She __ and __ he - 26 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 26

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 26

भाग__२६



राधा तिचा आवरत असते...ती आरशात बघते तर तिला रणजीत दिसतो...ती घाबरते आणि मागे वळून बघते तर तो नसतो...राधा खुप कंफ्यूसड होते...मग ती खाली येते...आणि नाश्ता करायला बस्ते...



राधा: आईssss जरा पाणी घेऊन ये ना ग...



मालती: आले....(पानी देत)...हम्म हे घे...



ती वरती बघते तर समोर साड़ी घालून रणजीत उभा होता...आणि तिच्याकडे बघून हसत होता...राधाच्या हतातून ग्लासच खाली पडला...तिने डोळे बंद करून पुन्हा उघडले...तर समोर मालती होत्या...



मालती: क़ाय ग क़ाय झाल...अशी का करतेस...



राधा: कककक काही नाही...मममम मी जज जाते..हहह हॉस्पिटलमध्ये....बाय....(बहेर पळत)



मालती: क़ाय बाई ही पोरगी...



************************



राधा: क़ाय होतय राधा तुला...सारखा रणजीत का दिसतोय मला..बहुतेक भास होतायत...शिई....



राधा विचार करत बसली होतीच..की तोवर तिचा फोन वाजला....



राधा:📱 बोल विकी...



विक्रम:📱 डार्लिग आज माझ्या घरी पार्टी ठेवले मी..असाच आपण youngsters आसनार फक्त...सो तू येते आहेस हा...



राधा:📱 हो बाबा...



तेवढ्यात वनिता सिस्टर राधाला बोलवतात...



विक्रम: आणि हो रण....



राधा: बर चल नतर बोलते मी......(फोन कट करून)



राधा त्याच पुढे काही ऐकुन न घेता फोन ठेवते...मग राधा तिचा कामाला लागते...विक्रम रणजीतला सुद्धा पार्टिला बोलावतो...पन दोघेही कामात इतके गुंतले होते की त्याच्या काहीतरी लक्षात नाही आल...



************************



संध्याकाळी राधा पार्टिसाठी तयार होते...पिंक कलरची फ्रॉक त्यावर हिल्स...हलकासा मेकअप करते..गळ्यात छोट मंगलसूत्र घालते आणि मस्त तयार होऊन विक्रमच्या घरी जायला निघते...काहीवेलाने ती विक्रमच्या घरी पोहोचते...



विक्रम: ए ब्यूटीफुल...हाय...



राधा: हाय....



पल्लवी: राधा...(मीठी मारून)



राधा: पल्ले मस्त आहेस ना...



पल्लवी: हो ग...



सनम: हाय कशी आहेस ग...



राधा: मस्त बड़ी...तू



सनम: मी पन...



जागृती: राधुडेsssssss......(उड़या मारून)



राधा: जीरूडेsssssss....(मीठी मारून)



विक्रम: ग हो हो...हळू जरा😂



पल्लवी: चला आता आतमध्ये...



जागृती: हो चला...



मग सगळे आत जातात राधा विक्रमच्या बाबाना ही भेटते..पार्टी सगळे एन्जॉय करत होते..तिचा ग्रुप डान्स करत होता...पण राधाच लक्ष कशात नव्हतं...मग ती कोल्ड ड्रिंक घेते आणि चेअर वर बसून पित असते..तर तिला रणजीत समोर दिसला तिने डोळे बंद केले परत उघडले..तर तो गायब झाला..आता तीच डोक दुखु लागल....तोवर एक वेटर आला....



वेटर: mam और कुछ चाहिए...?........(वोडकाची प्लेट खाली ठेवून)



राधा: (त्याच्याकडे बघत)....नो....थ थ....रणजीत😵😦 तू इकडे...नाही नाही..कुछ तो गड़बड़ है...(डोळे चोलुंन)



वेटर: जी क्या हुआ??



राधा: (मनात) अरे हा रणजीत नाही..मग मला हा रणजीत सारखा कसा दिसला ...अरेरे मी कोल्ड्रिंकच प्यायले ना नक्की..हो आहे तर कोल्ड्रिंक..(वास घेत).......आ ब कुछ नही...सॉरी ह...



वेटर: ओके...हा सर आया..



राधा: काय राधा...काय होतय तुला...कुल..शांत हो राधा..रणजीत कशाला येईल इकडे आणि आला तरी मला बोलायच नाही त्याच्याशी कस वागला तो माझ्याशी...आसो आलिया भोगासी असावे सादर...😑




राधा परत कोल्डड्रिंक पित बसते तर समोरच्या गेट मधुन रणजीत तिला येताना दिसतो (आता तो खरच अलाय) राधा डोळे चोलुंन त्यांला बघू लागली...पण तो गायब नव्हता झाला😂कारण तो खर आलाय...राधाला त्यांला इकडे अस अचानक बघून जरा शॉकच लागला...



रणजीत: विकी पार्टी ठेवायच काऱण क़ाय होत रे...



विक्रम: तुला नाही माहित...अरे लवकर लग्न करतोय मी म्हणून...



रणजीत: क़ाय...आ म्हणजे अभिनंदन...कोन आहे मूलगी..?



विक्रम: thank u.... Wait पल्लू...



पल्लवी: हाय रणजीत जीजू...



रणजीत: म्हणजे तू पल्लवीशी...?



विक्रम: हो..आम्ही आधी पासून रिलेशनशिप मध्ये होतो...



रणजीत: ओ...घरचे तयार झाले का..



विक्रम: हो माझ्या घरच्याना राधू ने आधी तयार केलेला...पल्लवीच्या घरी जरा आता मागे प्रॉब्लम झालेला...पन राधाने तिच्या घरच्याना ही मनवल...



पल्लवी: हो खरच ग्रेट आहे आमची राधू...



विक्रम: मी तर एवढा टेशनमध्ये आलो होतो ना यार तिला मी रात्री २ वाजता फोन करून सांगितलेल माहित आहे...



रणजीत: क़ाय...(मनात)....म्हणजे त्यादिवशी त्यांच हे बोलन चालू होता...शिई रणजीत क़ाय केलेस हे तू...



पल्लवी: हो...आणि खर हा राधा ना अमच्यासाठी काहीही करू शकते...विकीसाठी तर होच..कारण आम्ही तरी तिला कॉलेजमध्ये भेटलो...विकी आणि जागृती लहानपना पासुन तिचे फ्रेंड्स आहेत...



विक्रम: हो...अरे आधी ना हिला पण वाटायच की माझ आणि राधाचा काही आहे की क़ाय म्हणजे प्रेम वैगेरा...पन मी तिला सांगितल की राधा मला खुप आधी पासून राखी बांधते...आम्ही बेस्ट फ्रेड सोबत भाऊ बहिन पन आहोत...हा आता आम्ही वागतो तसे की कोणाला ही संशय येईल.......😃



रणजीत: क़ायssss....आ म्हणजे वाव....(मनात)....बग रणजीत तू राधावर डाउट घेतलास...वहिनी बरोबर बोली होती स्प्ष्ट बोलायच गैरसमज नाही करून घ्यायचे...आता मात्र राधाशी बोलावच लागेल..इतकी माती कशी खाल्ली मी...



विक्रम: बर रणजीत थंब जरा आलो मी...



रणजीत: या ओके...



विक्रमशी बोलून झाल्यानंतर रणजीतला राधा दिसली त्यांला ही तिला इकडे बघून जरा धक्काच बसला...आणि आनंद ही झाला...



रणजीत: अरे राधा इकडे...बर झाल मला बोलता तरी येईल तिच्याशी..माफी मागतो तिची.....ह्म्म्म....



मग तो राधा जवळ गेला..राधा त्यांला डोळे मोठे करून बघत होती..तिला अजुन कळत नव्हतं हा खर आलाय की नाही...राधाने त्यांच गडबडीत तिकडे ट्रेमध्ये असलेल्या वोडकाचे ग्लास उचलले आणि पिउ लागली...५-६ ग्लास तिने असे संपवले सगळ इतक पटकन झाल की रणजीतला तर कळलच नाही...



रणजीत: (तिचा हात पकडून)...राधा...Stop..बस झाल अग काय पीतेस तू .....(वास घेऊन) ....ई अग वोडका आहे ही....बापरे..राधा अग तू एवढ्या पटापट ५-६ ग्लास संपवले....



राधा: (नशेत)....हम्म्म्म....



रणजीत: एक मिनिट तू इकडेच बस ह..मी विकीला सांगून आलो अपन घरी जातोय म्हणून..ह थांब...



रणजीत विक्रमला शोधत जातो राधा तिकडेच बसून होती..राधाला खुप चढली होती..डोळे बारीक करून ती रणजीतला बघत होती...तेवढ्यात रणजीत जवळ २-४ मुलीं आल्या त्यांच कौतुक करू लागल्या सेल्फी काढू लागल्या (कारण तो टॉपचा बिझीनेस मेन होता म्हणून)...राधाला हे बघून राग आला त्यात ती होती नशेत....मग ती हलत डुलत उठली रणजीत जवळ गेली आणि त्यांला मागे खेचल...



राधा: (थोड़ अडकत)....ओय..काय आहे...काय चालय...😡



मूलगी: कोन तू..तुला काय प्रॉब्लम आहे..रणजीत तर टॉपचे बिझीनेस मैंन आहेत..म्हणून आम्ही फोटो काढत होतो...



राधा: कोन तू......(शब्दावर जोर देत)...वाss..👌तुम्ही पेपर बघत नाही वाटत..तू तुम्हला फक्त पेपर मध्ये रणजीत दिसतो पन त्याची बायको र र राधा नाही...माझा नवरा आहे हा...(त्याच्याकडे बघत)....काय रे आहेस ना...



रणजीत: (गोंधळत)...आ आ हो हो...



राधा: मग पागल मांझा नवरा आहेस तर सांग ना...घाबरतो काय...आणि तुम्ही लांब राहयच मझ्या नवरयापासून मला नाही आवडत त्याच्या जवळ कोणी आल तर ..काय समजल....(हलत)...कॉन्फ्लेक्स...आ सॉरी चुकल....आ नॉनसेंस...हा आता बरोबर..😄



रणजीत: सॉरी गर्ल्स...



मूलगी: ईट्स ओके..सर..



रणजीत: राधा चल तू......(तिला घेऊन जात)



राधा: (त्याच्या गळ्यात पड़त)....आ विकुड़ी....विकुड़ी...



विक्रम: राधू....Are you drunk??? आता निट होतीस आणि....



रणजीत: हो अरे ६ ग्लास वोडका प्यायली ती...मला पन आधी समजल नाही...



विक्रम: अरे यार..हिने आधी कधी घेतली नाही रे...



रणजीत: हो बर आम्ही घरी निघतो...सॉरी ह..तू बाकीच्याना पन सांग हा...



विक्रम: अरे सॉरी नको बोलूस जा तुम्ही...निट जा..



राधा: विकुड़ी.. बाय..आपण नेक्स्ट टाइम सगळे पजामा पार्टी करू ह...



विक्रम: हो ओके राधा आता तू गप घरी जा...नाहीतर सगळे आपला पजजामा काढतील....



राधा: नको..नको मी तर पजजामा घातला पण नाही आहे.....😂 ओके बाय...
(वेटरला चिडवत)....ए टकल्या...😂निट जा नाहीतर फुटतील... ग्लास रे😆



रणजीत: राधा shut up....
(वेटरला बघत)...सॉरी ह काका..चल राधा...(तिला ओढ़त)



रणजीत राधाला कस बस बाहेर घेऊन येतो...ती नुसती मस्ती करत होती...😂



रणजीत: शिवा...



शिवा: ह साहेब...अरे राधा ताईना काय झाल...



रणजीत: अरे ती चुकुन वोडका प्यायली..ऐक हे कोणाला घरी बोलू नको ह...आणि तू आता गाड़ी घेऊन घरी जा मी दुसऱ्या गाडीत येतो..ह निट जा..



शिवा: बापरे...हम्म नाही सांगणार साहेब...ओके साहेब...



राधा: अरे.....श शिवा दादा...कस क़ाय बर ना...आणि फुलवा कशी आहे.?



शिवा: मी मस्त ताई..पन ही फुलवा कोन?



राधा: क़ाय दादा स्वतःच्या मुलीला विसरला...



रणजीत: राधा....त्यांच्या मुलीच नाव दुर्वा आहे...फुलवा नाही..🤦🏻‍♂️आपणच नाही का नाव ठेवलेला तूच विसरली का आता..




राधा: अच्छ...फुलवा कोन मग?



रणजीत: राधा ग....सोड शिवा तू जा आता घरी....



शिवा: हो साहेब.....



शिवा गाड़ी घेऊन निघुन जातो...रणजीत राधाला गाडीत बसवतो आणि तो बसत असतो तर ती पुन्हा बाहेर जाते...अस ती खुपवेळा करते..शेवटी ती गाडीत बसते...रणजीत दार लॉक करतो...



राधा: रणजीत विंडो उघड़ न...प्लीज....



रणजीत: (विंडो उघड़त).....ह्म्म्म...



राधा विंडो उघड़ते तेव्हा थंड हवेत मस्त बाहेर बघत बसते...रणजीत तिला असच न्याहळत ड्राईव करत असतो...तेवढ्यात राधा रेडियो ऑन करते आणि सॉन्गवर गाडीतच डान्स करायला लगते आणि जोरात ओरडत गाण बोलते...



हा भार सोसेना जड झालाय पिकावानी
अंगात ज्वार भरलं तुझ्या प्रितीच पाज पाणी
घुमाजी राव माझा सांगा होणार का धनी
रात्रीला झोप नाही दावी लाव्तीया पापणी
चांद तु पुनावाचा तु रूपान गोजिर वाणी
जीव माझा जळतोया होत काळजाचं पाणी पाणी
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली



पोरं होते मी जवान झाले ऐन जवानीत बहरून आले
हि सुगंधी धुंद काया भेट देते तुला
मावळा मी मर्द गाडी हि मिठीची हीच घडी
दे ईशारा इश्क सारा येना माझ्या फुला
तुरू तुरू चालू नकोगुलू गुलू बोलू नको
टकमक टकमक पाहू नको सोडून साथ कधी जाऊ नको
प्रेमाची स्टोरी चाल शेतात जाऊ राणी
अन् वाटात सूर भिडलं चल गाऊया गावरान गाणी
कोंबडी पळाली इथ भर उडाली फड फड फडाला लागली
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली...🐥😀😆



राधाला अस बेभान नाचताना रणजीत पहिल्यांदा बघत होता...त्यांला आश्यर्च वाटल की राधाला ही छान नाचता येत...फाइनली ती दमली आणि गप्प बसली...रणजीतने तेव्हा सुटकेचा श्वास घेतला...



राधा: रणजीत...रणजीत....ऐक ना..



रणजीत: ह्म्म्म



राधा: तू आज मला ओरडला ना..खुप वाइट वाटला मला...तू अस ओरडायला नको होत मला...मी खुप रडले..तू खुप दुष्ट वागलास माझ्याशी...



रणजीतला हे ऐकुन जरा डोळ्यात पानी साचल...पण त्याने कंट्रोल केला...



राधा: मला ना तू आता कुठे....कुठे....



राधा बोलताना मधेच झोपली...मग रणजीतने गाड़ी राधाच्या घरी वळवली....दाराची बेल वाजवली मालती राधाला अस बघून थोड्या डचकल्या...



मालती: रणजीत राव...आहो..सोने अग ये सोने..काय झाल राधाला...तुम्ही अस पकडून का आनल....



मनोहर: अरे रणजीत राव....फुलपाखरा...काय झाल माझ्या फुलपाखराला...



रणजीत: बाबा...मी सांगतो नंतर घाबरु नका...आधी मी राधाला तिच्या खोलीत झोपवू का...



मनोहर: हो हो..



रणजीत: ह्म्म्म आलोच...



रणजीत राधाला उचलतो आणि तिच्या खोलीत घेऊन जातो...राधा नशेत काहीतरी बड़बड़ करत होती...खोलीत जाउन रणजीतने तिला बेडवर झोपवला तर तिने त्याचा हात पकडला आणि उठून बसली...



राधा: (त्याचा हात पकडून)....अय्य साखरपेकरांचा सलमान...कुठे चालला तू...



रणजीत: राधा तू झोप..आपण नंतर बोलू ह...



राधा: का...मला आताच बोलायच आहे..अरे आपण आंपल्या घरी आलो पण...



रणजीत: राधा..तू झोप ना आता..



राधा तरी ऐकत नाही...बड़बड़ करत थोड़ी झोपते..मग रणजीत खाली जाउन मालती आणि मनोहर यांच्यासोबत बसतो...



रणजीत: बाबा आई आहो..काय झाल मी आणि राधा विक्रम आहे ना त्याच्या पार्टीला गेलो होतो घरी...तिकडे गडबडीत राधाने चुकुन वोडका पीली...सो..



मनोहर: (हसत)....अरे बापरे😂😂



मालती: बाई अवघड आहे या पोरीच...अजुन पन गड़बड़ करतेच...



रणजीत: म्हणजे या अवस्थेत मी तिला घरी नेल तर कोणी काही बोलणार नाही पन..माहित नाही मला वाटल इकडे आनाव तिला मग आनल...चला मी निघतो..



मालती: रणजीत राव तुम्ही पन थांब आज इकडे...



मनोहर: हो



रणजीत: हम्म ठीके..



मनोहर: बर जेवायला वाढू का तुम्हला?



रणजीत: बाबा आहो नको खाऊन अलो मी..



मनोहर: बर...आम्ही जातो झोपायला तुम्ही राधाच्या खोलीत जा...गुड़ नाइट



मालती: गुड़ नाइट



रणजीत: good night....



रणजीत घरी फोन करून आईला कलवतो...आणि राधाच्या खोलीत जातो...दार लावून मागे वळतो की राधा बेडवर उठून बसली होती...तिला अस अचानक पाहून रणजीत आधी थोड़ा घाबरलाच...त्यांला अस घाबरलेल पाहून राधा हसू लागली...



रणजीत: र र राधा तू झोपली नाहीस...



राधा: नाही..मी तुला भोव करायला थांबले..😀😆



रणजीत: (मनात)...राधाची नशा उतरवायला लागेल..नाहीतर ही झोपनार नाही...सकाळी हिचा डोक अजुन जड़ होइल...हम्म..



राधा: (जोरात ओरडत).......मै मेरा दिल और तुम हो यहाँ..फिर क्यों हो पलके झुकाए वहां..तुमसा हँसी पहले देखा नही..तुम इसे पहले थे जाने कहाँ..जीने लगा हु पहले से ज्यादा पहले से ज्यादा तुम पे मरने लगा हु..ह्म्म्म ह्म्म्म हो हो...ललाल....



रणजीत: (तिच्या तोंडावर हात ठेवून).....राधा...अग २ वाजलेत रात्रीचे..दुपारचे नाही..ओरडू नकोस ग...शांत हो...



तोवर राधा रणजीतच्या डोळ्यात बघते...रणजीत पन तिच्या डोळ्यात बघतो...हळूच तोंडावरचा हात काढतो...तर राधा पुन्हा जोरात गाण बोलायला लागते...मग रणजीत तिला शांत करतो..



राधा: रणजीत...आपल्याला बेबीज कधी होतील....



रणजीतला तिच्या या प्रश्नावर ठसकाच लागला😂आता कय सांगव हिला😆😅



रणजीत: होतील हु....



राधा: ह मला न एक मुलगा आणि एक मूलगी पाहिजे...😃मी तर नाव पन ठरवून ठेवलेत...तुला आता नाही सांगणार सिक्रेट आहे😄



रणजीत: बर बाई...



राधा: मला पन माझ motherhood एंजॉय करायचा आहे...अनुभव घ्यायचा आहे..😃मला फक्त तुझ्याच मुलांची आई व्हायच्य कारण......(मधे थांबुन)



रणजीत: काय....



राधा त्यांला पुढे काय सांगतच नाही..जाउन रेडियो ऑन करते..तेव्हा तरी निदान ती शांत बसते..मग रणजीत तिचे ज्वेलरीज काढतो आणि तिला बाथरूममध्ये घेऊन जातो...



रणजीत राधाला शॉवर खाली उभ करतो..पाणी जस राधाच्या अंगावर पड़त राधाला बाजूला होऊन रणजीतला मीठी मारते...मग रणजीत पन राधाला तसाच घेऊन शॉवर खाली उभा राहतो...दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघतात..आणि हरवून जातात...



बाहों में चले आओ
बाहों में चले आओ
हम से सनम क्या पड़दा
ये आज का नही मिलन
ये संग है उम्र भर का
बाहों में चले आओ
हम से सनम क्या पड़दा..



रणजीत कस तरी स्वतःला सावरतो आणि बाथरूमच्या बाहेर येतो...राधा त्याच्या मागे येते आणि त्यांचा हात पकडते...नजरेनेच त्यांला नको जाउस सांगते आणि त्यांला मीठी मारते...रणजीतला ही तिची मीठी हवी होती तो ही थोड़ा सुखावला.....(कारण तुम्हला माहित आहेच....)



चले ही जाना है नजर चुरा के यू
फिर थामी थी साजन तुम ने मेरी कलाइ क्यों
किसी को अपना बना के छोड़ दे,ऐसे कोई नही करता
बाहों में चले
हमसे सनम क्या पड़दा
हो हम से सनम क्या पड़दा
♥️♥️



राधा: रणजीत ..मला सोडून कधीच जाऊ नकोस...



रणजीत: (इमोशनल होऊन)....ह्म्म्म...



राधा रणजीतचा चेहरा तिच्या ओंजळीत पकड़ते...आणि त्याच्या कपाळावर,डोळ्यांवर,गालावर किस करते...तिच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे रणजीत थोड़ा लाजला पन जास्त घाबरला..त्यांला कळलच नाही राधा हे का करतेय...मग राधा रणजीतच्या ओठांजवळ गेली...राधाच्या ओठांची थरथर रणजीतला जाणवत होती..पुढे काही होण्या अधिच...राधा त्याच्या खांद्यावर पडली..😆😂(रणजीतचा पचका झाला,बिचारा😂😆)



मग रणजीतने तिला उचलून बेडवर बसवल..आता ती गाढ़ झोपली होती...मग जाऊन मालतीना बोलावल आणि तिचे कपड़े चेज करायला सांगितले..केस पुसायला सांगितली आणि तोवर रणजीत मनोहर यांच्या सोबत होता..त्याने ही त्यांच अंग पुसल...मग मनोहर यांनी दिलेला टी शर्ट आणि ट्रैक घातली...मग खोलीत तो ही सोफ्यावर जरा पडला...



रणजीत: (मनात)....राधा आज जे काही वागली ते काय होत.....(थोड़ हसत)....ती किस😅😃...आणि ती काहीतरी बोलात होती...काय माहित...आणि क़ाय बोली मला साखरपेकरांचा सलमान.....पन आज एक वेगळीच राधा मला दिसली...तिचा तो डान्स बापरे😂...आणि बेबीज...खर राधा पन ना...



रणजीत या सगळ्यात डिवोर्सच,त्यांचे वाद विसरतो..त्यांला राधाशी बोलायच होता हे ही विसरतो...मग तो ही शांत झोपी जातो....




क्रमशः