kadambari premaachi jaadu part 35 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३५ वा

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३५ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग- ३५ वा

------------------------------------------------------------

१.

*******

नारायणकाका आणि जग्गुच्या बाबतीत जो काय निर्णय घायचा आहे तो घेण्याची जबाबदारी

सगळ्यांनी जणू एकमताने यशच्या गळ्यात टाकली होती . त्यामुळे या कारवाईला आपण उशीर करीत गेलोत तर .

.यात आपले तर नुकसान होणारच आहे ..आणि - ..मार्केटमध्ये असलेले इतर

बिझिनेसवाले ..जे आपले मित्रच आहेत ..यातील काही जणांचे नुकसान जग्गुने आधीच केलेले आहे.

म्हणून या मित्रांनी अपेक्षा व्यक्त करतांना म्हटले आहे की -

यश – हा प्रोब्लेम तूच चांगल्या पद्धतीने सोडवू शकतोस .., कारण आम्ही

जर आमच्या पद्धतीने हा प्रोब्लेम सोडवायचा प्रयत्न केला तर ..

सगळा मामला हमरी-तुमरीवर येणार, मग उगीच पोलीस –कारवाईचा बडगा आपल्या कुणाला परवडणारा नाहीये .

म्हणूनच मार्केटमध्ये सगळ्यांचे हेच मत आहे की –

हा प्रोब्लेम यशने सोडवावा आणि आपण यशच्या मागे उभे राहावे.

नारायणकाका आता तर यशकडे जॉबला आहेत ,

तेव्हा ..या ज्ग्गुचा बंदोबस्त यश जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो “, हे काम त्यालाच करू द्यावे.

गेल्या काही दिवसापासून या एकाच प्रोब्लेम्ने यशला चांगलेच हैराण करून सोडले होते .

यातून कसा मार्ग काढायचा ? नारायणकाकाना आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे का ?

हे यशला ठरवता येईना . कारण.. काकांनी जग्गुला वेळोवेळी पाठीशी घालीत ,त्याच्या आगाऊ धंद्यावर

एकप्रकारे पांघरून घातलेले आहे “, हा आरोप काका सहजा सहजी मान्य करतील का ?

शेवटी जग्गू आणि त्यांचे नाते ..जे आधी मामा –भाच्याचे होते ..आता पहिल्यापेक्षा ..जास्त जवळचे

आणि नाजूक नाते झाले होते . त्यांच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचा हा दिवटा जग्गू नवरा होता.

आणि तिच्या आडराहून ..तिला त्रास देऊन , सोडून देईन तुमच्या पोरीला “, अशा धमक्या देऊन जग्गू

काकांना ब्लैक –मेल करीत असतो “असेच म्हणावे लागेल.

मनाशीच यश म्हणाला - इमोशनली जरा कठीणच आहे हा प्रोब्लेम ..! काय करावे ?

**********

२.

***********

कधी नव्हे तो आज खूप दिवसांनी यश दुपारच्या जेवणाच्या वेळी ..घरी आलेला आहे हे पाहून ..

आजी –आजोबा , आई-बाबा ..खुश झाले . माळीकाकांनी घरातील या मोठ्या माणसांच्या कानावर

यश सध्या नारायणकाका आणि त्यांच्या जावयामुळे जरा टेन्शनमध्ये आहे” हे सांगितले होते . त्यामुळे

या चौघांनी यशला म्हटले.. जरा शांतपणाने ,विचारपूर्वक यातून मार्ग काढता येतो. तुला राग वगरे

येणे साहजिक आहे ..पण अशा नेमक्या वेळी कंट्रोल करावा माणसाने. म्हणजे..वेळ लागला तरी ..प्रश्न

सोडवता येत असतो यश .

घरातील मोठ्या माणसांचे हे धीराचे शब्द ऐकून यशला खूप बरे वाटले .

तो म्हणाला – काही काळजी करू नका ..मी मलाच नव्हे तर ,सर्वांना या प्रोब्लेम मधून सुखरूप बाहेर

काढील . आणि तुमच्या धीर देण्याने .मी आता स्वतःला कंट्रोल केले आहे. डोन्ट वरी.

जेवणे आटोपली ..तसे यशचे आई-बाबा दुपारच्या आरामासाठी त्यांच्या रूम मध्ये गेले .

आजी-आजोबा दिवसभर हॉलमध्येच असायचे ...जिना चढून वर जाणे नको म्हणून ..त्यांच्या

साठी एक रूम हॉलमध्येच नव्याने केली होती.

आजी-आजोबा .हॉलमध्येच असलेल्या दिवाणवर आराम करीत बसलेले असतात .

ते फक्त झोपण्या पुरतेच त्यांच्या रुममध्ये जातात हे सगळ्यांना माहिती होते.

थोडा वेळात यश त्याच्या शो-रूम –ऑफिसला निघेल “ हे पाहून ..आजोबा म्हणाले ..

यश, वेळ आहे ना तुला थोडा ? बोलायचे आहे जरा तुझ्याशी ..

यश म्हणाला – आजी-आजोबा ..असे का विचारताय ? मला सरळ म्हणा तुम्ही..

यश ,बस इथे , जाण्याची घाई नको करू ..

आजी म्हणाल्या – ते बरोबर आहे बाळा, पण, रीतसर विचारले तर कुठे बिघडले ?

बरे ते जाऊ दे ..आम्हाला तुझ्याशी बोलायचे ..ते ऐकून घे ..

आजी-आजोबांच्या समोर खुर्चीवर बसत यश म्हणाला ..

हं-बोला आता , निवांत बोला , मला अजिबात घाई नाहीये ..तुम्ही महत्वाचे ,

बाकी काही नाही.

आजींनी बोलणे सुरु करीत म्हणाल्या –

हे बघ यश ..

आपल्या घरात आता आम्हाला आमची नातसून आलेली पहायला मिळावी ..एव्हढी एकच इच्छा

राहिली आहे . तुझी बायको ..या घरात वावरतांना पहाणे ..आमच्यासाठीची खूप मोठी आनंदाची

गोष्ट आहे .

गेल्या काही महिन्यात ..आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी मुलींचे अनेक स्थळ पाहिले , काही मुली समक्ष

आपल्या घरी येऊन गेल्या , पण,यातल्या एकीला ही “ कौटुंबिक ..नात्यांचे महत्व नव्हते ,

पारिवारिक –सहजीवनाची इच्छा नव्हती , या एका ही मुलीचे पाय जमिनीवर नव्हते . स्वप्नाळू

दुनियेत वावरणाऱ्या शोभेच्या बाहुल्या आहेत “ या मुली ..असेच आम्हाला वाटले.

यश – आपल्या घरात एक पारिवारिक जीवनाची रीत आहे. नाते- जपत एकमेकांना सांभाळण्याची सवय आहे ,

आवड आहे “,आपल्या सर्वांना .

तुझी अंजलीवाहिनी ..आहे आधुनिक जगात वावरणारी , त्याच विचारांची ..पण.. आपल्या घरात

आल्यापासून ..सगळ्यांच्या सहवासात ..तिला या सगळ्या गोष्टींचे महत्व कळालेच ना ..!

आता बघ ..तुझी हीच अंजली वाहिनी आपल्या कुटुंबाशी किती एकरूप होऊन गेली आहे.

आजींच्या या बोलण्याला दुजोरा देत आजोबा म्हणाले –

यश .आजी म्हणते ते शंभर टक्के खरे आहे .

मला अंजलीचे खूप कौतुक वाटते , ते यासाठी की ,तिने सारासार विचार करीत ,या कुटुंबाशी ,

घरातील माणसांना आपले मानले . आणि यावरून असे म्हणता येईल की..

मनात इच्छा असली की ,माणूस परिस्थितीशी जुळवून घेत स्वतःला अधिक सुखी , समाधानी आणि आनंदित ठेवू शकतो.

आपली अंजली याचे उत्तम उदाहरण आहे.

आजी-आजोबांचे बोलणे यशला मनापासून पटले होते ..तो म्हणाला ..

तुम्ही दोघे म्हणता ते बरोबर आहे . आपल्या अंजलीवाहिनी आपल्या परिवारात आता इतक्या सहज

मिसळून गेल्या आहेत की..सुरुवातीच्या दिवसात याच अंजलीवाहिनीने सगळ्यांचे टेन्शन वाढवले होते “

हे आता कुणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही..

हो ना यश – असे झाले होते खरे ..आजी म्हणाल्या – मला आठवते ..

सुधीरची बायको – या घराची मोठी सून असणारी .. अंजली , तिचे आधुनिक विचार , तसेच बोलणे ,

वागणे आणि दिसणे ,आपलेच बोलणे कसे बरोबर असते ..हे ठामपणाने सांगण्याची सवय

आणि आवड पाहून .. तुझ्या आई-बाबांना खूप टेन्शन आले होते .

या नव्या मुलीबरोबर जर आपले विचार जुळले नाही तर कसे होणार ?

काही महिन्यातच अंजलीला ..कळून आले , तिला जाणवले ..

आपण आपल्या मताप्रमाणे सगळ्यांनी वागले पाहिजे ..? असा हट्ट करून इथे असे वागण्याची

आपल्याला गरजच नाहीये. कारण.. तिला तिच्या मनाप्रमाणे ..वागण्यास काहीच अडचण नव्हती, काही आडकाठी

नव्हती... असा साधा सरळ परिवार पाहून, यातली माणसे सहवासाने तिला समजत गेली , उमजतगेली ..

त्यात ..या आग्रही, हट्टी अंजलीचा जणू कायापालट होऊन गेला .

यश म्हणाला ..यस ..आजी-आजोबा ..हे मात्र अगदी बरोबर आहे.

आजोबा बोलू लागले -

मग ..यश ..आता तुझी वेळ आली आहे ..

या घराला आणि ..तुझ्या आई-बाबांना सांभाळणारी ,

आम्हा दोघांची काळजी घेणारी , अंजलीवहिनींची मैत्रीण होऊ शकणारी ..अशी मुलगी ..

तुझी बायको म्हणून..या घरात यायला हवी ..अशी आमची इच्छा आहे.

हे ऐकून यश म्हणाला .. आजी-आजोबा ..तुम्ही ठरवा मुलगी,

तिला पसंत करा ..तुमची इच्छा पूर्ण करणे

हे माझे कर्तव्य ..! मग तर झाले !

त्याचे बोलणे ऐकल्यावर आनंदने आजी म्हणाल्या -

बघ बरे का यश ..तू आमच्या शब्दा बाहेर नाही जाणार ना ? प्रोमीस कर आधी ..

हो आजी – पक्का प्रोमीस .. तुमच्या शब्दा बाहेर नाही जाणार मी .

आजी-आजोबा ..तुमच्या पाहण्यात असेल मुलगी ..तर जरूर सांगा मला ..

आजी म्हणाल्या – यश जास्त नाटकं करू नको आता ..

मी काय सांगते ते ऐक ..आणि तसे कर..

चौधरीकाकांनी आम्हाला ..मधुरा आणि तुझ्या बद्दल सांगितले आहे. तसे तर आम्हीच त्यांना

सुचवले होते.. की..असे काही करा ..ज्यामुळे यश आणि मधुरा अधिक जवळ येतील.

यश –आता तसे झाले आहे .आजींनी सांगून टाकीत म्हटले ...

आम्ही इकडे येतांना ..तसे ठरवूनच आलो होतो ..की मधुरा आपल्या घरासाठी अगदी अनुरूप आहे.

तुझ्या सुधीरभाऊला ,अंजली वाहीनींना , तुझ्या आई-बाबांना ..मधुरा या घराची सून होणे “

आवडले आहे ..

आता आज तू आम्हाला ..माधुरासाठी तुझा होकार “ आहे हे स्पष्टपणाने संग..

म्हणजे ...आम्ही पुढच्या तयारीला लागतो.. काय ?

आजोबा म्हणाले – यश ..तू खरोखरच मधुराचा विचार मनाशी पक्का ठरवला आहेस तर,

ही गोष्ट खूप छान आहे. माझ्या मते ..”मधुरा हीच तुझी पत्नी होण्यास लायक आहे “.

यश म्हणाला – होय आजोबा .. मला मधुरा आवडली आहे ..माझा होकार आहे “ हे तिला

मी सांगेन . तुम्ही तिच्या आई-बाबांशी पुढील गोष्टी ठरवाव्या .

आजींनी यशच्या पाठीवर हात ठेवीत आशीर्वाद देत म्हटले ..

नशीबवान आहेस रे यश , मधुराला देखील तू तिचा भावी जोडीदार म्हणून आवडला आहे .

हे तिने स्वतहा ..आम्हा दोघांना सांगितले आहे....

हे ऐकून ..यशला हसू आवरले नाही ..तो म्हणाला ..

आजी-आजोबा ..तुम्ही सर्वांनी अगदी ठरवून मला माधुराच्या जाळ्यात अडकवून टाकलाय म्हणा कि..

आजी म्हणाल्या ..मग, हे सगळं तुझ्याच भल्यासाठी केलाय आम्ही .

आजोबा म्हणाले-

आजीबाई ..लागा तयारीला .नातवाचे लग्न आहे आता लवकरच..

यश मोठ्या आनंदात शो-रूमकडे निघाला ..

आता संध्याकाळी ..मधुरासोबत ..एक मस्त फेरफटका करायलाच हवा ..

म्हणजे ..बागेत गोड सेलेब्रेशन करता येईल .

लव्ह यु मधुरा ..! यशचे मन फुलून आले होते ..

प्रेमाची जादू अशीच असते ..हो ना ..!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग – ३५ वा लवकरच येतो आहे ..

----------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------