Sri Sukta - 2 - Richa ६ te 10 in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | श्री सुक्त - 2 - ऋचा ६ ते 10

Featured Books
Categories
Share

श्री सुक्त - 2 - ऋचा ६ ते 10

"श्रीसूक्त"

"ऋचा ६"

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्वः | तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ||६||

अर्थ:--हे आदित्यर्णे,बालसुर्याप्रमाणे किंचिदारक्त वर्ण आहे जिचा,जिचे मुखमण्डल अरुण वर्णाने शोभत आहे अशा, हे लक्ष्मी! तव-तुझ्या ,तापसोधिजात:-तुझ्या उग्र तापश्चर्येमुळेच,बिल्बवृक्ष नावाची वनस्पती निर्माण झाली,बिल्ब वृक्षाला वनस्पती असे म्हंटले कारण हा केवळ फळे देणारा वृक्ष आहे म्हणून निव्वळ फळे देणाऱ्या वृक्षाला वनस्पती ही संज्ञा आहे"अपुष्पा:फलवंतो ये ते वनस्पतय:

स्मृता"तास्य म्हणजे त्या बिल्ब वृक्षाची

फलानी,परिपक्व फले,आंतरा:बाह्या म्हणजे अंतर आणि बाह्य आशा उभय विध इंद्रिया कडून घडून येणारे,अज्ञान कार्य आणि पातके (दारिद्र) नुदान्तु -तुझ्या कृपेने नाहीसे होवोत.

शंकराच्या आराधानेसाठी विष्णूला ज्या

वेळी बिल्बदळे कमी पडू लागली त्या वेळी लक्ष्मीने तप:प्रभावाने बिल्ब वृक्ष निर्माण करून,बिल्ब दळे उपलब्ध करून दिली.बिल्ब वृक्षाला "श्रीवृक्ष'असे म्हणतात.बिल्ब वृक्षाची फळे लक्ष्मीला अतिप्रिय आहेत बिल्ब फलाला "लक्ष्मीफल" असे म्हणतासत.

त्वाम-वृणे--मी तुला सदैव शरणभावणे

जवळ केले आहे.

सर्वव्यापीनी लक्ष्मीचे स्वरूप या मंत्रात आले आहे."देवजुष्टाम"हे विशेषण अर्थपूर्ण आहे-देवांनी स्वीकारली जावी

अशी संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती.या दैवी

संपत्तीमुळेच वनवासी पांडवांना साक्षात

भगवंताचा पाठिंबा मिळाला.अशी ही

दैवी गुणांची संपत्ती आपल्यामध्ये यावी,

म्हणून या मंत्रात प्रार्थना केली आहे.

"श्रीसूक्त"

"ऋचा ७"

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह | प्रादुर्भूतोSस्मिन कीर्तिमृद्धिं ददातु मे ||७||

अर्थ:--हे लक्ष्मी,देवसख:कुबेर,देव म्हणजे महादेव,त्याचा सखा,मित्र,महादेवाचा मित्र म्हणून कुबेराची प्रसिद्धी आहे,हा कुबेर कीर्ती आणि यश,तसेच मणी म्हणजे चिंतामणी

किंवा माणिभद्र नावाचा कुबेराचा कोषाध्यक्ष,यासह मला प्राप्त होवो हा आशय.

हे लक्ष्मी,अहम-मीअस्मिन राष्ट्रे-या भारत

राष्ट्रात,प्रदूर्भूत,अस्मि म्हणजे जन्म घेतला आहे, म्हणून तो देव सखा कुबेर मला,उदंड कीर्ती ,दिगंत यश,कोष म्हणजे धनाचा अक्षय साठा आणि ऋद्धिम म्हणजे सर्व भाग्यसमृद्धि मला

तुझ्या कृपेने देवो.

या मंत्रात मणी शब्दाने चिंतामणीचा उल्लेख केला आहे ती याच साठी की,

चिंतामणी दुसरा तिसरा कोणी नसून आपले मन हाच चिंतामणी आहे.चिंतिलेले पूर्ण करण्याचे साम्यर्थ मनाला येणे म्हणजे मनाची शक्ती वाढणे,असे शक्तीसंपन हाच खरोखर

चिंतामणी.चिंतन करण्याचा धर्म हा जसा मनाचा तसाच तो कृतीत आणण्याचाही धर्म मानाचाच.म्हणून हे 'लक्ष्मी,तू माझे मन दैवी शक्तीने संपन्न

कर 'असे या मंत्रात देवीला आवाहन

केले आहे.

"श्रीसूक्त"

"ऋचा ८"

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् | अभूतिमसमृद्धिं च सर्वांनिर्णुद मे गृहात् ||८||

अर्थ:- क्षुत म्हणजे क्षुधा,भूक आणि पिपासा म्हणजे तृषा (तहान) भूक आणि तहान यांनी मालाम,मालिन दिसणारी कृश,अशक्त एक प्रकारची अवकळा प्राप्त झालेली, ज्येष्टाम म्हणजे

अगोदर निर्माण झाल्यामुळे वडील असलेली.(क्षिरोदधितून लक्ष्मी उत्पन्न होण्यापूर्वी अगोदर निर्माण झाली म्हणून

हिला ज्येष्ठा म्हंटलेले आहे) अलक्ष्मीम- म्हणजे दारिद्रता, अहम - मी,नाशयामी म्हणजे नाहीशी करतो,दारिद्र्याच्या मी

स्वतः नाश करतो,हे लक्ष्मी तू फक्त मे-माझ्या,गृहात-घरातून,अभूतीम म्हणजे सर्व प्रकारची अवकळा,औदासीन्य आणि निरुत्साह,असमृध्दीम म्हणजे वर

सांगितल्या प्रमाणे,औदासिन्य आणि निरुत्साह,यांच्यामुळे प्राप्त होणारी असमृद्धी,निर्णुद--नाहीसा कर,माझ्या

घरातून तू याचे उच्चाटन कर हा आशय.

संपत्ती प्रयत्न साध्य तर .दारिद्र्य हे प्रयत्ना वाचून प्राप्त होणारे, संपत्ती ही प्रयत्नानंतर येणारी दारिद्र्य हे प्रयत्ना पूर्वी,या अभिप्रायाने दारिद्रतेला लक्ष्मीची

वडील बहीण असे संबोधले आहे.

"श्रीसूक्त"

"ऋचा९"

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् | ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ||९||

अर्थ:-- गंधद्वाराम:-गंधामुळे जी ओळखली जाते,गंध हा घ्राणेंद्रियाने (नाकाने) कळतो.हा गंध प्रत्येक परमाणुत असतो,म्हणूनच"गंधवती पृथि वि" गंध हे द्वार ,चिन्ह आहे जिचे ती गंधद्वारा पृथ्वी होय.आशा पृथ्वीरूप धारण केलेल्या, दुराधर्षाम:-प्रयत्नाने जी

हिसकावून(अर्थात शत्रूंना) घेता येत नाही अशा,आणि नित्यापुष्टाम:-धन,धांन्यानी नेहमी पुष्ट,सदैव धांन्यानी

समृद्ध असणाऱ्या, करिषिणीम,शुष्क

गोमय,(वाळलेले शेण) जिकडे तिकडे

विपुल प्रमाणात आहे अशा, असंख्य पशु संपत्ती

या विशेषणाने सुचित केले

आहे,असंख्यपशु असतील तारच गोमयादी पदार्थानी

युक्त असणार हे उघडच आहे.तसेच

सर्वभूतानाम:-सर्व चराचर प्राणिमात्रांचे

ईश्वरीम-नियमन करणारी,सकल चराचरावर जिची अप्रतिहीत सत्ता आहे

अशा, ताम-त्या जगप्रसिद्ध आशा,

श्रीयम:-पृथ्वीचे रूप धारण करणाऱ्या

लक्ष्मीला,इह-माझ्या घरी,उपव्हये-बोलावतो.

पदार्थाच्या समृद्धी बरोबर भूमीचीही

विपुलता असावी हा आशय.

"श्री सुक्त"

"ऋचा 10"

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि | पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ||१०||

अर्थ:-: हे लक्ष्मी, तुझ्या कृपेने ,मनस::-माझ्या मनाचे,कामम :-मनोरथ,आकुतिम:- संकल्प,विचार,तसेच, वाच:-वाणीचे,सत्यम:-यथार्थपणा,वाणीचा खरेपणा म्हणजेच वाणीचे सत्य.

पशूनाम:-गाई वगैरे पशूंच्या,अन्नस्य:-(हे अन्न भक्ष्य,भोज्य,चोष्य,आणि लेह्य असे चार प्रकारचे आहे.)रूपम :-वर सांगितलेले अन्नाचे चतुर्विध स्वरूप,आशिमही-प्राप्त करीन(तुझ्या कृपेने मला प्राप्त होवो),श्री-संपत्ती,यश-कीर्ती ,मायि-माझ्यामध्ये,श्रयताम:-आश्रय करो (,संपत्ती आणि संपत्ती वरोबर यशही मला मिळो हा आशय)

मनाची शक्ती विलक्षण आहे,या प्रबुद्ध

मन:शक्तीची देणगी केवळ मानवालाच

विशेषत्वाने मिळाली आहे म्हणून त्याला

'मानव'ही यथार्थ संज्ञा प्राप्त झाली.

भारतीय ऋषि मुनी याच मन:शक्तीच्या

जोरावर मनाच्या पलीकडे गेले आणि

तेथून मग त्यांनी या मन:शक्तीचा बहिर्मुख प्रवाह अंतर्मुख केला,त्या मुळे

जे ज्ञान ऋषींना झाले ते किनात्याही

भौतिक विज्ञानापेक्षा अद्भुत असे होते.

विवेकाचा बंधारा घालून जर मनाचा

प्रवाह थांबवता आला तर मनाची वाया

जाणारी शक्ती सहजच केंद्रित होईल

आणि मग अशा केंद्रित मनाचे मनोरथ

सहसा वाया जात नाही हे त्यांच्या लक्षात

येऊन चुकले.