आर्या .... in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | आर्या ....

Featured Books
Categories
Share

आर्या ....

अमन चल उठ लवकर ? ..अरे, ऑफीस ला जायचे आहे .. मला ही ऑफीस ला जायच आहे .डब्बा भरून ठेवला आहे .तूझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली आहे . सासूबाई चा ही सगळा स्वयंपाक बनवला आहे .उठ आहे ...आर्या .....चा सकाळ च्या वेळी तोंडाचा पट्टा चालु च होता .तिने बळजबरीने अमन ला झोपेतून उठवले . आणि लहान मुलाला जस शाळे साठी तयार करतात, तस ....त्याला तयार केल ..आणि ऑफीस ला पाठवून दिल .मग तीही त्यच्या पाठोपाठ ऑफीस ला जायला निघाली . घरातले सगळे उरकून आणि सासूबाई चा निरोप घेऊन ती निघाली ..धावत पळत च ती बस स्टँड वर निघाली . नेहमी प्रमाणे आज पण उशीर होणार ..आर्या मनोमन म्हणली . तेवढ्यात बस आली ....आर्या बस पकडण्यासाठी धावली ...कशीबशी त्या गर्दीतून वाट काढून तिने बस पकडली . बसण्याची जागा मिळेल ह्याची तर आशा करणेच चुकीचे होते .कशीबशी आर्या ,...ऑफीस मधे पोहचली . पण, ऑफीस मधे पौह्च्ताच तिची सगळी मरगळ निघून गेली . तिने झ्ट्क्न पर्स बाजूला ठेवली .आणि ती ने कामाला सुरवात केली .....हे ...मी निशा ....रेडियो 9.93 वर तुमच स्वागत करते . सकाळ चे हे गाणे फक्त ....तुमच्यासाठी .....चेनेल ची सुरवात करून, आर्या जरा वेळ शांत बसली .... सकाळ पासूनची चाललेली तिची धावपळ तिला आठवली ....आता तीच हे रोजच जाहले होते .पण तीच हे काम मात्र तिला खूप आवडायचं. ती खूप मन लावून हे काम करायची .जाहाले गाणे संपले .आता आर्या भानावर आली . आणि बोलू लागली ....हेलो ....मी तुमची निशा .......आज महिला दिनादिव्षि आपण आज चा शो महिलांवर करणार आहोत .आणि तुम्ही ही ह्या शो मधे सहभाग घेऊन मला मदत करणार आहे .... सो....... थँक यू ..,.एवढ्यात फोन ची रिंग वाजते .....आर्या फोन उचलते ..आणि कानाला लावते ....बोला .....मी तुमची निशा ....तुम्हाला काय मदत करू ..
समोरून आवाज ....हेलो ......निशा ..मी सायली ...कॉलेज मधे जाते ....मझे एका मुलावर खूप प्रेम आहे . त्याचे ही मझे वर खूप प्रेम आहे .पण आता तो मला अस म्हणतोय की .....आपण लिव्ह ईन मधे राहू ....मला काय करावे ते समजेना ....आणि जर लिव्ह ई न मधे रहावे? तर घरी काय सांगू? त्यांना कस मन्वू...... आता सायली चा प्रॉब्लेम आर्या ला समजला होता ....ती ....लगेच तिला म्हणली ....हेलो ....सायली ...मला तूजाहा प्रॉब्लेम समजलाय . आपण लवकरच भेटू ....तो पर्यंत हे गाणे तुझ्यासठि .....आर्या विचार करू लागली ....की, सायली ला उत्तर काय दयाचे कारण, काही दिवसापूर्वी तिने ही ह्याच चूक्या केल्या होत्या . तिला ही त्यावेळी काय करावे काही सुचत नव्हते .काय योग्य? काय अयोग्य काहीच कळत नव्हते .... पण त्यावेळी कोणचा तरी सल्ला घ्यावा ...कोणालातरी विचारावे ऐत्क्या जवळ तिच्या कोणीच नव्हते .....संपूर्ण घर माणसांनी भरलेले असून ही तिला घरात खूप एकटेपणा जाणावायचा . घरचा विषय डोक्यात येताच तिला घर आठवले . आई आठवली, बाबा आठवले ..दोन काका, काकू, आजी आजोबा ..तिची चुलत भावंडे सगळी आठवली . एकत्र कुटुंब जरी असले तरी ...त्याच कुटुंब मॉडर्न होत ...आजी आजोबा घरात मुलांना सांभाळायचे ...आणि आई बाबा ...काका काकू सगळे कामावर जायचे ..घरात बायकांच्या उपयोगी येतील अशी सगळी उपकरणे होती ... साडी व्यतिरिक्त ई तर कपडे परिधान करण्याची मुभा होती .संध्याकाळी सगळी माणसे एकत्र बसून जेवत असे ...मग त्यावेळी एकमेकांच्या अयुषत काय प्रॉब्लेम आहे ते सगळे जण सांगायचे ...मग त्यांच्यावर सगळेजण मिळून तोडगा काढायचे ...पण, त्यावेळी मला हे सगळ खूप बोरिंग व्हायचे. आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम दुसरे कसे सोडवू शकतात अस मला वाटायचे ...पण आज मला कळतंय ...की साथीची सोबती ची गरज ही लागतेच ... त्या वेळी आपण अस वागायला नको होत . आपण ....अस घर सोडून ......अरोही विचार करता करता थांबली ...नकोच तो विषय ....विचार करून करून फक्त डोक दुखत ..बाकी काही नाही .... पुन्हा तो त्रस्स नको ...ते टेन्शन नको ...आहे हे चांगले अस म्हणायचे .....म्हणजे दुःख, टेन्शन कमी होते . अस आई म्हणायची ...म्हणजे टेन्शन जरी कमी जाहले नाही ..तरी.... मनाला दिलासा. जाहले ...गाणे संपले, आणि अरोही परत कामाकडे वळली . तिने सायली ला फोन केला .....हेलो, सायली ...मी तुमची निशा ....तूझ्या प्रश्नांवर खूप विचार केल्यावर ....मझ्या लक्षात आले ,की ... तुमचा हा प्रश्न संवाद केल्यावर सुटेल . तुम्ही प्लीज ही लिव्ह ई न मधली गोष्ट तुमच्या घरी सांगावी ......घरच्यांनी तुमच म्हणे जर ऐकले तर उत्तमच आणि .....जरी नाही ऐकले तरी उद्या तुम्ही त्याच न ऐकता ..लिव्ह ई न मधे रहायला गेला ..तरी त्यांना ह्या विषयी कल्पना असेल ...आणि जरी तुम्ही एखद्या मोठ्या प्रॉब्लेम मधे फसला, तरी ते तुम्हाला मदत करतील .कारण त्यां त्या मुलांविषयी मीहीती असेल . पण .....पण हे सगळ करण्या आधी तुम्ही त्या मुलाविषयी सगळी महिती जाणून घ्या ....ज्या च्या साठी तुम्ही हे सगळ करताय ... तो कसा आहे हे माहीत असणे खूप गरजेचे असते . चला .....आजचा भाग ऐथेच संपतो ....उद्या भेटू या ...ऐथेच परत .... ह्याच वेळी ...तोपर्यंत नमस्कार........ आर्या ने एवढे बोलून कानाचा हेडफोन काढून खाली ठेवला . खूप गरम होत होत म्हणून ती बाहेर आली .तिथे तिची मैत्रीण कोमल धावत च आली ..आर्या मस्त झाला .एपिसोड ......हा घे जुईस ..,.आर्या ला गरम होतय ...हे तिने ओळखले होते . शेवटी आर्या सहा महिन्याची गरोदर होती ....आणि ह्या ही स्तीथीत ती जॉब करत होती . घरातील सगळ करत होती .ह्या मुला आधी तिला एक मुलगी होती ... रेवा ...खूप गोड होती ...रेवा ...दोन वर्षाची रेवा खूप चुणचुणीत आणि गोड होती . आई ऑफीस ला गेल्यावर ती शेजारच्या कडे राहत होती . पण त्या बाबतींत तिची आई कडे काहीच तक्रार नव्हती .तस पण त्या नख भर पोरी ला काय समजत होते? ....आर्यांचा शो जाहला आणि ती घरी जायला निघाली ...आज जरा रोज च्या पेक्षा जरा दमल्या सारखच जाहले होते . म्हणून ती जरा लवकरच कामावरून निघाली . बस पण पटकन मिळाल्यामुळे तिला जरा बरे वाटले ...तेवढाच थोडासा त्रस्स कमी जाहला. बस मधे बसल्यावर पुन्हा तिच्या डोक्यात विचार चक्र चालु जाहले . घरची तिला खूप आठवण येत होती .....अश्या अव्घ्ड्लेल्या स्तीथीत तिला त्याची फार गरज होती .पण त्यांच्याकडे ती जाऊ पण शकत नव्हती . कारण तिनेच तिकडे जाण्याचा रस्ता बंद केला होता .... आता फक्त ती एकटी होती .एकटीने सगळे सहन करत होती .एकटीने घराचा गाडा चालवत होती .दुःख फक्त एवढेच होते की ...ज्याच्या साठी तिने एवढे सगळे केले होते .त्याला मात्र ह्याची काहीच फिकीर नव्हती ...त्याने साधे लग्न झल्यापसून तूझ काही दुखतंय का? अस विचरले सूध्हा नाही .....रेवाच्या वेळी बाळंतपानात सूध्हा तिची बारा दिवसाच्या वर तीच कोणी काही केल नाही . तश्या अव्स्टेथ सूध्हा ती घरातील सगळी कामे करायची ...शिवाय रेवाला सूध्हा सांभाळायची.