ATRANGIRE EK PREM KATHA - 14 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 14

Featured Books
  • మనసిచ్చి చూడు - 5

                                    మనసిచ్చి చూడు - 05గౌతమ్ సడన్...

  • నిరుపమ - 5

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ- వీర - 6

    వీర :- "నీకు ఏప్పట్నుంచి తెల్సు?"ధర్మ :- "నాకు మొదటినుంచి తె...

  • అరె ఏమైందీ? - 18

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 4

    మనసిచ్చి చూడు - 04హలో ఎవరు.... ️ అవతల మాట్లాడకపోయే సరికి ఎవర...

Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 14

शौर्यचा पाय जरा दुखत असल्यामुळे त्याला जागेवरच उठता येत नव्हतं. तो फक्त समीराला जाताना बघत होता.

सरांनी शिटी वाजवली तसा शौर्य भानावर आला.

प्रॅक्टिस मॅच सुरू झाली. पण बघायला येणारे काही जण लांबुनच बघुन पुन्हा माघारी फिरत होते. कदाचित शौर्य तिथे नसावा म्हणुन..

पण शौर्य आणि इतर मंडळी मॅच बघण्यात गुंतून गेली. आज मात्र मैदानात रोहनच्या नावाचा जप चालु होता. मनवीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. पंचेचाळीस मिनिटांनी प्रॅक्टिस मॅच संपली.

टॉनी : "चलो गाईज लेट्स गो टु केंटींग."

शौर्य टॉनीचा आधार घेतच उभा राहिला. उजव्या पायावर जास्त जोर न देता टॉनीचा आधार घेत थोडं लंगडतच केंटिंगच्या दिशेने चालू लागला.

राज : "एवढं काय आहेरे बेगेत. नाही म्हणजे जाताना तु बेग नेलेलीस मला तर नाही आठवत म्हणुन विचारलं.."

शौर्य : "अरे माझ्या मम्माने आपल्या सगळ्यांसाठी खाऊ दिलाय पाठवुन."

सीमा : "कोणाकडे रे?? म्हणजे कोण घेऊन आलेलं??"

शौर्य : "ती स्वतः आलेली हे घेऊन.."

टॉनी : "कधी??"

शौर्य : "सकाळी. तुम्ही गेल्यावर.."

टॉनी : "मग लगेच गेलीही. इथे तरी आणायचं होतंस.. आम्हीही भेटलो असतो. "

सीमा : "सेम समीराचा भाऊ आहे हा..??"

"भाऊ??", शौर्य तोंड पाडतच सीमाकडे बघतो..

राज : "सीमा तु समीराचा भाऊ कोणाला बोललीस??"

सीमा : "ह्या शौर्यला आणि कोणाला.. ती पण त्यादिवशी तीचा दादा आलेला तिनेही त्याची ओळख न करून देताच त्याला बाहेरच्या बाहेरच भागवल.. आणि आता तु..

राज आणि टॉनी एकमेकांना टाळी देतच हसु लागतात..

शौर्य : "तिला काम होत ग खुप म्हणुन नाही जमलं यायला. पण नेक्स्ट टाईम येईल तेव्हा तुम्हां लोकांना नक्की भेटेल अस बोलली."

सीमा : "जाऊ दे आता काय बोलणार.."

सगळे गप्पा गोष्टी करत केंटिंगमध्ये घुसले.

सीमा : "मी समीराला पण फोन करून बोलवुन घेते."

थोड्याच वेळांत वृषभ आणि रोहन तिथे येतात.

मनवी : "आज मॅच बघताना खुप मज्जा आली. कसला भारी खेळलास रोहन तु. संपुर्ण ग्राउंडमध्ये फक्त रोहन आणि रोहनच.. होणं राज.."

(मनवी टाळ्या वाजवत रोहनच कौतुक करत बोलली)


"हिला खरच फुटबॉल कळत असतना तर ही आज अस बोलली नसती..", राज टॉनीच्या कानात कुजबुजतो तस टॉनी हसु लागतो..

मनवी : "टॉनी हा काय बोलला खर खर सांगायचं.."

टॉनी : "ते आमचं पर्सनल आहे.. टॉप सिक्रेट.. रोहन शौर्यच्या मॉमने बघ काय पाठवून दिलंय ये बस."

मनवी : "सॉरी पण आम्ही निघतोय.. हो ना रोहन??"

रोहन : "होsss.. बट थोडा वेळ बसुन जाऊयात प्लिज. "

रोहन तिथे चेअर घेऊन बसतो. मनवी सुद्धा नाईलाजाने बसते तिथे.

शौर्य : "ए सीमा, समीरा कुठेय ग??"

समीरा : "हॅलो गाईज.."

राज : "शंभर वर्ष जगणार तु.. आताच शौर्यने तुझं नाव काढल.."

समीरा : "का काय झालं?? मला का बोलवुन घेतलं??"

राज : "शौर्यच्या मॉमने पाठवलं. त्या स्वतः आपल्यासाठी घेऊन आल्यात."

समीरा : "कुठेयत त्या??"

शौर्य : "ती गेली. तिला थोडं काम होत ना.. नाही थांबता आलं."

मनवी : "सुट्टी मिळत नसेल ना तिला..? "

शौर्य : "हो तसच काहीस.."

मनवी : "काय काम करते तुझी मॉम.. मिन्स क्वालिफिकेशन काय आहे तुझ्या मॉमच??"

राज : "तुला एवढी इन्फॉर्मेशन का हवीय?? तुला सुद्धा तिथे जॉबला जायचय का??"

राज टॉनीला टाळी मारतच हसु लागला..

मनवी : "जस्ट शट अप हा राज.. मीsss आणि ह्याच्या मॉम सारख कधी जॉब करेल.. नोsss नेव्हरss. मला जॉब करणाऱ्या बायकांचं एक कळतच नाही. नवरा असताना का जॉब करावा. आता ह्याच्या मॉमच समजु शकते परिस्थितीमुळे कदाचित असू शकेल पण माझ..

"मनवी प्लिजsss",रोहन मध्येच मनवीला शांत करत बोलला.

"एक मिनिट.. मिस मनवी. ( शौर्य रोहनला मध्येच तोडत बोलला) इट्स नोट ए जॉक फॉर मी. एक स्त्री जॉब करते ते फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तर स्वतः च अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि प्रत्येकाची चॉईज असते जॉब करणं किंवा न करणे. पण मला अभिमान आहे की माझी मॉम एक वर्किंग वुमन आहे आणि क्वालिफिकेशन बद्दल बोलत असशील तर इतरांची रिस्पेक्ट करता नाही आली की आपलं क्वालिफिकेशन लगेच दिसुन येत ग त्यात.", शौर्य थोडं रागातच तिला बोलतो..

रोहन : "शौर्य बस्स.. थोडं जास्त होतय आता."

शौर्य : "मी बोललो तर जास्त झाल का??मगासपासून ती जे बोलत होती ते जास्त नव्हतं का?? She wants to know my mom's qualifications, I just explain her."

रोहन : "बस ना पण. तु कुठची गोष्ट कुठे नेतोयस. तिने फक्त क्वालिफिकेशन विचारलंय शौर्य.."

शौर्य : "त्या आधी ती काही तरी बोललीय रोहन.."

रोहन : "हो मी तिची बाजु घेतच नाहीय शौर्य. मी दोघांनाही शांत करतोय आणि मनवी शब्द नीट जपून वापरायला शिख प्लिज.."

मनवी : "तु ही मलाच बोल."

रोहन : "कारण तु चुकीचं बोललीस मनु. मला खरच समजत नाही की तुला नक्की झालंय काय?? "

वृषभ : "गाईज प्लिज शांत व्हा आणि त्याच्या मॉमने जे पाठवलय ते खाऊन झालं गेलं विसरून जावा."

सीमा : "हो मनवी. "

समीरा : "मला ही असच वाटत. उगाच विषय अजुन वाढायला नको. भले चुकी कोणाचीही असो. दोघांनीही नकळत एकमेकांची मन दुखावली आहेत सो दोघांनीही एक मेकांना सॉरी बोला. "

राज : "सुरुवात मनवीने केली. सो पहिल्यांदा सॉरी पण मनवीच बोलेल.."

मनवी रोहनकडे बघते..रोहन पण तिला शौर्यला सॉरी बोलायला सांगतो..

मनवी : "सॉरी.."

सगळे टाळ्या वाजवुन तीच कौतुक करतात.

समीरा शौर्यच्या हातावर हात ठेवते तस शौर्य समीराकडे बघतो. समीरा त्याला डोळ्यांतील इशाऱ्यानेच मनवीला सॉरी बोल म्हणुन सांगते.

शौर्य : "सॉरी..."

"येहहहह..." सगळे एकत्रच ओरडतात..

राज : "शौर्य लवकर दाखवणं काय काय पाठवलय तुझ्या मॉमने ते.."

शौर्य : "बघ ना तु.. तुझ्या जवळच तर आहे बेग."

"अरे मित्रा दोन बेगा आहेत.",राज शौर्यला दोन बेग उचलुन दाखवतच बोलला

"अरे ती नको.. ती आण इकडे त्यात औषध आणि शुज वैगेरे असतील."

"बर" अस बोलत राज दुसरी बेग उघडून शौर्यच्या मॉमने दिलेले खाऊचे डब्बे आणि बॉक्स बाहेर काढु लागला.

"दहिवडे, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, पेस्ट्री, ड्राय फ्रुट्स आणि खूप काही अनिता ने दिलं असत.

टॉनी : "बापरे!! एवढ सगळ.."

समीरा : "शौर्य, हे सगळं तुझ्या मॉमने दिलय. "

शौर्य : "मला ही आत्ताच कळतंय ग म्हणजे तिने बेग दिली ती मी जशीच्या तशी तुमच्या समोर उघडली."

सीमा : "माझं तर हे बघूनच पोट भरलय."

"आमच्या सगळ्यांकडून थेंक्स म्हणुन सांग तुझ्या मम्मीला.." टॉनी पेस्ट्रीचा एक पिस तोंडात टाकतच बोलला..

राज : "दहीवडा तर मस्तच यार".

समीरा : "सगळंच छान आहे.. थेंक्स टु यु एन्ड युअर मॉम.."

राज : "ए हा शौर्य माझ्याकडुन तुला पण थेंक्स."

शौर्य : "मला का थेंक्स बोलताय तु??"

राज : "अस कस?? तुला तर थेंक्स बोलावच लागेल. जर तु पडला नसतास तर तुझी मॉम इथे तुला भेटायला आली नसती आणि जर ती आली नसती तर हा खाऊ आणलाच नसता. खाऊ आणला नसता तर आम्हाला हे सगळं खायला मिळालं नसत.. आम्हाला खायला मिळालं नसत तर तुला थेंक्स बोललोच नसतो."

वृषभ : "हा.. हा.. एक दम कॉरेक्ट.."

सगळेच हसु लागतात

शौर्य : "अस जर थेंक्स मिळणार असेल तर नेक्स्ट टाईम आपण राजला पाडूयात.. काय गाईज.."

वृषभ : "येस, ह्या बाबतीत शौर्य मी तुझ्यासोबत.."

टॉनी : "मी पण. शौर्य तु माझ्या मनातलं बोललास बघ. राजला पडल्यावर तर आपण एक हॉटेल काढु एवढं खायचं सामान जमेल आपल्याकडे आणि ते ही आपल्यालाच संपवाव लागेल.. राजच तर त्याच्या मम्मा आणि पप्पांकडून मिळणाऱ्या लेक्चरनेच पोट भरेल होना राज..

(टॉनी शौर्यला टाळी देतच बोलला)

सीमा : "मग तर मज्जाच."

"मग तर मज्जाच...", राज तोंड वाकड करतच सीमाला चिडवत बोलला.

"तुम्ही मला मुद्दामून पाडणार.. ते ही फक्त खाण्यासाठी..OMG. किती भुक्कड पणा हा..",राज एक दहिवडा तोंडात कोंबतच बोलला.

"आणि हे तु बोलतोयस.. OMG.." सगळे एकत्रच बोलले..

समीरा : "गाईज एक मिनिट.. एक्सामच टाईम टेबल कोणी कोणी बघितलंय???"

रोहन : "कधी आहे एक्साम??"

समीरा : "मला माहित होतं.. कोणीच बघितलं नसणार.. कमिंग मंडे पासुन.."

रोहन : "ओहहनन नो.."

समीरा : "ओहह येस.. मी निघतेय..आज पासुन अभ्यासाला लागलं पाहिजे.. आणि हो नोटीस बोर्डवर टाईम टेबल लावलय पण तुम्हाला बघायला जायची काही गरज नाही. मी फोटो काढलाय आणि आपल्या व्हाट्सए ग्रुपवर टाकलाय."

"आम्हीही निघतो..",अस बोलत सगळे आपापल्या रूममध्ये जायला निघतात...

शौर्य ही रूमवर गेल्या गेल्या समीराने पाठवलेला टाईम टेबलचा फोटो बघतो. वृषभ सुद्धा शौर्यच्या हातातील मोबाईल घेत टाईम टेबल बघु लागतो.

"पहिलाच कोणी थेअरी पेपर ठेवतो काय यार. तेही इको..."वृषभ रडलेला चेहरा करत शौर्यकडे बघतो..

शौर्य पूर्णपणे लॅपटॉपमध्ये घुसलेला असतो.

वृषभ : "तुला अभ्यासाचं टेन्शन आहे का नाही काही??"

शौर्य : "अभ्यासाचं टेन्शन मी कधी घेत नाही रे मित्रा.."

वृषभ : "पर्वा मॅच झाली की मला अभ्यासाला टाईम मिळेल थोडा फार. तु लॅपटॉप काय घेऊन बसलायस.. बुक घेऊन बस इकोच.."

शौर्य : "माझा आता मुड नाही अभ्यासाचा.. शट ह्या लॅपटॉपच्या बेट्रीला पण आत्ताच संपायच होत.."

लॅपटॉप बाजुला ठेवतच शौर्य बोलला.

वृषभ : "तो लॅपटॉप पण तुला अभ्यास कर म्हणुन सांगतोय."

शौर्य : "तुला लॅपटॉपची भाषा पण कळते वाटत."

वृषभ : "जॉक छान होता.. मग वेळ मिळाला की हसतो तुझ्या ह्या जॉक वर. तुझा औषध घेण्याचा टाईम झालाय. त्या बेगेत बघ औषध भरलीत ती काढ आणि घे. नाही तर दे मी काढुन घेतो.."

शौर्य : "नको मी घेतो... काल पासुन आज पर्यंत जे कष्ट माझ्यासाठी घेतलात त्या बद्दल मी ऋणी आहे.. कधी तुम्हांला गरज लागली की नक्की मला सांगा.. एकदम निर्दास्त होऊन.."

"एकदम भारी डायलॉग हा. पण तु ह्या आधी नाटकात वैगेरे कामाला होतास का???वृषभ मस्तीच्या सुरातच विचारतो

शौर्य : "बस काय??? नाटकात कामाला असतो तर इथे का असतो मी.. आर्टस् घेतलं असत ना मित्रा.. काय तु पण.."

शौर्य बेग उघडुन त्यातली औषध काढुन एका टेबलवर ठेवु लागला. सोबत एका प्लॅस्टिक बेग मध्ये त्याच्या उजव्या पायाचा शुज ठेवला असतो. जो पायातील प्लॅस्टर मुळे त्याला घालता आला नाही. तोच शौर्यला त्यादिवशीचा प्रसंग आठवतो. त्याचा उजवाच पाय कश्यावर तरी पडलेला आणि तो घसरून जिन्यावरून घरंगळत खाली आला.

जर त्यादिवशी खरच पायाखाली तेल होत तर नक्कीच ह्या शूजला पण ते लागायला हवं.. शौर्य असाच काहीसा विचार मनात करत एकटक त्या शुजकडे बघु लागला.

वृषभ : "अस काय बघतोयस त्या शुजकडे.. तुझाच आहे तो.."

शौर्यची तंद्री उडते तो वृषभच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.
तो शुज हातात घेतो आणि उलटा करून बघतो त्याला काही लागलंय का?? शूजच्या तळाशी तेलकट अस काहीस अजुनही दिसत होतं..

शौर्य : "वृषभ मी तुला बोललो होतो ना माझा पाय स्लिप झाला आणि मी पडलो म्हणुन हे बघ अजुन ह्या शूजला काही तरी तेलासारखं लागलंय.."

वृषभ : "बघु.."

वृषभ बघु लागला..हाताची दोन बोट त्याला लावत तो त्याचा वास घेतो

"परफ्युम सारखा वास येतोय ह्याचा. हे तेल तर नाही आहे पण तु बोलत होतास त्याच प्रमाणे unctuous लागतंय थोडं म्हणजे पाय पडला की सहज घसरले अस. ए पण हा वास ओळखीचा वाटतोय माझ्या.. पण कुठे??", वृषभ विचार करू लागतो..

शौर्य : "जर हे माझ्या शूजला लागलय म्हणजे हे कॉलेजच्या फोर्थ फ्लॉरच्या स्टेरकेजवर नक्की पडलेलं होत. बट ते माझ्याच शुज ला कस लागलं. बाकीचे लोक पण होते ना तिथे.. ते कसे नाही पडले.. आणि मी वर चढताना कस नाही पडलो नेमकं उतरतानाच कस काय पडलो."

वृषभ : "एक मिनिट शौर्य.. मला आठवल.. तु हा शुज घेऊन फक्त माझ्यासोबत खाली चल.. मी सांगतो काय ते.."

शौर्य : "ए नाही हा आता खाली नाही.. पाय आणि कंबर खुप दुखतेय माझी.. तु इथेच काय ते सांग."

वृषभ : "रात्री दाबुन देतो तुझा पाय आणि कंबर पण बट तु चल बघु खाली."

वृषभ स्वतःच्या मोबाईलमध्ये काही तरी बटन दाबतो.. आणि शौर्य ला जबरदस्ती का होईना खाली नेतो.

(आता पुढे काय होईल?? वृषभला काय आठवल?? भेटूया पुढील भागात.. नेहमीप्रमाणे हा भाग कसा वाटला ते ही कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल