#तू_ही_रे_माझा_मितवा...💖💖💖💖
#भाग_११
आज ऑफिसमधून येऊन वेदला थोडाच वेळ झाला होता तेवढ्यात ऋतूचा फोन आला.
“वेद,एक मदत हवी होती.”
“बोल ना”
“एक माहिती हवी होती,अभय C&S मध्ये आहे ना जॉबला?मला असं तू बोललेलं आठवतंय”
“हो, मी मागे म्हटलं होतं की तुला.का ग?”
“अरे रीमाताईने इंटरव्ह्यू दिला होता C&S मध्ये for Quality Control section ,उद्या बोलावलं आहे final discussion साठी, कंपनी विषयी थोडी माहिती हवी होती,means कंपनीचं वातावरण,ऑफर ह्यायला हवी की नाही थोडं guidance sort of you know.कंपनी पिरंगुटला आहे म्हणून थोडी काळजी वाटतेय,तिचं घर खराडीला आहे,relocate करायचं म्हणजे sure असायला हवं ना. ”
“ohh ठीक आहे,नो प्रॉब्लेम मी बोलतो अभयशी,नाहीतर एक काम कर ना,मला सांग ताई कुठे आहे आणि कधी बोलावलंय डिस्कशनसाठी?”
“ती माझ्याकडे आलीय,उद्या दुपारी १२ नंतर बोलावलंय”
“Great, मी अभ्याशी बोलतो आणि एक पाच मिनिटात फोन करतो.”
“ओके”
अभयशी बोलून त्याने लगेच तिला फोन केला.
“ऋतू, उद्या अभ्याची जनरलशिफ्ट आहे तो लवकर निघेन ताईला गरवारेजवळ थांबायला सांग.तो ताईला तिथे पिक करेल,मी अभ्याचा नंबर पाठवतो तो दे तिला. कंपनीपर्यंत सगळ्या शंका विचारून घेता येतील नाही का?
“Are you sure? म्हणजे त्याला असं त्रास द्यायला जरा awkward होतंय.”
“अरे don’t worry तुला माहितीय ना अभ्या किती कूल आहे,he is more like my big bro.. तो ताईला अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगेल.”
“ओके,done.”
************
रीमा पाच मिनिट थांबली नसेल तोच अभयची गाडी आली.फॉर्मल ड्रेस,माफक मेकअप,व्यवस्थितपणे बांधलेले दाट केस,चेहऱ्यावर शांत,सौम्य भाव.ऋतुच्या चेहऱ्याशी बऱ्यापैकी मेळ खाणारा चेहरा असल्याने अभयने बरोबर ओळखलं.
“Hi”
“Hi, Come in”
“Thanks Abhay”
“अरे Thanks काय,काही विशेष करत नाहीये मी.”
“Actually,ऋतुसोबत बोलतांना तुमचा रेफरन्स मिळाला म्हणून जरा डिस्टर्ब केलं.”
“एकतर ‘तुम्ही’ म्हणू नको,अभयच म्हण,आणि डिस्टर्ब वैगरे काय?”
“ नाही म्हणजे आताच ही ऑफर स्वीकारू की नको ह्या संभ्रमात आहे मी पण जे वर्क प्रोफाईल ते देत आहे ते माझ्या करियरच्या दृष्टीने विचार केला तर मला खूप फायदा होईल. you might be knowing जरा खाजगी आयुष्यात ही खूप उलथापालथ झाली आहे म्हणून मग विचार केला की नवीन काम,नवीन वातावरण यामुळे कदाचित मन गुंतून राहील वेगळे काही विचार येणार नाही. माझा कन्सर्न एवढाच आहे की लेडीजसाठी वर्किंग कल्चर कसं आहे? कंपनी दूर असल्याने थोडी काळजी वाटते.”
“हम्म,वेदने सांगितलं मला त्याबद्दल. ओके, सर्वात अगोदर तर कंपनीत खूप कमी लेडीज आहेत,अगदी मोजक्या आणि महत्वाच्या कामांनासाठीच सो तुला असं इतर कंपनीज सारखं छान लेडीज कल्चर अस बघायला मिळणार नाही पण C&S सारखी एम्प्लॉयीची काळजी खूप कमी कंपनीज घेतात मग तो कुठल्याही केडर किंवा जेन्डरचा असू दे.खूप शिकायला मिळतं इथे, विशेष म्हणजे आज सात वर्ष झाली मला ह्या कंपनीत आल्यापासून एकदाही कंपनी सोडायचा विचार मनात आला नाही. कंपनी खूप दूर आहे पण प्रत्येक शिफ्टला बस आहे त्यामुळे येण्याजाण्याचं बर्डन नाही.लेडीज सगळ्या जनरल शिफ्टमध्येच आहेत.मी सुद्धा बऱ्याचवेळा कंपनीच्या बसनेच जातो.मला वाटतं जर हे लोक चांगलं पॅकेज ऑफर करत असतील तर तू स्वीकारायला हवं.”
“ह्म्म्म,बघूया,मागचं सगळं विसरून जरा फ्रेश सुरुवात करायला छान संधी आहे. ”
अभयशी बोलून तिचा निर्णय बऱ्यापैकी पक्का झाला. त्याच्या गाडीच्या डॅशबोर्ड पडलेला एका badge वर तिचं लक्ष गेलं,तिचा चेहरा आनंदाने उजळला.
“हा badge ‘सह्याद्रीवेडे ट्रेकर्स,SV trekkers चा आहे ना? मी तर वेडी आहे ट्रेकिंगसाठी,लग्न झालं आणि त्याला आवडत नाही म्हणून सोडून दिलं होतं, पण यांचे सगळे ट्रेकिंग ब्लॉग्स नियमित वाचत असते मी आणि युट्युबवरचं सगळ्यात आवडतं चॅनेल आहे हे माझं,तूलाही आवडतं ट्रेकिंग?”
“आवडतं? अरे it’s my passion. मी सभासद आहे SV चा बऱ्याच वर्षापासून. माझे विकेंड,सुट्ट्या सगळ्या ह्या ट्रेकिंगसाठीच असतात.Hey !! you can join SV ladies special trekking group ,खूप मस्त ट्रेकिंग ग्रुप आहे,तुला हवं तर मी बोलतो लीडरसोबत.”
“Oh please !! it would be again a great help.”
“नक्की बोलतो आणि सांगतो तुला.waaw ट्रेकिंग म्हणजे माझ्यासाठी मेडीटेशन आहे.सह्याद्रीच्या कितीतरी आडवाटा धुंडाळून झाल्यात तरी सह्याद्री पुरून उरतोच. तुझा सगळ्यात आवडता गड कुठला?”
“हरीश्चंद्रगड! अगदीच to the point म्हणशील तर कोकणकडा. मला धो धो पावसात भिजणारा कोकणकडा बघायचाय त्यात आयुष्यातल्या सगळ्या कटू आठवणी स्वच्छ धुवून टाकायच्या आहे. तू इंद्रवज्र पाहिलंय इथे,काय फिलिंग असतं तेव्हा ?.” तिच्या डोळ्यात जणू कोकण कड्याचं सावरी धुकं साचलं होतं.
“इंद्रवज्र बघायची गोष्ट नाहीच,ते अनुभवायचं आणि पुन्हा अनुभवायला विसरून जायचं बस्स!! हरिश्चंद्रगड म्हणजे पहिलं प्रेम आणि कोकणकडा म्हणजे कम्प्लीट मॅडनेस आणि इथे येऊनही इंद्रवज्र पाहिलं नाही तर पुनर्जन्म घ्यावा लागेल इतकं कंपल्सरी. १८० डिग्री मधला इंद्रधनुष्य पाहून जीव ओवाळणारे तर ३६० डिग्री गोल इंद्रवज्र पाहून काय करतील याचा विचार न केलेलाच बरा.धुक्यावर आपल्या सावलीभोवती जेव्हा ते गोल इंद्रवज्र पडतं तेव्हा ह्या सात रंगाच्या कैदेत आपली सावली आहे आपण स्वतः नाही. हा विचार आला की आपल्याच सावलीविषयी इर्षा निर्माण होते. इंद्रवज्र तू बघच आयुष्यात एकदा.”
“होप सो...सगळं नीट होईल आणि मनाप्रमाणे आयुष्य जगता येईल.” दीर्घ श्वास घेत ती म्हणाली.
“नक्की सगळं नीट होईल...Don’t worry,Time is the best medicine ever.”
सह्याद्रीच्या गप्पा सह्याद्रीसारख्याच अवीट,बेलाग...वेळ कसा गेला,अनोळखीपणा कुठे विरून गेला दोघांनाही कळलं नाही.
**********
लंच ब्रेक संपून सगळे पुन्हा जागेवर गेले होते,तेवढ्यात घाईघाईने जय रेवाच्या डेस्कजवळ आला.ऋतू तिच्या कामात व्यग्र होती.
“रेवा,काय ग काय झालं? इतक्या घाईत का बोलावलं?कसला टिफिन द्यायचा होता?”
“अरे मघाशी डबा द्यायला विसरले मी तुम्हाला. हा ब्लू तुझा आणि हा रेड वेदला दे जातांना जरा.” त्याच्या हातात दोन टपरवेयर डबे देत ती म्हटली.
“काय ग काय आहे ह्यात?” त्याने डबे उघडून बघितले.
“अरे तुझ्यासाठी शंकरपाळे आहेत आणि वेदसाठी होममेड प्रोटीन्सबार्स.”
“मला नाही का प्रोटीनबार्स?” तो जरा ऋतूला ऐकू जाईल ह्या आवाजात बोलला.ऋतूच्या कानावर सगळं येत होतं ,पण तिने जराही लक्ष दिलं नाही.
“तो जिमला जातो,तू जातोस? तू जेव्हा साक्षात exercise करायला सुरुवात करशील ना तेव्हा नक्की बनवून आणेन.”
“ये , हा माझा घोर अपमान आहे”
“बरं ठीक आहे वेद्ला विचारून ह्यातल घे थोडं,ओके?”
“झालंच मग, वेद तू दिलेलं काहीच माझ्याशी शेयर करत नाही हे माहितीय ना तुला.” तो अजून मोठयाने नाटकीपणाने बोलला.
“बर बाबा सांगेन मी त्याला, आणि हो त्याला आत्ता आठवण करून दे कपडे इस्त्रीला टाकून पाच दिवस झालेत आणि आता परवा ट्रीपला निघायचं आहे,वेळेवर गोंधळ घालेल तो.
लिस्ट whatsapp करेल दोघांना व्यवस्थित पॅकिंग करा,तुझ्यावर विश्वास आहे रे पण तो वेंधळा आहे जरा,माझ्या घरी गडबड चालूये सध्या सो मला पर्सनली लक्ष घालता येणार नाही.तेव्हा तू त्याच्या पॅकिंगची काळजी घे काय?
“तू तुझी काळजी घे काय?का उगाच जगाचा भार वाहतेस ? तुला काय मिळणार आहे? मी बोललो असतो पण जाऊदे....”
“जय..सोड न विषय...”
“इतकी सेल्फलेस नको राहूस रेवा..जरा शिकत जा ना आजूबाजूला पाहून.” डोळ्यावरचा चष्मा निट करत तो म्हणाला.
“जय जा,काम बाकी नाहीत का तुझी?”
“जातोय..” ऋतूकडे तिरस्कारपूर्ण नजर टाकून तो निघाला.
*******
पार्किंगमध्ये ऋतू वेदची वाट बघत उभी होती.जयशी बोलत तो खाली आला.ऋतुजा नजरेच्या टप्प्यात आली तसं त्याने बॅगमधून टिफिन काढून वेदला दिला.वेदने तो बागेत टाकला.जरावेळ त्याच्याशी बोलून जय निघून गेला.
“ऋतू रीमाताईचा इंटरव्ह्यू झाला का?फोन झाला तुझा? अभ्याचा अजून मला काही कॉल नाहीये.” तो ऋतुजवळ आल्यावर बोलला.
“अजून थांबायला सांगितलंय ,अभय सोडणार आहे तिला घरी.” ती तुटकपणे म्हणाली.
रेवा वेदशी दाखवत असलेल्या सलगीने ती जरा नाराज होती ,खरचं आपल्यापेक्षा रेवा वेदसाठी योग्य आहे का? आपल्यापेक्षा जास्त प्रेम,काळजी तिला आहे का? तिच्या मन प्रश्नांच्या द्वंद्वात अडकलं.
“काय झालं? इतकी ऑफ का वाटतेय?” त्याने काळजीने विचारलं.
“वेद..ते आता जयने तुला टिफिन दिला ना? मघाशी रेवाने दिला होता त्याच्याकडे.” ती चाचरत म्हणाली.
“हो,काहीतरी खाण्याचं असेल,ती बनवत असते असच काहीतरी....का गं? तो सहजपणे म्हणाला.
“..आणि तुझ्या बॅग पॅकिंगबद्दल ही ती बोलत होती.” त्याच्याकडे बघायचं टाळलं ती बोलली.
“मग ?” तिचा हे विचारण्याचा हेतू न कळल्याने त्याने आश्चर्याने तिला विचारलं.
“मग म्हणजे?..इतकं पर्सनल की तुझे कपडे इस्त्रीला कधी दिलेय,किती दिलेय सगळं माहित आहे तिला.”
“तुला म्हणायचं काय आहे ऋतू स्पष्ट बोल,मी जेवतांना कधीतरी सहज बोलून गेलो असेल की माझे तर कपडे इस्त्रीवाल्याकडे अडकले आहे वैगरे.तिने आठवण करून दिली असेल,बास..त्यात काय आणि तिने मला आणि जय दोघांना हे सांगितलंय.मी सांगत नाही तिला की मला आठवण करून दे किंवा मला हे असं काही बनवून दे,तिने काय केलं,काय बोलली ह्याला मी कसा जबाबदार असणार?” तो वैतागत म्हणाला.
“Sorry but she is trying to get too personal with you Ved.तिचे इंटेन्शन मला ठीक वाटत नाही ”ती सुद्धा तेवढ्याच नाराजीने म्हणाली.
“ऋतू तिला माझ्या तुझ्याबद्दल असलेल्या सगळ्या फिलिंग्स माहित आहे,ती तर infact खूप खुश आहे आपल्या दोघांसाठी.ती तुझ्याबद्दल काही असा विचार कधी करत नाही,तुला काय प्रॉब्लेम आहे तिचा?मला इतर काही सांगू नको हे सांग माझे इंटेन्शन तरी ठीक वाटतात न तुला?” त्याचा रागाचा पार जरा चढला होता.
तो चिडलेला पाहून ती जरा भानावर आली.रेवा विरुद्ध बोलायला आत्ता तरी काही ठोस मुद्दे आपल्याकडे नाही म्हणून तिने जरा पडती बाजू घेत परिस्थिती सांभाळायचा प्रयत्न केला.
“वेद..चिडू नको, स्टुपिड तुला माहितीय ना मी तुझ्यासाठी थोडी पझेसिव्ह आहे.”लाडाने त्याचे केस विसकटून ती म्हणाली.त्याने चिडून तिचा हात बाजूला केला,केसांमध्ये बोटं घालून केस निट केले.
“फक्त पझेसिव्ह राहू नको जरा विश्वास पण ठेव माझ्यावर.” तो कोरडेपणाने म्हणाला.
“ओके,सॉरी बोलतेय ना आता.” कान पकडत ती म्हणाली.
“ठीक ये” त्याने हसून तिच्या गालावर एक हलकीशी चापट मारली.
‘हा स्टुपिड उगाच एवढा हँडसम दिसतो,रेवा तरी काय करणार’ त्याच्याकडे बघत ती मनात म्हणाली.
“what? निघायचं ना?
“हो” म्हणत तिने गाडी स्टार्ट केली.
क्रमशः
©हर्षदा
स्टे ट्यून गाईज.....