Premagandha ... (Part-14) in Marathi Love Stories by Ritu Patil books and stories PDF | प्रेमगंध... (भाग - १४)

Featured Books
Categories
Share

प्रेमगंध... (भाग - १४)

(आपण मागच्या भागात पाहिलं की,
अजय- "राधिका... तू मला खूप आवडतेस... लग्न करशील का माझ्याशी...?"
दोघीही एकमेकींकडे बघू लागल्या... थोडा वेळ दोघीही चेहर्‍यावर काहीही हावभाव न आणता शांतच उभ्या होत्या. अजयला तर चांगलाच घाम फुटला होता. तो खुप घाबरला होता... तो मनातच विचार करत होता की आता राधिका चिडेल आणि रागाने निघून जाईल... त्याने खिशातून रूमाल काढला आणि चेहर्‍यावरचा घाम पुसू लागला... त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती... तो राधिकाच्या बोलण्याची वाट बघत होता... आता पुढे...)

राधिका- "अजय, मला अजिबात वाटलं नव्हतं की माझ्याबद्दल तू असा काहितरी विचार करत असशील... मी तुला किती चांगला मित्र समजत होती रे आणि किती विश्वास होता माझा तुझ्यावर... आणि तू... जाऊ दे मला पुढे काही बोलायचंच नाहीये... आजपासून आपली मैत्रीपण कायमची संपली समजलं..."

अजय राधिकाचं बोलणं ऐकून तर एकदम सुन्नच झाला... त्याला तर आजुबाजूचं जग सगळं गोलगोल फिरतंय असं वाटायला लागलं... तो खूप टेन्शन मध्ये आला. त्याला तर काय बोलावं काही कळतच नव्हतं. तो तसाच राधिकाकडे पाहत उभा होता.

राधिका- "अर्चू, मला वाटलं नव्हतं, अजयच्या मनात माझ्याबद्दल असं काहीतरी असेल... मी खरंच त्याचं हे ऐकून अगदी शाॅक झालंय गं... आपली दोघींची मैत्री अशीच राहील पण मी यापुढे आता अजयसोबत मैत्री नाही ठेऊ शकत..."

एवढं बोलून राधिका जायला निघाली... अजयने पटकन तिच्या समोर येऊन तिला थांबवलं. आणि म्हणाला...

अजय- "राधिका, प्लीज अशी रागवून जाऊ नकोस. हवं तर मी तुझी माफी मागतो. पण प्लीज आपली मैत्री तोडू नकोस. मला वाटलं की तुझंही माझ्यावर प्रेम आहे... साॅरी माझा गैरसमज झाला तो... ह्याच्यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही... प्राॅमिस... पण प्लीज अशी रागवून जाऊ नकोस..."

अजयला खुप वाईट वाटलं होतं. तो मनातून पार तुटुन गेला होता... तो चुपचाप मान खाली घालून उभा होता... अर्चना मात्र शांतपणे दोघांकडे बघत उभी होती... राधिकाने अजयचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले... तसं अजयने पटकन तिच्याकडे पाहीलं... अजयचे डोळे पाण्याने भरले होते... त्याचा एक अश्रूचा थेंब टपकन राधिकाच्या हातावर पडला... तिने ते पाहीलं...

राधिका- "अजय तू रडतोयस...? अरे साॅरी... खरंच माफ कर मला... माझ्यामुळे तू दुखावला गेलास... मला तुला असं टोचून बोलायला नको हवं होतं... मी तर फक्त तुझी गम्मत करत होते..."

क्षणभर तर अजयला काही कळतच नव्हतं... राधिका काय बोलतेय ते... त्याने एकदा अर्चनाकडे पाहीलं तर ती तोंडावर हात ठेवून गुपचुप हसत होती... नंतर राधिकाकडे पाहीलं तर राधिकाही गालातल्या गालातच हसत उभी होती. आता त्याला थोडं थोडं लक्षात येत होतं...

अजय- "राधिका कसली गम्मत सांगतेस तू...? मला समजेल असं बोलशील का प्लीज... आणि अर्चू काय चाललंय तुझं, कधीशी पाहतोय मी तुला तू सारखी हसतेस..."

अर्चना- "खरंच रे देवा... माझा भाऊ अगदी भोळासांब आहे खरंच... अरे कसं कळत नाही तुला... गम्मत करतेय ती तुझी..."

अजय- "म्हणजे... नीट सांगशील का मला काय ते...?"

अर्चना- "अरे शाळा सुटली ना तेव्हा राधिकाला भेटायला मी तिच्या वर्गात गेले होते..."

थोड्या वेळापूर्वी...

राधिका- "अगं अर्चू, ये ना आणि मी येतच होती गं आता बाहेर ... आणि मला एक कळत नाही की एवढं काय महत्वाचं बोलायचं आहे तुला माझ्याशी...? आपण मघाशीपण बोलू शकलो असतो ना..."

अर्चना- "राधिका मला नाही, खरं तर अजयला बोलायचं आहे तुझ्याशी..."
राधिका- "अजयला...? आणि कशाबद्दल बोलायचं आहे त्याला माझ्याशी...?"

अर्चनाने राधिकाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले... आणि ती म्हणाली...
अर्चना- "राधिका तुला तर माहीतच असेल ना की अजय तुझ्यावर खुप प्रेम करतो ते... हो ना..."

हे ऐकून राधिका लाजली... तीने मान खाली घातली..
राधिका- "हो माहीती आहे मला..." 😌
अर्चना- "आणि मला हेही माहिती आहे की तुझंही अजयवर प्रेम आहे, हो ना..."

"हम्म..." तीने मानेनेच होकार दिला... 😌

अर्चना- "तुला माहिती आहे राधिका, तु आमच्या घरात सगळ्यांनाच आवडली आहेस... अजयचे आईबाबा तर म्हणतात की आमच्या घरची सून म्हणून फक्त राधिकाच येणार बस... आणि आम्हा सगळ्यांनाच तुमच्या दोघांच्या लग्नाची खुपच उत्सुकता लागली आहे... फक्त अजय तुला कधी प्रपोज करेल ह्याच गोष्टीची सगळे वाट बघत आहेत... आणि अजयचा स्वभाव तर तुला माहितीच आहे... खुप शांत आहे तो आणि तुला विचारायला तर खुपच घाबरतो तो. त्याला वाटते की विचारलं तर कदाचित तू त्यालाही छत्रीने मारशील..." ती हसतच म्हणाली. तशी राधिकाही तोंडावर हात ठेवून हसू लागली...

अर्चना- "आज तेच विचारणार आहे तुला तो... तुझा होकार आहे ना लग्नासाठी..."
"हम्म..." राधिकाने लाजतच होकार दिला... 😌

अर्चना- "पण तू मात्र त्याला अजिबात होकार द्यायचा नाही... स्पष्टपणे नकार द्यायचा बस..."

राधिका आश्चर्याने तिच्याकडे बघू लागली... अर्चना तीला तसं बघून हसू लागली...

अर्चना- "अगं घाबरू नकोस, मी काही खरोखरच नकार द्यायला सांगत नाही त्याला... आपण थोडीशी गम्मत करू त्याची बस बाकी काही नाही..."
राधिका- "म्हणजे... कसली गम्मत सांगतेस तू...?"

नंतर अर्चनाने तिला सगळा प्लॅन समजावून सांगितला...
राधिका- "काय... अगं हे काय बोलतेयस तू...? मी असं काही नाही करणार हं... मला नाही जमणार हे....?"

अर्चना- "ओ हो म्हणजे आमच्या होणार्‍या वहिनीसाहेबांना पण लगेच होकार देण्याची खूप घाई झालंय वाटतं..."

ती हसतच म्हणाली... वहिनीसाहेब हा शब्द ऐकून राधिकाला खूप लाजायला झालं... 😌😌😊🤗

अर्चना- "ओ हो कुणीतरी खूप लाजतंय..."

राधिका- "ए काय गं अर्चू तू पण... खरंच हे असं खोटं खोटं नाटक करायला मला नाही जमणार गं..."

अर्चना- "अगं थोडीशी गम्मत करून बघू आपण अजयची... आणि असं पण म्हणतात ना की एखादी गोष्ट आपल्याला सहजच मिळाली की त्याची किंमत नाही राहत म्हणून... मग थोडा वेळ त्याला पण तडपू दे ना तुझ्यासाठी..." ती हसतच म्हणाली. 😁😁

राधिका- "अर्चू किती विचित्र आहेस गं तू... नक्की अजयचीच बहीण आहेस ना तू...?"

अर्चना- "कोई शक..." आणि दोघीपण हसू लागल्या...

आता...

अर्चना- "तर असा सगळा आमचा प्लॅन होता... कसा वाटला माझा प्लॅन... मज्जा आली ना... पण अजय मला वाटलं नव्हतं की तू रडशील असं, त्यासाठी खरंच साॅरी, तुझ्या लहान बहीणीला माफ नाही करणार तू...." तिने तिचे दोन्ही कान पकडले.

अजय- "अर्चू... ते माहिती ना... आपण बेडकांना दगड मारतो तेव्हा आपला खेळ होतो पण बेडकांचा मात्र जीव जातो, तशातली गत करून टाकली तुम्ही दोघींनी पण माझी... तुम्ही दोघी पण नौटंकी आहात खरंच... दोघींनी मिळून पुर्णपणे माझी वाटच लावली होती..."

अर्चना- "साॅरी ना अजय... आणि मी असताना कशी काय वाट लागेल तुझी...? मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी..." आणि तिघेही हसू लागले... 😅😅

अजय- "पण राधिका तू अजून काहीच बोलली नाहीस मला... म्हणजे मी होकार समजू का तुझा...?"

राधिका- "अजय मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला... आणि माझ्या आईबाबांचं सांगशील तर त्यांचीही काहीही हरकत नसेल आपल्या लग्नासाठी..."
ती खाली मान घालून लाजतच म्हणाली...

राधिकाला लाजताना बघून तो गालातल्या गालातच हसत होता. त्याला तर स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तिचा होकार ऐकून तो खुपच खुश झाला होता...

राधिका- "साॅरी अजय, माझ्यामुळे तुला त्रास झाला... मला तुला दुखवायचं नव्हतं... पण..." आणि ती हसतच अर्चनाकडे बघू लागली...

अजय- "काय करणार ना तू पण... जिथे माझी बहीणच माझी दुश्मन झालंय... घरी गेल्यावर बघतोच तिला मी..."
अर्चना तोंडावर हात ठेऊनच हसत होती...

अर्चना- "अरे मेरे भाई... तुमचं दोघांचं लग्न झालं तर सगळ्यांत जास्त मलाच आनंद होईल ना... अशी कशी दुश्मन असेन मी तुझी...? पण माझ्या प्लॅनमुळे तुमच्या लव्हस्टोरी मध्ये मस्त एक ट्विस्ट आला ना..."

अजय- "हो ताईसाहेब, हे अगदी खरं आहे तुमचं... हा ट्विस्ट आयुष्यभर मी कधी विसरू शकणार नाही... आणि आता असे प्लॅन करण्याचे तुम्ही कष्ट नाही घेतले तरी चालेल..." यांवर तिघेही हसू लागले... 😅😅😅😅

अर्चना- "मग कधी जायचं आपण राधिकाच्या घरी लग्नाची बोलणी करायला...?"

अजय- "आपल्या घरी तर काही प्राॅब्लेम नाही... सगळ्यांनाच राधिका पसंत आहे... पण राधिकाच्या घरी...."

राधिका- "मी आईबाबांशी आधी बोलते आणि नंतर सांगते तुम्हाला...."
अजय- "बरं ठिक आहे..."
अर्चना- "चला माझा भाऊ आणि मैत्रीण दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार तर... खरंच मी आज खुप खुप खुश आहे..." दोघेही लाजत होते...😌😌😊

अर्चना- "आता दोघेही लाजतच बसणार आहेत की घरी पण जायचं आहे दोघांना... की इथेच वस्ती करायचा विचार चाललाय..." अजय आणि राधिका हसू लागले...

अजय- "राधिका... मला ते टिव्ही मध्ये दाखवतात तसं हातात फुल घेऊन, गुडघ्यावर बसुन प्रपोज नाही करता येत... आणि ते चंद्र तारे तोडणं तर माझ्याने नाही होणार..." तो हसतच म्हणाला... 😄😄
"हा पण मी तुझं मन कधीच दुखावणार नाही... तूझी कधीच साथ सोडणार नाही... पण येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात तू मला साथ देशील ना...?" तो सिरीयस होत म्हणाला...

राधिका- "हो अजय, नक्कीच... माझं सुख ते तुझं सुख असेल आणि तुझं दुःख ते माझं दुःख असेल... प्रत्येक सुखदुःखात साथ देईन मी तुला... मी पण कधीच साथ सोडणार नाही तुझी..."

अर्चनाने डोक्याला हातच लावला...🤦🤦
अर्चना- "अरे देवा... अहो love birds... अजून काही प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या असतील तर ते पण घेऊन टाका इथेच... म्हणजे ब्राह्मणाला बोलवून इथेच सात फेरे आणि सात वचनं घेऊन लग्न पण लावून टाकते दोघांचं..."

अजय- "कबाब मे हड्डी..." तशी राधिका हसू लागली...😁
अर्चना- "अच्छा म्हणजे मी आता तुला कबाब मे हड्डी वाटतेय हं... आता असा प्लॅन करेन ना की बघच तू पुढे..." ती कमरेवर हात ठेवतच म्हणाली...

अजय- "नको गं माझे माते तुझे प्लॅन मला खुप महागात पडतात... त्यापेक्षा आपण घरीच जाऊ चला..." तो तिला हात जोडतच म्हणाला... तशा दोघीही हसू लागल्या...😀😀 नंतर अजयने राधिकाच्या हातात एक पिशवी दिली...

राधिका- "हे काय आहे अजय..."
अजय- "तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आहे... पहिल्यांदाच असं मुलीला गिफ्ट देतोय... काही सुचत नव्हतं मला काय गिफ्ट आणू ते... तुझी आवडनिवड नाही माहिती मला.... पण यांत जे काही आहे... ते तुला नक्कीच खुप आवडेल... प्लीज नाही म्हणू नकोस..."

राधिकाने ते गिफ्ट घेतलं...
राधिका- "थँक्यू अजय..." आणि एकमेकांचा निरोप घेऊन तिघेही आपापल्या मार्गाला निघून गेले...

क्रमशः-

💕💕@Ritu Patil 💕💕

💕💕 प्रेमगंध... 💕💕
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
-------------------------------------------------------------