Tu Hi re majha Mitwa - 7 in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | तू_ही_रे_माझा_मितवा... - 7

Featured Books
Categories
Share

तू_ही_रे_माझा_मितवा... - 7



#भाग_७

“खडूस!! नेहमीप्रमाणे लव्ह यु सोडून सगळं बोलला. जा! मी ही बोलणार नाही,पाहू कुणाचा नाईलाज होतो न कोण अगोदर बोलतं ते, हिशोब मांडूया म्हणे.खडूसेस्ट व्यक्ती.”
नाकावरचा लटका राग सांभाळत ती उठली आणि गाडीकडे निघाली.
गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. ऋतू वेद्च्या समांतर बाजूच्या खिडकीजवळ होती.वेद्शी नजरा नजर होणार नाही याची मुद्दाम काळजी घेत ती हेडफोन कानात टाकून बाहेर बघत होती.जरावेळाने तिने डोळे मिटले. मिटलेल्या पापण्यांच्या आड सुद्धा वेद होता! एक गोड हसू ओठांवर तरळलं.धबधब्याजवळचे ते अलवार क्षण, चंद्राच्या,समुद्राच्या गप्पात भिजलेले क्षण आणि डोळ्यांवर हळुवार टेकलेले त्याचे ओठ,हे सगळं एखाद्या गोड स्वप्नासारखं मनात विरघळत होतं.

”हे दोन दिवस कुठेतरी लपवून,ठेवावे अगदी त्या खडूसपासून सुद्धा!”

स्वतःला बजावत होती.विचारांच्या गुंत्यात हरवत तिचा डोळा लागला.
ड्रायव्हरने ब्रेक लावला तसा एक झटका बसल्याने ऋतूला जाग आली. कुणाच्यातरी खांद्यावर आपण बिनधास्त विसावलो होतो ह्या विचाराने खजील होऊन,झोपाळलेल्या डोळ्यांनी तिने शेजारी बघितलं.शेजारी वेदला पाहून ती जरा चपापली आणि सावरून बसणार तोच त्याच्या जॅकेटच्या शोबटनमध्ये तिचे केस अडकल्याने ते ओढले गेले,ती कळवली आणि त्याच्या इतक्या जवळ असण्याने ओशाळली देखील.

“रीलक्स...उठू नकोस let me try.!”

त्याने हळुवारपणे तिचे केस बाजूला केले.दोन स्टॉपपूर्वी तिच्या शेजारची सीट रिकामी झाली होती,गाढ झोपेत असणाऱ्या ऋतूचा सारखा तोल जात होता,सावरायला म्हणून तो येऊन बसला होता. विस्कटलेले केस जरा सारखे करत ती म्हणाली-

“सॉरी, खूप वेळ झाला का तुझ्या खांद्यावर डोकं ठेऊन?”

“खूप वेळ नाही झाला,खूप उशीर झाला....” तिच्याकडे बघत तो म्हणाला.

“काय?” गोंधळून तिने विचारलं.

“काही नाही,असंच...!"

तो माफक हसला तसं लाजून नजर चोरत ती खिडकीबाहेर पाहू लागली.

“पोहचू आता अर्ध्या तासात वाकडेवाडीला,ट्राफिकमुळे आधीच खूप उशीर झालाय.” बाहेरचा अंदाज घेत तो म्हणाला.

कंपनी थोड्या अंतरावर होती तसं टीम लीडरने पुढे येऊन ऋतूला विचारलं.-
“ऋतूजा,गाडी पुढे स्वारगेटपर्यंत जाणार आहे.मी,वेदिका,पूर्वा आणि शीतल स्वारगेटला उतरणार आहोत,would you like to come? तुलाही कंपनी मिळेल आणि पुढे कॅब किंवा रिक्षा मिळेलच,चालेल ना?”

“येस,नो प्रॉ..” ती पुढे बोलणार तसं तिला थांबवत वेद म्हणाला-

“आशिष,I am going to dhankawadi only, I will drop her n proceed ,don’t worry.”

“येस..” ती कसनुसं हसत म्हणाली.

“ok then ,no issue,पोहचल्यावर ग्रुपवर अपडेट करा.” तो काळजीने म्हणाला.

गाडी वाकडेवाडीला कंपनीजवळ थांबल्यावर ते उतरले.
रस्ता बऱ्यापैकी शांत होता.हवेतला गारठा जाणवून येत होता. जरा अंग चोरून उभ्या असलेल्या ऋतूकडे त्याने पाहिलं आणि जॅकेट काढून तिच्या खांद्यावर ठेवत तो म्हणाला-

“खूप थंडी आहे,अश्या वातावरणात कॉफी म्हणजे ब्लिस...”
कॉफीचा विषय निघताच बागेतला संदर्भ आठवून ती गोरीमोरी झाली,तो ही जरा खजील झाला.

“मिस्टर इनामदार,तुम्हाला कुणी सांगितलं बोलायला, मला न विचारता मनानेच सांगितलं,मी सोडणार म्हणून?
-पर्स आणि बॅग सावरत ती जरा रागातच म्हणाली.

“मग नाही म्हणायचं होतं,त्यात काय” - तिच्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर नंबर डायल करत तो म्हणाला आणि तो बोलायला बाजूला गेला.तो असं बाजूला जाऊन बोलत असल्यामुळे ती जरा चिडलीच.

“बाजूला जाऊन रेवाशी तर बोलत नसणार?” तिला जरा शंका आली आणि चटकन राग नाकावर येऊन बसला.फोन झाल्यावर तिच्याजवळ येऊन थांबला.

“पर्सनल बोलून झालं असेल तर निघायचं का,मैत्रिणी वाट बघत असतील माझ्या?” ती फणकारत म्हणाली.

तिच्या रागातलं पझेसिव्ह बोलणं ऐकून त्याला हसू आलं.

“सारखी चीडचीड करून थकत नाहीस का तू,नाक जाम दुखत असेल ना तुझं एवढा राग सांभाळता सांभाळता?” तिला चिडवायचा एकही क्षण त्याला सोडायचा नव्हता.

“वेद,बाईकवर कसं जाणार आहोत?दोन बॅग्स ,त्यात हा स्कर्ट...अवघड होईल रे,शी बाबा! उगाच थांबले.”

तो समोर खट्याळपणे हसत उभा होता.

“मला उशीर होतोय वेद न तू हसतोय?”

ती चिडली आणि शेजारच्या बेंचवर जाऊन बसली.समोरून आलेल्या गाडीच्या हेडलाईटचा डोळ्यात प्रकाश गेल्याने तिने डोळे बंद केले,गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली.

वेद गाडीजवळ गेला.गाडीत अभय होता.बाहेर येऊन त्याने वेद्च्या पाठीवर जोरदार थाप मारली.

“काय रायटर पोहचलो की नाही ऑनटाइम,उगाच काळजी करत असतोस?”
“साल्या तुझी किती नाटकं असतात. कंपनीमधून फोन आला की एक एक तास बोलत बसतोस,अजून उशीर झाला असता ना तर ह्या मॅडमचा राग तुला माहित नाही..”

ऋतू उठून त्यांच्या जवळ आली.वेद ओळख करून देणार तोच अभय स्वतःहून पुढे आला.

“हेल्लो,I am Abhay ,वेदचा रुमी,फ्रेंड,बिग ब्रो...अजून काय रे?” अभय हसत म्हणाला.

“हाय! I am Rutuja, His collogue.”

“Yes, of course,ओळखलं मी, आपण प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी रूममध्ये तुझ्या नावाचा सारखा जप असतो...आणि..” तो पुढे बोलणार तसं त्याला थांबवत,त्याचा हात दाबत वेद म्हणाला.

“अभ्या,तुला काहीतरी अर्जंट काम होतं ना साल्या, ही घे बाईकची चावी,तिकडे पार्किंगला गाडी आहे आणि फोरव्हीलरची दे मला,उशीर झालाय खूप.”

“ओक्के,जातोय.तू सुद्धा लवकर ये.जेवायला थांबलोय मी, चलो,ऋतुजा भेटू पुन्हा.बाय” त्याने निरोप घेतला आणि तो निघाला.

“बाय” ऋतुजाही गोड हसली.

गाडीत समान व्यवस्थित ठेऊन वेदने गाडी सुरु केली आणि ते निघाले.

“अभय काय म्हणत होता,माझ्या नावाचा जप वैगरे...” जरा रील्याक्स होत तिने विचारलं.

“अरे तो काही विषय नाही...ते तू जाम डोक्यात जायचीस ना अगोदर,भांडखोर,चिडकी ते सांगत असेल तो.”

“हो का? मी भांडखोर? ओह्ह वाव ग्रेट, आणि तू?”

“विषय का?as usual charming !” तिच्याकडे जराही लक्ष न देता तो म्हणाला.

“ठीक आहे,तुझ्याशी तर बोलायलाच नको.” रागावून खिडकीबाहेर बघत ती म्हणाली.तो फक्त हसला.गाडीत शांतता होती,बारीक आवाजात चालू असलेल्या एफ.एमचा सुद्धा आवाज नको म्हणून तिने त्याच्याकडे रागाने बघत तो बंद केला.

“हे रागाचे झटके रोजचेच असतात की अमावस्या-पोर्णिमा,नाही म्हणजे काही फिक्स पॅटर्न आहे का?

‘मी अशीच आहे आणि मला इतकाच राग येतो.’
नाकावर मघापेक्षाही जरा राग जास्तंच होता.

“मग अवघड आहे बाबा.” एक सुस्कारा सोडत तो म्हणाला.

“कुणाचं?”

मान नकारार्थी हलवत तिच्याकडे न बघता तो फक्त गोड हसला.

‘काहीही विचारलं तरी अर्धवट उत्तर देतोस आणि हे असं डिंपलकोटेड हसतोस,बास एवढंच येतं का तुला.’

“Usually सुंदर मुलगी सोबत असेल तर दोनच प्रकारे उत्तर द्यायचं टाळता येतं, एक तर हसून किंवा किस करून. मी bydefault हसायचं प्रेफर करतो.सेकंड ऑप्शन ट्राय केलं नाहीये अजून,तू म्हणत असशील तर सेकंड ऑप्शन आवडेल मला वापरायला.” एवढं बोलून तो खळखळून हसला.ती लाजेने गोरीमोरी झाली.

“मला आता खरच काही बोलायचं नाहीये.” डोळे बंद करून ती टेकून बसली.

तिने डोळे उघडले ते थेट गाडी थांबल्यावरच.आता बऱ्यापैकी सामसूम होती. बिल्डींगखाली तिची वाट बघत तनु आणि प्रिया अगोदरच येऊन थांबल्या होत्या. ऋतूला वेद्सोबत बघायला त्याही अगदी आतुर झाल्या होत्या.
तिने गाडीतून बाहेर येऊन दोघींना घट्ट मिठी मारली.चेहऱ्यावर लाजरं हसू मावत नव्हतं.गाडी व्यवस्थित पार्क करून वेदही आला.

“हाय!”

“हाय ! तुला पुन्हा एकदा हिला इथे सोडायची तसदी घ्यावी लागली ना?” बोलता बोलता तनुने ऋतूला एक टपली मारली.

“ये हेल्लो,मी नाही म्हटलं त्याला मला सोडायला ये म्हणून.तोच आला बळजबरी.”

“इट्स ओके,माझ्याही मायग्रेनच्या टॅबलेट अश्याच पडून होत्या,म्हटलं आज संपवून टाकू,म्हणून हिला सोडायला आलो.”

त्याच्या ह्या विनोदावर तनु आणि प्रिया खळखळून हसल्या,ऋतू मात्र वैतागली.

“अग,माझ्या मैत्रिणी आहात ना? हसताय काय? अँड मिस्टर वेद,यु जस्ट शट अप.”

थोड्या गप्पा झाल्यावर तो जायला निघाला.

“चलो I have to go,खूप उशीर झालाय..” चेहऱ्यावरची नाराजी लपवायचा प्रयत्न करत तो म्हणाला.ऋतूला सोडून जाणं खरंतर त्याला खूप जीवावर आलं होतं.

“ठीकये” बोलण्यात जरी नसला तरी तिच्या डोळ्यात स्पष्ट नकार दिसत होता.

“ओके देन बाय,गुड नाईट.” शेजारी तनु आणि प्रिया असल्याने थोडं फॉर्मल होत तो म्हणाला.

“तनु तुला प्रेसेंटेशन बनवायचं होतं ना? चल बाय वेद , आम्ही निघतो.” त्याची ही परिस्थिती ओळखून प्रिया म्हणाली.

“नाही गं.थांबूया ना,वेद गेला की मग जाऊया.” त्या दोघांची मजा घ्यायला म्हणून हसू दाबत तनु म्हणाली.
ऋतूने रागाने तिच्याकडे बघितलं,तसं हसत तनु म्हणाली-

“ओके..!! आम्ही वर जातोय,ये लवकर.बाय वेद,भेटू पुन्हा.” त्यानेही हसत त्यांना निरोप दिला.

जरावेळ शांततेत गेला.दोघेही बोलले नाही की एकमेकांकडे बघितलं नाही.एक दीर्घ श्वास घेऊन मग तिच म्हणाली-
“हे असं साधारण कितीवेळ उभं राहायचं मला? तुला नक्की काही बोलयचं नाहीये?”

त्याने मिश्किलपणे हसत मानेनेच नकार दिला.

“देन इट्स ओके. बाय” ती रागात म्हणाली आणि जायला म्हणून पाठमोरी वळली थोडं पुढं गेल्यावर त्याची हाक तिला ऐकू आली.

“ऋतु थांब...!”

त्याच्या तोंडून इतक्या प्रेमाने आलेली “ऋतू” ही हाक ऐकून तिच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येईल अशी वाढली.त्याच्याकडून 'लव्ह यु’ ऐकायला तिचा प्राण कानात आला.चेहऱ्यावर एक सुंदर हसू तरळलं,तिने मागे वळून पाहिलं तसं तो म्हणाला-

“I…”

“…..” तिच्या चेहऱ्यावर हजार प्रश्न.

“I...I forgot to give you your bag..” म्हणत त्याने गाडीत मागे ठेवलेली तिची बॅग काढून दिली.

“ओह्ह ,thank you very much ” तिने रागाने बॅग जवळ जवळ खेचली.

“बदमाश...”
रागाने पुटपुटत पुन्हा जराही मागे वळून न बघता ती गेटकडे निघाली,थोडं पुढं गेल्यावर थांबली आणि मागे वळून पुन्हा त्याच्याकडे आली. त्याला आनंद झाला. तिला गच्च मिठीत घ्यायची इच्छा त्याला झाली त्याने जरा हात पसरवले तसं जवळ आल्यावर तिने जॅकेट काढून त्याच्या एका हातावर ठेवलं.

“थँक्स फॉर द जॅकेट,ते तुझ्यापेक्षा माझ्याकडे जास्तवेळ असतं.बाय,पोहचल्यावर एक मेसेज कर.”

ती पुन्हा रागात निघून गेली.तो ही मघाच्या त्याच्या वागण्यावर ओशाळला.तिला रागाने असं निघून जातांना पाहून त्याला हसू अनावर झालं.मोबाईलमध्ये तिला नकळत घेतलेल्या एका फोटोकडे पाहून तो म्हणाला-

“ये चिडू..तुला माहित नाही माझं किती प्रेम आहे तुझ्यावर...वेळ आल्यावर सांगेनच..”

गेल्या दोन दिवसातला ऋतूच्या अवतीभोवती गुंफलेला प्रत्येक क्षण आठवतच तो रूमकडे निघाला.

***********

“ऋतुड्या काय नाराज आहेस गं,आम्ही किती excite होतो,दोन दिवसांत काय काय झालं ते ऐकायला.तू म्हटलीस की आल्यावर सविस्तर सांगेन आणि आता तो गेल्यापासून गालांचा फुगा करून बसलीय.यार आता फटके पडतील बोलली नाहीस तर.पटकन बोल कोण लव्ह यु बोललं अगोदर”
प्रिया आणि तनु तिला घेरून बसल्या होत्या,गेल्या दोन दिवसांत तिकडे काय झालं हे त्यांना सविस्तर ऐकायचं होतं.

“प्रियु काय सांगू? त्याने मला इतकं कोड्यात टाकलंय ना खडूस,हलकट,दोन दिवसांत त्याचं किती प्रेम आहे ना ते सगळं कळलंय मला पण लव्ह यु एवढं बोलून कान्फेस तर करायचं ना? तर नाही..! रायटर साहेबांना डायलॉग मारायचे आहेत,फोरहेड कीस घ्यायचंय,माझी काळजी करायचीय..फक्त ‘लव्ह यु’ तेवढं बोलायचं नाहीये.शहाणा!” ती वैतागत म्हणाली.

“ठीक आहे गं,लव्ह कन्फेशन इतकं महत्वाचं नाही,प्रेम असणं गरजेचं.” प्रिया जरा समजुतीने म्हणाली.

“प्रिया.तिकडे आम्ही एकटे होतो म्हणून तो इतका फ्री होता,पण आता उद्या जेव्हा पुन्हा कंपनीत जाऊ तेव्हा ते दोन माकडं असतील ना त्याच्यासोबत तेव्हा बघ किती परक्यासारखा वागेल तो.मी कुठल्या हक्काने त्याला जाब विचारायचा मग? म्हणून मला कन्फेशन हवंय त्याच्याकडून.”

“एक काम कर,make him jealous.नाक दाबलं की बरोबर तोंड उघडेल.” तनु लागलीच म्हणाली.

“how?

“उद्या त्याला इग्नोर कर. आरुष सोडून असं कुणी आहे का ज्यांच्याशी तू छान छान बोलू शकशील जेणेकरून तो जलस होईल?”

“आता असं कुणी लक्षात येत नाहीये पण ते मी करू शकेन.”

“yes, तेच करायचं,तू भेटली नाहीस,दुसऱ्याला भाव दिला ना मग त्याची चिडचिड होईल,मग गपचूप कबुल करतो की नाही ते बघ.”
जिंकल्याच्या अविर्भावात तनु म्हणाली.तिघीही मग खळखळून हसल्या.

“आता मात्र खरचं कॉफीची गरज आहे हं.” डोळे मिचकावत तनु म्हणाली आणि पुन्हा ऋतूला चिडवून दोघींनी बेजार केलं.

गारठलेली रात्र,बाहेरून येणारा गुलबक्षीचा मंद सुवास आणि मिटलेल्या पापण्यांच्या आड तो,आपलासा कुणीतरी.एका प्रेमात पडलेल्या व्यक्तीला अजून काय हवं होतं!!

************

ठरल्याप्रमाणे ती उशिराने ऑफिसला आली. टी-ब्रेकला तिने उगाचच जायचं टाळलं.ऋतू दिसली नाही म्हणून वेद अस्वस्थ होता. त्याचं लक्ष सारखं आजूबाजूला जात होतं.तिचा ग्रुप होता पण ती दिसत नव्हती.

“साल्या साक्षात दोन दिवसांनी भेटतो आहे पण लक्ष नाही आमच्या बोलण्याकडे तुझं,काय सीन आहे बॉस?” जय ओरडलाच.
रेवा मात्र शांतपणे चहा घेत होती.

“कुठे काय? मी जस्ट बघतोय ती आलीय का?”

“ती?” जयने रोखून विचारलं.

“ऋतुजा. हो ना? रेवा अगदी शांतपणे बोलली.

ऋतुजाबद्दल रेवा हे असं शांततेत बोलली हे बघून दोघांनाही आश्चर्य वाटलं.

“हो. आज तुमच्यासमोर एक कन्फेस करायचंय मला.”

“That you love Rutuja right?” पुन्हा अगदी चेहऱ्यावर छान हसू ठेवत रेवा म्हणाली.
वेद्ला तिचा ऋतूप्रती बदलेला हा attitude बघून खूप हायसं वाटलं.तो खुश झाला.

“येस! My first n last love.तिच्यासोबत घालवलेले हे दोन दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस होते यार.तिलाही समजलंय खरंतर पण मी अजून तिला प्रपोज केलं नाहीये आणि हे मला तुम्हाला असं भेटून सांगायचं होतं म्हणून फोनवर जास्त उत्तरं दिली नाहीत.”

जय अगदी उसनं हसू आणत म्हणाला-“गुड,हे अगदीच शॉकिंग वैगरे नाहीये तरी कशी सुचली ही कुबुद्धी सॉरी सुबुद्धी तुला?”

“ये साल्या नीट बोल ना” वेद चिडून म्हणाला.

“गाईज शांतता ! Ved, I am very happy for you ,मग कधी आणि कसं प्रपोज करणार आहेस तिला आमची काही मदत हवीय का तुला?” ती समजुतीच्या सुरात म्हणाली.

तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत जय म्हणाला-“ये बाई बरी आहेस ना? तो ऋतुजाबद्दल बोलतोय,कळतंय का तुला?”

“हो मग? माझ्यासाठी माझ्या बेस्टीचा आनंद महत्वाचा तिची दुष्मनी नाही.” वेद्च्या पाठीवर हलकेच थोपटत ती म्हणाली.

“ये साक्षात बिनडोक शिक काहीतरी याला म्हणतात true friends ,च्यायला नाहीतर तू. ओके! बाकीच्या गोष्टी नंतर बोलू, आता मॉर्निंग मिटिंगला जायचंय. मी पळतो,ब्रेकमध्ये भेटूया. ”

वेद पुन्हा एकदा गर्दी न्याहाळली पण ऋतू नव्हतीच,त्याने फोन बघितला,तिने अजूनही त्याचा मेसेज वाचलेला नव्हता.तो जरा नाराजीनेच निघाला.

‘चला आपल्यालाही उशीर होईल मिटींगला’ रेवाही जायला निघाली तसं जय तिच्या सोबत निघाला.

“तू बरी आहेस ना रेवा म्हणजे डोक्यावर परिणाम तर झाला नाहीये ना? तुला आनंद झाला वेद जे काही बोलला त्याचा?” त्याने तिच्याकडे पहिले.तिच्या डोळ्यात पाणी दाटले होते.

“जय तुला काय वाटतंय मला त्रास झाला नाही? मी स्वतःवर कसा कंट्रोल ठेवला माझं मला माहित.आता तिच्याविषयी चांगलं बोलून त्याचा ट्रस्ट मिळवणं महत्त्वाच होतं आणि तू सुद्धा तेच करायचंय समजलं.”
तिने डोळे पुसले आणि तरातरा निघून गेली.

*************

स्क्रिप्ट सबमिशन लांबल्याने लंचब्रेकमध्ये रेवाला बोलावण्याच्या बहाण्याने ऋतूला भेटायचा प्लान हुकला म्हणून त्याची बेचैनी वाढत होती.ऑफिस सुटायच्या जरा दहा मिनिट अगोदर तो रेवाच्या सेक्शनला आला.रेवा सिस्टम ऑफ करून निघायच्या बेतात होती.

“अरे मी येतच होते खाली.”
तिने त्याच्याकडे पाहिलं,त्याची नजर ऋतूला शोधत होती.ती खोलवर दुखावली गेली. त्याने पाहिलं ऋतू जागेवर नव्हती.त्याच्या फोनला,मेसेजला काहीही उत्तर तिने आज दिलेलं नव्हतं,त्याची चलबिचल वाढली.

“ओह्ह,सॉरी तू तिला भेटायला आला असशील नाही? पण अरे बराच वेळ झाला ती जागेवर नाहीये,फायनान्सचा तो अक्षय आहे ना त्याच्यासोबतच गेली त्यांच्या सेक्शनला.”
अगदी साळसूदपणे ती म्हणाली.

“Are you sure?” जरा चिडतच तो म्हणाला.

“Sure वैगरे नाही हं! तू आज कन्फेस केलं,मी सपोर्ट केला, म्हणून लगेच आज आमची मैत्री होईल हा विचार नको करू फॉर गोड सेक.वेळ लागेल अजून पण मी पूर्ण प्रयत्न करेन आणि आता राहिला ती कुठे गेली हे मला कसं माहित हा प्रश्न तर बराचवेळ तो इथे होता, त्याचं नव्या ऍड बजेटवर डिस्कशन चालू होतं आणि मग थोड्यावेळाने ‘माझ्या सेक्शनला जाऊया’ म्हणून तो तिला सोबत घेऊन गेला.इतकंच काय ते कळलं बाबा मला.”

“सो नाईस ऑफ यु रेवू. You take your time, trust me, there will be no burden from my side.”

“ohh that’s great! चल निघूया का?” तिने आनंदाने विचारलं.

“Actually,मलाही फायनान्सला रिपोर्ट करायचा आहे,तेव्हा मी जाऊन येतो आणि ती स्टुपिड आज मला दिसली सुद्धा नाहीये सो....”
- तो गोड हसला तश्या त्याच्या डिंपल उजळल्या.मनातला राग अत्यंत कसोशीने दाबत खोटं खोटं हसू आणत ती म्हणाली-

“of course ,you should go. Bye”

“Sorry dear bye.” डोळे मिचकावत तो म्हणाला आणि निघाला. तिच्या डोळ्यात संताप दाटून आला,डोळ्यातून घळघळा पाणी वहायला लागलं, डोळे पुसून ती तिरमिरीत निघाली.

************************
वेद अक्षयच्या क्यूबिकला गेला तेव्हा ऋतू पाठमोरी होती. कसल्याश्या डिस्कशनमध्ये दोघे गुंग आहे हे पाहून तो जागेवरच थांबला. ऋतूची नजर जरी समोर असली तरी तिचे कान सारखे पावलांचा कानोसा घेत होते,वेद नक्की येईल हे तिला माहित होतं. वेदला आलेलं पाहून अक्षय म्हणाला-
“Ved just wait for 5 min. Our discussion is about to end.”
ती आता तरी वळून बघेल अशी त्याला अपेक्षा होती पण ती वळली नाही.त्याच्या कपाळावर आठ्या वाढल्या. त्याने फोन काढला,डोळे स्क्रीनवर असले तरी कान पूर्ण त्या दोघांच्या बोलण्यावर होते. ऋतू अक्षयला विनवणी करत होती-

“अक्षय नाही पोसिबल इतक्या कमी बजेटमध्ये, माझ्या दोन तरी requirements टाक ना परचेस ऑर्डरमध्ये यार.”

वेदने समोर बघितलं, अक्षयने जरा पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला-
"यार I will try but शेवटी टीम लीडर म्हणेल तसं करूया ओके?"

त्यांच्या बोलण्याचा विषय पूर्णपणे फोर्मल आहे हे माहित असूनही अक्षयने तिच्या खांद्यावर हात ठेवला हे त्याला खटकलं. त्याला राग आला. वेदने मांडीवर ठेवलेली बॅग खाली पाडली.अक्षय दचकला पण तिने तरीही मागे पहिले नाही.जागेवरूनच अक्षयने विचारलं-
“वेद आपण तुझी परचेस ऑर्डर उद्या डिस्कस केली तर चालेल का? आता उशीर होईल?"

“अरे थोडावेळ, जास्त काही नाहीये माझ्या ऑर्डरमध्ये.” वेदला तिला सोडून जायचं नव्हतं

अक्षय पुढे काही बोलणार तसं ती म्हणाली-
“माझं अल्मोस्ट झालंय डिस्कशन तुम्ही कंटिन्यू करा मी निघते उशीर होईल,चालेल ना?”

“ठीक आहे,बाकी डिटेल मेल करतो.वेद come, we will discuss your order quickly .”

ती उठली,सोफ्ट यल्लो शर्ट आणि ग्रे ट्रौजर,पुसट झालेली लिपस्टिक आणि काजळ.त्याच्याकडे अजिबात न बघता तिने पर्स उचलली आणि ती निघून गेली.आता त्याला अक्षयसमोर बसून डिटेल्स देण्यात काही रस नव्हता.त्याची चुळबुळ वाढली.अजून एक मिनिट सुद्धा उशीर झाला तर ऋतू निघून जाईल म्हणून याची अस्वस्थता वाढली.काहीही विचार न करता त्याने बाग ख्नाद्याला लावली.

”अक्षय actually I suddenly remembered one important work ,sorry yaar.”
एवढं घाईघाईत बोलून तो पळत बाहेर गेला.

“what the hell ?”

जातांना दोनवेळा भिंतीला जवळपास धडकलेल्या वेद्कडे अक्षय आश्चर्याने पाहतच राहिला.

***************

वेद धावत पळत पार्किंगमध्ये आला.ऋतू हेल्मेट घालून निघायच्या बेतात होती. तो तिच्या गाडीजवळ आला आणि त्याने गाडीचं हन्डल पकडून ठेवलं.त्याच्या श्वास फुलला होता.गाडीची चावी ती फिरवणार तसं चावी सकट तिचा हात त्याने खेचला.आजूबाजूला बघत तिने तो ताकदीने सोडायचा प्रयत्न केला.लोकं येतजात होते म्हणून त्याने पकड सैल केली आणि तिने हात खेचला.

“हा काय मूर्खपणा आहे वेद?” हेल्मेट काढत ती रागात म्हणाली.

“माझा मूर्खपणा? तुझं काय चाललंय ऋतुजा? एका मेसेजला रिप्लाय नाही की माझा कॉल उचलला नाही.आताही अगदी ओळख नसल्यासारखी निघून आलीस,काय चालूये?” त्याचा त्रासिक चेहरा पाहून तिने नजर चोरली.

“Today, I was little busy Ved.”

“इतकी बिझी की एकदाही तुला मला भेटावं असं वाटलं नाही? इतके मेसेजेस केले एक रिप्लाय करावासा वाटला नाही?”

“मला ते एवढं गरजेचं नाही वाटलं वेद आणि ह्यापूर्वी सुद्धा आपण काही रोज भेटत नव्हतो, न मेसेजिंग होतं,आता का अचानक असं expect करतोय.” त्याच्याशी जमेल तितकं तुटकपणे बोलायचा प्रयत्न करत ती म्हणाली.

तिच्या ह्या उत्तराने तो जाम चिडला, ती न दिसल्याने सकाळपासून होणारी त्याची तगमग,अस्वस्थता आता तो लपवू शकला नाही.
त्याने तिचा चेहरा धसमुसळेपणाने स्वतःकडे वळवला.

“ हे सगळं मुद्दाम करतेयस ना?तुला माहित होतं,तू दिसली नाही तर मला त्रास होईल,माझी तगमग बघायची होती तुला.हो ना?

त्याचा हा अवतार पाहून ती जरा घाबरली,सकाळपासून त्याला बघायला, भेटायला त्याच्याशी बोलायला ती ही तेवढीच अधीर झाली होती पण त्याच्याकडून रागात का असेना प्रेमाची कबुली तिला घ्यायची होती.जरा धीर एकवटून ती बोलली.

“अजिबात नाही,एक दिवस भेटलो नाही, बोललो नाही तर तुला असा काय फरक पडतो?”

त्याने तिला जरा दूर ढकललं.तिच्या डोळ्यात थेट बघत तो म्हणाला-
“ohhhh is that so? What I am trying to say since few days u r not really understanding ha?तुला कालच एक request केली होती मी..जरा वेळ दे पण नाही,तुला माझे पेशंस ट्राय करायचे असतात.यार काय सांगू तुला? तू दिसली नाहीस की मला फरक पडतो कारण........कारण...” संतापात त्याने गाडीच्या सीटवर हात आपटला.

“कारण...?” तो काहीतरी बोलेले ह्या आशेने तिने थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं.

“forget it….!! ”

तिची चावी संतापात तिच्या गाडीवर फेकत तो म्हणाला.त्याने रागात तिला बाजूला ढकललं आणि स्वतःची गाडी बाजूला काढून तो वेगात निघून गेला.

स्वतःच्या मूर्खपणाला दोष देत ती तशीच उभी होती, कितीतरी वेळ!!



©हर्षदा

(लोभ असावा,कमेंटमधून दिसावा 🙈🙈🙈🙈)