ATRANGIRE EK PREM KATHA - 10 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 10

Featured Books
  • మనసిచ్చి చూడు - 5

                                    మనసిచ్చి చూడు - 05గౌతమ్ సడన్...

  • నిరుపమ - 5

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ- వీర - 6

    వీర :- "నీకు ఏప్పట్నుంచి తెల్సు?"ధర్మ :- "నాకు మొదటినుంచి తె...

  • అరె ఏమైందీ? - 18

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 4

    మనసిచ్చి చూడు - 04హలో ఎవరు.... ️ అవతల మాట్లాడకపోయే సరికి ఎవర...

Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 10

सरांनी प्रेसेंटी घ्यायला सुरुवात सुद्धा केली पण शौर्यचा अजुन काही पत्ता नाही.. समीराला आता काही स्वस्थ बसवणार नव्हतं आणि उठुन क्लासरूमच्या बाहेर पडता पण येत नव्हतं..

"काय करू?? काय करू??", तीच मन तिला शौर्यच्या विचाराने स्वस्थ बसु देत नव्हत.. काही भन्नाट कल्पना सुचल्यावर जसा आनंद होतो तस काहीस तिला झालं आणि ती सरळ उठुन सरांकडे जायला निघाली..

समीरा : "Excuse me sir, I feel like voimating can I..?"

समीरा मुद्दामूनच तोंडावर हात ठेवत थोडं एकटिंग करत सरांना बोलु लागली..

सरांनी लगेच हो म्हटले.. सर हो म्हणताच ती पळत क्लासरूमच्या बाहेर आली. पण शौर्य तिला क्लासरूममध्ये बाहेर दिसलाच नाही. ती चालत पुढे कॉलेजच्या गेट बाहेर एक नजर फिरवत त्याला शोधायला ग्राउंड वर जाऊ लागली. तिथे जाईपर्यंत ती ही थोडी फार भिजून गेलेली. शौर्य एकटाच फुटबॉलसोबत खेळताना तिला दिसला. थोडा वेळ तर ती तशीच त्याच्याकडे बघत प्रेम भऱ्या स्वप्नात हरवुन गेली.. पावसाच्या थेंबांचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर होताच ती थोडी भानावर आली. तिच्या पायापाशी पडलेली शौर्यची बेग उचलत ती त्याला आवाज देऊ लागली.. इशाऱ्यानेच ती त्याला आत बोलावू लागली. शौर्य फुटबॉलला जोरात किक मारत त्याला रिंगणात टाकत धावतच समीराकडे आला.

समीरा : "शौर्य हा काय वेडेपणा लावलायस?? किती भिजलयाया बघ."

शौर्य : "तु ह्याला वेडेपणा बोलतेस समीरा.??एक तर माझं काहीही ऐकून न घेता तु माझ्याशी बोलायचं बंद करतेस. एकदा मला एक्सप्लेन करायची संधी सुद्धा देत नाहीस तु.."

समीरा : "तु आत ये आधी.. आत येऊन बोल.."

शौर्य : "मी इथुनच बोलणार.. फक्त तु ऐक.. मी दारू वैगेरे कधीच घेत नाही ग. ते रोहन आणि राजने मला फसवुन माझ्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये हार्ड ड्रिंक्स मिक्स केलेली. आय स्वेर मी कधीही हार्डड्रिंक्स वैगेरे घेतली नव्हती ग. माझ्या घरी असलं काही नाही चालत.. मी अस काही केलं तर माझा भाऊ माझा जीव घेईल,"

समीरा : "पण टॉनी तर बोलला की तू स्वतः मागुन मागुन घेत होतास."

शौर्य : "अग ते मी आधी चढलेल्या ड्रिंकच्या नशेत मागत असेल. मला नाही आठवत काही. मी रोहनच्या घरी देखील कसा पोहचलो हे ही आठवत नव्हत मला. "

समीरा : "बर तु आधी आत ये बघु."

शौर्य : "आत्तातरी माझ्याशी बोलशील का ते सांग आधी.."

समीरा दोन्ही हात कानाला लावताच शौर्यला सॉरी बोलते..

समीरा : "मी ही तुझं ऐकून न घेता उगाच रागावली तुझ्यावर.. आता तरी आत येशील.. तुला लेक्चरला नाही यायचं??"

शौर्य : "आता मुड नाही ग.. आणि मी पुर्णच भिजलोय.. तु जा. "

समीरा : "ओके"

"एक विचारू", शौर्य आत येतच बोलला.

समीरा : "विचारणा.."

शौर्य : "ड्रिंक तर त्या दिवशी रोहन, राज, वृषभ आणि टॉनीने पण घेतलेलं. पण तू माझ्यावरच का एवढी रागावलीस..?"

शौर्य भुवया उडवतच समीरा विचारू लागला..


समीरा : "कारणssss.."

(समीराला काय बोलावं ते सुचतच नव्हतं... त्याच्या हातात ती बेग देतच एक एक शब्द आठवत जोडण्याचा प्रयत्न करू लागली)

"कारणsss"

(शौर्य देखील तिच्या थरथरणाऱ्या ओठांकडे आपले डोळे टीपुन होता. कान फक्त तिच्या तोंडातुन पडणाऱ्या शब्दांची वाट बघत बसले होते.)

"कारण तुsss.. .. तु सगळ्यांमध्ये जास्त ड्रिंक घेतलेलीस.. म्हणुन.." अस बोलत समीरा हसतच तिथुन निघाली.

शौर्य : "काय??? समीरा ऐक तर.."

"लेक्चर संपल्यावर भेटु", अस बोलत तीने तिथुन पळ काढला.

शौर्य आपल्या केसांवरून हात फिरवत एक गोड हसु चेहऱ्यावर आणत ती दिसेनाशी होईपर्यँत बघत राहिला.. आणि पुन्हा फुटबॉल खेळायला निघुन गेला.

सगळे हळुच तिला शौर्य कुठेय ते विचारू लागले..

"त्याचा मुड नाही आज लेक्चरला बसायचा.. तो प्रॅक्टिससाठी गेलाय.." समीरा सरांपासून स्वतःला लपवतच बोलते..

रोहन : "हे बर आहे. मला इथे फसवुन हा अस कस जाऊ शकतो.. मी पण नाही बसणार.."

वृषभ : "अरे आत्ता संपेल कि लेक्चर. फक्त दोन तास.."

रोहन : "झोप यायला लागली ह्याच इकॉनॉमिक्स ऐकून. चल आपण पण निघुयात.."

वृषभ : "आर यु मॅड?? आत्ता कस निघणार आपण.."

रोहन : "में हु ना.. तु बस थोडा एकटिंग कर.."

वृषभला रोहन काय बोलतो ते कळतच नसत..

रोहन : "Excuse me sir!!!"

रोहन मोठ्यानेच ओरडतो..

सर : "Yes.. Rohan tell me."

रोहन : "Sir his stomach is paining a lot and I need to take him out. can I take him please Sir???"

"what??", रोहन आपल्याबद्दल सरांना अस काही सांगतोय हे बघुन वृषभ जोरातच ओरडतो..

तस रोहन जोरातच शौर्यच्या पायावर आपला पाय मारतो.

"आहहह..",तस वृषभ कळवळत ओरडु लागतो.

सर : "take to him doctor.."

रोहन : "sure Sir..I will"

सरांनी सुद्धा लगेच होकार दर्शवला..

टॉनी आणि राज वृषभ आणि रोहनकडे बघत रहातात.

रोहन टॉनीला डोळा मारतो. वृषभचा हात तो आपल्या खांद्यावर टाकत त्याला बाहेर नेतो. रोहनने पायावर जोरात पाय दिल्याने वृषभ सुद्धा थोडं लंगडत चालत असतो. त्यामुळे सरांना खात्री पटते की खरच ह्याच्या पोटात दुखतंय.

मनवी रोहनकडे बघतच बसते.. रोहन मनवीला सरांच्या नकळत बाय करत तिथुन निघतो.

बाहेर पडताच वृषभ रोहनला मारू लागतो.. साल्या एवढ्या जोरात पाय दिलासा माझ्या पायावर.. नीट सांगितलं असत तर केली असतीना खोटी एकटींग.. वृषभ रागातच रोहनला बोलतो.

रोहन : "अरे पण त्यात इमोशन्स दिसले नसते ना.. हे कसं खर वाटलं. दोन दिवस तरी सर तुला बघताच आठवणीने तुझी विचारपूस करतील आणि कसं असत वृषभ एकटिंगपेक्षा ना इमोशन्स महत्वाचे असतात रे आणि ते आज सगळ्यांनी बघितले असतील."

वृषभ : "तु थांबच तुला तुझ्यातले इमोशन्स दाखवतो.."

वृषभ रोहनला मारत त्याच्या मागे पळु लागला..

"सॉरी ना यार.. मस्ती करत होतो.. नेक्स्ट टाईम आपण दुसर काही तरी करूयात.." अस बोलत रोहन ग्राउंडवर पळत सुटला.. वृषभ पळत त्याच्या मागे..

शौर्य मला वाचव करत रोहन शौर्यला पकडुनच गोल फिरू लागला..

वृषभ : "शौर्य तु बाजुला हो.. तु मध्ये नको पडुस.."

रोहन : "वृषभ बस काय सॉरी ना यार.."

शौर्य : "एक मिनिट काय झालं???"

वृषभने तो पर्यंत रोहनला पकडत मारायला सुरुवात केली..

शौर्य दोघांचीही भांडण सोडवू लागला..

दोघांनी केलेले पराक्रम ऐकुन शौर्यला हसु आलं..

"रोहन तुला हे सुचत बर हा..", शौर्य हसतच रोहनला बोलतो

"आणि काय रे मला लेक्चरला बसवुन स्वतः मस्त मज्जा करतोयस.. ", अस करत रोहन शौर्यला मारू लागतो..

शौर्य : "हे बर आहे एक तर मी तुला वाचवलं आणि आता तू मलाच मारतोस.."

वृषभ : "तु लेक्चरला का नाही आलास??"

शौर्य : "इको बोरिंग वाटतरे.. आणि त्यात त्या सरांची शिकवायची पद्धत तर त्याहून बोरिंग"

रोहन : "माझ्या मनासारखं बोललास.."

वृषभ : "एक काम करूयात उद्या पासून नवीन सरांना recruite करूयात. मिस्टर शौर्य..."

वृषभ रोहनला टाळी देतच बोलला.

शौर्य : "मला टीचर वैगेरे नाही व्हायचं.."

रोहन : "मग काय व्हायचं??"

शौर्य : "जे ठरवलं होत ते नाही करू शकलो.. त्यानंतर काही ठरलं नाही.. माझं ठरवलं की सांगतो तुला.. पण सध्या टीचर तर व्हायचं नाही मला. तुमच्यासारखे एक एक अतरंगी नमुने असतात क्लासरूममध्ये.. "

रोहन : "हो का?? तु ही काही कमी अतरंगी नाहीस.. आणि एकटा काय खेळतोस चल तिघे मिळुन खेळूयात."

"चलो फिर", शौर्य आणि वृषभ एकत्रच बोलतात..

रोहन, वृषभ आणि शौर्य तिघेजण पावसात भिजतच फुटबॉल खेळत होते. जवळपास तास भराने तिघेही दमले..

वृषभ : "शौर्यचा यार तुझा कोणी हात पकडुच शकत नाही फुटबॉलमध्ये.."

रोहन : "तु मास्टर आहेस यार फुटबॉलमध्ये. पहिलं कोणत्या कॉलेजमध्ये होतास.?"

शौर्य : " DPS.."

रोहन : "ओहहह. अरे स्टेट लेव्हलची मॅच असतेना आपली तेव्हा ते कॉलेज असत. मोठं कॉलेज आहे ते..म्हणजे एकदा गुगल केलेलं त्याबद्दल त्यामुळे माहिती."

शौर्य : "मी तर एक महिनाच होतो मला नाही माहीत एवढं काही. त्या आधी मी JB मध्ये होतो दोन वर्षे.."

रोहन : "तु अचानक का इथे आलास अस मधूनच.. म्हणजे काही प्रॉब्लेम होता का.."

"आपण केंटिंगमध्ये जाऊयात का??", शौर्य विषय बदलतच बोलतो..

वृषभ : "हा असाच आहे छुपेरुस्तम.. काहीच सांगत नाही.."

रोहन : "बस काय शौर्य विषय का बद्दलतोस. मी तर तुला चांगला यार मानतो आणि तु सगळे लपवतोस. आणि मला माहिती तुझ्याकडे Roll-Royance Cullinan आहे ते. तुझ्या मोबाईलचा डीपी मध्ये बघितलं. तु त्यादिवशी आमच्यासोबत नंतर खोट का बोललास मग..??"

शौर्य शांतच असतो..

वृषभ : "रोहन जाऊ दे हा काही सांगणार नाही चल जाऊयात केंटिंगमध्ये.. नाही तर तोंड पाडून बसायचा.."

रोहन : "चल.."

शौर्य : "डॅड माझा जीव घ्यायला बघतोय म्हणुन मम्माने माझ्या सेफ्टी साठी सगळ्यांपासुन लांब पाठवलय मला"

"तुझा डॅड तुझा का जीव घेणार??", वृषभ त्याला विचारतो.

"स्टेप फादर",अस बोलत शौर्य दोघांनाही घडुन गेलेला सर्व भुतकाळ सांगतो..

रोहन आणि वृषभ शौर्यकडे बघतच रहातात.

शौर्य : "प्लिज अजुन कोणाला सांगु नका ह्याबद्दल..

वृषभ : "आम्ही काही ऐकलं नाही आणि तु काही सांगितलं नाही.. काय रोहन.."

रोहन : "हो.. शौर्य तु सुद्धा विसरून जा की तु आम्हाला काही सांगितलं आहेस ते.."

"चल कँटीनमध्ये जाऊयात थंडी वाजतेय खुप.. पुन्हा प्रॅक्टिसला येऊयात.". रोहन शौर्यचे डोळे पुसतच बोलु लागला..

वृषभ : "त्यापेक्षा आपण टपरीवर जाऊन चहा घेऊयात..अस भर पावसात टपरीवरचा चहा पिण्याची मज्जा काहीतरी ओरच आहे."

तिघेही मिळुन मस्त पैकी चहा पितात..

चहा पिऊन झाल्यावर थोडा टाईम पास करत तिघेही ग्राउंडवर स्पोर्ट प्रॅक्टिसला जायला निघतात..

सर आधीपासुनच तिथे आलेले असतात.. सगळ्यांना एकत्र बोलवत चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या इंटर कॉलेज फुटबॉल मॅचची अनौन्समेंट ते करतात. आज प्रॅक्टिस थोडी जास्तच करू हे ही ते सांगता..

रोहनला लांबुनच मनवी आणि इतर मित्र मैत्रिणी येताना दिसतात तो लांबुनच त्यांना हात दाखवतो.

सरांचं लक्ष त्याच्याकडे जात..

सर : "Mister Rohan , Is this important for you or not??"

(सर मोठ्यानेच त्याच्यावर ओरडतात)

"सॉरी सर.." बोलत रोहन पुन्हा लक्ष देऊन सरांचं बोलणं ऐकतो.

आणि सगळे सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करू लागला..

"प्रॅक्टिस काही आज संपत नाही मला भूक लागलीय केंटींगमध्ये जाऊयात का??" राज सगळ्यांना आपलं पोट चोळतच बोलु लागला.

टॉनी : "तिथेच जाऊन बसूयात प्रॅक्टिस संपली की येतील आणि समीरा पण वाट बघत बसेल आपली तिथे."

सीमा आणि मनवीला टॉनीच म्हणणं पटत.

इथे समीरा आणि इतर लोक केंटिंगमध्ये तिघांची वाट बघत बसतात.

नेहमीपेक्षा आज थोडी जास्तच फुटबॉलची प्रॅक्टिस असल्याने तिघांनाही केंटिंगमध्ये जायला मिळतच नाही.

त्यामुळे समीरा आणि शौर्यची भेट काही होत नाही.

शौर्य आणि वृषभ प्रॅक्टिस संपताच हॉस्टेलमध्ये जातात. दिवसभर पावसात भिजून अंग अगदी आखडून गेलेलं असत. कपडे बदलून दोघेही आडवे पडणार तो जेवणाची रिंग होते..

राज आणि टॉनीला बोलवायला ते त्यांच्या रूममध्ये जातात. चौघे मिळुन जेवण जेवतात..

टॉनी : "प्ले हाऊस मध्ये जाऊयात..??"

राज : "आय एम रेडी.."

वृषभ : "मी नाही येत मी दमलोय तुम्ही जावा."

शौर्यला खर तर जायचं नसत पण समीरा दिसेल म्हणुन तो हो बोलतो

वृषभ : "तु तर जाणारच ह्याची खात्री होतीच मला.."

वृषभ वगळता तिघेही प्ले हाऊसमध्ये जाऊन बसतात.

प्ले हाऊसमध्ये शिरताच शौर्यची नजर समीराला शोधु लागते.. पण समीरा प्ले हाऊसमध्ये नसते..

(उगाचच आलो मी म्हणुन शौर्य मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत बसला)

सीमा आणि मनवी मात्र तिथे असतात..

शौर्य : "हॅलो सीमा, हाय मनवी..."

"हायsss.." दोघीही एकत्रच बोलतात..

शौर्य : "समिरा कुठे दिसत नाही आहे.."

सीमा : "आता तर ती फोनवर बोलत होती इथे.. असेल इथेच कुठे तरी."

शौर्यला वाटत की येईल लगेच फोन वर जास्तीत जास्त किती वेळ बोलणार आहे.

जवळपास अर्धा तास होऊन गेला पण समीरा काही अजून आली नाही.

"मी आलोच तुम्ही खेळा", अस बोलत शौर्य तिथुन जायला निघाला.

राज : "चाललास कुठे??"

शौर्य : "इथे बाहेरच आहे. आलोच.."

"जी नही लागता तेरे बिना... सोनिये जी नही लगता तेरे बिना..." राज गाणं गुणगुणत भुवया उडवत शौर्यला चिडवू लागला..

"गप्प खेळना उगाच कश्याला त्या बिचाऱ्या सिंगर लोकांच्या पोटावर पाय आणतोस एवढं छान गाणं बोलत..", शौर्य सुद्धा चिडवत राजला बोलला..

सगळे राज वर हसु लागतात..

"मी येतोच.. तुम्ही खेळा..", प्ले हाउस बाहेर येताच तो एक नजर फिरवतो पण त्याला समीरा काही दिसत नाही.

बहुतेक गेली असेल ती रूमवर.. शौर्य स्वतःच्या मनाला समजवतच बोलु लागला..

तो तसाच पुन्हा प्ले हाउस मध्ये वळणार पण त्याची नजर गेटजवळ गेली.

तिथे समीरा एका मुलासोबत बोलताना त्याला दिसते. त्या मुलाकडे बघून तो कॉलेजमधला आहे असं तरी वाटत नव्हतं..

शौर्यच हृदय आता जोर जोरात धडधड करू लागलं..

समीरा एकदम जवळीक साधत त्या मुलाशी बोलत होती. बोलता बोलता त्याला मिठी मारत होती. त्याला भेटल्यावर जणु तिला भरपूर आंनद झाला होता.. तो मुलगा ही तिच्याशी जास्त लगट करण्याचा प्रयत्न करत होता.

शौर्य तिथुन नाराज होत पुन्हा प्ले हाउस मध्ये आला.

राज : "काय झालं?? समीरा नव्हती का बाहेर?? कुठेय ती मला वाटलं तिला घेऊनच येशील. "

शौर्य : "मी तीला बघायला बाहेर गेलो नव्हतो आणि मला काय माहीत कुठेय ती.."

शौर्यच्या बोलण्यात एक वेगळाच बदल असता सगळ्यांना जाणवत होता.

जवळपास अर्ध्या तासाने समीरा तिथे आली..

सीमा : "अग होतीस कुठे?? किती वेळ?"

समीरा : "अग ते मी बाहेरच..."

शौर्य : "मी रूमवर जातो.. बायss"

(समीराला मध्ये तोडतच शौर्य बोलला आणि तिथुन जायला निघाला)

टॉनी : "ह्याला काय झालं??"

राज : "मी पण निघतो.."

टॉनी आणि राज देखील तिथुन निघून सरळ शौर्य सोबत त्याच्या रूममध्ये शिरले..

समीराला ही कळलं नाही शौर्यला काय झाल ते..

( नक्की कोण होता तो?? ज्याच्याशी समीरा एवढी जवळीक साधत होती. त्यासाठी प्रतीक्षा करा पुढील भागाची.. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल