Premchand… (Part - 3) in Marathi Love Stories by Ritu Patil books and stories PDF | प्रेमगंध... (भाग - ३)

Featured Books
Categories
Share

प्रेमगंध... (भाग - ३)

पावसाचे दिवस असल्यामुळे आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरूच होता. राधिका शाळेत जायला निघाली. तिला असं पावसात चालत जायला खुप आवडायचं. ती बसस्टॉपवर येऊन पोहोचली. काही लोकं शेडमध्ये बसली होती, काही छत्री घेऊन बाहेर उभे होते. पावसाचा जोरपण वाढला होता. राधिका छत्री घेऊन बाहेर उभी राहिली. ☔☔ छत्रीचं पाणी पडायचं ते हातात घेऊन आजूबाजूला उडवत होती. तिच्या चेहर्‍यावर छानशी स्माईल होती.😊😊 तीला खुप मज्जा वाटत होती. ती स्वतःच्या धुंदितच रमली होती. आजुबाजूची काही लोकं तीला बघून गालातल्या गालातच हसत होते. 😊😊 तर काही लोक "इतकी मोठी मुलगी असून लहान मुलांसारखी पाण्यासोबत खेळते." अशा आविर्भावात तीच्याकडे बघत होते.🙄🙄 तिचं अचानकच आजुबाजूला लक्ष गेलं तर काही लोकं तिच्याचकडे बघत आहेत हे तिच्या लक्षात आलं. आणि तिला एकदम ओशाळल्यागत झालं. तीने स्वतःचीच जीभ चावली. आणि मी काही केलंच नाही अशा आविर्भावात शांत उभी राहिली. 🙂🙂

थोड्या वेळाने तिच्यासमोर बस येऊन थांबली. पटापट सगळे बसमध्ये चढले. पावसाचा जोर वाढतच चालला होता. पावसाचं पाणी सीटवर पडत असल्यामुळे राधिकाने खिडकी लावून घेतली. तिच्या बाजूला एक माणूस येऊन बसला. तो थोडा विचित्रच वाटत होता. त्याचे केस अस्ताव्यस्त झालेले, दाढी खुप वाढलेली, डोळे लाल झालेले, तोंडात मावा भरलेला. त्याला तसं बघून राधिकाला त्याची किळसच वाटली म्हणून तिने तिची बॅग दोघांच्या मध्ये ठेवली आणि ती खिडकीजवळ सरकून बसली. तो माणूस आल्यापासून सारखा तिच्याकडेच बघत होता. राधिकाने ते पाहिले. तसं तो तिच्याकडे बघून हसू लागला. तिला त्याचा खुप राग आला होता, 😠😠 पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ती काहीच बोलत नाही, हे बघून त्याची हिंमत वाढली. त्याने हळूच त्याच्या पायातली चप्पल काढून त्याच्या पायाने तिची साडी थोडीशी वर करून तिच्या पायाला पाय लावला. तसं राधिकाने पटकन पाय मागे घेतला आणि सणकन त्या माणसाच्या कानाखाली लावून दिली. संपूर्ण बसमध्ये आवाज घुमला. बसमधली सगळी लोकं तिच्याचकडे बघु लागली. तो माणूस गालावर हात ठेऊन पटकन उभा राहिला. तिला इतका राग आला होता की, तिने तिची छत्री हातात घेऊन छत्री तुटेपर्यंत मार मार मारलं. 😠😠😈😈 बस गच्च भरली होती त्यामुळे त्याला तिथून जायला रस्ताच मिळत नव्हता. त्यामुळे तो घाबरून दोन्ही हात डोक्यावर ठेऊन जाग्यावरच बसला होता. तो प्रकार बघून कंडक्टर आणि बसमधली लोकं सारखे तिला विचारू लागले. "ताई काय झालं, ताई काय झालं ?" तसं तिने झालेला प्रकार सांगितला. कंडक्टरने पण त्या माणसाला कानाखाली लावून दिली. बसमधल्या इतर लोकांनी पण त्याला धू धू धुतला. तो माणूस घाबरून अगदी रडकुंडीला आला होता. राधिका तर अगदी रागाने लालबुंद झाली होती. 😠😠

सगळेच त्याला बडबड करू लागले. काही बायका तर त्याला शिव्या देऊ लागल्या. "कुठुन कुठुन अशी नालायक माणसं येतात कोणजाणे... बायकांची इज्जत करता येत नसेल तर अपमान तरी नका करू ना. नालायक, बेशरम कुठचे. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना." असे बरेचसे वाक्य राधिकाच्या कानावर पडत होते. कंडक्टरने त्या माणसाला बसमधून बाहेर काढून टाकलं.
"ताई तुम्ही अगदी योग्यच केलंत. अशा लोकांना चांगलीच अद्दल घडवायला हवी." असं काही लोकं तिच्याकडे बघून बोलत होती. सगळेजण तिच्याकडे आदराने बघत होते.

तिचा नेहमीचा स्टाॅप आला. पाऊस तर चालूच होता, आता शाळेपर्यंत जाणार कसं... कारण त्या माणसाला मारून तिची छत्री तर तुटून गेली होती. एवढ्या पावसात भिजत कसं जाणार म्हणून ती एका झाडाखाली जाऊन उभी राहिली. तरीपण पावसाचं पाणी तिच्या अंगावर पडतच होतं. काय करावं आता, म्हणून तिला टेन्शनच आलं. 🙁🙁 तेवढ्यात बाईकवर अजय तिच्या समोर येऊन उभा राहिला.

अजय- "राधिका, इथे का अशी उभी आहेस ? शाळेत नाही यायचं का तुला ? आणि छत्री कशी काय तुटली तुझी ?" अजय तुटलेल्या छत्रीकडे बघत म्हणाला.
राधिकाला काय बोलावं काही कळत नव्हतं. ती गपचूप उभी होती.
तिला तसं बघून अजय म्हणाला, "अगं काय विचारतो तुला मी, लक्ष कुठे आहे तुझं ? आणि छत्रीसोबत पानिपतची लढाई करून आलीयस का तू ?" आणि तो हसायला लागला तसं तिला पण हसू आलं. 😅😅😀😀
"दोन मिनिटं थांब इथेच, मी आलो." असं म्हणून अजय निघूनही गेला.
"हा असं बोलून आता कुठे गेला ?" असा विचार करतच राधिका तो गेला त्या दिशेने बघत राहिली. आणि थोड्या वेळातच अजय छत्री घेऊन आला. त्याने ती राधिकाला दिली आणि म्हणाला, "तू छत्री घेऊन मागे बस, मी हळूहळू बाईक चालवतो."
राधिका- "तू छत्री कुठुन घेऊन आलास लगेच ?"
अजय- "आणली मित्राकडून मागून, तू बस गाडीवर पटकन. उशीर होतोय आपल्याला."
राधिका- "अरे, मी आले असते ना चालत."
अजय- "अगं, आता बसतेस का गाडीवर, नाहीतर तुझ्यामुळे मला पण उशीर होईल." तशी राधिकाने गाडीची मागची सीट साडीच्या पदराने पुसली आणि सीटवर बसली.
छत्री वार्‍याने उडेल म्हणून अजयने हळूहळू शाळेपर्यंत गाडी आणली.

दोघेही स्टाफरूममध्ये येउन पोहोचले. राधिकाची साडी पावसाच्या पाण्याने ओली झाली होती. त्यामुळे त्या ओल्या साडीत तिला व्यवस्थित चालायला जमत नव्हतं म्हणून ती हळूहळू चालत होती. ती पुढे चालायला जाणार इतक्यांत तिचा पाय ओल्या साडीत अडकला. ती पडेल या भितीने तिने डोळेच बंद करून घेतले. ती पडणार तेवढ्यांत अजयने तिला पटकन पकडलं आणि जवळ ओढलं. त्याचा एक थंडगार हात तिच्या कमरेवर आणि एक हात तिच्या पाठीवर होता. ती खुप घाबरली होती. तिने हळूच डोळे उघडले. तर अजय तिच्या खुप जवळ उभा होता. त्याचे गरम श्वास तिला चेहर्‍यावर जाणवत होते. त्याला एवढ्या जवळ उभं राहिलेलं बघून तिच्या अंगावर एकदम सरसरून काटाच आला. अजय तिच्याचकडे बघत होता. ती पटकन बाजूला झाली. तो ही भानावर आला. स्टाफरूममध्ये काही शिक्षक होते, तेही दोघांना बघून गालातल्या गालात हसत होते. 😊😊 दोघांनाही आॅकवर्ड फील झालं होतं. दोघेही खुप लाजले होते. एकमेकांशी ते काहीच बोलले नाहीत. राधिकाने पटकन एका हातात पुस्तकं उचलून घेतली आणि दुसऱ्या हाताने आपली साडी व्यवस्थित पकडून आपल्या वर्गात निघून गेली. अजयही तिच्या पाठोपाठच आपल्या वर्गात निघून गेला.

राधिका वर्गात आली. पण तिला तोच मागचा प्रसंग डोळ्यासमोर येत होता. तिला स्वतःचाच खुप राग येत होता. "मी पण ना मुर्खच आहे अगदी खरंच. तू पण व्यवस्थित चालायचं ना राधे." अशी ती स्वतःशीच बोलत विचार करत होती. दुसर्‍याच क्षणाला अजय तिच्या इतक्या जवळ उभा होता ते आठवून तिच्या अंगावर शहारेच आले. तशी ती स्वतःशीच हसू लागली. 😊😊😊

तिच्या वर्गातली काही मुलं आल्यापासून तिच्याचकडे बघत होती. तिला असं एकटंच हसताना बघून एक मुलगा तिला विचारू लागला.
"बाई तुम्ही एकटेच का हसतात ?" राधिकाला त्या मुलाचा प्रश्न ऐकून अजूनच हसायला आलं. 😀😀 आता मुलांना काय सांगावं म्हणून ती बोलली, "अरे, मघाशी एक गंमत झाली ना, म्हणून मी हसत होते."
"बाई आम्हाला पण सांगा ना काय गंमत झाली ती ?" तो मुलगा राधिकाला म्हणाला.
राधिका- "बरं ठिक आहे, मी सांगते." आणि ती बोलू लागली. "मी सकाळी बसमधून शाळेत येत होते ना तेव्हा एका वाईट माणसाने एका मुलीची छेड काढली."
"बाई छेड काढणे म्हणजे काय असते ?" एका मुलाने निरागसपणे राधिकाला प्रश्न विचारला.
"आता यांना काय सांगू ?"🤔🤔 राधिका विचार करू लागली. आणि नंतर ती म्हणाली, "छेड काढणे म्हणजे काही मुलं मुलींचे केस ओढतात, त्यांची ओढणी खेचतात, साडीचा पदर खेचतात, त्याला सांगतात छेड काढणे, समजलं ?"
त्यातच दुसरा एक मुलगा बारीक तोंड करून राधिकाला म्हणाला, "मी तर रोजच माझ्या आईचा साडीचा पदर ओढतो आणि माझ्या ताईचे पण केस खेचतो. मग मी छेड काढतो का त्यांची ?"

राधिकाला त्या मुलाने बारीक केलेलं तोंड बघून हसायलाच आलं. आणि दुसऱ्याच क्षणाला मुलांचे एवढे प्रश्न ऐकून तीला वाटलं की उगाचच मी या मुलांना सांगितलं. आणि नंतर ती म्हणाली, "नाही रे बाळा तसं नाही. जेव्हा आपण एखाद्या अनोळखी म्हणजे आपण जीला ओळखत नसतो ना... अशा मुलींचे केस ओढणे, ओढणी खेचणे त्याला छेड काढणे असं म्हणतात. आता समजलं का तुम्हाला ?"
तसं सगळी मुलं एकसुरात ओरडली, "हो बाई समजलं आम्हाला." तसं राधिकाने एक उसासा सोडला.

राधिका- "बरं पुढे ऐका." तशी सगळी मुलं शांत झाली.
"बसमध्ये त्या वाईट माणसाने एका मुलीचे केस ताणले. म्हणून त्या माणसाला बसमधल्या लोकांनी खुप मारलं."
तशी सगळी मुलं हसू लागली तसं राधिकाही हसू लागली. 😅😅😀😀
"मग बाई तुम्ही पण त्याला मारलं ?" मुलं तिला विचारू लागली.
"हो मग, मी पण त्याला खुप मारलं," राधिका हसून म्हणाली. तशी सगळी मुलं अजून टाळ्या वाजवून हसू लागली. 😂😂😀😀😅😅
राधिका पुढे म्हणाली, "आता समजलं तुम्हाला..., कुठल्याही मुलींचे केस ओढायचे नाहीत, त्यांचे कपडे धरून खेचायचे नाहीत आणि वर्गातल्या मुलींशीही अशी मस्ती करायची नाही, समजलं का मुलांनो....."
तशी सर्व मुलं एकाच सुरात ओरडले, "हो बाई समजलं." नंतर सगळी मुलं आपापल्या अभ्यासाला लागली. राधिकापण त्यांचा अभ्यास घेऊ लागली.
इथे अजयची पण काही वेगळी परिस्थिती नव्हती. तो पण झालेला प्रकार आठवून गालातल्या गालातच एकटाच हसत होता. 😊😊

क्रमशः-

(बघुया पुढे काय होते ते पुढच्या भागात....)

🌹💕 @Ritu Patil 💕🌹

💕💕 प्रेमगंध... 💕💕
-------------------------------------------------------------