"ऋचा११"
कर्दमेनप्रजाभूता
मयिसम्भवकर्दम | श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ||११||>
(लक्ष्मी)
प्रजा:प्रजापती,पुत्रवती,भुता:-झाली,प्रजा या शब्दाचा अर्थ अपत्य असा आहे.कर्दम हा
लक्ष्मीचा पुत्र आहे.
व
हा पुत्र तिचा अत्यंत प्रिय आहे.म्हणून
हे
कर्दम!हे श्री पुत्रा, कर्दमा!तू मायि:-
माझ्या
घरी,संभव:-राहा.केवळ तूच राहा
असे
नव्हे तर, पद्ममालिनीम :-कमल
पुष्पांची
माला धारण करणाऱ्या जगज्जननी आदिमाता अशा तुझ्या,
मातरम:-आईलाही,मे
माझ्या,कुले:-वंशात,वासय:-निवास करण्यास सांग.
तुझ्या
आईचे वास्तव्य माझ्या वंशात सदैव राहो असे कर.तूच माझ्या इथे राहिलास की,तुझी आई आपोआपच
माझे घरी येईल."माझे घराण्यात कायमचे वास्तव्य करण्यास तू जर सांगितलंस तर तुझ्यावरील
प्रितीने ती
जगन्माता
माझ्या कुलात सैदैव राहिहा आशय.
केवळ
लक्ष्मी नव्हे तर लक्ष्मी पुत्रही आपल्या कुलांत निरंतर राहावा ही इच्छा
मोठी
मार्मिक आहे.
केवळ
ऐश्वर्य असले आणि त्या ऐश्वर्याचा
उपभोग
घेणारा परिवार नसेल तर तर त्या ऐश्वर्याचा काय उपयोग?
कित्येक
माणसांच्या घरी गडगंज संपत्ती
असते
पण त्याचा उपभोग घेणारा परिवार मुळीच नसतो.आशा माणसांना
संपत्ती
असूनही संपत्तीचा आनंद कसा
वाटणार.?म्हणून
संपत्ती बरोबर तिचे योग्य असे विणतर व्हावयास हवे.ज्या
घरात
ऐश्वर्य आहे पण उचित वितरण नाही त्या घरात ऐश्वर्य असूनही ऐश्वर्याची
कळा
दिसत नाही.
या
साठीच भारतीय ऋषी मुनींनी धनार्जना बरोबरच धनवितरणाचाही संदेश दिला आहे.
" आधायुरिन्द्रियारमो मोघं पार्थ स जिवति"
केवळ स्वात:च उपभोग घेणाऱ्या व्यक्तींची अशी निंदा केली
आहे.
संपत्तीविषयक धारणा ही त्यागावरच अधिष्ठित आहे.
"श्रीसूक्त"
"ऋचा १२"
आपः
सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे | नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ||१२||>
अर्थ:--आप-,जल,जलाभिमानी
देवता असा या ठिकाणी अभिप्रेत अर्थ आहे.
हे
जलदेवतांनो,तुमच्या कडून नेहमी
स्निग्ध,स्नेहयुक्त
अशीच कार्ये, सृजन्तु--
निर्माण
होवोत.तुम्ही नेहमी स्नेहयुक्त अशीच कार्ये करा असा आशय.
हे
चिक्लीत! हाही कर्दमाप्रमाणेच लक्ष्मीचा आणखी एक पुत्र आहे.हे
चीक्लीत
नावाच्या श्री पुत्रा, मे-माझ्या
गृही-घरी,वस
च- राहा आणि मातरम,
श्रीयम--तुझी
माता लक्ष्मी हिला,
मे
कुले:-माझ्या कुलांत, निवासय:-राहण्यास सांग.कर्दम,तू आणि लक्ष्मी
ही
सर्व माझ्या घरी निरंतर राहोत.हा
आशय.
जलांना
उद्देशून या मंत्रात प्रार्थना केली आहे,मोठी रहस्य पूर्ण आहे.
पाणी
ज्या विशिष्ट शक्ती मूळे निर्माण होते ती शक्तीच जलाची अधिष्टात्री देवता मानली आहे.
या शक्तींना परमाणु
शक्ती
असे म्हणतात.या परमाणुशक्तीवर
एकदा
का प्रभुत्व प्राप्त झाले की,या
शक्तीचे
जे कार्य ते स्वतःला अनुकूल
करून
घेता येते. श्रीमदभागावतात समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निर्माण झाली त्यात ही लक्ष्मी"सागरोद्भवा"
असे सांगितले आहे.खुद्द लक्ष्मीचीच उत्पत्ती
पाण्यातून
झाली असल्यामुळे या मंत्रात
जलशक्तींना
उद्देशून प्रार्थना केली आहे.
म्हणून
या आद्यशक्तीला, जलशक्तीला
या
मंत्रात आवाहन करून तिला आपल्या कुलात सैदैव राहण्याबद्दल तिचा पुत्र चिक्लीत याला
प्रार्थना केली आहे.
"श्रीसूक्त"
"ऋचा १३"
आर्द्रां
पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् | चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म
आवह ||१३||>
अर्थ:--हे
अग्ने, तू, मे-माझ्या गृहे -घरी
आद्राम-जिच्या
शरीरातून एकप्रकारचा
स्निग्ध
व आल्हाददायक गंध दरवळतो आहे आशा,किंवा जिचे शरीर अभिषेक
जलाने
आर्द्र झाले आहे अशा.
पुष्करिणीम-गजशुंडेणे
जिच्यावर सतत
जलाभिषेक
होत आहे अशा.पुष्कर शब्दाचा अर्थ गजशुंडाग्र,हत्तीची सोंड
असा
आहे.पुष्टीम-शक्तीशालिनी अशा,आणि पिङ्गलाम-पिङ्गट वर्णाच्या
पद्मामालिनीम:-कामलमाला
धारण
करणाऱ्या
चंद्राम:-चंद्राप्रमाणे आल्हाददायक असणाऱ्या, हिरण्मयीम-सुवर्णमय असणारी अशी जी लक्ष्मी
त्या
लक्ष्मीम-लक्ष्मीला
आवह-बोलाव
गजशुंडेने
जिच्यावर अभिषेक होत आहे अशा,लक्ष्मीला बोलवण्याबद्दल अग्नीला
उद्देशून
प्रार्थना केली आहे.
तेंव्हा
लक्ष्मी आणि गजांत लक्ष्मी यांचा
परस्पर
संबंध लक्षात घेता,अशी लक्ष्मी
माझ्या
घरी येउदे की जिच्यामुळे गजांत
लक्ष्मीचे
वैभव मला अक्षय प्राप्त होईल
असा
सूचक आशय या मंत्रात सांगितला
आहे.
गजांत
लक्ष्मी ज्याला प्राप्त होईल त्याच्या पायाशी ऋद्धि--सिद्धी सदैव लोळण घेत असतात.कौपिनधारी
योगी
याच
गजांत लक्ष्मीचा आधारावर त्रैलोक्यातील ऐश्वर्याला तृणासमान लेखू
शकतो.
दिवाधिदेव
शङ्कराचे ऐश्वर्य हे गजांत
लक्ष्मीचेच
आहे म्हणून सर्व देवांचा
महादेव
या
मंत्रात याच विश्वाभिलषित लक्ष्मीला
ऋषीने
आवाहन केले आहे.
"श्रीसूक्त"
"ऋचा
१४"
आर्द्रां
यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् | सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह
||१४||>
अर्थ:--हे
अग्ने,त्वम-तू,मे-माझ्या,गृहे-घरी
आर्द्राम-पूर्वी
सांगितल्या प्रमाणे अभिषेक जलाने आर्द्र किंवा अपार करुणेने जिचे हृदय आर्द्र म्हणजे
द्राविभूत झाले आहे अशा,य:करिणीम:-
जिच्या
हातात सदैव धर्मदंड आहे अशा
आणि
यष्टीम-दंडस्वरूप असलेल्या,
सुवर्णाम-सोन्याप्रमाणे
जिची कांती आहे अशा,हेममालिनीम--सुवर्णपुष्पांची माला धारण करणाऱ्या
सुर्याम:-सुर्याप्रमाणे
चराचराला प्रकाश
पुरविणाऱ्या
आशा,लक्ष्मीम म्हणजे
लक्ष्मीला
आवह- बोलाव.
या
मंत्रात लक्ष्मी ही दंडधारीणी आहे असे ऋषी सांगत आहेत,ऐश्वर्याबरोबरच त्या ऐश्वर्याचे
नियंत्रण करण्याची जर संयमशक्ति नसेल तर ते ऐश्वर्य घातक
ठरेल.ती
आसुरी संपत्ती मानावी लागेल.
म्हणून
यष्टीम शब्दाने संकेत केला आहे.
ऐश्वर्याला
दैवी गुणांचे तेजोवलाय प्राप्त
होत
असते.अशी दैवी गुणांनी चराचराला
संतृप्त
करणारी भाग्यलक्ष्मी,माझ्या कडे
यावी,माझ्या
वंशात अक्षय राहावी असा
महत्वपूर्ण
आशय या मंत्रात प्रकट झाला
आहे.
,
"श्रीसुक्त"
"ऋचा"
१५"
यः
शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् | सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत्
||१६||
अर्थ:--य:जो,श्रीकाम:
संपत्तीची इच्छा करणारा असेल,स:तो शुचि--शरीराची स्नानादि मार्गानी स्वच्छता करून,स्वच्छ
होऊन,प्रयत:-मन
स्वच्छ ठेऊन,स्थिर करून, भुत्वा:-वर सांगितल्या प्रमाणे,शरीर व मन यांची शुचिता संपादन
करून,अन्वहम:-दररोज,आज्यम:-धृत,तूप ते जुहूयात:-
हवन
करावे,तुपाचा आहुती द्याव्यात,(अर्थातच आज्याहुती द्याव्यात हे सांगितल्यामुळे वैश्वदेव
विधीने अग्नी संस्कार करून त्यांच्या आहुती द्याव्यात
हे
ओघानेच सिद्ध झाले) तसेच पंचदशर्रच च:-पंधरा ऋचा असणारे हे
श्रीसूक्त,सततम--निरंतर,जपत:--जप
करावा (श्री सुक्ताचा सतत रोज जप करावा आणि प्रत्येक दिवशी श्रीसूक्तानेच आज्याहुति
देऊन हवन करावे,जर संपत्तीची इच्छा असेल तर, असा आशय)
श्रीसुक्तात
जी भौतिक ऐश्वर्याची प्रार्थना
केली
आहे त्याचा संबंध मनाशी आहे म्हणून या मंत्रात'शुचि:'आणि 'प्रयत:' या
दोन
पदांनी रहस्य विशद केले आहे.
पंधरा
ऋचा असणाऱ्या या श्रीसूक्ताचा सतत जप करावा हे सांगून द्रव्ययज्ञाबरोबर जपयज्ञहि व्हावयास
हवा हे सांगितले आहे.फल प्राप्ती कर्त्याच्या मनोभूमीवर अवलंबून आहे म्हणून ज्या प्रमाणात
उपसकाची मनोभूमी विशुद्ध होईल,त्या प्रमाणात त्याला फळ मिळेलच.
"तस्मान्मंत्रं जपेद्योगी यत:शुद्धेन्द्रियक्रिय:।
या ठिकाणी श्रीसूक्त समाप्त झाले.