Abhagi - 2 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | अभागी ...भाग 2

Featured Books
Categories
Share

अभागी ...भाग 2

मधुरा सानप ..सुंदर,प्रेमळ,समजूतदार..अशी. संजय सानप व सीमा सानप यांची एकुलती एक मुलगी....आणि आपल्या बाबांची लाडू बाई....घरची परिस्थिती तशी चांगीली होती ..तरीही सीमा बाई नी तिचे अतीलाड केले नव्हते. तिला घरातील सर्व कामे शिकवली होती..आणि ती मनापासून करत ही होती..अभ्यासात ही मधुरा हुशार होती .
मधुरा मुळातच सुंदर होती पण इतर मुलीनं प्रमाणे तिला मॉडर्न कपडे घालन अजिबात आवडत नसे.. मेकअप आणि तिज तर कधी जुळलच नाही ...निसर्गानं इतकं सौंदर्य बहाल केल होत पणं त्याचा तिला अजिबात गर्व नव्हता.साधी,सरळ..पणं राग आला की तितकीच रागीट अशी मधुरा.

विराज मधुरा शिकत असलेल्या कॉलेज चा चॉकलेट बॉय ,हॅण्डसम..गोरा पान.. गर्भ श्रीमंत..पणं त्याला एक वाईट सवय होती ..कॉलेज मध्ये कोणी ही नवीन मुलगी आली की तो तिला आपल्या वागण्या बोलण्यातून प्रेमात पाडत असे व थोड्या दिवसांनी पुन्हा नवीन मुलीच्या मागे लागत असे..तसा तो थोडा फ्लरटि होता पणं कधी कोणत्या मुली सोबत तो वाईट वागत नसे..मधुरा ही जेव्हा नवीन आली तेव्हा ही त्याने आपली जादू मधुरा वर चालवली होती ..पणं ती त्यात फसण्या आधीच सायली व अनु ने मधुराला सावध केलं होत आणि म्हणूनच तेव्हा पासून सायली व अनु मधू च्या खास मैत्रीनी झाल्या होत्या ..नेहमी तिघींनी ची जोडी असे..

आता आला विषय मधुर चा तर एकदम साधा ,सरळ सर्वांना मदत करणारा..सगळ्या सोबत नम्रपणे वागणारा..कॉलेज चा हुशार मुलगा..मुलींच्या तर तो कधी विश्वात पाऊल ही ठेवत नसे..आणि कोणतीच मुलगी त्याला पाहत ही नसे..कारण इतर मुलानं सारखा तो हॅण्डसम नव्हता ना .. काळा सावळा..ना फॅशन..ना स्टाईल..ना..कोणत्या मुली सोबत बोलण्याची सवय..काहीच नव्हते ना बिचाऱ्या जवळ..कधी ही मुलीनं कडे न पाहणारा असा हा मधुर मात्र मधुराला पहिल्या पासून वेडा झाला होता..तिचं साध पणं च त्याला खूप भावल होत..पणं मधुरा आपल्याला टाळते हे त्याला माहीत होत.पणं तरीही त्याची काही तक्रार नव्हती.जिथे मधुरा तिथे मधुर नेहमी असायचा..तिच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा..पणं मधुरा ला त्याचं अस वेड्या सारख पाहणं आवडत नसे ती त्याच्या सोबत तुटक बोलायची.
एकदा जेव्हा मधुर ने मधुराला मधू म्हणून हाक मारली होती तेव्हा माझे जवळचे च फक्त मला मधू बोलू शकतात..तू मधुरा बोलत जा..अस मधुरा त्याला बोलली होती..बिचाऱ्याला खूपच वाईट वाटलं होत ..पणं मधुरा वर त्याचं खूप प्रेम होत ..त्याच्या हृदयात मधुराने केव्हाच घर केलं होत..

मधुरा कॉलेजे मध्ये गेल्यापासून सर्व मुलांना शंकेच्या नजरेने पाहत होती..कोण असेल साया?..विराज असेल का?आता आपण त्याच्या प्रपोजल मध्ये फसलो नाही म्हणून त्याने हे नाटक केलं असेल का ? का दुसरं कोणी असेल..ती आपल्याच विचारात ..मुलानं कडे पाहत उभी होती..तिचे हे चाळे सायली व अनु पाहत होत्या आणि तिला काय वेड लागलं आहे का असा विचार करत होत्या..त्या दोघी मधू कडे गेल्या.

सायली: हॅलो,कव्हर गर्ल..विराज कसा आहे हे तर आम्हाला माहिती आहे ..पणं तू केव्हा पासून अशी झालीस ? इतकं काय पाहत आहेस मुलानं कडे ?

मधुरा सायलीच्या बोलण्याने भानावर येते व सांगते चला म्हणून कॉलेजच्या बागेत वळते ..दोघी ही तिच्या मागे जातात.. हीला काय झालं ..याचा दोघींना विचार पडलेला असतो..बागेतील गुलमोहर च झाड मधू च आवडत ..दररोज ती त्या झाडा खाली येऊन बसत असे..तिला ती जागा खूप आवडायची..कॉलेज मध्ये मधू दिसली नाही की ..नक्की बागेतील झाडाखाली बसली असेल अस सायली व अनु समजून जायच्या व तिला शोधत तिथे यायच्या आणि ती त्यांना तिथेच भेटायची.कधी कधी पुस्तक वाचत ..कधी नोट्स काढत ..कधी मोबाईल वर गाणी ऐकत मधू तिथे बसलेली असत .आज ही त्या तिघी झाडा खाली येऊन बसल्या.
मधू ने कालचा मॅसेज बद्दल सायली व अनु ला सांगितलं ... व कोण असेल तो अस त्यांना विचारू लागली...तेवढयात सायली ने मधू ला उभी रहा म्हणून सांगितलं..आणि तिच्या भोवती एक फेरी मारली..

मधू : काय झालं सायले ?

सायली : अग मी तो साया बघत होते ..तुझ्या मागे आहे का ते .?

मधू खूप चिडली ..आणि सायली व अनु जोरात हसू लागल्या..

मधू: नालायके तुझ्या सारखी मैत्रीण असावी ..इथ मी माझं टेन्शन सांगत आहे आणि तुम्ही दोघी माझा मजाक उडवत आहात ..जाते मी काही बोलायचं नाही मला तुमच्या सोबत ..

अस म्हणून ती निघाली होती की सायली तिला थांबवते .. व सॉरी म्हणुन तिला खाली बसवते ..अग तू खूप सिरीयस वाटली स म्हणून फक्त थोडी गम्मत केली ग..लगेच काय चिडते स?

अनु : ये पण खरंच कोण असेल तो साया..

तिघी ही विचार करू लागतात...पणं शेवटी सायलीच बोलते..

सायली : जावू दे मधू ,विचार नको करू ..कोणी तर गंमत केली असेल तुझी..पुन्हा काही झालं तर आपण शोधू मग पुढे अस सायली ने मधू ची समजूत घातली..मग मधू ही थोडी शांत झाली.
तेवढयात अनु बोलली ..

अनु : मला वाटतं तो साया रणवीर असेल ?

मधू : कोण रणवीर ग..?

अनु: अग तो नाही का स्टार प्लस वरती एक सीरियल आहे विरा ..त्यात नाही का तो वीरा चा भाऊ ..

सायली : मग त्याच काय इथे ?

अनु : अग तू त्याचं गाणं नाही ऐकल स का ?

साया साया साया हुं
दौडा दौडा आया हुं
तूने कतरा मांगा था
मैं दरिया लाया हुं...

सायली: अग होय ग..

मधू : अनु तू थोडी टीव्ही कमी पाहत जा ..नाही ते येत तुझ्या डोक्यात ..
अस म्हणून तिघी ही हसू लागतात व कॉलेज मध्ये जात असतात ..मध्येच विराज भेटतो.

विराज : हाय ..मधुरा..

मधू: हाय.

विराज : अभिनंदन कव्हर गर्ल..छान आला आहे फोटो ..मग पार्टी देतेस की नाही ?

मधू : थँक्यु ..पणं कसली पार्टी ?

विराज : अग कॉलेज कव्हर फोटो या वर्षी तुझा आहे पार्टी तो बनती हैं ना..

मधू: त्याचं काय आहे ना विराज श्रेय माझं असत तर दिली असती पार्टी..पणं ..

विराज : म्हणजे ?

विराज ला मधू च बोलणं काही समजत नाही..मधू त्याला काही नाही म्हणून त्याला bye बोलून सायली व अनु सोबत कॉलेज मधे जाते ..सर्वजण तिचं अभिनंदन करतात ..नंतर मधुर येतो तो ही तिला अभिनंदन बोलून ..हात पुढे करतो तर मधू त्याला लांबूनच थँक्यु बोलून तिथून निघून जाते..कॉलेज सुटल्यावर ..मधू ,अनु सायली घरी जात असतात ..रस्त्यात एक आजीबाई पेरू विकत बसलेली असते .. आजी पेरूची पाटी उचलून डोक्यावर घेत असते पणं पाटी जड असते त्यामुळे त्यांना ती उचलता येत नसते..मधू हे पाहते व त्या आजी ला पाटी उचलून डोक्यावर देते.. आजी तिला आशीर्वाद देऊन निघुन जातात..
मधू घरी येते एक झोप काढते ..संध्याकाळी थोड काम आवरून रूम मध्ये पुस्तक वाचत बसलेली असते..की तेवढयात तिचा मोबाईल वाजतो ..पुन्हा त्याच नंबर वरून ..तिला मॅसेज येतो.

साया: हाय ,मधुरा..

मधू: अरे कोण आहेस तू ?

साया: अग काल तर सांगितलं तुझा साया म्हणून ..इतक्या लवकर विसरते स..

मधू: कोण साया? समोर का येत नाहीस तू ?

साया: येईन ग ..वेळ आल्यावर.. बर ते सोड ..उद्या तुझ्या साठी एक गिफ्ट आहे ..तिथेच तुझ्या गुलमोहर जवळ असेल ..कॉलेज मध्ये गेलीस की घे ..

मधू: गिफ्ट ? का ? मला काही नको आहे.

साया: गिफ्ट द्यायला दोन कारणं आहेत ..एक तर तू कव्हर गर्ल बनली स..

मधू : आणि दुसरं ?

साया: दुसरं तू आज त्या आजी ला मदत केलीस..आज काल माणसं माणुसकी विसरत चालली आहेत ग..आणि गरिबान कडे तर कोणी लक्ष ही देत नाही..रस्त्यात इतकी मानस येत जात होती पणं कोणी त्या आजी ची मदत केली नाही पणं तू केलीस ना ..अग मी च करणार होतो मदत पणं तेवढयात तूच पुढे होऊन गेलीस ना..त्यामुळे तुला गिफ्ट ,आठवणीने घे.

मधू पुढे काही बोलणार इतक्यात पुन्हा तिचे मॅसेज जान बंद होत..पणं आज मधू साया चा विचार करत असते..किती चांगले विचार आहेत ना त्याचे..कोणी कोणाला मदत केली म्हणून त्याला गिफ्ट ?

काय असेल गिफ्ट ? येईल का मधू चा साया तिच्या समोर ? पाहू next part मध्ये

क्रमशः