ATRANGIRE EK PREM KATHA - 1 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 1

Featured Books
  • Devil I Hate You - 23

    और फिर वहां सोचने लगती है, ,,,,,वह सोचते हुए ,,,,,अपनी आंखों...

  • श्रापित

    मनोहरपुर का नाम सुनते ही लोगों के चेहरे पर अजीब सी घबराहट आ...

  • स्वयंवधू - 33

    उलझन"कल शाम हुआ क्या था? भविष्य के लिए मुझे विस्तार से बताओ।...

  • लव एंड ट्रेजडी - 16

    उन सब ने नाश्ता कर लिया था अब उन्हें एक गाइड की ज़रुरत थी जो...

  • अपराध ही अपराध - भाग 31

    अध्याय 31 पिछला सारांश: कार्तिका इंडस्ट्रीज कंपनी के मालिक क...

Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 1

कॉलेज सुरू होऊन एक महिना सहज होऊन गेला. शौर्यने आजच कॉलेजमध्ये प्रवेश केला शौर्य म्हणजे एकदम रेखीव व्यक्तिमहत्व. उंच, गोरापान आणि त्यावर असणारे त्याच रेखीव असे नाक. पहिल्याच नजरेत कोणालाही पसंत पडेल असा तो. कॉलेजचा आजचा त्याचा पहिला दिवस त्यामुळे एकदम निरखुन तो कॉलेज बघत होता. त्याची नजर वोचमेनला शोधत होती पण तो काही जागेवर नव्हता.

"फर्स्ट इयरचा क्लासरूम कुठेय???"उभ्या असलेल्या घोळक्याला त्याने आपल्या मनातील शंका विचारली..कारण त्यांच्या व्यतिरिक्त गेटवर कोणीही दिसत नव्हतं

"थर्ड फ्लोर सेकंड लेफ्ट.." त्यातील एकाने त्याला सांगितलं.

त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तो क्लासरूममध्ये जायला निघाला. थर्ड फ्लोरवर येऊन बघतो तर लेडीज वोशरूम. तसाच पाठून हसण्याचा आवज येऊ लागला. ही तिच मुल होती ज्यांना त्याने एड्रेस विचारला होता.

शौर्य : "तुम्हाला ऐकायला कमी येत हे सांगितलं असत तर चालल असत मला मी दुसऱ्या कुणाला तरी विचारल असता आय मिन आय विल मॅनेज माय सेल्फ."

एवढं बोलुन तो तिथुन जायला निघाला तोच एकाने त्याच्या खांद्याला हात लावुन त्याला मागे ढकललं.

आज त्या ग्रुपच्या जाळ्यात नवीन मासा अडकला होता अस त्यांना वाटत होतं पण शौर्यने उलट बोलुन त्यांना चांगलच डिवचले होते.

"जास्तच स्मार्ट समजतोस तु स्वतःला, नाव काय रे तुझं???", त्यांच्यातील एकाने त्याला विचारलं.

"नाव सांगितलं असत पण..."( त्याने ठेवलेला खांद्यावरचा हात खाली करतच तो त्याला बोलला)

"पण काय???.. "ग्रुपमधील एकाने त्याला विचारलं..

"पहिलं तुम्ही डॉक्टरांकडून तुमच्या कानावर इलाज करून या मगच सांगेल. न जाणो तेही ऐकायला गेलं नाही तर???" शौर्य मिश्किलपणे हसतच तिथुन जाऊ लागला आणि ज्याने त्याला मागे ढकललं होत त्याला आपला खांदा मारत बाजुला ढकलुन पुढे निघुन गेला.

आज पर्यंत कोणाची एवढी हिंमत नव्हती की तो ह्या रोहनवर हसेल.. रोहन रागाने लाल बुंद होत होता.

"जाऊ दे ना यार नवीनच आहे, त्याला तु कोण आहेस हे माहीत नसेलच.", सगळेच आपल्या ग्रुप लिडरची समजुत काढु लागले.

इथे एक जण टाळ्या वाजवतच शौर्यला हात मिळवु लागला.

"यु आर ग्रेट यार."

शौर्य थोडं आश्चर्याने त्याच्याकडे बघु लागला.

"ओहह सॉरी मी राज फ्रॉम एफ वाय बीकॉम."

"शौर्य हिअर", दोघेही एकमेकांना हात मिळवु लागले.

(फायनली शौर्यला एक जोडीदार मिळाला)

राज : "कसला भारी आहेस यार तु??"

शौर्य : "का काय झालं??"

राज : "अरे तुला माहीत नाहीत ती कोण मुलं होती.."

शौर्य : "अरे पण त्यांना तरी कुठे माहिती मी कोण आहे ते."

(राज आणि शौर्य दोघेही हसु लागले)

राज शौर्यला घेऊन क्लासरूमध्ये जाऊन बसतो.

शिक्षक अजुन वर्गात आलेले नसतात. तो पर्यंत राज शॉर्यची ओळख करून देत होता.

टॉनी, वृषभ, सीमा आणि दोन जण आहेत..

सॉरी गाईज तुम्हा सगळ्यांची नाव माझ्या लक्षात रहाणे कठीण आहे.

सीमा : "हळुहळु राहिलरे लक्षात."

वृषभ : "तुला मी काल पाहिलेलं होस्टेलवर. मी तुझ्या बाजूच्याच रूममध्ये आहे."

शौर्य : "ओहहह. बट थेंक्स टु गॉड कोणी तरी आहे सोबत होस्टेलवर."

वृषभ : "अरे मीच नाही इकडे सगळीच जण होस्टलवर आहेत ठराविक सोडली तर."

शौर्य : "ओके.. ग्रेट."

सगळे मिळुन गप्पा मारत असतात.

शौर्यला खरतर एकट इथे रहाण्याच खूप टेन्शन आलेल कारण दिल्लीसारख्या शहरात त्याच आपलं अस कोणीच नव्हत आणि इतक्या सहज ओळखी होतील अस त्याला वाटलं देखील नव्हतं.

थोड्याच वेळांत रोहन आणि त्याचा ग्रुप टवाळक्या करत क्लासरूमध्ये शिरला आणि बरोबर शौर्यच्या मागे जाऊन बसला.

रोहन : "काय मग राज पुरोहितsss."

राज थोडा घाबरतच मागे बघु लागला. शौर्य पुस्तकात बघत होता पण लक्ष त्याच पूर्णपणे रोहन काय बोलतो त्यावर होत.

राज : "कsss कsss काय झालं??"

रोहन : "इथे जो कोणी नवीन येईल त्याला तु समजवत नाहीस का मी कोण आहे ते??"

रोहन शौर्यकडे नजर फिरवतच बोलु लागला.

राज : "शौर्य आजच आलाय त्याला नाही माहीत तुझ्या बद्दल."

रोहन : "ओहहह म्हणजे म्हणजे नाव शौर्य आहे तर."

सो मिस्टर शौर्य, रोहन त्याच्याजवळ जातच बोलला.

शौर्य पुस्तक उघडुन ते वाचतोय असे सगळ्यांना भासवत होता.

राज त्याला हातानेच हलवत सांगत होता की तुला रोहन बोलवतोय. पण शौर्य मात्र लक्ष देत नव्हता.

रोहन : "बहुतेक तुला सुद्धा कानाच्या डॉक्टरांकडे जावं लागेल कारण आता तुला सुध्दा ऐकु गेलेलं दिसत नाही मला.."

रोहनने अस बोलताच सगळा त्याचा ग्रुप शौर्यवर हसु लागला.

रोहन : "सो मिस्टर शौर्य.. इथे शिकायचंय आणि टाकायच असेल तर माझं ऐकायचं.. आणि ह्या पुढे आपल्याशी नडायच नाही. पहिलं आणि शेवटच सांगतोय. हा रोहन एक चान्स सगळ्यांनाच देतो सुधारण्यासाठी.."

शौर्य बुक बंद करून उभा राहिला..

शौर्य : "सो मिस्टर....(थोडा मोठा पोज घेऊन) व्हॉटेवर जे असशील ते. कस असत ना कुत्र्याचं भूकंण आपल्याला कधी कधी नकोस वाटत म्हणुन त्याला दगड नाही मारायचा. कारण कुत्र्याचं कामच असत घोळका करून भुकायच..त्यांना भुकु द्यायचं. आपण सुद्धा त्यांच्यासोबत भूकल तर आपल्यात आणि त्याच्यात फरक रहात नाही. सो तुला कळलं असेल मी का शांत होतो ते."

"ए. तुला तर ना." अस बोलत रोहनचा ग्रुप शौर्यला मारायला जाणार तोच रोहन ने त्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला.

"आम्ही त्याला समजावतो, नवीन आहे तो.."अस बोलत राज आणि इतर लोक मध्यस्थी करू लागले.

"भेटीगाठी आता रोजच होतील आपल्या.."शौर्यच्या शर्टची कॉलर नीट करतच तो त्याला समजवतच बोलु लागला. दोन बोट स्वतःच्या डोळ्यांसमोर धरून आणि मग शौर्यला दाखवत काहीही न बोलता एक प्रकारे त्याला धमकी देत क्लासरूमच्या बाहेर निघून गेला.

आणि तोच सर आले.

सर लेक्चरला सुरुवात करणार तोच मनवी येते. लांब सडक केस आकर्षक बांधा त्यातच तिने घातलेल्या पिंकीश अश्या शॉट्स मध्ये ती खुप सुंदर दिसत होती. बघताच क्षणी आवडावी अशी ती. सगळे तिच्याकडे बघतच बसले. शौर्यच मात्र तिच्याकडे लक्षच नव्हतं. ती येऊन शौर्यच्या बाजूच्या डेस्कजवळ येऊन बसली. सरांनी प्रेसेंटी घेऊन लेक्चरला सुरुवात केली. सर काही महत्वाचे नोट्स लिहून देऊ लागले. मनवी बेगेतुन बुक आणि पेन काढु लागली आणि नकळत तीच पेन खाली पडल. आणि ते घरंगळत शौर्यच्या डेस्कजवळ आलं.

मनवी : "Excuse me"

शौर्यच लक्षच नसत, त्याच संपुर्ण लक्ष सरांकडे असत.

मनवी सोबत पहिल्यांदाच अस झालं असेल की तिच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही.

"Excuse Me"मनवीने पुन्हा मगासच्यापेक्षा थोडा जोरातच आवाज दिला.

तस सरांसकट सगळे तिच्याकडे बघु लागले.

"Can u pass my Pen please??" पेन कडे बोट दाखवत ती शौर्य ला बोलु लागली.

शौर्यने वाकुन पेन उचलला.

मनवीने हात पुढे केला पण त्याने तो तिच्या हातात न देता तिच्या डेस्कवर ठेवला.

मनवीने तसाच हात मागे घेतला.

"स्वतः सुद्धा घेऊ शकली असती एवढं थोडीन लांब होता", म्हणुन स्वतःशीच काहीस पुटपुटत लेक्चरमध्ये लक्ष केंद्रित करू लागला.

मनवीला मात्र त्याच हे वागणं आवडलं नव्हतं. ती लेक्चर सोडून त्याच्याकडे रागाने बघत होती.

"कोण आहे ग हा??" तिने हळुच सीमाला विचारलं..

"आजच जॉईंट झालाय शौर्य",सीमा हळुच तिच्या कानात कुजबुजली..

दोघांची कुजबुज वर्गातील शांतता भंग करत होती.

""Don't make a noise", सर मोठ्यानेच ओरडतात..

तश्या दोघी शांत झाल्या.. मनवीच्या मात्र डोक्यातुन काही केल्या तो विषय जातच नव्हता.

शौर्य मात्र नोट्स लिहिण्यात बिजी होता.. एका बाजूने दिसणारा त्याचा तो आकर्षित चेहरा मनवी बघतच राहिली. अधुन मधुन त्याच्या गालावर उमटणारी खळी तिला त्याच्याकडे आकर्षित करत होती.

डोळे बंद करून मान हलवत तिने तिला लागलेली तंद्री स्वतःच दूर केली. आणि सरांकडे लक्ष देऊन नोट्स लिहिण्याचा प्रयत्न करत होती. पण आज अस का होतय हे तिला कळत नव्हतं. एक लांब खोल श्वास घेऊन तिने पुन्हा लेक्चरमध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न केला पण तिची नजर आपणच शौर्यकडे जात होती.

तिने पेन हातात घेत वहीत नजर स्थिर ठेवली. मनात शंभर ते एक अशी उलट मोजणी चालु केली. अस ती वारंवार करत होती आणि फायनली बेल झाली म्हणजे लेक्चर संपल तस तीने सुटकेचा श्वास सोडला.

लेक्चर संपताच सगळे शौर्यच्या डेस्कजवळ गेले आणि त्याला समजावु लागले. सुरुवात तर राजनेच केली..,

राज : "अरे शौर्य तो चांगला मुलगा नाही त्याच्याशी पंगा घेऊन तु तुझं खुप मोठ नुकसान करशील. एका श्रीमंत घराचा वाया गेलेला मुलगा आहे तो अस समजलंस तरी चालेल खूप साऱ्या कॉलेजमधुन त्याला टर्मिनेट केलंय पण इथुन नाही करू शकत कोणी कारण हे कॉलेज आणि हॉस्टेल पूर्णपणे त्याच्या वडिलांच्या ट्रस्टीवर चालत."

शौर्य : "हे तुम्हांला त्यानेच सांगितलं का??"

राज : "हो म्हणजे नाही.. म्हणजे सगळे तेच बोलतात" त्याच्याबद्दल.

(राज थोडं अडखळतच बोलला)

शौर्य : "असल्या अंधश्रद्धा मी नाही मानत.. आणि तो कोणाचाही मुलगा असेल किंवा काहीही असेल, रॅगिंग करणं हा गुन्हा आहे आणि मी माझ्यावर होणार रॅगिंग सहन करणार नाही. रॅगिंग करणारा गुन्हेगार असतो तर तो सहन करणार देखील तितकाच गुन्हेगार असतो."

वृषभ : "पण दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. इथे दिल्ली मध्ये तुझं कोण आहे का ओळखीच जे तुझ्यासोबत नेहमी पोलीस स्टेशनमध्ये नाचत बसेल.? "

शौर्य : "नाही.."

टॉनी : "मग तर तु जपुनच रहा तुला तर तो धमकी देऊ गेलाय."

सगळे शौर्यला समजवत होते इथे मनवीला काय चालु आहे हे कळत नव्हत तिने सीमाला विचारलं.

तस सीमाने घडुन गेलेला प्रसंग तिला सांगितला.

मनवी : "काय बोलतेस?? तुला सांगु मला ना हा थोडा अतरंगीच वाटतो. मगाशी पण बघितलं न कसा वागत होता ते."

सीमा : "काहीही काय बोलतेस. एक तर त्याने तुझं पेन उचलुन दिल वर तु थेंक्स सुद्धा नाही बोललीस त्याला आणि वर तुला तो अतरंगी वाटतो अस बोलतेस."

मनवी : "अरे हो यार, लेक्चरच्या नादात राहुनच गेलं बोलायच."

सीमा : "पण तु आज एवढ्या लेट का आलीस??"

मनवी : "अग आज गाडी मध्येच बंद पडली मग टेक्सी भेटेपर्यंत वेळ झाला. समीरा कुठेय?? आज आली नाही ती? हॉस्टेलमध्ये नव्हती का??"

सीमा : "ती स्पोर्ट्स प्रॅक्टिसला गेलीय. तिला वाटलं लेक्चर नाही होणार आज."

मनवी : "ओहहह. मग सुटल्यावर भेटु."

आणि थोड्या वेळांत पुन्हा दुसर लेक्चर सुरू झाले.

लेक्चर संपताच सगळे ग्रुप करून ग्राउंडवर गेले.

स्पोर्ट प्रॅक्टिस बघायला.

राज : "इथे डिस्ट्रिक्ट लेव्हल स्पोर्ट प्रॅक्टिस होते.तु इंटेरेस्टेड असशील तर पार्टीसिपेंट करू शकतोस पण अस मधुनच तुला घेतील का नाही ह्यावर थोडा डाऊट आहे. आपल्या ग्रुपचे खुप जण आहेत. पण न चुकता तुला प्रेसिटीसला यावं लागेल ते स्पोर्टचे सर तिथे उभे आहेत."

शौर्यची नजर मात्र एकीकडे स्थिर झाली.

इथे राज त्याला एक एक सांगत असतो पण त्याच लक्ष मात्र त्याच्या बोलण्यात नसत.

"समीरा आहे ती.. " राज शौर्यला लागलेली तंद्री दुर करतच बोलला. थोड्या वेळात समीरा ग्रुपमध्ये येऊन सगळ्यांना हाय हॅलो करू लागली.

सीमा : "ए हा बघ हा आजच जॉईंट झालाय शौर्य."

"हॅलो शौर्य समीरा हिअर", समीरा आपला उजवा हात शौर्यपुढे करत त्याला बोलु लागली.

शौर्यने देखील तिला हात मिळवला. तिच्या त्या नाजूक हाताच्या स्पर्शाने शौर्यच्या मनात एक वेगळीच जादु केली.

¶¶टीक वाजते डोक्यात,
धडधड वाढते ठोक्यात.¶¶

अस काहीस त्याच होऊ लागलं..

"हेय शौर्य थेंक्स माझा पेन उचलून दिलास त्याबद्दल", अस बोलत मनवीने देखील शौर्यला हात मिळवायला तिचा हात पुढे केला.

शौर्यने तिला सुद्धा हात मिळवत तिची ओळख करून घेतली.

शौर्य तो भला मोठा स्पोर्टस एरिया बघतच बसला.

"चलो गाईज रेसिंग हो जाये??" टॉनी बोलतो..

"आपलं नेहमी ठरल्याप्रमाणे जो जिंकेल त्याला बाकीचे लंचल घेऊन जातील." मनवीने सगळ्यांना आव्हान केलं.

लेट्स गो गाईज.. वृषभ बोलतो..

राज : "ए मी नाही बाबा तुम्ही खेळा. मी तसा पण लास्टच येतो."

टोनी : "शौर्य तु तरी चल.."

शौर्य : "आज नको नंतर कधी तरी.. तुम्ही खेळाना प्लिज."

समीरा : "लेट्स गो गाईज.."

सगळे जाऊन नेहमी प्रमाणे रेसिंग ट्रॅकवर उभे राहिले आणि रेसिंग सुरू होणार तोच एक फुटबॉल येऊन शौर्यवर आदळतो, शौर्य मागे वळुन बघतो तर रोहन.

एका वेगळ्याच एटीट्युड मध्ये त्याच्याकडे बघत बॉल मागु लागला.

राज : "शौर्य कुल डाउन. तु लक्ष नको देऊस मी बॉल देतो त्याला"

राज त्याला समजवतच बॉल घेऊन रोहनकडे पास करणार पण रोहनने त्याला शिटी मारून थांबायला सांगितले.

रोहन : "तुला सांगितलं का मी बॉल पास करायला ज्याला लागला तोच करेल."

शौर्य रोहनकडे पाठ करून उभा राहिला.

रोहन : "अरे तुला गॉल मारायला नाही सांगत फूटबॉल फक्त पास करायला सांगतोय. आय नो तुला हा गेम माहीत नसेल कारण गल्लीतल्या टिंगु चिंगुन सोबत गोट्या खेळण्यासारखा गेम नाही हा. तु फक्त फूटबॉल पास कर."

ग्राउंडवर जमलेले इतर लोक सगळे शौर्यला हसु लागले.

शौर्य तिथुन होस्टेलवर जायला निघाला.

रोहन : "अरे ए हिरो पळतोस कुठे. बर एक काम कर मम्मीला बोल नाव चेंज करायला तुझं. शौर्य नाही शोभुन दिसत तुला.. हे गाईज लुजर नाव कसं राहील.. येसss लूजर इज परफेक्ट. तु तेच ठेव."

पुन्हा सगळे हसु लागले. मनवी सुद्धा हसु लागली शौर्यला.

(हा ह्याला का त्रास देतोय? समीराने मनातली शंका विचारली. वृषभ आणि इतर लोक तिला सकाळपासून जे घडलं ते सांगु लागले.)

इथे शौर्य जागीच थांबला.

खांद्यावरची बेग त्याने खाली झटकली. बॉल पायाने तुडवत तो रोहनजवळ गेला.

आणि तोच पावसाने जोर धरला.;

"आपल्या ओपोझिटरकडे फूटबॉल मागायचा नसतो त्याच्याकडून हिसकावून घ्यायचा असतो ते ही पायाने.. हिंमत असेल तर हिसकावून दाखव", एवढं बोलत रोहनला शौर्यने त्याला बाजुला सारले आणि बोल पायाने तुडवतच तो पुढे जाऊ लागला. तसे रोहनचे इतर मित्र त्याच्याकडून फुटबॉल हिसकवण्याचा प्रयत्न करत होते पण शौर्य मात्र त्याच्या शातीर दिमागाची कमाल त्याच्या पायातुन आणि फुटबॉलवर रोखुन धरलेल्या नजरेतुन दाखवत होता. शौर्यची फुटबॉलवर असणारी पायाची पकड ग्राउंडवर असणारे सगळेच अगदी अवाक होऊन बघत होते.

"शौर्यss.... शौर्यsss..." करत त्याचे मित्र त्याला आता चिरअप करू लागले.

शौर्य एकेकाला चकवा देत पुढे चालेला. पावसात चिंब भिजलेला तो आणि त्यावर त्याच्या शरीराचा आकर्षित बांध मुलींच्या मनात एक वेगळीच जादु करत होता. फुटबॉलमध्ये चालु झालेली ती जुगलबंदी सगळेच एक वेगळ्याच धुंदीने बघत होते आणि अचानक समोर रोहन आला दोघांत जुगलबंदी चालु झाली. शौर्यने त्याला तो उजवीकडे जातोय अस भासवत एक गोल वळसा स्वतःभोवती घेतला. फुटबॉलला डाव्या पायाने एक किक मारून रोहनलासुद्धा चकवा देत पुढे जात जोरात किक मारली. गोलकीपरसुद्धा काही वेळ कळत नव्हतं की नक्की फुटबॉल कोणत्या बाजुने येईल ते. आणि हा गॉल...

"येहह... शौर्य.. शौर्य... हिप हिप हुर्रे" करत सगळे शौर्यच्या नावाचा जल्लोष करत होते.

शौर्य पावसात भिजलेल्या केसांवर हात फिरवत एक गोड स्माईल देत रोहनजवळ आला.

शौर्य : "काय मग?? पुढच्या वेळेला गोट्या खेळूयात चालेलना??पण तुझ्या ह्या टिंगु चिंगुला नीट ट्रेनिंग करून आण नाही तर पुन्हा तोंडावर पडशील."

आणि हसतच तिथुन निघाला.

तोच स्पोर्ट्स सर तिथे येऊन त्याच्याशी बोलु लागले.

"आम्हाला टिममध्ये तुझ्यासारखाय स्ट्रॉंग प्लेयरची गरज आहे. उद्या पासुन प्रॅक्टीसला यायच. कॉलेज लेक्चर संपल की इथे प्रॅक्टिस सुरू."

शौर्य : "ओके सर"

सर त्याची इतर चौकशी करतात. आणि शौर्यला उद्यापासून प्रॅक्टिसला यायला सांगतात.

ओके सर बोलत शौर्य तिथुन निघाला.

तो बेग उचलायसाठी गेला पण तिथे त्याची बेग नव्हतीच. मनवीने ती भिजु नये म्हणुन उचलुन हातात पकडली.

"यु आर ग्रेट ड्युड." अस बोलत सगळे त्याच कौतुक करत होते.

शौर्यने मनवीच्या हातातुन बेग घेतली आणि तिला थेंक्स बोलुन इतरांसोबत हॉस्टेलमध्ये निघुन गेला.

मनवी फक्त त्याच्याकडे बघतच राहिली

इथे रोहनच्या टीम मधले शौर्य बद्दल डिस्कस करत बसले.

"कसला भारी खेळतोना तो.." (एक जण त्याच कौतुक करत बोलला)

"अरे मेरे को तो समजमेही नही आ रहा था की बॉल को वो कोणसे साइडसे वो किक करेगा??"

रोहनने मात्र रागाच्या भरात जाऊन एकाची कॉलर पकडली. त्याच्या बद्दलच कौतुकास्पद भाषण द्यायला तुम्हाला इथे बसवलं आहे का मी???

"तु हम लोगोंपे क्यु गुस्सा निकाल रहा हे यार?"

रोहन : "एक गोष्ट कायम लक्ष्यात असु द्यायची इथे फक्त आणि फक्त मी, बाकी सगळे माझ्यापेक्षा कमी.."

एवढं बोलुन तोसुद्धा कॉलेजच्या गेट बाहेर जाऊ लागला. तोच त्याला मनवी दिसली.

मनवीने त्याला बघुन न बघितल्यासारख केलं आणि मैत्रिणींशी बोलु लागली.

पण आज मात्र रोहनसुद्धा मूड मध्ये नव्हता तो तसाच घरी जायला निघाला.

शौर्य आपल्या रूममध्ये जाऊन कपडे बदलुन झोपुन गेला. दुपारी लंच टाईमला सुद्धा तो उठला नाही. आदल्या दिवशी झालेल्या प्रवासाने तो भरपूर थकुन गेलेला. जवळपास संध्याकाळी त्याला जाग आली.

मोबाईल हातात घेऊन बघितलं तर सात वाजलेले.

"एवढा वेळ मी कसा झोपलो.?"स्वतःलाच प्रश्न विचारू लागला.

थोडं तोंडावर पाणी मारून तो फ्रेश झाला. त्याच्या पोटात मात्र कावळ्यांनी धुडगूस चालु केलेला. खिश्यात पॉकेट टाकत रूम बंद करत तो बाहेर पडला तस बाहेरच वृषभ, टॉनी आणि राज उभे होते.

राज : "अरे काय झालं काय तुला?आम्ही कधीचा दरवाजा ठोकतोय तुझा पण उघडतच नाहीस तु. किती घाबरलो आम्ही."

टोनी : नाही तर काय. एक तर तुझा नंबर पण नाही आमच्याकडे.

शौर्य : आय एम रिअली सॉरी यार मी एवढं गाढ कधीच झोपत नाही आज कसा झोपलो काय माहीत.

वृषभ : तु कुठे चाललायस??

शौर्य : मला भूक लागलीय, काही खायला मिळेल का ते बघतो.

तिघेही एकमेकांकडे बघू लागतात.

राज : ह्या वेळेला इथे खायला नसत. आता डायरेक्ट नऊ वाजता जेवण. नऊ वाजायला अजून दिड तास आहे आणि आठ वाजायला एक तास.. जए तुम्ही बाहेर गेलात मग 18 मिनिट्स जायला, 15 मिनिट्स ऑर्डर यायला,15 मिनिट्स ते खायला आणि पुन्हा 18 मिनिट्स यायला म्हणजे टोटल एक तास सहा मिनिट. पोसिबल नाही..

शौर्य : तु अस कोड्यात का बोलतोस? मला समजेल अस बोल ना आणि सिरियसली मला जाम भुक लागलीय यार.

वृषभ : अरे म्हणजे आठ वाजता गेट बंद होतो हॉस्टेलचा.

टॉनी : तुला उडी मारता वैगेरे येत असेल ना???नाही तु एवढं छान फुटबॉल खेळतो मग येतच असेल पण तरी एकदा कंफर्म करतो तुला विचारून.

आता तु अस का विचारतोयस?? शौर्य थोडं चकीत होत बोलला.

वृषभ : बोल तर..

शौर्य : जर मला खायला मिळणार असेल तर मी काहीही करायला तैयार आहे.

वृषभ : चला मग झालं तर.. आपण चायनीज खायला जाऊयात.

राज : मला भीती वाटते यार.. तुम्ही जावा.

टोनी : तु घाबरटच आहेस.. तु इथेच थांब आणि काही वाटलं तर आम्हाला फोन कर.

राज : बर ठिक आहे पण लवकर या. तो हिटलर कसा आहे माहिती ना.

टोनी : हो रे. चल शौर्य निघुयात.

शौर्यला खर तर काय होतंय ह्याची काहीच कल्पना नव्हती टॉनी पळतच कुठे तर जाऊ लागला त्याच्या मागोमाग वृषभ. ते दोघे पळतायत हे बघून शौर्य देखील त्यांच्या मागे पळु लागला.

हॉस्टेलचा गेट तर उघडाच होता. तिघेही धावतच बाहेर पडले.

शौर्य : यार तुम्ही लोक.. माझ्यासाठी उगाचच एवढी मोठी रिस्क घेतायत

वृषभ : फ्रँडशिप मे रिस्क तो बनता हे बॉस.

टोनी : आणि आम्ही तस पण हॉस्टेलच जेवण जेवुन बोर झालो तर हेच करतो.

तिघेही धावत एका चायनीजच्या गाडीवर येऊन थांबतात. तिघेही गुडघ्यावर हात ठेवत जोर जोरात श्वास घेत होते. शौर्यच लक्ष चायनीजच्या गाडीवर जात..

शौर्य : आपण इथे खाणार आहोत. आय मिन इथे जवळपास हॉटेल वैगेरे असेलना??

टॉनी आणि वृषभ दोघेही एकमेकांकडे बघू लागले.

वृषभ : इकडच्या चायनीजची टेस्ट खुप छान आहे तु एकदा खाऊन बघ.

टॉनी : आम्ही नेहमी येतो इथेच. तुला नाही चालणार का?

शौर्यला काय करावं ते सुचत नव्हतं. आज पर्यंत त्याने अस रस्तावरच कधी काही खाल्लं नव्हतं.

हो नाही, हो नाही विचार करत त्याने ठिक आहे म्हटले.

तस वृषभने तिघांसाठी ऑर्डर देखील केलं.

ऑर्डर येईपर्यंत शौर्य घड्याळाकडे बघत होता.

शौर्य :आठ वाजायला 25 मिनिट्स आहे आपण पोहचू का?? अजून ऑर्डर सुद्धा नाही आली.

दोघेही एकदम सिरीयस होऊन त्याच्याकडे बघु लागले..

वृषभ : ओहह नो.. आता आपल्याला तो हिटलर आत घेणार नाही.

टॉनी : म्हणजे आपण हि रात्र पूर्ण ह्या पावसात आणि थंडीत घालवायची.

शौर्य : चला आपण जाऊया हॉस्टेलमध्ये. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको.

शौर्य उठुन उभा राहिला..

तसे दोघेही हसायला लागले.

वृषभ : काय मित्रा किती भितोस त्या राज सारखा आम्ही मस्ती करत होतो.

शौर्य : काय यार तुम्हीपण, कुणाला माझ्यामुळे त्रास झालेला मला नाही आवडतरे.

टॉनी : तु ते टाईम बघणं सोडुन दे. आणि फक्त इथल्या चायनीज चा आनंद घे.

तोच एक वेटर चायनीज घेऊन येतो.

वृषभने सांगितल्याप्रमाणे टेस्ट अप्रतिमच होती. एक स्पुन तोंडात टाकतच शौर्यच्या तोंडातुन वाह बाहेर पडल.

तिघेही गप्पा गोष्टी करत चायनीज वर ताव मारू लागले.

बाय दि वे तु कुठुन आलास?? आय मिन तुझे मॉम डेड कुठे असतात. वृषभने सहज शौर्यला प्रश्न केला.

आता पर्यंत हसत चायनीज खाणार शौर्यचा चेहरा मात्र गंभीर झाला. आर यु ओके?? वृषभ शौर्यच्या दंडाला हात लावत बोलु लागला.

तसा शौर्य भानावर आला. तुम्ही बसा मी बिल पेड करून येतो एवढं बोलुन शौर्य तिथुन उठुन गेला. खर तर त्याला तो विषय नको होता. वृषभ आणि टॉनी एकमेकांकडे बघत राहिले.

वृषभ : बहुतेक त्याला नाही आवडल वाटत..

टॉनी : हो पुन्हा नको विचारुस..

शौर्य पैसे देऊन पुन्हा येऊन बसतो.

शौर्य : आठ वाजायला फक्त पाच मिनिटं आहेत. आता परत हॉस्टेलमध्ये जायचं कस.?

टोनी : आपली राज माता जिंदाबाद.

शौर्य : म्हणजे??

वृषभ : जसे आलो तसेच जायचं तु नको घाबरुस..

(का गंभीर झाला शौर्य वृषभच्या प्रश्नाने?? नक्की काय असेल शौर्यच ह्या पूर्वीच आयुष्य?? आता पुन्हा हे तिघे हॉस्टेलमध्ये कसे जातील. त्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल पुढील भागाची. आणि हा भाग कसा वाटला ते ही कळवा)

©भावना विनेश भुतल