Tujhi Majhi Love Life - 1 in Marathi Love Stories by Pratiksha Agrawal books and stories PDF | तुझी माझी लव्ह लाईफ... - 1

Featured Books
Categories
Share

तुझी माझी लव्ह लाईफ... - 1



सौम्या हि खूप आदरणीय आणि प्रामाणिक मुलगी होती. ती आपल्या आईबाबांसोबत् पुण्याला वास्तव्यास् होती. ती तिच्या घरात एकुलती एक मुलगी होती.
तिला तिच्या आईबाबांनि खूप लाडाने वाढविले होते.
तरी पण ती एवढी समजूतदार होती कि, ती त्यांचा शब्द कधीच टाळत नव्हती.

तिची नेमकीच् बारावी संपली होती.आता मात्र तिला तिच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायच होत, तिला इंजिनीरिंग करायची होती.

सौम्या : "बाबा ओ बाबा" कुठे आहात तुम्ही, चला ना लवकर उशीर होतोय आपल्याला.

बाबा : अग थांब ग् आलोच बघ, बाबा चष्मा लावत लावत्
गडबडीने बाहेर येतात.

( सौम्यचि बाकी सगळी तयारी झालेली असते, आज फक्त कॉलेज मधेय प्रवेश फॉर्म भरायचा बाकी असतो.एकटी नको जाऊ ,मि पण येतो सोबत असे बाबा तिला म्हणतात म्हणून ती बाबा ना जोरजोरात हाक मारायला लागते.)

सौम्या आणि बाबा कॉलेज ला जातात, कॉलेज ला ऍडमिशन साठी थोडी जास्त गर्दी असल्यामुळे त्यांना बराच वेळ लागतो.पण ऍडमिशन झाल्यावर सौम्या आणि बाबाच् थकवा कमी होत, आणि दोघांच्या चेहऱ्यावर सुखद भाव येतो.

बाबा : चाल सौम्या आज पार्टी करूया

सौम्या : बाबा मि खूप थकले आपण असं करू का पार्सल घेऊ यात, आणि आता खूप उशीर झाला. आई वाट बघत असेल.

बाबा तिला होकार देतात. ते दोघ डिनेर साठी पार्सल घेतात आणि घरी येतात. सौम्या ची आई दारातच् उभी असते दोघांची वाट बघत.

डिनर झाल्यावर सौम्या आइबाबाना शुभ रात्री म्हणून तिच्या रूम मधेय जाते. ती तिची कॉलेज ला जायची सगळी तयारी करून ठेवते , ती तिचा आवडता नारंगी रंगाचा कुर्ता आणि त्यावर रेड सलवार आणि रेड ओढणी काढून ठेवते.
उद्या कॉलेज चा पहिला दिवस असल्यामुळे ती खूप उत्सुक असते.

आज् सौम्यचा पहिला दिवस असतो कॉलेज चा, ती पटकन तयार होते आणि खाली येते, ती तिच्या आईला हाक मारते आई ....अग येते मि मला उशीर होतोय

आई: तिची आई दहि साखर घेऊन येते, अग थांब हे घे

सौम्या : दे लवकर ती एक चमचा खाते आणि पळत सुट्ते

कॉलेज च्या gate वर पोहोचतच तीच हृदय धडधड करायला लागत.आत जाताच् तिला एक मुलगी आवाज देते ,एक्सक्युज मि .....ओ हॅलो.....
ती मागे वळून बघते

गौरी: अग हाय मि गौरी,माझं पण आज पहिला दिवस आहे कॉलेज चा, चाल आपण सोबत जाऊ आपण एकच क्लास मधेय आहोत

सौम्या : ती अवाक् होऊन तिच्याकडे बघतच राह्ते आणि तिला म्हणते तुला कस माहित

गौरी: अग मि ऍडमिशन च्या वेळेस तुझ्या मागेच् होते, तेव्हा मि ऐकलं होता ,ते सोड तुझं नाव् काय ? ते मात्र नाही ऐकलं मि

सौम्या : माझं नाव सौम्या आहे .nice to meet you 😊

दोघी कॉलेज च्या आवारतुन् जातच् असतात कि तिथे काही सिनिअर्स नवीन मुलांचि मजा घेत असता.त्यांना काहीपण टास्क देत असता ते बघून या दोघी थोडं घाबरतात,पण त्यांच लक्ष इकडे नसल्यामुळे दोघी पटकन तिथून निसटून जातात.

त्यांना त्यांचा क्लास माहित नसत ,दोघी इकडे तिकडे बघतात,बाजूला तीन मुलं उभी असतात दोघी त्यांच्याकडे जातात.

सौम्या : एक्सक्युज मि कॉम्पुटर इंजिनीरिंग क्लास कुठे आहे ?

रॉकी : सरळ जा आणि त्या बोर्ड पासून लेफ्ट घ्या.

सौम्या : थँक्स .

दोघी क्लास कडे निघून जाता.
पहिले लेकचर् चालू होणार असते, सगळे आत येतात, तेव्हा ते तिघहि आत येता
गौरी आणि सौम्या च लक्ष जात त्यांच्याकडे तेव्हा त्यांना हे त्यांचे classmate असल्याच कळतं.

लेकचर् संपल्यावर त्या दोघी त्यानच्याकदे जातात.त्यांची मैत्री होते. पहिले हाय मि रॉकी , हाय मि संकेत,आणि हाय मि राज .
सगळ्यांचं introduction संपत आणि सगळे कॅन्टीन मधेय जातात.

कॉलेज संपल्यावर सौम्या घरी पोहचते , आईबाबा कुठे आहात ?

सौम्या च आवाज ऐकून आइबाबा लगेच बाहेर येतात.आली का बाळा कसा राहीला आजचा दिवस बाबा पुढे येत सौम्या ला म्हणतात.

सौम्या : खूप छान बाबा आज माझे खूप सारे फ्रेंड्स बनले,आणि सगळ कॉलेज कॅम्पस बघणं झालं आज ,खूप छान वाटलं

बाबा : मस्तच मग चल आता तु फ्रेश होऊन ये , मग आपण बसुन् गप्पा मारू

सौम्या : हो बाबा म्हणत लगेच तिच्या रूममध्ये जाते.