college love story - 1 in Marathi Love Stories by shraddha gavankar books and stories PDF | कॉलेज वाली लव्ह स्टोरी - भाग १

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

कॉलेज वाली लव्ह स्टोरी - भाग १

महाविद्यालयात स्नेह सम्मेलन ची तयारी सुरु होती कॉलेज अगदी आनंदी होते सर्व जण आपल्या आपल्या मित्र मैत्रिणी सोबत गुंग होते. कोणी डान्स करण्या मध्ये , कोणी नाटक कोणी शायरी तयार करत होत तर कोणी स्वतःच टेलेन्ट दाखवत होत सर्व जण आप आपला सराव करत होते. कारण सर्वाना स्वतःला प्रूफ करायचं होत मी बेस्ट आहे कॉलेज मध्ये माझा पहिला नंबर येण्या साठी सर्व जण जीवा पाड मेहनत करत होते.

कॉलेज मधले सर्व हॉल चे दरवाजे बंद होते सर्व जण आप आपली कामे करत होती तेवढ्यात एक मुलगी खुप धावत एका रूम कडे जात होती दिसायला सुंदर रंग तिचा गोरा लांब सडक केस काळे क्षार डोळे नकशीदार भोया खांद्याला बॅग हाथा मध्ये मोबाईल आणि साधा असा पंजाबी ड्रेस . ती एका हॉल मध्ये गेली सर्व जण त्या हॉल मध्ये जमलेली होती अगोदरच. ती हॉल मध्ये आली आणि तिला आवाज आला हॅलो तनु कशी आहेस अग किती वेळ लावला आम्ही किती वेळ झाला वाट बघतोय अरे हो थोडा वेळच लागला.
तनु तिथे नाटका मध्ये सहभाग घेण्या साठी आली होती सर्वाना आप आपले रोल मिळाले तनु ला पण मुख्य हिरोईन च रोल मिळाला. तनुने विचारलं नाटकाचं नाव काय तर तिला मनाली ने सांगितलं कॉलेज वाली लव्ह स्टोरी नाव आहे मनाली हि मुख्य होती सर्वाना रोल देणे आणि त्यांच्या कडून दिलेला सराव करून घेणे हे मनाली च काम होत सर्वाना आप आपल्या जोड्या मिळाल्या तसे त्या नाटका मध्ये सर्व मिळून १५ जण असतील त्या मध्ये २ मुख्य जोड्या आणि बाकी त्यांचे मित्र मैत्रीण आत्ता फक्त तनुला अजून सुद्धा तिचा जोडीदार मिळाला नव्हता तिने मनाली ला विचारलं तर मनाली सांगत होती. त्याच नाव श्री आहे तो येईलच आत्ता तनु वाट बघत होती. बराच वेळ झाला पण श्री अजून सुद्धा आला नव्हता पण तनू मात्र आत्ता वाट बघुन खुप चिडली होती तिला भयानक राग आला होता ती स्वतःच्या मनात विचार करत होती हा आहे तरी कोण श्री स्वतःला खुप हुशार समजतो का आम्ही वाट बघणारे याला मूर्ख दिसतो का वेळेची कदर नाही ह्याला आम्हाला कश्याला एवढ्या लवकर बोलावलं आत्ता येऊ दे त्याला सांगते मी तिच्या मनात विचार सुरू होते. तेवढ्यात आवाज आला अरे श्री आलास का हे आवाज ऐकून तनुने दरवाज्या कडे बघितलं तर तिला एक मुलगा दिसला पिंक शर्ट घालून हाथा मध्ये घडी पायात बुट खांद्यावर बॅग आणि एका हाथा मध्ये फाईल आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य त्याला बघून तनुचा सर्व राग शांत झाला.अरे मला थोडा वेळ लागला सॉरी तुम्ही माझी वाट बघितली श्रीं सर्वाना म्हणत होता.ओके चला जे झालं ते झालं आता सराव करूयात अरे श्री हि बघ तुझी न्यू हिरोईन मनालीने सर्वांशी ओळख करून दिली आणि श्री ला सांगितलं श्री ने तनु कडे बघितलं आणि त्याच्या चेहऱ्या वर हास्य आलं तनू पण त्याच्या कडे बघून खुश झाली.दोघांचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी त्यांना सोबत डान्स चा सराव करायला सांगितलं पण आत्ता मात्र तनुला थोडं वेगळं वाटत होत कारण याच्या अगोदर कधीच तनुने कोणत्या मुला सोबत डान्स केला नव्हता.

आणि श्री पण खुप लाजरू होता त्याला ही वाटत होत आपण कस ह्या मुली सोबत डान्स करायचं चुकून तिला हाथ लागला तर तिला कस वाटेल ती काय विचार करेल माझ्या बद्दल दोघांच्याही मनात वेग वेगळे विचार येत होते पण काय करणार नाटक करायची सहभाग घायची दोघांना हि आवड होती एवढे सगळे विचार करून शेवटी दोघे तयार झाली. तसे बाकी सर्व स्वतःचा सराव करत होते तनू आणि श्री दोघे ऐका जागे वर जाऊन उभे राहिले अजून त्यांनी सुरुवात केली नव्हती. दोघे सोबत असून सुद्धा ऐक मेकाला बोलत नव्हते दोघांचा स्वभाव सारखा होता तनुला वाटत होत श्री ने काही तरी बोलावं आणि श्री ला वाटत होत तनुने बोलावं दोघे पण वाट बघत होते हे दोघे फक्त एकमेकांना नव्हते बोलत बाकी च्या सोबत खूप मस्ती करायचे. मनाली ने आवाज दिला अरे थांबलात का चला सुरुवात करा. दोघांनी सुरुवात केली घाबरत. दोघेही नवीन होती एका चांगल्या गण्या वर त्यांना सराव करायचा होता दोघेही सांगितल्या प्रमाणे करत होती. पण सराव करते वेळेस दोघांना एकमेकांचा स्पर्श होत असे तस दोघांनाही चांगलं वाटतं नव्हतं. पहिला दिवस असाच निघुन गेला दुसऱ्या दिवशी परत सर्व जमा झाले पण तनु अजून सुद्धा आलेली नव्हती सर्वाना वाटत होत तनुला असं डान्स करायला आवडलं नसेल श्री ने तिच्या मैत्रिणी कडून नंबर घेतला आणि तनुला कॉल केला पण तनु कुठे व्यस्त असल्या मुळे तिने फोन बघितलं नाही पण श्री ला मात्र आत्ता वाईट वाटायला लागलं त्याला वाटत होत तनुला राग तर आला नसेल त्याने तिला एक संदेश पाठवला त्या मध्ये असं लिहून होत हॅलो तनु मी श्री आहे आज येणार नाहीस का तुला राग आला का कोणत्या गोष्टीचा पण तनुने संदेश थोड्या उशिरा बघितला आणि नंतर परत त्या संदेश ला प्रति उत्तर दिल तिने लिहून पाठवलं अरे हो येणार आहे मला राग नाही आला थोडं काम होत येते मी तिचा संदेश बघुन श्री ला थोडं बरं वाटलं. पण जस जस ते सराव करत गेले तसे तसे ते जवळ येत गेले कधी दिवस जायचा हे दोघांना कळत सुद्धा नव्हतं त्या दोघांना दुसरं कोणी दिसत नव्हतं दोघे फक्त एकमेकात गुंग डान्स करत राहायचे कोण काय बोलते काय करते याचा विचार पण येत नव्हता त्यांना असं वाटायचं हा दिवस कधी खतम होऊ नये. आणि दिवस संपला तरी लवकर दुसरा दिवस निघायला हवा.

सर्वाना आत्ता वाटायला लागलं होत यांच्या मध्ये काहीतरी आहे पण ह्या दोघांना माहित असून सुद्धा दाखवत नव्हते. आत्ता दोघे एकमेकांची काळजी घायला लागले होते तनु श्री साठी डब्बा घेऊन यायची त्याला पाणी लागेल म्हणून शिल्लकची बॉटल सोबत ठेवायची श्री पण तनुची काळजी घेत असे दोघात आत्ता हळूहळू प्रेम ह्यायला सुरुवात झाली होती. श्री चे सर्व मित्र त्याला विचारत होते तुला तनु बद्दल काय वाटते पण तो मित्रांना सांगत असे असं काही नाही आमच्यात आम्ही फक्त मित्र आहोत तुम्ही उगाच काही विचार नका करू. असं बोलून दोघे हि त्यांच्या मित्र मैत्रिणीला सांगत होते आत्ता कॉलेज मध्ये तनुला फ़क्त आणि फक्त श्री दिसत होता एवढ्या मोठ्या कॉलेज मध्ये कधीच मी या श्री ला बघितलं नाही आणि आत्ता हाच का दिसतो मला जिकडेतिकडे तिला असा प्रश्न येत होता श्री पण असाच विचारच करायचा. नंतर दोघांचं बोलणं चालू झालं दोघे एक मेकांना वेळ देत असे दिवसभर गप्पा करायचे संध्याकाळी घरी गेल्या नंतर मॅसेज करायचे.

नाटकाची तयारी अगदी जोरात चालु होती आणि तेवढ्याच श्री चा बर्थडे पण आला. सर्वानी ठरवलं श्री ला सरप्राईज द्यायचं तनुची पण इच्छा होती. पण सर्व काय विचार करतील म्हणून राहून गेलं सर्व जण बर्थडे ला जमा झाली आणि मिळून केला. नाटक तस मस्त सुरु होत सर्वाना जमायला लागलं आप आपले रोल सर्व जण चांगल्या रीतीने करायला लागले स्नेह संमेलनाची तारीख जवळ आली आत्ता सर्व कपडे कोणते घालायचे मेकअप कसा पाहिजे याचा विचार करत होते. आणि तारीख जवळ आली स्नेह संमेलनाची एका पाठोपाठ कॉलेज मध्ये डान्स नाटक होत होते. आत्ता नंबर होता कॉलेज वाली लव्ह स्टोरीचा तस सर्व जण स्टेज वर आले नाटक पण झालं सर्वानी खुप प्रतिसात दिला नाटक संपणार तेव्हा श्री ने ठरवलं होत मी सर्वान समोर तनुला प्रेमाची मांगणी घालणार पण श्री ला जमलं नाही.त्या नंतर कॉलेज ला सुट्ट्या लागल्या आत्ता तर भेट पण होणार नाही कोणाची फक्त सर्वान कडे फोन नंबर होते आणि ग्रुप वर सर्व जण बोलत असे सर्वानी विचार केला आपण कुठे तरी भेटायचं एका हॉटेल मध्ये भेटायचं ठरलं सर्व जण तयारी करून आले तनूच्या मैत्रिणी तनूची वाट बघुन निघून गेल्या थोडी संध्याकाळ झाली होती. सर्वजण हॉटेल मध्ये आले तनु अजून पोहचलेली नव्हती बरेच फोन आले तनु सर्वाना म्हणत होती आलेच मी शेवटी श्री ने तिला कॉल केला आणि विचारलं तनु कुठेस मी तुला घेण्या साठी येऊ का खुप अंधार झाला एकटी नको येऊ थांब मी आलोच तनू ने बऱ्याच वेळा नाही म्हणत होती पण श्री ऐकून घेत नव्हता शेवटी श्री आला तिला घेण्या साठी ती पण त्याच्या सोबत गाडी वर बसली तेव्हा दोघे जण एकटेच होते.

श्री ला वाटलं आत्ता कोणीच नाही मी माझ्या मनात काय आहे हे तनुला सांगून टाकतो शेवटी तिची इच्छा तनु तुला एक विचारायचं होत विचारू का हो विचार ना तनु म्हणाली. तुझ्या आयुष्यात कोणी आहे का म्हणजे तु ज्याच्या वर प्रेम करते तुझ्या वर कोणी करते असं. नाही पण तु का मला असा प्रश्न विचारत आहे तनु म्हणली श्री ला काय म्हणायच हे तनुला समजल होत पण तिने त्याच्या बोलण्या कडे लक्ष दिल नाही त्या नंतर श्री ने सोडून दे चल पोहचलो आपण. हॉटेल मध्ये अगोदरच सर्व जमलेली होती ह्या दोघांना बघितल्या नंतर सर्वाना आत्ता खात्री पटली होती. पण यांच्या दोघात अजून पण तस काही नव्हतं. दोघे जण सोबतच बसले एकाच प्लेट मध्ये खात होते. बाकीचे त्यांच्या कडे फक्त बघून हसत होते कारण तर एवढे सगळे असून सुद्धा त्यांचं दोघांचं बोलणं सुरु होत. बाकीच्यांना बोलत सुद्धा नव्हते. सर्वानी आत्ता बाय केलं आणि सर्व निघुन गेले. घरी आल्या नंतर श्री ने मॅसेज केला आणि तनुला प्रेमाची मांगणी घातली.पण तनूच उत्तर काय होत.....



सांगेल पुढच्या भागात द्यन्यवाद.........