ATRANGIRE EK PREM KATHA - 5 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 5

Featured Books
Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 5

"तुम्ही लोक सगळे असे का बसलेत???"


राजचा आवाज ऐकताच चौघांनी घाबरतच माना वर करून पाहिल्या... समोर राजला बघताच चौघांच्याही जिवात जिव आला.


वृषभ आणि टॉनी रागातच त्याच्याकडे पाहू लागले.


राज : "काय झालं?? तुम्ही असे का बघतायत??"


रोहन : "हा पोलिसांच्या व्हेनचा आवाज????"


"कशी वाटली माझी आयडिया...???" हातातील मोबाईल चौघांना दाखवतच राज आपल्या दोन्ही भुवया उडवु लागला.


चौघांनी सुटकेचा श्वास सोडला..


वृषभ, शौर्य आणि टॉनी धावतच राजला मस्तीत मारू लागले.


राज : "अरे झालं तरी काय??"


वृषभ : "तुझ्या ह्या आवाजाने आमचा आवाज कायमचा बंद झाला असता."


राज : "अरे... "


शौर्य : "गप्पबस एक शब्द बोलु नकोस. ती लोक पळाली ना मग तेव्हाच तु हा आवाज बंद करायचाना.. बर जाऊदे तेव्हा नाही केलास पण निदान इथे येताना तरी.."


टॉनी : "हृदय बंद पडत का काय अस झालेलं आता."


(तिघेही मिळुन राजला मारू लागले पण ते ही हळु)


राज : "अरे थांबा यार तुम्ही...एक तर माझी काही चुक नाही ह्यात.. ट्युन मी बंद करत होतो पण नेहमीप्रेमाणे फोन हँग झालाय."


वृषभ : "बघु तो फोन.."


"हा बघ.." वृषभच्या हातात फोन देतच राज बोलला..


राज : "ऐकूणच घेत नाही तुम्ही लोक.. एक तर मी एवढी मदत केली तुमची.. कौतुक करायचं सोडून वर तुम्ही मलाच मारतायत.. "


वृषभ : "हा खर बोलतोय.. चुकी ह्याची नाहीच आहे.."


राज : "तेच सांगतोय मी.."


"चुकी आहे तर ती ह्या मोबाईलची आहे..मग शिक्षा झाली पाहिजे ती ह्या मोबाईलला", वृषभने डोळ्यानेच टॉनी आणि शौर्यला इशारे केले.


टॉनी : "बरोबर.. चुकी आहे ती ह्या मोबाईलची..आण तो मोबाईल इथे.."


राज : "ए नाही हा.. मोबाईलला काही करायच नाही.."


टॉनी : "अस कस.. वृषभ दे मीच फोडतो..तो मोबाईल.. ना रहेगा बास ओर ना बजेगी बासुरी.."


वृषभने मोबाईल टॉनीकडे फेकला.. टॉनीने मोबाईल कॅच करत तो खाली आपटतोय अस नाटक करू लागला तसा राज त्याच्याकडे धावत गेला.


राज : "ए वृषभ तु फेकतोस काय तो हा.. ए टॉनी माझ्या मोबाईलला काही करायचं नाही हा.. दे तो इकडे"


शौर्य : "एक मिनिट..त्याने ही ट्युन माझ्यामुळे लावली त्यामुळे हा मोबाईल फोडण्यचा मान मला..आण तो इथे.."


शौर्य ने अस बोलताच टॉनीने फोन त्याच्याकडे फेकला.. तस राज त्याच्याकडे धावत जाऊ लागला.


तिघेही जाणुन बुजून राजची मस्ती करत होते. मोबाईल एकमेकांकडे फेकत राजला घाबरवत होते.


राजने कसा बसा मोबाईल त्यांच्याकडुन हिसकावुन घेत तो खिश्यात टाकला.


"तुम्ही तिघे तर ना थांबाच आत्ता" एवढं बोलुन राजसुद्धा मस्तीत तिघांना मारायला त्यांच्या मागे मागे पळु लागला. चौघेही मज्जा मस्ती करत प्ले हाऊसमध्ये इथे तिथे पळु लागले. जसे दमले तसे चौघेही गळे मिळाले.. शौर्यला सुद्धा थोडं भावुक व्हायला झालं..


"राज यु आर ग्रेट.. आणि तुम्हा दोघांना पण खूप थेंक्स.. लव्ह यु गाईज" शौर्य तिघांना मिठी मारत बोलतो..


रोहन फक्त त्यांचं मित्र प्रेम बघत होता.. त्याने आयुष्यात प्रेम ही गोष्ट कधी अनुभवलीच नव्हती. प्रेम काय असत हे कदाचित त्याला माहीत असेल पण प्रेम निभावणं आणि अनुभवन ह्या दोन गोष्टी कदाचित त्याला आज समजत होत. नकळत आलेलं डोळ्यांतील पाणी पुसतच केरमबोर्डच्या आडोश्याला जाऊन बसला.


तोच समीरा आणि सीमा तिथे येतात..


समीरा : "शौर्य आर यु ओके??? आणि एवढं मारामारी करायची काय गरज आहे तुला??"


सीमा : "हो ना.. तुम्हा लोकांना कसबस शोधत इथे आलो. तरी मी हिला बोलली कँटीनमध्ये नाही तर स्पोर्ट्स हाऊसमध्ये असतील आणि तुम्ही कोणीच का फोन उचलत नाही..? "


वृषभ : "अग मी मोबाईल रुममध्येच विसरलो."


टॉनी : "हो मी पण.."


राज : "माझा फोन हँग झालेला त्यामुळे उचललाच जात नव्हता."


सीमा : "तु राहुच दे शेवटी तुझा फोन ना तुझ्यावरच गेलाय तो पण..."


राज : "काय बोललीस?? परत बोल एकदाच"


समीरा : "गाईज.. गाईज... प्लिजना आता तुम्ही दोघे पुन्हा सुरू नका होऊ प्लिज. "


"

तु ठिक आहेसना???.."समिराने शौर्यकडे बघत विचारलं


शौर्यने मानेनेच हो म्हटले..


समीरा : "थेंक्स टु गॉड.. आम्ही दोघीही घाबरून गेलो पण नक्की झालं काय?? आणि मी तर ऐकलेलं की पोलिस आलेले कुठे गेले मग ते."


"मी सांगतो काय झालं ते. रोहनला मारत होते म्हणुन हा त्याला वाचवायला गेला. हा शौर्य काय भारी फायटिंग करतो माहिती का?? आणि...."राज हातवारे करत घडलेला सगळा प्रसंग सांगु लागला.


शौर्य : "अरे पण रोहन कुठेय????"


सगळे इथे तिथे बघु लागतात. शौर्यच लक्ष केरमबोर्डच्या आडोश्याला बसलेल्या रोहनकडे गेल. त्यांनी सगळ्यांना डोळ्यानेच इशारा करत रोहनकडे बघायला सांगितलं..


शौर्य रोहनजवळ गेला.. त्याच्या बाजुला बसत त्याच तोंड आपल्याकडे करतच त्याला विचारलं.. रोहनचे डोळे अक्षरशः पाण्याने भरलेले.


शौर्य : "काय झालं???"


रोहनने मानेनेच काही नाही म्हटलं..


शौर्य : "नक्की???"


पुन्हा रोहनने मानेनेच हो म्हटलं..


बाकीची मंडळी देखील रोहनजवळ येऊन उभे रहातात


वृषभ : "तु रडतोयस का??"


रोहन निशब्द होता..


"तुला रडता पण येत?? मी तुला फक्त आतापर्यंत रडवतानाच पाहिलं म्हणून...बो....ल", राज हस्तच बोलला


पण राजच लक्ष त्याच्या इतर मित्र मैत्रिणींकडे जात तसा त्याचा चेहरा गंभीर होतो कारण सगळेच त्याच्याकडे रागाने बघतात.


वृषभ : "राज तुला जरा अक्कल आहे का कुठे काय बोलतोस ते??"


वृषभ रोहनला ऐकु जाणार नाही अश्या आवाजात राजच्या कानात पुटपुटला, आपली चाफेकळी ओठांवर ठेवत डोळ्यांतुन त्याला राग दाखवत पुन्हा रोहनजवळ बसला.


टॉनी : "कुठे लागलंय का तुला?? तु आम्हाला सांगु शकतोस."


समिराने धावतच जाऊन पाण्याचा ग्लास भरून त्याच्या पुढे केला.


आता मात्र रोहनला भरून आलं.


रोहनने सगळ्यांकडे बघत कानाला हात लावत आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली..


टॉनी : "रोहन बस काय... तुला तु चुकत होतास हे कळलं तेच आमच्यासाठी खुप आहे..प्लिज रडणं थांबव बघु तु.."


रोहन : "एवढं काळजी करणार आत्तापर्यंत कोणी भेटलच नाही रे. तुम्ही लोकच पहिले असाल जे प्रेमाने आणि आपुलकीने मला एवढं विचारतायत.. माझ्यासाठी पाणी घेऊन आलात."


शौर्य : "रोहन तु डेशिंग लुकमध्ये छान वाटतोसरे. अस नको ना रडू. अरे कॉलेजच्या मुलींची छेडछाड त्या मुलांनी केली म्हणुन तु स्वतःची पर्वा न करता त्यांना भिडलास आणि आता अस रडतोस."


रोहन : "पण मी तुम्हा लोकांना त्रास सुद्धा दिला ना आणि शौर्य तुला एवढं त्रास देऊन सुद्धा तु मला वाचवायला आलास."


शौर्य : "कारण तु खरा होतास आणि राज ने मला तुझ्याबद्दल जे सांगितलं ते ऐकून मला खरच तुझं कौतुक आहे. अरे रस्त्यात चालताना मुलींची छेड काढली ना तर लोक त्यांना प्रतिउत्तर द्यायच सोडुन काहीच बघितलं नाही ना काही ऐकलं असा आव आणुन निघुन जातात. पण त्या लफणग्यांना सामोरे जाणारे त्यांना नडणारे तुझ्यासारखे खुप कमी असतात आणि मला अभिमान आहे की मी तुझा मित्र आहे."


रोहनने शौर्यला मिठी मारली आणि अश्रूंनी शौर्यचा खांदा ओला केला.


रोहन : "आयुष्यात कोणीतरी पहिल्यांदाच माझं अस कौतुक करतय आणि तो ही तु.. थेंक्स शौर्य.."


सगळे मिळुन रोहनला शांत करतात.


"

मग फ्रेंड्स???" वृषभने आपला हात रोहनच्या पुढे करत विचारलं. रोहनने क्षणाचा विलंब न करता लगेच त्याच्या हातावर हात ठेवला. तस लगेच एका मागुन एकाने हात ठेवत.. तोच हात हवेत उडवत येहहहहह करत आपल्या नवीन मित्राचं टिममध्ये स्वागत केल.


सेलिब्रेशन तो बनता हे बॉस...


सगळे राजकडे बघु लागले..


राज : "अस काय बघतायत तुम्ही माझ्याकडे??? आपण टपरीवर जाऊन चहा तर घेऊच शकतो ना??"


वृषभ : "मला चालेल.."


रोहन : "मलाही चालेल.."


टॉनी : "मला पण.."


शौर्य : "समीरा तु आणि सीमा???"


समीरा : "सॉरी गाईज पण मला चहा नकोय म्हणजे मी घेतच नाही सीमा तुला जायचय???"


सीमा : "एवढ्या लवकर नको चहा.. एसीडीटी होईल आपण उद्या भेटू चालेल..??"


राज : "हो चालेल.. बाय.."


पाच जण मिळुन टपरीवर चहा पिण्यासाठी निघतात..


शौर्य : "मग रोहन उद्यापासून वेळेवर कॉलेजला यायचं हा.."


रोहन : "हो आपण भेटूच प्रॅक्टिसला.."


वृषभ : "एक मिनीट तु लेक्चरला सुद्धा बसणार आहेस.."


रोहन : "ए नाही हा प्लिज. मी लेक्चरला बसलो ना सगळं कॉलेज माझ्याकडे डोळे फाडुन बघत बसेल."


शौर्य : "उद्या 8 वाजता कॉलेज गेटजवळ भेटू आणि तु नाही आलास तर मी सुद्धा कोणतेच लेक्चर बसणार नाही."


वृषभ : "मी पण"


टॉनी : "मी पण.."


राज : "आता तुम्ही सगळेच बोलतायत तर मी पण.. पण रोहन तुझ्या पाया पडतोरे.. उद्या अकाउंटच लेक्चर आहे मित्रा. दया कर आमच्यावर.."


बस काय यार...रोहन पाय पाठी घेतच बोलला.


रोहन : "मी काय बोलतो. आपण... म्हणजे.."


"

उद्या 8 वाजता.. बाय..", चहाचा रिकामी ग्लास तिथे टेबलवर ठेवत चहाच्या टपरीवर बसलेल्या काकांना पैसे देऊन एक गॉड स्माईल रोहनला देत शौर्य तिथुन निघाला.


रोहन : "वृषभ तु तरी.."


"

8 वाजता.. लेक्चरमध्ये भेटूच.. बाय.." वृषभ सुद्धा रिकामी झालेला काचेचा ग्लास टेबलवर ठेवत रोहनला बाय करून निघाला.


रोहन टॉनीकडे बघु लागला.


"

नक्की ये 8 वाजता.. "एवढं बोलून टॉनीसुद्धा निघाला..


आता फक्त राज राहिला..


राजने ग्लास ठेवला.. पुन्हा दोन्ही हात रोहनच्या पायाजवळ लावत..नक्की ये मित्रा.. "तु नाही आलास तर माझं खुप मोठं नुकसान होईल. एक तर माझ्या आवडीचा विषय आहे तो इतका आवडीचा की तु विचारूच नकोस. फक्त माझ्या भावना समजून घे.. येतो मी.. "आणि तोही तिथुन निघाला.


चौघेही होस्टेलमध्ये येऊन शौर्यच्या रूममध्ये घुसतात.


तिघेही शौर्यच कौतुक करतात त्यांच्यामुळे त्यांना मुळात रोहन कसा आहे हे कळत. थोडा वेळ तिथेच गप्पा मस्ती करत राहतात.


रात्रीच्या जेवणाची रिंग वाजते तसे चौघे भानावर येतात आणि जेवणासाठी खाली जातात. नेहमी प्रमाणे चौघेही जेवुन बाहेर फेऱ्या मारायला जातात.


वृषभ : "हॉस्टेलच जेवण नको वाटतना यार.. मला जेवण जेवताना आईची खुप आठवण येते. "


शौर्य : "मग तु कोल्हापुरातच राहायचं होत ना एवढ्या लांब कश्याला आला नाही म्हणजे तिथेही आहेत की कॉलेज."


वृषभ : "मित्रा.. माझ्या कोल्हापुरातसुद्धा कॉलेज आहेत की पण माझे पप्पा इथे दिल्लीतच रहातात. त्यांनी माझं नाव इथेच घातलं."


शौर्य : "मग तु पप्पांसोबत का नाही राहत.""


वृषभ : "त्यांना तशी परवानगी नाही ना रे म्हणजे ते कंपनीने दिलेल्या रूममध्ये रहातात आणि सिम्पल फंडा आहे बघ. माझे पप्पा xx ltd मध्ये एज मॅनेजर आहेत. त्यांचं अस म्हणणं आहे की मी इथेच सेटल व्हावं. म्हणजे ते त्यांच्या ओळखीन मला लावतील त्यांच्या कामावर. म्हणजे नंतर हर शहर अनोळखी वाटायला नको म्हणून आधीपासूनच थोडी सवय लावतात मला."


शौर्य : "पण तुझी मॉम तुम्हा दोघांशिवाय राहते??"


टॉनी : "बस ना यार तु किती इंटरव्हीव घेतो त्याचा. त्यादिवशी तुला विचारलं तर तोंड पाडून बसला."


वृषभ : "हा ना.. तु का आला इथे तुझ्या मुंबईत कॉलेज नाहीत का??"


शौर्य पुन्हा शांत बसतो..


टॉनी : "बघितलं ह्याच अस असत."


वृषभ : "ए शौर्य तुला नाही सांगायचं मग जाऊदे पण तू तोंड नको पाडुन बसुस तुला जेव्हा सांगावस वाटेल तेव्हा सांग."


टॉनी : "चला जाऊयात झोपायला. मला खुप झोप येतेय."


चौघेही झोपायला आपापल्या रूममध्ये निघुन जातात.


शौर्यला मात्र झोप येत नाही. न राहवून तो आईला फोन लावतो. रिंग होत असते पण त्याची आई फोन काही उचलत नाही. रागातच फोन तो बेडवर आपटतो उशीत तोंड खुपसुन खुप रडतो.. त्याला रात्रीचा एकटेपणा नकोसा वाटत असतो वारंवार कुस बदलत रहातो पण थोड्या वेळाने का होईना त्याला झोप लागते.


★★★★★


दुसऱ्यादिवशी सीमा, समीरा आणि मनवी क्लासरूममध्ये जाऊन बसतात.


सीमा : "हे लोक आपली गेटजवळ वाट तर नाही ना बघत बसले असणार.?"


मनवी : "मी ग्रुपवर मेसेज केलाय आम्ही कलासरूममध्ये आहोत म्हणून. "


समीरा : "मग अजुन कोणीच कस नाही आलं?? लेक्चर सुरू व्हायला पाच मिनिट शिल्लक आहे."


तोच शौर्य, वृषभ, टॉनी आणि राज क्लासरूमच्या मेन डॉरमधुन येताना दिसले.


सीमा : "आले.... बघ..."


त्यांच्या मागोमाग रोहनला बघुन सगळयांनाच आश्चर्य वाटलं..


शौर्य आपल्या नेहमीच्या जागेवर बसला.. रोहन एकदम शेवटी बसायला जात होता पण शौर्यने त्याचा हात घट्ट पकडत त्याला आपल्या बाजूला बसवलं आणि राजला दुसऱ्या बाजुने बसायला सांगितल.


रोहन : "यार मी पाठी बसलो असतो ना.."


शौर्य : "तु पाठी बसुन काय करणार ते चांगलंच माहिती मला. म्हणून तु आम्हा दोघांच्या मध्येच बसायचं.."


संपुर्ण क्लासरूममध्ये रोहन आणि शौर्यला एकत्र बघुन कुजबुज चालू असते.


अकाउंटचे सर येताच लेक्चर चालु होत..


रोहनच लक्ष मात्र शौर्यच्या आडोश्याला असणाऱ्या मनवीकडे असत. मनवीला थोडं फार जाणवत असत की रोहन आपल्याकडे चोरून बघतोय. पण तीही गालातल्या गालात हसत दुर्लक्ष करते.


"

तु नुसतं तिच्याकडे बघत बसणार की काही शिकणार सुद्धा??" सरांच्या नकळत शौर्य हळुच रोहनच्या कानात कुजबुजला..


तसा रोहन ताठ बसत ब्लॅकबोर्डकडे बघु लागला.


कस बस लेक्चर संपल. तश्या तिघीही शौर्यच्या डेस्कवर आल्या..


मनवी : "एवढा बदल.. नाही म्हणजे काल काय झालं ते कळलं मला. पण आज चक्क लेक्चरला.."


(मनवी थोडं चिडवण्याच्या हेतूनेच रोहनला बोलली.. मनवी आपल्याबद्दल काही तरी बोलते हे बघुन रोहन मनातल्या मनात खुप खुश होत असतो)


वृषभ : "तो आज पासुन नेहमी लेक्चरला येणार आहे.. काय रोहन बरोबर ना??"


रोहन : "काय करणार यावच लागेल.."


(रोहन थोडं नाराज होतच बोलला..)


सगळे त्याच ते नाराज झालेलं तोंड बघुन हसु लागले.


शौर्य : "बर तुमचं झालं असेल तर आता निघुयात??"


रोहन : "आता कुठे??"


शौर्य : "प्रॅक्टिसला!"


वृषभ : "ओहहह मी तर विसरलोच होतो.."


समीरा : "मी पण.."


सगळे नेहमी प्रमाणे आपापली प्रॅक्टिस संपवून कँटीनमध्ये आले. समीरा, मनवी आणि इतर जण त्यांची वाट बघत कॅंटिंगमध्येच बसतात.


समीराला आज लवकर बघुन शौर्यला थोडं आश्चर्य वाटत..


शौर्य : "आज तु प्रॅक्टिसला नाही गेलीस का??"


समीरा : "प्रॅक्टिससाठी कोण आलंच नाही मग मी ही निघुन आले."


शौर्य : "ओहहह"


राज : "मित्रा कधीतरी मला ही विचारत जा अस.. "


"

नक्की तुला कस विसरू शकतो मी.",शौर्य राजची मान पाठून दाबतच बोलला.


राज : "आ... समीरा.. हा बघना ग.."


समीरा : "काय बघु."


( समीरा शौर्यकडे बघु लागली तस शौर्यने राजची मॅन सोडली)


शौर्य : "काही घेणार का विचारतोय मी.. म्हणजे मी काही तरी आणायला चाललोय तुला काही हवं का.. नाही म्हणजे मी सगळ्यांनाच विचारतोय..??"


(शौर्यने अडखळत बोलत का होईना पण एक एक शब्द जोडून वेळ मारून घेतली)


समीरा : "सॅंडविच.."


मनवी : "मला पण.."


सीमा : "मला पण आणशील प्लिज.."


शौर्य : "प्लिज काय त्यात सगळ्यांसाठीच आणतो.. वृषभ, टॉनी तुम्हांला रे??


"

सॅंडविच." दोघेही मोबाईलमध्ये काही तरी बघत एकत्रच बोलले..


शौर्य : "रोहन तुला??"


रोहन : "मला पण हवंय सॅंडविच पण मी येतो तुझ्याबरोबर एकटा किती जणांचं घेऊन येशील??"


राज : "मला पण विचार की मित्रा. मला पण सॅंडविच हवंय.."


शौर्य : "मला वाटलं तुझा उपवास असेल. "


राज : "हुं... उपवास आणि मी..."


शौर्य : "ठिक आहे घेऊन येतो तुला सॅंडविच."


राज : "आणतोच आहेस तर ऐक.. चिज थोडं जास्त.. आणि ग्रील सॅंडवीच आवडत मला."


शौर्य : "ओके अजुन???"


राज : "सॉस नको हा त्यात..."


शौर्य जायला निघाला...


राज : "शौर्य ऐकना.. "


"

आता काय??"


"

चटणी बाजुला द्यायला सांग.. सॅंडविचवर नको.. नाही तर नरम पडत मग खाण्यात काही मज्जा येत नाही."


"झालं तुझं??" शौर्यने खोट हसु तोंडावर आणतच राजला विचारल..


सगळे हसतच शौर्यची मज्जा घेत होते..


समीरासुद्धा गालातल्या गालात हसत होती..


"मला न बिट नाही आवडतरे त्यात. त्याला सांग त्या ऐवजी बटाटा जरा जास्त टाक.." राज मस्तीतच हुकूम सोडतच बोलला.


शौर्य : "मित्रा तुला स्पेसिअल सॅंडविच आणेल मी डोन्ट वरी.." (1, 2 ,3...7 शौर्य काऊंट करू लागला)


"

सात सॅंडविच आणि एक स्पेसिअल सॅंडविच काय राज बरोबर ना??"


राज : "एक दम बरोबर."

शौर्य गोड अस स्मित हास्य राजला दाखवुन तिथुन निघाला


राज : "ए गाईज ठेवा ना तो फोन तिथे.."


समीरा : "का रे त्याला त्रास देत होतास. त्यापेक्षा तुच जाऊन घ्यायचं ना.."


राज : "तुला वाईट वाटलं का मी त्याच्याशी अस वागलो ते??"


वृषभ आणि टॉनी समीराकडे बघु लागले..


समीरा : "हो मग काय?? कोणी काही बोलत नाही म्हणुन जास्त फायदा नाही घ्यायचा.."


राज : "हे बर आहे.. तो जेव्हा मला त्रास देतो तेव्हा नाही तुला दिसत. आज त्याला त्रास झाला ते लगेच दिसलं तुला.."


मनवी : "बस ना आता.. आज इव्हीनींगच काय प्लॅन.?? त्याबद्दल कोणी बोलतच नाही.."


वृषभ : "अग आम्ही दोघ तेच बघत होतो. रेस्टोरंट बुक करतोय रात्री डीनरसाठी.. पण सगळं काही प्रि बुक आहेत.."


मनवी : "मग आता??"


वृषभ : "तुम्हीच ठरवा आता काय ते.. नेक्स्ट विकमध्ये जाऊयात का??"


समीरा : "मला ही तेच वाटत.."


सगळे अगदी चेहरा पाडून बसतात. थोड्या वेळाने शौर्य आणि रोहन येतात.. सगळ्यांना अस चेहरा पाडून बसलेलं बघुन त्यांना पण नवल वाटत..


रोहन : "काय झालं तुम्ही असे तोंड पाडुन का बसलेत..??"


वृषभ : "आजचा आमचा प्लॅन फिसकटला."


रोहन : "म्हणजे..??"


वृषभ : "म्हणजे आज आम्ही आऊटिंगला जाणार होतो बट डिनरसाठी हॉटेलमध्ये सीट बुक करतोय पण सगळे आधीच बुक आहेत.. "


रोहन : "बस एवढंच ना.. ??"


सगळे रोहनकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघतात..


एक मिनिट बोलत रोहन हातात फोन घेतो आणि कुणाचा तरी फोन लावत तिथुन उठून बाहेर जातो..


"तुम्ही तोपर्यंत सॅंडवीचचा आनंद घ्या.. अँड मिस्टर राज This is special सँडविच फॉर यु.." डोळ्यांत एक वेगळीच चमक दाखवत शौर्य राजकडे बघु लागला.


राज : "मी सांगितले तसच आहे ना??? "


शौर्य : "येस सर.."

हा एवढं नाटक करतोय नक्कीच ह्यात काहीतरी केलं असेल.. राज मनात विचार करू लागला..


रोहनसुद्धा फोनवर बोलत पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतो..


रोहन : "गाईज... दि रॉयलमध्ये बुक केलं तर चालेल??"


वृषभ : "चालेल काय धावेल.."


रोहन : "किती सीट??"


टॉनी : "किती म्हणजे काय.. आठ..."


रोहन : "आठ...! एक मिनिट आठवं कोण??"


"

तुsss..." सगळे एकत्रच बोलले..


"हे कधी ठरलं??" रोहन फोनवर हात ठेवतच विचारतो.


"

आत्ताचssa.." पुन्हा सगळे एकत्रच म्हणाले.


वृषभ : "तु आठ सीट बुक कर मग सांगतो.. 9 ते 10.30.."


रोहनने वृषभने सांगितल्या प्रमाणे सीट बुक गेल्या..


रोहन : "अरे तुम्ही अस अचानक प्लॅन केलं मला घरून पण परमिशन घ्यावी लागेल ना.. "


वृषभ : "रोहन आता तू मुलींसारखं नकोना बोलुस.. परमिशन वैगेरे.. आपण आज जातोय हे कॉन्फर्म आणि तु येतोस ह्यावर शिक्का मोर्तब.. काय गाईज.."


"

होss", सगळे एकत्रच बोलले..


रोहन : "बर.."


सगळे लोक सॅंडविच खात प्लॅन बद्दल डिस्कस करू लागले..


राज मात्र सॅंडवीचचा एक पीस घाबरतच हातात घेत त्याला न्याहाळू लागला.


(नक्कीच शौर्यचा काही तरी अतरंगी पणा असेल ह्यात अशी राजची खात्री होती)


शौर्य पुन्हा गोड अस स्मित हास्य ओठांवर आणत राजकडे बघतच स्वतः सॅंडवीच खाऊ लागला.


राजने घाबरतच सॅंडवीचमधील एक पीस खाल्ला त्याला नेहमीप्रमाणेच त्याची चव लागली. म्हणजे सॅंडवीच मध्ये काही गडबड नाही ह्याची खात्री झाली. त्याने सुटकेचा श्वास सोडत उरलेलं सॅंडवीच खाऊ लागला.


रोहन शौर्यकडे बघु लागला.. शौर्येने भुवया उडवत त्याला पुन्हा राज कडे बघायला सांगितलं..


वृषभ : "मग गाईज आपण ठिक सात वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडू मग डिस्कोला जाऊ तिथुन जमलं तर थोडं इथे तिथे फिरू आणि मग डिनर आणि मग .."


"

हाsss.." राज मध्येच जोरातच ओरडला..


सगळे राजकडे बघू लागले..


वृषभ : "एक मिनिट माझं बोलणं पूर्ण नाही झालं.."


"

आss... आss..." राज तोंडावर हात ठेवत ओरडू लागला.."


शौर्य : "राज, काही हवंय का तुला??"


"हो पाणी.... आsss..." राज अक्षरशः दोन्ही हात तोंडावर धरत पाणी मागू लागला..


शौर्य पाण्याची बाटली राजच्यापुढे धरतो पण राज ती घेणार तेवढ्यात शौर्य पुन्हा मागे खेचतो


"

तुला हे पाणी चालेल ना...??"


राज : "हो चालेल दे ते इथे.."


शौर्य पुन्हा बाटली त्याला देतो राज घेणार पण पुन्हा ती मागे खेचतो..


"

अरे पण ह्यात साद पाणी आहे तुला साद पाणी हवं की थंड??"


सगळे आता राजची मज्जा घेत होते..


राज : "जे आहे ते दे.."


"

बर धर" अस बोलत शौर्य बाटली राज ला देतो आणि पुन्हा मागे खेचतो.. तुला ग्लासमध्ये ओतून देऊ का??


राज जबरदस्ती शौर्यच्या हातातील बॉटल खेचतो आणि घटाघटा पाणी पितो.. पण अजुनही त्याची जीभ मिरची खाल्यासारखी झणझणत होती.


"राज स्पेसिअल सॅंडवीच आवडलंना??" शौर्य चिडवतच राजला बोलला..


"

साल्या तु तर थांब" अस बोलत राज तिथुन उठला आणि शौर्यला मारायला पळायला लागला.


शौर्य तिथल्या तिथेच गोल गोल फिरू लागला.. बाकीचे सगळे हसत होते..


राज : "समीरा आत्ता ह्याला बोल.. मगाशी मला बोलत होतीस ना ह्याला त्रास दिला म्हणून आता ह्याला पण बोलना.."


समीरा : "एक मिनिट..Tit for Tat"


राज : "हे बर आहे..मी काही केलं तर तो बिचारा.आणि त्याने केलं तर tit for tat.. पण शौर्य ये बदला तो हम लेकर ही रहेंगे.."


शौर्य : "बस काय राज.."


राज : "का आता का घाबरलास??"


शौर्य : "मी नाही घाबरत पण मला तुझी काळजी वाटतेरे म्हणुन बोललो..."


वृषभ आणि टॉनी एकमेकांना टाळी देत हसतात..


रोहन : "राज तु हे चॉकलेट खा तुला बर वाटेल.."


राज : "थेंक्स रोहन.. तुच माझा मित्र.. ह्या शौर्यला तर मी बघेलच.."


वृषभ : "मग इव्हीनींगला भेटूच.. ठरल्याप्रमाणे आणि ठरल्या ठिकाणी.."


"

येसsss.." सगळे एकत्रच बोलले..


ठरल्याप्रमाणे 7 वाजता चौघेही हॉस्टेलच्या बाहेर पडतात.. समीरा आणि सीमा ठरल्या ठिकाणी काही आल्या नसतात..


वृषभ : "ह्या मुलींच ना नेहमीच अस असत.. कधी वेळेवर नाही.."


तोच दुरून येणारी समीरा आणि सीमा राजच्या नजरेस पडते..


राज : "आल्या मॅडम बघा.."


शौर्य मागे वळुन बघतो.. आणि बघतच रहातो..


समीरा आज खुपच सुंदर दिसत होती. त्यात तिने सोडलेल्या बटा हवेच्या झुळकेने उडत तिच्या चेहऱ्यासोबत शौर्यच्या हृदयावरसुद्धा जादु करत होते. शौर्यची नजर मात्र तिच्यावरून हटतच नव्हती.


वृषभच लक्ष शौर्यकडे गेलं तस त्याने इतरांना सुद्धा त्याच्याकडे बघायला सांगितलं..


राज : "इश्क हुआ..."


"

ट ना न ना ¶¶¶¶" (वृषभ आणि टॉनी त्याला सूर देतच बोलत होते)


राज : "कैसे हुआ..??"


शौर्य केसांवरून हात फिरवत लाजतच मान खाली घालतो..


राज : "ओहह हो.. काय लाजतोय बघ.."


शौर्य : "बस बस.. ती ऐकेल.."


राज : "प्यार किया तो डरणा क्या... जब प्यार किया तो डरणा क्या??"


समीराला राजच गाणं ऐकु जात..


"

कोण प्रेमात पडलय???" समीरा हसतच बोलली..


"

शौर्य आणि कोण.. काय तु पण अस.." राज नकळत बोलुन गेला.. आणि नंतर वाक्य पूर्ण न करताच जीभ चावू लागला..


"काय??", समीरा एकदम आश्चर्य होत बोलली.


चौघेही एकमेकांकडे बघू लागले. कोणालाचं आता काय बोलावे ते सुचत नव्हते..


क्रमशः

(पुढील गंमत पाहूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल