भाग 13
अथर्व अरे बाळ थांब कुठे निघालास (शंभू काका ने जे काही झाल ते सांगितल्या नंतर अथर्व त्या मनस्थितीत नव्हता कि तिथे थांबून अजून काही ऐकू शकेल, त्याला त्याच्या वडिलांचा प्रचंड राग आला होता त्या आधी त्याला साक्षीला जाब विचारयाचा होता म्हणून तो तिथून साक्षी ला भेटण्यासाठी निघाला)
साक्षी दवाखान्यात patient सोबत बोलत होती अथर्व चा चेहरा पाहून तिला समजत होत कि, काही तरी problem आहे, अथर्व ची तर मनस्थिती नव्हती, त्याला अस झाल होत कि कधी हा patient जातो आणि तो साक्षी ला सगळा जाब विचारतो.
Patient गेल्या नंतर साक्षी थोड शांत घेण्याचा प्रयत्न करते कारण तिला माहित होत कि अथर्व सहजासहजी चिडत नाही पण जर त्याला राग आला तर तो शांत होण हे शक्य नाही. त्यामुळे ती स्वतः शांत राहण्याचा प्रयत्न करत होती, अथर्व तिच्या वर खूप चिडला होता.
अथर्व- साक्षी तू देखील एवढी मोठी गोष्ट माझ्या पासून लपून ठेवली, एकदा मला बोलून बघायच होतस, मी काही तरी नक्की केल असत, का लपवली एवढी मोठी गोष्ट सांग ना, मी विसरलोच तुझा काय संबंध तुझ्या आजोबाना थोडीच काय होणार आहे तू काय बोललीस आणि नाही बोलली काय......
मीच मूर्ख तुझ्यावर विश्वास ठेवला.......
(आता मात्र साक्षी प्रचंड चिडली)
साक्षी- मला काय फरक पडतो, मग ऐक बोलणार नव्हते मी पण तू जे आज बोललास न त्यानंतर सगळ माहित असण गरजेच आहे, तुझे आजोबा तुझ्या लग्न या विषयात मध्ये का पडत नाहीत, किवा मी तुला कोणतीच मदत का करत नाही हे तू आज समजून घे, कारण तुझे शब्द मला एखद्या धारधार तलवारी सारखे वाटले, मी तुझ्या आजोबान इतकी मजबूत विचारंची नाही ये, पण आज पर्यंत गप्प होते ते म्हणजे माझ्या आजोबाना दिलेल्या शब्दान मुळे, पण आज तुला सगळ समजल पाहिजे. तुझा वेडेपणा पाहून मला तुझे आजोबा बोलले होते कि, काही झाल तरी अथर्व ला सत्य कळता कामा नये. पण आता ऐक.
तुझ्या वडिलांच्या अहंकारा मुळे मी एका दिवसात अनाथ झाले, तुझ्या सारखेच तुझ्या वडिलांचे शब्द माझ्या आजोबाना एखाद्याने गळा दाबून मारावे असे लागले, कि त्यांना heart attack आला, हि बातमी ऐकून माझे वडील हातातील सर्व कामे सोडून त्यांच्या कडे यायला निघाली आणि, त्यांचा देखील त्या सर्व विचारात accident झाला. तरी देखील मी गप्प कारण जाताना माझ्या आजोबांनी माझ्या कडून वचन घेतल कि मी यातील एकही शब्द तुला सांगणार नाही म्हणून..................
(गेले कित्येक वर्ष स्वतः ला तिने सांभाळल होत पण आज हे सगळ सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आल, तिला ज्यावेळेस अथर्व ची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तो नव्हता, पण आज आहे तरी त्याने तिला दोषी ठरवल होत)
हे सर्व ऐकून अथर्व खालीच बसला, आणि त्याने सगळीकडे एक नजर फिरवली, आणि त्याला लक्षात आल कि त्याने आल्या पासून काकांना किवा आजोबाना तिच्या आसपास पहिलाच नव्हत. त्याला आता काय बोलाव हेच सुचत नव्हत. आणि त्याने एक नजर साक्षी कडे पाहिलं, तिची हि अवस्था पाहून आता त्याला स्वतःचा राग येत होता, त्याने पाहिलं तिला जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यांची मैत्री इतकी चांगली होती कि काही न बोलता ते एकमेकांना समजत होते, पण या सर्व गोष्टी मध्ये ते दूर गेले होते. साक्षी ने आजोबाना दिलेले वाचन आणि अथर्व ची त्याला न सांगता बाहेर देशात पाठवले या मुळे होणारी चिडचिड........ या सर्व गोष्टी मध्ये ते एकमेकान पासून दूर जात होते. मैत्री तर होती पण ती तितकी मजबूत राहिली नव्हती, याचा अथर्व ला प्रचंड राग येत होता.
काय झाल असणार ज्यामुळे सगळी नाती दूर गेली होती...................................................