दिवाळीची पूजा आटोपली... दोघेही तिथेच राहत असलेला गौरवचा मित्र आशिष त्याला भेटले , त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.. आणि त्याच्याकडून दोघांचे छान फोटो काढून घेतलेत.. काही गौरव बरोबर तर काही गौरवच्या आईबाबांबरोबर, काही पूजा करताना , रांगोळी काढताना, दिवे लावताना असे बरेच वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढून झाल्यावर त्यांचं फोटो सेशन संपलं..
सगळ्यांनी जेवण केलेत आणि थोडावेळ गप्पा मारून सगळे झोपी गेले.. गौरवला मात्र झोप येत नव्हती.. फोटो काढताना गार्गीचा झालेला स्पर्श आठवून तो मनातल्या मनात आनंदी होत होता.. आणखी विशेष म्हणजे एरवी ती त्याच्यापासून लांब पळायची पण आज गार्गीने कुठलाच विरोध केला नाही.. त्याने पटकन मोबाइल हातात घेतला आणि आज काढलेले फोटो बघू लागला.. पुन्हा पुन्हा तो गार्गीला बघत होता ती खूप सुंदर दिसत होती.. पण एक दोन फोटो मध्ये तिच्या चेहऱ्यावरचे भाव जरा वेगळे होते..
इकडे नवीन जागा आणि सासुच्या बाजूने झोपायचं या टेन्शन मुळेच गार्गीला झोप येत नव्हती.. ती ही जागीच होती.. तिलाही आजच फोटो सेशन आठवू लागलं.. ती मनातच विचार करत राहिली.. " आज मी गौरवला मला स्पर्श करण्यापासून अडवलं नाही.. कारण तो खूप खुश होता, उगाच त्याचा आनंद मला कमी करायचा नव्हता, आणि आशिष ही समोरच फोटो घेत होता, माझा विरोध करणं कदाचित याला संशयस्पद वाटलं असतं म्हणूनही.. आणि किती दिवस मी अस गौरवचा स्पर्श टाळणार आहे लग्न झाल्यानंतर तर मला अस नाही करता येणार ना.. आता मला या सर्वांची थोडी सवय करून घ्यावीच लागेल.. आणि काय कारण सांगून मी मनाई करत राहणार आहे.. कुठलच कारण या गोष्टीची पुष्टी करणार नाही की आता गौरवच माझा होणारा नवरा आहे आणि माझ्यावर त्याचा पूर्ण अधिकार आहे.. मला या सतत जाणवणाऱ्या अवघडलेपणा मधून बाहेर पडवंच लागेल.. साखरपुड्याच्या वेळी आम्ही अनोळखी होता पण आता तर खूप छान मैत्री झालीय आमची.. मीही थोड्याफार प्रमाणात का होईना त्याच्या गुंतत चालली आहे मग हा अवघडलेपणा का?? नकोच तो .. " स्वतःला समजावता समजावता तिला कधी झोप लागली तीच तिलाही कळलं नाही, इकडे गार्गीच्या फोटोला कवटाळून गौरवही झोपी गेला..
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बाबा देवपूजेसाठी फुलं आणायला बाहेर गेले होते आणि आई अंघोळीला.. गार्गी एकटीच किचन मध्ये गौरवसाठी चहा बनवत होती.. तेवढ्यात हळूच माघून येऊन गौरवने गार्गीला अलगद मिठी मारली, गार्गी एकदम दचकून
गार्गी - अरे काय करतोय?? कुणी येईल ना..
तो तसाच तिच्या कमरेभोवती त्याच्या हातांचा विळखा आणि तिच्या खांद्यावर त्याची हनुवटी ठेवत..
गौरव - अग, आई अंघोळीला गेलीय आणि बाबा फुलं आणायला.. कुणी नाहीय इथे बघणारं..
ती त्याचे हात सोडवण्याचा वायफळ प्रयत्न करत असते.. पण तो मात्र काही ऐकत नाही..
गार्गी - अरे पण आई येईल ना अंघोळीवरून.. किंवा अचनक बाबा येतील बाहेरून..
गौरव - ते कळेल ना आपल्याला..
गार्गी - हम्म, चान्स पे डान्स मारून घेतोय मग तू हं..
गौरव - का तुला नाही आवडलं का आपल्याला चान्स मिळाला ते..
गार्गी - तस नाही रे पण आता चहा सांडला असता ना..
गौरव - हम्म पण सांडला नाही ना.. आणि किती भारी ना तू माझ्यासाठी चहा बनवतेय.. मला तर वाटतंय तू आजच माझी बायको आहे..
गार्गी - हम्म बस बस अजून वेळ आहे लग्नाला.. आणि सोड आता मला..
गौरव तिच्या कानाजवळ त्याचे ओठ नेत..
गौरव - खरच सोडू..
त्याचा गरम श्वास गार्गीला तिच्या मानेवर जाणवला आणि त्यामुळे तीही शहारली.. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.. आणि दचकून गौरवने एकदम गार्गीला सोडून दिलं.. 2 सेकंद त्याला कळलंच नाही काय झालं.. मग गार्गीनेच डोळ्याने दाराकडे खुणावत सांगितलं की कुणीतरी आलंय.. आणि त्याच्या अशा गोंधळलेल्या स्थितीवर तिला फार हसू आलं..
गौरव - आताच यायचं होतं.. आणि तुला काय ग हसू येतंय?? थांब तुला बघतो जरा नंतर..
गार्गी - हो हो बघ बघ.. पण आधी दार उघड..
गौरवने दार उघडलं.. बाबा आले होते फुलं घेऊन.. आणि तो आपला tv लावत सोफ्यावर जाऊन बसला.. गार्गीने त्याला चहा नेऊन दिला .. त्यानेही एक प्रेमळ नजर तिच्यावर टाकली आणि ती ही लाजली.. लगेच वळत गार्गीने बाबांना विचारलं..
गार्गी - बाबा तुम्हाला आणू का चहा ??
बाबा - नको माझा झाला सकाळीच..
गार्गी ने एक तिरपी नजर पुन्हा गौरववर टाकली आणि त्याने नजरेनेच सांगितलं की चहा खूप छान झालाय..
आज गौरवची बहीण आणि भाचा येणार होते भाऊबीजेसाठी.. कालच ते गाडीत बसले, थोड्यावेळात त्यांची गाडी पोचली आणि गौरव त्यांना घेऊन आला.. जेवण , गप्पा झाल्यानंतर.. गार्गी तिची बॅग भरत होती... कारण आज रात्री तिचीही परतीची गाडी होती.. तिचा लहान भाऊ सुद्धा भाऊबीजेसाठी तिची वाट बघत होता. ती परत जाणार म्हणून गौरवचा चेहरा उतरला होता..
गौरव - काय ग, लगेच चालली पण..
गार्गी - अरे मी पाहुनी आली होती , जास्त दिवस कसं थांबणार?? आणि उद्या भाऊबीजेसाठी योगेश माझी वाट बघत असेल.. तसही लग्न आधी असे किती दिवस राहणार 2 दिवस खूप झालेत..
गौरव - हो पण मला आणखी तुझ्याबरोबर वेळ घालवायचा होता..
गार्गी - आता अस म्हणतोय , लग्न झाल्यावर कधी माझ्यापासून सुटका मिळते का याची वाट बघशील.. आणि लग्न झाल्यावर इथंच यायचं आहे ना मला कायमच.. थोडा धीर धर..
गौरव - आता तुझ्याशिवाय राहणं खूप जड जातंय ग.. किती उशीराच मुहूर्त काढलाय या पंडितजी नी..
गार्गी ला त्याच्या अशा उतावीळ पणावर खूप हसू येत होतं..
गौरव - हा.. तुला काय ग हसू येतं.. तेव्हा पण हसत होती आता पण हसते आहे.. इकडे माझी अवस्था काय झालीय.. आणि तू आपली दात दाखव.. जाऊ दे काही उपयोगच नाहीय बोलून..
गौरव जरा चिढतच बोलला आणि रुसून बसला..
आता गार्गीला मात्र त्याला मनवायच होत पण कसं ते मात्र कळत नव्हतं.. आज पहिल्यांदाच गौरव रुसला होता .. एरवी नेहमी ती रुसायची..
गार्गी - अरे अस रुसून काय बसतो लहान बाळासारखं.. पुढच्या महिन्यात येशीलच ना तू मला भेटायला..
गौरव काहीच बोलला नाही.
अरे मी जाणार आहे आणि तू मला अस रुसून रवाना करणारा आहेस का? माझं मन लागेल का तिकडे..
गौरव - तुला काय फरक पडतो .. मी रुसलो काय की हसलो काय..
गार्गी - मला का पडणार नाही फरक??
गौरव - तू कुठे प्रेम करते माझ्यावर... म्हणून तर तुला माझ्या भावना नाही कळत..
गार्गी - मला कळतंय रे की तुला आणखी वेळ हवा होता माझ्याबरोबर .. पण आता नाही ते शक्य तर जाऊ दे ना..
गौरव - अग मी तुला कुठेच फिरायला पण नाही घेऊन जाऊ शकलो..
गार्गी - आणि आता मी थांबली तरी आपल्याला जाता येणार आहे का?? नाही ना... आणिआता तर ताई (गौरवच्या बहीण)आणि पार्थ( गौरवाचा भाचा) पण आले आहेत.. तेव्हा... सोड ते सगळे विचार जाऊ दे .. आपण नंतर जाऊयात ना.. आणि लग्ना नंतर फिरव ना.. तेव्हा कोण अडवणार आपल्याला नाही का?? 😊
गौरव - काय ग सारख लग्नानंतर, सगळं काही लग्नानंतर अग त्याला अजून किती वेळ आहे आणि मला आता तू हवी आहेस.. तुझ्यासोबत राहावंसं वाटतंय ग..
गार्गी - चल रे .. उतावीळ कुठला.. आता रुसवा सोड बरं मला नाही मनवता यायचं तुला..
गौरव - हो ना मी उतावीळ झालोय.. तुला काही वाटतच नाही ना माझ्याबाबतीत.. म्हणूनच तू अस बोलते..
गार्गी - अस कसं बोलतो रे तू..
गौरव - मग काय खरंच आहे ना ते.. मी कितीदा आज पर्यंत माझं प्रेम व्यक्त केलं.. तुला वाटेल तेव्हा तुही बोलशील म्हणून किती वाट बघतो मी.. पण तू अजून पर्यंत तुझं प्रेम व्यक्त नाही केलंस.. म्हणजे तू प्रेम नाही करत माझ्यावर अजूनपर्यंत.. असच अर्थ झाला ना त्याचा..
गार्गी - अरे गौरव अस मला नाही बोलता येणार तू मला वेळ देणार होता ना मग.. आज का अस बोलतोय तू..
गौरव - सगळं काही बोलू शकते पण प्रेम आहे हे बोलून नाही दाखवत येणार??.. असू दे.. तस पण मी तुला काही बोल म्हणतच नाहीय, फक्त तुला माझ्या भावना कळणार नाही कारण तू प्रेम करत नाही असं बोलतोय मी..
गार्गी - बरं , मला नाही कळत तुझ्या भावना , ठीक आहे.. पण म्हणून तू मला असा माझ्यावर रागवून पाठवणार आहे का??
खरं तर गौरवला वाटलं होतं की आपण अस रुसल्यावर आणि अस बोलल्यावर कदाचित गार्गी तिच्या प्रेमाची कबुली देईल.. पण गार्गीने तस काहीच केलं नाही उलट हारती बाजू घेतली.. पण गौरवने आणखी एकदा पुन्हा प्रयत्न कारून बघितला
गौरव - हो ,असंच दुःखी होऊन पाठवणार मी तुला.. तसही तुला तर फरक नाहीच पडत ना..
गार्गी - गौरव अरे पुन्हा तेच... बरं सांग काय करू मी अस की तुला पटेल की मलाही फरक पडतो तुझ्या रुसण्याचा....
आता गौरवच्या हातात बाजी आली..
गौरव - बस मला एकदा तु माझ्यावर प्रेम करते अस बोल बस मग बघ मी कसा टुन टून उड्या मारायला लागतो ते..
गार्गी - अच्छा म्हणजे माझ्याकडून हे बोलावून घ्यायसाठी हे सगळे नाटकं आहे तर.. चल नौटंकी कुठला मी नाही बोलणार..
गौरव - फक्त हो की नाही असं तरी confirmation दे..
गार्गी - नाही अजिबात नाही.. दुसरं काही ओपशन असेल तर सांग..
गौरव - उमम, आहे .. पण तू त्यालाही नाहीच म्हणशील..
गार्गी - सांगून बघ..
गौरव - माझ्या गालावर तुझ्या ओठांचा गोड स्पर्श तरी मिळू दे..
गार्गी - काsssय?? जरा मोठ्याने ओरडतच गार्गी बोलली..
गौरव - अग हळू उऊ.. सगळे झोपलेले उठून बसतील ना ग..
गार्गी - अरे हे अस तू काहिही काय मागतोय.. अजिबात नाही.. काही सोपं सांग..
गौरव - मी आधीच बोललो होतो तू नाहीच म्हणशील ते.. असू दे मी असाच रुसून बसतो अजिबात नाही बोलणार तुझ्याशी..
गार्गी - दुसरं काही सोपं सांग ना..
गौरव - अ.. अ... एक मिठी??
गार्गी - next option...
गौरव - चल ग... जा तू .. तुला काहीच पटत नाही..
अस म्हणत गौरव रूम मधून निघून गेला.. गार्गी मात्र त्याच्या अशा वागण्यावर गालातच हसत राहिली.. म्हणतात ना आपण करत असलेल्या प्रेमापेक्षा आपल्यावर कुणी जीवापाड प्रेम करतंय ही भावना जास्त सुखावून जाते.. तोच अनुभव आज गार्गी घेत होती..
---------------------------------------------------
क्रमशः