Shevtacha Kshan in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 17

Featured Books
Categories
Share

शेवटचा क्षण - भाग 17

त्याला आज गार्गीच मन तिच्या डोळ्यांतून कळलं होतं.. आणि याचा त्याला आनंदही झाला होता.. पण "मी असा कसा वागलो ती काय विचार करत असेल" म्हणून त्याला थोडं टेन्शन सुद्धा आलंं.. त्याने मनातच विचार केला "घाई नको करायला म्हणून आता नाही नंतर बोलूयात" म्हणून त्याने गार्गीला पाणी दिलं आणि तो विषय मोडत,

प्रतिक - कमाल आहे हा गार्गी.. तू कधीच हरत नाही हा खेळ.. पण एक दिवस मी तुला नक्की हरवेल बघ तू..

पाणी पिऊन झाल्यानंतर ती ही नॉर्मल झाली... आणि तेवढ्याच ठसक्यात त्याला बोलली..

गार्गी - अरे चल, तू नाही हरवू शकत मला, मी पण वाट बघेल तो दिवस कधी येतो त्याची...

प्रतीक - बघ हा.. पैंज लावायची का??

गार्गी - हो चालेल, पैंज.. तू फक्त एकदाच मला हरवून दाखव..

प्रतीक - जोपर्यंत तू जिंकते आहेस तोपर्यंत जे आहे ते चालू दे .. ज्या दिवशी ज्या खेळीला मी तुला हरवलं त्या दिवशी तुला मी सांगेल ते ऐकावं लागेल.. बोल आहे मंजूर..

गार्गी - चालेल.. मला मंजूर आहे..

अशी पैंज लावून मात्र गार्गीने स्वतःची चांगलीच पंचाईत करून घेतली होती.. पुढे आणखी एक एक खेळ त्यानी खेळला.. आणि त्यातही गार्गीच जिंकली.. नंतर थोडावेळ दोघही व्हिडिओ गेम खेळत बसले.. दोघही पलंगावर पोटावर भार देत आणि हाताच्या कोपरांना टेकवून डोकं आणि मानेचा भाग वर ठेवत आडवे पडून, दोन्ही हातात रिमोट घेऊन खेळत होते... मधातच मस्ती, ऊशी घेऊन मारामारी, अस.. त्यांचं सुरू होतं.. प्रतीक उगाच केव्हा केव्हा तिला चिढवत होता ती रुसली की तिची समजूत काढत होता.. आणि पुन्हा त्यांचा गेम सुरू होत होता.. असाच गादीवर आडवं होऊन खेळत असताना प्रतिकच्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श गार्गीच्या पायाला झाला आणि ती एकदम शहारली.. त्यात तिचा गेम मधला सैनिक मात्र हरला.. प्रतीक एकदम आनंदाने ओरडत मी जिंकलो मी जिंकलो म्हणत उठून बसला.. तशी गार्गीही उठून त्याच्या कडे चेहरा करून बसली.. पण गार्गी मात्र अगदी शांत भावाने त्याच्याकडे बघत होती.. अचानक तिच अस शांत होणं त्याला कळलंच नाही.. ती मात्र एकटक फक्त त्याच्याकडे बघत होती.. आणि लगेच काही ना बोलता तिथून निघून गेली.. तो मात्र " ही अशी का निघून गेली??काय झालं ?" म्हणून विचारच करत राहिला.. थोडाच वेळात त्याचे आईबाबा आलेत आणि तो मोकळा झाला..

प्रतिकला वाटलं गार्गीला राग आला म्हणून तिची समजूत काढायसाठी तो थोड्यावेळाने गार्गीकडे गेला..

प्रतीक - काकू, काकू..!!!

गार्गीच्या आईला आवाज देत प्रतीक आत शिरला..

गा आई - अरे प्रतीक , ये !! . .. काय म्हणतो?? आले का तुझे आई बाबा?

प्रतीक - हो काकू , आलेत ते.. मी लाडू खायला आलो होतो.. तुम्ही केलेत ना , मला खूप आवडतात तुमच्या हातचे लाडू..

गा आई - तुला गार्गीने सांगितलं वाटतं..

प्रतीक - हो.. कुठे आहे ती??

गा आई - तिच्या खोलीत आहे.. आली तेव्हापासून आतच बसली आहे .. कुणाशी काही बोलली पण नाही.. तुमचं भांडण झालं का??

प्रतीक - नाही हो काकू, मला पण नाही माहीत काय झालं.. तिला विचारून येतो मी.. आलोच हं..

तो गार्गीच्या खोलीत गेला दरवाजा उघडच होता.. तर त्याने नॉक न करताच हळू हळू चोरपावलांनीच आत गेला.. ती तिच्या पलंगावर पोटावर झोपली होती ,दोन्ही हातांच्या मधात, हनुवटी खाली उश्या कोंबलेल्या आणि दोन्ही हातात चेहऱ्यासमोर मोबाइलला पकडून मोबाईल मध्ये बघत एकटीच काहीतरी बडबडत होती.. त्यातले काही शब्द प्रतिकला ऐकू आलेत..

गार्गी - " काय होतंय असं?? सांग ना?? तुझ्याच बाबतीत का अस माझं मन ओढ घेतंय?? का तुझ्या शिवाय मला कुठे करमत नाही आजकाल?? या कसल्या भावना आहेत ??"

लगेच प्रतिकने मागून येऊन तिला उत्तर दिलं..

प्रतीक - मला वाटतं तु कुणाच्या प्रेमात पडली असावी..

तीच अस बोलणं ऐकून त्याला थोडं वाईट वाटलं कारण त्याला वाटलं ही कुणाशी चॅट करते आहे..पण त्याने चेहऱ्यावर मात्र तस काहीच येऊ दिल नाही..

त्याच्या आवाजाने ती एकदम गोंधळून पलंगावर उठून बसलीे.. आणि मोबाइलला लपवण्याचा प्रयत्न करत होतीे..
मोबाईल मध्ये ती प्रतिकच्या फोटोशी बोलत होतीे.. पण त्याला मात्र ते दिसलं नाही.. त्याला बघून तर तिच्या कपाळावर घाम जमा झाला...

गार्गी - प्रतीक तू?? आणि तू अस कसा आत आलास??

प्रतीक - दरवजा उघडा होता मी फक्त लोटून आत आलो.. का काय झालं?? एवढी का घाबरलीय?? आणि कुणाशी बोलत होती?? बघू ..

अस म्हणत तो तिच्याकडे तिचा मोबाइलला घ्यायला जातो.. पण ती मात्र नाही नको म्हणत तिथुन पळत होती.. त्यात पुन्हा दोघांची ओढाताण सुरू झाली.. तो तिच्याकडे जाऊन मोबाइलला घ्यायचा प्रयत्न करत होता आणि ती त्याच्यापासून दुर पळत होती.. . शेवटी थकून दोघेही थांबलेत पण त्याच्या हातात काही फोन लागला नाही.. तो धाप टाकतच तिला भावनात्मक धमकी द्यायचा प्रयत्न करु लागला..

प्रतीक - काय आहे असं गार्गी?? माझ्यापासुन पण लपवणार का?? आणि कोण आहें ज्याच्या शिवाय तुला करमत नाही आजकाल?? लवकर सांग नाहीतर मी काकूंना जाऊन सांगतो की तू अस बोलत होती..

प्रतीक आईला सांगणार म्हणून ती पण घाबरली , पण खर त्याला नाही सांगू शकत म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती..

गार्गी - अस काय करतो रे.. मी सांगेल ना तुला वेळ आली की.. मैत्रिणीला अश्या धमक्या देत असतात का? प्लीज ऐक ना..

प्रतीक - ठीक आहे .. पण सर्वात आधी मलाच सांगायच कळलं..??

गार्गी - हो बाबा.. तूच आहे तर आधी तुलाच सांगणार ना.. तुझ्याशिवाय कुणाला सांगून काही उपयोग थोडाच आहे..

गार्गी तिच्याही नकळत त्याच्या डोळ्यात बघत मनातलं बोलून गेली..

प्रतीक - अं... काय बोलली.??

गार्गीला आता कळलं की ती काय बोलून गेली.. थोडी सारवासारव करत ती बोलली..

गार्गी - अरे म्हणजे मला म्हणायचं आहे की आधी तुलाच सांगेल.. बरं तू इथे कशाला आला होता??

प्रतीक - अग, तेव्हा नाही का तू अशी काही न बोलता अचानक निघून आली मला वाटलं तुला राग वगैरे आला की काय, म्हणून विचारायला आलो होतो, काय झालं ते, पण राग आलेला तर वाटत नाहीय इथे तर कुणाशी तरी वेगळ्याच गप्पा सुरु आहेत, मग का अशी निघून आली??

आता गार्गीला पुन्हा काय उत्तर द्यावे सुचत नव्हतं..

गार्गी - ते.. ते.. मला रागच आला होता तेव्हा.. तू माझ्याशी चिटिंग करून जिंकला म्हणून..

काहीतरी सांगायचं म्हणून गार्गी बोलली..

प्रतीक - ए काहीही काय?? मी केव्हा चिटिंग केली..

गार्गी - तू चिटिंग केलीस, तू चिटर, तू चिटर

अस म्हणत दोन्ही कानांत बोटं घालून ती ओरडत होती, की प्रतीक एकदम तिच्याजवळ येऊन तिचे दोन्ही हात पकडून कानातले बोटं बाहेर काढत, तिच्या अगदी जवळ जात,

प्रतीक - "मी चिटर नाहीय"

अस बोलला पण तोपर्यंत गार्गी मात्र त्याच्या अशा जवळ येण्याने पुरती गोंधळूण गेली होती.. ती त्याच्या डोळ्यात एकटक बघत राहिली.. प्रतिकही तसाच तिचे हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात बघत होता.. आज त्याचे डोळे तिला काही सांगू बघत होते.. आणि तिची नजर प्रतीकच मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतं.. तेवढ्यात आईच्या येण्याची चाहूल लागली आणि दोघही पटकन बाजूला झाले.. प्रतिकला आणि गार्गीला अस उभं बघून आईला वाटलं प्रतीक निघत असावा..

आई - अरे प्रतीक, निघालास का?? अरे लाडू हवा होता ना तुला.. हे घे.. आणि काय?? कळलं का काय झालं होतं मॅडमला ते??

प्रतीक - हो काकू, रुसल्या होत्या मॅडम, मी चिटिंग केली म्हणे गेम खळताना.. पण काय चीटिंग केली ते नाही सांगत आहे.. जाऊ द्या मला विचारायचंच नाहीय आता..

आई - (हसतच ) तुम्ही मूलं सगळे सारखेच आहात.. तिकडे खाली प्रिया आणि अमितही असेच भांडत होते.. गेम खेळताना कुणी चिटिंग केली म्हणून.. आणि हसतच आई लाडू देवून निघून गेली..

तेव्हाच्या त्या नजरेच्या गुंतेतून तर दोघे सुटलेत पण आता भावनिक गोंतावलळयात फसले होते.. दोघही एकदम शांत होते.. कुणीच काही बोललं नाही... प्रतिकनी लाडू संपवला आणि तिच्या खोलीतुन जायला निघाला, पण दरवाजा पर्यंत जाऊन काहीतरी विचार करून पुन्हा परत आला आणि गार्गीच्या डोळ्यांत बघत गार्गीला म्हणाला..

प्रतीक - गार्गी तुला काही सांगायचं आहे का मला, कारण तुझे डोळे बरच काही बोलत आहेत..

गार्गी - सांगायचं आहे प्रतीक पण मी योग्य वेळेची वाट बघत होते.. मला वाटत ती वेळ आली आहे.. पण आता अस नाही बोलता येणार मला..

प्रतीक - ठीक आहे, मी वाट बघतोय .. जास्त उशीर नको करू हं.. मला नाही थांबवल्या गेलं तर मग मीच..

एवढं बोलून तो शांत झाला... आणि तिच्याकडे बघून हसत हसतच तिच्या खोलीतून निघून गेला...

---------------------------------------------------------
क्रमशः