"आई, अगं मी निघते आता, उशीर होतोय मला चल येते मी" ती म्हणाली. तीने देवाला नमस्कार केला. आईने तिला हातावर दहीसाखर दिले. नंतर तीने आई बाबांना नमस्कार केला. तिच्या बहिणी तिला म्हणाल्या, "ताई, आॅल दि बेस्ट" ती म्हणाली, "Thank you." आणि तिने त्यांना छानशी स्माईल दिली.😊😊 आणि ती घराबाहेर पडली.
राधिका हि आपल्या कथेची नायिका. दिसायला अगदी सुंदर. उंच गोरीपान, गोलसर चेहरा, ब्राऊन रंगाचे डोळे, कुरळे काळेभोर केस एखाद्या मराठी टिव्ही सिरीयलच्या नायिकेप्रमाणे राधिका सुंदर दिसायची. तिचं राहणीमान अगदी साधं, निर्मळ अशी गोड, प्रेमळ स्वभावाची. 😊😊लहानपणापासून ती खुप समजूतदार होती तेवढीच कष्टाळू पण होती. घरामध्ये तिच्यासोबत तिचे आईवडील आणि तीच्या तीन बहिणी राहत होत्या. मीरा, मेघा आणि सोनाली. मिरा, मेघा थोड्या अवखळ स्वभावाच्या होत्या आणि सोनाली हि मात्र राधिका प्रमाणेच समजूतदार आणि खुप शांत स्वभावाची होती. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. तिचे वडील एका कंपनीत मजूर म्हणून कामाला होते. आई घर सांभाळायची. राधिकाला फुलझाडांची खुप आवड होती म्हणून तीने घरासमोर छोटीशी सुंदर बाग फुलवली होती. 🌹🌹
राधिका एका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कामावर रुजू झाली होती. आज तिचा शाळेचा पहिला दिवस होता. ती घाईघाईने घरातून बाहेर पडली. बसस्टॉप वर आली तर बरीच मोठी रांग लागली होती. थोड्या वेळाने तिची बस आली, बसमधून उतरणारी माणसं पटापट खाली उतरली. नंतर सगळे बसमध्ये जाऊन बसले. राधिकाने पण एक विंडो सीट पकडली. ती खिडकीतून बाहेर बघत होती. खुप छान थंडगार वारा सुटला होता, त्यांतच नवीन पावसाची सुरूवात झाल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरायला सुरुवात झाली होती. खुप छान वातावरण वाटत होतं. तिचे काळे कुरळे केस सारखे डोळ्यासमोर येत असल्यामुळे एका हाताने ते केस सारखे मागे करण्यात ती गुंतली होती. तिला खुप छान प्रसन्न वाटत होतं. आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस असल्यामुळे तीला थोडंसं नर्व्हस फील होत होतं. 'माझे सहकारी शिक्षक मित्रमैत्रीण कसे असतील? मला सांभाळून घेतील ना?' असे बरेचसे विचार तिच्या मनात चालले होते. तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली. तशी ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. तिचं स्टाॅप आलं होतं. ती आपली बॅग सांभाळत बसमधून खाली उतरली. मेन रोडवरून शाळेमध्ये जायला तिला दहा मिनिटे लागणार होती. ती घाईघाईने चालतच निघाली. ती शाळेच्या गेटमध्ये येऊन पोहोचली. प्रार्थनेसाठी सगळी मुलं रांगेत उभे राहत होते. ती पण प्रार्थनेसाठी येऊन उभी राहिली. सगळीकडे मुलांचा गोंधळ चालू होता. तसं एक शिक्षक "सावधान" असं ओरडले. तशी सगळे शांत झाले आणि प्रार्थनेला सुरूवात झाली. प्रार्थना झाल्यानंतर सगळी मुलं आपापल्या वर्गात निघून गेली. राधिका पण स्टाफरूममध्ये गेली. तिच्या पाठोपाठ शाळेचे मुख्याध्यापक प्रधान सर आले आणि त्यांनी सर्व शिक्षकांना राधिकाशी ओळख करून दिली.
राधिकाला तिसरीचा वर्ग शिकवण्यासाठी दिला होता. तिची सहकारी शिक्षिका अंजली बाईंनी तिला तीचा वर्ग दाखवला तशी ती त्या वर्गात निघून गेली. वर्गात सगळी मुलं गोंधळ घालत बसली होती. राधिकाला बघून सगळी मुलं आपापल्या जागेवर जाऊन बसली.
राधिका- "मुलांनो माझं नाव राधिका कदम, तुमची नवीन शिक्षिका. आजपासून मी तुमच्या वर्गाला शिकवणार, बरं का."
"हो बाई," सगळी मुलं एकसुरात ओरडले.
राधिका- "चला प्रत्येकाने आपापलं नाव सांगा."
सगळ्या मुलांनी अडखळत अडखळत आपली नावं सांगितली. त्यांतली काही मुलं बोबडेच बोल बोलत होते. ते ऐकून राधिकाला गंमतच वाटत होती. शाळेचा पहिला दिवस होता म्हणून तिने मुलांना अभ्यास न शिकवता मुलांना काही प्राण्यांच्या, पक्षांच्या गोष्टी आणि कविता सांगितल्या. मुलं पण खुप enjoy करत होती. तीला पण त्यांना असं बघून खुप बरं वाटलं. ती सगळ्या मुलांशी प्रेमाने वागु बोलू लागली. त्यामुळे मुलांना पण आपली नवीन राधिका बाई खुप आवडली. आजचा राधिकाचा शाळेचा पहिला दिवस खुप छान गेला.
राधिका घरी आली तसे सगळे तिच्या जवळ येऊन बसले.
आई- "आजचा शाळेचा पहिला दिवस कसा गेला तुझा ?"
राधिका- "खुप छान गेला आजचा दिवस आणि शाळेतले सगळे शिक्षक पण खुप छान आहेत."
मीरा- "ताई, आज काय शिकवलं मग मुलांना तू."
राधिका- "आज शाळेचा पहिला दिवस म्हणून मी त्यांना फक्त गोष्टी सांगितल्या. मुलं पण खुप खुश झाली." आणि राधिका बराचवेळ बसून त्यांना शाळेत जे काही घडलं ते सर्व सांगत होती.
आई- "चला आता गप्पाच मारत बसणार आहेत का, जेवणार नाही का ?"
राधिका- "हो आई, खुप भुक लागलंय चल जेवायला वाढ."
सगळे जेवायला बसले. वांग्याची भाजी बघून मेघाने तोंडच वाकडं केलं.
ती रागानेच म्हणाली, "आई, काय गं ही भाजी कशाला बनवतेस तू ? तुला माहिती आहे ना मला नाही आवडत ते. मला नाही जेवायचं."😡😡 मेघा रागाने उठून जाणार तेवढ्यात राधिकाने तीचा हात पकडून तिला खाली बसवलं. आणि तीला दटावून सांगितलं, "चुपचाप बसून जेव असं जेवणावरून ऊठून जाऊ नये. अन्नाचा अपमान होतो."
"मेघा, चुपचाप जेवायला बस, नाटकं नकोत मला जेवणावर, कळलं." आईपण रागानेच म्हणाली. 😡😡
"ताई नाही आवडत मला वांग्याची भाजी." मेघापण रागानेच म्हणाली. 😡😡
"बरं ठीक आहे, उद्या येताना तुझ्या आवडीची भाजी घेऊन येते मी, चालेल ना. पण आता मुकाट्याने जेव कळलं." राधिका मेघाला समजावत म्हणाली.
आई- "हो, जास्त लाड करून डोक्यावर चढवून ठेव तू तिला. "
राधिका- "अगं आई लहान आहे ती अजून."
आई- "हो का, लहान आहे म्हणे, अजून एक दोन वर्षांनी तिघीपण लग्नाच्या वयाच्या होतील आता."
मीरा- "हो तू आमच्या ना सतत लग्नाचाच विचार करत बस."
त्यांत मेघाने पण दुजोरा दिला आणि म्हणाली, "बरोबर बोलतेस मीरू तू, आईला ना आपल्या लग्नाची जास्तच घाई झालंय. सतत आपल्याला फक्त घरातून हाकलवायचंच बघत असते. राहा मग एकटीच घरात."😡😡
त्यांवर राधिका मेघाला ओरडली आणि तीला म्हणाली, "मेघा, तोंड सांभाळून बोल जरा. अगं आई आहे ती आपली. असं कसं बोलतेस तू आईला. तीला आपली काळजी वाटते म्हणून बोलते ती." तशी मेघा गप्पच बसली.🤐🤐🤐
"बघितलं पोरी कशा बोलायला लागल्यांत मला. मोठ्या झाल्यांत ना आता. तुम्ही पण एकेक पोरींच्या आई व्हाल ना तेव्हा कळेल तुम्हाला आईची काळजी काय असते ते. राधिका हे सर्व तुझे लाड आहेत बाकी काही नाही." आई लहानसं तोंड करून म्हणाली. 😔😔
राधिका- "अगं आपण नाही लाड करणार तर आणखी कोण करणार सांग तुच."
आई- "बरं राधिका बाई तुझ्या बोलण्याच्या पुढे कोण गेलंय का ?"😅😅😂
तसे सगळे हसू लागले. बाबा आणि सोनाली हे सर्व गप्प बसून बघत हसत होते. तसे राधिकाचे बाबा गमतीतच बोलले, "मेघे, आपण एक काम करू. ज्याची वांग्याची वाडी असेल ना त्याच्यासोबतच आपण तुझं लग्न लावून देऊ चालेल ना." तसे सगळेच जोरजोरात हसू लागले.😂😂😅😅😅 असंच हसतखेळतच त्यांचं जेवण झालं.
क्रमशः-
🌹💕Ritu Patil💕🌹
💕💕 प्रेमगंध... 💕💕
--------------------------------------------------------------------