दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका शाळेत येऊन पोहोचली. ती स्टाफरूममधून रजिस्टर, पुस्तकं वगैरे घेऊन जायला निघाली. ती जायला मागे वळली तशी ती कोणाला तरी जोराची धडकली. ती एकदम घाबरली, तिच्या हातातील पुस्तकं खाली पडली. समोर तिने पाहिलं तर एक उंच, गोरासाच मुलगा तिच्याकडे बघतच उभा राहिला होता. त्याला तसं बघून तिला थोडं आॅकवर्ड फिल झालं. तसं ती त्याला लगेच म्हणाली, "साॅरी सर, ते मी मागे पाहिलं नाही ना. म्हणून चुकुन धक्का लागला माझा."
"नाही इट्स ओके होते असं कधी कधी." तो म्हणाला आणि त्याने तिची पडलेली पुस्तकं उचलून दिली.
तो- "तुम्ही नवीन आहात का इथे ?"
राधिका- "हो मी कालच कामावर रूजू झाले."
तो- "मी अजय मोहिते. मला या शाळेत तीन वर्षे झाली."
"मी राधिका कदम," तीनेही स्माईल देत म्हटलं. 😊😊
अजय- "खुप छान नाव आहे तुमचं, छान वाटलं तुम्हाला भेटून. काहीही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की विचारा हेल्प करेन मी."
राधिका- "ओके सर, थँक्यू सो मच." ती हसून म्हणाली.
"आणि हो, मला नावाने आवाज दिलं तरी चालेल, सर म्हणायची काही गरज नाही." अजय हसतच म्हणाला. 😊तसं राधिकाही हसू लागली आणि म्हणाली, "ठिक आहे." एवढं बोलून ती निघून गेली. अजय मात्र तीला जाताना बघतच राहिला आणि एकटाच गालातल्या गालात हसू लागला. 😊😊
राधिका मुलांना खुप प्रेमाने सगळं समजावून सांगायची. तीचं आणि तिच्या वर्गातल्या मुलांचं खुप छान जमत होतं. राधिकाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुलं ऐकत असत, त्यामुळे तीला वर्गात शिकवायला पण खुप छान वाटायचं. शिकवत असताना ती छोटी छोटी मुलं तीला अधून मधुन काही ना काही प्रश्न विचारत राहायचे. त्यांचे ते गमतीशीर प्रश्न ऐकून तिला हसायलाच यायचं. थोड्या दिवसातच शाळेमध्ये ती खुप छान रमुन गेली होती. शाळेची मधली सुट्टी झाली की, राधिका स्टाफरूममध्ये सगळ्या शिक्षकांसोबत बसून नाश्ता करायची. सगळ्यांशी तिची छान ओळख झाली होती. तीला सगळे शिक्षक खुप छान सहकार्य करत होते. त्यांत अजयही तिला खुप मदत करायचा. अजयने तिला आपल्या बाजूला बसण्यासाठी खुर्ची दिली होती. दोघांची पण एकमेकांशी चांगली मैत्री झाली होती. असेच सगळे शिक्षक बसलेले असताना अजयने राधिकाला विचारले, "राधिका, काय मग कशी वाटली आपली शाळा, शाळेतले शिक्षक वगैरे ?"
राधिका- "खुप छान आहेत तुम्ही सगळे, तुम्ही सगळ्यांनी मला खुप सहकार्य केलं," आणि तिने सगळ्या शिक्षकांकडे बघून त्यांचे आभार मानले. आणि ती पुढे म्हणाली, "अजय, विशेष करून तुझे खूप खूप आभार, तू खुप मदत केलीस मला आणि अजूनही करतोयस."
अजय- "अगं त्यांत कसले आभार मानतेस, आपणच एकमेकांना मदत करणार ना."
राधिका- "हो खरंय तुझं... आणि माझ्या वर्गातली मुलं पण खुप छान आहेत. काही मुलं आहेत अवली, खुप मस्ती करतात, पण सांगितलं की राहतात गप्प."
"लहान मुलं आहेत ती, आता नाही मस्ती करणार तर कधी करणार नाही का, चालायचंच ते." अजय हसतच म्हणाला.
"आणि प्रश्न तर असे विचारतात ना की कधी कधी काय उत्तर द्यावं आपल्यालाच कळत नाही." राधिका हसतच म्हणाली.
अंजली बाई- "हो ना खरंच, लहान मुलांचे प्रश्न ऐकून कधी कधी असं वाटते ना की यांना असले प्रश्न सुचतातच
कुठुन ?" 🤔🤔
अजय- "खरंय बाई तुमचं, छोट्या मुलांची कल्पनाशक्ती खुप भारी असते. कधी कधी आपल्याला पण सुचत नाहीत तसे प्रश्न त्यांना पडतात."
निलेश सर- "हो ना खरंय तुझं अजय, एक गंमत सांगतो तुम्हाला, वर्गात मी आपल्या पृथ्वीबद्दल शिकवत होतो. तर एक मुलगा उठून मला विचारतो, "गुरूजी, पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती पण फिरते, मग तिला चक्कर नाही येत का ?" हे ऐकून सगळे शिक्षक हसायला लागले. 😂😂😀😀
सरिता बाई- "खरंच काय बोलावं मुलांना, कल्पनेच्या पलीकडे त्यांची बुद्धी चालते."
राधिकाचे खुप छान दिवस चालले होते. अजयला राधिका आवडू लागली होती. हे राधिकाच्या पण लक्षात आलं होतं. तिलाही तो आवडू लागला होता.
राधिका आज खुप खुश होती. तिला तिचा पहिला पगार हातात मिळाला होता. तिने बाजारात जाऊन आईसाठी एक छानशी साडी घेतली. बाबांसाठी एक घड्याळ घेतलं. आणि तिघी बहिणींसाठी पण कपडे घेतले आणि पेढे घेऊन ती घरी गेली. घरात फक्त आई होती. मीरा, मेघा काॅलेजला आणि सोनाली शाळेत गेली होती. बाबा कामावर गेले होते.
गेल्या गेल्या राधिकाने आईला आवाज दिला.
"आई इथे ये जरा." तशी आई आली आणि तिच्या हातात पिशव्या बघून म्हणाली, "काय गं काय झालं ओरडायला आणि हे काय सगळं आणलयस ?"
राधिकाने आईच्या हातात साडी ठेवली आणि म्हणाली, "आई बघ तुला साडी आवडते का ?" आईने साडी बघितली आणि तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
"आई काय झालं तू रडतेस का?" राधिका म्हणाली.
"नाही गं, हे आनंदाश्रू आहेत. खुप नशीबवान आहे बघ मी, तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला." आईने तिला जवळ घेऊन कपाळावर चुंबन दिलं. तसे राधिकाचेही डोळे पाणावले आणि ती म्हणाली, "तुझ्यासारखी आई मिळायला पण नशीब लागतं बघ. तू पण किती प्रेम करतेस आमच्यावर." आणि तिने आईला मिठी मारली. आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "जा हातपाय धुवून घे, आताच आलीस ना थकली असशील तू." राधिकाने आईच्या हातात पेढ्यांचा बाॅक्स दिला, तिचा
पगारही दिला. आणि ती फ्रेश व्हायला निघून गेली. आईने देवाजवळ पेढे ठेवले. तेवढ्यात राधिकापण आली. तिने एक पेढा उचलून आईला भरवला तसं आईनेपण तीला पेढा भरवला. संध्याकाळी सगळे घरी आले. राधिकाने सगळ्या नविन कपड्यांच्या पिशव्या रुममध्ये नेऊन ठेवल्या होत्या. मीरा, मेघा, सोनाली तिघीपण रूममध्ये गेल्या. त्यांनी त्या पिशव्या पाहिल्या आणि पटापट उघडून बघितल्या. राधिका उभी राहून त्यांची गम्मत बघत होती. तिघी पण खुप खुश होत्या. 😊😊
"आवडले का तुम्हाला कपडे ?" राधिका म्हणाली.
तशा तिघीही सोबतच बोलल्या, "हो ताई आम्हाला कपडे खुप आवडले." तिघींनी पण धावत जाऊन राधिकाला घट्ट मिठी मारली.
थोड्या वेळात सगळे बाबा बसले होते तिथे बाहेर आले. राधिकाने बाबांसाठी आणलेलं गिफ्ट मागे लपवलं. आणि ती बाबांना म्हणाली, "बाबा तुमचा हात पुढे करा बघू."
बाबा- "का गं काय झालं ?"
राधिका- "बाबा आधी तुम्ही हात तर पुढे करा."
बाबा- "बरं" असं म्हणून बाबांनी हात पुढे केला. तसं राधिकाने बॉक्समधून घड्याळ काढून बाबांच्या हाताला बांधलं. तसं बाबा तिला म्हणाले, "अगं राधी, कशासाठी आणलंस हे ?, माझं जुनं घड्याळ आहे अजून माझ्याकडे."
राधिका- "बाबा ते घड्याळ खुप जुनं झालंय आता. आणि आज माझा पहिला पगार झाला त्याचीच ही आठवण म्हणून आणलंय."
बाबांना खुप कौतुक वाटत होतं तीचं. बाबांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, "पोरी खरंच खुप कौतुक वाटते मला तुझं. आज मला चारी मुलीच, मुलगा नाही, पण त्याचं दुःख नाही मला. तुझ्यासारखी मुलगी असेल, तर प्रत्येक बाप हा नशीबवानच असेल बघ. मुलाच्या जागीच आहेस तू मला." सगळेच खुप भाऊक झाले होते. आईने सगळ्यांना पेढे दिले, सगळ्यांनी तोंड गोड केलं. राधिकाला आज खुप बरं वाटत होतं. घरात सगळे खुप खुश होते. आईने आज जेवणात खीरपुरी बनवली होते. सगळ्यांनी आनंदाने जेवण केले.
क्रमशः-
(बघुया पुढे काय होते ते राधिकाच्या आयुष्यात, पुढच्या भागात...)
🌹💕 @Ritu Patil 💕🌹
💕💕 प्रेमगंध... 💕💕
--------------------------------------------------------------