ATRANGIRE EK PREM KATHA - 12 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 12

Featured Books
Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 12

डिस्ट्रिक्ट लेव्हल मॅचची तैयारी आता जोरदार चालु झाली होती त्याचबरोबर रोहन आणि मनवीची लव्ह स्टोरीही. रोहनच प्रॅक्टिस सोडून संपुर्ण लक्ष मनवीकडे असायचं. कॉलेज सुटल्यावर तिला फिरायला घेऊन जाण, लेट नाईट आऊटिंगला जाण, एकत्र मुव्हीला जाण आणि खुप काही. रोहन आता अनियमित प्रॅक्टिसला येऊ लागला. शौर्य आणि वृषभ ने त्याला समज देऊन देखील मनवीच्या आवडी निवडी जपण्याला तो जास्त महत्व देत असे. रोहनच अनियमित प्रॅक्टिसला येण हे आता स्पोर्ट्सच्या सरांना कुठे तरी खटकु लागलं.

नेहमीप्रमाणे रोहन एक दिवशी प्रॅक्टिसला भरपूर उशिरा पोहचला हे जाणत असुन की स्पोर्ट्सच्या सरांना प्रॅक्टिसला असा उशीर झालेला अजिबात आवडत नाही. सरांनी देखील आज त्याला तलवारीच्या टोकावर धरायचा निर्णय घेतलाच होता. ते सगळ्यांसमोर त्याला ओरडतात आणि तिथुन बाहेर जायला सांगतात. जर वेळेवर प्रॅक्टिसला यायला जमत नसेल तर टीम मध्ये नसलास तरी चालेल मला असेही ते सगळ्यांसमोर त्याला बोलतात. रोहन नाराज होतच ग्राउंडमधुन बाहेर पडला. सर समोरच असल्यामुळे शौर्य आणि वृषभला तिथुन निघुन रोहनची समजूत काढायला जमलं नाही. पण कधी न कधी तर हे होणारच होत. दोन दिवसांवर मॅच येऊन ठेपली असताना रोहन एवढा निष्काळजी वागूच कसा शकतो.

रोहन नाराज होतच कॉलेजमध्ये शिरला. जिथे तो पहिलं टवाळक्या करत बसायचा तिथे तो जाऊन बसला. मनवी आणि त्याचे इतर मित्र मैत्रिणी स्पोर्ट प्रॅक्टिस बघत असल्यामुळे सगळ्यांना तिथे काय घडलं ह्याचा अंदाज आला होता. सगळेच त्याची समजुत काढत त्याच्या मागे गेले.

मनवी : "रोहन आय एम सॉरी.. हे सगळं माझ्यामुळे झालं.. मलाच कळायला हवं होतं की प्रॅक्टिस झाल्यावर सुद्धा आपण भेटु शकत होतो ते"

रोहन : "मनवी ह्यात तुझी चूक नाही. मी थोड दोन मिनिटं शांत बसू.. प्लिजsss."

रोहनमुळे शौर्यच प्रॅक्टिसमध्ये लक्षच लागत नव्हत.. सरांकडे पाच मिनिटांचा वेळ मागुन तो मैदानातून बाहेर पडला. धावतच जाऊन त्याने बेगेतुन मोबाईल काढला आणि रोहनला फोन लावला पण रोहनने फोन काही उचलला नाही. म्हणून त्याने राज ला फोन करून ते लोक कुठेत त्याबद्दल विचारलं.. आणि शौर्य पळतच कॉलेजच्या चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी निघाला.

राज : "शौर्य येतोय.."

"आता तो का येतोय इथे??",मनवी थोडं रागातच बोलली.

टॉनी : "अग मनवी तु त्याच्यावर का रागावतेस.?? त्याने काय केलं??"

मनवी : "त्याला काय गरज सरांना सांगायची रोहन प्रॅक्टिसला येत नाही म्हणुन.."

राज : "एक मिनिट, सरांना डोळे आहेत मनवी.."

मनवी : "राज मी मस्तीच्या मुड मध्ये नाही हा.."

राज : "आणि मी सुद्धा नाही.."

तोच शौर्य तिथे येतो. शौर्यला आलेलं पाहुन मनवी जाऊन बाजूला उभी राहते.

रोहन डोक्याला हात लावून बसलेला असतो.

शौर्य दोन्ही हात त्याच्या घुडग्यावर ठेवत त्याच्याशी बोलायला त्याच्या समोरच बसतो.

शौर्य : "रोहन नको ना वाईट वाटून घेऊस. तुला मी आणि वृषभने खुपदा समजवल पण तू ऐकतच नव्हतास. पण प्लिज सरांचं बोलणं मनावर नको ना घेऊस."

रोहन : "शौर्य प्लिज तु माझ्यासाठी प्रॅक्टिस सोडून येऊ नकोस. आपण प्रॅक्टिस संपल्यावर बोलूयात. सर तुला ही ओरडतील. माझ्यामुळे तुला ओरडलेलं मला नाही आवडणार. मी आहे बरा आणि उद्या पासुन वेळेवर येत जाईल प्रॅक्टिसला."

शौर्य : "नक्की..??"

रोहन : "हम्मम.."

शौर्य : "प्रॅक्टिस संपल्यावर भेटुयात आपण. प्लिज कुठे जाऊ नकोस.."

एवढं बोलत शौर्य तिथुन निघाला.

शौर्य जिने उतरून जाणार पण कश्यावर तरी पाय पडून त्याचा पाय घसरला आणि तो गडगडत खाली गेला.

त्याला अस पडताना बघुन रोहन, राज आणि टॉनीसुद्धा पळतच खाली जाऊ लागले. पण मनवी मध्येच उभी राहिलेली. शौर्यला अस खाली पडताना बघुन ती जणु घाबरून गेलेली. तिघेही तिच्या मागुन शौर्य जवळ गेले.

"आहहह मम्माss" करत शौर्य कळवळतच रडु लागतो. त्याच्या हाता पायाला जबरदस्त मार लागला होता. डोकं देखील एका कठड्यावर आपटल्यामुळे त्यातुन रक्त येत होत.

टॉनी : "अरे शौर्य तु पडला कसा??"

रोहन : "त्याला प्रश्न विचारू नकोस. तु पळतच पूढे जा आणि आधी टेक्सी घेऊन ये.. मी आणि राज त्याला खाली घेऊन येतो."

टॉनी धावतच जाऊन टेक्सी घेऊन येतो.

रोहन आणि राजने मिळुन शौर्यला टेक्सित टाकले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

शौर्यचा हात आणि पाय भरपुर दुखत होता. तो हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत अगदी लहान लहानमुलासारख रडत होता.

"ए शौर्य खुप दुखतंय का??", राज काळजीतच विचारतो

पण शौर्य कोणाशीही बोलायच्या मनःस्थितीमध्ये नव्हता.

तिघांनीही मिळुन शौर्यला हॉस्पिटलमध्ये नेलं.

मनवी आणि सीमा दोघीही केंटिंगमध्ये वृषभ आणि समीराची वाट बघत बसलेले असतात.

मनवी : "सीमा तु इथेच बस मी पाच मिनिटांत आली. "

सीमा : "आता तू कुठे चाललीस??"

मनवी : "एक काम आठवल तु बस मी आलीच."

(आता हीच कोणतं काम आहे?? सीमा मनातच विचार करू लागली..)

थोड्याच वेळांत वृषभ केंटिंगमध्ये येतो. सोबत शौर्यची बेग घेऊन.

वृषभ : "बाकीची गॅंग कुठेय?? आणि शौर्यला बघितलस का? अर्धवट प्रॅक्टिस टाकुन कुठे गायब झाला काय माहीत. बेगसुद्धा नाही घेऊन गेला."

"हाय गाईज.."अस बोलत समीराने सुद्धा आपली हजेरी लावली तिथे.

सीमा : "किती लेट.?? कधीपासून तुम्हा दोघांची वाट बघत मी आणि मनवी थांबलोय."

समीरा : "आहे कुठे ती??"

सीमा : "तिला सोडा.. आपल्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जावं लागेल.."

वृषभ : 'का? काय झालं??"

सीमा दोघांनाही घडलेला प्रसंग सांगते.

वृषभ : "काय!! अस कस पडला तो..??"

समीरा : "जास्त लागलंय का?? कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलय. "

सीमा : "तेच नाही ना माहीत. कोणी फोन उचलतच नाही. "

"थांब मी एकदा ट्राय करून बघतो.", वृषभ मोबाईल काढत रोहनला फोन लावतो..

"लागला?", सीमा त्याला विचारते..

"रोहनचा फोन बिजी येतोय ग.. एक मिनिट मी टॉनीला लावतो..",अस बोलत वृषभ रोहनला फोन लावतो.

समीरा : "मी राजचा फोन ट्राय करते."

सगळ्यांच्या प्रयत्ना नंतर फायनली टॉनीने फोन उचलुन ते लोक कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते सांगतात.

तिघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तोच समोरून मनवी येते.

सीमा : "कुठे होतीस??"

मनवी : "घरून फोन आलेला.. फोनवर बोलत होती."

सीमा : "बर तु येतेस हॉस्पिटलमध्ये??"

मनवी : "मला घरी जावं लागेल. डॅडला काही तरी काम आहे माझ्याकडे सो मी घरी जातेय."

समीरा : "प्लिज आपण निघुयात..??"

वृषभ : "हो निघुयात बट तुम्ही इथे गेटजवळ थांबा मी पाच मिनिटात येतो."

समीरा : "आता तू कुठे चाललास.??"

"अग पैसे नको का सोबत. मी घेऊन येतो तुम्ही गेटजवळ थांबा. टेक्सी मिळते का बघा तोपर्यंत.", अस बोलत वृषभ तिथुन पळतच रूमवर जायला निघाला. वृषभने सांगितल्याप्रमाणे दोघीही गेटजवळ वृषभची वाट बघत बसले.

वृषभ येताच तिघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघाले.

समीराला कधी ती एकदाच हॉस्पिटलमध्ये पोहचते अस झालेलं. तिच्या चलबीचल झालेल्या मनाने वृषभ आणि सीमाची खात्री पटली की हीच शौर्यवर प्रेम आहे.

समीरा : "वृषभ, तुला टॉनी अजुन काही बोलला का? म्हणजे शौर्य बरा आहे किंवा काही??'

वृषभ : "तस काही बोलला नाही ग पण आपण पोजिटीव्हली विचार करूयात. बराच असेल तो."

समीरा : "हम्मम"

टेक्सी हॉस्पिटलजवळ येऊन थांबली देखील.

टॉनी आणि राज हॉस्पिटल बाहेरच उभे होते.

टॉनी : "तुम्ही लोक आलात पण."

समीरा : "शौर्य??"

टॉनी : "फर्स्ट फ्लॉरवर आहे."

समीरा : "कसा आहे तो??"

राज : "आहे तसा बरा. तु आलीस म्हटलं की अजुन बर वाटेल त्याला."

समीराने राजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपला मोर्चा पहिल्या मजल्यावर वळवला. पण तिथे खुप वोर्ड आणि रूम असतात. शौर्य कुठंल्या वोर्ड मध्ये असेल ह्याचा विचार ती करत असताना नेमका रोहन फोनवर बोलत एका रूममधुन बाहेर येतो.

समीरा धावतच आत जाते.

शौर्य डोळे मिटुन पडुन असतो. ती दरवाज्यातच उभं राहून त्याला बघत बसते. पायाला फ्लेक्चर लावलेलं असत. हाताला आणि डोक्याला देखील पट्टी बांधली असते. पुर्ण रूम मध्ये शांतता असते.. फक्त सलाईनच्या बाटलीतुन टिपुक टिपुक आवाज करत पडणाऱ्या थेंबाचा आवाज त्या रूम मध्ये असतो. समीरा एक टेबल घेत शौर्यच्या बाजूला जाऊन बसते. तोच पाठून सीमा आणि वृषभ येतो.

कोणीतरी रूममध्ये आलय ह्या आवाजानेच शौर्य आपले डोळे उघडतो .

समीरा : "कसा आहेस?? बर वाटतंय.??"

शौर्य : "हम्मम..."

वृषभ : "असा कसा पडलास तु? जरा बघुन जिने उतरत जा ना यार."

शौर्य काहीच बोलत नाही.

तोच रोहन येतो.

रोहन : "तुम्ही कधी आलात.??"

वृषभ : "तु बाहेर फोनवर बोलत होतास ना तेव्हाच."

समीरा : "डॉक्टर काय बोलले.?"

रोहन : "पायाला फ्लेक्चर आहे. पंधरा दिवस त्याला पाय हलवता येणार नाही. डोक्याला दोन टाके आहेत. बाकी ठीक आहे तो. "

सीमा : "त्रास होतोय का शौर्य तुला??"

शौर्य डोळे मिटुन शांतच राहतो.

सीमा समीरला इशाऱ्यानेच काही तरी विचारते. समीरा तिला डोळे बंद करत शांत रहाण्याचा इशारा करते.

रोहन : "त्याला जरा आराम करू देत. आपण बाहेर थांबुयात."

शौर्यला त्रास नको म्हणुन सगळे बाहेर थांबतात.

समीरा : "असा कसा पडला तो."

रोहन : "माहीत नाही ग. बहुतेक पायात पाय अडकुन पडला असेल."

समीरा : "बर मग जेवणाचं वैगेरे काय?? आणि त्याच्या घरी कळवलं का?"

रोहन : "घरी नाही कळवलं त्याच्या आणि मला काय वाटत माहिती का एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही त्यात. उगाच त्याची आई तिथे टेन्शन घेत बसेल आणि जेवणाचं बोलत असशील तर ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा मिळत पण जर त्याला ते नाही आवडल की समोर हॉटेल आहे तिथुन घेऊयात तस पण उद्या नाही तर पर्वा तरी सोडतील त्याला."

समीरा : "बर."

रोहन : "मनवी??"

सीमा : "तिला घरी काही तरी काम होत ती गेली निघुन कॉलेजमधूनच"

रोहन : "मला अस वाटत तुम्ही पण हॉस्टेलमध्ये गेलात तर बरं होईल. आम्ही चौघे आहोत इथे. राज आणि टॉनी खाली गेलेत ते येतीलच."

समीरा : "थोड्या वेळाने जातो आम्ही. नाही तर मी थांबु का त्याच्यासोबत."

वृषभ : "अजिबात नको.. मी थांबेल इथे. तुम्ही जास्त वेळ अस हॉस्टेल बाहेर थांबन मला योग्य वाटत नाही. ही दिल्ली सिटी आहे हे लक्षात असू दे."

समीरा : "बर थोड्या वेळाने निघतो आम्ही."

थोडा वेळ सगळे शौर्य कसा पडला ह्यावर आपली शक्कल लढवत होते.

"मी एकदा शौर्यला भेटुन येते" अस बोलत समीरा शौर्यच्या रूममध्ये शिरते.

समीरा : "शौर्य..."

(समीरा त्याचा हात पकडत त्याला आवाज देते)

शौर्य : "तु गेली नाहीस अजून..??"

समीरा : "जाते थोड्या वेळाने.. पण तुला त्रास होतोय का खुप??"

शौर्य : "नाही.."

समीरा : "तु पडला कसा??"

शौर्य : "तु हॉस्टेलवर जा.. आणि बाकीच्यांना सुद्धा जायला सांग. मी आहे ठिक."

(शौर्यला विषय नको होता तो म्हणून तो बोलला)

समीरा : "शौर्य काय झालं?? नेहमी बडबड करणारा तु आज असा एकदम शांत का आहेस??"

शौर्य : "तु प्लिज वेळेवर होस्टेलमध्ये जा.."

समीरा : "बर काळजी घे.."

एवढं बोलुन समीरा निघते.

शौर्य : "समीराsss"

"हम्मम..", समीरा मागे बघत त्याला विचारते.

"सांभाळुन जा.. पोहचल्यावर मला मेसेज कर..",शौर्य काळजीच्या सुरात बोलला.

समीरा : "बर.. तु ही काळजी घे.."

समीरा एक गोड स्माईल देत तिथुन निघते.

समीरा आणि सीमा निघतात तिथुन.शौर्य झोपुनच असतो.

शौर्यने थोडं हसाव म्हणुन राज त्याच्या रूममध्ये येऊन त्याच्यासोबत मस्ती करत राहतो. पण शौर्यच्या डोक्यात मात्र वेगळंच काही तरी चालु असत.

शौर्यचा फोन रोहनच्या खिश्यात असतो त्याची आई फोन करते म्हणुन रोहन आणि बाकी सगळेच शौर्यच्या रूममध्ये शिरतात.

रोहन : "शौर्य तुझ्या मॉमचा फोन आहे.."

शौर्य : "दे इथे.."

रोहनने फोन शौर्यसमोर धरला. खुप वेळ शौर्य फोनकडे बघतच बसला कारण तो व्हिडीओ कॉल होता..

"काय तु पण रोहन त्याच्या हाताला लागलंय तुला उचलता नाही येत का?? उचलुन त्याच्या समोर धर ना.. मग तो बोलेल..", अस बोलत राजने फोन उचलायला आपला हात पुढे केला

"एक मिनिट राज !! फोन उचलू नकोस व्हिडीओ कॉल आहे..",शौर्य एवढं बोलेपर्यंत राज ने फोन उचलला..

तिथुन अनिता शौर्यचा अवतार बघुन पुरती खुप घाबरून गेली.

अनिता : "शरु काय झालं तुला???"

शौर्य पण आता पुरता घाबरून जातो..आईला काय सांगावे हेच कळत नसत त्याला.

शौर्य : "अग मम्मा, ते जिन्यावरून पडलो.. आता आहे ठिक तु घाबरू नकोस प्लिज.."

अनिता : "असा कसा पडला तु जिन्यावरून?? आणि डॉक्टर काय बोलले?? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेस तू??"

अनिता खुप सारे प्रश्न विचारू लागते.

शौर्य : "मम्मा ग.. नको ना अस घाबरुस.. मी आहे बरा आता.. प्लिज तु शांत हो आधी.."

रोहन लगेच फोन स्वतःजवळ फिरवतो..

रोहन : "हॅलो आंटी... रोहन हिअर.. आपण आधी बोललोय."

अनिता : "रोहन बेटा काय झालं शरुला?? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे तो.? आणि डॉक्टर काय बोलले..??"

अनिता एका मोगोमाग खुप सारे प्रश्न रोहनला करते.. रोहन अनिताला घडलेला सगळा प्रसंग जसाच्या तसा सांगतो आणि सोबतच तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे डॉक्टर काय बोलले हे ही सांगतो.

शौर्य आणि त्याचे इतर मित्र अनिताची समजुत काढतफोन ठेवतात. फोन ठेवताच शौर्य सुटकेचा श्वास सोडतो..

शौर्य : "राज तुला कळत का तु काय केलंस??"

राज : "काय केलं?? आता प्लिज मी तुला फोन उचलून दिला म्हणुन त्याबदल्यात तु मला थेंक्स वैगेरे बोलणार असशील तर प्लिज.. एवढ्याश्या कामासाठी कोणी थेंक्स बोलत का??"

वृषभ : "शौर्य तु आराम कर ह्याला आम्ही बघतो..अस बोलत सगळे त्याला मारू लागले."

शौर्य तसपण कोणत्या तरी गोष्टीला धरून नाराज असतो. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतेही हाव भाव न दाखवता तो डोळे मिटुन पडून रहातो.

वृषभ : "रोहन तु घरी जा. तुझे डॅड वाट बघत असतील तुझी नाही तर ओरडा खाशील डॅडचा. आम्ही थांबतो इथे ह्याच्यासोबत.."

रोहन : "बस काय.. मित्रासाठी ओरडा खाईल मी."

शौर्य : "एक मिनिट..!! रोहन तु घरी जाणार आहेस आणि तुम्ही तिघेही हॉस्टेलवर. मी आहे इथे."

टॉनी : "शौर्य तुला कोणी विचारलं का??आम्ही ठरवू.. तु गप्प पडून रहा बघु. रोहन तु घरी जा. उद्या तस पण लेक्चर नाही होणार आहेत. तु सकाळी लवकर उठून ये आणि मग इथुन स्पोर्ट प्रॅक्टिसला जा. वृषभ तुही आता हॉस्टेलवर जा. मी आणि राज थांबतो इथे."

रोहन आणि वृषभला टॉनीच म्हणणं पटत.

टॉनी आणि राज शौर्यसोबत त्याच्या रूममध्ये थांबतात.

दुसऱ्या दिवशी वृषभ आणि रोहन सकाळ सकाळी हॉस्पिटलमध्ये हजर रहातात. दोघे आल्यामुळे टॉनी आणि राज तिथुन निघतात.

वृषभ आणि रोहन आल्या आल्या शौर्यची विचारपूस करतात.

त्याला कालपेक्षा आता बऱ्यापैकी बर वाटत असत. दोघेही त्याला उठून बसवतात. वृषभ त्याला सोबत घेऊन आणलेल चहा आणि बिस्कीट काढून भरवायला घेणार तोच रूममधून कोणी तरी आत येत..

त्या व्यक्तीला आलेलं बघुन नकळत शौर्य रडु लागतो..

(कोण असेल ती व्यक्ती जीला बघुन शौर्य रडु लागतो?? कसा पडला असेल शौर्य?? त्यासाठी प्रतिक्षा करा पुढील भागाची.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल