ATRANGIRE EK PREM KATHA - 9 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 9

Featured Books
Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 9

खुप दिवसांनी आज तो त्याच्या आईला बघणार होता एक वेगळाच उत्साह त्याच्या मनात होता..क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन उचलला..

"सॉरी मम्मा ती चार्जिंग संपली मोबाईलची म्हणुन स्विच ऑफ झाला.. तु काही सांगत होतीस मला..", शौर्य फोन उचलल्या उचलल्या त्याच्या मम्माला बोलतो..

अनिता : "आधी मन भरून बघु तर दे तुला.. डोळे असे सुजलेत का तुझे.??नीट झोपत नाहीस का?? हॉस्टेल वैगेरे चांगलं आहे ना??"

शौर्य : "हो ग.. मम्मा ... माझा ब्रुनो कुठेय ग??"

मम्मा : "हा बघ.. मला माहित होत तु विचारणार त्याच्याबद्दल ते.. म्हणुन मी ह्याला घेऊनच बसली.."

(ब्रुनो म्हणजे शौर्यच लाडक अस कुत्र्याचं छोटस पिल्लू. एकदा कॉलेजमधून येताना त्याला रस्त्याच्या आडोश्याला सापडलं. भर पावसात कुठे ठेवायचं म्हणुन तो त्याला घरी घेऊन आला आणि दोघांनाही एकमेकांचा लळा लागला)

शौर्यला अस मोबाईलमध्ये बघताना ब्रुनो अक्षरशः मोठं मोठ्याने भुकून त्याचा आनंद व्यक्त करत होता.. शौर्य देखील त्याची प्रेमाने विचारपूस करत होता. थोड्या वेळाने अनिता ब्रुनोला गेलरीत सोडते..

शौर्य : "मम्मा तु माझ्या रूममध्ये आहेस ना??"

अनिता : "तुला दिल्लीला पाठवल्यानंतर मी इथेच असते.. तु नाही तर तुझ्या ह्या रुमममधील आठवणी तरी.. तुझे इकडचे मित्र मैत्रिणीसुद्धा आलेले तुला भेटायला.. मी त्यांना तु चेन्नईला गेलाय अस सांगितलं.."

(शौर्यला त्याची रूम, त्याचा लाडका ब्रूनो आणि त्याची मम्मा सगळ्यांना बघुन भरून आलेलं)

शौर्य : "मम्मा मला इथे नाही ग करमत तुझ्याशिवाय. खुप आठवण येतेय ग तुम्हा सगळ्यांची.. तु माझं का ऐकुन नाही घेतलंस तेव्हा.. रॉबिन त्रास देत होता ज्यो ला.. म्हणुन मी."

एवढं बोलुन शौर्य रडु लागला.. वृषभ शौर्यकडे बघतच बसतो. शौर्यसुद्धा विसरून गेला की वृषभ तिथे आहे. वृषभला तिथे थांबणे योग्य वाटत नव्हतं तो शौर्यला न सांगताच तिथुन निघून सरळ प्ले हाउसमध्ये जाऊन बसला.

अनिता : "मी तुला त्यामुळे दिल्लीला पाठवलं नाही आहे.. मी तुला जे सांगते ते तु नीट ऐक. तुला मी आज सगळं काही सांगायचं ठरवलंय.. त्यादिवशी आपल्या S S Ltd ची सगळ्यात मोठी अशी डिल होणार होती. त्यासाठी मी आदल्या दिवशी रात्रभर आपल्या एम्प्लॉयेस ने बनवलेले प्रोजेक्ट आणि प्रेझेन्टेशन बघत बसलेली. कारण काहीही करून मला ही डिल हातातली जाऊ द्यायची नव्हती. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये जायला निघाली. मी गाडीत बसल्यावर आदल्या दिवशी निवडून ठेवलेले प्रेझेन्टेशन बघण्यासाठी लॅपटॉप हातात घेतला पण मी पेनड्राइव्ह घरीच विसरले होते. मनात विचार आला की सुरजला फोन करून सांगाव पण तो पेनड्राइव्ह शोधत बसेल आणि माझाच वेळ वाया जाईल म्हणुन मी ड्राईव्हरला गाडी थांबवायला सांगुन मी स्वतःच तो पेनड्राइव्ह आणायला गेले. मी आतमध्ये जाणार तोच सुरजच बोलणं माझ्या कानावर पडल. कोणाशी तरी फोनवर बोलत होता.

(सुरज : दोनदा वाचला पण आता अजून नाही. एक प्लॅन तुला नीट करता येत नाही. आता पर्यंत केलेल्या सगळ्या मेहनतीवर तु पाणी फेरणार. मला वाटलं तु माझा राईट हॅन्ड बनशील पण नाही. आता पुन्हा अशी चुक होता कामा नये. ह्या वेळेला तो त्याच्या बापाकडे नक्की गेला पाहिजे. त्या शेखरचा अंश मला त्याच्यात दिसतोय. त्याच दिसणं, त्याच वागणं, त्याच बोलणं सगळ्यातच मला शेखर दिसतोय. त्यात त्याच वारंवार अनिताजवळ वावरणं मला अजिबात नाही आवडत आहे.. मला पुन्हा तो ह्या घरात नकोय. त्यात ती अनिता. S S Ltd मध्ये फक्त वीस टक्केच पार्टनर्शीप देऊ करतेय मला.. बाकी सगळ त्या शौर्यच.. मला शौर्य विषयच संपवुन टाकायचाय..)

शरु माझे तर हात पाय गळून गेलेरे त्याच तस बोलन ऐकून. तुझा बाबा गेला ना सर्वच आधार गेलारे माझा. एकटी पडलेले मी. त्यात तुला शेखर दिसत नाही म्हणुन तु चीडचीड करायचास. शेखरने तुला त्याची सवयच अशी लावलेली. ऑफिसमधल्या महत्वाच्या मिटिंग सुद्धा तो तुझ्यासाठी केन्सल करायचा. पण कार एक्सिडेंटमध्ये तो आपल्या सगळ्यांना कायमचा सोडून गेलेला. त्याच्याशिवाय मला तुला सांभाळुन बिजनेस सांभाळणं म्हणजे अशक्य... त्यात समीर आणि आई सुद्धा हे घर सोडून गेले.. सुरज हा शेखर आणि माझा क्लासमेट. बिजिनेस उभारण्यासाठी त्याने शेखर आणि मला क्लाइन्ट मिळवुन द्यायला मदत केलेली. त्यात त्याने आणि शेखर गेल्यानंतर तर खुपच आपुलकी दाखवली. शेखरच्या डोळ्यांत जस प्रेम होताना अगदी तसच त्याच्या डोळ्यात दिसत होत मला. विराज तेव्हा सहावीत तरी असेल. पण आई विना वाढलेलं ते मुल. विराजला आईची गरज होती तर तुला बाबाची. म्हणुन समजूतदार पणे आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला पण निर्णय फसलारे माझा. तु सुरजला बाबा म्हणुन कधी मानलंच नाहीस. पण तेच योग्य होत ह्याची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे तुला माझ्यापासुन लांब पाठवायची गरज मला पडली. सुरजच ते फोनवरच बोलणं ऐकून खर तर मला तुला US ला पाठवायच होत पण तुझा व्हिसा तैयार नव्हता आणि एका दिवसात हे सगळं अरेंज करणं मला शक्य नव्हतं. मला काहीच सुचत नव्हतं आणि तुला मी हे सगळं सांगितलं असत तर तु तिथे जायला तैयार झाला नसतास. मला काहीही करून तुला त्याच दिवशी इथुन दूर पाठवायचं होत आणि नेमका मला तू कॉलेजच्या बाहेर मारामारी करताना दिसलास. मी ही खोटच बोलले की प्रिंसिपलकडूनच फोन आलेला म्हणुन. सुरज आणि विर समोर मी जाणूनबुजून तुला ओरडले जेणे करून त्यांना खात्री पटावी की मी तुला त्या कारणासाठीच एवढ्या लांब पाठवतेय आणि त्या राक्षसा पासून तुला लांब पाठवायला मी सफल झाली. तिथे तु पोहचलास की तुला हे सगळं सांगणारच होते पण तू फोन उचलतच नव्हतास माझे. शरू तुला जस करमत नव्हतं ना तसच मलासुद्धा नाही करमतरे इथे. त्यात तु बोलत सुद्धा नव्हतास. तुझा आवाज ऐकला नाही तर भुक, तहान आणि झोप सर्व काही विसरून गेली मी. पर्वा अक्षरशः झोपेची गोळी घेऊन झोपली आणि नेमका तु फोन केलास म्हणुन नाही उचलता आलारे तुझा फोन."

शौर्य : "मम्मा आय एम सॉरी.. मी तुझ्याशी खुप रुड वागलो. मला करमत नव्हतं ग अनोळखी ठिकाणी म्हणुन माझी चिडचिड होत होती..बट आय लव्ह यु मम्मा.."

मम्मा : "लव्ह यु 2 बेटा.."

शौर्य : "मम्मा मला तुझी खुप काळजी वाटते ग. त्याने तुला काही केलं तर.."

मम्मा : "माझी काळजी नको करुस.. फक्त तुला कोणी विचारलं तर तु चेन्नईला आहेस अस सांग. कारण तुझं फ्लाईट बुकिंगसुद्धा मी तसच केलेल आणि मी प्रॉपर्टीच्या सर्व पेपरमध्ये फेरबदल केलेत. ते मी तुला मेल करेलते एकदा बघुन घे. तू नीट रहा आणि काळजी घे."

शौर्य : "मम्मा.. पण तू हे सगळं पोलिसांना सुद्धा जाऊन सांगु शकतेस ना?? "

मम्मा : "बाळा पोलिस प्रूफ मागतील ते मी कुठुन देऊ. एकदा का प्रूफ मिळाले तर मी काही विचार करू शकते. पण त्याने हे सगळं करताना कोणतेही पुरावे मागे ठेवले असतील अस मला नाही वाटत."

शौर्य : "मम्मा मी येतो ना तिथे.. आपण दोघ करू काहीतरी.."

अनिता : "नाही हा शरू बाळ मी सांगेपर्यंत मुंबईला यायचा वेडेपणा अजिबात करायचा नाहीस. तु माझी काळजी अजिबात करू नकोस मी सेफ आहे. तु तुझी काळजी घे आणि मी सांगितलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेव. तुझ्या बाबाच नाव खराब होई अस कधीच वागु नकोस. "

शौर्य : "विर आहे बरा??"

अनिता : "हम्मम.. तुझ्याबद्दल विचारत असतो तो.. बट तो कसा आहे हे आपण नाही सांगु शकत.. शक्यतो त्याच्याशी बोलणं टाळ तु.. तो त्या सुरजचा मुलगा आहे हे विसरू नकोस.."

शौर्य काहीही न बोलता शांत बसुन असतो..

थोडी एकमेकांची विचारपुस करत.. एकमेकांना बाय करत दोघही फोन ठेवुन देतात.. दोघांनाही फोन ठेवताना रडु येत.. शौर्य लॅपटॉप बंद करून रडु लागतो. तोच शौर्यचा डॉर उघडून राज आणि टॉनी आत येतात.

टॉनी : "हा बघ मस्त झोपलाय आणि आपण उगाच ह्याची वाट बघत बसलोय."

राज : "शौर्य भुक लागलीय यार चलना ब्रेकफास्ट करून येऊयात."

शौर्य पटकन डोळे पुसून उठतो..

टॉनी : "काय झालं?? रडतोयस का??".

"ते थोडं डोकं दुखतंय.. आपण निघुयात.. मला पण भुक लागली.. आणि रोहन कुठेय??"विषय वाढु नये म्हणुन शौर्यने विषय बदलला.

टॉनी : "तो आणि वृषभ खाली आहेत तुझी वाट बघत."

शौर्य सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करायला निघुन जातो. संपूर्ण दिवस त्याचा मॉलमध्ये फिरण्यात, शॉपिंग करण्यात निघुन जातो. पण जशी रात्र होते तस तो त्याच्या मम्माने सांगितलेल्या गोष्टींचा खोलवर जाऊन विचार करू लागतो..

त्याला आठवत की एकदा पावसाने भरपुर जोर धरला होता. लेक्चर संपवुन तो आणि त्याचा मित्र नैतिक दोघेही शौर्यच्या बाईकवरून घरी परतत होते. बाईक स्लिप होऊ नये म्हणून तो हळु हळु बाईक चालवत होता. तोच एक भरधाव ट्रक मागुन येत एक जोराशी धडक त्याच्या बाईकला दिली.. शौर्यच बाईक वरच कॉन्ट्रोल सुटलं तशी बाईक स्लिप होऊन रस्त्याच्या आडोश्याला जाऊन आदळली. शौर्यने वेळीच स्वतःला सावरल्याने शौर्यच्या हाताला तर त्याच्या मित्राच्या पायाला थोडं फार खरचटते. मम्माला कळल्यावर ती आपल्यालाच ओरडेल ह्या भीतीने तो त्याच्या मम्माला काही सांगत नाही. पण त्या वेळेला जर वेळीच त्याने सावरलं नसत तर कदाचित खुप हानी झाली असती. शौर्यला येऊन जाऊन त्याच्या मम्माचीच काळजी वाटत होती पण तितकीच त्याला खात्री देखील होती की ती हे प्रकरण अगदी लाईटली का होईना हँडल करू शकते पण कस?? तो ह्या गोष्टीचा विचार करू लागतो..

समीराला मात्र शौर्यचा चेहरा आठवत असतो. आपण एवढं नको बोलायलव हवं होतं त्याला.. ती बाजुच्या बेडवर झोपलेल्या सीमाला आवाज देतच विचारते..

समीरा : "सीमाsss.."

सीमा : "हम्मम्म.."

समीरा : "मी थोड जास्तच रिएक्ट झाले का ग?? नाही म्हणजे मला अस वाटत की शौर्यला एवढं बोलायला नको होतं ग. पण तो जे वागला ते नाही पटलं मला.."

सीमा : "हम्मम्म.."

समीरा : "नुसतं हम्मम काय ग मी काही तरी विचारतेय तुला.."

सीमा : "हम्मम्म्म.."

समीरा उठुन सीमाच्या बेडवर जात तिला जबरदस्ती उठवते..

सीमा : "ए काय ग समीरा.. उद्या बोलूयात ना.. दिड वाजुन गेलाय.."

समीरा : "पहिलं तु मला सांग.."

सीमा : "हो तु जास्त रिएक्ट झालीस आणि नेहमीच जास्तच रिएक्ट होतेस.. त्याची लाईफ तो दारू पियेल, जुगार खेळेल किंवा काहीही करेल आपल्याला काय करायचंय.."

समीरा : "पण मला नाही ना ग आवडत हे सगळं..त्याला कळायला हवं.."

सीमा : "अग पण त्याला आवडत असेल तर.. एक मिनिट तु प्रेमात वैगेरे पडलीस का काय त्याच्या?"

समीरा : "प्रेमात आणि मी.. त ते तेही त्याच्या..हम्मम.. दिड वाजलाय झोप आणि मला ही झोपू दे.."

समीरा अडखळतच बोलत स्वतःच्या बेडवर जाऊन सीमापासुन आपली नजर लपवत डोळे बंद करत झोपली..

सीमा : "कुछ तो गडबड हे दया..."

सीमा चिडवतच समीराला बोलली..

समीरा : "हो आहे ना गडबड पण माझ्यात नाही तुझ्या डोक्यात. झोपू दे मला दीड वाजलाय.. लाईट बंद करा ती"

सीमा : "हे बर आहे.. एक तर मला झोपेतून उठवलंस आणि आता स्वतःला झोप आली.."

सीमा लाईट बंद करून झोपते.. समीरा मात्र रात्रभर शौर्यच्या विचारात पुन्हा हरवुन जाते.. आणि विचारांच्या चक्रव्यूहात झोपुन जाते..

★★★★★

नेहमीप्रमाणे कॉलेज गेटजवळ सगळे जमतात.

सीमा, मनवी दिसताच शौर्य सीमाला समीराबद्दल विचारतो.

सीमा : "ती येतेय पाठून."

वृषभ : "आपण जाऊयात आत.."

शौर्य : "तुम्ही व्हा पुढे मला एक फोन करायचाय मी येतोच फोन करून."

राज : "मी थांबतो तुझ्यासोबत."

शौर्य : "कश्याला राज अजुन प्रॉब्लेममध्ये मला टाकतोयस.. तु जा ना आत."

"ए राज त्याला पर्सनल फोन करायचाय तुझं काय मध्ये मध्ये." अस बोलत वृषभ राजला जबरदस्ती आत घेऊन जातो.

शौर्य घड्याळात बघतो. दहा मिनिटं शिल्लक असतात पण समीराचा अजून काही पत्ता नसतो.. तोच पावसाची एक झुळूक येऊ लागते आणि हळुहळु येणारी झुळूक वाढु लागते. शौर्य पत्र्याच्या आड उभं राहुन पावसाच्या थेंबाना हातावर झेलत रहातो. तोच लांबून पावसापासून स्वतःला कसबस वाचवत येणारी समीरा त्याला दिसते. बघताच क्षणी त्याच्या हृदयात गाणं वाजु लागत..

¶¶कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात
कधी तू... कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात
कधी तू...¶¶

जस जशी समीरा जवळ येऊ लागली तस तशी शौर्यची हृदयाची धडधड जणु वाढु लागली. समीराच शौर्यकडे लक्षच नसत.

शौर्य : "गुड मॉर्निंग समीरा.."

"गुड मॉर्sssss"समीरा अर्ध्यावरच थांबते. मागे वळुन बघते तर शौर्य..

पुन्हा एक राग नजरेनेच त्याला दाखवत ती तिथुन जाऊ लागते.

शौर्य : "समीरा प्लिज एकदा माझं ऐकुन घे न. समीरा जर तु माझ्याशी बोलली नाहीस तर मी लेक्चरला बसणार नाही.. इथे पावसात भिजत राहील. "


(हा खरच लेक्चरला बसला नाही तर??आणि बोलतो तस भिजणार तर नाही ना.?? समीरा मनात भरपुर विचार करू लागली)

समीरा : "ओके.."

शौर्य : "तुला नाहीच बोलायचं ना माझ्याशी मग ठिक आहे.." शौर्य तिथुन निघून जातो..

समीरा क्लासरुमध्ये येऊन बसते..

रोहन : "ए समीरा, शौर्य बाहेर दिसला का तुला?"


समीरा : "होsss."

वृषभ : "मग कुठेय??"

समीरा : "येईल पाठून.."

(नक्की येईल का हा की खरच पावसात भिजेल?? समीरा मनात भरपुर विचार करू लागते. लेक्चर बुडवणाऱ्यातला शौर्य नाही.. बरोबर येईल)

बेल सुद्धा वाजली.. सर येऊन समोर उभे राहिल.. पण शौर्य काही क्लासरुमध्ये आला नाही.. समीराच्या हृदयाची धडधड मात्र आता वाढु लागली..

वृषभ : "ए समीरा आहे कुठे तो??"

समीराला आता काय बोलावं ते कळत नाही.. ती क्लासरूमच्या दरवाजाकडे बघते पण पण तो आता येईल असं काही वाटत नव्हतं..

समीराला आता काय करावं ते सुचत नव्हतं..

(पुढे काय?? उत्कंठा तशीच राहु दे. भेटूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.)


क्रमशः

©भावना विनेश भुतल