मामा आणि मामी अगदी सहजपणे घरातुन निघुन गेले. त्यांना आजीची काळजी नव्हती की स्वतःच्या भविष्याची चिंता नव्हती. दिवसामागुन दिवस जात होते. आजीची तब्बेत ढासळत चालली होती. पण ती तब्बेतीकडे दुर्लक्ष्य करत होती. आमचे तिघेंचेही व्यवस्थित सुरु होते. ताई गजरे विकायला मला सोबत न्यायची आणि माई शाळेत जायची. माईने आज शाळेत खुप दिवसांनी आनंद साजरा केला. बाईंनी वर्गात शिकवत असताना प्रश्न विचारले , काही मुलांना उत्तरच येत नव्हते तर काही मुलं उत्तर देण्याची हिंमतच करत नव्हते. माई मात्र नेहमी उत्सुकच असायची. बाईंनी काही वेळाने विचारले, मुलांनो सांगा पाहु... चार मुख्य दिशा कोणत्या आहेत???बाई मी...बाई मी.. सांगु उत्तर..
अगं बाळा..प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुच देणार का?.?
बाई हा शेवटचा..
ठिक आहे.. सांग बरं..
उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत.
अरेव्वा... खुप छान.. टाळ्या वाजवा सर्वांनी हिच्यासाठी..
सर्वांनी माईसाठी टाळ्या वाजवल्या पण तिला खूप आनंद झाला. शाळा सुटल्यानंतर माई थेट गावात ताई आणि माझ्या कडेच आली. आजुबाजुला न बघताच तीने नाचायला सुरुवात केली. अगं.. अगं.. "माई काय आहे हे??? भर रस्त्यात काय वेड्यासारखी नाचतेस???"
"गप्प गं ताई तु.."
"चिऊ ये नाच तु पण मी आज खुप खुश आहे..."
मी पण ऊठुन माईसोबत नाचायला लागली..
रस्त्यावरुन येणारी जाणारी लोकं आमच्याकडे बघुन हसत होती..
"ये गप्प गं माई बस ईथे, सांग मला काय झालं तर इतकी माधुरी दिक्षित होऊन नाचतेस.."
माई खाली बसत.. "अगं.. ताई आता तु बघच तुझी बहिण आता खुप मोठी होणार, खुप शिकणार.. "
"तु ..सांग तर आधी मग मोठी व्हायचं बघु.."
"मी आज वर्गात बाईंनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचुक उत्तरं दिली, बाई पण माझ्यावर खुप खुश आहेत."
"अरेव्वा शाब्बास..माई खरंच तु खुप मोठी हो तुला काय बनायचं आहे सांग मी बनवेल तुला.."
"ताई ..मी ना...??मी .. टीचर बनणार आणी माझ्या शाळेतल्या बाईंसारखं मुलांना शिकवणार, मुलांसोबत गप्पा गोष्टी करणार."
"म्हणजे तु आम्हांला पण शिकवणार.. चालेल मग असं असेल तर मला तु शिकवायचं.. तुझी ताई आडाणी नाही राहणार मग.. "
"हो शिकवेल ना..." (माई हसुन बोलली)
ताई मला भुक लागले चल ना घरी..
"हो गं चिऊ .. आज आपण वडापाव खाऊ चल मी देते वडापाव आज तुम्हांला.. आपली माई शिक्षक होणार ना म्हणुन.."
(ताई हसत हसत माईला चिडवत होती..)
आम्ही तिघी चालत चालत गावा समोरच्या एका टपरीवर गेलो...
"दादा दोन वडापाव द्या..."
"हो बाळा देतो .."
"ताई तुलापण घे नाहीतर चल घरी.."
"अगं चिऊ मला भुक नाही..."
"बघ तु पण खायचं नाहीतर आम्हांला पण नको.. हो ना माई.."
"हो चला घरी.."
"अगं, मुलींनो काय चाललंय..."???
"तु पण घे मग गप्प बसु.."
"दादा तीन वडापाव द्या.."
"बस्स खुश आता.."
"हो खुप खुश. "
आम्ही वडापाव खाल्लानंतर घरी निघालो, घरी मामा मामी नसल्यामुळे आणि आजीची तब्बेत ठिक नसल्यामुळे घरी लवकर जावं लागलं..
घरी पोहचल्यानंतर बघतोय तर.. दरवाजा कुलुप होता.. आम्ही इकडे तिकडे बघत होतो पण आजी कुठेच दिसत नव्हती. ताई आणि आम्ही शेजारच्यांकडे चौकशी केली पण त्यांनी देखील आजीला बघितले नव्हते. सात वाजुन गेले तरी आजी नाही आली..
"ताई, आजी आज लवकर येणार होती ना गं .?"
"हो गं.. माई, तब्बेत ठिक नव्हती म्हणुन ती सकाळीच मला म्हणाली मी आज लवकर येईल आणि आराम करेल.."
"चल ताई लवकर आपणाजीला शोधायला जाऊ.. "
"चिऊ, तु थांब ईथे शेजारच्या काकुंकडे..."
"नाही ...मी पण येणार, आजीला शोधायला..."
"असुदे गं माई..चला लवकर पायाखाली बघुन चाला,...मी आजी जिथे कामाला जाते त्या काकुंना विचारते, तुम्ही त्या गल्लीत विचारा.. माई त्या गल्लीत विचारण्यासाठी पुढे गेली मी जाणार तोच मला शेजारी जाणा-या रस्त्यावर आजी खाली पडलेली दिसली...
"माई ..माई ..इकडे ये.. आजी बघ ये ना इथे कशी पडले..."
चिऊ, थांब तु आली मी..
मी आणी चिऊ नी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला आजी उठतच नव्हती. आजीला ताप आला होता.. आजीचे अंग प्रचंड तापले होते.. चिऊ तु थांब इथे मी ताईला बोलावते...
माई ने जाऊन ताईला बोलावुन आणले..
आजी ..आजी.. ऊठ ना.. आजी ला हात लावुन बघितल्यानंतर ताई रडायलाच लागली.. आजी ऊठ गं..असं म्हणत ताई रडत होती.
तेवढ्यात आजी कामाला जाते त्या काकु आम्हांला बघुन आल्या आणि त्यांनी आम्हांला आजीला उचलायला मदत केली. त्यांनी त्यांच्या घरात आजीला झोपवले, आजीच्या चेह-यावर पाणी शिंपडले पण आजी काही शुध्दीवर येईना..
काकु तुम्ही आम्हांला एक ॲम्ब्युलन्स बोलवुन द्या, आम्ही आजीला दवाखान्यात नेतो..
"अगं, ताई तुम्ही तिघीच कशा जाणार?? मी येते चला.."
नको काकु तुमची पण घरात गरज आहे..
काकुंनी ॲम्ब्युलन्स बोलवली आम्ही आजीला घेऊन त्या गाडीत बसलो. पण मला आणि माईला भिती वाटियला लागली होती...
रात्री नऊ वाजले होते आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.
ये पोरींनो नका घाबरु आपण करु काहीतरी,..
"माई, एक काम कर.. आजीचा फोन आहे बघ पिशवीत त्यावरुन मामाला फोन कर आणि सांग आजीला घेऊन आम्ही तालुक्याच्या दवाखान्यात आलो आहोत."
हो करते...
हॅलो.. मामा मी माई बोलते.. हा बोल गं...
मामा आजी खुप आजारी आहे, डोळे पण ऊघडत नाही आम्ही तालुक्याच्या दवाखान्यात आलो आहोत आजीला घेऊन, तु पण ये ना....
तुमची आजी आहे तुम्हांला ती सांभाळते ना तुम्ही तुमचं बघा मला सांगु नका.. असं म्हणत मामाने फोन ठेवुन दिला.
आम्ही दवाखान्याच्या जवळ पोहचलो. ॲम्ब्युलन्सवाले काका इम्हांला तिघींनाच बघुन प्रश्नात पडले..
काय गं पोरीनो..?? तुम्हीच आहात का??? तुमच्यासोबत कोणी नाही का?? ताई ने मान हालवली...
त्या काकांनी दोघांना आवाज देऊन आजीला गाडीतुन खाली उतरवले,... "चला गं, पोरींनो मी येतो सोबत.."
काका चांगले होते आणि आम्हांला सोबत हवी होती म्हणुन आम्ही काहीच बोललो नाही.
डॉक्टर काका बघा ना,.. माझ्या आजीला काय झालं चेक करा ना.. माई रडत रडत डॉक्टर काकांना बोलत होती..
"पोरींनो तुम्ही शांत व्हा गं..डॉक्टर सांगतील तसं करु..."
डॉक्टर काकांनी चेक केल्यानंतर ... "आजींची तब्बेत खुप खराब आहे. काही सांगता येत नाही. ताप भरपुर आहे मी इंजेक्शन देतो तुम्ही समोरच्या मेडीकल मधुन गोळ्या घेऊन या बघु मग काय करायचं.."
हो.. काका मी आणते..
ताई धावतच मेडीकल मध्ये गेली, पाऊस काही बेहेर थांबला नव्हता.. ती बाहेरुन गोळ्या घेऊन आली तर पुर्ण भिजली होती. तीने त्याच गोळ्या डॉक्टरांकडे दिल्या.. डॉक्टर गोळ्या घेऊन आत गेले आणि लवकर बाहेर आलेच नाहीत. आमच्यासोबत ते काका थांबले होते. ते आमची काळजी घेत होते पण आता आम्हांला आमच्या आजीची जास्त गरज होती. तिला अशी बघवत नव्हती आम्हांला. तिला अशा अवस्थेत बघितल्या पासुन ताई तर व्यवस्थित बोलतही नव्हती.
रात्रीचे दोन वाजत आले तरी डॉक्टर आम्हांला काहीच सांगत नव्हते.. ताईने मला झोपायला सांगितले पण मला ताईची अवस्था बघुन झोप नव्हती येत. ताई खाली लादीवर एका कोप-यात रडत बसली होती. आजी आमच्यासाठी आई वडिल सर्वच होती. तिच्यामुळेच आमचं आयुष्य व्यवस्थित आणि आज तिला काही झालं तर आम्ही तिघी या वयात काय करणार..???
ताई देखील वयाने अकरा वर्षांचीच होती.. पण ती आमच्यासाठी नक्कीच काहीतरी करेल.. पण आजीशिवाय आम्ही कशा राहणार??? सतत काहीतरी मनात सुरुच होते... काय करु सुचत नव्हतं ताई आणि माई दोघी न थांबता रडत होत्या. तेवढ्यात आतुन एक सिस्टर बाहेर आली ताईने आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तीने ऐकुनही न ऐकल्यासारखे केले आणि पुढे निघुन गेली.. तिच्या मागुन डॉक्टर आले आणि ताईला हात लावुन बाळा तुमची आजी नाही राहिली आता....