प्रकाश जेव्हा निराशावादी बोलत होता. तेव्हा खरं तर रतन पण खचली होती. पण कोणी खंबीर राहणे गरजेच होत.प्रकाश खूपच निराश होता .मनातल सार रतनला सांगत होता ,आपले पुढे असे होणार,मला जर काम नाही झाले तर,आत्ताच कर्ज काढून खर्च भागवतात, सीमाचे बाळंतपण, घरातील खर्च, रमेश तर घरी लक्ष देत नाही , काही काही बोलावे तर..... ........................रतनने प्रकाशाचे सारे बोलणे शांत ऐकुन घेतले, व ती म्हणली, दिवस एक सारखे राहत नाही. जसे रात्री नंतर सकाळ होते, तसे दुःखा नंतर सुख हे येते. आत्ता घरात काही बोलणे बरोबर नाही. आणि ती आपलीच आहेत. कोणी कसे वागले तरी आपण आपले कर्तव्य करावे. आणि मी नेहमी तुमच्या बरोबरआहे .सुख असो वा दुःख रतनचे हे बोलणे ऐकुन प्रकाशाचे डोळे भरून आले. घरातील सगळे तुला बोलतात तरी तु. .......... ................ .. ''आहो , ते जरी मला बोलतात तरी पहिले माझे कैतुक पण करत होते. ते आपण कसे विसारायच .''रतन म्हणली. खरच मी खुप भाग्यवान आहे, मला तूझ्या सारखी पत्नी मिळाली.. ते सगळे जाऊ दया जेवण करा आणि गोळ्या घ्या. ..........किती तरी दिवसांनी दोघे एकत्र जेवण करतात. रतन आपली सगळी कामे उरकते दोघे खुप गप्पा मरतात. तो दिवस अगदी आनंदात घालवतात . ................................................. आज सोमवार मी कहाणी लिहायला घेतली. माझे मन अशांत होते. तस घरात कोणी नव्हत. माझ्या मनात विचार घोळू लागले. रतन किती समंजस आहे. देवाने बायकांना किती सहनशीलता दिली आहे. खरं तर तिला देवीचे स्थान दिले आहे. सासर-माहेर जोडण्याचे सामर्थ तिच्यात आहे. कोणताही निर्णय घेताना ती सासर-माहेर दोनीचा विचार करते. ..................... ... .............................आणि प्रकाश पण किती प्रेम करतो तिच्या वर. म्हणतात ना गाडीची दोनी चाके सारखी लागतात तरच गाडी नीट चालते तसाच रतन आणि प्रकाश एकमेकांनां किती समजूनघेत होते. जस।चांदणी शिवाय चंद्राला शोभा नाही,दिवा वाती शिवाय पेट घेऊ शकत नाही. घरचा पाया जरी पुरुष असला तरी स्री हि भिंत आहे. पति व पत्नी एकमेकांशी जोडलेली असतात. एकाने रागवले तर दुसऱ्या ने समजून घ्यावे. घरातील मोठ्यां माणसाच आदर करणे. हाच आदर्श आपण आपल्या मुलांना द्याला हवा. ईतक्यात घड्याळाचे चार चे ठोके पडले. आणि मी भानावर आले. अजून सगळे घरी येण्यास एक तास होता. मी लिहिण्यास सुरुवात केली. .......... .'' ................ .................रतन च्या घरचे आले. प्रकाश आईला म्हणतो. सिमला काय संगितल डॉक्टरांनी किती तारिख दिली '' प्रकाश
ची आई खुप निराश होती. अरे काय करावे कळत नाही.काय झाले, प्रकाश .........सीमांचे दिवस भरले उदया या म्हणतात. सगळे साहित्ये घेऊन या. शीजर करावे लागेल. आई म्हणते.
पण आई आपण थोड्या दिवस थांबू मग काय तो निर्णय घेऊ दिवस चुकू शकतात. प्रकाशाचे म्हणणे आई ला पडते. रतन सीमाची खुप काळजी घेत असे .खाणे-पिणे वेळच्यावेळी देत असे, कुटले हि काम करू देत नसे.
घरची परस्थिती अजूनच हलकीची होत चालली होती. पण तिला सामोरे तर गेलेच पहिजे. प्रकाशाचे आई वडिल दोघे हि काळजीत असे. पण प्रकाशच्या तब्येतीत सुधारणा पाहून ते थोडे सुखावत असे. तो आत्ता कुबड्या न घेता काठी घेऊन चालत असे.....
एक दिवस रात्रीची वेळ होती. आणि सीमाच्या पोटात दुखायला लागले. रात्री वेळ असल्याने गावातील सोईनीला आईने बाबांना आणयला संगितले. त्या आल्या सिमला पाहिल्यावर म्हणल्या, थोडा वेळ वाट पाहू नाही तर दवाखान्यात न्याहवे लागेल. बाबा व प्रकाश बाहेर बसून होते. मनोमन देवाचा दावा करत होते. रतन ची पण तिच अवस्था होती. देव असतो म्हणतात, ते अगदी खरं . अगदी दवाखान्यात जाण्याची वेळ आली. ईतक्यात बळाचा जन्म झाला. सगळ्याना आनंद झाला. सोईनबाई म्हणल्या, अग मुलगा झाला. आईने त्याचे आभार मानले. काय देयाचे म्हणून विचरले, त्या म्हणल्या, तुझा प्रकाश बरा झाला, आणि त्याला एक छान बाळ होईल तेव्हा मागून घेईल. त्यांनी रतन च्या डोक्यावर हात फिरून आशिर्वाद दिला. हा आशिर्वाद रतन साठी खुप महत्वाचा होता. हा
मग काय बाळा मध्ये सगळे गुंतून गेले. आई बाळा कडे व रतन घरात दोघी कामात गुंतून गेल्या. बाळ आत्ता दोन महिन्याचे झाले होते. बाबांनी घेतलेले कर्जासाठी लोक मागणी करू लागले. काय करावे कळत नव्हते. बाबांनी रमेशला पत्र पाठवले. पण त्याचे उतर आले नाही.
एक दिवस प्रकाशच्या कंपनीतून निरोप आला. कि, झालेल्या दिवसाची भरपाई प्रकाशच्या खात्यात जमा कोणार आहे. प्रकाशने ते सगळे पैसे जसे घेतले तसे ते त्या कर्ज दिले. वडिलांना प्रकाशचा खुप अभिमान वाटला. त्यांनी प्रकाशचा हात आपल्या हातात घेतला. आणि त्याचे डोळे भरून आले. मुलगा असावा तर तुझा सारखा. '' घरी हे सांगायचे नाही '' असे प्रकाश म्हणला. दोघे घरी येतात. जेवणाची वेळ झालेली असते. रतन सगळ्याना जेवण वाटते. सीमा थोडी नाराज असते. तिला वाटते माझ्या बाळाचे बारसें करावे. पण बाबा नाही म्हणतात. आईला वाटते प्रकाशला पैसे मिळाले. त्यातून खर्च करावा. तरी बाबा नाही म्हणतात. प्रकाशची आई त्याला बडबड करते. प्रकाशला खुप वाईट वाटते पण तो काही बोलत नाही. अर्ध्या पोटी ताटा वरून उठतो. हे सारे रतन पाहते. ती सुद्दा काही बोलत नही. पण बाबा खुप चिडतात. व म्हणतात, अरे कधी विचार केला. घरात पैसा कोठून येतो. लोकांचे कर्ज झाले. लोक पैसे मागतात. कोठून फेडणाऱ् कर्ज. राहिला प्रश्न प्रकाशच्या पैशाचा तर ते जसे मिळाले तसे कर्जवाल्याला दिले. त्यातील एक रूपया त्याने आपल्या बायको साठी ना स्वतःला ठेवला.असा मुलगा व सून मिळण्यास नशीब लागते. व बाबा रागाने बाहेर जातात..........
रतन हे सगळे ऐकते व प्रकाशला म्हणते, खरच तुम्ही चांगला निर्णय घेतला. आपल्या घरा पेक्षा पैसा महत्वाचा नाही. प्रकाश रतन चा हात हातात घेतो. व म्हणतो, पण तूझ्या साठी काही करू शकत नाही. मला माप कर. ''आहो, माफी मागून मला लाजऊ नका. तुमच सुख तेच माझ सुख. मी नेहमी तुमच्या बरोबर आहे'' रतन म्हणते. प्रकाशला रतन चा अभिमान वाटतो. ..........
अशी जीवन साथीनी असेल तर संसारच काय? हे जगच सुंदर वाटेल .हे सारे बोलणे बाबा ऐकातात आणि आपल्याला अशी दोन रतन मिळाली याचा अभिमान वाटतो. देवाचे मनोमन आभार मानतात. काही दिवस असेच जातात........ ..................
रतन ची तब्येत बिगडते. तिला खुप अस्वस्थ वाटते. प्रकाशला थोडी काळजी वाटते. प्रकाशच्या आईला कळते ही आनंदची बातमी आहे. पण त्या काही बोलत नाही. तिला डॉक्टर कडे येऊन जातात. ती आई होणार ही बातमी कळते. घरी आल्यावर सगळ्याना ही बातमी आई सांगते. खुप खुप आनंद होतो. रतन तर लाजेने चूर होते. प्रकाश ची आई देवाला दिवा लावते व साखर ठेवते. सगळे रतन च कैतुक करतात. रतन च्या आईला पण ही बातमी कळते. माझ्या रतन ला आत्ता चांगले दिवस येतील.डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात.या ऐका बातमीने रतन चे पूर्ण जीवन बदलून जाते. बाबांना खूपच आनंद होतो. रतन सारखी गुणी मुलगी आपल्या घरी आहे. तिच्या मुळे घरात पाळणा हलणार. ते सुख काही वेगळेच होते. प्रकाशला जणू नवीन ताकत मिळाली असे वाटू लागले. रतन च्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसू लागली. किती गोड आहे हा आनंद....