भाग १६
अथर्व आणि त्याचे आजोबा लग्नाच्या तयारीला लागले, पण सगळ्यात मोठी जबाबदारी कोण घेणार याचा प्रश्न मात्र होता. आजोबा आणि अथर्व ने शेवटी ती जबाबदारी आजी कडे दिली, ती जबाबदारी म्हणजे अथर्वच्या आई वडिलांना हे सगळ सांगण आणि त्यांना तयार करण. पण एक दिलासा होता तो म्हणजे संपूर्ण निर्णय हा अथर्वचा होता, आणि आता कितीही कोणीही काही केल तरी तो बदलला जाणार नाही.
पण एक होत कि या सर्व गोष्टींचा त्रास साक्षी ला होऊन द्यायचा नव्हता. तिने पहिलच खूप सोसलं होत आणि आता अथर्वला त्यात अजून काहीच भर घालायची नव्हती.
पण शेवटी ज्याची भीती होती तेच झालं आजीचा फोन झाल्यावर लगेच आईने साक्षीला फोन केला पण अथर्वला सगळ माहित होत म्हणून तो पूर्ण वेळ साक्षी सोबत होता. ज्या वेळेस त्याच्या आईचा फोन आला त्यावेळेस साक्षी क्लिनिक मध्ये व्यस्थ होती, म्हणून तो फोन त्यानेच उचलला. आणि सर्व पूर्णपणे ऐकून घेतल, स्वतःच्या आईच्या मनात इतका द्वेष, राग पाहून अथर्वला काही वेळ काहीच सुचत न्हवत, न राहून तो मध्ये आईच बोलन तोडून बोलू लागला, आई बस्स कर आता अजून किती कडवट पणा ठेवणार आहेस मनामध्ये. साक्षी सोबत लग्नाचा निर्णय माझा आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे म्हणून आजीने फोन केला. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या लग्नात यायचं असेल तर या मी हे लग्न तुम्ही असोवानसो मी हे लग्न करणार आहे आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आजी आजोबा आहेत. माझा कोणालाही कोणत्याहि प्रकारचा आग्रह नाहीये, आणि जर परत कोणी काही साक्षीला बोललं तर मला आवडणार नाही. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते.
एका दमामध्ये अथर्व हे सगळ बोलून गेला, हे सगळ बोलताना त्याला खूप वाईट वाटत होत पण, शेवटी जे ठरवल आहे आणि संपूर्ण परिवार एकत्र आणायचा असेल तर हे सगळ करण फार गरजेच होत, म्हणतात ना जर एखद्या गोष्टी मागे उद्देश चांगला असेल तर थोड कडू बोलन गरजेच असत. आणि दोघांना तर फक्त त्यांचा परिवार एक करायचा होता. गेल्या काही वर्षात जे आजी आजोबांनी भोगल उद्या ते तुमच्या सोबत हि होऊ शकत याची जाणीव करून द्याची होती.
या सर्व विचारत साक्षी तिथे येते, आणि तिला अथर्वच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून समजून जात कि, काही तरी अस झाल आहे ज्याने त्याला खूप दुखः झाल आहे, ती त्याच्या जवळ जाते आणि अलगद त्याच्या केसांमधून हाथ फिरवते, तिला जवळ पाहून अथर्व तिला बिलगून रडू लागतो. त्याच्या मनात सुरु असलेली चलबिचल तिला समजते व तीही त्याला जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करते.
पल पल मेरा तेरे ही संग बिताना है
अपनी वफ़ाओं से तुझे सजाना है
दिल चाहता है तुझे कितना बताना है
हाँ तेरे साथ ही मेरा ठिकाना है
अब थक चुके हैं ये कदम
चल घर चलें मेरे हमदम
होंगे जुदा ना जब तक है दम
चल घर चलें मेरे हमदम
ता उम्र प्यार ना होगा कम
चल घर चलें मेरे हमदम
मेरे रहो तुम और तेरे हम
चल घर चलें मेरे हमदम
ख़ुशबुओं से तेरी महके हर एक कमरा
दरों दीवार नहीं
काफी है तेरी पनाह
संग तेरे प्यार का जहां बसाना है
जिसमे रहें तुम और हम
चल घर चलें मेरे हमदम
मेरे रहो तुम और तेरे हम
चल घर चलें मेरे हमदम
दोघांची मने इतकी एक होती कि त्यांना एकमेकांना होणार त्रास कधीच सहन झालेला नव्हता, आणि अथर्व आता जे करत होता त्यात त्याला साक्षीची सगळ्यात जास्त गरज होती. आणि साक्षीला त्याची हि अवस्था समजत होती, पण धीर देण्याव्यतिरिक्त अजून काहीच करू शकत नव्हती.
आणि शेवटी तेच झाल अथर्व च्या आई वडिलांची गाडी त्यांच्या घरासमोर थांबण्याऐवजी ती साक्षी च्या घरा समोर थांबली, आणि आत शिरताच त्यांचा साक्षी सोबत वाद सुरु झाला, वाद कसला एकटे ते दोघेच बोलत होते आणि साक्षी शांत पणे सगळ ऐकून घेत होती, तितक्यात जोरात एक आवाज आला, तिला कोणीही काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही, लग्नाला थांबायचं नसेल तर निघून गेलात तरी चालेल, पण तिला यात मध्ये ओढायच नाही. आणि सगळे त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागतात.
बाबा: अरे मी तुझा बाबा आहे, आणि तू माझ्या सोबत अस बोलतोस, हेच शिकवलं का रे तुला आम्ही, का तुझ ऐकून घेण्यासाठी जन्माला घातल तुला, अस कस वागू शकतोस, आम्हाला तुझ्या लग्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि तुझ लग्न कोणा सोबत होणार हे देखील आम्हीच ठरवणार.
या सर्व बोलण्यावर अथर्वच अजिबात लक्ष नव्हत, त्याची नजर फक्त साक्षी वर होती, ती मान खाली करून उभी होती पण डोळ्याच्या कडा काठोकाठ भरल्या होत्या, अजून जर कोणी काही बोललं असत तर मात्र तिला संभाळण मुश्कील झाल असत. आई बाबांना दूर करत अथर्व साक्षी जवळ जातो आणि तिला हाथ पकडून डोळ्याने शांत होण्यासाठी सांगतो. हे सगळ पाहून अथर्व च्या आईला खूप राग आला, पण मुलाच्या पुढे काय बोलणार. म्हणून दोघेही तिथून निघून जातात. दोघांना निघून जाताना पाहून अथर्व साक्षी ला शांत करून तोही त्यांच्या मागे निघतो, कारण त्याला माहित होत जर इथे काहीच करता आल नाही तर त्यांचा मोर्चा हा आई बाबांकडे वळणार. साक्षी ला समजावन खूप सोप होत, पण आजोबाची तब्यत बघता आता त्यांचा कोणताही मार्ग हा फक्त नुकसानच करू शकतो आणि ते अथर्वला होऊन द्यायचा नव्हत.