रोहन : "मला अस वाटतंय ह्याला चढलीय आता.."
"तरी मी बोलत होतो नको म्हणुन.. पण तुम्ही दोघ", वृषभ राजला मारतच बोलु लागला.
टॉनी : "आज शौर्यच काही खर नाही. ह्याची लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच संपणार वाटत..ती बघ समीरापण आली.."
मनवी : "गाईज आपण डिनरला जाऊयात??मला लेट होतोय.. डॅड वाट बघत असेलरे माझी."
समीरा : "शौर्यला काय झालं?? असं रोहनने का पकडुन धरलय."
"मला.. मला कुठे काय झालं??", रोहनला लांब ढकलतच तो बोलतो
शौर्यच्या आवाजात आता वेगळाच सूर धरलेला त्यामुळे समीराला त्याने ड्रिंक घेतल्याचा अंदाज आलाच होता
समीरा : "शौर्य तु ड्रिंक घेतलीस..??"
शौर्य : "ड्रिंक तर तू पण घेतलीस.. आणि मी पण घेतली. आपण सगळ्यांनीच घेतलीना.. "
मनवी : "समीरा आय थिंक ह्याने ड्रिंक घेतलीय.."
सीमा : "मलाही तेच वाटत.."
समीरा : "तरी मी आधीच म्हटलं होतं राज तुला की दारू वैगेरे नको.."
राज : "दारू कुठेय ती वाईन होती ती.."
समीरा : "काहीही असेल ते... पण जाऊदे... तुमच्याशी बोलायलाच नको.. आणि शौर्यकडुन अशी अपेक्षा मला अजिबात नव्हती.."
तिघीही रागात तिथुन निघु लागल्या..
टॉनी त्यांची समजुत काढत त्यांच्या मागे जाऊ लागला..
टॉनी : @अरे ऐकून तर घ्या माझं.. मनवी तु तरी.. "
"एक मिनिट" कोणी ऐकत नाही म्हणुन टॉनी मोठ्यानेच ओरडला तश्या तिघी थांबल्या..
टॉनी : "अरे त्या रोहनने आपल्यासाठी हॉटेलमध्ये सीट बुक केल्या.. एक तर बुकिंग होत सुद्धा नव्हती कुठे... निदान त्याच्यासाठी तरी डिनर करून जाऊयात. आता शौर्यने ओव्हर ड्रिंक केली त्यात त्याची काय चुक ते तर सांगा.."
तिघीही एकमेकांकडे बघु लागल्या.. मनवी भुवया उडवत समीराला विचारू लागली.
"गाईज प्लिज डिनर करून जावा.. मी सीट बुक केल्यात आपल्यासाठी.. प्लिजss" रोहन धावत तिघींजवळ येऊन बोलला..
समीरा : "शौर्यच काय??"
रोहन : "त्याला आम्ही बघतो.. तुम्ही पुढे जाऊन ऑर्डर करा मी येतोच.. टॉनी तु पण जा त्यांच्यासोबत..मी बाकीच्यांना घेऊन येतो."
तिघींना त्याच म्हणणं पटत..
"जाऊयात का..?? प्लिजss.." टॉनी रिक्वेस्ट करत बोलु लागला
तश्या तिघीही त्याच्यासोबत तिथुन रेस्टोरंटला जायला निघतात..
मनवी आणि सीमा एकमेकींशी बोलत पुढे जातात. समीरा मात्र शौर्यच्याच विचारात असते.
समीरा : "टॉनी, शौर्य दारू घेतो का??"
टॉनी : "घेत असेल मला नाही माहीत आणि आता तो जे पियाला ना ती वाईन आहे ग दारू नाही.."
समीरा : "माझ्यासाठी वाईन पण दारूचं आहे.. मला अस वाटत होत की तो दारू वैगेरे पिणारा नाही.. तुम्ही लोकांनी तर नाही ना त्याला जबरदस्ती केली"
टॉनी : "एक मिनिट हा..! शौर्य स्वतःच पित होता.. मी स्वतः तिथे होतो.. आणि ते ही अजून एक पॅक, अजून एक पॅक अस करत जवळपास त्याने पाच तरी पॅक घेतले आणि त्यात काय चुक आहे त्याला आवडत असेल त्याने घेतली."
समीरा : "पण मला नाही ना आवडत.."
(टॉनी समिराकडे थोडं चकीत होऊन बघु लागला..)
"म्हणजे दारू पिणारी लोक मला नाही आवडत",समिराने पुन्हा शब्द जोडत आपली बाजु मांडली.
समीरा टॉनीच्या बोलण्याचा विचार करू लागली
चौघेही जाऊन हॉटेलमध्ये बसतात..
समीरा सोडुन सगळे मेनु कार्ड मध्ये स्टेटर्स आणि मेन कोर्स ऑर्डर करण्यात गुंतून गेले असतात. पण समीराला मात्र फुटबॉल खेळताना पावसात भिजून गेलेला शौर्य आणि त्याने फुटबॉल सोबतच जिंकलेल तीच मन सगळ्या गोष्टी आठवत होत्या. आपण आपल्या दारुड्या वडिलांसोबत राहू नाही शकत म्हणुन मुंबई सोडून इतक्या लांब राहायला आलो तर अश्या मुलासोबत राहण्याची स्वप्न नकोच. भरपूर विचार एकाच वेळेला तिच्या मनात सतावत होते..
इथे शौर्यच मात्र स्वतःवर असणार नियंत्रण सुटलं होत. संपुर्ण डोकं त्याच गरगरू लागलं होतं..पुर्ण डोक्यात दारू भिनली होती.. डोकं टेकुन तो तिथेच टेबलवर पडुन रहातो
वृषभ : "आता ह्याला हॉस्टेलवर न्यायच कस?? राज तुच आता हँडल कर.."
राज : "मी एकटा थोडीन होतो हा रोहन पण होता. हा पण तर बोलत होता की पाज म्हणुन त्याला."
रोहन : "एक काम करूयात आपण माझ्या घरी जाऊयात. तुम्ही उद्या जावा हॉस्टेलमध्ये तस पण आज घरी कोणीच नाही."
राज : "मी नाही.. माझ्या घरचे फोन करतील यार आणि ते ही व्हिडीओ कॉल.. परत हॉस्टेलवर दिसलो नाही की ओरडतील"
रोहन : "वृषभ तु तरी चल.. मी एकटा कस काय हँडल करु.."
वृषभ खुप वेळ विचार करतो..
वृषभ : "बर ठीक आहे.."
रोहन : "तुम्ही सगळे डिनर करून या मी ह्याला बघतो."
वृषभ : "आणि तु कधी जेवशील??"
रोहन : "मी पार्सल घेतो..घरी जाऊन जेवेल.. ह्याला पण जेवण भरवाव लागेल ना."
वृषभ : "मी पण तुझ्याबरोबरच जेवेल. राज तु जेवुन घे.."
इथे समिराच मात्र जेवणात लक्षच लागत नसत. ती चमचा असच ताटात फिरवत कसल्या तरी विचारांच्या कोड्यात हरवुन गेलेली होती.
रोहन वृषभला शौर्यसोबत गाडीत थांबायला सांगतो आणि तिघांसाठी काही जेवण पार्सल नेण्यासाठी रेस्टोरंटमध्ये जातो. जेवण पार्सल घेऊन बाकीच्यां सोबतच तो बाहेर पडतो.
शौर्य अगदी गाढ झोपुन गेला असतो.. अधुन मधुन 'विरss आय मिस यु' म्हणुन कोणाला तरी आवाज देत असतो..
"विर कोण आहे??",समीरा वृषभला विचातरते..
वृषभ : "आम्हांला तर अजुन हा कोण आहे हे सुद्धा नाही माहीत.."
टॉनी : "काही विचारलं तर तोंड पाडुन बसतो.. मग आम्ही ह्याला काही विचारणच सोडुन दिलंय.."
गाडी थोडं पुढे येताच समीरा थांबवायला सांगते..
समीरा : "रोहन आम्ही निघतो इथूनच.. तुम्ही सांभाळुन जावा."
रोहन : "मी तुम्हाला सोडतो हॉस्टेलवर मग जातो.."
"नाही नको.. आम्ही जाऊ..",समीरा थोडं नाराज होतच बोलते.
रोहन टॉनीकडे बघतो..
टॉनी : "रोहन आम्ही जातो तुम्ही तिघे सांभाळुन जावा आणि फोन कर मला पोहचलास की.."
मनवी : "रोहन थेंक्स.. आणि नीट जा बाय.. गुड नाईट.."
रोहन : "पोहचल्यावर टेक्स्ट कर.."
(सगळेच भुवया उडवत चिडवु लागले..)
"टेक्स्ट करा अस बोलायचं होत मला.. चलो बाय.. गुड नाईट.."
राज : "भावना पोहचल्या ??"मित्रा तुझ्या... काय मनवी बरोबर ना..
मनवी थोडीशी लाजते..
रोहन सगळ्यांना बाय करत गाडीत येऊन बसतो..
वृषभ : "तुझ्या घरी यायला कस तरी वाटतंय यार.. मी ह्याला तुझ्या घरी सोडुन मग जाऊ का हॉस्टेलवर..
रोहन : "अजिबात नाही हा... तु माझ्यासोबत घरी येतोयस.. आणि एवढं कस तरी वाटुन घ्यायची काहीही गरज नाही.. हॉस्टेलवर रोजच राहतोस ना.. एक रात्र माझ्या घरी राहुच शकतोस ना तु.."
वृषभ : "तरीपण हॉस्टेल.."
"वृषभ तु आजची रात्र माझ्या घरी रहातोयस.. हॉस्टेलवर नाही.. कळलं??", रोहन वृषभला थोडं राग दाखवतच बोलतो..
वृषभ होकारार्थी मान हलवत हो बोलतो..
"मम्मा हॉस्टेल नको.. परत त्रास नाही देणार.. विर मला नाही जायचय हॉस्टेलवर वर.. मम्मा प्लिज.. परत मारामारी नाही करणार..", शौर्य रडतच बोलत असतो.. आणि गाडी उघडुन बाहेर पडु लागतो..
वृषभ : "ए शौर्य आपण हॉस्टेलवर नाही जात आहे.. घरीच जातोय.."
शौर्य : नक्की??
वृषभ : हो बाबा नक्की..
वृषभ कशी बशी शौर्यची समजूत काढत त्याला आत बसवतो..
"आय लव्ह यु विर.. तु माझी जान आहे ब्रो.", वृषभला विर समजुन मिठी मारतच तो बोलतो आणि पुन्हा झोपतो..
वृषभ आणि रोहन एकमेकांकडे बघतात.. रोहन जास्त काही न बोलता गाडी ड्राईव्ह करू लागतो..
गाडी मोठ्या अश्या आलिशान घराजवळ येऊन थांबते.. वृषभ फक्त त्याच घर बाहेरून बघतच बसतो.. रोहन गाडीने हॉर्न वाजवतो तसा गेट उघडतो.. शौर्यला दोघेही पकडुन वर्ती एका रूममध्ये नेतात. एका बेडवर त्याला झोपवतात..
वृषभ : "काय भारी बंगला आहे यार तुझा.. मस्तच..!'
रोहन : "थेंक्स यार.. आपण जेवुन घेऊयात मला भुक लागलीय खूप.. अरे पण जेवणाची पार्सल गाडीतच राहील. थांब मी घेऊन येतो."
रोहन जेवणाची पार्सल नेण्यासाठी गाडी उघडतो तेव्हा त्याच लक्ष शौर्यच्या मोबाईलवर जात.. मघाशी गाणी लावण्यासाठी शौर्यने त्याचा मोबाईल त्याला दिलेला.. तो त्याचा मोबाईल पण घेतो.. पण मोबाईल वायब्रेट होत असतो.. शौर्यच्या मॉमच नाव त्यावर डिस्प्ले होत असत.
"ओहह शट...! ", अस बोलत रोहन मोबाईल घेऊन धावतच रूम मध्ये येतो..
रोहन : "ए वृषभ ह्या शौर्यची मॉम त्याला फोन करतेय हे बघ.. आई शप्पथ हे बघ जवळपास 27 मिसकॉल येऊन गेलेत.."
वृषभ : "ओहह नो! आता काय करायच?? आज खरच ह्याचा दिवस खराब आहे वाटत... "
रोहन : "ह्याला उठव..."
दोघेही मिळुन शौर्यला उठवतात..
वृषभ : "शौर्य उठणं मॉमचा फोन आहे.. शुद्धीत ये नारे.."
शौर्य : "मम्मा... तिला वेळ मिळाला.. अरे वाह.. अस बोलुन रडु लागतो..आणि पुन्हा झोपतो.."
रोहन : 'हा असा काय बोलतोय??. एक काम कर वृषभ तु बोल फोन उचलुन.."
वृषभ : "मी नाही बाबा तूच बोल.. बोल की शौर्य फोन तुझ्याजवळ विसरू गेलाय.. अभ्यासाला आलेला.. अस काही तरी बोल"
पुन्हा शौर्यचा फोन वाजला..
रोहनने घाबरतच उचलला.. तो काही बोलणार तोच अनिता म्हणजे शौर्यची आई बोलु लागली..
अनिता : "शरू कसा आहेस तु आणि किती फोन करायचे तुला.. एक कॉल उचलुन तुला माझ्याशी बोलावंस नाही वाटत का?? इथे तुझ्या आठवणीत एक दिवससुद्धा माझा सुखाचा जात नाही रे.. तुला नाही का येत तुझ्या मम्माची आठवण?? प्लिज काही तरी बोल..आपल्या मम्माचा कोणी अस राग करत का?? आय एम सॉरी ना बच्चा.. मी जे केलं ते तुझ्यासाठीच केलंय रे.. हॅलो शरू.. प्लिज काही तरी बोल प्लिज.."
रोहन : "आंटी सॉरी! मी शौर्यचा मित्र रोहन आहे.. एकच्युअली तो माझ्या घरी आलेला आज अभ्यासासाठी आणि त्याचा फोन इथेच विसरला तो.."
अनिताला काय बोलावे सुचत नव्हतं..
अनिता :" माझा शौर्य कसा आहेरे?? खुप दिवस झाले आमचं बोलणंच नाही झालं.."
रोहन : "तो तर एकदम मस्त आहे.. खुप एन्जॉय करतोय तो इथे दिल्लीत.. तुम्ही टेन्शन नका घेऊ. "
अनिता : "त्याला एकदा फोन करून माझ्याशी बोलायला सांगशील.. त्याला सांग त्याची मम्मा वाट बघतेय त्याच्या फोनची आणि त्याच्या मम्माने जे केलं ते त्याच्या चांगल्यासाठीच केलंय."
रोहन : "अ...हो सांगतो मी.. ठेवु??"
अनिता : "हम्मम.."
रोहनने फोन ठेवताच एक सुटकेचा श्वास सोडला..
फोन स्पीकरवर ठेवल्याने वृषभनेसुद्धा बोलणं ऐकलं होतं..
रोहन : "शौर्यचा काही प्रॉब्लेम आहे का??"
वृषभ : "नाही ना माहीत. तो काही सांगतच नाही ना.. म्हणजे आम्ही एकदा दोनदा विचारण्याचा प्रयत्न केला तर तो तोंड पाडून बसतो.. टॉनी बोलला ना तुला मगाशी.."
रोहन शौर्यचा मोबाईलवर ठेवलेला वॉलपेपर वृषभला दाखवतो.
वृषभ : "काय??"
रोहन : "अरे वॉलपेपर नीट बघ.. "
वृषभ : "शौर्यचा तर आहे.. गाडी ड्राइव्ह करताना.."
रोहन : "मॅड गाडी बघ.. Roll-Royance Cullinan"
वृषभ : "अरे शो रूममध्ये गाडी बघायला गेला असेल तेव्हा काढला असेल."
रोहन शौर्यचा मोबाईल चाळू लागला..
रोहन : "अरे नाही वृषभ तो मगाशी जे बोलला ते खरं आहे त्याच्याकडे आहे Roll-Royance Cullinan.. हे बघ.."
वृषभ आणि रोहन त्याच्या मोबाईलमध्ये असलेले त्याचे पिक्स बघु लागले..
वृषभ : "मला अस वाटत आपण त्याला न विचारता त्याचा मोबाईल नको बघायला ठेव तु.. उद्या तो शुद्धीवर आला की विचारू त्यालाच."
रोहन : "हम्म जेवुन घेऊयात.."
दोघेसुद्धा जेवुन शौर्यजवळच झोपतात.
समीराला रात्रभर झोप लागत नाही.. "शौर्यशी ह्यापुढे कधीच बोलायचं नाही. त्याच्याशी बोललेच नाही तर त्याच्या प्रेमात पडणारच नाही"असा विचार ती मनात करते. "पण त्याच्याशी न बोलता राहायला कस जमेल??नाही जमुन कस चालेल जमवायलाच लागेल." स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तर तिला अगदी सहज मिळत होती. प्रश्नउत्तरांचा खेळ खेळत ती झोपुन जाते.
इथे मनवी आणि रोहनचा प्रेम प्रवास सुरू होतो. दोघेही रात्रभर एकमेकांसोबत चॅटिंग करण्यात रमुन जातात.
★★★★★
सकाळी शौर्य अगदी डोकं धरून उठतो. अंगावर शर्टच नसत.. तो काल काय घडलं ते आठवण्याचा प्रयत्न करू लागतो. वृषभ त्याच्या बेडजवळच डोकं टेकून झोपलेला त्याला दिसतो तर रोहनसुद्धा वृषभच्या जवळच झोपून असतो.. शौर्यला तो कुठे आहे हे काही कळत नसत.. तो वृषभला हलवतो.. वृषभ डोळे चोळतच उठतो.
वृषभ : "थेंक्स गॉड यार तु शुद्धीवर आलास.. काय यार रात्रभर झोपुच दिलंस नाही मर्दा तु.. किती उलट्या करत होतास.."
वृषभच्या आवाजाने रोहनला जाग येते..
शौर्य : "आपण कुठे आहोत..??"
रोहन : "माझ्या घरी.."
शौर्य डोकं धरून तिथुन उठला.. मला आत्ताच्या आता हॉस्टेलवर जायचं.. माझं शर्ट कुठेय..
रोहन आणि वृषभ एकमेकांकडे बघू लागले..
वृषभ : "काय झालं शौर्य??तु अस का बोलतोयस."
शौर्य : "माझं शर्ट कुठेय??"
रोहन : "ते खराब झालंय बाथरूममध्येच असेल.."
शौर्य बाथरूममध्ये जातो..शर्ट स्वच्छ धुतो आणि तसच ओल शर्ट अंगावर चढवतो आणि हॉस्टेलवर जायला निघतो.. रोहन आणि वृषभ त्याला पकडतात..
वृषभ : "शौर्य यार तुला काय झालं ते सांग तरी..??"
शौर्य वृषभला रागातच लांब ढकलतो..
"यार बोलतोस ना.. आणि नाही बोलत असताना सुद्धा तुम्ही लोकांनी दारू मिक्स केलीत माझ्या ड्रिंक मध्ये.. मला नकोय तुमची फ्रँडशीप.. मी मुंबईला निघुन जाणार.. मला नाही आवडत इथे.. मला नाही रहायच इथे.", शौर्य रडतच बोलतो.
रोहन : "शौर्य यार सॉरी ना.."
शौर्य : "सॉरी फॉर व्हॉट रोहन?? मला काल माझी गेलेली इज्जत परत मिळणार आहे का?? प्लिज मला जावु दे.."
वृषभ : "ए शौर्य यार प्लिज ना.. मस्ती करत होतो रे.."
शौर्य : ह्याला मस्ती बोलतात..? अशी मस्ती असते का वृषभ.. मला बोलायचंच नाही कुणाशी जाउदे..
शौर्य तिथुन रागानेच निघु लागतो..
रोहन आणि वृषभ त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात पण तो काही ऐकत नाही. वृषभसुद्धा त्याच्या सोबत त्याच्या मागे निघतो..
शौर्य एका टेक्सिला हात दाखवतो आणि आत जाऊन बसतो. वृषभ सुद्धा पळत येऊन त्याच्या टेक्सित बसतो..
वृषभ संपुर्ण टेक्सित त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण शौर्य डोकं टेकुन डोळे मिटून गप्प पडुन रहातो.
टेक्सि हॉस्टेलजवळ थांबताच टेक्सिच भाडं देऊन तो सरळ आत निघुन जातो.
क्रमशः
(शौर्यची असणारी ही मैत्री कायम राहील?? शौर्यची समजूत काढू शकतील त्याचे मित्र??समीरा आणि शौर्यची लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच संपेल?? भेटूया पुढील भागात)