(आपण मागच्या भागात पाहिलं की...
राधिका- "खुप मोठी झालंयस का गं तू आता... आहेस शेंडेफळ पण खुप मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस... आणि तुमच्यामुळे माझं कसलं आलंय गं नुकसान...? काहीही बोलत असतेस... खुप उशीर झालाय... झोप आता गूपचूप, वेडी कुठली..."
तशी सोनाली हसू लागली... राधिकाने सोनालीच्या केसांवरून हात फिरवला... आणि सोनाली तिच्या अंगावर पाय टाकून झोपून गेली... राधिकाला पण उशीरा कधीतरी झोप लागली....
आता पुढे...)
आज सकाळी राधिकाला जागही लवकरच आली. ती आंघोळ वगैरे आटोपून किचन मध्ये जाऊन टिफीनची तयारी करू लागली. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता... कालचं सगळं आठवून ती एकटीच हसत होती. मेघा आणि मीरा देखील राधिकाला मदत करण्यासाठी किचन मध्ये आल्या...
मीरा- "ताई आज तू एवढ्या लवकर उठलीस...?"
मेघा- "अगं मीरू ताई आता लग्न करून सासरी जाईल ना... मग तीथे उशीरा उठून कसं चालेल...? म्हणून ताई आता लवकर उठण्याची प्रॅक्टिस करतेय... हो ना गं ताई..."
आणि दोघीही एकमेकींना टाळी देऊन हसायला
लागल्या... राधिकाने दोघींचाही कान पकडला...
"ताई... अगं सोड ना दुखतोय कान..." दोघीही म्हणू लागल्या...
राधिका- "मोठ्या बहीणीची मस्करी करताय काय...? खूप बोलायला लागलेत आता तुम्ही दोघी..."
आई आणि सोनाली पण किचनमध्ये आल्या...
आई- "काय गोंधळ चाललाय गं तुमचा सकाळीच...? आणि राधी आज तू कशी काय एवढ्या लवकर उठलीस...? आज सुर्य पश्चिमेला उगवला की काय...?"
आई हसतच म्हणाली. तशा मीरा, मेघा, सोनाली तिघीही हसू लागल्या... राधिका त्यांना मोठे डोळे करून बघू लागली...
राधिका- "आई काय गं तू पण माझी मस्करी करतेस ना... आणि मी काय लवकर उठू शकत नाही का...?"
आई- "हो गं माहिती आहे मला... आणि हे असं एक दिवस लवकर उठून चालणार नाही... आता रोजच लवकर उठावं लागेल तूला ... तुझ्या सासरी काही मी नसणार सगळं करून द्यायला कळलं ना...?"
राधिकाने आईला मागून जाऊन मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं....
राधिका- "अगं आई कळतंय मला सगळं... खुप काळजी वाटते ना तूला माझी, म्हणून असं बोलतेस ना... आणि हो उद्यापासून बघच तू मी रोजच लवकर उठत जाईन..."
आई- "हो गं राधिका बाई... ठिक आहे आता ते उद्या बघूच लवकर उठते की मला उठवावं लागते ते... आणि आता चला तुमचे लाड पुरवून झाले असतील तर... मला पण तुझा डबा भरू दे आणि तू पण जाऊन तयारी कर..."
राधिका तयारी करून शाळेत निघून गेली... ती शाळेत आली तेव्हा समोरच अजय आणि अर्चना दोघेही उभे होते... राधिकाने छानशी निळ्या रंगाची साडी नेसली होती... तीला तो निळा रंग खूप उठून दिसत होता... ती खुपच सुंदर दिसत होती... तीने अर्चनाला स्माईल दिली... तिने अजयकडे पाहीलं तर तो राधिकाला एकटक बघतच राहिला होता... राधिकाने अजयला छानशी स्माईल दिली... दोघीपण त्याला बघून हसत होत्या...
अर्चना- "राधिका तू एवढी छान तयार होऊन येत नको जाऊस गं... मग माझ्या भावाला आजूबाजूच्या जगाचं काही भानच राहत नाही... बहीणीलाही विसरून जातो तो..." आणि दोघीही त्याला हसू लागल्या... अजयलाही तिचं बोलणं ऐकून हसू आलं...
-------------------------------------------------------------
राधिका आज वर्गात मुलांना प्राण्यांचं महत्त्व समजावून सांगत होती... मुलं लक्ष देऊन ऐकत होते... नंतर राधिकाने मुलांना विचारले, "मुलांनो तुमचा आवडता प्राणी कोणता...? चला एकेकांनी सांगा बरं"
मुलं उभे राहून एकेक प्राण्याचं नाव सांगत होते... कोणी घोडा सांगितलं तर कोणी कुत्रा, कोणी गाय, ससा, मांजर अशी वेगवेगळ्या प्राण्यांची नावे मुलांनी सांगितली...
राधिका- "प्रत्येकाने आपल्या आवडत्या प्राण्यावर निबंध लिहून आणायचा..."
तसं मुलांनी विचारलं, "बाई निबंध कधी लिहून आणायचा...?"
राधिका- "आज लिहा किंवा उद्या लिहून आणा."
तसं एक मुलगा उठून उभा राहिला आणि म्हणाला, "बाई मला तर घोडा हा प्राणी आवडतो..."
राधिका- "हो का छान... मग त्याच्यावरच निबंध लिह ना... "
मुलगा- "बाई पण मला घोड्याची भिती वाटते, मी त्याच्यावर निबंध लिहीत असताना, त्याने मला लाथ मारून उडवलं तर...?"
हे ऐकून वर्गातली सगळी मुलं जोरजोरात हसायला लागली... राधिकालाही हसू आलं. तिने सगळ्या मुलांना शांत केलं... आणि त्या मुलाला जवळ बोलवलं...
राधिका- "तुझ्याकडे पाटी आणि पेन्सील आहे ना..."
मुलगा- "हो बाई आहे."
राधिका- "मग त्या पाटीवर तुझ्या आवडत्या प्राण्याविषयी लिहून घेऊन ये... तो प्राणी कोणत्या रंगाचा असतो, तो तूला का आवडतो... असं पाटीवर लिहून घेऊन ये... समजलं बाळा..."
मुलगा- "हो बाई समजलं..." आणि तो जागेवर जाऊन बसला.
राधिकाला त्या मुलाचं बोलणं आठवून हसू येत होतं. मधली सुट्टी झाली तशी मुलं धावतच खेळायला बाहेर निघून गेली... राधिका हसतच स्टाफरूममध्ये निघून आली.
अर्चना- "काय गं काय झालं... एकटीच का हसतेस...?"
राधिकाने तिच्या वर्गातला प्रसंग सांगितला, ते ऐकून सगळे शिक्षक हसू लागले... सगळ्यांच्याच गप्पा चालू होत्या...
राधिका- "अजय मला महत्त्वाचं थोडं बोलायचं होतं तुझ्याशी..."
अजय- "अगं मग बोल ना... काय बोलायचं आहे ते..."
राधिका- "इथे नको... इथे बोलता नाही येणार आपण नंतर बाहेर भेटून बोलूया..."
अजय- "ओके... चालेल..."
अर्चना- "ओ हो... म्हणजे आता अजयसोबत तुला माझ्यासमोर नाही बोलता येणार का...? तुमच्या दोघांमध्ये मी आता "कबाब में हड्डी" झाली हो ना..."
ती बारीक तोंड करत म्हणाली.... अजय तीला हसू लागला....
राधिका- "नाही गं तसं काही नाही... तू तर कायम आमच्या सोबत हवी आहेस..."
अर्चना- "हम्म तसं असेल तर ठीक आहे मग..." राधिका आणि अजय दोघेही तीला हसू लागले.
शाळा सुटल्यावर तिघेही एका बागेत येऊन बसले...
अजय- "राधिका, बोल काय बोलायचं होतं तुला...?"
राधिका- "बोलते मी, पण प्लीज माझ्याबाबतीत तू गैरसमज करुन घेऊ नकोस..."
अजय- "अगं मी का गैरसमज करुन घेऊ... तू स्पष्टपणे बोलशील का नक्की काय झालंय ते...?"
अर्चना- "हो राधिका, नक्की काय प्राॅब्लेम झालाय सांगशील का...? म्हणजे तुझे आई बाबा तुमच्या लग्नासाठी नाही बोलले का...?"
राधिका- "नाही गं अर्चू असं काही नाहीये..."
तिने दोघांनाही कालचा घरी घडलेला सगळा प्रसंग सांगितला... ते ऐकून दोघेही हसू लागले...
राधिका- "अजय, खरं तर आमच्या घरात मी कमवणारी एकटीच आहे... माझ्यामागे अजून तीन बहीणी आहेत. त्यांचं शिक्षण, त्यांच्या भविष्याचं मलाच सगळं बघायचं आहे... बाबा पण आजारीच असतात हे माहीती आहे ना तूला..."
अजय- "आलंय माझ्या लक्षात तुला काय बोलायचं आहे ते... राधिका एक सांगू तूला खरं तर मी खुप नशिबवान समजतो स्वतःला की तू माझ्या आयुष्यांत आलीस... कारण तू फक्त स्वतःचं सुख नाही बघत, तर तुझ्या घरच्यांच्याही सुखाचा तेवढाच विचार करतेस, हाच तुझा स्वभाव आवडतो मला...
आणि आता एक लक्षात ठेव राधिका, आता तुझे सगळे प्राॅब्लेम्स, जबाबदार्या, तुझे कर्तव्य सगळे माझे असतील... आपण दोघे मिळून तुझ्या घरची सर्व जबाबदारी पार पाडायची... आता तू एकटी नाहीस... मी पण तुझ्या सोबत आहे, कळलं का..."
अजयचं ऐकून अर्चनाला त्याचं खूप कौतुक वाटत होतं... त्याच्या खांद्यावर तिने हात ठेवला आणि म्हणाली...
अर्चना- "अजय खरंच आज मला मनापासून अभिमान वाटतो तुझा की तू माझा भाऊ आहेस..."
अजयचं सगळं बोलणं ऐकून राधिकाच्या डोळ्यांत पाणी आलं...
अजय- "अगं रडूबाई रडतेस काय... आणि आता तूला कधीच रडायचं नाहीये... तुला फक्त आनंदात राहायचं आहे... कळलं का... आता तू एकटी नाहीयेस मी पण तुझ्या सोबत आहे..."
अर्चना- "आणि मला विसरलास का तू...?" ती लटका राग दाखवतच म्हणाली.
अजय- "नाही गं माझी बहिणाबाई तूला कसा विसरेन मी...? मी नाही सांगितलं तरी तू आम्हा दोघांची साथ सोडणार आहेस का...? तू फेव्हीकोल सारखी नेहमी आम्हाला चिटकूनच राहशील... फेव्हीकोल का मजबूत जोड है तू..." तो हसतच म्हणाला. अर्चना त्याच्या हातावर फटके मारू लागली... राधिकाही हसू लागली... तिला मनातून खूप समाधान वाटत होतं...
अजय- "आणि हो राधिका, रविवारी आम्ही तुझ्या घरी येणार आहोत तुझ्या बाबांना बघायला.... तेव्हा या विषयावर मी स्वतः तुझ्या आईबाबांशी बोलेन... तुझा विश्वास आहे ना माझ्यावर...?"
राधिका- "हो अजय माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर..."
अजय- "बरं ठिक आहे मग, सगळं काही नीट होईल तू काळजी नको करूस... आणि याबाबतीत तू माझ्या आईबाबांचंही टेन्शन घेऊ नकोस... कारण त्यांनाही या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नसेल, विश्वास ठेव माझ्यावर... आणि तू फक्त खुश रहा बस, कारण तू खुश तर मी पण खुश..."
अर्चना- "अगदी खरंय अजय तुझं... राधिका तूला आता कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये... आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत कळलं, आता छानशी एक स्माईल दे बघू..." ती हसतच म्हणाली. राधिकानेही गोड स्माईल दिली...😊😊
अर्चना- "छान आणि आता अशीच नेहमी हसत रहा कळलं... चल आम्ही घरी जायला निघू आता, माझा लाडू माझी वाट बघत असेल.... " ती हसतच म्हणाली.
राधिका- "ओके, ठिक आहे... चालेल."
आणि तिघांनीही एकमेकांचा निरोप घेतला...
-------------------------------------------------------------
रात्र झाली... अजय आणि त्याचे आईबाबा गप्पा मारत बसले होते...
अजय- "आई बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं..."
बाबा- "अरे मग बोल ना... काय बोलायचं होतं...?"
राधिकासोबतचं झालेलं सगळं बोलणं अजयने आईबाबांना सांगितलं...
बाबा- "आमची काहीच हरकत नाही बाळा... तीच्या घरूनपण होकार मिळाला हि आनंदाचीच गोष्ट आहे... आणि हे बघ ती पोरगी लग्न झाल्यावर आपलं सगळं घरदार सोडून आपल्या घरची मुलगी बनून आपलं सगळं घरदार सांभाळणार, आपली काळजी घेणार... मग तुही तिच्या घरच्यांना आपलं मानून त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करणं, यांत काय चुकीचं आहे सांग... ती लग्न करून आपल्या घरी आली म्हणून तिचं तिच्या माहेरच्या माणसांशी नातं तुटत तर नाही ना... आणि त्यांतच आपल्याला एक नवीन कुटुंब मिळेल... बरोबर ना..."
आई- "हो अगदी बरोबर बोललात तुम्ही... आणि माझी पण काहीच हरकत नाही... तिचं कुटुंब म्हणजे तुझं कुटुंब समजून तू तिच्या सोबत उभा रहा... उलट आम्हाला तुमचा दोघांचा अभिमानच वाटेल... आणि हो तिच्या घरून पण आता होकार मिळालाय... मग आता पुढची बोलणी करायला काहीच हरकत नाही..."
अजय- "आई बाबा खरंच मी खुपच नशीबवान आहे... तुमच्यासारखे समजदार आणि प्रेमळ आईबाबा मला भेटले... खुपच समजून घेतात तुम्ही मला..."
बाबा- "अरे तुला समजून घेणार नाही तर आणखी कोणाला घेऊ... तू खुश तर आम्ही खुश... तुझ्या सुखातच आमचं सुख आहे... हो ना गं सावी..."
आई- "हो अगदी बरोबर बोललात तुम्ही...."
आईबाबांचं बोलणं ऐकून अजयला खुप छान, आणि मनालाही तेवढंच समाधान वाटत होतं...
क्रमशः-
💕💕 @Ritu Patil... 💕💕
💕💕 प्रेमगंध... 💕💕
🌿🥀🌾🌿🥀🌾🌿🥀🌾🌿🥀🌾🌿🥀🌾🌿
------------------------------------------------------------------------