ATRANGIRE EK PREM KATHA - 2 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 2

Featured Books
Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 2

तिघेही जेवण आटोपुन पुन्हा होस्टेलवर जायला निघाले. गेट बाहेर पोहचताच टॉनीने कोणाला तरी फोन लावला आणि काही सूचना दिल्या. थोड्याच वेळात वॉचमेनच्या केबिनमधला फोन वाजु लागला. थोडस तोंडातल्या तोंडातच काहीस पुटपुटत वॉचमन आत फोन घेण्यासाठी गेला. तस वेळ न घालवता तिघेही गेटवरून उद्या मारून आत आले.


वृषभ पुढे त्याच्या मागे टॉनी आणि मग दोघांच्याही मागे शौर्य अश्या पद्धतीने ते तिघ आत शिरत होते. वृषभ समोर कोण दिसत का बघत होता तर टॉनी मागुन कोणी येत का ते. तिघेही आत येणारच तोच समोरच दृश्य बघुन वृषभ जागीच थांबला तसा त्याच्या मागुन येणारा टॉनी त्याला धडकला.


टॉनी : "तु असा मध्ये का थांबल्यास चल लवकर तो हिटलर यायच्या आत."


"हळु बोल तो तिथेच उभा आहे त्या राम काकांसोबत काही तरी बोलतोय", वृषभ टॉनीच तोंड बंद करतच त्याला हळु आवाजात बोलु लागला.


तिघेही जॉन सर तिथून जाण्याची वाट पाहू लागले. थोड्यावेळाने जॉन सर राम काकांसोबत किचनमध्ये वळले. तसे हे तिघे वाऱ्याच्या वेगाने आपल्या रूममध्ये पळत सुटले.


तिघेही राजच्या रूम बाहेर जाऊन पोहचले. भीतीने तिघांचेही हात पाय गळुन गेलेले. कारण जॉन सर आहेतच तसे. जॉन सर म्हणजे कॉलेजवाल्यांसाठी हिटलर. शिस्तीला एकदम कडक. बघताच क्षणी कोणालाही भीती वाटेल अस त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांचा आवाज म्हणजेच धार असलेली तलवार. संपूर्ण हॉस्टेलमध्ये त्यांचा दरारा.


राज आणि टॉनी एकाच रूममध्ये रहात असल्याने टॉनीने स्वतःच्या किल्लीने गपचुप दरवाजा खोलला.


शौर्य काही तरी बोलणार तोच टॉनीने "शहहहह" करत आपली चाफेकळी ओठांवर ठेवत त्याला शांत केलं आणि तिघेही हळुच आत गेले.


राज एका मुलीच्या आवाजात वॉचमेनसोबत मस्ती करत होता.


राज : "अरे का हुआ प्यारेलाल. फोन काहे कट करत हो.. इ चांदणी तुमको मिलने के लिये बेताब होवत हे और इक तुम जो तुम्हारी इस चांदणी को भुलत हो."


त्याच ते मुलींसारखं हसण, लाजण बघुन तिघेही एकदम हसु लागले.


राज : "तुम्ही आलात... एकदा सांगायचं तरी."


वृषभ : "ह्याला प्यारेलालची प्रेमिका दाखवायची होती रे म्हटलं एक झलक होऊन जाऊ दे."


टॉनी : "काय मग कधी लग्न करताय मिस चांदणी??"


राज उशी घेऊन टॉनी आणि वृषभ ला मारू लागला. सगळे इकडे तिकडे पळत राजची मस्ती करत होते.


जसे दमले तसे बेडवर झोपले. खोलवर श्वास घेत शांत पडुन राहिले. शौर्य तर खुप दिवसांनी इतक हसत आणि मस्ती करत होता.


तोच राजचा फोन वाजला. फोन वृषभच्या बाजुला होता.


एवढ्या रात्री कोणरे तुला फोन करत अस बोलत वृषभ ने मोबाईल बघितला तर मम्मा म्हणुन नंबर सेव्ह केलेला.


वृषभ : "घेरे तुझ्या मम्माचा फोन आहे.."


आणि वृषभने मोबाईल राजकडे फेकला.


"वेडा मोबाईल पडला असता तर??",मोबाईल कॅच करत राज बोलला आणि गेलेरित जाऊन फोनवर बोलु लागला.


"ए शौर्य हे घे आमचे चायनीजचे पैसे", पैसे पुढे करत टॉनी बोलला. पण शौर्यच टॉनी कडे लक्ष नव्हतं तो राजला त्याच्या आईशी फोनवर बोलताना तो न्याहाळत होता.


वृषभने हातातील उशी त्याला फेकून मारली तसा तो भानावर आला.


टॉनी : "कुठे हरवतोस, हे पकड चायनीजचे पैसे.."


शौर्य : "हे काय आता?"


वृषभ : "गप्प घे रे."


शौर्य : "ए कमॉन यार, मैत्रीत पैस्यांचा हिशोब ठेवत का कोणी?"


वृषभ : "तरी सुद्धारे आम्हाला नाही आवडणार अस घ्यायला."


शौर्य : "पुढच्या वेळेला तुम्ही मला चायनीज द्या मी घेईल मग तर चालेल. पण पैसे खरच नको."


वृषभ आणि टॉनीला त्याच म्हणणं पटत.


वृषभ : "चला खाली राऊंड मारून येऊयात."


टॉनी : "चलो.."


शौर्य : "पुन्हा ते सर असतीलना.."


वृषभ : "अरे मित्रा तेव्हा आपण गेट जवळ होतो तिथे रात्रीच जाण्याची परवानगी आपल्याला नाही आहे. आपण होस्टेलमध्ये जे भलं मोठं ग्राउंड आहे तिथे जाऊ शकतो आणि स्पोर्ट हाऊस आहे तिथे जाऊ शकतो."


शौर्य : "ओके"


वृषभ : "अरे पण राजच काय??"


टॉनी : "अरे यार तो आपल्या आईसोबत अर्धा तास बोलेल मग जेवायला जाईल मग पुन्हा त्याची मातोश्री फोन करेल. बाबु जेवलास? काय जेवलास? एन्ड ऑल. "


वृषभ : "ओहह हा चला आपण जाऊयात."


शौर्य त्यांच्या बरोबर जातो.


तिघेही कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये असणाऱ्या ग्राऊंडमध्ये आले.


वृषभ : "शौर्य तुला आवडतय इथे ??"


शौर्य : "हम्मम. इथे थंडी खुप आहे मुंबईत एवढी थंडी नाही.."


टॉनी : "ओहह फायनली तु सांगितलंस तु मुंबईचा आहेस"


वृषभ आणि टॉनी एकमेकांना टाळ्या मारतच बोलु लागले.


शौर्य : "तुम्ही कुठुन आलात??"


टॉनी : मी रायपूर.. आणि हा कोल्हापूरचा


वृषभ : "काय मग उद्या फुटबॉल तुझ्यासोबत खेळायला भारी मज्जा येईल. काय भारी खेळतोस तू?? रोहनला पहिल्यांदाच कोणी तरी नडल असेल."


शौर्य : "अरे फुटबॉल तो अपनी जान हे बॉस.."


टॉनी : "ओह्हहोहो.."


तिघेही गप्पा मारून झाल्यावर जवळपास साडे नऊ वाजता आपापल्या रूममध्ये जातात.


शौर्य आपल्या रूममध्ये जाऊन बसतो आणि सामान लावायला घेतो. जवळपास अकरा वाजून जातात पण त्याला झोप येत नाही म्हणुन तो मॅनेजमेन्टच बुक काढुन वाचायला घेतो. पण डोक्यात मात्र त्याच्या वेगळंच चालू असत. शेवटी न राहवुन तो बुक बंद करतो आणि खिडकीत जाऊन उभा रहातो. संपुर्ण काळोख आणि रातकिड्यांचा किर्रर्र असा आवाज त्याच हृदय धस्त करत होत आणि एक वेगळ्याच आठवणींच्या धुंदीत तो हरवतो. एकदा लहानपणी असाच तो त्याच्या लाडक्या बाबासोबत खेळत असताना अचानक घरातील लाईट गेल्यावर त्याने घाबरतच आणि भरलेल्या डोळ्यांनी बाबाला मारलेली मिठी त्याला आठवते. नजरेसमोरून अचानक बालपण तरंगु लागल्याने नकळत एक गोड हसु त्याच्या गालावर येत आणि बाबाची ती मिठी आठवते. एक खोल श्वास घेऊन येणार आठवणीच रडु थांबवतच तो आत जाऊन बेडवर आडवा पडतो. मोबाईल हातात घेऊन बघतो तर त्याला त्याच्या मॉमचे चार मिस कॉल येऊन गेलेले असतात. पुन्हा फोन लावण्याचा विचार तो मनातच थांबवतो आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतो. जवळपास मध्यरात्री तीन वाजता त्याला झोप लागते.


साधारण सहा वाजता कोणी तरी दरवाजा ठोकतोय अस त्याला वाटत. तो डोळे चोळतच दरवाजा उघडतो.


दरवाज्यात राज, वृषभ आणि टॉनी असतात.


काय यार एवढ्या सकाळी तुम्ही. अस बोलत शौर्य दरवाजा उघडा ठेवतो आणि पुन्हा बेड वर येऊन झोपतो.


राज : "ए झोपाळु, नंतर गर्दी होईल अंघोळीला. उठ..."


सगळे त्याला जबरदस्ती उठवत अंघोळीला घेऊन जातात


शौर्य बऱ्यापैकी हॉस्टेल,कॉलेज आणि त्याचा मित्र परिवार ह्या तीन गोष्टीत रमुन गेलेला.


★★★★★


(इथे शौर्य फोन उचलत नाही म्हणुन त्याची आई अगदी चिंतेत असते)


"

अग मम्मा लक्ष कुठेय तुझं?? चहा थंड होतोय तो..". एकटक कुठेतरी हरवुन गेलेल्या आपल्या मम्माला विराजने विचारलं.


(विराज म्हणजे शौर्यचा मोठा भाऊ.)

अनिता

: "शौर्यने दोन दिवस झाले फोन उचलला नाही माझा. कसा असेल तो ठिक असेल की नाही ह्या काळजीने रात्रभर झोप नाही लागत.."


विराज : "पाठवलस कुठे त्याला??. माझे पण फोन उचलत नाही तो.. तुझ्यामुळे माझ्यावर पण रागवलाय तो.. खरच हॉस्टेलवर पाठवायची गरज होती का ग मम्मा??"


अनिता

: "जिथे पाठवलं तिथे सेफ आहे तो."


विराज त्याच्या वडिलांकडे बघु लागला पण विराजचे वडील मात्र शांतच राहिले.


विराज : "जिथे कुठे रहातो तिकडचा फोन असेल तिथे बघ फोन करून"


अनिता

: "त्याला नाही आवडणार. थोडा राग शांत झाला की तो स्वतःच करेल फोन. "


सुरज: "अति काळजी घेण कधी थांबवणार आहेस तु..? तुला तुझ्या त्या उद्धट मुलापुढे आम्ही कोणी दिसतच नाहीत का??"


"

डॅड प्लिज पुन्हा नको ना.." विराज त्याच्या डॅडना शांत करतच बोलला.


अनिता

: "कधी लांब नाही ठेवलं मी त्याला माझ्यापासुन. कामाच्या गडबडीत कधी फोन करायच राहून गेलं ना तर अख्ख घर डोक्यावर घ्यायचा तो. पण शेखर होता तेव्हा तो त्याला अगदी सहज सांभाळुन घ्यायचा. "


भावनेच्या भरात खुप काही जास्तच आणि नेहमीपेक्षा थोडं वेगळंच बोलुन गेलो हे अनिताच्या म्हणजे शौर्यच्या आईच्या लक्षात आलं.


शेखरच नाव ऐकताच तिघेही एकदम सिरीयस झाले.


आता मात्र विराजच्या वडिलांचा म्हणजे सुरजचा पारा खुपच चढला.

अनिता

: "हे बघ सूरज मी वकिलांना फोन केलाय, येतील ते इतक्यात. मला त्यांच्यापुढे वाद नकोत."


सूरज काही बोलणारच तोच अनिताचने एक हात वर करत त्याला थांबवतच तिथून काढता पाय घेतला.


विराज : "डॅड आता वकिलांना का बोलवतेय ही??"


सुरज : "काय माहीत आता नवीन काय शिजतय हिच्या डोक्यात."


दोघेही विचार करू लागले तोच त्यांचे फेमिलियर वकील मिस्टर साठे आले.


सूरज : "जा मम्माला घेऊन ये तुझ्या."


"

तुम्ही माझ्याच रूममध्ये या, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय तेही पर्सनल." अनिताने वरुनच आवाज दिला.


तसे विराज, त्याचे वडील आणि वकील वर्ती बघु लागले.


साठे वकील तसेच वर्ती अनिताच्या रूममध्ये जायला निघाले.


सुरजला आणि विराजला काहीच कळत आज अनिता अस का वागतेय ते..


अनिता वकिलांसोबत चर्चा करून त्यांच्यासोबतच खाली येते.


अनिता : "मी आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये खुप काही बदल केलेत. मिस्टर साठे तुम्हाला ते वाचुन दाखवतीलच. पण त्याआधी मी एक गोष्ट क्लीअर करते म्हणजे विराजला अस वाटायला नको की तो माझा मुलगा नाही म्हणुन मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही. S S ltd ही कंपनी आम्ही म्हणजे मी आणि शेखरने शौर्य जन्माला झाल्यावर आमच्या स्वबळावर अस्थितत्वात आणली. शेखरनेसुद्धा ती शौर्यच्याच नावावर राहावी ही इच्छा त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला बोलुन दाखवली. त्यामुळे मी त्या कंपनीचे सर्व शेअर शौर्यच्या नावावर करत आहे. तो अजुन लहान आहे पण इतरांप्रमाणे स्वार्थी जरासुद्धा नाही. "


"

तुला काय म्हणायचं आम्ही स्वार्थी आहोत??" सुरज मध्येच अनिताला तोडत म्हणाला.


अनिता : "का तु स्वार्थी नाहीस?? मीच मुर्ख जे शौर्यचा वेडेपणा समजुन आणि कामाच्या व्यापात तुझा तो स्वार्थपण ओळखु नाही शकली. "


सुरज : "अनिता तु काय बोलतेस अग माझ्या विराजमध्ये आणि तुझ्या शौर्यमध्ये मी कधी फरक..."


"

वाद नकोत.." अनिता मध्येच त्याला तोडत म्हणली.


अनिता : "मी माझ्या कंपनीचे सर्व अधिकार शौर्यला देणार आहे कारण ती कंपनी आणि हे राहत घर शेखरने त्याच्यासाठीच केलेलं. त्यांच्यासाठीच तो दिवस रात्र झटत होता."


एक खोल श्वास घेत येणार रडु सावरतच अनिताने वकिलांना इशारा केला.


वकिल : "सोप्या आणि सरळ भाषेत बोलायचं झालं तर लोणावळा येथे असणारा फार्म हाऊस जो अनिता मॅडमने स्वतः विकत घेतलेला तो त्या विराजच्या नावावर करत आहेत ते सोडुन बाकी सर्व जे काही असेल ते शौर्यच आणि त्यांचंच असेल. शौर्यच्या आणि अनिता मेडमच्या वैयक्तिक मताशिवाय किंवा त्याच्या स्वाक्षरी शिवाय कोणीही त्याच्याकडून तो भिडकावून घेऊ शकत नाही ह्याची खास जबाबदारी अनिता मॅडमने घेतलीय."


सुरज : "अनिता हे सगळं काय आहे??"


अनिता : "मी तुला आधीच सांगितलंय आणि पुन्हा सांगते जे शेखरच होत ते शौर्यच राहील."


सुरज : "आणि माझ्या विराजच.? त्याला कंपनीत तु अर्ध पार्टनर्शीप देऊ शकत होतीस."


अनिता : "त्यासाठी तुझी कंपनी आहे ना. तु तुझ्या कंपनीत शौर्यला अर्धी पार्टनर्शीप देऊ केलीस?"


सुरज : "ते मी..."


अनिता : "आहे का काही बोलायला??? आणि मी आता शेवटचं सांगते मी फक्त शौर्यला तेच देतेय जे त्याच्या बाबाने त्याच्यासाठी करून ठेवलय. मला ह्या विषयावर पुन्हा वाद नकोत."


मीही निघतो एवढं बोलुन साठे वकील देखील तिथुन निघुन गेले.


"

दुपारचं जेवण मी रुममध्येच जेवेल, कामावरून कोणीही भेटायला आले तर मी नाही म्हणुन सांग", अश्या काहीश्या सूचना तीने तिच्या हाताखाली असणाऱ्या असिस्टंटला दिल्या आणि ती रूममध्ये जायला निघाली.


तिच ते बदललेल रूप विराजसुद्धा बघतच राहिला.


सुरज रागातच उठुन बाहेर गेला. बाबा अरे थांब करत विराज देखील त्याच्या मागे त्याला समजवण्यासाठी गेला.


सुरज : "शौर्य कुठे गेलाय हे मला आता तर कळायलाच हवं."


विराज : "पण कस??"


सुरज : "ते मला माहित नाही. त्याची सही घेऊन सगळं काही आपण आपल्या ताब्यात मिळवुन ह्या दोघांना इथुन कायमच लांब पाठवुन देऊयात. एवढ्या वर्षाची माझी मेहनत मी अशी वाया थोडीन जाऊ देणार."


★★★★★


शौर्य आणि त्याच्यासोबत इतर जण नाष्टा वैगेरे आवरून कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करायला जाऊ लागली. पण आत जाण्याआधी सगळी जण गेट बाहेर त्यांच्या ग्रुप मधील मुलींची वाट बघु लागली. सीमा, मनवी, रीतु आणि तेजु आली. पण शौर्यची नजर कोणाला तरी शोधत होती ती काही दिसत नव्हती. तोंड वाकड करतच तो आत जाऊ लागला तस

"समीरा आली बघ" म्हणुन राज त्याच्या कानात कुजबुजला. खुललेला चेहरा करत शौर्य मागे बघु लागला पण समीरा नव्हती.


शौर्य : "कुठे??"


राज : "ओहह हो.."


डावी भुवई उडवतच हसत त्याच्याकडे बघत राहतो.


शौर्य : "काय??? तु अस का बघतोयस??"


अचानक राज घाबरत डोळे थोडे मोठे करत शौर्यच्या मागे बघत बोलु लागला.


राज : "अग समीरा आता हा तुझ्याबद्दलच बोलत होता.'


"

नाही अग हा काहीही बोलतोय" अस बोलत शौर्य मागे वळुन समीराला बोलायला वळला पण मागे कोणीच नसत..


"

राज तुला तर ना... "अस बोलत पळत असणाऱ्या राजच्या मागे हसतच शौर्य पण पळु लागला.


बाकीच्या ग्रुपमधील लोकांना ह्या दोघांचं काय चाललंय हे कळतच नव्हतं.


"

अरे काय झालं??" टॉनी मोठ्याने ओरडला


"

हॅलो गाईज" अस बोलत समीरा देखील अली तिथे.


टॉनी आणि इतर लोक शौर्य आणि राजकडे बघतच होते.


समीरा : "ही दोघे असे का पळतायत."


मनवी : "आम्हांला पण नाही कळत."


"

राज थांब पळु नकोस",शौर्य त्याच्या मागे पळत त्याला बोलत होता.


इथे राज पळत होता आणि शौर्य त्याला पकडायला त्याच्या मागे पळत होता आणि तोच कोणाच्या तरी पायात पाय अडकून शौर्य खाली पडतो. शौर्यच्या हाताला खरचटलं आणि पायाला थोडं लागल पण त्यातसुद्धा शौर्यने बऱ्यापैकी त्याचा तोल सांभाळला.


कोणीतरी पडलं म्हणुन जसे हसतात तसे शौर्यला सगळे हसु लागले.


राज पाठी बघतो तर शौर्य पडला होता. तो पुन्हा धावतच त्याच्याजवळ येऊन त्याला हात देत उठवु लागला. बाकीचे इतर मित्र देखील आले तिथे. शौर्य पेंट झटकतच उभा राहिला.


समोर रोहन हसतच त्याच्याकडे बघु लागला.


रोहन : "लागलं का???काय यार तु पण खाली बघुन तरी चालायचं. ओहह तुला डोळ्यांचा पण प्रॉब्लेम आहे ते तु सांगितलंच नाहीस. नाही तर आम्ही तरी तुझ्या पासुन सांभाळुन राहिलो असतो."


रोहन त्याच्या ग्रुपमधील एकाला टाळी देत हसु लागतो.


समोर रोहनला बघुन शौर्य ही हसु लागला.


शौर्य : "हसु येतंय यार तुझ्यावर. शाळेत असताना आम्ही असले प्रयोग करायचो. पण आता मी कॉलेजला आलोय यार पण तु मात्र शाळेत असल्यासारखं वागतोस. तुला तर मी इथेच दाखवलं असत कोणामध्ये किती प्रॉब्लेम आहे ते बट परत तू घरी जाऊन तुझ्या मम्मीला जाऊन माझं नाव सांगशील म्हणुन नकोच जाऊ दे जा माफ केले तुला आणि मोठा हो रे असले लहानमुलासारख वागणं बंद कर."


सगळे रोहनला हसु लागले..


शौर्यसुद्धा एक गोड स्माईल तिथुन निघुन आपल्या क्लासरूममध्ये जाऊन बसतो.


सगळे आपापल्या वर्गात जाऊन बसले.


राज : "शौर्य आय एम सॉरी माझ्यामुळे झालं सगळं? मी तुला चिडवलं नसत तर काही झालं नसत.."


टॉनी : "तुम्ही दोघे पळत का होतात?? आणि एवढं काय चिडवत होतास तु त्याला."


शौर्य राजकडे बघु लागला.


राज : "अरे ते मी अ... सिक्रेट. आमचं सिक्रेट आहे ते.."


समीरा : "ए बट तुला हाताला लागलय का खुप?? मी बेंडेज आणते हवं तर."


शौर्य : "नाही एवढं काही नाही. I Am Ok.."


"

तु बोललीस तरी बर वाटेल त्याला..", राज हळुच शौर्यच्या कानात पुटपुटला..


शौर्य : "राज तु उगाच नको ते विचार करतोयस."


समीरा : "काय चाललंय तुमचं मागासपासून आम्हाला पण कळु दे."


राज : "शौर्य सांगु का??"


शौर्य : "राज प्लिज. आपण मग बोलुया ह्या टॉपिकवर."


मेथ्सचे सर आले अस बोलताच सगळे आपापल्या जागेवर गेले.


समीरा शौर्यच्या मागच्या डेस्कवर बसलेली असते. सर एक एक सम ब्लॅकबोर्डवर उतरवत असतात आणि सगळे नोट डाऊन करत असतात. शौर्य मात्र मध्येच हात झटकत असतो आणि पून्हा तो लिहायला घेतो जास्त वेळ हात दुमडल्यामुळे त्याला थोडं दुखत असत. समीरा त्याची ती गोष्ट न्याहाळू लागते आणि तिच्या पुढे बसलेली मानवी सुद्धा. शौर्यच लक्ष मात्र लेक्चरमध्ये असत.


एक लेक्चर संपताच दुसरे सर हजर होतात. जवळपास दोन तीन तासांनी लेक्चर संपत. तसे सगळे बाहेर येतात आणि ग्राउंडवर जायला निघतात.


स्पोर्टचे सर अजुन काही आले नसतात.


चलो गाईज नेहमी प्रमाणे रेसिंग हो जाये.


शौर्य आज तरी खेळणार का?? वृषभने विचारलं


शौर्य : "चला.."


समीरा : "जो जिंकेल त्याला डेरीमिल्क??चालेल??"


राज : "तू बोलतेस मग शौर्यला चालेल आणि मला पण चालेल..शौर्य नक्की तुला चालेलना??"


शौर्य : "हो चालेल मला. (शौर्य राजकडे रागातच बघत बोलु लागला)


"आम्हाला पण चालेल.." सगळे जण एका लाईनमध्ये उभी राहतात.


"

ओनियोमान, गेट सेट , गो" राज ओरडला तसे सगळे पळु लागले..


शौर्य आणि वृषभ एकत्रच पुढे होते.. शौर्यने थोडा स्पीड वाढवतच रेसिंग जिंकली.


"

अरे यार शट.. जराश्यासाठी हारलो.." वृषभ घुडग्यावर हात ठेवत मोठं मोठ्याने श्वास घेतच बोलु लागला.


शौर्य : "नेक्स्ट टाईम वृषभ.. पण मज्जा आली.."


राज : "अँड द विनर इज शौर्य. शौर्यला मिळत आहेत टॉटल 8 डेरीमिल्क."


सगळे टाळ्या वाजवुन त्याच कौतुक करू लागले.


वृषभ : "सर आले चला जाऊयात तिथे."


मी पण येते करत समीरा पण त्यांच्या सोबत गेली.


राज : "आपण काय करायचं?? आपण पण जाऊन बघायला जाऊयात का फुटबॉलमॅच.??"


हो बोलत सगळेच तैयार होऊन त्यांच्या मागे जाऊ लागले.


समीरा तु कोणत्या स्पोर्ट्स मध्ये आहेस? शौर्यने समीराला विचारलं.


समीरा : "टेबल टेनिस"


शौर्य : "ग्रेट."


समीरा : "तुला येत खेळायला."


शौर्य : "हो..पण एवढं नाही म्हणजे जस फुटबॉल येत तस नाही."


समीरा : "कधी तरी खेळूयात मग."


शौर्य : "नक्की.."


समीरा दोघांनाही बाय करून स्पोर्ट्स क्लब मध्ये गेली. शौर्य आणि वृषभ ग्राउंडवर गेले.


इथे फुटबॉल प्रॅक्टिससाठी सरांनी दोन टिम बनवल्या. त्यांना रंगीत अश्या जर्सी ही दिल्या. कपडे चेंज करून पाच मिनिटात ग्राउंडवर या अशी सूचना दिली. सगळे प्लेयर्स कपडे चेंज करून ग्राउंडवर आले.


सर नेहमीप्रमाणे त्यांना काही सूचना देऊ लागले. तोवर फुटबॉलच्या भल्या मोठ्या ग्राउंडवर गर्दी जमा झाली.


टॉनी : "आता ह्या लोकांत शौर्य आणि वृषभला कस ओळखायचं. रेड वाल्या जर्सीमध्ये असतील का ब्ल्यु वाल्या.??"


मनवी : "मला तो वृषभ वाटतो.. आणि तो आहे बघ सरांच्या लेफ्ट साईडला तो शौर्य.."


टॉनी : "शौर्य साऊथ आफ्रिकेला गेलेला का अचानक??"


मनवी : "अस का बोलतोस??"


टॉनी : "तू सांगतेस त्याचा रंग आणि शौर्यचा रंग मॅच होत नाही म्हणुन म्हटलं ग."


(सगळे हसु लागले)


राज : "एक मिनिट मी सांगतो.. शौर्य आणि वृषभ कुठे आहेत ते."


"ए शौर्य... ए वृषभ... "राज जोरात ओरडला.. दोघेही आवाजाच्या दिशेने बघु लागले. सगळी मित्र मंडळी दोघांना हात दाखवु लागली. दोघांनीही त्यांना हात दाखवला.


टॉनी : "क्या दिमाग हे बॉस.."


टॉनी ने राजची थोडी स्तुती करताच राज आपली कॉलर नीट करून थोड शायनिंग मारू लागला.


सीमा : "अस डोकं तु नेहमी का नाही वापरतरे"


(पुन्हा सगळे राजवर हसु लागले.)


"ते ओळखायला स्वतः जवळ पण असावं लागतं", राज तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला..


सीमा : "मला काही म्हणालास का तु.??"


राज : "वेड लागलंय मला जे मी तुला काही बोलेल."


टॉनी : "बस झालं हा, आता मॅच बघुयात.. चालु होईलच इतक्यात."


इथे सगळे प्लेयर सरांच्या सूचना ऐकत होते.


तोच शौर्यच लक्ष रोहनकडे गेलं. एक टक तो शौर्यकडे बघत मिश्कीलपणे हसत होता. त्याच्या त्या मिश्किल हसण्याकडे शौर्यने इग्नोर केलं आणि सरांच्या बोलण्यात त्याने आपल लक्ष केंद्रित केल.


शौर्य आणि रोहन दोघेही विरुद्ध टिममधून खेळत होते.


"बोथ टिम इज रेडी...??" सरांनी मोठ्याने विचारलं..


"

येस सर" सगळे एकत्रच ओरडले..


©भावना विनेश भुतल


(फुटबॉलमध्ये कोणती टीम जिंकेल.. टिम रेड का टिम ब्लू..? आणखीन खुप गंमती जमती वाचायला मिळतील पुढील




भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा)