ATRANGIRE EK PREM KATHA - 3 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 3

Featured Books
Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 3



संपुर्ण ग्राउंडवर फुटबॉल मॅच सुरू होण्याचा एक वेगळाच उत्साह होता. दोन्हीही टीम विभक्त होऊन आपापले कॅप्टन निवडु लागले. टीम ग्रीन ला केप्टन ठरवायला जास्त वेळ नाही लागला कारण त्यांच्याकडुन रोहन खेळतच होता. शौर्यचा कालचा गेम बघता टीम रेडमधुन शौर्यला केप्टन करण्याचे ठरले.

सर : "Kindly note that this match is for practice only so we will play it for 45 minutes only instead of 90 minutes. we will shortlist 11 and 4 extra player. They will play for our Inter college match. Every one got my point??"

"येस सर..." ( सगळे एकत्रच ओरडले)

एक शिटी वाजली तस टिम ग्रीन मधील एकाने फुटबॉलला जोरात किक मारली. टिम ग्रीनमध्ये आतल्या आत फुटबॉल पास होऊ लागला. पहिल्याकडुन दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून पुन्हा पाहिल्याकडे आणि मग पुढे असा काहीसा फुटबॉल पास होऊ लागला. टिम ग्रीनकडुन फुटबॉल स्वतःकडे हिसकावुन घेण हे जणु टिम रेडच टार्गेटच बनलं होत. फुटबॉल हळुहळु टिम रेडच्या गोलकीपरजवळ चाललेला. पण मध्येच शौर्यने आपल्या चतुराईने तो एकाकडुन हिसकावुन घेत दुसऱ्याकडे पास केला आणि तो धावतच पुढे जाऊ लागला. शौर्य पुढे जाताच तो फुटबॉल पुन्हा त्याच्याकडे आला. शौर्यने एक कटाक्ष गॉल पोस्टवर टाकला. अजुन गॉल पोस्ट खुपच लांब होता. पण अचानक समोरून त्याला रोहनने घेरलं. रोहने संपुर्ण लक्ष फुटबॉलवर ठेवलं. काहीही झालं तरी शौर्यकडुन फुटबॉल हिसकावन हेच त्याच टार्गेट त्याने ठेवलेलं. दोघांत जुगलबंदी चालु झाली. शौर्यने आजुबाजुला नजर फिरवली. शौर्यने त्याच्या विरूध्द दिशेने फिरत त्याच्या मागे असणाऱ्याकडे फुटबॉल पास करतोय अस भासवतच पुन्हा स्वतःच्या पायात रोखुन धरत रोहनला चकवा देत पुढे गेला.

"शटsss "करत रोहनने रागातच आपला हात झटकत नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा शौर्यच्या मागे पळु लागला. पण त्याने आता काही फरक पडणार नव्हता कारण शौर्यची असणारी फुटबॉलवरची पकड आता काही सुटेल असे काही दिसत नव्हतं.

गॉल पोस्टवर असणाऱ्या ग्रीन टिमच्या गोलकीपरची हृदयाची धडधड जणु अचानक वाढु लागली होती. प्रेक्षक म्हणुन बसलेले इतर कॉलेज स्टुडंन्ट अगदी अवाक होऊन शौर्यची ही जुगलबंदी बघु लागले. शौर्यsss... शौर्यsss.. करत सगळे त्याला चिअर अप करत होते. पुढे येणाऱ्या सगळ्या प्लेयर्स ना चकवा देत एकच किक मारत शौर्यने गॉल केला. संपूर्ण रेड टीम मध्ये जणु जल्लोष झाला. शौर्यने उजवा हात घडी करत डोळ्यांसमोर धरत डावा हात सरळ रेषेत वर करत प्रसिद्ध फुटबॉल पटु नेयमार ची प्रसिद्ध अशी स्टेप करत आपला आनंद व्यक्त केला. सगळे त्याचे टिम मेम्बर त्याला हाय फाय देत मिळालेल्या पहिल्या पॉइंटचा आनंद लुटत होते.

पुन्हा फुटबॉल हवेत उडवण्यात आला.. वृषभने छातीवर झेलत आपली फुटबॉलवरची कमाल दाखवत त्यावर पकड धरत तो पुढे पास केला. हळुहळु फुटबॉल पुन्हा गॉलपोस्ट जवळ जाऊ लागला पण तोच ग्रीन टिमच्या एका खेळाडुने आपल्या चलाख बुद्धीने तो अगदी सहजरित्या हिसकावुन घेतला आणि पळतच पुढे पास करू लागला. एकाकडुन दुसरीकडे मग पुढे असा रेड टिमच्या एकेएक प्लेयर्सना चखवा देत तो पुढे जाऊ लागला. फायनली तो रोहनकडे येऊन धडाडला. काहीही झालं तरी हा गॉल करणे हेच रोहनच टार्गेट होत. रेड टिमचा गॉल पोस्टच्या अगदी काहीश्या अंतरावरच तो होता. रोहनसुद्धा एकेकाला चकवा देतच पुढे जात होता. तोच शौर्यने त्याला घेरलं. शौर्यने मात्र स्वतःची नजर फुटबॉलवर स्थिर ठेवली. शौर्यला चकवा देणं म्हणजे रोहनसाठी एक आणखी मोठं टार्गेट होत. शौर्य फुटबॉलला किक मारतच फुटबॉल रोहनकडुन हिसकावुन घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण रोहनने फुटबॉलला मागे घेत शौर्यला चकवा देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि शौर्यने रोहनकडुन तो यशस्वीरित्या हिसकावुन घेत पुढे वृषभकडे पास केला आणि तोही पुढे पळु लागला. हळुहळु फुटबॉल पुढे जाऊ लागला आणि पुन्हा शौर्यच्या पायात येऊन तो आदळला. शौर्य सहज गॉल करू शकला असता पण त्याने तस न करता तो त्याच्या बाजुला असणाऱ्या वृषभकडे पास केला आणि ह्यावेळेस वृषभ ने कमाल दाखवत आणखीन एक पॉईंट टीम रेडच्या खात्यात टाकला. पुन्हा रेड टिम मध्ये जल्लोषाचे वातावरण झाले.

वृषभ हसतच शौर्य जवळ येऊन त्याला मिठी मारत आपला आनंद व्यक्त करू लागला. राज दोघांचीही नाव घेत त्यांना चिअर्प करत होता. शौर्य आणि वृषभसुद्धा आपल्या ग्रुपला हात दाखवत आपल्या आनंदात त्यांना सामील करून घेत होते. तोच शौर्यच लक्ष स्कॉरबोर्डच्या आडोश्याला गेल. समीरा तिथे उभी होती आणि ती जणु आपल्याकडेच बघतेय अस शौर्यला जाणवत होतं. पण ही तर प्रॅक्टिसला गेलेलीना?? शौर्यने स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारला. तोच पुन्हा शिटी वाजवत फुटबॉल आकाशात उडु लागला. शौर्यने समीराला तो तिच्याकडे बघत आहे असं जराही भासवल नाही पण आता त्याच लक्ष हळुहळु तिथेच जात होतं. एक खोल श्वास घेत त्याने गेममध्ये लक्ष टाकल आणि फुटबॉलच्या मागे पळु लागला. पण आता ग्रीन टीमने देखील आपली कमाल दाखवायला सुरुवात केली. फुटबॉल हळुहळु ती टीम रेडला चकवा देतच हळूहळू टिम रेडच्या गॉलपोस्टजवळ जावु लागला आणि फायनली रोहनकडे येत रोहन ने पुढे जातच जोरात किक करत एक गॉल केला आणि एक गुण घेत रेड टिमच्या खात्यात. शौर्यच मात्र लक्ष आता खेळात लागतच नव्हतं. रोहनला सगळे चिअर अप करत होते. तो पुन्हा स्कॉरबोर्डच्या इथे बघु लागला पण आता तिथे समीरा नव्हती. खरच समीरा होती का तो भास होत त्याच त्यालाच कळत नव्हतं. तोच रोहन ने त्याच्या खांद्यावर जोरात खांदा मारत पुढे गेला. रोहनने इतक्या जोरात शौर्य खांदा मारला की शौर्य पाठी वळला आणि रोहनकडे बघु लागला. रोहन नेहमीप्रमाणे उजव्या हाताची दोन बोट आपल्या डोळ्यासमोर धरत नंतर शौर्यला दाखवत हसतच तिथुन निघाला. शौर्यने पण त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. त्याची नजर फक्त समीराला शोधत होती.

काही फुटबॉल अगदी सहजरित्या गॉल झाले आणि काही गॉल होण्याच्या आधीच ते गोलकीपरने आपली कमाल दाखवतच अडवले.

पंचेचाळीस मिनिटांचा तो सामना संपु नये असं वाटत होतं पण तो अखेरसंपला. सरांच्या हातात एक यादी होती त्यात सरांनी निवडून घेतलेल्या 15 जणांची नाव होती त्यात शौर्य आणि वृषभच देखील नाव होतं. सरांनी दिलेल्या सूचना वरच्यावर ऐकतच तो आणि वृषभ तिथुन निघाले.

कपडे चेंज करून दोघेही आपल्या ग्रुपजवळ गेले.

दोघांचंही टिममध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल कौतुक होऊ लागलं. सगळे कॉलेजच्या कँटीनमध्ये जाऊन बसले.

प्रत्येकाने सॅंडविच ऑर्डर केलं. शौर्य बराच वेळ फोन मधील अपडेट बघितले नव्हते त्यामुळे तो फोन चाळत बसला. ग्रुपमध्ये चालु असणाऱ्या मज्जा मस्तीमध्ये त्याच लक्ष नव्हतं.

"काय यार तु मोबाईल घेऊन बसलायस."राज ने त्याचा मोबाईल खेचतच लोक करून टेबलवर ठेवला.

"सॉरी", अस बोलत शौर्य फोन खिश्यात ठेवु लागला.

आणि थोड्याच वेळात वृषभ आणि टॉनी सगळ्यांसाठी सँडविच घेऊन आला. सगळीजण खायला चालु करणार तोच समीरा आली.

राज : हाय समीरा ! तु पण आलीस..

शौर्यला वाटलं की राज पुन्हा मस्ती करतो त्याने बघतीलच नाही. फक्त गोड हसत राज कडे बघितलं जणु तो सांगत होता की ह्या वेळेला मी काही फसणार नाही.

समीरा : "हे काय तुम्ही लोक मला एकटीला टाकुन सँडविच खातायत."

एक भुवई उडवत राज शौर्यला चिडवु लागला.

र"बघ तर, काय शौर्य तु पण तुला समजत नाही काय?? आम्ही सगळे इथे थांबलोय हिच्यासाठी आणि तु खुशाल सँडविच खात बसलायस. किती वाईट वाटल बघ तिला. समीराला टाकुन तु सॅंडवीच खाऊच कस शकतोस... हां.." उगाच नकट्या रागात शौर्यला दम देण्याची एकटिंग्ज राज करू लागला.

तसा शौर्यला जोरातच ठचका लागला.

वृषभ आणि टॉनीला हळुहळु कळत होत की ह्या दोघांचं नक्की काय चाललंय ते.. दोघेही एकमेकांकडे बघत इशाऱ्यानेच काही तरी बोलु लागले.

टॉनी पाण्याने भरलेला ग्लास शौर्यच्या पुढे केला.

शौर्य पाणी पिऊ लागला.

ग्लास खाली ठेवतच टॉनीला तो थेंक्स बोलु कागल.

समीरा : "Are You Ok??"

"हम्मम." शौर्य रागातच राजकडे बघत बोलतो.

राज : "अस का बघतोस यार माझ्याकडे.. आम्ही सगळे खरच तिच्यासाठी थांबलेलो हे बघ."

शौर्यने सगळ्यांच्या प्लेटकडे बघितलं तर खरच कोणी खाल्लच नव्हतं.

टॉनी : "एक मिनिट हा कोईनसिडेंट होता. नाही तर आपण कधीपासून अस थांबायला लागलोय. तो नवीन आहे म्हणुन तु त्याला काहीही सांगतोस तु."

राज डोळे मारून टॉनीला काही तरी इशारे करत होता.

"एक मिनिट माझ्यासाठी भांडायची काही गरज नाही, मी सहज बोलले होते." समीरा समजुत काढतच बोलली..

आणि एक चेअर घेऊन शौर्यच्या बाजुला बसली.

राज : "अरे आम्ही तर मस्ती करतोय शौर्यची."

"सँडविच घेणं.. "मनवीने आपली प्लेट समीरा पुढे करत म्हणाली. तश्या सगळ्यांनीच आपापल्या प्लेट्स समीराच्या पुढे केल्या. नकळत शौर्यने सुद्धा.

समीरा : "थेंक्स गाईज बट तुम्ही चालु करा मी माझं सँडविच घेऊन येते आणि कुणाला काही हवंय???"

राज डावी पापणी वर उडवत हसतच शौर्यला चिडवु लागला. तस शौर्यने एक पाय जोरातच राजच्या पायावर मारला.

"आहsss.." करत राज ओरडला.

समीरा : "काय??"

"कुठे काय??" एक हात पायाजवळ धरत थोडं कळवळतच तो बोलतो..

समीरा : "अरे आता हा बोललास ना.. "

राज : "मग??"

समीरा : "तुला अजुन काही हवंय??"

राज : "नाही नको.."

समीरा : "आता हो बोललास ना??"

राज : "कधी??"

समीरा : "जाऊ दे सोड.. काही नकोय ना तुला?"

राज : "नकोय."

समीरा तिच्यासाठी काही तरी खायला घेऊन येण्यासाठी निघाली.

राज हॉस्टेलमध्ये भेटशीलच ना आपण बोलुच", समीरा जाताच शौर्य राजला हसतच बोलला.

टॉनी : "का रे काय झालं?"

राज : "हा शौर्य काय झालं?? इथेच बोलणं"

(राजसुध्दा हसतच बोलु लागला)

"तुला चालेलना इथे बोललेलं??" थोडं गंभीर असा चेहरा करत शौर्यला विचारू लागला.

राज : "मला तर चालेल"

शौर्य : "बघ मग बोलु नकोस तु इकडे ह्या सगळ्यांच्या पुढ्यात का बोललास म्हणुन??"

राज : "आपला मित्र परिवात आहे यार हा बोल बिनधास्त.."

शौर्य : "बघ नक्की ना??"

सीमा : "आता तो एवढं बोलतोय तर बोलणं."

राज : "तेच तर.. नुसतं आपलं नक्की नक्की करत बसलायस. "

(राजला वाटत की हा समीरा बद्दलच आपल्याला विचारतोय)

शौर्य : "बस काय राज.. आता तुझी परवानगी घेण गरजेचं आहेना. "

राज : "काय मित्रा तु पण. अस आपल्या मित्राकडे परवानगी मागत बसतोस. जाऊदे दिली परवानगी बोल आता."

शौर्य : "गाईज आमच्या बॉईज होस्टेलवर रात्रीना एक वॉचमेन असतो त्याच ना एका मुलीशी अफेर आहे आणि तुम्हाला माहिती तीच नाव चांदणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती ती मिस चांदणीना.."

"शौर्य आपण नंतरच बोलुयात ह्या विषयावर. मित्रा मला आधी माहीत असत तु ह्या विषयावर बोलणार तर मी नसती दिली असती परवानगी तुला." राज तोंडात टाकणारा सॅंडविचचा पीस खाली ठेवतच बोलला शौर्यला मध्येच तोडत बोलु लागला.

वृषभ आणि टॉनी एकमेकांना टाळ्या मारतच हसु लागले..

सीमा : "राज जरा शांत बसरे. कोण ती मिस चांदणी???"

राज : "कोणी पण असेलना ती तुला काय करायच्यात नसत्या चौकश्या ग?? मुलींना फक्त तेवढीच काम असतात."

सीमा : "तुला काय प्रॉब्लेम आहे?? "

मनवी : "बघ तर तुला काय प्रॉब्लेम आहेरे. "

राज : "मला प्रॉब्लेम आहे.. शौर्य आपण हॉस्टेलवर गेल्यावर बोलु."

(टॉनी आणि वृषभ हसतच राजची मज्जा घेत होते.)

टॉनी : "होस्टेलमध्ये का? आम्हाला पण कळलंच पाहिजे कोण आहे ती चांदणी??"

राज : "तुला सांगतो मी. रूममध्ये चल.."

सीमा : "ए शौर्य सगळं जाऊदे आम्हाला सांग ना"

राज : "शौर्य नाही.."

सीमा : "का नाही?? आता तर आम्हांला ऐकायचंच आहे..."

"हो हो.. ऐकायचंच आहे..", वृषभ आणि टॉनी एका सुरात राजला चिडवतच बोलु लागलर

राज : "मी नाही म्हटलं तर नाही.."

शौर्य फक्त मज्जा बघत बसला.. आणि तोच त्याचा फोन वाजला. खिश्यातून फोन काढतच त्याने नंबर बघितला तर विराजचा फोन होता.

शौर्य : "चालु द्या तुमचं मी येतोच फोनवर बोलुन."

बाहेर जाऊन शौर्यने फोन उचलला.

विराज : "हेय ब्रो, कसा आहेस??"

शौर्य : "हम्म.. जसा होतो तसाच आहे. का फोन केलायस??"

विराज : "तु माझ्यावर पण रागवलायस??"

शौर्य काहीही न बोलता शांत बसुन असतो..

"शौर्य प्लिज बोलणं.. मी मम्माला समजवण्याचा प्रयत्न केला ना.. ती ऐकतच नव्हती यार माझं.. आणि तु मम्माचा फोन का नाही उचलत?? दोन दिवस नीट जेवली नाही ती, ना कश्यात तीच लक्ष लागतंय.. का असा वागतोस तु.?"

शौर्य : अजुन??

विराज : अजुन म्हणजे काय?? तुला बोलावसं नाही वाटत का आमच्याशी??

शौर्य : "नाही वाटत. तुझ्याशी तर अजिबात नाही.."

विराज : अस का बोलतोस??

शौर्य : "विर आत्ता कोणाशी कस बोलायच ते पण तुम्ही लोकच शिकवणार का मला?.. आणि मला नाही बोलायचंय.. तुझ्याशी पण नाही आणि मम्मासोबत तर नाहीच नाही"

विराज : "अरे तु माझ्यावर का भडकतोयस. एक तर तुझी आठवण आली म्हणून तुला फोन केला आणि तुझं हे असं. बाय दि वे तु आहेस कुठे??"

शौर्य : "जिथे आहे तिथे खुश आहे.. मला फोन करून डिस्टरब नका करू दोघांनी पण.. तुला तर सांगतोय मी.. तु तुझ्या मम्माला सांग.. आत्तापर्यंत नेहमीच तिला माझा त्रास होत आलाय आत्ता मला तिचा आणि तुझा, तुम्हां दोघांचा त्रास होतोय.. बायss"

विराज : अरे पण??

शौर्यने विराजच पुढचं काहीही न ऐकुण घेता फोन ठेवला. त्याला सुद्धा त्याच्या आईची आठवण येत होती पण आता नको रात्रीच फोन करू असा विचार करून तो आत पुन्हा कँटीनमध्ये जाऊन बसला.

सीमा : "शौर्य बर झालं आलास तु.. तु सांग ना पुढे काय झालं.."

शौर्य : "अरे हो.. तस मी कुठे होतो.??"

मनवी : "मिस चांदणी.. आय मिन त्या वॉचमेनची प्रेमिका.."

राज : "शौर्यss, आपण नंतर बसुन बोलूयात ना बस काय.."

"नक्की... ?" शौर्य हसतच राजला विचारू लागला.

"काय चालु आहे तुमच आणि ही चांदणी कोण आहे? नवीनच नाव आहे." समीरा सॅंडवीचच एक पिस तोंडात टाकतच विचारते..

मनवी : "अग बॉईज हॉस्टेलच्या बाहेर जो वॉचमन बसतोना त्याच एका चांदणी नावाच्या मुलीसोबत अफेर आहे आणि हा बोलतो की ती रोज त्या वॉचमेनला भेटायला त्या बॉईज हॉस्टेलवर जाते ते ही लपून छपून.."

समीरा : "तुला येऊन तर दोन दिवस झालेत तुला कस माहिती एवढं??"

शौर्य : "मला ना.. राज... ह्या राजनेच सांगितलं.. हो ना राज.."

(शौर्य राजच्या खांद्यावर हात ठेवतच बोलला)

राज : "अंह ssaह हो..."

सीमा : "काय रे राज तुला कस माहिती तीच नाव चांदणी आहे ते??"

राज : "मी नाही सांगणार.. आणि तुला तर नाहीच नाही. आली मोठी डिटेक्टिव्ह बनायला."

सीमा : "तुना.."

राज : "मग तु पण ना."

वृषभ : "गाईज.. गाईज.. लेट्स गो.. बस झालं..नाही तर मस्ती मस्तीत आता भांडण होतील. समीरा तुझं सॅंडविच खाऊन झालं की आपण निघुयात."

समीराच सॅंडवीच खाऊन होताच सगळे निघु लागले.

शौर्य : "मी लायब्ररीत जातोय माझं थोडं काम आहे"

राज : "माझं पण."

सगळयांना बाय करून शौर्य लायब्ररीत जाऊ लागला. मागोमाग राजसुद्धा..

राज : "तु अस का वागलास माझ्यासोबत??"

शौर्य : "हेच मी तुला विचारणार होतो."

राज : "काय??"

शौर्य :" समीराला बघुन तु मला का चिडवतोयस.."

राज : "मी कधी चिडवलं??"

शौर्य : "राज don't lie.. "

राज : हेय समीरा.. तुझं पण काम आहे का लायब्ररीत??

शौर्य : "राज प्लिज स्टॉपना.. नको ना यार.."

आणि शौर्य पुढे जाऊ लागला..

समीरा : "शौर्यss"

राज डोळ्यानेच इशारा करत त्याला त्याच्या पाठी बघायला सांगु लागला.

शौर्य पाठी बघतो तर समीरा. आपल्या हातातली डेरीमिल्क पुढे करतच त्याला स्माईल देत उभी राहिली.

शौर्य दोन मिनिटं तिच्या त्या सुंदर अश्या डोळयांत बघतच राहिला.

¶¶आँखों में तेरी
अजब सी अजब सी अदाएं हैं
दिल को बनादे जो पतंग साँसे
ये तेरी वो हवाएं हैं¶¶

एक हाथ शौर्यच्या डोळ्यांसमोरून समीरा फिरवत त्याच्या डोक्यात वाजणार गाणं जणु बंद करू लागली.

राजने समीराच्या नकळत शौर्यच्या हाताला चिमटा काढला तसा तो भानावर आला.

"आहsss.. राज काय करतोयस.." शौर्य आपला हात चोळतच बोलतो..

राज : "कधीच ती डेरीमिल्क घेऊन उभीय आणि तुझ मात्र काहीतरी वेगळंच चालु आहे."

शौर्य : 'अरे लगेच घेऊन पण आलीस.."

समीरा : "मगाशीच घेतलं बट सॅंडवीच खाण्याच्या नादात द्यायला विसरली तुला. धर..."

शौर्य : "राहु दे. तु खा.."

समीरा : "माझ्याकडे अजुन एक आहे.. आणि ही तुला घ्यावीच लागेल. You deserve that."

शौर्यचा हाथ पुढे करत ती त्याच्या हातात डेरीमिल्क देऊन त्याला एक गोड स्माईल करत तिथुन निघाली..

शौर्य मात्र तिच्याकडे बघतच राहिला.

राज : "गेली ती.."

"हो ना..", शौर्य तोंड पाडतच बोलतो..

राज : "तिला जाऊन बोलणं की तुला ती आवडते म्हणून थांब मीच बोलतो.. ए स...."

शौर्य लगेच राजच तोंड बंद करतो..

शौर्य : "काय करतोयस?"

राज : "मस्ती करतोय यार. "

"हो का मिस चांदणी???" शौर्य चिडवतच राजला बोलु लागला.

राज : "एक तर मी तुमच्यासाठी एवढं केलं आणि तुम्ही मला असं चिडवता. नेक्स्ट टाईम बघतो तुम्हाला.."

"अरे वाहह.. तु करतो ती मस्ती आणि आम्ही केली की?? हां हां.." शौर्य त्याच्यावर चिडलेल्या राजला गुदगुदल्या करू लागला.

दोघेही मस्ती करत लायब्ररीत जाऊ लागले. तोच मनवी आणि सीमा तिथे आली..

"मला ही बुक परत द्यायचीय लायब्ररीत." मनवी बुक दाखवतच बोलली..

"चला आपण एकत्रच जाऊयात." शौर्य बोलतो..

चौघे जण गप्पा मारत जाऊ लागले.

सीमा : "ए शौर्य नंतर आम्हाला तु सांग हा त्या चांदणी बद्दल.."

राज : "अजुन डोक्यात तेच का?? थोडं अभ्यासात लक्ष दे"

सीमा : "मला काय वाटत माहिती का मनवी ही चांदणी ना नक्की ह्याचीच कोणी तरी लागत असणार."

मनवी : "हो मलाही तेच वाटतंय. शौर्य अस काही आहे का??"

शौर्य : "हो म्हणजे नाही...म्हणजे ऐकणं आपण ह्या टॉपिकवर नकोना डिस्कस करूयात. कारण राजला खुप वाईट वाटत त्या चांदणीबद्दल काही बोललो तर"

राज : "एक मिनिट शौर्य तु माझ्या बाजुने बोलतोयस की ह्यांच्या??"

शौर्य : "अस काय करतोस राज मी तुझ्याच बाजुने बोलतोय. प्लिज आता भांडण नकोत आपण जाऊन बुक घेऊयात."

लायब्ररी चौथ्या मजल्यावर होती.

चौघेही चौथ्या मजल्यावर पोहचून लायब्ररीत जाऊ लागले.

रोहन तिथेच मित्रांसोबत मस्ती करत बसलेला पण रोहनला बघुन शौर्यने इग्नोर केलं आणि चौघेही लायब्ररीत शिरले

रोहनच मात्र मनवा आली ह्याकडे लक्षच नव्हतं.. तो मित्रांसोबत टवाळक्या करण्यात गुंतून गेलेला.

लायब्ररीत जाताच शौर्य त्याला हवी ती टेक्स्ट बुक शोधु लागला खुप वेळाने त्याला हवी ती बुक भेटली. तो बुक घेऊन त्याची एन्ट्री करतच बाहेर येऊन बाकीच्यांची वाट बघत थांबला. मोबाईल काढून त्यात काही तरी टाईमपास करू लागला.

हि दोघ आली नाही का अजुन..मनवीने बाहेर येताच शौर्यला विचारले.

शौर्य : "अजुन पर्यंत तर नाही आली.."

मनवी : "तुला भेटलं का बुक??"

शौर्य : "हो भेटलं आणि तुझं झालं का काम??"

मनवी : "मला तर बुक रिटर्न्स द्यायचं होत मी दिल ते. "

थोड्यावेळात राज आणि सीमासुद्धा येतात.

चौघेही गप्पा गोष्टी करत खाली जाऊ लागले.

खाली जाताना वाटेतच एका खिडकीला काच असते त्यात चेहरा बघत राज आपले केस निट करू लागला आणि मध्येच त्याला काही तरी आठवलं तो पुन्हा थोडं मागे गेला

राज : "तुम्हाला चांदणी बद्दल ऐकायचं होत ना"

शौर्य : "राज आर यु ओके..?"

राज : "शौर्य जाऊ दे आज मी ह्या दोघींना चांदणी दाखवुनच देतो. पण एका अटीवर?? कुणालाही त्याबद्दल सांगायचं नाही.."

मनवी : "नाही सांगत कुणालाच.."

हो मी पण नाही सांगणार सीमासुद्धा बोलु लागली.

ठिक आहे मग मी दाखवतोच तुम्हाला.. राज थोडं सिरीयस होऊन बोलला.

"ती बघ ती दिसते रेड ड्रेसमध्ये.. तीच ती.. मिस चांदणी.. त्या प्यारेलालची गर्लफ्रेंड.." समोर असणाऱ्या खिडकीच्या काचेत बोट दाखवत राज बोलु लागला.

त्यात सीमाच प्रतिबिंब दिसत होतं. सीमाच प्रतिबिंब बघताच तिघेही हसु लागले. सीमा रागातच राजला मारायला त्याच्या मागे पळु लागली. राज शौर्यच्या मागे लपुन तिला चिडवत होता. सीमाने शौर्यला पकडतच बाजुला केलं तसा तो मनवीवर जाऊन आदळणार पण त्याने त्याचा तोल सभाळाला पण शौर्य आपल्या अंगावर येईल म्हणुन मनवी मागे झाली पण पायात उंच असे हिल घातल्याने तिचा तोल जाणार पण शौर्यने तिला आपल्या हातावर झेलले.

"आर यु ओके??" शौर्यने तिला नीट उभं करतच विचारलं..

मनवी : "हम्म.. थेंक्स शौर्य..'

शौर्य : "तुम्हा दोघांचं झालं तर जाऊयात आपण.?"

सीमा : "आय एम सॉरी मनवी.."

मनवी : "इट्स ओके. पण थोडं बघुन मस्ती करत जा.. शौर्य नसता तर मी आता पडलेच असते."

आणि चौघेही तिथुन जाऊ लागले.

चौघेही उतरताना जिन्यावर असणाऱ्या रोहनकडे त्यांचं लक्ष जात. तो एकटक मनवीकडेच बघत असतो.

चौघेही शांतपणे तिथुन जाऊ लागले

मनवी दोन जिने उतरली तस रोहन गाणं बोलु लागला..

¶¶तुझे देख के मेरी मधुबाला
मेरा मन ये पाऽऽगल झाला
तुझे देख के मेरी मधुबाला
मेरा मन ये पागल झाला
तुने एक बार हंसके जो बोला
तो मन पंछी बन के डोला
तुने मन का द्वार जो खोला
मन कामातूनच गेला¶¶

मनवी अक्षरशः खाली उतरेपर्यंत तिला रोहनचा आवाज ऐकू येत असतो.. खर तर मनवीला रोहन सुरुवातीपासूनच आवडत असतो पण त्याच्या अंगात असणारा अतरंगीपणामुळे मनवी त्याला इग्नोर करत असते.

राज : "काय ग मनवी आजच गाणं छान होत ना?? पण सूर जरा इथे तिथे लागले त्याचे बट इट्स ओके..नेक्स्ट टाईम अजुन चांगलं गाईल तो अशी अपेक्षा करूयात आपण."

"बर..' एवढं बोलुन मनवी पुन्हा वर्ती जाऊ लागली.

राज : "तु पुन्हा वर्ती त्याच गाणं ऐकायला चाललीस का??"

मनवी : "नाही रे तु एवढी छान कॉम्प्लिमेंट ज्याला दिलीस त्याला सांगायला नको?? नेक्स्ट टाईम सुर नीट ऐकायला मिळतील तुला.."

शौर्य आणि सीमा गालातल्या गालात हसु लागले.

राज : "अरे मी तर सहजच मस्तीत बोलत होतो तु पण किती सिरीयस घेतेस यार.. तुम्ही मुली पण ना.. जाऊदे.. भलेपन का जमाना ना ही नही रहा."

डायलॉग मारायला कोणी ह्याच्याकडून शिकावं..मनवीसुद्धा हसतच बोलु लागली.

राज : "चला लंच टाईम होईल. मग भेटुयात दुपारी.."

मनवी : "हम्म.. भेटा तुम्ही मी जाते घरी..बाय.."

शौर्य आणि राज दोघींना बाय करून हॉस्टेलमध्ये आले..

शौर्य रूममध्ये जाणार पण राजने त्याला जबरदस्ती करत आपल्या रूममध्ये नेलं जिथे वृषभ आणि टॉनी आधीपासूनच त्याची वाट बघत होते. दोघेही एकदम सिरीयस तोंड करून त्याच्याकडे बघत होते.

आत जाताच राजने दरवाजा लावला.

शौर्य : "काय झालं?? तुम्ही दोघा अस का माझ्याकडे बघत आहात??"

(नक्की काय झालं असेल वृषभ आणि टॉनीला?? समीरा पण शौर्यवर प्रेम करत असेल?? अजुन खूप काही गंमती जमती बघायला मिळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल