ATRANGIRE EK PREM KATHA - 17 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 17

Featured Books
Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 17

"समीरा ते.. कस सांगु तुला?? मला नाही कळत.. तु समजतेस तस नाही आहे ग..",शौर्य थोडं घाबरतच बोलततो..

"म्हणजे?? तुझी फायनान्शियल परिस्थिति ठिक नाही ना??म्हणुनच तु डेटा एन्ट्री करत असतोसना??",समीरा थोडा गंभीर चेहरा करतच त्याला विचारते.

शौर्य नकारार्थी मान हलवत नाही बोलतो..

समीरा : "एक मिनिट.. तु तर बोलला होतास की तू डेटा एन्ट्री करतो म्हणुन.."

शौर्य : "मग त्याचा अर्थ असा नाही ना होत की मी गरीब आहे किंवा माझा तु बोलतेस फायनसीयल प्रॉब्लेम आहे.."

समीरा : "मग तुझ हॉस्पिटलच बिल रोहनने का भरलं??"

शौर्य : "तुला कोण बोललं माझं बिल त्याने भरलं??"

समीरा : "ते मला वाटलं कारण जेव्हा तु हॉस्पिटलमध्ये होतास ना तेव्हा मनवीला रोहनसोबत बोलताना ऐकलं मी."

शौर्य : "हे बघ समीरा, तु काय ऐकलस ते गॉड नोज बट हॉस्पिटलच बिल माझ्या मम्माने पेड केलंय.. माझी मम्मा असताना रोहनने भरण्याचा प्रश्नच नाही येत."

समीरा : "मग तु पार्ट टाईम जॉब का करतोस??"

"मी कुठे पार्ट टाईम जॉब क...र...तोय??", शौर्य स्तब्ध होऊन समीराकडे बघु लागला. नकळत का होईना त्याने तो खोटं बोलला ह्याची कबुली दिली.

"म्हणजे तु माझ्याशी खोट बोललास..??", समीरा रागातच त्याला विचारते..

"सॉरीss, ते चुकून निघालं ग तोंडातुन..म्हणजे त्या क्षणाला तुला काय बोलावे ते मला कळतच नव्हतं ग..", शौर्य दोन्ही हात कानाला लावतच समीराला बोलतो..

"जी गोष्ट तु करत नाहीस ती चुकुन कशी निघाली तुझ्या तोंडुन.. ?? आणि तु खोट का बोललास..?? मेन म्हणजे तु खोटं बोलुच कसा शकतोस..??, समीरा मोठं मोठ्याने त्याच्यावर ओरडत असते..

"किती प्रश्न करते ग तु.?? सॉरी ना आणि मी एक्सेप्ट करतोयना की मी ते सगळ खोटं बोललोय तेवढं पुरेस नाही का ग तुला???", शौर्य तिला प्रेमाने समजवतच बोलतो..

"मला तर वाटताना त्यादिवशी पण तु खोटंच बोलला असशील.. ड्रिंक स्वतःच्या मर्जीने घेतली असशील आणि उगाच त्या राजवर नाव टाकत असशील..", समीरा त्याच्यावर आरोप करतच बोलते

शौर्य : समीरा तु गोष्ट खुप वाढवतेस. आत्ता त्यादिवशीच तु पुन्हा का काढतेस.?? तेव्हा मी खरंच बोललो होतो ग मी."

"मला खोटं अजिबात सहन होत नाही शौर्य..",समीरा शौर्यचा हात पुढे खेचत त्याने दिलेला डब्बा त्याच्या हातावर ठेवते आणि रागात प्ले हाऊस मधुन बाहेर पडते.

"अग तुझाच डब्बा आहे हा.. अस काय करतेस..??", शौर्य मोठ्याने ओरडतच तिला बोलतो..

समीरा : "त्यातला स्पेसिअल खाऊ तुच स्पेसिअली एका स्पेसिअल ठिकाणी जाऊन खा आणि रिकामी झाला की मग तुझ्या एका स्पेसिअल व्यतिकडुन स्पेसिअली मला पाठवुन दे मगच मी स्पेसिअली घेईल तो.."

शौर्य : "आता हे काय स्पेसिअल तु बोलतेस.. आय मिन हे काय बोलतेस तु..??

समीरा प्लिज ना.. आय एम सॉरी.." शौर्य तिला आवाज देत असतो.. पण समीरा शौर्यला राग दाखवतच तिथुन हॉस्टेलच्या दिशेने जायला निघाली..

शौर्य ही जमेल तसं लंगडतच तिला आवाज तिच्या मागे जाऊ लागला.. तोच पायातून कळ आली तसा..

"आह... मम्मा..", अस कळवळतच आपला पाय धरत तो उभं रहातो.. वेदनेने डोळ्यांतुन पाणी सुद्धा येऊ लागत..

शौर्यचा आवाज आला म्हणुन समीराने लगेच मागे वळुन पाहिलं. शौर्यला अस बघुन ती पुन्हा त्याच्या जवळ आली..

"समीरा आय एम सॉरी", समीराला पुन्हा आपल्या जवळ येताना बघुन शौर्य पायातुन येणाऱ्या वेदना विसरत सरळ कसंबसं सरळ उभा रहातच तिला बोलतो..

"मला वाटलेलच तु एकटींग करतोस ते. तुला वाटेल त्यादिवशी सारख मी ह्यावेळेला पण फसेल आणि तुला माफ करेल किंवा समजुन घेईल तर तस काहीही नाही होणार. प्लिज थांबव हे सगळं.. प्लिज", समीरा पुन्हा रागातच त्याच्यावर ओरडत तिथुन जाऊ लागते.

"समीरा तुला हि सगळी एकटिंग वाटतेय.. खरच कालपासून खुप पाय दुखतोय माझा आणि त्यादिवशी पण एकटिंग नव्हती ती.", शौर्य डोळ्यांतुन येणार पाणी पुसतच तिला बोलतो.

समीरा : "मग आता लगेच बरा पण झाला का तुझा पाय..?? शौर्य बसsss.. मला नाही पटत".

समीरा रागातच तिथुन निघुन गेली..

खुप वेळ झाला समीरा आली नाही म्हणुन सीमा तिला शोधत बाहेर आली.. तिच लक्ष प्ले हाऊसच्या पायरीवर बसलेल्या शौर्यकडे जात.

"तु अस का बसलायस?? काय झालं?? रडतोयस का??", सीमा त्याची काळजी करतच विचारते..

"डोळ्यांत काही तरी गेलंय", आपले डोळे पुसतच तो बोलतो.

"समीराला बघितलस का??",सीमापुन्हा त्याला प्रश्न करते..

शौर्य : "हॉस्टेलमध्ये गेली ती.."

सीमा : "मग तु का अस बसलायस इथे.."

शौर्य : "असच.. थोडा पाय दुखतोय म्हणुन.. ऐकना एक काम करशील माझं??"

सीमा : "काय झालं??"

शौर्य : "हा समीराचा डब्बा फक्त तिला दे.."

"एवढंच ना.. दे इथे तिला देते मी", सीमाने डब्बा हातात घेत म्हंटले..

"थेंक्सsss", एवढं बोलुन शौर्य उठुन उभं रहायचा प्रयत्न करतो.. पण त्याला उभं रहायला जमत नसत..

सीमा त्याला हात देतच उभं करते..

पुन्हा तिला थेंक्स बोलत कसं बस एका पायावर लंगडत तो सरळ आपल्या रूममध्ये जायला निघतो..

"नक्कीच काही तरी झालं असेल.", सीमा मनातच विचार करू लागते आणि सरळ हॉस्टेलवर निघुन येते..

रूममध्ये येऊन बघते समीरा बुक काढुन वाचत बसलेली असते..

"समीरा तु पाणी पियायला म्हणुन गेलीस परत आलीसच नाहीस. काय झालं??",सीमाने आत आल्या आल्या समीराला प्रश्न विचारायला सुरुवात केली..

समीरा : "माझा मुड थोडा खराब झाला म्हणुन नाही आली परत.."

सीमा : "हा डब्बा घे तुझा.. शौर्यने दिलाय.."

समीरा : "तु का घेतलास?? काय गरज काय होती तुला डब्बा घ्यायची त्याच्याकडून.. "

सीमा : "ए हॅलो... माझ्यावर का भडकतेस तु. झालं काय ते तरी सांगशील का नाही???"

समीरा : "तो खोटारडा आहे.. त्याने मला त्यादिवशी खोटं सांगितलं की तो पार्ट टाईम जॉब वैगेरे करतो. तुला माहिती ना की मला नाही आवडत ग खोटं.. का तो खोटं बोलला माझ्याशी.."

सीमा : "तुला कोण बोललं की तो जॉब वैगेरे करत नाही ते.."

"तोच बोलला.. म्हणजे..", समीरा घडुन गेलेला सगळा प्रकार जसाच्या तसा सीमाला सांगते..

सीमा : "तो सॉरी बोलतोय ना. तु थोडं जास्तच रुड वागतेयस.. बिचारा तिथे प्ले हाऊसच्या इथे पाय धरून रडत बसलेला.."

समीरा : "मग त्यादिवशी पण ह्याच्या ड्रिंक मध्ये राज ने हार्ड ड्रिंक मिक्स केलं हे कश्यावरून खर आहे?? तो बोलला म्हणुन.."

"तुच पुन्हा एकदा विचार कर.. मी काहीच बोलणार नाही.. तो खर बोलतोय की खोटं ते तुझं तु शोध आणि हा तुझा डब्बा.. तुला नको असेल तर तु स्वतः त्याला दे. हवा असेल तर ठेव.. नाही तर तु काहीही कर तिथे.. मला मध्ये घेऊ नकोस..", सीमा डब्बा समीराच्या बेड वर ठेवतच बोलते.

समीरा : "एक मिनिट हा डब्बा तु आणलायस..??"

सीमा : "तुझा डब्बा त्याच्याकडे होता म्हणुन आणला.."

समीरा रागातच उठुन डब्बा समोर असणाऱ्या छोट्याश्या कपबोर्डवर ठेवते.

सीमा : "उघडुन तरी बघ काय आहे त्यात.."

समीरा : "आय एम नोट इंटरेस्टड.. तुला हवं असेल तर तु करू शकतेस.."

सीमाने सुद्धा तिच्याशी बोलणंच टाळलं..

M K कॉलेज पहिलीच मॅच हरल्यामुळे टॉनी आणि राजसुद्धा आता आपल्या रूममध्ये जाऊ लागले.

राज : "आपला लव्हबर्ड कुठे गायब झाला. फिरायला वैगेरे गेला की काय समीराला घेऊन.. इथे कुठे तर दिसत नाही मला.."

टॉनी : "मलाही तेच वाटत.. सकाळ पर्यंत तर बोलत होता पाय खुप दुखतोय. मी थोडा वेळ बसेल नि येईल.. आता बघ.."

राज : "रूमवर तर गेला नसेलना?? "

टॉनी : "बघुयात जाता जाता.."

दोघेही बोलत बोलत हॉस्टेलमध्ये जातात..

टॉनी : "रूमवरच आहे हा.. चल बघुयात.."

दोघेही आत येतात..

शौर्य झोपुन असतो..

राज : "शौर्य तु इथे का आलास?? बर नाही वाटत का??"

"हम्म पाय दुखतोय खुप यार", शौर्य तोंड पाडतच बोलतो..

टॉनी : "जाऊयात का डॉक्टरकडे..??"

शौर्य : "औषध घेतलय जर दुखायचा नाही थांबला की मग उद्या जातो."

राज : "समीराला दिला का डब्बा..??"

शौर्य : "हम्मम.."

टॉनी : "काही बोलली का??"

शौर्य : "जे पाहिजे ते न बोलता नको तेच बोलली आणि गेली.."

राज : "काय झालं??"

शौर्य : "ते सोड मॅचच काय झालं??"

राज : "जिंकता जिंकता हरली"

शौर्य : "शट.. आजचा दिवस नको यायला होता.."

टॉनी : "मी जातो रूमवर मला अभ्यास आहे.. ""

राज : "मला ही.. शौर्यकाही लागलं तर सांग.."

दोघेही रूममध्ये निघून जातात..

शौर्य समीराचाच विचार करत राहतो.. उद्या कॉलेजमध्ये भेटेल तेव्हा बोलेल मी तिच्याशी..

★★★★★

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजच्या गेटजवळ सगळे येतात शिवाय शौर्य.. समीराला सुद्धा तो दिसला नाही म्हणुन थोडं चुकचुकल्या सारख वाटत. सीमा जाणुन बुजून शौर्य कुठेय हे विचारत नाही जेणे करून समीराने विचारावं.. लेक्चरला सुरुवात ही होते.. आता समीराला स्वस्थ बसवत नव्हतं. तिला त्यादिवशी घडलेला प्रसंग आठवतो. ती बोलत नव्हती म्हणुन शौर्य पावसात भिजत होता.. लेक्चरला सुद्धा बसला नाही. तिला वाटत बहुतेक आत्ताही तसच करत असेल.. पण आज पाऊस नाही म्हणजे घाबरायचं कारण नाही आणि जरी तस करायचं असेल तर मला गेट बाहेर दिसला असता. समोर सर शिकवायला घेतात पण समीराच लक्ष मात्र आज कुठेच लागत नव्हत.. येऊन जाऊन ती क्लासरूमच्या दरवाजा कडे बघत असते.. त्यात परीक्षा तोंडावर आल्यात आणि पोर्शनही अजुन पूर्ण नाही झालाय म्हणुन सरांनीही एक्स्ट्रा लेक्चर घेणार हे आधीच सांगितले. ..तीच लक्ष तिच्या शेजारच्या डेस्कवर बसलेल्या वृषभकडे जात. शेवटी न राहवुन समीरा त्याला विचारायाच ठेवते. पण कस?? सर क्लासरूमध्ये असताना बोलताही येणार नव्हतं.. तिला एक युक्ती सुचते ती आपल्या नोटबुकच शेवटचं पान उघडते.. त्यात लिहिते.. "Where is Shaury??" आणि सरांच्या नकळत ती बुक वृषभच्या डेस्कवर ठेवते.. आणि वृषभला ती इशाऱ्यानेच वाचायला सांगते..
"He is not well..have leg pain.." एवढं लिहुन तो ती बुक समीराकडे पास करतो.. समीरा वाचते आणि ती रागातच वृषभकडे बघते.. तिला वाटत वृषभ शौर्यची बाजु घेऊन तिच्याशी खोटं बोलतोय.. वृषभला खर तर काल काय घडुन गेलं असत हे माहितीच नसंत.. वृषभ आधीच मॅच हरल्यामुळे नाराज असतो.. त्यामुळे शौर्यही त्याला हे सगळं सांगणं योग्य समजत नाही..

समीराला कधी लेक्चर संपत आणि कधी ती मनमोकळेपणाने वृषभशी बोलते अस झालं असत.. म्हणजे काल शौर्य खरच बोलत होता.. पण त्याच्याकडे बघुन अस वाटत तर नव्हतं.. हे देवा जर दुखत असेल तर प्लिज बरा कर त्याचा पाय प्लिज प्लिज प्लिज. समीरा नुसती चलबीचल होत होती.. एवढ्या विचारांत कधी तीन तास निघुन गेले कळलंच नाही.. बेल वाजली तस तिने हुश्श केलं..

सीमा तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत होती.. समीराने मात्र तिला इग्नोर केलं आणि तशीच ती वृषभच्या डेस्कवर गेली..

वृषभ : "तु मगाशी रागात का बघत होतीस.."

समीरा : "तु खोटं का बोलतोयस..??"

वृषभ : "मी काय खोटं बोललो??"

समीरा : "शौर्यला बर नाही. त्याचा पाय दुखतोय.."

राज : "तो खोट नाही बोलत आहे खरच दुखतोय. पर्वा साहेब एकटेच रूममध्ये फुटबॉल खेळत होते. त्यामुळे बहुतेक ताण पडला असेल. आम्ही गेलो तेव्हा लहानमुलासारखं रडत होता.. "

टॉनी : "काल चल बोललो डॉक्टरकडे पण नाही ऐकला. सकाळी जास्तच दुखत होता."

वृषभ : "मी निघतो.. मला त्याच्यासोबत डॉक्टरकडे जावं लागेल."

"आम्ही पण येतो", टॉनी आणि राज एकत्रच बोलले आणि तिघेही तिथुन निघाले.

समीरा : "सीमा मी काल थोडं जास्तच बोलली ना.. तु मला समजवल का नाहीस ग..?"

सीमा : 'तु समजवण्याचा मुडमध्ये नव्हती आणि असतीस तरी तुला तुझंच खर वाटलं असत.. शौर्यला भेटुन तर येऊयात.. खाली येईल ना तो.."

समीरा : "हम्मम.."

दोघीही बॉईज हॉस्टेलच्या गेटजवळ उभे असतात. रोहन आणि मनवी देखील तिथेच असतात. रोहन आणि मनवीला माहीत नसतं नक्की काय झालंय ते.. रोहन सीमा आणि समीराला विचारणार तोच समोरून शौर्य वृषभच्या खांद्यावर हात ठेवुन येताना त्याला दिसतो. तो बाईक तशीच स्टॅन्डवर लावतो आणि शौर्यजवळ जातो..

रोहन : "काय झालं तुला?? पाय दुखतोय का?? "

शौर्य समोर मनवीला बघुन शांतच असतो..

"दोन दिवस झाले खुप दुखतोय. आज त्याच्याने सहनच नाही होत आहे.."शौर्य शांत असतो म्हणुन वृषभ बोलतो.

रोहन : "मला वाटलं तुला लेक्चरला बसायचं नाही म्हणुन आला नाहीस. चल मग मी नेतो तुला बाईकने.."

मनवी : "रोहन.. मला उशीर होतोय घरी जायला.. घरी गेस्ट येणार आहेत मी तुला आधीच सांगितलंय.'

रोहन : "मनवी त्याचा पाय दुखतोय तु प्लिज टेक्सीने जाना आजच्या दिवस.. प्लिजsss.."

समीरा : "मनवी तु एक दिवस तर एडजस्ट करू शकतेस ना.. त्याला त्रास होतोय.."

शौर्य : "एक मिनिट..!!! माझी काळजी करायची एवढी गरज नाही कोणालाच.. मी कार बुक केलीय. माणसाला समजत असत किंवा त्यांच्यात हृदय नावाचा प्रकार असता तर आज माझी ही अवस्था झालीच नसती.."

शौर्य खर तर मनवीला बोलत असतो पण समीराला वाटत की तो ते तिला बोलतो..

थोड्याच वेळात एक कार तिथे येते शौर्य, वृषभ, राज आणि टॉनी त्यात बसतात आणि निघुन जातात..

रोहनला मनवीच वागणं जराही पटत नाही. पण वाद नकोत म्हणुन तो तिला बस म्हणुन सांगतो आणि गप्प घरी सोडतो..

"रोहन तु रागावलास??",रोहन निघणार तोच मनवी त्याला अडवत विचारते.

रोहन : "तु शौर्य सोबत का अस वागतेस.?"

मनवी : "कारण आता जर तुला सोडलं असत तर पुन्हा त्याच हॉस्पिटलच बिल तु भरणार. त्याला काय फुकटच मिळतंय ते घ्यायचं."

रोहन : "तु काय बोलतेस हे..? मी का त्याच बिल भरू अग?? त्याच तोच भरणार ना आणि जर त्याला गरज लागली तर मी भरेल ही. पण शौर्यला कधी अशी गरज लागेल अस मला तरी नाही वाटत.. आणि मुळात मैत्रीत कधीही हिशोब नसावा ग. ती निर्मळ असते.."

मनवी : "तुला ना कळतच नाही रोहन... तुझ्याकडे पैसा आहे म्हणुन तर त्याने तुझ्याशी मैत्री केली. नाही तर कोण तुझ्याशी मैत्री करायचं सांग."

रोहन : "मनवी तुला माहिती की माहित नाही असं तु दाखवतेस.. शौर्य आहे म्हणुन तु माझ्या आयुष्यात आहे हे न समजण्या इतपत मुर्ख तर तु नक्कीच नाहीस आणि माझ्यापेक्षा दुप्पट पैसा त्याच्याकडे आहे.. अग करोडो रुपयांच्या गाड्या तो चालवतो तो काय माझे पैसे बघुन माझ्या जवळ येणार आणि प्लिज तु असे तुझे विचार मला परत नको बोलून दाखवुस मला नाही आवडत आणि माझ्या मित्राबद्दल तर अजिबात नाही.."

रोहन तिथुन निघुन शौर्यसोबत हॉस्पिटलमध्ये जातो..

मनवीच्या कानाभोवती फक्त रोहनचे शब्द घुमत होते.. आत्ता तिच्या प्रेमाने रोहनकडून शौर्यकडे वळावे अस तिचा मेंदु तिला सांगत होता.

इथे समीरा रूमवर येऊन शौर्य बोललेल्या शब्दांचा विचार करू लागली.. तोच तीच लक्ष शौर्यने काल सीमाकडे पाठवुन दिलेल्या डब्ब्याकडे जात.. ती सीमाच्या नकळत तो डब्बा घेते आणि हळुच रूमबाहेर पडते आणि एका स्टेरकेजवर येऊन बसते.. आधी खात्री करून घेते की कोणी बघत तर नाही ना आपल्याला आणि मग डब्बा उघडायला घेते..

(काय असेल त्यास डब्यात?? समीराने एवढ्याश्या चुकीवरून एवढा राग व्यक्त करणे खरच गरजेचं होतं का?? अजून पुढे काय बघायला मिळेल?? उत्सुकता अशीच ठेवा.. भेटूया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल