She __ and __ he - 25 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 25

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

Categories
Share

ती__आणि__तो... - 25

भाग__२५


दुसऱ्या दिवशी रात्री राधा उशीरा घरी आली...सगळे जागे होते पन रणजीत खोलीत झोपला होता...राधाला याच आश्चर्यच वाटल पण तिने दुर्लक्ष केले...आणि झोपी गेली....पण रणजीत जागा होता...



सकाळी राधा तीच आवरत होती...तेवढ्यात रणजीत ही फ्रेश होऊन आला...रणजीतने राधाकडे पाहिल तिचे डोळे लाल झाले होते...त्यांला वाइट वाटला...पन कालच आठवून तो पुन्हा चिडला आणि स्वतःच आवरायला घेतला...राधाच आवरल तस तीं रूमबाहेर जाऊ लागली...तेवढ्यात रणजीतने तिला आवाज दिला....



रणजीत: राधा.....



राधा: हु...



रणजीत: हे घे...डिवोर्स पेपर्स.....(पेपर तिच्याकडे देऊन)



हे ऐकूनच राधाला रणजीतचा खुप राग आला...डोळ्यात पटकन पाणी साचल...तिने भरलेल्या डोळ्यांनी रणजीतवर एक कटाक्ष टाकला....ते पाहून का कुणास ठाऊक रणजीतच्या हॄदयात जोरात कळ बसली....



राधा: बरीच घाई झालेय तुला..म्हणून डिवोर्स पेपर्स पन लगेच तयार करून आणलस...



रणजीत: परिस्थिति भाग पाडते मला...मी स्वतः काहीही करत नाही आहे...आणि तुझ वागण पन बदलल आहे..हे दिसत नाही का तुला...



राधा: माझ क़ाय वागण बदले आहे....तुझ वागण बदले आहे....



रणजीत: माझ्यापासुन तू खुप गोष्टी लपवतेस...स्वतःच्या धुंडित राहतेस...आणि काल ट्रिपला गेलीस मला न सांगता...त्यात मेसेज असा टाकतेस तस क़ाय उपकारच केले...



राधा: मी गोष्टी लपवते की तू...आणि ट्रिपला जायच की नाही हा माझा प्रश्न आहे..तुला विचारल असत तर तू नाहीच बोला असतास...आणि मी जाणार नव्हते...पण सगळ्यांनी खुप फोर्स केला....



रणजीत: हो स्पेशली विकिने हो ना...



राधा: रणजीत....प्लीज...



सोनाक्षी: (बाहेरुन आवाज देत)....रणजीत...निघूया का...मला पन सोड ना स्कुलला...रणजीत....



राधा: घे आली तुझी प्रेमिका...जा आता मज्जा करा😡



रणजीत: राsssssधा😡(हात उचलून).....तू ना आता माझ्या डोळ्यासमोर पन येऊ नकोस...U bitch 😡.....



राधा: what...???? मी bitch...आणि तू तू माझ्यावर हात उचलला...🙁😡😥



रणजीत: हो😡😡😡😡



रणजीत रागावर कंट्रोल करून रूमबाहेर निघुन गेला...राधा खुप रडू लागली...नंतर तशीच तीने थोड़े कपडे घेतले आणि कोणाच्याही नकळत तिच्या माहेरी निघुन गेली...


*****************************



रात्री मनोहर घरी आले...त्यांना राधा आल्याची खबर समजली...राधा दिवसभर तिच्या खोलीतच बसून होती...मनोहर राधाच्या खोलीत गेले...तर राधा रडत होती...



मनोहर: फुलपाखरा......



राधा: बाबा......😢(त्यांना मीठी मारून)



मनोहर: अरे अरे...क़ाय झाल फुलपाखरा..चक्क रड़तेस तू...ए पिल्लू...



राधा: बाबा...😢😭😭



राधा खुप जोरात रडू लागली....हुंदके देऊन रडू लागली...तिच्या आवजाने मालती धावत वरती आल्या...



मालती: राधा.....ए बाळा रड़तेस का...क़ाय ओ क़ाय झाल बाळ रडताय का आपल...



राधा: आई....😢



मनोहर: राधा शांत हो...क़ाय झाल आहे सांग...



मग राधा दोघांना ख़र सांगते...इतक्या दिवसांपासून त्यांची होणारी भांडण...डिवोर्स पेपर्स...रणजीतच तिच्यावर हात उचलन...सगळ ऐकुन त्यांना जरा धक्काच बसला...



मनोहर: ह्म्म्म....फुलपाखरा..मी काही सांगितले तर ऐकशील...



राधा: हो बाबा...



मनोहर: मला या गोष्टीच आनंद आहे की तुला रणजीत आवडतोय..अन वाइट याच की तुमच्या दोघांमध्ये गैरसमज झालेत...आणि ते तुम्हला कळत नाही आहेत...ते ही तुम्ही इतके matured असून...



राधा: बाबा...आधी निशांतवर प्रेम केल तो ही सोडून गेला...नंतर आता रणजीत मला आवडतोय तर तो ही😕



मनोहर: हम्म...मालू तू जा आणि राधासाठी सुप बनवून आन...तोवर आम्ही जरा बोलतो...



मालती: हो..आलेच.....



मनोहर: ऐक बाळा...तुझ्या सांगण्यावरुन स्प्ष्ट दिसते आहे तुमचा गैरसमजच झालेय....अग समोरासमोर बसा आणि बोला न स्प्ष्ट...मला ना एक समजत नाहीत माणस जे आहे ते स्प्ष्टपणे तोंडावर का बोलात नाहीत..याने निदान गैरसमज नाही होत ना...



राधा: बाबा कस...म्हणजे गैरसमज???



मनोहर: बग...त्यादिवशी तुला आणि विकीला रणजीतने एकत्र बघितले..मीठी मारतांना पन त्यामगे क़ाय कारण हे त्यांनी समजून नाही घेतले..आणि तू सुद्धा त्यांना काही सांगितले नाहीस तू कुठे चालीस वैगेरा..आणि लग्न ठरल्यापासून आता पर्यंत ग्रूपमधुन तू जास्त जवळ कोणाच्या असते विकी...आणि रणजीतला तुमच्या नात्याबड्डल जास्त माहित नाही...सो अस झाल तर साहजिक आहे त्याच गैरसमज होंन...हा आता त्याची चुकी ही कि त्याने तुझ्याशी क्लीयर बोलायला हव होता....आणि सेम हिच घटना तुझ्यासोबत झाली तू पन तेच केलास...मग दोघांच्या ही मनात गैरसमज निर्माण झाला...त्यात तू रागात त्यांला न सांगता ट्रिपला गेली...मग तो आजुन चिडला..आणि डिवोर्स पेपर घेऊन आला..सगळ्याच कारण रागच...



राधा: हो बाबा...



मनोहर: मग..आणि त्यात दोघेही तुम्ही रागिट स्वभावाची माणस..एकतर अधिच तुम्ही बेचैन होता...त्यात चिड़चिड़ वहायची त्यावरुन तुम्ही भंडलात..आणि एकमेकांना रागात काहीही बोलात...रागिट मानुस रागात जे बोलतो ते कधीच त्याच्या मनातल नसत...लक्षात ठेव राधा...रणजीत अती बोला पन त्याच्या मनात ते नव्हतं....कळल का क़ाय बीन्सल ते...



राधा: हो बाबा... inshort चूक आम्हा दोघांची नाही....सगळ आपोआप घड़ल...तरी सुद्धा मी काही दिवस इकडेच राहणार आहे...मला राग अल्लाय ना त्याच...😏



मनोहर: क़ाय बाई तुम्ही मूली😂पन फुलपाखरा पुन्हा अस गैरसमज करून घेऊ नका....परिणाम खुप वाइट होतात..



राधा: हो बाबा...Thank u...तुम्ही ग्रेट आहत बाबा..तुमच्याशिवाय ना मी काहीच नाही करू शकत..प्लीज कायम माझ्या जवळ राहा हु...(मीठी मारून)



मनोहर: हो ग बाळा...आता कस गोड़ हसल माझ फुलपाखरु...बर आता राग घालव हु...आणि लवकर रणजीतशी बोल....(डोक्यावरुन हात फिरवून)



राधा: हो बाबा...



वाव मनोहर सारखे बाबा सगळ्यांना भेटले पाहिजेत...किती चांगल समजवल त्यांनी नाही का☺️


**************************



रात्री रणजीत उशीरा घरी आला...पन रूममध्ये राधा नव्हती...त्यांनी तिला सगळीकडे बघितले ती कुठे दिसलीच नाही..रणजीतला आता राधाची काळजी वाटत होती...



रणजीत: कुठे गेली असेल ही रेडियो...मी सकाळी खुप ओवर वागलो..राधा खरच घर सोडून तर नाही ना गेली...



रणजीत पटकन खाली उतरला आणि बाहेर जाऊ लागला...तेवढ्यात माधवीनी त्यांला अडवल...



माधवी: जीत कुठे चालला...



रणजीत: ग राधा.....



माधवी: अरे हो...राधा तिच्या माहेरी गेले...मगाशी आला होता फोन..



रणजीत: अच्छा....ओके....(मनात)....आता ही न सांगता गेली....पण तिची क़ाय चूक मीच तिला.....



माधवी: चल गुड़ नाइट....



रणजीत मग त्याच्या खोलीत जातो....आज राधा नव्हती तर त्यांला खुप एकट वाटत होत...त्यांला राधाशी बोलाव वाटत होत...तिची काळजी वाटत होती....न राहून रणजीतने राधाच्या बाबना फोन केला...



मनोहर: 📱 हा बोला रणजीतराव...



रणजीत:📱 बाबा..राधा..????



मनोहर:📱 हो तीं आहे ना तिच्या खोलीत...थांबा मी फोन देतो....(फोन खाली करत)



मनोहर राधाच्या खोलीत जातात...तर राधा मस्त गाणी ऐकत होती आणि गात होती...ते जाउन रणजीतला गाण एकवतात...रणजीत सुद्धा तिचा गोड़ आवाज एकत होता...आणि हळूच हसत होता....



राधा: "आँखों से वार कर दे ना,सिने में प्यार भर दे ना..आजा ना मेरी बाँहो में..और कह दे दिल मे ही रहना...ये गो ये..ये मैना पिंजरा बनाया....याई याई याई..."



मनोहर: फुलपाखरा...गाण बंद कर जरा



राधा: हो बाबा...बोला ना...



मनोहर: हम्म...बर..हे घे फोन आहे रणजीत चा...



राधा: क़ाय...हु.....📱 बोल.....



रणजीत:📱 आ...ब...ते...नथिंग...गुड़ नाइट.....(फोन कट करत)



घाबरूनच रणजीतने फोन ठेवला....मग तिने ही दुर्लक्ष केल...काहीवेलाने राधा ही शांत झोपी गेली...पन तिकडे रणजीत मात्र रडत बसला होता....



रणजीत: (मनात).....ही अशी का वागतेय..राधा काय झालय तुला...मी बोलो तर लगेच निघुन गेलीस...मला पण खुप त्रास होतोय ग...कस सांगू तुला...अस म्हणतात आपल माणस रडत असतील तर त्यांचा आवाज आपल्याला एकु येतो...तुला माझा आवाज येत नाही आहे का ग....तुझा रणजीत इकडे आतून खुप रड़तोय.......😢राधा......



राधाला क़ाय होत माहित नाही ती लागेच उठून बसते...जनु त्यांनी मारलेली हाक तिला ऐकु आली...मग पुन्हा तीं झोपते..




राधा: (मनात)......अस वाटल रणजीत रड़तोय त्यांला माझी गरज आहे...जउद्या का अस वाटाव मला...त्याच्या सोना सोबत तो खुश आहे...अजुन काय हवाय मला...😢



दोघेही तसेच रडत झोपी जातात..असेच दिवस जातात...राधा अजूनही माहेरी होती...दोघेही मनातून एकमेकापासून खुप लांब गेले होते...जास्त बोलन नाही काही नाही...फक्त स्वतःच्या रूटीन मध्ये बिझी असायचे.....



****************************



माधवी: क़ाय ग सुमन खुप दिवस झाले ना राधा माहेरी गेले...



सुमन: हो ना ओ..



रम्या: आई,काकू काही झाल तर नसेल ना त्यांच्यात...म्हणजे वाद वैगेरा...



रेवा: वहिनी मलाही तसाच वाटतंय..कारण ना गेल्या महिन्यापासुन दोघांच्या खोलितुन नुसता भांडनाचा आवाज यायचा...आणि दोघा जरा उदास पन असायचे...



रम्या: क़ाय....अग मग हे आधी का नाही बोलीस...



रेवा: वहिनी ते दोघा आधिपासुन भांडतात आणि मग गोड़ होतात म्हणून मी नाही सांगितला...मला वाटल त्यांच ते मिटवतील ....



माधवी: ह्म्म्म पन यावेळी जास्त काहीतरी झालय अस वाटतंय....



सुमन: हो...आपण बोलून बघायचा का जीतसोबत...समजवू त्यांला...



रेवा: हो तुम्ही समजवा मी निघते कॉलेजला...



माधवी: निट जा...



सुमन: निट जा शोन्या हा..



रेवा: हो



रम्या: आपण चला....



मग तिघी पन रणजीतच्या खोलीत जातात....रणजीत टेबलवर बसून शूज घालत होता...



रणजीत: अरे...आज महिला मोर्चा इकडे कुठे....



सुमन: जीत जरा बोलायच आहे तुझ्याशी...



रणजीत: बोला ना...



सुमन: राधा अजुन तिच्या माहेरी का आहे?..आणि तुम्ही दोघा गेल्या महिन्यापासुन भांडत पन आहेत..क़ाय झाल आहे..?



माधवी: हो बाळा..बग शपथ आहे तुला आमची..क़ाय झाल आहे का ख़र सांग...



रम्या: हो जीत...



रणजीत: हो आमच्यात जरा गैरसमजा वरुन वाद चालू आहेत..आता कारण विचारु नका प्लीज..



रम्या: ह्म्म्म...



माधवी: अरे अस वाद घालन बरोबर नाही...


सुमन: बग आम्हाला कारण तर नाही माहित..पन एक सांगते..गैरसमज झाले ना तर त्यांला काही मर्यादा ठेवायला हव्यात...मर्यादा जर ओलंडल्या तर नातं नाही टिकात...



रम्या: खरय जीत...



माधवी: हो...बाळा अरे गैरसमज झाले तर स्प्ष्ट बोलून क्लीयर करा ना...गैरसमज मनात ठेवले तर त्यांच रूपांतर संशयामध्ये होत...आणि ते नात्याला कमजोर बनवत...



रम्या: जीत माझ्यासाठी तू माझा लहान भाऊ आहेस..तुझ चांगल व्हाव असच वाटत मला...म्हणून सांगते...बग संसार ना रबरासारखा असतो...दोन्ही बाजुनी तानल तर तुटत..एकाने तरी सैल सोडायला हव ना..तुमच पन असच झालय...दोघा तानता आहात..मग तुटनार नाही का..? तू तर सैल दे...



रणजीत: हो ग वहिनी..पन नेमक क़ाय करू...



रम्या: तिच्याशी जाउन स्प्ष्ट बोल...स्प्ष्ट बोलाल तेव्हाच समजेल ना...



रणजीत: ह्म्म्म...चालेल..☺️



माधवी: हु गुड़...



सुमन: एकमेकांना समजून घेत जा रे....बाकी काही नाही....



रणजीत: हो



सुमन: बर चल लवकर खाली ये...नाश्ता करू..



रणजीत: यस....


******************************


मालती: राधा बाई उठा चला....(तिला उठवत)



राधा: ममम...आई ग झोपु दे ना...



मालती: राधा ग...९ वाजले...



राधा: (उठून)....अरे देवा वेळ झालय...हॉस्पिटलमध्ये जायला हव...



मालती: हम्म आता घाई करू नकोस...जरा निवांत आवर...



राधा: ह्म्म्म...



मालती: आणि राधा...बाबानी सांगितलाय तस रणजीतसोबत बोलून घे...वेळ गेली की हातात काही उरत नाही...



राधा: हो आई...



मालती: हु...



क्रमशः


(आता बघुया पुढे रणजीत राधाशी बोलणार का नाही ते...एवढे दिवस बिचारे भांड भांड भांडतायत...लवकर त्यांची भांडण मिटत नाही का...☺️Stay tuned....)