Sees you in Marathi Short Stories by Bunty Ohol books and stories PDF | तुला पाहते

Featured Books
Categories
Share

तुला पाहते

तुला पाहते .........

आपल्या जीवनात काही घटना ह्या विधी लिखित राहतात. म्हणजे खूप वेळा असे होते कि ते लोक फक्त काही क्षणा साठी भेटतात आणि आयुष्य भरा साठी आपलेच होऊन जातात. .....
अशीच काही कहाणी आहे ती मैथिली आणि मिहीर ची.... हि गोष्ट असेल २०१० मधली त्या वेळेस मैथिली हि नगर ला कॉलेज ला होती आणि मिहीर पण नगर ला कॉलेज ला असतो. ते दोघे पण एकाच रूट ने प्रवास करत असे पण कधी दोघांची भेट झाली नाही. पण एके दिवशी राहुरी मध्ये बस थांबली आणि खूप काही लोक वरती चढले त्यात मैथिली पण होती. ती इकडे तिकडे नजर फिरवत होती, कि मला एखादे शीट हे बसण्यासाठी भेटेल. पण तिला भेटत नव्हतं. पण तेवढ्यात मागून एक आवाज आला. "इथे जागा बसण्या साठी " आणि ती मागे वळून पाहते तर तो मिहीर असतो. मिहीर च्या तोंडाला एक रुमाल असतो. आणि मैथिली ने स्क्राफ़् बांधलेले असते. इथे दोघेनां पण एकमेकांचा चेहरा पहिला नाही भेटत. मैथिली..... मिहीर च्या शेजारी येऊन बसते. आणि ती बॅग मधून न बुक कडून तिचा अभ्यास चालू करते. कदाचित तिची एक्साम चालू असेल तेव्हा. ती वाचत होती तेव्हा मिहीर ची नजर तिच्या नोट्स वर पडते आणि तो तिला लगेच विचारतो तुम्ही इलेट्रॉनिक मध्ये एमटेक करत आहेत का...?
ती त्याच्या कडे पहाते आणि म्हणते नाही. मी इंजनेरिंग करत आहे. मग इलेट्रॉनिक्स आहे का.. तुमची ब्रँच ..? ती हो बोलते आणि म्हणते काय झाले..? तो म्हणतो काय नाही तुमच्या नोट्स मध्ये जे आहे ते आम्हाला पण होते. म्हणून विचारलं .. ती थोडी शी चेहर्या वर स्माईल देते. ते पूर्ण प्रवासात एकमेकां विषयी जाणून घेतात. मिहीर ला पण तिच्याशी बोलून छान वाटते. तिच्या कडे सॅमसंग चा छोटासा फोन होता. पण त्याला तिच्या कडे डायरेक्ट नंबर विचारणं त्याला बरोबर वाटत नाही . म्हणून तो तीला विचारतो तुम्ही फेसबुक ला आहे का ...? आणि ती हो बोलते. तो तिला विचारतो प्रोफाइल ला कोणता फोटो आहे? त्या वर ती म्हणते बाप्पा चा..... गाडी मध्ये जास्त आवाज असल्या मुले त्याला ऐकला येते पप्पा चा. तेव्हा तो पुन्हा विचारतो पप्पा चा ..... तेव्हा ती बोलते पप्पा चा नाही गणपती बाप्पा चा. तेव्हा तो हसतो आणि आणि बस मधून खाली उतरतो.
त्यांची भेट होऊन पूर्ण तीन दिवस झाले होते. आणि अचानक त्याला तिची आठवण येते आणि तो तिला फेसबुक ला शोधतो त्याला ती सापडते ते आता फेसबुक वर बोलू लागतात. त्यांची चांगली मैत्री होते. पण दोघांच्या आयुष्यात पण आधी पासूनच कोणी ना कोणी असते. म्हणून ते मैत्री पलीकडे बोलत नाही. काही दिवस नंतर मिहीर हा नाशिक ला कामा साठी जातो.

आणि इकडे मैथिली पण टीचर च्या जॉब साठी कोपरगाव ला जाते. दोघांचे जीवन वेगळे असते कारण दोघांच्या आयुष्यात कोणी ना कोणी असते. दोघे पण कामा मध्ये एवढ्य वस्थ होतात. कि दोघं मध्ये कॉल वरील सपंर्क कमी होऊ लागतो. आणि मॅसेज वर पण जास्त बोलणं होत नाही. आणि अशेच काही दिवस जातात आणि दोघांचे पण पूर्ण सपंर्क तुटून जातो. आणि अचानक २०१६ मध्ये मैथिली चा फेसबुक वर मिहीर ला मेसेज येतो वाढ दिवसाच्या शुभेच्या साठी. तेव्हा तू पण तिला आभार वेक्त करतो. आणि ते मागील जीवना बद्दल बोलू लागतात. काही वेळा नंतर मिहीर तिच्या कडे नंबर मागतो. एवढे वर्ष होतात कि दोघं कडे नंबर नसतात. ते दोघे पण आप आपला नंबर एकमेकांना देतात. तेव्हा ती सांगते कि मी डिप्लोमा कॉलेज वर शिक्षक आहे. आणि मिहीर सांगतो कि मी एक चांगल्या कंपनीत काम करतोय. ते खूप दिवसा नंतर एकमेकांशी गप्पा मारतात. जसे ते या पूर्वी मारत असे. तेव्हा तो मैथिली ला तिच्या बॉयफ्रेंड विषयी विचारतो तेव्हा ती सांगते कि तो नाही आहे माझ्या आयुष्यात आता पूर्ण दोन वर्ष झाली आहे. त्याचे लग्न पण झाले आहे. तेव्हा मैथिली पण राहून त्याच्या गर्लफ्रेंड विषयी विचारते. तेव्हा तो पण म्हणतो कि नाही आहे ती पण माझ्या आयुष्यात. इथं दोघांचं आयुष्य एकाच वळणावर आले होते.
आता त्यांचं फोन वरबोलणं सुरु होतात. व्हाट्स अँप वर सकाळ आणि संध्या काळी मेसेज होतात. त्याच दरम्यान त्याला आणि तिला कळते कि दोघांच्या आयुष्यात कोणी नाही आहे. आणि ते एक मेकांना प्रोपोज करतात. यात दोघांना हि त्यांच्या अतीत विषयी काही प्रॉब्लेम नव्हता. दोघे हि शिकलेले होते. ते एकमेकांशी लग्न करायचा निर्णय घेतात आणि त्यांचे हि घरचे पण तयार होतात. आज ते दोघे हि खुश आहे. त्यांच्या ह्या गोड लाईफ शी. कधी तिला हि वाटलं नव्हतं किंवा त्याला हि वाटलं नव्हतं कि हा माझा जीवनाचा जोडीदार हा होईल किंवा हि होईल.
मिहीर आणि मैथिली ने एकमेकांचा चेहरा सहा वर्ष नंतर बघतात. तरी ते लग्नला तयार होतात. कारण त्याला हि माहित होत आणि तिला पण माहित होत एकमेकां बद्दल. आणि म्हणतात ना प्रेम आंधळं असत ते खरंच आहे कारण प्रेम हे मनाने माणशी बांधलेले गोडं नातं असत. एकमेकांशी असलेले रीस्पेकट हा पाहिजे. प्रत्येक च वेळी आपला इगो हा महत्वाचा नसतो कधी तरी समोरच्या वक्ती ला पण देवा. मिहीर आणि मैथिली मध्ये त्यांच्या भविष्यात काय झाले आहे ते दोघांना पण माहित होते. तरी ते दोघांना स्वीकार करतात. हि कहाणी छोटी आहे पण खु काही सांगण्याचा प्रयन मात्र नक्की करते.