(Under the 13 section of copy rights act1957 This story its characters and even all dialogue are secure.. Don't copyright You will face consequences....Thank You)
गेम ऑफ लव....!
भाग 1......
रश्मी आज नववधूच्या वेशात स्वतःला आरशात पाहत होती....आज..तिचे लग्न ठरले होते.. लग्न घटिका समीप आली होती ......सगळेच उत्साहात या सोहळ्यात सहभागी होते.... अगदी मोजकेच लोक लग्नमंडपात उपस्थित होते..... साहिल तिची मंडपात वाट पाहत होता.....
रश्मी मंडपात आली ....आणि लग्न विधि सुरू झाल्या.. सगळीकडे मंगलमय सनईचे सूर ऐकू येत होते......
.
मागून मंडपातून गोळ्यांचा कानठळ्या बसवणारा.. आवाज आला... आकाशाच्या दिशेने कोणीतरी फायरिंग केले होते... ब्लेझर घातलेला तो स्वतःचा चेहरा..मास्क ने.. झाकून ताडताड...चालत मंडपात.. येतहोता. हातात गन असलेला तो आणि त्वेषाने...पेटलेली... त्याची चाल.. त्याचे..हे भयावह रूप पाहून सगळे मंडपातील लोकांची बोबडी वळली होती.... नेमकं काय सुरू आहे याची कुणालाच कल्पना नव्हती... सगळ्यांचा जिवाचा थरकाप उडाला होता.... तोंडावर मास्क लावून आलेला तो... नेमका कोण ..?? हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं ...तो मंडपाच्या होम विधी जवळ गेला ...
रश्मीच्या जवळ जातच रश्मी च्या काळजाचा ठोका चुकला ...नववधूच्या वेषात ती खूप सुंदर दिसत होती ...त्याच्या डोळ्यातला राग... त्याच्या डोळ्यातले भाव ..तिथे तिला क्षणभरात... अचूक ओळखता आले होते ...इतर कोणाला तो लक्षात आला नसला.... तरी तिने त्याला फक्त.... त्याच्या डोळ्यावरून .... जाणले होते.... बंदुकीच्या धाकाच्या जोरावर तिला उद्देशून मोठ्या आवाजात
"आग जो दिल में लगी है
उसे दुनिया में लगा दुंगा मै
तेरी डोली उठी तो.....
जमाने को जला दूंगा में।"
असं म्हणत....त्याने तिच्या तोंडावर क्लोरोफार्म लावून तिला बेशुद्ध करत..... तितक्याच आवेगाने तो सगळ्यांसमोर तिला गाडीतून घेऊन गेला ...संपुर्ण मंडपात इतक्यावेळ सुरू असलेले मंगल सुर...आता भयाचा वातावरणात परावर्तित झाले होते....
त्याच्यासोबत आणखीन दोन साथीदार आले होते ...ते मंडपातील आणखीन बऱ्याच लोकांना धाकात ठेवत होते.... घडलेल्या प्रकाराबद्दल कोणालाच काही बोलता येत नव्हतं....
आणखीन एकदा मंडपात एक दोन वेळा आकाशाच्या दिशेने फायरिंग करून तिथे असलेल्या लायटिंगच्या शोभेतुन ठिणग्या उडत वातावरणाला आणखी थरारकता आणली होती....
तो....तिला तसा बेशुद्धावस्थेत हातावरती उचलतच गाडीत ... समोरच्या सीटवर ठेवून भरधाव वेगाने ड्रायव्हिंग करू लागला.... गाडी बरीच लांब जाता.... त्यांने ड्रायव्हिंग करत....चेहऱ्यावरचा मास्क काढला... चेहऱ्यावर.. हलकीशी दाढी... गोरापान चेहरा... तितकेच तेजाळले डोळे ...विस्कटलेल्या सिल्की केसांवरती.... स्वतः हात फिरवत समोर असलेल्या गाडी तील पाण्याची बॉटल ओपन करून त्याने ते पाणी स्वतःचा चेहऱ्यावर तितक्याच अधीरतेने मारून ...स्वतःला त्यातल्या त्यात फ्रेश करत.... तो ते पाणी ... पिऊ लागला ......आणि शेजारच्या सीटवर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रश्मी कडे वळला ......तिच्या अत्यंत जवळ जात ...त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हलकेच एका हाताने बाजूला केले आणि तिच्या गालावरून स्वतःचा हात फिरवत.. एक खुनशी स्माईल केली......
आता त्याने तिला एका फार्महाऊसवर आणले होते... माइल्ड क्लोरोफॉर्म च्या प्रभावामुळे पुढील सात आठ तास तरी तिला शुद्ध येणार नव्हती... तिला तसाच दोन्ही हातांवर उचलत तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला.... आणि आलिशान बेड वरती त्याने तिला झोपवून.... एक हलकेसे पांघरून अंगावर टाकले... स्वतः बेडवर जाण्याआधी घातलेले ब्लेजर काढून.... शेजारीच चेअरवर ठेवतच ....राजवीर .....रश्मीला जवळून पाहू लागला.. सरळ नाक ...पाणीदार हरणीसारखे डोळे ....ओठांवर लिपस्टिक.... चेहऱ्यावरची मादकता... निरागसता... हातामध्ये नववधूचा चूडा... अंगावर हळदीचे तेज... अगदी सगळं त्याला पाहिजे ..तसं होतं.... अस तिला शांत झोपलेल्या अवस्थेत पाहूनही... तो स्वतः..तिच्या.. सौंदर्यात हरवून गेला होता.... तिच्याजवळ जात तिच्या ओठांना स्पर्श करायचा म्हणून आणखीन जवळ जाऊन झुकला खरा ....पण.... तिच्या कपाळावर किस करता...च
" आई ग.... आई ग !"अह्...अह् ....असा रश्मीच्या कणलेला आवाजाने.... तो मागे सरकला....
तिचा चूड्यांनी भरलेला हाताला ....हलकेच हातात घेऊन... हातावर त्याने तितक्याच अधीरतेने स्वतःचे ओठ टेकवले....
" तू फक्त माझी आहेस!" रश्मी .....तू फक्त माझी..आहेस ..
आणि .....मी फक्त तुझा.... तुझाच राजवीर.....! नेहमीच्या स्टाईलने शायरी म्हणत....
"कुछ खास नही बस इतनी सी मोहब्बत है।
मेरी हर रात का आखरी खयाल ...और
हर सुबह की पहिली सोच हो.. तुम ...बस तुम....। "
... पुन्हा तितक्याच तन्मयतेने तो तिच्याकडे पाहू लागला होता.....व झटकन उठून... बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करत ...फार्म हाऊसच्या हॉल मध्ये येउन बसला.. तिथे ....किचनमध्ये एक पंच्चावण्..साठ..वयाच्या खालाजी... काम करत होत्या... त्यांना..रश्मी चे कपडे बदलायला सांगून .... बेडरूमचा कपाटात असलेला.... त्याचा आवडीचा.... गुलाबी गाऊन तिला घालायला सांगितला.....
तसाच पुन्हा ....हॉलमध्ये येऊन खिशातली गन काढून समोर टेबलवर ठेवत... सोप्यावर डोक्याला हात लावून .... बराच वेळ डोळे बंद करून तो पडला होता ...थोडा वेळ तसाच पडून.... त्याने... दुसर्या रूम मध्ये जाताना... खालाजींनी .... रश्मीचा रूमचा ... दरवाजा लाॅक केला का ...याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली....!
संध्याकाळी सातच्या दरम्यान तिला जाग आली होती ... आपण नेमके कुठे आहोत याची कल्पना जरी नसली तरी.... अंदाज आला होता... तिने जेव्हा झटापटीत उठायचा प्रयत्न केला...
मेन डोअर कडे जातच... दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करता.. दरवाजा बाहेरून लाॅक आहे ....व आपला हा प्रयत्न हा निष्फळ प्रयत्न आहे .... हे तिच्या लवकर लक्षात आलं .....तिला खूप तहान लागली होती..... शेजारी टेबल वरती असलेल्या पाणी पित... आपले कपडे ..कुणी....चेंज केले.... असा विचार करत.... तेवढ्यातच तो तिच्यासाठी जेवणाचे ताट आणि दूध घेऊन रूम मध्ये आला होता... आणलेले ताट टेबलवर ठेवतच.....
अजून ही तशी ती ग्लानीत च होती... तिचा जवळ...जात...तिच्या चेहर्यावरून हात फिरवत असताना ....त्याला असे स्वतःजवळ बसलेला पाहता... घाबरून तिने ....."राजवीर तू.. !"अस म्हणत... ती उठायचा प्रयत्न करू लागली..व .. त्याच्या पासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असताना ...अंगातील . . गाऊन... पाहून तिने पुन्हा एकदा पांघरून अंगावर ओढत... कशीबशी धडपडतच राजवीर पासून आणखीन लांब जाण्याचा प्रयत्न करताना ....त्याने तिला पकडले.... त्याच्या हाताला हिसका देतच... "हे माझे कपडे ....माझे कपडे .....कुणी चेंज केले....!" असं विचारत... तिच्या दंडाला पकडून तिच्या डोळ्यातील अपेक्षित भाव लक्षात घेऊन ......त्याने ...त्याचे लालसर डोळे ...आणखीन तिच्यावर रोखत..... कुस्सितपणे हसू लागला .....
"माय स्वीट हार्ट .....अजून तरी कसलीच जबरदस्ती केली नाही....! आणि मला वाटतं ती वेळ.... तू येऊ देणार नाहीस !" व... दुसऱ्याच क्षणाला तिला घाबरलेले पाहून ....
" हदो में रहकर भी ...
जो हद में ना रहे...
वो इश्क हैं । "
त्याच्या..नेहमीच्या...स्टाईल ने....ही..शायरी..म्हणता.... तिच्या डोळ्यात प्रचंड भीती होती.... त्याने तिच्या दंडाला धरलेला हात ....सोडण्याचा ती प्रयत्न करत होती..... पण त्याच्या बलदंड बाहुतून..... तिच्यासारख्या नाजूक मुलीला ते अशक्य होतं.... तिची धडपड त्याला सहन झाली नाही ....म्हणून हसतच....अगदी प्रेमाने... त्याने स्वतःचे हात खाली घेतले....ती... तितक्याच झटापटीत खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना....
जो तुमको हो पसंद ...वही बात करेंगे...
तुम दिन को अगर ..रात कहो ..रात कहेंगे...!
गुणगुणतच तिच्याकडे पाहू लागला होता...
तिला एसी मध्ये असून सुद्धा घाम यायला लागला होता.... तिचं अंग भीतीने थरथरत होतं ....तिच्या डोळ्यातली प्रचंड भीती त्याला जाणवत होती.... त्या भितीनेच ती त्याच्या पासून लांब पळू लागली असता... त्याने... तितक्याच तत्परतेने तिचा हात पकडत.... तिला... खुनशी नजरेने स्वतःकडे वळवून घेत.... जवळ ओढून....
"जो मेरी है ....उस पर किसी का हक
तो क्या
नजर तक... बरदास्त नही है मुझे..।"
#######################
@लेखिकेच्या परवानगीशिवाय लेखन कुठेही वापरू नये अन्यथा कारवाई केली जाईल लेखकाचे सर्व हक्क सुरक्षित
आता इथून पुढील कथा पुढील भागात.....
राजवीर कोण आहे??? रश्मी राजवीर ला ओळखते???? तो रश्मी शी असा का वागतोय....!!
हे सगळे आपण पाहू आपल्या पुढील भागात....
@स्वाती पवार अभिप्राय....!