एका भयाण रात्री *"मंदिराच्या* पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण *पंधरा वर्षाचा मुलगा* अभ्यास करताना पाहिला. *थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण *मग्न* होता वाचनात.
हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ.
*रात्रीचे साडेबारा* वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो. तर तो *मुलगा* नेहमी प्रमाणे *मंदिराच्या पायरीवर* अभ्यास करत दिसला. मी *गाडी* थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात *हसला.* जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस.
सर माझ्या *घरात लाईट* नाही. माझी *आई आजारी* असते. दिव्यात *रॉकेल* घालून अभ्यास करायला. माझी *ऐपत* नाही.
बाळ तू मला बघून का *गोड हसलास* ?
सर तुम्ही *देव* आहात !
नाही रे!
सर तुम्ही माझ्या साठी *देवच* आहात.
ते जाऊदे तू *जेवलास* का? मी तुझ्यासाठी *खाऊचं पार्सल* आणलं आहे.
सर म्हणूनच मी *हसलो.* मला माहित होतं. तो ( देव ) कोणत्याही *रूपात* येइल पण मला *भुकेलेला नाही* ठेवणार. मी जेंव्हा जेंव्हा *भुकेलेला* असतो , तो काहींना काही मला *देतोच.* कधी *नवसाचे पेढे* तर कधी *फळ* तो मला देऊन जातो. आज मी *भुकेलेला* होतो पण *निश्चिंत* होतो. मला माहित होतं....तो काहीतरी कारण करून मला *भेटायला* येणार आणि *तुम्ही* आलात. तुम्ही *देव* आहात ना !
मी *निःशब्द* झालो, नकळत माझ्या कडून *पुण्याचं* काम घडलं होतं. रोज *कर्जाच्या* ओझ्याखाली दबताना *देवाला* कोसत होतो. त्याने आज मला *देवाची उपाधी* देऊन लाजवलं होतं.
त्याने तो अर्धवट *खाऊ* खाल्ला आणि म्हणाला , सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या *आईला* देऊन येतो. माझे डोळे *तरळले.* त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. तो पाच मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत *पारिजातकाची फुलं* होती.
सर , माझी *आई* सांगते , ज्या *परमेश्वराने* आपल्या *पोटाची खळगी* भरली त्याच्या चरणी *ओंजळभर फुलं* तरी वहावीत. क्षणभर *डोळे* बंद केले आणि त्या बंद दारातल्या *पाषाणाकडे* पाहिलं तर तेही मला त्या मुलाच्या गोड *हसण्यासारखं* वाटलं.
नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. *शाळा कॉलेज बंद* झाले. देवळं ओस पडली. देवळांना *कुलूप* ठोकली आणि रस्त्यावर *शुकशुकाट* झाला. असच एके दिवशी *त्या* मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या *देवळाकडे* डोकावलं. रात्रीची वेळ होती. देवळाची पायरीवरील *लाईट बंद* होती आणि तो *मुलगा* कुठेच दिसला नाही. वाईट वाटलं मला. या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ? काय खात असेल ? कसा जगत असेल ? असे *ना ना प्रश्न* आ वासून उभे राहिले.
कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी *प्राण* गमावले. असाच आमचा एक मित्र *पॉजिटीव्ह* होऊन दगावला. मी त्याच्या *अंत्य संस्काराला स्मशानात* गेलो होतो. *अंत्यसत्कार* झाले. सर्व आपल्या घरी निघाले. निघताना हात पाय धुवावे म्हणून *शंकराच्या* मंदिरा शेजारील *नळावर* गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर *स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे* धुऊन त्या *स्मशानाच्या भिंतीवर* वाळत टाकत होता. मला बघून त्याने आवाज दिला , सर ....
अरे तू *इथे* काय करतोस ?
सर आता मी *इथेच राहतो.* आम्ही घर बदललं. *भाडं* भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊन मध्ये *शिव* मंदिर बंद झालं आणि पायरी वरची *लाईटही* बंद झाली.
मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी *शिक्षण थांबता* कामा नये असं तिनं सांगितलं आहे. त्या *शिव* मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या *शव* मंदिराचे दरवाजे *कधी बंद होत* नाहीत. तिथे *जीवंत माणसं* यायची आणि *इथे मेलेली.* ह्या लाईट खाली माझा *अभ्यास* चालू असतो. सर मी *हार* नाही मानली. *आई* सांगायची........ज्याने *जन्म* दिला तोच *भुकेची खळगी* भरणार.
बरं..... तुझी आई कुठे आहे ?
सर ती *कोरोनाच्या* आजारात *गेली.* तीन दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे *पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी* दिला. *14 दिवस* इथंच ह्या खोपीत *होम क्वाँरनटाईन* राहिलो. *सरकारी कायदा मोडू* नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं *ती* सांगायची. *आईच्या अस्थी* समोरच्या नदीत *विसर्जित* केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या *अग्नी* देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच *क्रियाकर्म* आटपलं.
सर तरी मी *हरलेलो* नाही पण *दुःख* एव्हढच आहे की मी *पास* झालेलो पहायला *आई* ह्या जगात *नाही.* ती जिथे ज्या जगात असेल तिथे *खुप खुश* असेल हे माझं *यश* बघून. कालच माझा *रिजल्ट* लागला आणि मी शाळेत *पहिला* आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे *शिक्षक* करणार आहेत पण आता तर *खरी अडचण* उभी राहिलीय. *ऑनलाईन* अभ्यास करायला माझ्या जवळ *मोबाईल* सुद्धा नाही.
असो सर , तुम्ही का वाईट वाटून घेता ? तुम्हाला मी *पास* झाल्याचा *आनंद* नाही झाला ? सर , तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.
त्याने छोट्याशा *डब्यातून साखर* आणली होती.चिमूटभर माझ्या हातावर ठेवली . सर *तोंड गोड* करा.
तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या *तोंडावर* त्या नळाचं पाणी मारून *भानावर* आलो. *भरलेले डोळे* लपवण्यासाठी *तोंड धुतले.*
सर, मला माहीत होते , *देव* या जगात आहे आणि तो माझ्या *आनंदात माझी पाठ थोपटायला* नक्की येणार. त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या *खिशातला* माझा *नवा मोबाईल* त्या मुलाच्या *हातावर* टेकविला आणि त्याची *पाठ थोपटून* निमूटपणे *बाय* करून *स्मशानाबाहेर* चालू लागलो. आता दर महिन्याला *मी* त्याचा मोबाईल *रिचार्ज* करतो......न सांगता.
मी त्या *मुलाच्या डोळ्यात देव* पाहिला. .... *देव पाहिला....*
👏🏻जनहित के लिये जारी 👏🏻