Shevtacha Kshan - 12 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 12

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

शेवटचा क्षण - भाग 12


आज गौरवचा वाढदिवस होता....

आज गार्गी सकाळपासूनच सगळं भराभर आवरत होती.. सुटीचा दिवस नसल्यामुळे नाईलाजाने गौरवला ऑफिसला जावंच लागणार होतं आणि तीच गार्गीला संधी मिळाली..

तिने वाढदिवसाच्या सजावटीच सगळं सामान आदल्यादिवशीच जाऊन आणलं होतं पण गौरवला काही कळू नये म्हणून मेघाकडे( तिची शेजारी मैत्रीण) कडे ठेवलं होतं.. तो ऑफिसला निघाला, जाताना त्याला फक्त कोरडं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिने रवाना केलं, लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस असूनही गार्गीने मला साधं औक्षवन सुद्धा केलं नाही.. म्हणून त्याला थोडं वाईट वाटलं पण लगेच " ठीक आहे .. सगळ्यांना अस सगळं नाही सुचत निदान wish तर केलं ना विसरली तर नाही एवढंच पुरेसे आहे, संध्याकाळी मीच तिला डिनर साठी घेऊन जाईल.. " अस स्वतःला समजावत तो ऑफिसला पोचला..

इकडे गार्गी मात्र तिच्या तयारीला लागली.. आधी त्याच्या आवडती रसमलाई, गुलाबजाम बनवून घेतले आणि रात्री पनीर कढई, जिरे राईस, दाल तडका आणि फुलके बनवण्याचा बेत केला.. सगळं काही त्याच्या आवडीचं .. मग लगेच डेकोरेशनला लागली.. हॉल मध्ये पूर्ण घरात फुगे फुगवून सोडले होते.. खूप सूंदर सुंदर प्रॉप्स ही तिने स्वतःच्या हातानी बनवून लावलेत.. कागदाच्या कलरफुल स्ट्रीप्सनी त्याच नाव भिंतीवर हार्टशेपच्या फुग्यांनी बनवलेल्या हार्ट मध्ये लिहिलं.. आणि वर हॅपी बर्थडेच प्रॉप.. वरती छताला सुद्धा तिने फुगे लावलेत, प्रत्येक फुग्याला हॅपी birthday प्रिंटेड रिबन बांधली.. फुग्याच्या हार्ट भोवती lighting अश्यपद्धतीने लावली की बघणाऱ्याला अस वाटेल की प्रत्येक फुग्यांमध्ये लाईट लावला आहे.. आणि संध्याकाळच्या वेळी हॉलमध्ये मंद आणि सौम्य प्रकाश पडेल एवढेच लाईट .. त्यानंतर त्याचे काही जुने काही नवे काही दोघांचे चांगले चांगले फोटो काढून त्याचा एक व्हिडिओ बनवून तो हार्ड डिस्क मध्ये टाकला .. आणि हार्ड डिस्क tv ला लावून ठेवली.. जिथे केक ठेवणार तो टेबल ही तिने सुंदर डेकोरेट केला.. . आणि केक च माप घेऊन बाजूला मेणबत्या उभ्या करून ठेवल्या.. म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा फक्त केक आणून ठेवायचा आणि मेणबत्या पेटवायच्या...

नंतर ती बेडरूमकडे वळली.. बेडवर नवीन बेडशीट टाकली.. त्यावर गुलाबांच्या पाकळ्यांची सजावट केली.. दोन एकाला एक जुळलेले हार्ट त्याला बाण आणि त्यात गौरांगी अस लिहिलं.. बेडच्या डोक्याच्या बाजूच्या भिंतीवर गुलाबाच्या फुलांनी I LOVE YOU... अस लिहिलं.. तिथेही एक बेडच्या वरच्या भागावर एक मंद lighting अशाप्रकारे लावली की फक्त त्याचा प्रकाश सम्पूर्ण खोलीत पसरेल पण lighting दिसणार नाही.. एवढंच नाही तर खोलीत इतरत्र ही आणखी फुलांची सजावट केली.. आणि दोघांच्या लग्नाचा एक मोठा फोटो एका बाजूला भिंतीवर टांगला..

सजावटीत तिचा संपूर्ण दिवसच निघून गेला.." आज लवकर ये घरी जमलं तर " अस तिने त्याला मेसेज मध्ये लिहून पाठवलं होतं.. डेकोरेशन उरकावून ती स्वयंपाकाला गेली.. पटकन स्वयंपाक आवरून पटकन शॉवर घेतला आणि स्वतःची तयारी करायला लागली आज तिने साडी घातली होती कारण गौरवला गार्गी साडीत खूप आवडायची... गौरवसाठीही ड्रेस काढून ठेवला.. आणि घड्याळात बघायला गेली तोच दारावरची बेल वाजली.. तिने किहोल मधून बघितलं गौरवच आला होता.. तिने मुद्दामच दार नाही उघडलं.. कारण तिला माहिती होतं तिने दार नाही उघडलं की तो त्याच्या जवळच्या चावीने दार उघडून आत येईल..

तिने पटकन सगळे लाईटस बंद करून फक्त ते शांत सौम्य लाईट लावलेत.. टेबल वर केक ठेऊन त्याच्या भोवताली मेणबत्त्या लावल्यात.. आणि tv वर तिने बनवलेला विडिओ प्ले केला.. थोडावेळ वाट बघून तो घरात आला आणि समोरच दृश्य बघून अवाकच राहिला.. तसाच त्याला हॅपी बर्थडे सॉंगचा आवाज आला आणि त्याने tv कडे बघितलं.. त्याचे सगळे जुने नवे, दोघांच्या सोबतीचे, आयुष्यातले महत्वाच्या वळणावरचे सगळे फोटोस खूप कुशलतेने गार्गीने निवडले होते.. ते बघून तो खूपच आनंदी झाला.. आणि गार्गीला शोधू लागला.. गार्गी हातात टॉवेल आणि त्याचे कपडे घेऊन उभी होती.. त्याला फ्रेश व्हायला पाठवण्याच्या तयारीत.. त्याने आताच बेडरूम मध्ये जाऊ नये म्हणून सगळं खटाटोप तिचा.. त्यानेही पटकन फ्रेश होऊन घेतलं.. गार्गीने त्याला औक्षवन केलं आणि मग दोघांनी त्या रोमँटिक मंद प्रकाशातच केक कट केला.. दोघांनीही एकमेकांना केक भरवला.. थोडाफार फोटो सेशन वगैरे केलं.. एवढी सगळी सजावट बघून गौरव तर एकदम भारावून गेला होता आणि त्यात तो विडिओ म्हणजे गौरवच्या सगळ्या भावनात्मक आठवणी..

गौरव - गार्गी, हे सगळं कधी केलं तू??

गार्गी - तुला आवडलं ??

गौरव - अग नुसतं आवडलं नाही खूप खूप आवडलं, आणि हा व्हिडिओ .. माझ्या वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट मिळालं मला आज..

तिच्याकडे वळत

आणि आज तर तुही खूप सुंदर तयार झालीय.. खूप खूप छान दिसतेय.. अस वाटतंय की ..

त्याची खट्याळ नजर ओळखून
गार्गी - बस बस बस.. कळलं मला.. आणखी एक सरप्राईस आहे..

गौरव - (अगदी अधीर होऊन ) काय?? काय आहे??लवकर सांग..

गार्गी - हो नक्कीच पण थोडा धीर धरावा लागेल आता लगेच नाही सांगायचं मला..

गौरव - तू पण ना गार्गी.. अस बोलून मला टांगणीला लावतेस.. बर ते जाऊ दे.. तुझ्यासाठी पण सरप्राईस आहे..

गार्गी - माझ्यासाठी?? काय??

गौरव - तू तयारी तर केलीच आहेस.. आज आपण डिनर ला बाहेर जातोय.. केक कट केलाय पण जेवण पण करावं लागेल ना..

गार्गी - गौरव, आजच जायला हवं का?? कारण मी स्वयंपाक केलाय घरी ..

गौरव - हो अग ते उद्या खाऊयात ना..

गार्गी - आपण दोघे घरातच अस मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकशात डिनर केलं तर नाही चालणार का??

गौरव - अरे वाह.. रोमँटिक candle light डिनर म्हणायचं आहे का तुला?? चालेल मला आवडेल.. म्हणजे तुझी बाहेर जायची इच्छा नाहीय तर..

गार्गी - जेवणात काय आहे कळल्यावर तुझी पण इच्छा होणार नाही..

गौरव - हो का... अरे वाह.. म्हणजे आज जेवायला मजा येईल.. बरं सांग पटकन काय काय केलंय..

गार्गी - अ हं , सांगणार नाही तू बाहेर बाल्कनीत जा मी घेऊन येते सगळं..

तो बाहेर बाल्कनी मध्ये गेला तेव्हा, तिथे सुद्धा, एक छोटा टेबल आणि दोन खुर्च्या ठेवलेल्या होत्या आणि बाल्कनी सुद्धा खूप सुंदर सजवली होती.. बाजूला कुंडीत क्रिसमस ट्री आणि त्यावर बारीक lighting.. टेबल वर दोन मोठ्या मेणबत्त्या ठेवलेल्या.. काही लहान मोठे फुगे.. अशी सुंदर सजावट त्याला दिसली आणि त्याच्या लक्षात आलं की का गार्गी आज बाहेर जायला नाही म्हंटली.." बरच झालं हॉटेल पेक्षा आज घरीच छान मजा येणार अस दिसतेय.. काय केलं असेल हिने आज .. 🤔 नक्कीच माझ्या आवडीचं असणार.. पण काय?? मला तर खूप काही आवडतं.. " तो मनातच विचार करत होता.. ( मुळात गौरव foodie होता म्हणून त्याला आपल्याला जास्त काय आवडतं हाही विचार करावा लागला.. असो ) त्याने टेबल वरच्या मेणबत्त्या लावल्यात आणि तेवढ्यात गार्गी डिनर घेऊन आली..

सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ बघून तर तो आनंदाने उडयाच मारायचा बाकी होता.. दोघांनीही जेवायला घेतलं.. प्रत्येक पदार्थाची चव बघत तो गार्गीच कौतुक करत होता.. आज तो पहिल्यांदाच असा रोमँटिक जेवणाचा अनुभव घेत होता.. दोघांनीही जेवण केलं..

जेवताना त्याने गार्गी कडे पाहिलं ती एकटक त्यालाच बघत होती त्याचा हा आनंद आणि तो ही तिच्यामुळे.. तिलाही खूप छान वाटत होतं.. गार्गीच्या डोळ्यांत आज गौरवला काहीतरी वेगळं जाणवलं.. त्यात एवढं सगळं डेकोरेशन तेही सगळं प्रेमाच्या थीम च आणि एवढं रोमँटिक... पण तरीही तो काही न बोलता शांत बसला तिच्या बोलण्याची वाट बघत होता..

जेवण करून झाल्यावर दोघे लॉंग ड्राईव्ह ला गेलेत.. परत येताना एका बागेत शतपावली करायला म्हणून थांबलेत.. रात्र असल्यामुळे बागेत फारसं कुणीच नव्हतं.. दोघेही चालू लागलेत.. चालता चालता अचानक गार्गी थांबली.. गौरव दोन पाऊलं पुढे टाकून, ती का थांबली बघण्यासाठी वळला.. गार्गी खाली नजर घालून उभी होती..

गौरव - काय झालं गार्गी?? तू अशी का थांबली? तू ठीक तर आहेस ना..

गार्गी हळूच त्याच्या जवळ येत, त्याच्याकडे बघत..

गार्गी - नाही रे ठीक नाहीय.. तूला काही संगायचंय.. सांगू??

तिच्या बोलण्यातून , नजरेतून आणि वागण्यातून तिला काय बोलायचं असेल याचा हलकासा गौरवला अंदाज आला होता... तो हळुवारपणे तिला म्हणाला..

गौरव - त्यात काय विचारायचं.. मी तर वाटच बघतोय आहे.. बोल ना!!

गार्गी त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याच्या नजरेत बघत बोलू लागली..

तुझी आयुष्यभराची साथ मला मिळाली..
तुझ्या सोबतीने मला जगण्याची कला उमगली..
तुझ्या नजरेतून बघताना मीच मला रुपराणी वाटली..
तुझी निस्वार्थ प्रीत मलाही प्रीत शिकवू लागली..

तुझ्या प्रेमाच्या किल्लीने कधी माझ्या मनाचा ताळा उघडला मलाही नाही कळले..
तुझ्या सोबत राहूनही अस विलग जगणे मला आता कठीण झाले ..

ती थोडं थांबली .. तो एकटक तिच्याकडेच बघत होता... दोघही एकमेकांच्या नजरेत गुंतले होते..

तुझ्या निरागस प्रेमाने तू जिंकली माझी प्रीती ...
आतातरी मिठीत घे ना, आणखी प्रतीक्षा करायची तरी किती??

तिच्या शेवटच्या वाक्यावर त्याने थोडंसं हसून पटकन तिला मिठीत घेतले.. तिनेही ती मिठी घट्ट केली.. आज गार्गीच्या बोलण्याने गौरव खूप खूप खुश झाला होता त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू गळायला लागलेत.. तब्बल 16 महिन्यांपासून तो या दिवसाची वाट बघत होता..

गौरव - thank you गार्गी.. थँक् यु सो मच.. तुला नाही माहिती तू मला आज किती मोठा आनंद दिला आहे.. हे माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातलं सर्वात बेस्ट गिफ्ट आहे..

गार्गी - मिठी सैल करत.. थांब रे जरा, बेस्ट गिफ्ट ठरवण्याची किती घाई आहे तुला..

गौरव - म्हणजे??

गार्गी - काही नाही .. चल घरी जाऊयात आता??

गौरव - हो चल..

दोघेही घरी आलेत, दरवाजा बंद केला आणि गौरव गार्गीला उचलूनच घेतलं.. गोल गोल फिरवत आनंदाने.. I LOVE YOU GARGI.. I LOVE YOU अत्यंत उत्साहानेे तो बोलत होता.. तिला त्याच्या अश्या वागण्याचं खूप हसून आलं..

गार्गी - अरे खाली ठेव , काय करतोय?? मला चक्कर येईल..

गौरव तिला खाली ठेवतो आणि पुन्हा एकदा मिठी मारतो.. मिठी सोडवत..

गार्गी - डान्स??

गौरव - अरे वाह.. हो हो.. थांब मी लावतो गाणे..

त्याने रोमँटिक गाण tv वर लावलं.. आणि दोघेही त्यावर थिरकू लागले ..

गाणं संपलं आणि गार्गी तशीच त्याच्या गळ्याभोवती दोन्ही हातांचा विळखा घालत त्याच्या डोळ्यात बघत बोलू लागली...

वाटे तुझ्या वाढदिवशी भेटवस्तू बनून यावं
तुझ्या प्रतिक्षेचं आज तुला गोड फळ द्यावं

तुझ्या माझ्या प्रीतीला आता नवीन वळण मिळावं
आपल्यातल्या दुराव्याचं सावट आता गळून पडावं

नजरेतल्या भाषेला आता स्पर्शाने बोलकं करावं
तुझ्या मिठीत आज मी अलगद विरघळून जावं..

तुझ्या गरम श्वासानेही मी अगदी शहारून यावं
तुझ्या प्रेमसागरात माझं गात्र अन गात्र भिजावं

आज तुझ्या वाढदिवशी मी माझं सर्वस्व तुला द्यावं..
तुही तुझ्या प्रेमाने त्याला तुला हवं तसं फुलवावं..

गौरव - अरे वाह आज तर कवितांवर कविता सुरू आहे.. त्याही एवढ्या रोमँटिक ... कुठून चोरल्यात?

गार्गी - चोरल्या नाहीत रे माझ्या भावना आहेत त्या.. मी केल्यात.. कश्या वाटल्या..??

गौरव - खरं सांगू?? ( गौरव अगदी रोमँटिक मूड मध्ये तिला आणखी जवळ घेत)

गार्गी - हम्म..

गौरव - खूप छान.. आणि ही जी तुला फुलवायची ओळ होती ना ती तर खूपच आवडली मला.. त्यावर तर मी लगेच अंमल करणार आहे...☺

तो तिच्या ओठांवरून अलगद अंगठा फिरवत बोलला.. त्याच्या या स्पर्शने ती शहारली.. आणि तिने डोळे मिटले.. त्याने हलकेच त्याच्या ओठांनी तिच्या ओठांवरून प्रेम वेचून घेतले... नंतर त्याने तिला अलगद उचललं आणि बेडरूम मध्ये घेऊन जाऊ लागला.. बेडरूम मध्ये जाताच त्याला आणखी एक सरप्राईस मिळालं.. ती इतकी सुंदर सजवलेली खोली बघून त्याला खूप छान वाटलं.. त्याने तिला अलगद बेडवर ठेवलं आणि तिथेच बसून पूर्ण खोली बघून घेतली.. बेडवरच हार्टशेप मध्ये लिहिलेलं गौरांगी नाव त्याला खूपच आवडलं..

गौरव - किती छान आहे ना हे आपल्या दोघांच्या नावाच combination.. आणि हे फुलांनी लिहिलेलं I LOVE YOU .. खुपच सूंदर..

गार्गी - हम्म..

तो पुन्हा तिच्याजवळ आला ती लाजून खाली बघत होती.. त्याने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर केला

गौरव - ए तू ही म्हण ना एकदा.. एवढं सगळं बोललीस पण प्रेमाचे ते तीन शब्द मात्र तेवढे नाही बोलली, बोल ना ग प्लीज...

गार्गी - एरवी नसत म्हंटल मी पण आज तुझ्या वाढदिवशी तुझी इच्छा तर पूर्ण करावीच लागणार ना... 😊I LOVE YOU Gaurav... त्याच्या डोळ्यात बघत ती बोलली..

त्याने अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवलेत.. आणि तिच्या ओठांचं रसपान करू लागला.. आणि बघता बघता दोघही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलेत.. लग्नानंतर आज पहिल्यांदा ते खऱ्या अर्थानेे एक झाले होते...

--------------------------–----------------------------------