Shevtacha Kshan - 11 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 11

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

शेवटचा क्षण - भाग 11




आज लग्नाचा दिवस आला.. गार्गी लग्नाच्या त्या मरून शालू , हिरवे काठ आणि सोनेरी ओढणी मध्ये खूपच सुंदर दिसत होती.. गौरव तीचं पहिलं प्रेम नसला तरी तो तिच्यावर किती प्रेम करतो तिला माहिती होतं आणि एवढं प्रेम करणारा, समजून घेणारा, विश्वासु त्याच्यासारख्या मुलगा तिचा नवरा असणं तीच सौभाग्यच आहे असं ती समजत होती.. आणि म्हणूनच गौरवसोबत लग्न करण्याची खुशी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.. ..तसाच गौरवही सोनेरी रंगाच्या शेरवणीत खुलून दिसत होता.. आणि आजच्या दिवसाची तर त्याने कधीपासून आतुरतेने वाट पाहिली होती.. आज गार्गी त्याची होणार म्हणून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होत..

रंग, उंची , बांधा आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता या सगळ्याच गोष्टींमुळे त्या दोघांची जोडी अगदी परफेक्ट वाटत होती...

लग्नाचे विधी सुरू झालेत.. मंगलाष्टके सुरू झालीत, मध्ये अंतरपाट धरलेला असला तरी गौरवला गार्गी दिसत होती.. आणि तो एकटक तिच्याच कडे बघत होता.. तीच इतकं सुंदर रूप बघून तो त्याची नजर कुठेच फिरकवू शकला नव्हता.. पण गार्गी मात्र आपली खाली मान घालून शांत उभी होती..

" शुभमंगल सावधान, सावधान, सावधान!!! " आणि मंगलाष्टके संपलीत.. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातलेत... या क्षणाला गौरवचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.. पुढच्या विधी पार पाडत असतांना एकमेकांना होणारे स्पर्श दोघेही आनंदाने अनुभवत होते.. सप्तपदीची विधी सुरू झाली.. आणि तिला का कुणास ठाऊक गीतच्या लग्नात प्रतीक बरोबर बघितलेल्या तिच्या स्वप्नाची आठवण झाली.. तिच्या डोळ्यात पाणी आलं, तोच पाणावलेले डोळे बघून गौरवने लगेच तिला इशाऱ्याने विचारलं " काय झालं? " स्वतःला सावरत आणि बजावत तिने तो विचार लगेच झिडकरला आणि "कदाचित होम कुंडातल्या धुरामुळे डोळे पाणावले असतील" अस गौरवला सांगितलं.. तिला वाटत होत की एकदा लग्न झाल्यावर तरी तीच मन स्थिर होईल आणि प्रतिकच्या विचारांतून बाहेर पडून ती मनापासून गौरवची होईल.. पण आजचा हा विचार तिला पुन्हा अस्वस्थ करून गेला.. तिने स्वतःला सावरलं.. पुन्हा पुन्हा बजावलं.. आणि पुन्हा गौरव सोबत लग्नाच्या विधी आनंदाने पूर्ण करू लागली..

लग्न लांबच्या गावी असल्यामुळे आणि त्यानंतर 2 दिवसांनी लग्नाच रिसेपशन तिच्याच गावी असल्यामुळे फक्त सगळे मोठे लोक लग्नाला गेले होते , बाल मित्रांची गॅंग तसेच clasaametes रिसेपशन मध्येच जाणार होते.. त्यामुळे प्रतिकही लग्नात आलेला नव्हताच..

पुढच्या 2 दिवसांनीच रिसेपशन होतं.. आणि गीतच्या लग्नासारखी इथेही ही गॅंग मस्त मजा करत होती.. स्टेजवर फोटोग्राफर गार्गी आणि गौरवच्या वेगवेगळ्या मस्ती आणि रोमँटिक पोज मध्ये फोटो काढत होता.. आणि सगळे लॉण मधून त्यांना बघत होते, गार्गीला खूप लाजल्यासारखं होत होतं आणि गौरव मजा घेत होता...

प्रतीक आज खुप खुश असल्यासारखं दाखवत होता.. त्यामागे तो त्याच्या हळव्या भावना लपवत असावा.. थोडावेळणी सगळे स्टेजवर गार्गी आणि गौरव ला अभिनंदन करायला गेलेत ... प्रतीक गौरवशी बोलला पण गार्गीपासून मात्र तो सारखा नजर चोरत होता.. एक ग्रुप फोटो काढून सगळे खाली आलेत.. आणि जेवणावर ताव मारला.. रिसेपशन संपत आलं आणि मुलं मोठे सगळे मिळून आणखी एक मोठा ग्रुप फोटोही त्यांनी घेतला..

प्रतीक आज पुन्हा मनातून हेलवला होता.. आपल्या प्रेमाला आपल्याच डोळ्यासमोर दुसऱ्याच होताना पाहण्यात खरच किती वेदना होतात याचा अनुभव आज त्याला होत होता.. सगळ्यांसमोर हसता खेळता प्रतीक आतून किती तुटत चाललाय हे फक्त त्यालाच माहिती होतं.. आणि मनाचे भाव चेहऱ्यावर येवू न देण्याची कला त्याला खूप चांगल्या पद्धतीने अवगत होती.. त्याचे डोळे बघून गार्गीने त्याच मन लगेच वाचलं असतं त्याला माहिती होतं म्हणून त्यांनी तिच्याशी नजरानजर टाळली.. आणि गार्गी येणारे पाहुणे मंडळी सगळ्यांशी बोलण्यात आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यात व्यस्त होती.. तसच त्याच्याकडे बघून नेहमीसारखा उगाच काहीतरी गैरसमज होईल आणि तीच मन पुन्हा अस्थिर होईल म्हणून तिनेही प्रतिकसोबत बोलण्याचा प्रयत्न नाही केला..

गार्गी आणि गौरवच लग्न, सगळ्या विधी कुलदैवत सगळ काही पार पडलं आणि शेवटी सत्यनारायणाची पूजा झाली.. गार्गीच्या ओटीत फळे टाकली गेली.. आज गार्गी आणि गौरवच्या मधुचंद्राची रात्र आली, पण गार्गी मात्र मनातून खूप घाबरलेली होती.. कदाचित अजूनही ती मनापासून गौरव ला आपलं सर्वस्व द्यायला तयार झालेली नव्हती.. आणि गौरव तेवढाच उताविळ झाला होता.. गौरवच्या ताईने आणि घरातल्या आणखी बायका वहिनी वगैरे यांना सोबत घेऊन गार्गी आणि गौरवची शैय्या अत्यंत सूंदर फुलांनी , lightings वगैरे वापरून खूप सुंदर सजविली होती.. दोघांनाही खोलीत पाठवून सगळे आपापल्या जागेवर जाऊन झोपलेत..

गौरव अत्यंत खुषीतच आत येत..
गौरव - वाव गार्गी शेवटी आलाच आजचा दिवस.. किती दिवसांपासून वाट बघतोय मी.. झालं आपलं लग्न .. आता तर तुला हक्काने मिठीत घेऊ शकतो ना मी?? आणि तू पण नाही अडवू शकणार आता तर.. गार्गी तुला नाही माहिती मी किती किती आनंदी आहे आज...

गार्गी काहीच बोलत नव्हती गौरवच्या बोलण्याने ती आणखीच अस्वस्थ झाली होती.. गौरव आपल्याच धुंदीत बोलत होता.. पण गार्गी काहीच उत्तर देत नाहीय म्हणून त्याने गार्गीला हाक मारली.. ती ही लगेच वळली.. गौरवने तिच्या डोळ्यात बघितलं आणि तिच्या डोळ्यातली अस्वस्थता त्याला स्पष्ट जाणवली.. तो हळूच तिच्याकडे येत..

गौरव - गार्गी काय झालं?? तू इतकी अस्वस्थ का?? अग वेडे तुझ्या इच्छेशिवाय मी तुला हातही लावणार नाही, एवढा तरी विश्वास आहे ना तुझा माझ्यावर..

गार्गी आश्चर्याने त्याच्या डोळ्यात बघत होती.. तिच्या नजरेतल्या प्रश्न त्याला कळला..

गौरव - अग ते तर मी उत्साहात होतो म्हणून काहीही बरळत होतो.. सॉरी तू घाबरलीस का?? अग 10 महिने झालेत तू मला ओळखते तुझ्या इच्छेविरुद्ध काही केलंय का मी?? आणि हो अजून तर तुझं confirmation पण नाही मिळालं मला , ते मिळाल्याशिवाय मी तरी पुढे जाणार नाही.. ठीक आहे?? आता तरी थोडं रिलॅक्स हो.. लग्न झालंय पण तुझं मन काय म्हणतं ते ही महत्वाचं आहे ना.. बोल ना अशी इतकी गप्प का आहेस..

गार्गी - गौरव मी तुझ्या भावना समजू शकते रे आधीच 10 महिने वाट बघितली तू माझी आणि आजही मी अशा अवघडल्या स्थितीत आहे.. पण खरंच गौरव मी प्रयत्न करते आहे रे पण हे सगळं.. मला थोडा आणखी वेळ देशील का प्लीज..

गौरव - दिला.. तुला हवा तेवढा वेळ घे पण अशी दुःखी किंवा टेन्शन मध्ये नको राहू... तूझ्या इच्छेशिवाय मी कधीच कुठलीच बळजबरी तुझ्यावर कधीच करणार नाही हे आजच्या दिवशी वचन देतो मी तुला.. अग वेडे मी प्रेम करतो तुझ्यावर.. तुला आनंदी बघणं हा माझा पहिला उद्देश आहे.. तुला शरीराने मिळवणं हा नव्हे..

तो अस बोलला आणि गार्गीला भरून आलं.. तिने पटकन त्याला मिठी मारली.. आणि रडत रडतच ती त्याला धन्यवाद करत होती आणि सोबतच त्याची माफीही मागत होती.. गौरवही अगदी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत होता.. थोडावेळणी गार्गी शांत झाल्यावर दोघांनी भरपूर गप्पा मारल्यात.. पुढे 2 दिवसांनी दोघेही केरळला 5- 6 दिवसांसाठी फिरायला गेलेत.. खार यर ही सगळी प्लॅनिंग गौरवाने तिला ना विचारता आधीच केली होती त्यामुळे साधं फिरून तरी येऊ म्हणून ते गेले... तिथे त्यांनी पहिल्यांदा इतका दीर्घकाळ एकमेकांचा सहवास अनुभवला.. 3 दिवसांनी गार्गीचा वाढदिवस होता आणि गौरवने केरळमध्ये च तिच्यासाठी खूप छान सरप्राईज प्लॅन केला होता.. त्याने तिचा वाढदिवस केरळच्या झिल मधल्या होऊसबोटवर मनवला.. छान केक आणि केंडल लाईट dinner ते ही होऊसबोट मध्ये पाण्याच्या मधोमध.. अतिशय सुंदर पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा केला. भरपूर मस्ती, हलकासा रोमान्स (गार्गी परमिशन देईल तेवढाच ) आणि निसर्ग सौंदर्याची मजा , खूप सारे फोटो अशी आठवणींची शिदीरी घेऊन ते पुण्यात परत आले..

गार्गी आणि गौरवच सहजीवन आता खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालं होतं.. गार्गी गौरवची सगळी नीट काळजी घेत असे तर गौरवही गार्गीला जपत असे.. हळूहळू त्यांचं जीवन फुलू लागलं होतं प्रेमही बहरत होतं.. गार्गी मनाने ही गौरवच्या जवळ जाऊ लागली होती..

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुटी असली की दोघही जण नेहमी कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात भटकायला जात असत.. गौरवला अश्या वातावरणात फिरायला खूप आवडायचं तसच आता गार्गीला सुद्धा आवडू लागलं.. या आधी ती अशी कधी कुठे फिरायला म्हणून गेलीच नव्हती.. आणि आता गौरव मात्र तिची ही ईच्छा अगदी आनंदाने पूर्ण करायचा.. गार्गीचीही गौरवकडे भावनिक गुंतवणूक वाढत चालली होती.. तीही हळू हळू त्याच्यावर प्रेम करायला लागली.. पण अजूनपर्यंत त्याच्यापुढे कबूल केलं नव्हतं..

पुण्यात जिथे ते राहायचे तिथेच शेजारी यांच्यासारख्याच नवीन लग्न झालेल्या 3-4 जोड्या आणखी होत्या.. त्यामुळे यांचा मस्त ग्रुप तयार झालेला.. कधी दोघेच तर कधी ग्रुप ने सगळे मस्त मजा करायचे.. वेगवेगळ्या नवनवीन ठिकाणी कधी तिथे थांबत तर कधी एक दिवसात परत असा प्रवास करत कितीतरी ट्रिप त्यांनी केल्यात..

आता त्यांच्या लग्नाला 6 महिने झाले होते पण अजूनही ते शरीराने एक झाले नव्हते.. दोन दिवसांवर गौरवचा वाढदिवस आला.. गौरवला वाढदिवसाच काय गिफ्ट द्यावं म्हणून ती विचार करतच होती की तिला एक युक्ती सुचली.. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस काहीतरी अविस्मरणीय, काही तरी अस ज्याची तो कधीची वाट बघतोय .. अस त्याला द्यावं.. म्हणून मग तिने त्याला तिच्या मनीची बात सांगण्याचा निर्णय घेतला..

----------------------------------------------------
क्रमशः