मैत्रीण
प्रत्येक वक्तीच्या काही ना काही आठवणी असतात. त्या खूप गोड असतात. त्या आठवणी जरी आपल्याला कधी आल्या तर आपण तासन तास त्या मधून बाहेर येत नाही त्या मध्ये पूर्ण पणे गुंतून जातो. माझ्या हि काही अशाच आठवणी आहे. त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण सर्वात आधी मी माझी ओळख करून देतो माझं नाव प्रेम मी मूळचा वसई चा पण पुण्यात माझे इंजिनिअरींग साठी आडमिशन झाले आणि पुण्यातच माझे मामा हि राहत होते. हि गोष्ट आहे २०१६ मधली. मी पुण्यातील एक इंजिनिअरींग कॉलेज साठी ऍडमीशन घेतले होते आणि त्या दिवशी आमचे सगळे कागत पत्र जमा करत होते. त्याच वेळेस मी असेच म्हणालो कि माझ्या शाखेचे कोणीच दिसत नाही. पण माझा मागे एक मुलगी होती ती म्हणाली अरे तुझ्या समोरची मुलगी आणि तुझी शाखा एकाच आहे. कदाचित ती मुलगी तिची मैत्रीण असावी. मी म्हणालो हो का ...?
ज्या मुलीची शाखा आणि माझी शाखा(इन्स्ट्रुमेंटशन) एकच होती तिची माझी तेव्हा ओळख नाही झाली. आम्ही सगळ्या नि इंजिनिअरींग च्या दुसऱ्या वर्षी साठी प्रवेश घेतला होता. आणि आमची शाखा हि इन्स्ट्रुमेंटशन हि होती. मी माझे कागद पत्र विद्यलयात जमा केले आणि बाहेर आलो. मला एक वक्ती चे वडील दिसले आणि ते माझ्या कडे आले आणि म्हणाले कि इथे कुठे वसतिगृह आहे का मुलीनं साठी मी म्हणालो..... तुम्हाला कदाचित बाहेर विचारावे लागेन मला हि जास्त माहित नाही. तेव्हा ते म्हणाले तू पण ऍडमीशन घेतले का? मी त्यानां म्हणालो हो... ते म्हणाले माझी पण मुलींनी घेतले आहे. आणि तिच्या साठी मि वस्तीगृह पाहत आहे. आमच्या खूप वेळ गप्पा मारून झाल्यावर ते तिथून निघाले कारण त्याच्या मुलीचे पण कागद पत्र हे जमा करून झाले होते. आणि जी माझ्यात समोर मुलगी उभी होती मघाशी ,जिची आणि माझ्या शाखा एकच होती ती हीच होती.
तीच आणि माझं ऍडमीशन मागे पुढे असल्या मुले आमचे रोल नंबर पण मागे पुढे च आले होते. म्हणून आमची मैत्री वाढली होती. आम्ही सगळे काम एकत्र येऊन पूर्ण करायचो मग ते प्रोजेक्ट असो किंवा नोट्स लिहून असो. आम्ही अभ्यास पण सोबत करायचो. कॉलेज मध्ये तर मुलाचा समज असा झाला कि आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे. सगळे आमच्या कडे त्याच नजरेने पाहत असे.
तीच नाव रिया होते. माझ्या मित्रपरिवार मध्ये तर मला तिचा नावाने चिडू पण लागले होते. हि तिला मी एकदा सांगिले तेव्हा ती पण हसत होती. तेव्हा मी तिला म्हणालो आपण बाहेर बोलत जाऊ आता नको बोलायला.
पण तिला हे आवडलं नाही. ती म्हणाली लोक पायी चालून देत नाही आणि बसून हि चालू देत नाही. आपल्या ला माहित आहे ना आपण फक्त एक मेकाचे चांगले मित्र आहोत . तिने खूप समजून पण सांगितले तरी पण मी थोडं इग्नोरं करत असे. आणि तिच्या सोबत मुलानं समोर बोलणं टाळत पण हे तिला वाईट वाटत होत कारण ती कॉलेज मध्ये फक्त माझ्याशी जास्त बोलत असे. नंतर मी सोडून दिले कि लोक काय म्हणेल याच आणि आम्ही सोबत राहू लागलो.कॉलेज ला सोबत जाऊ लागलो येऊ लागलो. असे एक वर्ष पूर्ण झाले आणि आम्ही तिसऱ्या वर्षात प्रवेश केला. इथे आमची ओळख राणी शी झाली राणी चा एक वर्ष घरी होती आजारी असल्या कारणाने तिने तिसऱ्या वर्षी ऍडमीशन घेतले नव्हते. मग तिने आमच्या सोबत घेतले. राणी ची आणि रिया ची ओळख आधी झाली कारण त्या एकच वसतिगृह मध्ये राहत होत्या.
आणि कॉलेज मध्ये आल्या वर रिया मुळे माझी आणि तिची ओळख झाली. आमची ओळख झाली आणि एक मुलाला ते कदाचित नाही आवडलें आणि त्याने आमच्यात भांडणं करून दिले. इकडे रिया ला पण वाईट वाटत होते कारण मी आता वेळ राणी ला देत होतो. पण माझं तसे काही नव्हतं जे काही घडत होते हे सगळं अचानक होत.
रिया माझ्या सोबत भाडंन करत होती तिची आणि तुझी ओळख होऊन फक्त दोन आठवडे झाले आहे आणि तू तिच्या साठी माझ्या शी नीट बोलत नाही. खार तर यहे सगळे त्या मुला मुले घडले होते.
एक रात्री रिया ने मला फोने केला आणि खूप रडली आणि म्हणाली मी तुझ्या जीवनात ढवळा ढवळ करते कारे. आणि रडत होती. तिने तिच्या एक मित्र ला पण हा सगळं प्रकार सांगितलं होता. त्या मित्रांने मला फोने करून सांगितले कि तू बोलत जा. तिच्या शी मैत्री नको तोडू.
मला हि समजले कि हे सगळ्या त्या मुलां मुले घडले होते. मग मी रिया ला फोने केला आणि तिच्याशी बोलो तिची समजूत काढली. तिचे पण बरोबर होते मी इतक्या दिवस पासून तिच्या सोबत राहत होतो आणि अचानक मी राणी सोबत पाहून तिला राग येणे साजिक होत.
पण राणी ला कोण जास्त मैत्र नव्हते कारण तिचे सगळे मित्र हे पुढे गेले होते. मग मी दोघि नां समोर घेऊन सगळं गैरसमज दूर केला आणि आणि एक नवीन फ्रेइन्डशिप ची सुरवात केली. ती आजून पण आहे आज आम्ही २०२१ मध्ये आहे आणि आजून पण आमच्या मैत्री मध्ये काही च प्रॉब्लेम नाही आहे. रिया बंगलोर मध्ये आहे. राणी मुबई मध्ये एक चांगल्या कंपनीत आहे.
पण कॉलेज मध्ये रिया नंतर राणी च माझी गर्लफ्रेंड आहे असा खूप लोकांचा गैरसमज होता. कारण शेवटच्या वर्ष नंतर रिया बंगलोर ला गेली आणि राणी पुण्यात होती आणि मी पण पुण्यात होतो. एक वर्ष त्या नंतर ती मुबंई ला गेली लोकडाऊन नंतर. आम्ही कधी पण एकमेकां सोबत बोलतो वाढदिवस असो किंवा काहीं सण आम्ही विडिओ कॉल मार्फत नेहमी एक मेकांशी जोडलेलो आहोत. आणि मुलगी किंवा मुलगा मित्र किंवा मैत्रीण असणे म्हणजे लगेच ते गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल असे नाही. ते चांगले मित्र पण असो शकतात ना..?
एक चांगला मित्र किंवा मैत्रीण त्याला चांगल्या गोष्टी शिकवतो. आई वडील नसेल तर ते नातं बनतो
ते प्रेम देतो. बहीण भाऊ नसेल तर ती माया देतो सुखात तसे च दुखत आपल्या पाठीशी उभा राहतो. तुम्ही जीवनाचे निर्णय घेत असताना तुम्हाला मदत करतो. संकटात असेल तर बाहेर काढायला मदत हि करतो त्या साठी तो मुलगा च किंवा मुलगी च असला पाहिजे असे नाही. ते मैत्री मध्ये सगळे करू शकतात. फक्त मैत्री मध्ये आपला काही फायदा आहे म्हणून करायची नसते.
आम्ही कधी च आमच्या मैत्री मधला फायदा नाही पहिला. म्हणून तर कदाचित आमची मैत्री खास आहे. आणि गोड आहे.
आणि कधी गैरसमज जरी झाले ना तुमच्या मध्ये तर समोर समोर या आणि ते दुरुस्त करा आम्ही पण तेच केले ना. म्हणून तर आम्ही तिघे पण सोबत आहे. आणि हे जीवन गेले ना पुन्हा नाही येत. आपण फक्त आठवणी तयार करू शकतो त्या पुन्हा जगू नाही शकत. म्हणून जो वेळ आहे तुमच्या कडे तो छान मस्त जगा लोक काय बोलतील याचा विचार नका करू.... ......