रतन नेआपल्या संसारची काय स्वपन पहिली असतील. तस पण बायकांना संसाराची खुप हैस असते.म्हणतात ना'' संसार हा बरकाईने केला तर सुई ईतका बरीक असतो''.बायका नेहमी सुखी संसाराचे स्वपन पाहतात.त्यासाठी त्या वाटेल तेवढे कष्ट करतात. ... दुसऱ्या दिवशीसगळे लवकर उठले. सासू रत्नाला हे दिले ते दिले अस कार तस कार असे संगत होती.ऐतक्यत प्रकाश आला.रतन स्वयंपाक करायला लागली. बाकी ची तयारी रतन च्या सासूबाई नी केली. थोड्याच वेळात जेवण झाली. गप्पा मरता जाण्याची वेळ झाली रतन व प्रकाशने आई,, वडिलांचा आशिर्वाद घेतला. आणि जाण्यास बाहेर पटली. वडिलांनी गाडीत सगळे समान ठेवले. गाडी दूर गेली, तरी वडिल पहात होते. जड पावलांनी घरी परतले. प्रकाशची आई दरात उभी होती..... जड आवाजात म्हणली, मिळाली गाडी. हो.........दोघे थोडा वेळ गप्प बसतात. . रतन ने येवढा प्रवास कधी केला नव्हता, त्यामुळे ती खुप कंटाळली होती. ठीक आठ वाजता ते त्याच्यारूम वर पोचले. येताना आणलेली भाजी व चपाती होती, आणि पाणी पण होते.जेवण करून दोघे झोपी गेले. सकाळी प्रकाश लवकर उठला करण रतन ला काही माहीत नव्हते. रतन पण लगेच उठली. त्याने रतन ला तुझे नवीन शहरात, नवीन रूम मधे, नव्याने संसाराततुझे स्क्गत आहे. रतन खुप गोड हसली, प्रकाशने त्याला परवडेल अशी एक तशी छोटी पण दोघांसाठी मोठी अशी रूम घेतली. घरात पाणी काही सोई होत्या. प्रकाश रतन ला म्हणला, ''आवडली का रूम' हो आवडली, रतन म्हणली. नकी,हो नकी . रतन म्हणली, रूम तर चांगली आहे. पणमला तुमच्या बरोबर रहायला मिळते, हे मला सगळ्यात मोठे सुख आहे .आपल्या पतीची सात-सोबत मिळते याच्या सारखे सुख नाही. दोघे सामानाची आवरा-आवर करतात. रूम मधे असलेल्या कपाटावर रतन सासू ने दिलेली भांडी मांडते. कपडे नीट-नेटके ठेवते घरून आणलेला स्टो पण नीट ठेवते. सगळे बऱ्या पैकी उरकतात. स्वयंपाक करण्यसाठी काही वस्तु नसतात. प्रकाश म्हणतो, तुझे उरक आपण बाहेर जाऊ जेवण बाहेर करू आणि येताना लागणारे समान आणू. रतन लगेच तयार झाली. दोघे बाहेर पडले. गावच्या पोरीला थोड वेगळे तर वाटणार. लाजरी बुजरी रतन ईकडे तिकडे पहात होती'',व स्वतःला सावरत होती, पण प्रकाशच्या हे लक्षात आले. त्याने तिला सावरले व तिला संगितले, घाबरू नको. मी आहे. रतन ला बरे वाटले. जेवण करून दोघे परत फिरले. ........... थोडा आराम केला. खोलीच्या मालकीन काकू आल्या प्रकाशने व रतन ने त्याला नमस्कार केला. काकू म्हणल्या, सकाळी येणार होते. पण लगेच कसे यावे म्हणून......... तर तुम्हाला काही लागले तर नक्की सांगा. येथे काही घाबरण्याचे करण नाही आम्ही सगळे होत. दोघाणींत्याचे आभार मानले. घरातील सामानाची आवरा-आवर करून रतन संध्याकाळच्या स्वयंपाक करयला लागली.प्रकाश एक पुस्तक वाचत बसला. त्याला वाचण्याची खुप आवड होती. रात्रीच जेवण झाल्यावर दोघांना घरची आठवण येत होती. रतन म्हणली,आहो, मा झे एक ऐका घरी आपली काळजी करत असतील. त्यांना एक पत्र लिहा, हो मी पण तोच विचार करतो प्रकाशने पत्र लिहायला घेतले. .. प्रिय आई व बाबा यांना माझा रतन चा सप्रेम नमस्कार आम्ही काल रात्री ठीक नऊ वाजता पोचलो. तु दिलेले जेवण केले. आज सकाळी आवरा-आवर गेली. जेवण करण्यसाठी काही वस्तु नव्हत्या म्हणून बाहेर जेवण करून लागणारे समान घेतले. घरी आलो. आतच रात्रीचे जेवण केले. व पत्र लिहण्यासाठी घेतले. आमची काळजी करू नका. आम्हाला तुमची आठवण येते. आणि आई तुझी व बाबांची काळजी घे. आम्हाला माहीत आहे तुम्हाला करमत नसेल. उदया कामावर जायचे आहे. बाबा पात्रांचे उत्तर दया. काळजी घ्या. ... तुमचा प्रकाश....... प्रकाशच्या आई बाबांना खरच खुप आठवण येत होती. रतन च्या सासूबाईंना सारखा रतन चा भास होत असे. सहा महिन्यात रतन ने घरला व घरातील माणसांना आपले करून घेतले होते.जेवण बनवण्याची तर सवयच मोडली. त्या उदास राहू लागल्या. रतन च्या सासरे यांनी विचारले, का ग त्या म्हणाल्या, मला रतन ची आठवण येते. अस वाटत ती मला आवज देते. मला पण आठवण येते. हळु हळु सवय होईल. करू दे त्यांना आनंदाने संसार. देव त्यांना सुखी ठेव . नेहमी प्रमाने प्रकाश कामाला जाण्याची तयारी करत होता. रतन डबा तयार करत होती. मनात भीती पण होती. पण तिने तसे प्रकाशला कळू दिले नाही. कामाला जाताना प्रकाशने काकूंना रतन कडे लक्ष ठेवण्यास सागितले. काकूंच्या कडे जा असे रतन ला संगितले.प्रकाश. गेल्यावर तिने सगळे काम आवरले. बाकी शेजारी पण चांगली होती. .............................. . . प्रकाशची आई घरात काम करत होती. बाबा अंगणात काही तरी करत होते तेवढ्यात पोस्टमन आला. जोरात म्हणला काका पत्र आले आहे.बाबांनी पत्र घेतले. घरात येत म्हणले, ''अग प्रकाशाचे पत्र,हो मग वाचा की,प्रकाशची आई म्हणली.बाबांनी पत्र वाजले दोघांना आनंद झाला. चला, देवाच्या क्रुपेने सगळे ठीक आहे. पात्रांचे उत्तर दया. असे प्रकाशची आई म्हणली. हो लगेच.................... . .. रतन ची सगळ्या सोबत चांगली मैत्री झाली होती. प्रकाश रतन ला अधुन-मधून फिरायला घेऊन जात असे. दोघे आनंदाने राहत होते. रतन ने तिच्या आईला पण पत्र लिहिले होते. ती पण सगळे सुखी व खुशाल होते. प्रकाशच्या बाबांचे खुशालीच पत्र आले सगळे आनंदी होते. पण '' देव करो कोणाची नजर लागू नये.'......... असेच आनंदाने दिवस चालले होते. प्रकाश रतन ला म्हणला, आज रविवार मला सुट्टी आहे. आपण बाहेर फिरायला जाऊ एकदा सिनिमा पाहू. रात्री चे जेवण बाहेर करू. फिरायला कोणाला आवडणार नाही? रतन लगेच हो म्हणली. रतन .मस्त तयार झाली. दिसायला सुंदर असल्याने ती खुप सुंदर दिसत होती. प्रकाशला आपल्या बायकोचा खुप अभिमान होता. तो नेहमी बोलायचा माझी बायको खुप सुंदर आहे. रात्री उशीरा परत येतात.
रतन प्रकाशला दोन महिने झाले होते शहरात जाऊन. प्रकाशच्या बाबांचे पत्र आले. की प्रकाश रतन साठी अनेक आशीर्वाद ,आणि मकरसाक्रंत या सनाला गावी यावे .रतन ला पहिली संक्रांत असल्याने माहेरी पटवायला लागेन .तिच्या महेरहून तसा निरोप आला आहे. तरी तुम्ही जरूर येणे. . .. प्रकाश रतन ला तुला काय हवे ते घे, साडी हवी असेल तर घे. घरून तर आई देणार आहे. पण तुझ्या आवडीने पण घे. माहेरी जायच म्हणून काय बोलावे ते कळत नव्हते ती म्हणली ,नंतर सांगते. रतन च्या माहेरी सगळे आनंदी होते. रतन येणार आई तर वाट पाहत होती. रविवारी सुट्टी असल्याने व संक्रांत मंगळवारी होती. म्हणून ते रविवारी सकाळी निघणार होते. तस प्रकाशने पत्राने कळवले होते. प्रकाशने बाजारात जाऊन रतन ला काय हवे ते घेतले. रतन ने पण सासू-सासरे यांच्या साठी काही वस्तु घेतल्या. गावी जायच्या अगोदर तिने तेथील लोकांच्या गाठी-भेटी घेतल्या. . रविवारी सकाळी नऊ वाजता दोघे गावी जाण्यास निघाले. काकू म्हणाल्या, रतन लवकर ये. बाकी शेजारी पण म्हणले, लवकर यां दोन लहान मुलांना जवळ घेऊन त्यांना खाऊ साठी पैसे दिले. दोघे गाडीच्या दिशेने गेले. ...... प्रकाशाचे आई व बाबा रतन ला संक्रांतीला लागणाऱ्या वस्तु आणल्या होत्या. सुंदर साडी,बांगड्या,तीलगुलचे लाडू, ओटिचे साहित्य, कोरडा ओवसा म्हणजे ऊस, बोरे, सहा प्रकारच्या भाज्या आजू लागणारे काही साहित्य .रतन व प्रकाशची वाट पाहत होते.