ATRANGIRE EK PREM KATHA - 13 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 13

Featured Books
  • మనసిచ్చి చూడు - 5

                                    మనసిచ్చి చూడు - 05గౌతమ్ సడన్...

  • నిరుపమ - 5

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ- వీర - 6

    వీర :- "నీకు ఏప్పట్నుంచి తెల్సు?"ధర్మ :- "నాకు మొదటినుంచి తె...

  • అరె ఏమైందీ? - 18

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 4

    మనసిచ్చి చూడు - 04హలో ఎవరు.... ️ అవతల మాట్లాడకపోయే సరికి ఎవర...

Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 13

"मम्माsss..",आपल्या मम्माला बघुन त्या खुप खुप भरून येत.. दोन्ही हात आपल्या पासुन लांब करत तिला माझ्याजवळ येऊन मला मिठी मार अस तो सांगत असतो..

वृषभ आणि रोहन अनिताकडे बघतच उठुन बाजूला उभे राहिले.. तस अनिता त्याच्याजवळ येऊन त्याला मिठी मारते.. शौर्यही तिला मिठी मारत रडतो..

अनिता : "जास्त त्रास होतोय का??

शौर्य : "तु आलीस मग आता एकदम बर वाटतंय.."

अनिता : "काल तुला अश्या अवस्थेत बघुन मला राहवलच नाही रे.."

शौर्य : "एकटीच आलीस??"

अनिता : "हम्मम.."

शौर्य : "विर कसा आहे??"

अनिता शौर्यचा प्रश्न ऐकुनन ऐकल्यासारखा करते.. आणि आपली नजर वृषभ आणि रोहनवर फिरवते..

अनिता : "तु रोहन ना.?? इज एम राइट..? आपण बोललोय ह्याआधी आणि कालच व्हिडीओ कॉलवर सुद्धा.."

रोहन : "हो आंटी.. how's you..??"

अनिता : "एम गुड बेटा.. आणि हा.??"

"हा वृषभ..", शौर्य वृषभची ओळख करून देतच बोलला..

वृषभ : "हॅलो आंटी.."

अनिता आपल्या हाताचा पंजा हलवतच एक गोड स्माईल देत वृषभला हाय करते.

अनिता : "तुम्ही तिघांनी नाश्ता केलात??"

रोहन : "आम्ही जस्ट करायलाच बसत होतो.."

अनिता : "म्हणजे मी वेळेवर आलीय तर..शौर्य.. मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेसियल आणलंय.. you can guess..??"

"नाही माहीत एन्ड आय डोन्ट वॉन्ट एनी थिंग", शौर्यतोंड पाडतच बोलतो..

"अस काय करतोयस.. नेहमीप्रमाणे guess तर तु करूच शकतोस ना?? बर जाऊदे मीच सांगते",अस बोलत अनिता डब्बा उघडुन शौर्यच्या समोर ठेवते.. पण शौर्यच्या चेहऱ्यावर काहीच हाव भाव नव्हते.

अनिता : "काय झालं शरू नाही आवडत का आता.. नाही म्हणजे दहीवडा बघुन तुझ्या चेहऱ्यावर जो आंनद दिसायचा तो नाही दिसला मला."

शौर्य : "मी बोललो ना मला नकोय काही.".

वृषभ : "काय झालंय शौर्य तुला?? टॉनी बोलला तु काल जेवलास सुद्धा नाही. तुला दुसर काही खावंसं वाटतंय का??"

"शरु का जेवलास नाही काल?? काय झालं सांग??" अनिता थोडा गंभीर चेहरा करतच त्याला विचारते..

"आपल्या मम्माला नाही सांगणार??", शौर्यच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतच ती बोलते..

तस शौर्य खुप रडु लागतो..

शौर्य : मम्मा दोन दिवसांनी फुटबॉलची डिस्ट्रीक्ट लेव्हलची मॅच आहे ग. तुला माहिती ना फुटबॉल माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ते. मला आता ती मॅच नाही खेळायला मिळणार.. माझ्या स्टुपिडपणा मुळे.."

वृषभ : "शौर्य फक्त हीच मॅच स्कीप होईलना तुझी.. स्टेट लेव्हलची मॅच तर तु खेळु शकतोसना आपण.. एवढं का तु मनाला लावुन घेतोयस यार..??"

रोहन : "शौर्य तु ह्या स्तुपिड कारणाने काल पासुन अपसेट होतास."

शौर्य : "फुटबॉल जॉक नाहीय रे माझ्यासाठी.. मम्मा तुला माहिती ना ग. "

अनिता : "शहहह!!! तु आधी शांत हो बघु.. मला माहितीय पण तुला ही माहितीना मला तु अस रडलेलं नाही आवडत ते आणि सगळ्यात महत्त्वाचं तु असा विचार करतोयस की तु आयुष्यात कधीच फुटबॉल खेळणार नाहीस. आधी तो विचार करणं सोडून दे बघु. अजुन आयुष्य खुप मोठं आहे बेटा एवढ्याश्या छोट्याश्या गोष्टीवरून तु तुझं किमती अश्रु वाया घालवलेलेस मला नाही चालणार. तुला माहिती तुझा बाबा काय बोलायचा,

"जिंगदी कमजोरी को अपनी दुष्मनी बनाती हे,
ओर ये दुष्मनी अच्छे पलोंको भुला देती हे !

सोचने की बात येह हे की,

अच्छे पलोंकी पकड में दुष्मनी भी कभी कबार युही फंस जाती हे की , कमजोरी ही जिंदगी जिने की नई उम्मीद बनके सामने आ जाती हे !", शौर्य त्याच्या मम्माचा मांडीवर डोकं ठेवुन त्याच्या मम्माचा तोंडुन निघणारे त्याच्या बाबांचे शब्द अगदी मन लावून ऐकत रहातो.

शरू तु ही असाच वागतोयस बघ.. माझ्या पायाला लागलं, मी मॅच नाही खेळु शकणार म्हणुन काल पासून जेवणसुद्धा केलं नाहीस. पण तू ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोयस की तुला मित्राचं प्रेम अनुभवता येतयरे. खुप कमी लोकांच्या नशिबी असत अस मित्र प्रेम. तुला माहिती तुझा बाबा सोडला ना तर माझं एवढं काळजी करणार मित्र अस कोणी झालंच नाही. त्यात तुझे हे मित्र. त्यांनी तुला वेळेवर आणलं इथे. तुला हवं नको ते बघतायात. तुला हसवायचा प्रयत्न करतायत. मी आले तेव्हाही हा वृषभ तुला त्याच्या स्वतःच्या हाताने चहा बिस्कीट भरवत होता.. फुटबॉल खेळायची संधी ना तुला पुन्हा पुन्हा भेटेल पण हे दिवस पुन्हा नाही येणार आणि मला काय वाटत माहिती, जर तु काल व्हिडीओ फोन उचलला नसतास तर कदाचित मी ही तुला भेटायची संधी शोधत राहिली असती आणि आज भेटेल उद्या भेटेल ह्या चक्रव्यूहात आपली भेट व्हायला कदाचित वर्ष तरी लागले असते. पण तुझी ही अवस्था बघुन कशी धावत आले बघ तुझ्याकडे. जीवनात मिळणाऱ्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्याल शिक." शौर्यचे डोळे पुसत अनिताने त्याला बसवलं. सोबत आणलेले दही वडे तिने एका प्लॅटमध्ये काढत शौर्यला भरवायला घेते. शौर्यची प्लॅट शौर्यच्या हातात देत वृषभ आणि रोहनसाठीसुद्धा तिने दही वडा प्लॅटमध्ये काढत दोघांनाही सुरुवातीचा एक एक घास भरवत तिने त्यांचे आभार व्यक्त केले.

"मम्मा मस्त झालेत.. तु पण खाना." शौर्य आपल्याच प्लॅट मधुन अनिताला भरवु लागला)

वृषभ : "हो आंटी अप्रतिम.."

रोहन : "मला सुद्धा आवडले."

अनिता : "मग अजून घ्या.. खुप आणलेत. शौर्य एवढेच मित्र झाले.."

वृषभ : "काकु आमचा ग्रुप खुप मोठा आहे. आत्ताच दोघे हॉस्टेलवर गेले."

रोहन : "हो न. तुम्ही थोडं लवकर यायला हवं होतं म्हणजे त्यांना पण भेटले असता. "

अनिता : "नेक्स्ट टाईम वेळ काढुन येईल तेव्हा भेटेल मी सगळ्यांना आणि शौर्य ह्यापुढे रडायच नाही हा. "

वृषभ : "तुमचा शौर्य आजच रडतोय नाही तर नेहमी आम्हालाच रडवत असतो."

शौर्य : "काही काय?? मम्माला खर वाटेल."

रोहन : "खर तेच तर बोलतोय.. राजला केंटिंगमध्ये सॅंडवीच मध्ये काय घालुन दिलेल सांगु का? आणि किती त्रास देतो त्याला ते.. सांगु??"

अनिता : "शरू इथे पण तुझं तेच चालु का?? मला तुझ्या कम्प्लेन्टि ऐकायला नाही आवडत."

शौर्य : "मम्मा अग ते मस्तीत ग... आणि तोही मला त्रास देतच असतो ना. बघावं तेव्हा नुसतं त्या समीरा वरून चिडवत असतो.."

अनिता : "समीरा कोण??"

रोहन : "कोणी नाही.. आमची क्लासमेट आहे."

शौर्य : "फक्त क्लासमेट हा मम्मा.."

(मम्मा पुन्हा टॉपिक छेडत बसेल म्हणुन शौर्य बोलला)

अनिता : "बर.. आणि काय मज्जा मस्ती चालते..?"

रोहन आणि वृषभ मिळुन शौर्यने दोन आठवड्यात केलेल्या करामती सांगु लागले.. अनिता हसतच शौर्यच्या नटखट खोडी ऐकू लागली.

आता रूममधील वातावरणात एक कमालीचा बदल जाणवत होता. जुन्या आठवणीतील खोडकरपणा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसु आणत होता.

तोच डॉक्टर शौर्यच्या रूममध्ये येतात..

"आता वाटतंय का बर.??", डॉक्टर शौर्यला चेक करतच विचारतात..

शौर्य : "होsss".

अनिता : "ह्याला डिस्चार्ज कधी पर्यंत मिळेल..?"

डॉक्टर : "मी त्यासाठीच आलोय, फक्त उजव्या पायाची हालचाल कशी कमी करता येईल ह्याची काळजी घ्यावी लागेल आणि एक आठवड्यानी आपण पून्हा एक एक्सरे काढुन बघुयात. बाकी काळजी करण्यासारखं काहीच नाही.."

सगळ्यांना ऐकुन थोडं बर वाटत..

डॉक्टर : "सो मिस्टर शौर्य... जायचं का मग घरी..??"

"जायचं तर आहे.. मम्मा येऊ का ग घरी??",शौर्य मम्माची मस्ती करतच बोलु लागला.

अनिता पण थोडं हसण्यावर घेऊन दुर्लक्ष करते.

डॉक्टर : "डिस्चार्ज फॉर्मेलिटी पूर्ण करून नेऊ शकता तुम्ही ह्याला."

आणि डॉक्टर निघतात.

शौर्य : "मम्मा.. चल ना ग मला घेऊन मुंबईला.."

अनिता : "तुम्ही इथे बसा ह्याच्यासोबत मी डिस्चार्ज फॉर्मेलिटी पूर्ण करून येते.."

(अनिता ऐकुन न ऐकल्यासारखं करते आणि रूममधुन निघुन जाते)

शौर्य : "बघितलस नेहमी असच करते ही.."

रोहन : "शौर्य तु पण समजुन घेणा यार. त्यांची पण मजबुरी समजुन घ्यायला शिक.. आणि तु मला सांग आधी तु पडलासच कसा.? नाही म्हणजे तुला साधा बेलेन्ससुद्धा करता आला नाही का.?"

शौर्य : "काही तरी पायाखाली तेल वैगेरे असेलरे.. नाही म्हणजे त्यावर पाय पडुन स्लिप झाला माझा. "

रोहन : "तेल..?? आणि तेही फोर्थ फ्लॉरवर.. तस नाही रे मी पण तिथूनच आलो ना मग मी कसा नाही पडलो..? मी काय तो राज आणि टॉनी पण तिथुनच आलो आम्ही.. मग आम्ही पण पडायला हवे होतो ना.."

वृषभ : "तुझ्या शुजला चिक्खल वैगेरे लागला असेल म्हणुन घसरला असशील तु.. तस पण तु ग्राउंडमधुन गेलेलास ना.."

शौर्य : "तु बोलतोयस मग असेलही बट पायाखाली काही तरी unctuous अस होत एवढ नक्की".

वृषभ : "जाऊ दे जास्त विचार नको करुस.. हॉस्टेल वाट बघतय तुझी..".

रोहन : "शौर्य तुझी मॉम?? ते रहातील ना तुझ्यासोबत आज.?"

शौर्य : "तेवढा वेळ ती माझ्यासाठी कधी नाही रे काढत.. मी अस आजारी असल्यावरच मला तिच प्रेम अनुभवता येत.. नाही तर एवढं माझ्यासाठी माझी मम्मा आणि माझा बाबा कोणी तरी वेगळंच आहे.."

"कोण?", दोघेही एकत्रच विचारतार..

शौर्य : "अस नाही सांगणार.. जेव्हा ती व्यक्ती मला भेटायला इथे येईल तेव्हा दाखवेल".

रोहन : "ओके".

वृषभ : "तुला इथे का नाही आवडत?? बघावं तेव्हा नुसतं मुंबईला जायच्या मागे लागलेला असतो."

शौर्य : "माझं सगळं काही तिथेच आहेरे. माझा विर, ब्रुनो आणि माझी मम्मा पण.. मला ह्या तिघांशिवाय नाही जगता येतरे. मी रागावलो ना तर नाराज होऊन रूम लॉक करून घ्यायचो. मम्मा बाहेरूनच समजूत काढायची पण मी नाही उघडायचो. माझा राग शांत झाला की मीच मग मम्माच्या रूममध्ये जायचो भले रात्रीचे दोन वाजु दे नाही तर तीन वाजु देत. तो पर्यंत तीही जागीच असायची. मग तिच्या मांडीवर झोपायचो. ते सगळं मिस करतोय मी इथे.

वृषभ : "पण तुझी मम्मा जे काही करतेय ते तुझ्यासाठीच हे ही लक्षात ठेव.."

"अस तुला वाटतंयरे मला नाही", शौर्य नाराज होतच बोलतो..

"बर हा टॉपिक राहु दे बाजूला अजुन मुंबईला काय करतोस ते सांग..", शौर्यने नाराज राहुनये म्हणुन रोहन विषय बदलतो..

शौर्य मुंबईची धमाल मस्ती दोघांना सांगतो.. तिघांच्याही गप्पा अगदी रंगात आलेल्या असतात.

तोच अनिता तिथे येते.

अनिता : "शरू मी सगळ्या फॉर्मेलिटी पूर्ण केल्यात आपल्याला आता निघायला काहीच हरकत नाही."

रोहन : "आंटी तुम्ही एवढ्या लांबुन आलात एक काम करूयात का..? सगळे माझ्या घरी जाऊयात. तुम्ही थोडं रेस्ट करा तिथे."

अनिता : "थेंक्स बेटा बट मला अस वाटत शौर्य सोबत तुम्ही आहात त्याची काळजी घ्यायला. मी निघाले तरी काही हरकत नाही."

शौर्य : "मम्मा प्लिजss.. मला बर वाटेपर्यंत तर तु राहुच शकतेसना??"

अनिता : "शरू मला एवढे कठोर निर्णय का घ्यावे लागतायत हे तुला माहिती आहे ना?? मी आत्ता जास्त काही बोलत नाही.. काळजी घे तुझी. "

शौर्य : "विर कसा आहे ते तरी सांग.."

अनिता : "त्याचा डॅड त्याच्या सोबत असताना तो कसा असणार आहे.. त्याची काळजी घेणं बंद कर तु तुझी काळजी घे."

शौर्य : "विर चांगला आहे ग खुप.. तु त्याला डॅड सोबत कंम्पेर नको ना करुस आणि त्याचा राग पण नको करुस.. प्लिज.."

अनिता : "मी तुझी काळजी घेतेय शरू.. बाकी कुणाचा मी राग नाही करत.. आपण लवकरच भेटु.. पोहचल्यावर फोन करते मी. मगाशी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव. रडत बसू नकोस. तुझ्यासाठी आणि तुझ्या फ्रेंड्ससाठी खाऊ आणलाय. ते वाटून घ्या. आणि एन्जॉय करा हे दिवस.. काय??"

येस..( सगळे एकत्रच बोलले)

अनिता शौर्यला मिठी मारतच तिथुन निघते.

आईचा निरोप घेताना शौर्यला खुप जड जात असत. येणार रडु तो आवरतच तिला बाय करतो..

दोघेही मिळुन शौर्यला कॉलेजमध्ये आणतात.

शौर्य : "किती वाजलेरे??"

बारा वाजुन गेलेत..

शौर्य : "प्रॅक्टिस चालू होईलना...???"

वृषभ : "हो पण तु आराम कर..".

पण एका शब्दात ऐकल तो शौर्य कसला.. शौर्य ग्राउंडमध्ये जायची जिद्द करतो. रोहन आणि वृषभ नाईलाजाने त्याला तिथे नेतात व बाकीच्यांना मेसेज करून कळवतात

शौर्य आलाय हे कळताच सगळे धावतच ग्राउंडमध्ये जमतात..

समीरा : "तु आराम करायचास ना.?"

शौर्य : "खेळू नाही शकत निदान बघु तर शकतो ना ग मी..?? पण तू नाही गेली प्रॅक्टिसला..?"

समीरा मानेनेच नाही म्हणते.

शौर्य : "का ??"

समीरा : "माझं सोड तुला बर वाटतंय का??"

शौर्य : "हो म्हणजे पाय थोडा दुखतोय."

शौर्यला ग्राउंडमध्ये बघुन मनवीला थोडं आश्चर्य वाटत..

मनवी : "तुला लगेच डिस्चार्ज पण दिला??"

शौर्य : "तुला नाही आवडलं का मी इथे अस आलेलो.."

मनवी : "नाहीsss."

ती अस बोलताच सगळे तिच्याकडे बघु लागतात..

रोहन : "मनवी तु काय बोलतेस हे..??"

मनवी : "काय बोलते म्हणजे.. खर तेच तर बोलतेय आणि तुम्ही सगळे असे का बघत आहात माझ्याकडे.. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा होता की, त्याने रूमवर जाऊन आराम करावा. इथे येण्याची काय गरज आहे.. पुन्हा पाय दुखेल त्याचा.."

सीमा : "हे तु पूर्ण वाक्यात बोलली असतीस तर आम्हांला नीट कळलं असत."

राज : "एवढी काळजी.. रोहन तुझी तरी करते का रे ही.. ??"

(राज हळुच रोहनच्या कानात बोलला)

मनवी : "एक मिनिट राज.. तु काय बोललास ह्याच्या कानात..??"

राज : "मी कुठे काय बोललो...??"

मनवी : "तु माझ्याबद्दलच काही तरी बोललास.."

राज : "हो बोललो तुझ्याबद्दल.. तु एवढी बारीक का झालीयस.. हेच विचारत होतो त्याला.. हो ना रे रोहन.."

"अ... हो...", रोहन राजला थोडं सावरतच बोलला.

मनवी : "ओहह रिअरली..!! ते मी डाएटवर आहे म्हणून.. बट जाऊदे.. रोहन एक मिनिट.. माझं काही काम आहे तुझ्याकडे पर्सनल."

रोहन : "गाईज मी आलोच.. एकच मिनीट हा.."

राज : "रोहन आम्हाला तुझ्या ह्या एकच मिनिट शब्दाची सवय झालीय आता. यु केरी ऑन.."

सीमा : "ही जरा अतीच वागतेय अस नाही का वाटत..??"

टॉनी : "पहिलं तरी कुठे नीट वागायची. सोडना.. रोहनला पटतय ना तीच वागणं मग आपल्याला काय करायचंय?? मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी??"

मनवी आणि रोहन बाजुला जाऊनच काही तरी बोलतात पण समीराला अंदाज आला होता की मनवी काय बोलणार ते.

मनवी : "तुला त्याला एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये न्यायची काय गरज होती रोहन..???"

रोहन : "तुला झालं काय आहे मनवी..? मी गेल्या चार पाच दिवसापासून बघतोय तु नुसतं राग राग करतेयस त्याचा. काय प्रॉब्लेम काय आहे तुला त्याच्या पासून??"

मनवी : "रोहन मला नाही आवडत तो. खर तर मी तुला सांगणार नव्हती पण तो एक वेगळयाच नजरेने माझ्याकडे बघत असतो. "

रोहन : "कोण शौर्य??"

मनवी : "आता मी त्याच्याबद्दलच बोलतेय ना??.. मग त्याच्याबद्दलच सांगणार ना??"

रोहन : "हो पण शौर्य तसा नाही ग. तुझा गैरसमज झाला असेल त्याच्याबद्दल काही."

मनवी : "जर तुला त्याची बाजु घेऊन माझ्याशी भांडायच असेल मग ठिक आहे.. तु भांड.."

रोहन : "तस नाही ग.. पण.."

मनवी : "पण काय..? बर ते सोड..हॉस्पिटलच बिल किती झालं आणि बिल भरल कोणी..?"

रोहन : "ते तर शौर्यनेच भरले म्हणजे.."

"खोट बोलू नकोस हा रोहन... मला माहिती तूच भरलं असणार..", मनवी मध्येच त्याला तोडतच बोलली..

"एक मिनिट..!! तुला आज झालंय काय.. ताप वैगेरे तर नाही ना.." रोहन मनवीच्या डोक्याला हात लावत बघतो

मनवी : "मी एकदम बरी आहे. काल आपण लंचसाठी बाहेर जाणार होतो. पण तुला माझ्यापुढे तो महत्वाचा. ग्रेट.. तु तर ना माझ्याशी बोलूच नकोस."

रोहन : "रागात भारी दिसतेस मनु तु.."

मनवीचा राग शांत व्हावा म्हणुन तो नेहमीचाच डायलॉग तिला बोलुन दाखवतो.. आणि त्यासोबत तिची समजुत सुद्धा काढत असतो)

"तु सोड मला बोलायचंच नाही तुझ्याशी.. ", मनवी रागातच तिथुन निघुन जाते..

"आज जाऊयात ना.. मनवी ऐक तर..", रोहन जोरातच ओरडत बोलतो..

पण मनवी ऐकुन न ऐकल्यासारखं करत गृपमध्ये येऊन बसते.

स्पोर्टचे सर शौर्यशी बोलत तिथे उभे असतात.

मनवी अर्ध्यातच येऊन त्यांचं बोलणं ऐकते.

सर : "Only because of you I was very confident that, we will win all level of match but now.."

शौर्य : "Sir B positive.. we will definitely Win.."

सर : "hmm lets see.. you take care.."

शौर्य : "Thanks sir..."

ग्राऊंडवर जाणाऱ्या सरांकडे शौर्य बघतच बसतो..

"नेक्स्ट मॅच नक्की खेळशील तु.. don't worry..", समीरा शौर्यच्या खांद्यावर हात ठेवत त्याला बोलली..

समिराच्या हातांचा स्पर्श शौर्यला आतल्या आत सुखावत होता.शौर्य तिच्याकडे बघतच रहातो. समीराला सुद्धा जाणवत की आपण भावनेच्या भरात थोडं जास्तच जवळ जातोय. ती लगेच हात मागे घेत पुन्हा आपल्या केसांची बट कानामागे सरकवतच ग्राउंड वर चालू होणारी प्रॅक्टिस मॅच बघु लागते.

शौर्य : "तुला खरच प्रॅक्टिसला नाही जायचं का??"

समीरा : "नाही.."

शौर्य : "काही प्रॉब्लेम आहे का समीरा??"

समीरा : "तस काही नाही.."

शौर्य : "मग तु का नाही जात आहेस प्रॅक्टिसला??"

"असच..", एवढं बोलुन समीरा तिथुन निघुन जाते..

शौर्य : "सीमा ही का ग खेळायचं नाही बोलते. काही प्रॉब्लेम आहे का??"

सीमा : "मला सुद्धा आज कळतंय की ती खेळत नाही ते ही आत्ताच."

राज : "तु नाही खेळायचं बोलतोयस म्हणुन ती पण बोलत असेल अस मला वाटत."

शौर्य : "राज कधी तरी कोणती तरी गोष्ट तु सिरियसली घेतोस का?"

राज : "मुड असेल तर नाही तर आपलं असच.."

टॉनी : "शौर्य मला अस वाटत काही तरी प्रॉब्लेम नक्की असेल."

शौर्य : "मलाही तेच वाटतंयरे, पण काय??"

क्रमशः

(का नाही खेळायच बोलतेय समीरा?? नक्की काय प्रॉब्लेम असेल?? कळेलंच पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल