श्री
सुक्त
लक्ष्मी
प्राप्तीसाठी,
तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत असल्यास.म्हणतांना मनाची एकाग्रता होते.त्याची फलप्राप्ती होते.बऱ्याच जणांना श्री सुक्ताचा अर्थ माहीत असेल पण ज्यांना अर्थ माहीत नाही त्यांच्या करिता रोज एका ऋचाचा अर्थ देत आहे.
"श्री
सुक्त"
हिरण्यवर्णां
हरिणीं
सुवर्णरजतस्रजाम्
| चन्द्रां
हिरण्मयीं
लक्ष्मीं
जातवेदो
म आवह ||१||
अर्थ:--
हे जातवेद म्हणजे विशिष्ट संस्कारांनी आवाहित केलेल्या अग्ने,त्वम-तू,हिरण्यवर्णाम:सोन्याप्रमाणे
चमकणारे
जिचे रूप आहे,'हरिणीं या शब्दाचा अर्थ चैतन्याच्या आल्हादक प्रभेने सुवर्णाप्रमाणे एक प्रकारचा जिवंत पणा आला आहे"चैतन्याच्या रसरशीत तेजाने बाहेरची सुवर्णकांती जिची द्विगुणित झाली आहे अशा लक्ष्मीला,
सुवर्णरजतस्रजाम:-सोने,चांदी यांची
स्रक
म्हणजे
माला जिच्या कंठात शोभते
आहे
अशा,चंद्राम-चंद्राप्रमाणे जिचे तेज
आल्हाद
दायक आहे,हिरण्मयीम:,जिचे
संपूर्ण
शरीर,सुवर्णांनी घडलेले आहे.
सुवर्ण
हेही एक पार्थिव तेज आहे असे
वैज्ञानिक
मानतात.लक्ष्मीम:-म्हणजे
लक्षणवती,
ऐश्वर्याच्या
अभिजात
चिन्हांनी
सालंकृत
हिजे.
"श्री सुक्त"
"ऋचा 2"
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् | यस्यां हिरण्यं विन्देयं
गामश्वं पुरुषानहम् ||२||
अर्थ:--जातवेद! हे अग्निदेवा!ताम म्हणजे त्या पूर्वी वर्णन केलेल्या
व जगप्रसिद्ध आशा आणि अनपगिमिनीम-म्हणजे एकदा प्राप्त झाल्यावर कधीही इतरत्र न जाणारी,माझ्या
घरात एकदा प्रवेश झाल्यावर निरंतर माझ्याच घरात राहणारी,अशा लक्ष्मीला मे माझ्यासाठी,
हे अग्ने,तू आहव म्हणजे बोलाव.यस्याम-पूर्वोक्त लक्षणांनी युक्त
आशा लक्ष्मीचे आगमन झाले असता (मी)सहजतेने,हिरण्यम म्हणजे सुवर्ण,गाम-गाईंना,गाईंच्या
खिल्लारांना
अश्वम-घोडे आणि पुरुषानं म्हणजे मित्र,
हितचिंतक व जीवाला जीव देणारे एकनिष्ठ सेवक अहम-मी विन्देयम-प्राप्त
करू शकेन.
लक्ष्मी म्हणजे लक्षणवती,ही लक्षणे कोणते.
"ज्ञानैश्वर्यसुखारोग्य
धनधान्य जयादिकम
लक्ष्म यस्यास्समुद्दिष्टं सा लक्ष्मीति निगद्यते ।।
लक्ष्मीचे अस्तित्व या श्लोकात सांगितलेल्या चिन्हांनी ओळखता
येते.
"श्रीसुक्त"
"ऋचा ३
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् | श्रियं देवीमुपह्वये
श्रीर्मादेवी जुषताम् ||३||
अर्थ:- अश्वपूर्व;- पूर्व म्हणजे प्रथम आणि अश्व म्हणजे घोडे-सैन्य
होय.ज्या सैन्यात प्रथम दौडत येणारे घोडे दृष्टीस पडतात असे सैन्य,आणि रथमध्यांम-घोड्याच्या
नंतर त्या सैन्याच्या मध्यभागी
रथ चालत आहे ते रथमध्य सैन्य होय.
हस्तिनादप्रबोधिनिम:- हत्तीच्या आवाजाने जी जागी होते.हत्तींनच्या
आवाजामुळे ते सैन्य लांबून ओळखता येते.देवीम म्हणजे घोडे,रथ आणि हत्ती
यांच्यामुळे एकप्रकारचे सामर्थ्य ज्या सैन्यात निर्माण झाले
आहे अशा श्रियम म्हणजे सैन्याचे रूप धारण करणारी जी
श्री म्हणजे लक्ष्मी तिला,सैन्यारुपधारिणी
लक्ष्मीला उपव्हये-मी पाचारण करतो.मी
बोलावतो.मी बोलावलेली ही सेनेचे रूप
धारण करणारी लक्ष्मी,मा--जुषताम :-निरंतर माझाच आश्रय करो,माझ्याच
घरी तिचा निवास,सैन्याचे रूप धारण केलेल्या लक्ष्मीचे वास्तव्य निरंतर असो.
ज्या वेळी लक्ष्मी सैन्याचे रूप धारण करते त्या वेळी संपत्ती
तर मिळतेच पण
त्याच बरोबर सत्ताही प्राप्त होते.संपत्ती
बरोबर सत्ताही मला प्राप्त होवो हा
स्थूल आशय.
लक्ष्मी ही एक स्वतंत्र परंतु सर्व प्रकाशक
अशी प्रचंड शक्ती आहे,दिव्यात जशी ज्योत तशी.त्या ज्योतीमुळे
दिव्याची प्रभा जशी सर्व दूर फाकते तशीच या लक्षीमुळे सर्व भौतिक पदार्थातून एक तऱ्हेची
प्रभा फाकत असते.
"श्रीसूक्त"
"ऋचा ४"
कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्
| पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वयेश्रियम् ||४||
अर्थ:--काम म्हणजे वाणी आणि मन यांना न कळणारी.लक्ष्मी ही एक
शक्ती आहे आणि शक्ती ही नेहमीच अमूर्त किंवा अप्रकट असते असा भावार्थ.(असे असूनही ती
ज्यावेळी भक्तांसाठी प्रगट
uहोते
त्या वेळी) सोस्मिताम म्हणजे किंचित स्मित हास्याची रेखा जिच्या
मुखममंडलावर शोभते आहे अशा,नेहमी
हस्यमुख असणाऱ्या अशा, हिरण्यप्राकाराम:-जिच्या आस पास सोन्याची
तटबंदी आहे किंवा सुवर्णाप्रमाणे देदीप्यमान आकृती जिची आहे अशा,अद्राम:- क्षिरोदधीतून
लक्ष्मीचा जन्म झाल्या मूळे जी नेहमी आर्द्र जिच्या शरीरावरून पाणी निथळते आहे अशा
किंवा भक्तांविषयीच्या कारुण्यामुळे जिचे हृदय द्रवत आहे,जिचे हृदय कारुणासान्द्र आहे.लक्ष्मीचे
हृदय म्हणजे अक्षय करूणामृताचा वर्षाव
करणारा जणू वर्षाकालातील मेघ होय
असा आशय.ज्वलन्तीम:-दाहक तेजाच्या दिप्तीने शोभणाऱ्या किरणांनी
जिचे शरीर उजळून गेले आहे अशा.
तृप्ताम:-म्हणजे सदैव तृप्त किंवा प्रसन्न
असणाऱ्या, तर्पयन्तीम:-स्वतः तृप्त असून,पूर्णकाम असून जी भक्तांचेही
मनोरथ अविलंबाने तृप्त किंवा पूर्ण करते अशा, पद्मे म्हणजे कामलात
स्थिताम-नेहमी असणाऱ्या, पद्मवर्णाम्:-पद्मा प्रमाणे कंतीमती,कमालाप्रमाणे
जिचे बाह्यरुप आल्हाददायक आहे अशा,ताम श्रीयम म्हणजे त्या लक्ष्मीला
इह:-येथे माझ्या जवळ उपव्हये:-मी
बोलावतो.
"श्रीसूक्त"
"ऋचा ५"
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं
लोके देवजुष्टामुदाराम् | तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां
वृणे ||५||
अर्थ:--चंद्राम:-चंद्राप्रमाणे आल्हाददायक
असणाऱ्या व प्रभासम म्हणजे अत्यंत कांतीमती आशा.
यशासा ज्वलंतीम म्हणजे दिक्कालाल
भेदून जाणाऱ्या यशामुळे जी त्रैलोक्यात
प्रसिद्ध आहे अशा,आणि देवजुष्टाम:-इंद्रप्रमुखादी
देवांनी जिचा आश्रय केला आहे,इंद्रादी देव जिची सेवा करतात आशा,उदाराम:-अन्तर्बाह्य उदार असणाऱ्या, मनाने प्रगल्भ आणि आकृतीने लावण्यती
असणाऱ्या, पद्मिनीम,म्हणजे कामलाकार असणाऱ्या,ताम-श्रीयम-आशा या लक्ष्मीला मी विनम्रभावाने
शरण,प्रपद्ये:-
आलो.शरण भावाने तिच्या जवळ आलो, हा
आशय.त्या अर्थी मे-माझी
अलक्ष्मी-भौतिक
दारिद्रय,नाहीसे कर.