Reshmi Nate - 25 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 25

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

रेशमी नाते - 25


पिहु पेपर वर साईन कर...विराट ‌तिच्यासमोर पेपर ठेवत बोलतो..

कसले ,पिहु ब्लँक‌ होत पेपरला बघत बोलते.

साईन कर ..पिहु..पूढची प्रोसिजर पुर्ण करायच्या आहेत.पिहु काहीच न बोलता चेहरा दुसरीकडे फिरवते.

माझ्यावर ट्रस्ट नाही का,तो तिला जवळ घेत बोलतो‌..अहो,ती आठ्या पाडतच बोलते...

हो तसच आहे,तु मला पूर्णपणे स्वतःच मानलच नाही...

तुम्ही काय बोलतोय....(विराट तिचा हात पकडुन बेडवर बसवतो.)

पिहु,मी तुला काही घेतलं तर तुला का प्रॅाब्लेम आहे..हे नको ते‌ नको का करत असते....माझ जे आहे ते तुझच आहे ना.तुझ्यानावाने जी इनवेस्टमेंट करतो..ते फ्युचरमध्ये तुला किंवा मला उपयोगीच पडणार ना...

हहं पण,तुमच्या नावाने घेतलं तर चांगलच आहे ना...तुम्ही तुमच्या नावाने घ्या...

पिहु,साईन कर..ति‌‌ला कुशीत घेत पेन हातात धरतो...

अहो,तुम्ही आईंना सांगितलं का...काय म्हणाल्या..
आईनेच मला सांगितलं ...पिहु अजुन काही प्रश्न आहेत का??? (विचार करत होती.)म्हणुन विराट तिला विचारतो..

(ती मानेनेच नाही म्हणते..).मग साईन कर ना...तु माझी जबाबदारी आहे,तुझ्यासाठी काय घ्यायच... नाही ,तुझ्यासाठी कुठली गोष्ट चांगली -वाईट ठरवु शकतो ना...

पिहु,मानेनेच हो बोलते...

विराट गालात हसत तिच्या कपाळावर किस करतो...पिहु पेपरवर साईन करते.

नमन दुसरया दिवशी परत मुंबईला येतो.. ..

नमन विराटशी बोलतच नव्हता...विराट जे बोलेल त्याच हा नाही मध्ये बोलत होता....चार पाच दिवस असेच गेले विराट‌ ही त्याला शांततेत घेत होता....

दोन महिन्याच सिलॅबस पिहु करत बसली होती..विराट ही तिला हेल्प करत होता.मिस्टर मेहता विराटला कॉल करतात...विराट कॉल रिसीव करत गॅलेरीत जातो....

येस मि.मेहता....विराट हसत बोलतो..

मि.विराट इट विल बी बेटर इफ यु विल बी हिइर व्ही कॅन डिसकस थिंग इन डिटेल...मि.मेहता गंभीर होतच बोलतात...

वाय ?इज देअर ऐनी प्रॅाब्लेम मि.मेहता?

मि.विराट‌ इट सिम्स लाईक मि.नमन हॅड नो इनटरेस्ट इन टॉकिंग टु मी आय कुड सीन्स इट वाईल टॉकिंग टु हिम..मि.वि‌राट व्ही वर्क टुगेदर .आय हॅव नो शॉर्टेज ऑफ वर्क बट वॉट डज इट मीन टु प्रेटेंड दॅट इट इज नॉट नेसेसरी ते थोडस चिडुनच बोलतात..‌

आ..आ....आय अम एक्सट्रीमली सॉरी,मि.विराट नमन इज
स्टील न्यु अॅट वर्क ही डोन्ट हॅव मच एक्सपिरीन्स अबाऊट बट ही डीड नॉट हॅव अन्डरस्टुड.बट ही डीड नॉट मीन ऑफऐन्ड यु.... विराट शांतपणे बोलतो...

मि.विराट,आय अम गोईंग कम बॅक टु नेक्स्ट मंथ.व्ही विल डिसकस आबाऊट अफ्टर धिस मिटींग यु .आय कॉन्ट से ऐनीथिंक राईट नाऊ .ऑलरेडी आय अम वर्किंग ऑन टु प्रोजेक्ट राईट नाऊ....

विराट ओके बोलुन फोन ठेवतो.

विराट रागानेच ताडकन रुमच्या बाहेर गेला..पिहु, तो गेला त्या दिशेनेच बघु लागली...तिने नाईटड्रेस घातल्याने ती स्टेप पर्यंत आली.
.
.
.
.
मनी, नमन आला का,विराट ओरडुनच बोलतो..

रोहिणी, सुमन एकमेंकीकडे बघतात....विराट च्या आवाजाने दामोदर पण बाहेर येतात...

नाही भैय्या,अजुन आले नाही.

विराट नमनला कॉल करतो.. दारातच नमनचा मोबाईल वाजतो..

नमन आत येत मोबाईल कट करतो...

नमन,फ्रेश होऊन स्टडी मध्ये ये मला बोलायच विराट नजर रोखुनच त्याला बोलत स्टडीकडे वळतो.

नमन,रोहिणी कडे एकदा आणि सुमनकडे एकदा बघत रुममध्ये जातो.

पिहू वरून बघुन परत रुममध्ये विचार करतच जाते.

आता,काय केलं नमन ने रोहिणी बोलत विराट कडे चाललीच होती कि,दामोदर अडवतात...

रोहिणी नमनला बोलवलं...ते चिडुनच बोलतात...

ह...हो,पण मी..विराटला...

दामोदर हाताने थांबवत तु मध्ये बोलायची काही गरज नाही...आणि जायच ही नाही....ते ओरडुन बोलुन निघून जातात.‌‌

सुमन ही निघुन जातात..‌

नमन फ्रेश होऊन येतो.विराट एक नजर बघुन बाहेर बघतो...

नमन विराटच्या शेजारी येऊन थांबतो...दोघेही शांत बाहेर बघत थांबले होते.

नमन..

नमन विराटकडे नजर वळवतो.

नमन तुझी खरच इच्छा नाहीये बिझनेसमध्ये यायची..का अजुन कुठलं कारण आहे...

नमन त्याच्याकडे आश्चार्याने एकटक बघत राहतो..

विराट त्याच्या हाताला धरत काऊचवर बसवतो...नमन मी़ तुला तुझ्या स्वप्नांशी दुर करणार नाहीये...तुला जे करायच ते तु कर...माझी इच्छा आहे.तु ही बिझनेस मध्ये लक्ष घालव.. कस काय‌ हे ही तु समजुन घ्याव...

दादा तु आई सांगते म्हणुन करतोय ना...नमन विराट च्या डोळ्यात बघत बोलतो .

आई...आईचा काय संबंध आहे ...मी

सगळा आईचाच संबंध आहे..आई बोलते आणि तु ऐकतो.नमन चिडुनच बोलतो...

नमनsss (नमन शांत होत दुसरीकडे बघतो)

नमन आईला वाटलं तर काय चुकीच आहे का,कुठल्या आईला नाही आवडणार आपला मुलगा पुढे जातोय...

दादा आई,किती सेल्फिश आहे हे माहीत असुनही तु असा बोलतोय..

नमन डोन्ट क्राॅस लिमीट ..

मी नाही आईने लिमीट क्राॅस‌ केली आणि तु दरवेळेस डोळ्यावर पट्टी बांधुन आईच्या चुकांवर पांघरुन घालतो..सगळी मेहनत तु करणार ...विराट मध्येच थांबवत बोलतो.

नमन,आपण हा विष‌‌यावर बोलत नाहीये...परत हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही विराट रागातच त्याच्या डोळ्यात बघत बोलतो..

दादा....मी बिझनेस वैगेर बघणार नाही ये.तु फोर्स करू नको.

नमन..

दादा मला आता काहीच बोलायच नाहीये....तो विराटला पाठ करुन उभा राहतो.

विराट हाताच्या मुठ आवळत रागावर कंट्रोल करत दाराकडे वळतो...दार‌ात थांबुन मागे वळत...नमन परत आईबद्दलं माझ्यासमोर काही बोलायच नाही...आई आणि मॉम मध्ये मी कधीच फरक केला नाही..विराट निघुन जातो.नमन एकटक तो जातो त्या दिशेने बघत विचार करतो....

विराट रुममध्ये ‌येतो...पिहु स्टडी करत बसल्याजागीच टेबलावर‌ डोक ठेवुन झोपली होती.

विराट ने तिच्या हातातला पेन काढला आणि सगळे बुक्स बाजुला नीट ठेवले...तिला अलगद उचलुन बेडवर झोपवले...नमन आणि आईमध्ये पुर्णपणे विराट फसला होता....त्याच डोकच काम करत नव्हते..तो ही विचार करता करता झोपी गेला...

सकाळी नमनच्या कारचा आवाजाने विराटला जाग येते.....विराट गॅलेरीत येत नमनला कॉल करतो...तर त्याने त्याचा कॉल कट केला...

पिहु आवरुन विराटवर नजर टाकत ‌विचार करतच खाली जाते...

आई,नमन कुुठे गेला ...

गेला असेल काहीतरी काम वैगेर असेल...सुमन बोलतात...
रोहिणी ही जास्त डोक लावत नाही..‌त्याला सकाळ सकाळी पेंटीग्ज चा नाद असल्याने विराट सोडुन सगळे नॉर्मल असतात...

पिहु उद्या आईला सोडवायला मी पुण्याला जाणार आहे

का,पिहु नाराज होतच बोलते..

जीजी हसत तिच्या जवळ येतात...पिहु,मुलीच्या सासरी राहायच नसतं पण विराट काही ऐकत‌ नाही म्हणून थांबलीये...

आजी तुम्ही सांगा ना जीजींना ...किती छान वाटते तूम्हा दोघांना अस दिवस भर एकत्र बघुन घर भरल्यासार ‌ख वाटते...

हह.हो गं आजी पिहूच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणते.

आई,मी जीजींसाठी कॉलेजवरुन येताना मी गिफ्ट आणते....

हो आण,

क‌ाय आणु,

बाळकृष्णाची मूर्ती सूमन हसत बोलल्या.

पिहू हसत हो बोलली.

विराट शांतच होता..पिहुला माहित होते तिने विचारलं तरी तो काहीच बोलणार नाही...म्हणून तिने कालच काही विचारलं नाही.

पिहु रुममध्ये येऊन कॉलेजसाठी आवरत होती...अहो,मी जाते तूमच ऑफिस एकीकडे माझ कॉलेज एकीकडे...

विराट त्याच्याच विचारत‌ गुंतला होता....त्याच लक्ष नाही म्हणुन पिहु त्याच्यासमोर जाऊन उभी राहली...त्याचे दोन्ही हात बाजुला घेत त्याच्या मिठीत शिरते...विराट विचारातुन बाहेर येत तिला घट्ठ मिठीत घेत तिच्या केसांवर अलगद ओठ टेकवतो.

अहो,तुम्ही मला आज गुड मार्निंग नाही,किस नाही अस इग्नोर करतात का,पिहु लटक्या रागातच बोलु लागली...

विराट गालात हसत तिला बाजुला करत तिच्या कपाळावर किस करतो...

पिहु खुश होऊन त्याच्या ओठांवर हलके ओठ ठेवते...

विराटचा मोबाईल वाजल्याने पिहु चक करतच बाजुलां सरकत आवरु लागते.विराट हसतच कॉल रीसीव करतो.
.
.

हा बोल आता..विराट मोबाईल बंद करुन तिच्या जवळ आला.

अहो,मी काय म्हणत‌होते...तुम्ही नका येऊ,तुम...

ए...एक मिनीट, तुला काहीतरी विचारायचे आहे विराट कपाळावर आठ्या पाडतच बोलतो.....

क...काय,

पिहु,एक्जाम चे मार्क तू सांंगितले नाही..तो टेबलाजवळ जाऊन मार्कलिस्ट तिच्या समोर धरतो...पिहु एकनजर विराट कडे बघून खाली बघते...

पिहु‌ssहे मार्क आहेत विराट दात ओठ खातच बोलतो..

पिहु दचकून डोळे उघडझाप करत त्याच्याकडे बघते...

पिहुss इतके कमी मार्क तो चिडुनच बोलतो‌..

अ..अहो,टुच सबजेक्ट मध्ये कमी पडलेत पिहु हसत त्याच्या हाताला विळखा घालते.

व्हा काय भारी सांगतेस..विराट रागातच तिचा हात झटकतो.

अ..अहो,पिहु बारीक चेहरा करत ‌च बोलते.

पिहु तुला काय काम असते..सांग ...तरी पण इतके कमी मार्क्स कॉलेजवरून आल्यावर काय काम असते.. खाली फिरत राहायच विनाकारण....तो त्याच्या ब्लेझर घालतचओरडुन बोलत होता‌‌‌...पिहु ही तिच रागाने आवरुन घेते....

विराट रागानेच खाली येतो.....पिहु अजुन आली नाही म्हणून तो जोरातच‌ पिहूला हाक मारतो..

सुमन,विराटकडेच एकटक बघत जवळ येतात...विराट हळु इतक चिडायला क‌ा‌य झालं.नमनचा राग काढु नकोस...आणि नमन कुठे गेला ...

तो त्यावर काहीच बोलला नाही....सूमन पण शांत बसतात...

घश्यात माईक असल्यासारखा आवाज हुहह.

पिहु पळतच खाली येत होती...तो रागाने तिच्याकडे नजर रो‌खुनच बघतो तशी ती चालत येत...त्याला न बघताच बाहेर जाऊन गाडीत बसते..रागाने डोळे लाल झालेच होते...तो ही तिच्या मागे येतो.विराट एक नजर बघुन ड्रायव्हरला कार चालु करायला लावतो.ती बाहेरच बघत होती.विराटनेही तिच्याशी बोलण टाळलं...तो अस चुकिच काही बोललाच नव्हता....कॉलेज आल्यावर पिहु रागानेचडोर आदळतच उतरुन निघुन ‌सुध्दा गेली..

खर बोलल तर राग किती तो तिच्याकडे बघतच तोडांत पुटपुटला.

इतक काय ओरडायच होतं ....कधी स्वतःला कमी मार्क पडलेच नसतील असे बोलतात...फाईनल एक्जामचे थोडे आहेत...हहुह पिहु चिडुन स्वतःशीच बोलून क्लास मध्ये गेली.

माझी थोडी शॉपिंग आहे कॉलेज झाल्यावर जाऊ आपण पिहु गुंजनला म्हणाली...

ओके..

दोघी कॉलेज संपल्यावर बाहेर आल्या ....विराटचा फोन आला.आता लाडीगोडी लावणार पिहु स्वतःशीच म्हणत हसत फोन उचलते...

हॅलो,

हहं पिहु पण़ भाव खातच बोलते.

मी बिझी आहे ड्रायव्हर आला‌य....तो ही कामापुरतेच बोलून कॉल कट करतो....

तसा पिहुचा चेहराच पडला..गूंजन तिची स्कुटी‌ घेऊन जवळ आली.पिहु निघायच...

हह.हो,ती गुंजन च्या गाडीवर बसणार कि ड्रायव्हर जवळ आला..

मॅम,

हहं ...हो दादा मी बाहेर चालली ...तुम्ही ही मागे या...आपण थोडयावेळाने घरी निघु...

मॅम,सरांनी घरी जायला सांगितले...

पिहु गुंजन एकमेकींकडे बघु लागल्या...पिहुने लगेच विराटला कॉल लावला...

अहो,मी बाहेर चालली थोड्यावेळाने घरी जाते...ती चिडुनच बोलली..

कुठे चालली,

ते...ते थोड शॉपिंग होतं.

आपण जाऊ ,तु एकटी कुठे जायच नाही ये...घरी जा

अहो,जीजी उद्या जाणार आहे ना...

पिहु,एकच गोष्ट दहा वेळा रीपीट करायाचीच का,तो दात ओठ खातच बोलु लागला.

पिहु रागातच फोन कट करते.गुंजनला हि कळालं पिहु आपण नेक्स्ट टाईम जाऊ ...

पिहु नाराज होऊनच गाडीत बसते...तिला विराटचा राग खुप आला होता...

विराट मॉमला कॉल करून सांगतो..‌पिहु बरोबर जायला..मॉम,तिला एकटी कुठेच पाठवु नको,किती वेळा सांगितले...

अरे,हो माझ्या लक्षातच आले नाही .दररोज तु जातो ना...घ्यायला मला वाटल तुझ्याबरोबर जाईल..आता आली ना,मी जाते तिच्याबरोबर..सुमन फोनवर बोलत होत्या...कि समोरुन पिहु येत होती...पिहु(,सूमन हाक मारुन जवळ बोलवतात.).पिहु आणलीस मूर्ती ...

नाही,ना.....ह्यांनी मला जाऊच दिलं नाही...पिहु गाल फगवुनच बोलते.फोन चालु असल्याने विराटला ऐकू गेले...तो गालात हसत कॉल कट करतो...त्याला ही वाईट वाटत होते...पण देवेश मुळे तिला अजुन कुठलाच त्रास नको होता...देवेश पासुन पिहुला धोका नव्हता .पण विराटच मन तयार‌ होत नव्हते...

नमन फार्महाऊसवर आहे ..मानव आत येतच बोलतो...

एकटाच आहे का...

नाही त्याचे फ्रेंड्सपण गेलेत...

कॉल कर...नमन चा बंद असल्याने मानव त्याच्या फ्रेंड्सला कॉल करतो...नमन चा आवाज ऐकल्याने सकाळपासुन विराट टेंशनमध्ये आला होता..आता कुठे तो रीलॅक्स झाला...

चल फ्रेश होऊन ये आपण दोघी जाऊ....सूमन हसत बोलल्या..

हो जाऊ पिहु खुश होतच रुममध्ये जाते.दोघी शॉपिंग करायाला गेल्या ...पिहू पण खुप दिवासांनी बाहेर आली होती...तर तिला फ्रेश वाटत होते....जीजी साठी थोडीफार शॉपिंग करतात‌....बाळकृष्णाची मुर्ती बघायला आले ...पिहु सगळे एक एक बघत सुमनला दाखवत होती...

सुमन पण तिच्या चेहारयावरचा आंनद टिपत गालात हसत‌ होते....

सुमन पिहुच्या हातातली मुर्ती घेतात....पिहु,मला ही हवा आहे बाळगोपाळ असाच...

मग घेऊ आपण पिहु दूसरया मुर्ती बघत बोलली...

पिहु,मला तुझ्याकडुन हवा आहे...सुमन हसत बोलतात..

तशी पिहु ब्लँक होत एकटक बघते....

अशी काय बघतेस...तुला नकोय का,

पिहु,गालात हसत लाजते...आई,अजुन काही विचार नाहीये....आम्ही कधी बेबीजबद्दल बोललोच नाही....

मग बोल ना,विराटला नाही कळत हे सगळ तु स्वतःहुन बोल या विषयावर...

आई,...माझ कॉलेज पुर्ण झाल्यावर विचार करेन...

मी तूला सहज बोलले राग नको मानुन घेऊ..तुला जेवढा वेळ‌ घ्यायचा तेवढा घे...

नाही,आई राग काय त्यात आता तुमची इच्छा असतेस ना,..मम्मी तर दहा वेळा विचारते..पिहु हसुन सांगत‌ होती..

दोघींना यायला आठ वाजले....

पिहु विराटला कॉल कर कधी येणार आहे ...सुमन बॅग सोफ्यावर ठेवत बोलतात..

आई,तुम्ही करा...परत चिडतील.

सुमन हलक हसतात...बिनसलं का काय...

न..नाही,तेअसच पिहु नजर चोरुनच बॅगचेक करत बोलते...

ठिक ये करते...जा आजी आणि जीजी ला बोलव...

हम्म,आले..

पिहु फ्रेश होऊन आजी जीजींना आणलेल्या वस्तु दा‌‌खवु लागली.

रोहिणी ही येते.सुमन नमन सकाळपासुन बाहेर गेला अजुन आला नाही...फोन पण बंद आहे...रोहीणी काळजीने बोलु लागली.

फोन बंद आहे सुमन पण घाबरतच बोलते....सुमन नमनला कॉल लावतात...बंद होता..त्या विराटला कॉल लावतात..

मॉम रसत्यात आहे किती कॉल करायचे विराट चिडूनच बोलतो.

विराट ऐकुन तरी घे...नमन घरी नाहीये सकाळपासुन फोन सुध्दा बंद आहे...

(विराट पॉज घेत...)तो फार्महाऊस वर आहे मॉम....इव्हिंनगला त्याच्या कॉल आला होता...

फार्महाऊस( सुमन रोहीणीकडे बघत बोलतात..)तिकडे काय करतोय....

मॉम,त्याच पेटींग एक्सबिशेन आहे..मग त्याला निंवात वेळ हवाय...टु- थ्री डेज नंतर येणार आहे...टेंशन घेऊ नको...फ्रेंड्स पण आहेत...

हम्म,सुमन फोन ठेवून देतात....रोहिणी फार्महाऊसच्या लॅनलाईन वर कॉल करून नमनची चौकशी करतात..तेव्हा कुठे सगळे रिलॅक्स होतात.

थोड्यावेळातच विराट येतो...रोहीणीशी बोलायला रुममध्ये जातो....

विराट हे काय आहे ..दोन तीन दिवस पण नीट ऑफिसला गेला नसेल ..‌लगेच घेऊन बसला ब्रश हातात...रोहिणी चिडुनच बोलते...

आई,राहु त्याला आवडते ते करु देऊ आपण..

क.काय बोलतोय ,विराट....तु असा बोलेल वाटलं नव्हतं....मला नमन बिझनेस मध्येच हवा आहे...रोहीणी धमकीच्या स्वरातच बोलते...

विराट हलक हसुन निघून जातो.. तो जेवायला येतो...पिहु त्याची प्लेट लावते....दोघांची नजरानजर होते...विराट एक लुक देत चेहरा फिरवतो...पिहु चिडुनच त्याच्याकडे नजर रो‌खुनच बघते...

तो मोबाईल बघत जेवण करत होता...तिच्याकडे एकदा सुध्दा बघितले नाही...

पिहूने त्याच्या हातातला मोबाईल ओढून घेतला‌..जेवण करून बघत बसा..पिहु रगाातच बोलली...

विराट दात ओठ खातच एक नजर बघत ‌खाली बघुन जेवण करतो.
.
.
दोघे रूममध्ये येतात.विराट एक ही शब्द तिच्याशी बोलत‌ नव्हता..
तो त्याच काम करत स्टडीमध्ये बसला होता..पिहू बेडवर बसून बुक रीड करत होती...तिच आर्ध लक्ष तर विराटवरच होतं..दररोज लाडात येणारा,आज तिच्याकडे बघत पण नव्हता.त्यामूळे‌ पिहूची चिडचीड‌ होत होती..

अहो,sss पिहु बेडवरुनच त्याला हाक मारते...तो एक नजर बघत परत लॅपटॉपकडे नजर वळवतो...

पिहु बेडवरचा पिलो फेकूनच त्याला मारते..तो पिलो झेलत तिच्याकडे परत टाकतो.ऑ हहह.अहो तूम्ही इकडे या पिहू चिडुन ओरडुनच बोलते.

पिहु,मी काय करतोय दिसतय ना,

हहं, पण तुम्ही माझ्याशी बोलत नाहीये...ती उठुन त्याच्यासमोर जाऊन उभी होते...

.मी, बोललं तर राग येतो ना..त्यापेक्षा न बोललेच बर तो इग्नोर टोनमध्येच बोलतो.

तूम्हच बोलणच तस कोणालाही राग येतो...सगळ्यांनाच ओरडून बोलतात...गोडीत समजवलं ना,पूढचा माणुस समजतो ..पण नाही ओरडुन रागावुन बोलायच...

विराट हातच्या मुठी आवळत शांत राहण्याचा प्रयत्न करत होता..

तूम्ही नमनवर अस फोर्स करता येत...मला बिलकुल पटत नाहीये..त्याची इच्छा नाहीये...तर (विराट टेबलावर जोरातच हात आदळत पिहुच्या दंडाला पकडत जवळ ओढतो)...पिहुचा आवाजच बंद होतो...रागाने डोळे लालबुंद झालेले,कापाळावर आठया पाडल्या होत्या..त्याचा राग बघुन पिहु थर ‌थरच कापु लागली....

काय..काय म्हणालीस...मी फोर्स करतो..सगळ्यांना फक्त ओरडत असतो‌...मला खुप आवडते ना...‌बोलायला खुप सोप आहे...हहं तो खवळुनच ओरडतो.

पिहु त्याच्या आवाजानेच डोळे घट्ट मिटुन घेते.. तो तिला रागानेच बाजुला करत रूमचा डोर जोरातच आपटून बाहेर निघून जातो...
पिहुची धडकीच भरली..इतक्यावेळ दाबुन ठेवलेला हुंदका फुटतो...पहिल्यांदाच तो तिच्यावर इतका चिडला होता...

विराट रागातच बाहेर गार्डनमध्ये फिरत होता...त्याला आता जास्त पिहुचा राग आला होता..पिहु त्याला समजून घेतच नव्हती..माझ ओरडण दिसत पण मनाची घालमेल दिसत नाही‌..

पिहू तर काऊचवर बसून रडत बसली...तिला कळलंच नाही...इतक चिडण्यासारख ती बोलली तर काय बोलली....नमनबद्दल तिला वाईट वाटत‌ होते...म्हणून एक शब्द बोलाव म्हणून ती बोलायाला गेली ...

तो ‌थोड्यावेळाने परत रुममध्ये ‌येतो ..पिहू गॅलेरीत फिरत होती..त्याला बघुन ती आत येते...

अहो,सॉरी ती रडतच त्याला मिठी मारते...मी नाही परत..ती बोलतच होती कि तो तिला रागातच दूर करुन काही न बोलता बेडवर जाऊन ब्लँकेट ओढुन पडतो...

पिहु एकटक त्याच्याकडे बघत बेडवर येऊन पडते...विराट तिला पाठ करून झोपतो...

जेव्हापासुन दोघे एकमेकांना ओळखु लागले.. पिहुला त्याने कधीच दुर केले नव्हते...पिहुच्या मनालाच गोष्ट लागली.
डोळ्यातुन पाणी तर वाहतच होते.तिलाच तिच कळत नव्हते...ती काय वेगळ बोलली...

दोघांना झोप तर लागत नव्हती...विचार करत कधी झोपले त्यांना त्यांचच माहित ...

सकाळी पिहु उठली ,विराट पालथा झोपुन एक हात तिच्या अंगावरच होता.पिहु गालात हसत त्याचा हात अलगद काढते..त्याच्या अंगावर ब्लॅ‌ँकेट नीट ओढुन आवरायला जाते.

जीजी आज जाणार म्हणून पिहूने त्यांच्यासाठी डब्बा केला...सुमन पिहुवर नजर टाकतात .

पिहु काय झालं शांत शांत आहे...तिचा उतरलेला चेहरा बघून त्यांनी काळजीने विचारलं

न..नाही.काही नाही थोड डोक जड वाटतयं..पिहू नजर चोरतच बोलू लागली....

हहं मी येईल पाच सहा दिवसात काळजी घे....सुमन बोलतात..

आजीने पिहूला हाक मारली म्हणुन पिहू निघून गेली.

विराट आवरुन खाली आला...पिहु,त्याच्यावर नजर टाकते .तो एक नजर टाकत जीजीकडे जातो...

जीजी काळजी घे,बाहेर कूठे नको फिरु..टाईमिंगवर जेवण मेडीसीन घे विराट एक एक इन्स्ट्रक्शन देत होता...जीजी डोळे भरुन बघत त्याच्या कपाळावर ओठ टेकवुन त्याला जवळ घेतात...

तु तुझी काळजी घे ...जास्त ताण घे‌त जाऊ नको कामाचा जीजी रडतच बोलतात.

विराट हलक हसुन जीजीचे डोळे पूसतो...जीजी सग्ळ्यांशी बोलून जातात.

पिहु कॉलेज साठी आवरुन खाली येते..विराट पिहुची वाट बघत कारमध्ये बसलाच होता...ती एक नजर बघत बसते..तो तिच्याकडे बघत सुध्दा नव्हता..पिहुला कसतरीच होत होते...ती डोळ्यांच्या कडा एका बोटाने पूसून बाहेर बघु लागली...कॉलेज आल्यावर पिहु विराटकडे बघु लागली....विराट पेप‌र्स रीड करत होता.पिहु कार मधुन उतरुन आत निघुन गेली...विराट ती आत गेल्यावर निघुन गेला...

आता त्याला सध्या नमनच टेंशन आलं होते...नमन रागातच निघुन गेला होता...

असेच चार पाच‌ दिवस पिहु काही ना काही बहाना करत घाबरत का असेना विराटशी बोलत होती पण तो हा नाही ह्याच टोन मध्ये बोलत होता....

अहो,

हहं तो तिच्या कडे न बघताच बोलतो..

कुठे चालला का,आज संडे आहे ना...पिहु त्याच्या जवळ जात बोलते...

हो माहित आहे..तो मोबाईल चेक करतच निघून जातो...पिहुला आधीचे दिवस आठवतात...ती विचार करतच बसते...

विराट फार्महाऊस कडे कार वळवतो..

नमन गार्डनमध्ये पेटींग काढत असताना त्याचा ब्रश खाली,पडतो विराट मागुन येत ब्रश उचलुन त्याच्या समोर धरतो...

नमन एक नजर बघत ब्रश घेतो...विराट पेटींग बघुन गालात हसतो....

नमन ह्यात कसे कलर भरतो ना तसं... तु आणि,वीराच्या चेहरयावरचा आंनद बघितला ना माझी लाईफ कलरफुल होते..आणि आज मला हे सांगव लागतं ह्याच वाईट वाटते....

नमनचे डोळेच भरुन येतात..तो मागुन मिठी मारतो...
सॉरी,दादा...पण मला आता एकांत हवा होता म्हणुन मी आलो,.

विराट त्याचे हात काढुन त्याच्याकडे वळतो...नमन,एकांत कोणाला हवा असतो ज्याला नात्यांचा कंटाळा आला असेल..हे अस रागात निघुन यायच का...घरात राहल्याने मी दिसलो असतो मग मी तुला कही ना काही विचारत बसलो असतो...ह्यासाठी घर सोडायची गरज नव्हती... मला बोलायच मी तुझ्या समोर आलोच नसतो....

दादा काही‌ काय बोलतोस तुझा का त्रास होईल मला.नमन कंठ दाटुनच बोलतो.

ठिक ये, आज पासुन तुला मी कधी काही बोलणार नाही...तुला जे वाटेल ते कर....पण प‌रत अस रागात घर सोडुन जायच नाही ...विराट भावुक होतच बोलतो.

(नमनला आता त्याच त्यालाच गिल्टी वाटत होते...)
नमन घरी जायच .....माझ्या डोळ्यासमोर मला तु हसताना दिसायला हवा....असा सॅड फेस करुन नाही विराट हलक हसत त्याचे केस विसकटतो.नमन हसत विराटला टाईट हग करत डोळे पुसतो.

चल घरी ,तुला काय त्या कलर ,ब्रश असल्यावर बोर होत नाही पण तिकडे घरात तु नाही तर वीरा शांत बसली दोघांची फाईट झाल्याशिवाय घर घरासारख वाटत नाही...

दोघेही जोरात हसत टाळी देत टाईट हग करतात...विराट त्याच्या पाठीवर थोपवत त्याला शांत करतो...

दोघेही घरचा रस्ता पकडतात..

दादा न्यू कलरचे शेड्स हवेत मला नमन मोबाईलमधले पिक्स दाखवत बोलतो.

नमन मनमोकळ बोलताना विराट च मन हलक होते...किती तरी दिवस तो विराटशी नीट बोलत नव्हता. त्याच मन आतुन जळत होते.....

नमन किती दिवस गेला अस जातात का,रोहिणी तो आल्यावर काळजीने ओरडत बोलत होत्या...

आई,मला एकांत हवा होता...म्हणून गेलो होतो तो हग करत थोड दुर होत बोलतो...विराट त्याच्या डोक्यावरुन हात फिरवुन रुममध्ये निघून जाते...

पिहु झोपली होती .तो तिच्या वर एक नजर टाकून फ्रेश होयला निघून जातो...

नमनची चांगलीच ‌खातीरदारी चालली होती.हे खा ते खा
विराट गालात हसत त्याच्या शेजारी बसतो....

विराट आम्ही कोकणच्या रीसोर्टला चाललो आहोत....सुधा आजी आणि बाबा रोहीणी हसत बोलते...

हो कधी निघणार आहे...

थोड्यावेळाने निघणार आहोत....नमन वीरा जास्त भांडण करु नका...रोहीणी दोघांना ओरडुनच बोलते...

वि‌राट पिहु कुठे सकाळपासुन दिसलीच नाही रुममध्येच आहे .सुधा बोलते...

हा ,झोपली .विराट विचार करतच बोलतो...

झोपली आता एक वाजला जेवली पण नाही आज बर वाटत नाही का....तसा विराट ब्लँक होतच सूधा कडे बघतो...नमनच्या टेंशनमध्ये तो पिहुशी बोलत सुध्दा नव्हता...तेवढच मोजक बोलत होता...त्यात तिचा राग ही आला होता..
.
वि‌राट जेव ना..रोहिणी त्याची प्लेट समोर करत बोलते...

हह..हो,आई आलो एक अर्जंट कॉल येतो‌य...विराट‌ काही तरी कारण देत उठला आणि वर आला..तो केसांमधुन चेहरावरुन हात फिरवत विचार करतच रुममध्ये आला.

पिहुच्या शेजारी येऊन बसला आता कुठुन सूरुवात करायची..

पिहु,त्याने एक हाक मारली .तशी पिहु दचकतच ब्लँकेट तोंडावरची काढत डोळे चोळतच बघु लागली...

हहं..तु.तुम्ही....कधी आलात पिहु उठुन बसत बोलते

थोड्‌यावेळ झाला तु झोपली बर वाटत नाही का,तो जवळ येत तिच्या कपाळाला हात लावत बोलतो.

पिहु एकटक त्याच्याकडेच बघत राहते...पाच दिवस तो नीट बोलत नव्हता ...

फिवर तर‌ नाहीये ...अजून काही त्रास होतोय का तो काळजीने विचारु लागला .

पिहु कसतरी मान हलवत नाही म्हणते..

हम्म,मग जेवली का ना....

ते भूक नाही‌ेये...तुम्हाला वाढू ती गालात हसत बोलते.

विराट,तिलाच एक टक बघत होता.तिचा चेहरा सुकल्यासारखा वाटत होता पण ती सांगत नाहीये त्याच्याच त्याला आता राग येत होता. तो काही न बोलता रूमच्या बाहेर जातो.पिहु,पण त्याच्यामागे जाते...

पिहू त्याची प्लेट वाढते..

तु नाही जेवणार का,तो नजर रोखूनच विचारते...

ह...हो पिहू पण पटकन बसते...स्वतःलाही ‌प्लेट वाढुन घेते...

पोट दूखत असल्याने तिची काही जेवायाची इच्छा नव्हती...ती थोडस खाऊन उठते...विराटला दिसत होते.तिला काहीतरी त्रास होतोय ..इतकी हट्ठी आहे ना,लवकर सांगतच नाही तो स्वतशीच बोलत जेवण करून रागाने रुममध्ये जातो..पिहु नमन शी बोलुन रुममध्ये येते..

वि‌राट त्याच काम करत स्टडीमध्ये बसला होता.

पिहु परत ब्लँकेट घेऊन पडते...तिची चुळबुळ चालुच होती..विराट तिच्याकडे बघत कपाळाला अंगठा घासतो....

तो चेअर वरुन उठुन तिच्या जवळ येऊन उभा राहतो...पिहुs

तशी पिहु त्याच्याकडे बघते...अ..हं

पिहु,का त्रास देत असतेस...काय त्रास होतोय सांगता येत नाही का, तुझ्यामागे स‌तरा वेळा लागायच का,मी..तो चिडुनच बोलतो...

पिहु घाबरतच उठुन बसते....ते....ते....म...मला ती नजर इकडे तिकडे करत बोलु लागली...

.पिहुsssतो ओरडुन बोलतो...

पिहूच्या डोळ्यात टचकन पाणी येते...तिचा हुंदकाच फुटतो...

विराट दचकतोच ..पिहु,...अशी का करतेस......तो तिचा हात पकडत कुशीत घेतो...

पिहु चिडुन रडतच बाजुला सरकते.नाही बोलायच मला काही नाही सांगायच.हे अस विचारता का.एकादा बोलायच बोलत जा तुला जे वाटते.घाबरत जाऊ नको,बिनधास्त माझ्याशी बोलत जा.आणि बोलायाला गेलं तर काही विचारलं तर ओरडा‌यच चिडायच.मला तर कस बोलाव काही कळतच नाही तुमच्याशी.ह्या घरात काय चालु असते ते ही मला कळत नाही.तुम्हाला विचारलं तर‌ कधीच सांगत नाही.फक्त चिडायच माहीत आहे.तुम्ही न बोलले बर आहे .अस काय वेगळ बोलले होते.इतक चिडायला.‌.आणि आज स्वत रीलॅक्स आहेत म्हणुन मी आठवते का इतक्या दिवस मी नसल्यासारखेच वागत होता...आणि बोलत असे आहात मी चुकिची आहे...आता नमनच तुमच काय झालं मला माहीत पण नाही.. ..घरात जे बोलतात...तेवढच कानावर पडत...त्यावरुनच मी एक शब्द बोलायला गेले कि तुम्ही मझ्याशी बोलणच बंद केले...मीच स्वतःहुन बोलत होते.सकाळी नीट विचारलं ना मी कुठे चालला ..काही बोलला नाही....आणि आईने विचारलं तर लगेच सांगितले...पिहु रडतच चिडुन बोलत होती...विराट तिचे डोळे पुसत होता..तर तिने हात झटकला...

काही गरज नाही.काळजी करायची...पिहु ‌दुसरीकडे सरकुन परत ब्लँकेट तोडांवर घेऊन पडते...रडण तर चालुच होते..

विराट गॅलेरीत जाऊन बसतो.....त्याला आता स्वतःच राग येत होता...तिला कश्यातलं काही माहित नसुन सुध्दा आपण तिच्यावर चिडलो...कधी तिला काही सांगत ही नाही.‌‌..तिला समोर जे घडत ती ही तशीच रीयॅक्ट‌ करणार...त्याच्यामुळे पिहु किती हर्ट झाली त्याच वाईट वाटत होते...विराट आत येतो.. बोलण्यासाठी तिच्या जवळ येत तिच्या चेहरयावरची ब्लँकेट काढतो...तिला झोप लागली होती..तो तिचा हात डोक्यावरुन काढत नीट ठेवत ब्लँकेट नीट ओढुन ऐसी बंद करतो...तिच्याशेजारी मागे टेकुन तिच्या केसांवरुन हात फिरवत तिला एकटक निहाळत बसतो.

चारच्या दरम्यान पिहुला जाग येते...ती उघडझाप करतच डोळे उघडुऩ बघते...विराट तिला कुशीत घेऊन झोपला होता....
पिहुच्या चुळबुळीने विराट ही जागा झाला...पिहु त्याच्या हात
काढत होती तर वि‌राट ने हात घट्ट करत तिला मिठीत घेत तिच्या केसावरुन हात फिरवत होता..सॉरी म्हणत तिच्या गालावर किस क‌रत‌ होता...पिहु पण राग विसरुन त्याच्या भोवती हातांचा विळखा घालत घट्ट बिलगते.तिला कळत होते...त्याला किती सगळीकडचे टेंशन आहे..त्याची चिडचीड होतेच...

पिहु,...

हहं

सॉरी,

हहहं .

हहं ..हहं काय बोल‌ ना..तो तिचा चेहरा वर करत बोलतो..पिहू परत‌ त्याला बिलगते.

काय झालं...

पोट दुखतयं...

मग किती वेळच विचारतोय.सांगत का नाही...चल डॉक्टर कडे जाऊ..

पिहु त्याच्याकडे बघुन गालात हसते...तस नाही,मला पिरीयड्स आले म्हणुन दुखतं ..ह्यावेळेस लेट आल्यामुळे जरा जास्त पेन होतयं‌.....

तो एक नजर‌ तिला बघत विचारात पडतो...

क..काय झालं...

सॉरी,...तुला अजुन त्रास दिला ना‌.‌.तो तिला घट्ट मिठीत घेतो.‌

तुम्ही आहेच कडु....पिहु त्याच्या गालावर चावत म्हणते..

विराट हलक हसत तिच्या ओठांवर हलके ओठ ठेवतो...

अजून पेन होतयं का,तो तिचे केस मागे घेत बोलतो..

हो...पिहु बार‌ीक चेहरा करतच बोलते.

झोप ,आणि हे काय साडी घातली कंफर्ट कपडे घाल.‌.विराट उठून बसत बोलतो...

अहो, पिहु नजर रोखुनच बोलते...

तसा विराट आवाजाचा टोन कमी करतो...अहं...अगं तुला हेवी वाटत‌ नाही का,अस म्हणायच होते...विराट गालात हसत बोलतो...

ह..हो मग खाली कस जाणार ...मोठ्‌या आईंना आवडत नाही.

काssआई,काही बोलली का तो संशयानेच बघतच विचा‌रतो...

परत पिहुच्या लक्षात येते...आता कुठे नमन घरी आल्याने वातावरण नीट झाले ...परत अजुन काहीतरी घडायचं...

पिहु,उठुन बसते..अ..हं...तस नाही..कोणीही कधीपण ‌येते ना...चांगलं नाही वाटत ,अस आईंच म्हण होते...

हम्म,मी तुझ्यासाठी सुप मागवतो...तु फ्रेश हो आणि चेंज कर घरात कोणीही नाहीये...नमन वीराच आहेत...उद्या पासुन तुझी इच्छा,असेल तर घाल नाही तर नको...आई काही बोलली तर मला,आवडत नाही म्हणून सांग.हहहं तो प्रेमाने बोलत तिच्या कपाळाला कपाळ टेकवतो...

मला सुप नकोय...

का?

मला तुमचा हातचा चहा हवा...पिहु नाक गोळ करत हसतच बोलते...

नो ,तो आठ्या पाडतच बोलतो..

का,‌ssती गाल,फुगवुनच बोलते....

अ..मी किचन...नो वेज🙄

का,तिकडे करून दिला होता ना..

तिथे कोणीही नव्हतं ...

माहित आहे पण तुम्ही म्हणाला ना,आई बाबा बाहेर गेलेत...

हह..हो,पण स्टाफ तर आहे ना...विराट एका दमात बोलून गेला

पिहु खूदकन हसते....ओ..ओहह तर‌ मि. विराट देशमुख आपली इमेज संभळतात...

पिहू, फोन कर आणि मागव...मी नाही जाणार..तो चेहरा फिरवतच बोलतो.

मला कोणाच्या हातचा आवडत नाही....जाऊ दे मीच करते..पिहू नाटकी चेहरा करतच बेडवरुन उठु लागते...

ह....हे.थांब पिहु,ss.आपण डीनर ला जाऊ तेवढच बाहेर बर वाटेल...

न..नको मला इथे फिरु वाटत‌ नाही आणि बाहेर नको ...मला तुमच्या हाताचा चहा हवा बस्स...हीच तुमची पनिशमेंट सिक्स डेज तुम्ही माझ्याशी नीट बोलला नाही म्हणून..‌तुम्ही चहा केला नाही तर मी सिक्स डेज बोलणार‌ नाही..हुहहह

विराट तिच्या कडे चिडुनच बघतो...

अहो आणि ह्यापुढे ओरडला ना आणि अस तुटक बोलला ना,मी मम्मी कडे निघून जाईल....

तसा तो डोळे ताटच करत बघतो..

हो,खर बोलते...

हो तू खरच बोलते गं...नाही तर काय तुझ माईंड तिकडेच असते...दिवसातुन दहा फोन असतात...एवढ काय बोलत असते...गं...

ऑहहह.म्हणजे आता बोलायच पण नाही का,😒..

अगं बोल पण काय बोलतेस........ जेवली का... तु काय केली आज जेवायला हे काय बोलण झालं ....सकाळी ब्रेकफास्ट‌ का‌य‌ केल्यापासुन ते डीनर पर्यंत जाते...तो हसतच बोलतो..

माझ तोंड मी काही बोलु आणि तुम्ही का ऐकता...

मला कान आहेत ..ऐकु येतं‌..आणि हसु पण येत😂😂

ऑहहहं‌.ह उठा मला चहा करून आणा 😣 मी फ्रेश होते हुहहहं पिहू उठुन फ्रेश होयला जाते...

विराट हसतो...अगं अजुन एक सांगायच...

मला नाही ऐकायच😠 जा पिहु जोरातच दार आदळते...

विराट हसत बाहेर जातो..आता किचन मध्ये कोण नसाव ह्या विचारातच तो किचनमध्ये येतो...तिथे आधीपासुनच नमन वीराच काहीतरी चाललं होतं...ह्यांना काय आजचाच दिवस भेटला किचन मध्ये यायला विराट दात ओठ खातच बोलतो...नमन वीराची नजर पडते....

हहहॉ....दादा तु sss व‌ीरा विराटला बघुन ब्लँक होत बोलते...

विराट डोक्यावर अंगठा घासतच त...त.तुम्ही दोघ काय करता...तो त्यांनाच प्रश्न विचारतो....

मॅडमला पास्ता खायचा होता.माझ्या हातचा नमन हसतच बोलतो...

आत्ताच सुचलं विराट इकडे तिकडे बघतच पूटपुटतो...

दादा,तुला काय हव आहे का वीरा विचारते...

ना....नाही,मला काही नको...तो कसतरी हसत बोलतो...वि‌राट वाट बघत असतो.दोघांच कधी होतयं....

विराट अजून आला नाही म्हणून पिहुच ‌खाली येेते....अहो,चहा करायला मोजुन पाच मिनीट लागतात.कितीवेळचा चहा करताय...पिहु किचन मध्ये येत ओरडुनच बोलतच होती...नमन वीराला बघुन दचकतेच...

नमन वीरा शॉक होत एकमेकांनाकडे बघतात...वि‌राट कापाळालाच हात मारतो...पिहु घाबरुन विराट कडे एकदा आणि नमन वीराकडे एकदा बघते....मम.....मी ते..पिहुला काय बोलाव कळतच नाही...‌

नमन वीरा पोट धरुन जोरातच हसतात...

विराट पिहुकडे नजर रोखूनच बघतो....

हह..ते...मी करते..पिहु घाबरतच किचनकडे वळाली...

राहु,दे...वहिनी दादा आहे ना... करुन देईल.... आम्ही जातो...नमन हसतच बोलतो..

दादा, काय हाल चालु आहेत.....वीरा हसतच,विराटच्या दंडाला मारत जाते...

पिहु एक नजर बघत जवळ येते...अहो,आता करा पिहु हसु दाबतच हातात चहापावडरचा डब्बा देत बोलते...

विराट गालात हसत तिच्या नाक ओढत तिला चहा ठेवतो.पिहु त्याच्या साठी पुदिना घालुन ग्रीन टी करते....दोघेही लॉन मध्ये येऊन झोपाळ्यावर बसतात...

विराट मग बाजुला ठेवुन पिहुला जवळ कुशीत घेतो..

पिहु,

हहं

बोल ना...तो तिच्या हातात बोट गुंफवुन तिच्या हाताला किस करत बोलतो...

हहं तुम्ही बोला....मला ऐकायच आहे ......

पिहु माझ्यासाठी फॅमिली खुप महत्वाची आहे...

हो माहीत आहे ...आणि ते दिसुन येते सांगायची गरज नाही...

कधी मी माझ्या जबबादरया संभळताना,तुझ्याकडे दुर्लक्ष झालं तर राग नको धरु...

पिहु गालात हसते...आणि त्याच्या गालावर ओठ टेकवते....नाही,कधीच नाही ...कधीच अस होणार नाही‌..आणि मला कळतं तुम्हालाही किती त्रास होतोय...पण तुम्हाला ते कोणाला दा‌खवायचे नाही....तुम्ही नावाप्रमाणेच आहात...एका मोठ्या पहाडासारखे सगळ्यांना सावली देऊन स्वतः उन्हाचे चटके अंगावर झेलता...

विराट पिहुला भारावुन बघत कपाळावर किस करत मिठीत कैद करतो.....

तुमच नाव कोण ठेवलं...पिहू विषय चेंज करत बोलते....

माझ नाव डॅडने ठेवले विराट ‌ओठांच्या कडा रुदांवत सांगतो.‌.

डॅडला तुमच फ्युचर पाळण्यातच दिसले असेल तुम्ही मोठ्यापणी कसे अससाल...पिहु हसुन बोलते...

विराट ब्लँक होत बघतो...

पिहु डोक्यालाच हात मा‌रते...अहो,अस आधीचे लोक बोलत होते....त्याच्या चेहरयावरुन कळालं नाही पिहु काय म्हणते.

अ..अहो मला एक विचारयच...पिहु लाजतच बोलते...

हम्म,

मला माहित नाही तुमची रीयॅक्शन कशी आहे....पिहु चाचरतच बोलते...

बोल...‌नाही चिडणार तो हसतच बोलतो...

तु...तुम्हाला बेबीज आवडतात....

तो प्रश्नआर्थक नजरेने बघतो...

बोला ना...

हा कसला प्रश्न ऑफकोर्स बेबीज कोणाला नाही आवडत...तो सहजच बोलुन जातो...

पिहु खुश होते....पिहु बोलणार कि विराटचा फोन वाजला...विषय ही तिथेच थांबला...
.
.
.
.
रात्री चौघे जोक करतच डिनर करतात...नमन वीराच तर सारख वाजतच होते....विराटला घर भरल्यासारखे वाटत होते..आठ दहा दिवस नमन कोणाशीच बोलत नव्हता...त्याने ही ठरवलं आता फोर्स नको करायाला त्याची इच्छा असेल त‌‌रच तो करेल‌.
आल्यावर आईला बोलु म्हणुन त्याने मनाशी पक्क केल...

पिहु हसत चेअर वरुन उठतच होती...तिला विकनेस मुळे भोवळ आल्यासारखच झालं...ती पठकन डोक धरतच चेअरवर बसली...विराट घाबरुन पटकन उठला...

पिहु ,काय झालं...नमन वीरा पण शांत होत जवळ आले...

काही,नाही..थोडस गरगल्यासारख झालं...

विराट समोरचा ग्लास घेत तिच्या ओठांना लावतो...आता ठिक वाटतं का,डॉक्टरांनाकडे जायच का....तो टेंशनच्या स्वरातच बोलतो..

वीराला माहीत होते..

दादा चल जाऊ आपण,डॉक्टरकडे ....नमन काळजीने बोलतो...

न..नको,ते ..परत समोर नमन असल्याने ती शांत बसते..ती इश्यारयाने त्याला खुणवते...विराटला हि कळतं चल रूम मध्ये आराम कर...

दादा,

नमन वकिनेस आहे..हेवी मेडीसीन चालु आहेत ....होतो तिला अधुनमधुन त्रास....तो त्याला समजवतो....लेट झाला आहे...झोपा दोघे....विराट पिहुच्या हाताला पकडत उभ करत बोलतो...दोघेही निघुन जातात‌..

तो पिहुला उचलतो...

अ..अहो मी चालते ना...दोन दिवस त्रास होईल..

शुशुsssतुझ खाण पिण नीट नसल्याने हे असे ‌प्राॅब्लेम होतात...तो थोडस चिडुन बोलतो....

पिहु त्याच्या गळ्यात हात गुंफवुन त्याला बिलगते...विराट तिला बेडवर झोपून ब्लँकेट ओढतो....

पिहु उद्या कॉलेजला काही जायची गरज नाही....जास्त त्रास होत असेल तर डॉक्टर जाऊ...

अहो,ते मला दोन तीन दिवसच त्रास होतो...पण ह्या वेळेस लेट आल्याने विकनेस वाटतोय...

विराट तिच्या चेहरयावरुन हात फिरवत झुकुन ओठांवर‌ हलके‌ किस करतो...पिहु पाय दुखतात का...तो पा‌‌याला‌हात लावत विचारतो.

पिहु पटकन पाय मागे ओढते..अहो का‌य‌ करता‌...पायाला नका हात लावु...

का,

नको...

पिहु,माझे पाय दुखल्यावर तु तेल मॉलीश करते ना...तेव्हा मी म्हणतो...

हहहा पण नको...माझ डोक दुखतय....

विराट तिच्या शेजारी येऊन डोक दाबतो.चहा पी नाही दूखणार‌ तो टोमण्यातच बोलतो...

पिहु गाल फुगवुनच बघते....विराट हसत तिला कुशीत घेऊन झोपतो.
.
.

.
.
.
वीरा कॉलेजला निघाली का,नमन विचारतो...

वीरा सॅक चेक करतच हो बोलते....हो...का रे....

अम्म नथिंग...नमन विचार करतच बोलतो...वीरा बाय करुनच निघते.....

गीता वर नाश्ता देऊन येत होती....गीता वहिनी उठली का ...

हो,

नमन तु इतका कसा सेल्फिश आहेस...दादा किती करतो सगळ्यांसाठी आणि तु तुझाच विचार करतो.वहिनीला बर नाही तरी दादाला जाव लागतं.....नमन स्वतःशीच बडबड करत विराटच्या रुमकडे वळतो...

पिहु मी एक दोन तासात येतो...आराम कर विराट ब्लेझर घालत‌ बोलतो..

हो ss जावा..मला आता बर वाटतं तुम्ही उगाच टेंशन घेतो...

अगं घरात कोणी नाही म्हणुन काळजी वाटते...मॉम पण दोन तीन दिवसाने येईल.चक्कर येत असेल तर‌ कॉल कर..माझ मन तर‌ नाही ...सोडुन जा‌यची इच्छा तर नाही विराट नाराजीच्या स्वरातच बोलत तिच्या डोक्यावरुन हात फिरवत तिला हग करतो...पिहु , हसत विराटच्या पाठीवरुन हात फिरवतो.

नमन डोर नॉक करतो..वि‌राट डोर उघडतो..

गुडमार्निंग विराट गालात हसत वॉच घालत बोलतो.

नमन पण विश करत‌ आत येतो..वहिनी आता बर वाटते ना...

वि‌राट पिहु एकमेकांनाकडे बघतात..पिहु गालात हसत हो म्हणते.

नमन घरीच आहे ना... मी ऑफिसला जाऊन येतो....तो निघतच होता ...

दादा,

हहं

तु थांब ..ऑफिसला मी जातो...वहिनी एकटीच आहे घरात

विराट ब्लँक होतच पिहुकडे एकदा आणि नमन कडे एकदा बघतो...

.विराट गालत‌ हसत जवळ येतो...नमन पिहुला काही नाही
झालं टेंशन नको घेऊ...

ते...मी आज पासुन ऑफिस जॉईन करतो....ते ही मानापासुन बोलतो‌य..तुला थोडीफार हेल्प‌ करुच शकतो...ना...

आर यु शुअर ...विराट नजर रोखुनच विचारतो....

नमन गालात हसत मान हलवुन हो म्हणतो...अँड सॉरी दादा मी मुद्दाम केलं होते...तु स्वतः रागात परत कुठल काम सांगणार नाही..तो मान खाली घालतच बोलतो...

विराट,त्याला जवळ घेत हग करतो...ते मला कळालं...पिहु पण दोघांना अस बघुन ‌खुश होते...

हे धर मानवला दे....तुझ्या केबिनची कि...वि‌राट ड्राॅवर मधुन चावी त्याच्या हातात देतो..तुला काही चेंजेस करायच्या असतील तर करुन घे....आणि हे अस जाऊ नको....चल मी स्वतः तुला सुट काढुन देतो...विराट खुश होतच त्याच्याबरोबर‌ रूममध्ये जातो...विराटचा आंनद तर गगनात मावत नव्हता.

विराट त्याच्यासाठी सुट सिलेक्ट करतो...त्याचे शुज वॉच सगळ एक एक सामान काढत होता...नमन ही विराटच्या चेहरायवरचा आंनद बघुन त्याचा गिल्टीपणा कमी होतो..विराट त्याला टाय बांधतो...

नमन इव्हिनिंगला आपण तुझ्यासाठी शॉपिंग करायाला जाऊ...
दादा हे सगळे सुट युज तरी करु देत‌..

काही गरज नाही...आपण जातोय ....विराट ऑर्डर देतच बोलतो..

नमन हसत ठिक ‌ये बोलतो.....

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

कसा वाटला भाग नक्की सांगा...

क्रमश:



























.