ATRANGIRE EK PREM KATHA - 6 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 6

Featured Books
  • Venom Mafiya - 5

    अब आगेराघव मल्होत्रा का विला उधर राघव अपने आदमियों के साथ बै...

  • रहस्यमय हवेली

    रहस्यमयी हवेलीगांव के बाहरी छोर पर एक पुरानी हवेली स्थित थी।...

  • किट्टी पार्टी

    "सुनो, तुम आज खाना जल्दी खा लेना, आज घर में किट्टी पार्टी है...

  • Thursty Crow

     यह एक गर्म गर्मी का दिन था। एक प्यासा कौआ पानी की तलाश में...

  • राम मंदिर प्राण प्रतिष्ठा - 14

    उसी समय विभीषण दरबार मे चले आये"यह दूत है।औऱ दूत की हत्या नि...

Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 6

सीमा : "अरे वाह शौर्य तु कोणाच्या प्रेमात पडलास..आम्हाला पण कळू दे. कोण आहे ती लकी गर्ल.."

शौर्य समीराकडेच बघतो..

(दोन मिनिटं का होईना सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. )

सीमा : "शौर्य मी तुझ्याशी बोलतेय."

"आहे कोणी तरी.. स्पेसिअल", शौर्य थोडे रोमँटिक असे हाव भाव चेहऱ्यावर आणतच बोलतो..

राज, वृषभ आणि टॉनी तिघेही त्याच्याकडे बघतात. हा आता सांगतोय की काय अस त्यांना वाटत असते..

समीरा : "आम्हाला सुद्धा सांगु शकतोस..नाही म्हणजे जर तु आम्हाला आपलं समजत असशील तर.."

"ठिक आहे तु एवढं बोलतेस मग सांगतो. मी जिच्या प्रेमात आहे ती.."शौर्य समीरावर आपली नजर रोखत बोलायच थांबतो..

"ती म्हणजे"

(चौघेही टक लावुन शौर्यकडे बघत बसतात..पण शौर्य मात्र समिराच्या चेहऱ्याचे भाव टिपत असतो)

"नक्की सांगु.??" शौर्य सगळ्यांवर आपली नजर फिरवतच विचारतो..

राज : "शौर्य फक्त एकच मिनिट हा.. ए वृषभ रोहनला हॉटेल बुकिंग केन्सल करायला सांग... आणि हो अजून एक.. मनवी आणि तो जिथे कुठे असतील त्यांना तिथुन रिटर्न जायला सांगितलंस तरी चालेल.."

शौर्य : "तुला काय झालं अचानक..??"

राज : "आजचा प्लॅन तु विस्कटायचा ठरवलायस अस दिसत आहे मला म्हणून बोललो.."

सीमा : "एक मिनिट तो कुठे प्लॅन विस्कटतोय?? आणि तु आधी आम्हाला कळेल अस बोल.."

राज : "नाव कळलं की सगळंच कळेल.. हो ना शौर्य..??"

समीरा : "राज तु काय बोलतोयस?? हे सगळं जाऊ दे शौर्य तु नाव सांगणार होतास.."

शौर्य : "कोणाचं??"

समीरा : "तु जिच्या प्रेमात पडलायस तीच रे.. अस काय करतोयस??"

शौर्य : "अरे हो विसरलोच.. तीच नाव तुम्हाला माहीत असेल. आय मिन माझ्या पेक्षा तुम्हीच तिला जास्त ओळखत असाल. मी तर आत्ताच ओळखु लागलोय. ही पण थोडी तिच्यासारखीच आहे.."

"कोणासारखी??", समिराच हृदय धडधडू लागलं

"जिच्या मी आधी प्रेमात होतो..", शौर्य केसांवरून हात फिरवत एका वेगळ्याच विचारांत हरवतच बोलतो.

वृषभ आणि टॉनी एकमेकांकडे बघु लागले..

"हा त्यादिवशी तर बोलत होता ही पहिलीच आहे.. आणि मोठं मोठे डायलॉग मारत होता.." राज हळूच वृषभ आणि टॉनीच्या कानात पुटपुटला.

"बघ तर" दोघेही त्याला साथ देत बोलतात..

सीमा आणि समीरा दोघीही एकमेकांकडे बघु लागले..

शौर्य : "तीच नाव संगण्याआधी मी पहिलं तीच नाव सांगेल जिच्या पहिल्यांदाच अखंड प्रेमात बुडुन गेलो होतो.."

शौर्यच अस बोलणं ऐकुन समीराचा पडलेला चेहरा ह्या गोष्टीची शौर्यला खात्री देत होत की तिला शौर्यच्या आयुष्यात तिच्या व्यतिरिक्त कोणी असन हे पटल नाही पण आपल्यापेक्षा दुसर त्याला कोण आवडत तीच नाव ऐकुन घेतल्याशीवाय तिला स्वस्थ ही बसवणार नव्हतं.

"जिने माझ्या हृदयावर जादु केली.."

"आणि तीच नाव आहे.."

"मुंबईssss.."

समीरा : "काय??"

शौर्य : "आणि हो आत्ता मी दिल्लीच्या प्रेमात पडत चाललोय.."

"एकच नंबर" वृषभ शौर्यला हाय फाय देतच बोलतो..

सीमालासुद्धा हसु येत.. तुझं चालु दे मी मनवीला कॉल करून बघते कुठपर्यंत आलीय ते.

समीरा : "घाबरवलस तु आज मला.."

(समीरा हळुच बोलली कोणाला ऐकु न जाईल असा पण शौर्यला मात्र ते ऐकु गेल)

शौर्य : "तु का घाबरलीस..??"

(समीरा खाली बघत आपली जीभ चावू लावली.. न काही बोलता जणु काही तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली.)

समीरा : "मला वाटलं मी चुकीच्या व्यक्तीशी मैत्री केली.. मला असली मुलं नाही आवडत अजिबात.. आज एक आणि उद्या एक.."

शौर्य : "हो का..??"

समीरा : "नक्की ना तु असा नाहीस??"

शौर्य काही बोलणार पण अचानक एक इनोवा क्रिस्टा त्यांच्या बाजूला येऊन थांबते.. सगळे एकमेकांकडे बघु लागतात.

राज : "वृषभ तु ओला बुक पण केलीस?? अजून रोहन आणि मनवी यायचे आहेत."

वृषभ : "नाही रे अजुन मी नाही बुक केली आणि तुला ती नेम प्लेट्स येल्लो दिसतेय का??(राजच्या डोक्यात एक टपली मारत वृषभ बोलला) ही कोणाची तरी स्वतःची गाडी आहे. सगळं शिकवावं लागत ह्या मुलाला"

"हा यार.. येह तो मेने सोचा ही नही" राज डोकं चोळत बोलू लागला..

हळूहळू विंडोची काच खाली जाऊ लागली तसा रोहन आतुन सगळ्यांना हात दाखवत आत यायला सांगतो.

वृषभ : "क्या बात हे यार.. तु चक्क गाडी घेऊन आलास."

रोहन : "अरे डॅड नाही आहेत घरी बीजीनेस मिटिंगसाठी मुंबईत गेलेत. मग काय घेऊन आलो.."

टॉनी : "मस्तच !"

रोहन : "आले का सगळे??"

समीरा : "नाही ना मनवी यायची बाकी आहे.."

"सॉरी गाईज थोडा उशीर झाला..", मनवी धापा टाकतच बोलली.

रोहन : "आत या ना.. तुम्ही सगळे.."

सगळे जाऊन गाडीत बसतात. शौर्य रोहनच्या बाजूच्याच सीटवर बसतो.. रोहन गुगल मॅप चालु करतो..


रोहन : "पंधरा वीस मिनिट लागतील आपल्याला पोहचायला.. शौर्य तु तो सीट बेल्ट लाव आधी.. कारण तु माझ्या बाजुला बसलायस.."

शौर्य : "तु मला सांगतोयस की घाबरवतोयस??"

राज : "ए रोहन तुला येते ना नीट गाडी चालवायला..??"

रोहन : "कधी कधी मुड असला की चालवतो मी नीट तस.. पण कधी कधी चुका होतात माणसांकडून.."

मनवी : "आर यु किडींग अस??"

रोहन : "नो आय एम सिरीयस.."

शौर्य : "एक मिनिट तु उठ मी ड्राइव्ह करतो.. "

"तुला पण ड्राइव्ह करता येत??",सगळे एकत्रच विचारू लागले..

शौर्य : "ऑफकोर्स येत.. तुम्ही सगळे असे ओरडुन का विचारतायत???"

रोहन : "मी दमलो की तु चालव.. आणि एवढं पण घाबरू नका. आज चालवेल मी व्यवस्थित.."

शौर्य : "रोहन मस्ती नको यार. मी ड्राइव्ह करतो दे..."

रोहन : "तुला नक्की येत ना.."

शौर्य : "हो रे तु उतर बघु गाडी बाहेर."

रोहन : "बर ठिक आहे ये.."

"जर ड्राइव्ह करत बसलो असतो तर तिला नीट बघु शकलो नसतो.." रोहन बाहेर येताच आपला एक डोळा मिटतच शौर्यला बोलला..

शौर्य : "तुझ्यासाठी काय पण.. एन्जॉय कर.."

दोघेही आपापल्या सीट चेंज करतात..

रोहन : "तुझ्याकडे कोणती गाडी आहे.?"

"Roll-Royance Cullinan.", शौर्य सहज बोलुन गेला..

रोहन लगेच पाठी आपल्या इतर मित्रांकडे बघु लागला..

"तुझ्याकडे Roll-Royance Cullinan आहे ह्याचा काय प्रूफ आहे..??" राज संशयी नजरेने त्याच्याकडे बघतच बोलतो..

समीरा : "अस काय बोलतोस त्याला.. असू पण शकते.."

रोहन : "तुला माहिती त्या कारची किमंत 300000 डॉलर्स प्रेक्षा ही जास्त आहे म्हणजे 6 करोड.."

"हो का?? मग मस्ती करत होतो मी. माझ्याकडे लिनोव्हा आहे."शौर्यला उगाच इथे तो किती श्रीमंत आहे हे दाखवायचं नव्हतं.

रोहन : "बघितलंस??"

शौर्य : "ए म्युसिक लाव ना.."

रोहन : म्युसिक सिस्टिमला ना माझा मोबाईल नाही कनेक्ट होत..

"माझा करून बघ मग..", शौर्य खिश्यातून मोबाईल काढून रोहनकडे देतो.

राज : "त्यापेक्षा मोबाईलमध्ये लाव ना.."

मनवी : "नको.. त्यापेक्षा आपण अंताक्षरी खेळुयात.. "

समीरा : "अंताक्षरीपेक्षा एकेकानी गाणी गाऊयात.. कारण आपण लगेच पोहचू आता.."

राज : "ठिक आहे मग सुरुवात शौर्य करेल.".

शौर्य : "मीच का??'

राज : "कारण तुच प्रेमात पडलायस.."

वृषभ आणि टॉनी जोरात हसु लागतात..

मनवी आणि रोहन : "कोणाच्या???"

सीमा : "आता सांगा ह्यांना पण."

राज मगाशी घडुन गेलेला प्रसंग सांगतो.. मगासचा प्रसंग पुन्हा डोळ्यांसमोरुन तरंगून गेल्यामुळे सगळेच पुन्हा हसु लागतात.


रोहन : "शौर्य एक गाणं तर बनता हे बॉस.."

"एहहह शौर्यss.. शौर्यsss.." सगळे त्याला चिअर्सप करू लागले..

शौर्य : "ओके ओके.."

शौर्य ड्राइव्ह करता करताच पुढे असणारा मिरर नीट करतो जेणे करून त्याला समीरा दिसेल..

¶¶हम्मम हम्म्म हम्ममम
तुझसे ही तो मिली है राहत....
तू ही तो मेरी है चाहत.....
तुझसे ही तो जुडी ज़िन्दगी....

तेरी यादें हैं कुछ अधूरी....
सांस आधी है कुछ है पूरी...
आँखों में है कैसी ये नमी....
मेरा मन... कहने लगा...
पास आके ना तू दूर जा...

छूने दे होंठ तेरे...
ज़रा साँसों में अपनी बसा आ …हुं …

तुझे अपना बना लूं
तुझे तुझ से चुरा लूं
तुझे खुद में छुपा लूं साहिबा
इक मुझ पे करम हो
तू ही मेरा सनम हो
तेरी मुझ पे नज़र हो, साहिबा
हमम … आ आ …¶¶

(शौर्य गाणं बोलताना समिराकडे चोरून बघत असतो समीरला ही जाणवत असत की हे गाणं आपल्यासाठीच आहे ते)

सगळे एकत्रच टाळ्या वाजवतात..

"वाह... तोडलस मित्रा!" राज जोरात टाळ्या वाजवत बोलत बोलु लागला..

वृषभ : "मस्तच शौर्य.. तुझा आवाज खूप छान आहे.."

शौर्य : "थेंक्स गाईज.. आय थिंक आपण पोहचलोय.."

रोहन : "हो ते बघ समोर आहे तेच.."

गाईज तुम्ही इथेच उतरा मी आणि शौर्य गाडी पार्क करून येतो.

शौर्य आणि रोहन मिळुन गाडी पार्क करून येतात.

सगळेच रोहनसोबत आतमध्ये जाऊ लागले.. मॅनेजर रोहनला बघताच हॅलो सर बोलतो..

रोहन : "हॅलो.."

मॅनेजर : "सब ठिक सर??.."

रोहन : "हा सब ठीक.. ये सब मेरे फ्रेंड्स हे.. कल मेने कॉल करके बुकिंग किया था.."

मॅनेजर : "येस सर आय रिमेम्बर देट.. प्लिज वेलकम सर.."

मॅनेजर दरवाजा उघडून सगळ्यांना आत वेलकम करतो..

मनवीच्या हृदयात आता मात्र रोहनने पूर्णपणेच जादू केलेली.. तिच्या स्वप्नातल्या राजकुमारा प्रमाणेच रोहन एक श्रीमंत आणि दिसायला तर तो एखाद्या राजबिंडाप्रमाणे होताच.

शौर्यतर पहिल्यांदाच अश्या ठिकाणी जात होता. त्यामुळे मनात थोडा संकोच ठेवतच तो आत गेला.


वृषभ : "क्या बात हे रोहन.. ओळखी भारी आहेत तुझ्या.."

रोहन : "अरे ओळख नाही हे आमचंच हॉटेल आहे. फक्त आम्ही रेंटवर दिलंय.."

सगळे एकमेकांकडे बघु लागतात.

"गाईज तुम्ही काय घेणार का?? हा आपलाच मित्र आहे ह्याला सांगा.." एका वेटरची ओळख करून देत रोहन बोलला

राज : "ए गाईज आधी आपण नाचूयात मग पियायच बघु.."

सीमा आणि समीरा त्याच्याकडे रागाने बघते..

"आणि त्याचबरोबर खायचंही आपण नंतर बघु.. राज दात चावतच बोलु लागला..

सीमा राजला रागातच काही बोलणार तोच झिंगाट गाणं वाजलं.. तेही मोठ्या आवाजात.. त्यामुळे राज येहहहss करत तीच बोलणं न ऐकताच नाचायला गेला.. सोबत सगळे एकदम बेभान होऊन नाचु लागले..

सीमा समीराला राज बद्दल सांगु लागली पण तीच लक्ष मात्र शौर्यकडे. शौर्यच नाचणं तिला त्याच्याकडे आकर्षित करत होत. त्यात त्याच्या गालावर फुललेली कळी तिला त्याच्या प्रेमात पाडण्यास मजबूर करत होती..

शौर्य इशाऱ्यानेच दोघींना तिथे बोलवत होता.. समीरा मात्र एकटक त्याच्याकडे बघण्यात हरवुन गेलेली.. सीमाने तिला हाताला पकडत नाचायला नेलं. मनवी आणि रोहन तर एकमेकांनच्या डोळ्यांत पाहत हरवुन गेले.

जवळपास अर्धा तास झाला तसे सगळे नाचून दमुन बसले शिवाय शौर्य आणि टॉनी..

बाकी सगळे जण आपल्याला हवी तशी ड्रिंक्स ऑर्डर करून तिथेच शौर्य आणि टॉनीला बघत बसले..

समीरा, मनवी आणि सीमाने सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर केली. रोहन, वृषभ आणि राजला हार्ड ड्रिंक घ्यायची होती पण परत समीरा आणि सीमा ओरडेल म्हणुन ती लोक त्यांची ड्रिंक घेऊन तिथे बसल्यावर त्यांनी स्वतःसाठी ड्रिंक ऑर्डर केली.

राजने शौर्यला इशाऱ्यानेच विचारलं.. पण शौर्यने मानेनेच नाही म्हटलं.. वृषभने त्याला स्वतः जवळ बोलावून घेतले..

वृषभ : "सॉफ्ट ड्रिंक की हार्ड ड्रिंक??"

शौर्य : "सॉफ्ट ड्रिंक.. मी हार्ड ड्रिंक्स वैगेरे नाही घेत.."

रोहन : "काय तु पण एकदा घेऊन तर बघ.."

शौर्य : "नाही नको मला.. तुम्ही एन्जॉय करा.. मला सॉफ्ट ड्रिंक फक्त"

वृषभ : "टॉनीला घेऊन ये.."

शौर्य : "अजुन थोडा वेळ न.."

वृषभ : "अरे पण हे ड्रिंक्स तर पिऊन जा.."

"येऊन पितो.. तिथेच ठेव.." एवढं बोलुन शौर्य पुन्हा नाचायला गेला.. तोपर्यंत

राज : "मला मिरची दिलेली ना आज ह्याला पाजतो की नाही बघ.."

"राज तो घेत नाही उगाच नको हां", वृषभ राजला दम देतच बोलतो.

राज : "एका पॅकने काही नाही होत"

"तरीही नकोच.." वृषभ पुन्हा राजवर ओरडतच बोलतो.

रोहन : "ए राहू दे ना वृषभ मज्जा येईल.."

राजने वेटरला ड्रिंक्स चेंज करायला सांगितल्या..

थोड्यावेळाने शौर्य तिथे येऊन ग्लास हातात घेतला. घसा पुर्ण पणे कोरडा पडल्याने त्याने पूर्ण ग्लास एकाच घोटात पिला.. मला अजुन एक ग्लास सॉफ्ट ड्रिंक..

राज : "तुला आवडलं??"

शौर्य : "सध्या तरी मला तहान लागलीय म्हणुन पितोय मी.. आवडल की नाही हे नंतर सांगेल मी तुला.."

रोहनने वेटरला इशारा करत पुन्हा मागासचाच ड्रिंक बनवायला सांगतो.. रोहनने सांगितल्याप्रमाणे वेटर ड्रिंक बनवुन ठेवतो..

आता मात्र शौर्य ड्रिंक हळु पिऊ लागला.

"हे अस का लागतंय.." तोंड वाकड करतच शौर्य बोलतो.

राज : "मगाशी पण हेच होत.."

शौर्य : "नक्की हे सॉफ्ट ड्रिंकच आहेना??"

"तुम्ही सॉफ्ट ड्रिंकच मागितली ना सर??", वेटरने त्यालाच उलट प्रश्न विचारल्याने शौर्यला संशय नाही आला..


शौर्य : "हो पण मला आता कस तरी लागतंय.. मला नकोय हे.."

राज : "शौर्य वेस्ट नाही करायचं हा.. संपवून टाक आधी ते.."

राज जबरदस्ती ग्लास त्याच्या ओठांजवळ नेत त्याला ते ड्रिंक पाजतो.. शौर्यने नको असताना सुद्धा राजच्या समाधानासाठी ते पिऊन टाकतो..पण आता थोडी थोडी ड्रिंक्सची नशा त्याला चढत होती..

ग्लास तसाच खाली ठेवत डोकं धरून तो दोन मिनिटं शांत राहिला.

"मज्जा आली काय शौर्य?? का अजून एक हवंय?", राज हसतच विचारू लागला..

"अजून एक ग्लास.." शौर्य ग्लास पुढे सरकवतच बोलतो..

वेटरने त्याला अजुन एक पॅक भरून दिल..

शौर्यने ते सुद्धा एका घोटात पियाला

"अजुन एक.." शौर्य पुन्हा ग्लास पुढे करत बोलला..

वृषभ : "ए शौर्य बस हा.. राज आधीच नको बोललो होतो मी तुम्हांला. त्याला ड्रिंक चढली पण बघ..

राज : "ए शौर्य बस झालं.."

शौर्य दोघांकडे बघु लागला..

"ए राज तु मला अस चार चार का दिसतोयस..?? अरे वृषभ तु तर एक, दोन, तीन, चार, पाच.. तु तर पाच पाच दिसतोयस.. " शौर्य हसतच बोलतो..

वृषभ : "राज आणि रोहन तुम्हीच निस्तरा ह्याला.."

राज : "मला काय माहीत ह्याला लगेच चढेल ते.."

वृषभ : "आता ह्याला सांभाळ तूच. ते बघ समीरा, सीमा आणि मनवी पण इथेच येतायत."

शौर्य : "समीरा... कुठेय समीरा..?? तुम्ही लोकं मला परत चिडवतायतना... आणि तुम्ही नाचत का नाही. लेट्स गो फॉर डान्स यार"

(शौर्य आता दारूच्या नशेत बोलत होता)

क्रमशः

(आता पुढे काय?? सगळे शौर्यला कसे सांभाळतील?? शौर्यने दारू घेतलीय हे समीराला कळल्यावर तिला काय वाटेल?? तरीही ती शौर्यवर प्रेम करेल?? पुन्हा सगळे होस्टेलमध्ये परत कसे जातील? त्यासाठी पुढच्या भागाची प्रतीक्षा करा आणि हा भाग कसा वाटला ते ही कळवा)

©भावना विनेश भुतल