One more secret ... - Part 3 in Marathi Horror Stories by Nikhil Deore books and stories PDF | एक रहस्य आणखी... - भाग 3

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

एक रहस्य आणखी... - भाग 3

भाग 2 वरून पुढे

क्षणातच तिची शुद्ध हरपली आणि ती बेशुद्ध झाली. तिच्या चेहऱ्याला आणि तोंडाला रक्त माखले होते. ती बेशुद्ध जरी असली तरीही तिच्या चेहऱ्यावर असणारी निरागसता केव्हाच मावळली होती. एक भयाण असुरता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. रोहनला काय करावे हे समजतच नव्हते त्याच्या सर्व दुःखाला आणि भावनेला अश्रू वाट मोकळी करून देत होते. लगेचच त्याने अश्रू पुसले आणि मोबाईल वर एक नंबर डायल केला

" हॅलो.. बोल रोहन एवढ्या रात्री का फोन केलायस? "
" अरे अमित तू आत्ता माझ्या घरी ये यार खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ".
" का? चोरी बिरी झाली आहे का? "
" अरे एकदाची चोरी झाली असती तर चालली असती पण त्यापेक्षा ही मोठा प्रॉब्लेम झालाय यार. मी तुला कस सांगू तू लवकर ये घरी काही गोष्टी मी फोनवर नाही सांगू शकत ".
" ठीक आहे येतो मी ".
भर वेगाने दुचाकी चालवत अमित रोहनच्या घराजवळ पोहचतो आणि त्याला फोन करून गेट उघडायला लावतो. हळुवारपणे रोहन गेट उघडतो आणि कुणालाही माहित न होता तो अमितला घराच्या आतमध्ये घेतो.नक्की काय झालंय आणि रोहननी त्याला एवढ्या रात्री का बोलावलंय या प्रश्नांनी अमित हतबल झाला होता. नक्कीच काहीतरी मोठं संकट आहे याचा त्याने वेध घेतला होता. रोहन अमितला अतिशय सावकाशपणे आपल्या खोलीत घेऊन जातो त्याला प्यायला पाणी देतो. अमितची व्याकुळता आता शिगेला पोहचली कि रोहन सांगणार तरी काय आहे. रोहनचे शब्द ऐकण्यासाठी त्याचे कान टवकारले होते. कोणत्याही प्रकारचा आवाज न करता अतिशय हळुवारपणे रोहन अमितला वर हॉलच्या दिशेने घेऊन जातो. हॉलच्या मुख्य द्वाराजवळ पोहचताच अमितला अतिशय दुर्गंध येऊ लागतो. खिशातला रुमाल काढून तो नाकाला लावतो आणि हॉलकडे चालू लागतो . समोरच दृश्य पाहून तो धावतच बेसिंग कडे जातो. उलटी करत तो रोहनला विचारतो
" काय रे काय आहे हे सगळं? काय झालंय इथे?"

रोहन अमितला खाली त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. अमित अतिशय घाबरलेला असतो त्याच्या तोंडातून एक शब्दही पुटपुटत नसल्यामुळे तो कमालीचा शांत होतो. रोहन अमितला सुरवातीपासून घडलेल्या सर्व घटना सांगतो.

" म्हणजे हा सर्व अमानवी शक्तीचा खेळ आहे तर " अमित म्हणतो
" नक्कीच मलाही तसंच वाटायला लागलंय यार "
" तू काळजी नको करू आपण करू काहीतरी "
" पण आता काय करायचं ते सांग ":- रोहन
"आता रात्रीचे 3 वाजले आहे म्हणजेच एका तासात 4वाजेलच तोपर्यंत आपण रेवती ला तुझ्या खोलीत ठेवू. वरचा हॉल स्वच्छ करून रूम फ्रेशनर मारून तो दुर्गंध घालवून देऊ. त्या टूहू ची अंतिम क्रिया ही आत्ताच करू " अमित एकादमातच म्हणतो.

"तुझ्याकडे रेवती च्या बहिणीचा नंबर आहे का? "

" तुला कशाला हवाय तिच्या बहिणीचा नंबर म्हणजे काहीतरी..... आहे.... 😊😊😊"

"😡😡 अरे मुर्खा मी म्हणत होतो तीला आता फोन कर आणि सर्व घडलेली घटना सांग ".

"आपल्याकडे दुसरा काही उपाय नाही आहे. तिला सांग कि तिच्या घरचे गेट बरोबर 4 वाजता उघडून ठेव " अमित म्हणाला.

"पण एवढ्या रात्री फोन करण बर नाही वाटत रे ".

" आपल्याकडे दुसरा काही उपाय आहे का? तिला सांग कि तिच्या घरचे गेट बरोबर 4 वाजता उघडून ठेव " अमित म्हणाला.

" पण ते कशाला? "
" अरे आपल्याला रेवतीला तिच्या घरी सोडावे लागेल ना ".

" हो, तेही आहे म्हणा "

रोहन रेवतीची बहीण म्हणजेच आरती हिला फोन लावतो आणि घडलेली सर्व घटना सांगतो सोबतच सकाळी 4 वाजता घरचे गेट उघडून ठेवायला सांगतो.

" अम्या मी आरती ला सगळं सांगितलं पण तिची प्रतिक्रिया फार आश्चर्यजणक नव्हती यार जणू तिला हे सर्व काही माहीतच आहे ".

"कमाल आहे बुवा ! चल आपण कामाला लागूया मी वरचा हॉल सर्व पुसून घेतो तू रेवतीला तुझ्या खोलीत झोपवून ये ".

रोहन रेवतीला तिच्या खोलीत झोपवून येतो. " माझ्या एका चुकीमुळे हे सर्व काही विपरीत घडलंय ". आपल्याला चुकीबद्दलचे वलयं त्याच्या चेहऱ्यावर उमटतात. अमित अतिशय स्वच्छ असा हॉल पुसून घेतो. रोहन टूहू च्या शरीराचे श्लेष्म बाहेर बागेत अंतक्रयेसाठी घेऊन जातो एक खड्डा खणून टूहूला मातीत पुरून टाकतो. ज्या सश्याला एवढं ओंजारल गोंजारल त्याचा अंत एवढा विदारक व्हावा ह्या विचाराने त्याचे मन हेलकावे घेत होते. आपल्या मनाला आवर घालून तो पुढच्या तयारीला लागतो.

सकाळचे चार वाजलेले असतात. रोहन आणि अमित रेवतीला बेशुद्ध अवस्थेत कार मध्ये घेऊन तिला घरी सोडायला निघतात. चिंता आणि भीती चे भाव रोहनच्या चेहऱ्यावर वलयं निर्माण करत होते. हलका जरी आवाज झाला तरीही त्याचा कानोसा घेण्यासाठी रोहन आणि अमितचे कान टवकारले होते. शेवटी एकदाची रेवतीच्या घरासमोर रोहनची कार थांबते. आरती गेट उघडून गेटजवळच रोहन आणि अमितची प्रतीक्षा करत असते. अतिशय हळुवार आणि अलगदपणे रेवतीला आरती तिच्या खोलीत घेऊन जाते. अमितही काही वेळात आपल्या घरी निघून जातो. रोहन दोघांनाही दुपारी 11 वाजता ईफोर कॅफेमध्ये भेटायला बोलावतो

🏤🏤 स्थळ :- इफोर कॅफे ☕️🍵 वेळ :- दुपारी 11

" काल रात्री जे काही झालं ते आरती मी तुलाही सगळं सांगितलंय आणि अमित तुही ते डोळ्यांनी पाहिलंय, मला तर काही सुचेना झालंय ".
" तु नको काळजी करू रे होईल सगळं ठीक " अमित म्हणाला ".

" मी काय म्हणतेय " एवढा वेळ शांत असलेली आरती बोलायला सुरवात करते. मोर ज्याप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करतो त्याचप्रमाणे अमित आणि रोहन तिच्या बोलण्याची मोरप्रतीक्षा करीत होते.

" काय? रोहन म्हणतो "

" तिला नक्की काहीतरी झालंय हे मला काल रात्रीच कळून चुकले होते ".

"म्हणजे नक्की कसे? " अमित विचारतो
" काल रात्री मी ताईच्या रूममध्ये सहज बोलायला म्हणून गेली होती तिने अतिशय भरड्या आवाजात मला दटावले मला वाटल ताई माझी मस्करी करत असेल म्हणून मी जास्त बोलण्याचा प्रयत्न केला तर अतिशय जोरदार चपराक मला लगावली जणू ती ताई नव्हतीच दुसरीच कुणीतरी होती कारण ताई कधीही असं करत नाही. कुणावर हात उचलणं ही संज्ञाच तिला माहित नाही ".

सगळ्यांच्याच चेहऱ्यावर काळजीच्या धुक्यानी गर्दी केली. इतक्यात आरतीचा मोबाईल खणाणतो. फोनवर बोलायचं म्हणून ती कॅफेच्या बाहेर जाते.अमित आणि रोहन एकमेकांशी बोलण्यात गुंग असतात.

" ताईची तब्येत खूप खराब आहे.... तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलय... आत्ताच आईचा फोन आला होता.." आरती सर्वकाही एकादमात म्हणून टाकते तिचा श्वासही भरून येतो.

" काय " अमित आणि रोहन एकदम ओरडतात.
आरती लगेचच तेथून हॉस्पिटलकडे रवाना होते. अमितही आपल्या घरी निघून जातो. रोहन अतिशय दुविधा मनस्थितीं होता. रेवतीची काळजी त्याच्या हृदयाला घायाळ करीत होती.

कॉलेजच्या समोर असणाऱ्या प्रसेनजीत उद्यानात रोहन एकटाच बसला होता. त्या उद्यानात रोहन आणि रेवती तासन तास हातात हात घेऊन बसले असायचे. भविष्याचे गोड मधाळ स्वप्न पाहताना एका भयाण वणव्यात ते बेचिराख व्हावे असेच काहीसे रोहनला वाटत होते. परिस्तिथीपुढे हतबल झालेल्या हरिणाची अवस्था त्याची झाली होती.

" हॅलो आरती, कशी आहे रेवतीची तब्येत " रोहन फोनवर आरतीला विचारतो.
" आता बरी आहे"
" मी येऊ शकतो का भेटायला? "
" सध्या तरी मम्मी पापा इथेच आहे फक्त मी असल्यावर फोन करेल तुला ".
" चालेल Bye "
" Bye "

वेळ :- रात्रीचे 11

रोहनचा मोबाईल खणाणतो
" हॅलो रोहन सध्या मम्मी घरी गेलीय आणि पापा बाहेर आहे तुला आणि अमितला जर रेवतीला भेटायचं असेल तर तुम्ही येऊ शकता " :- आरती

" Ok ठीक आहे येतो मग मी आणि अमित " रोहन म्हणतो.
रोहन आणि अमित हॉस्पिटलमध्ये रेवतीला भेटायला पोहचतात. रोहन हॉस्पिटलच्या रूम नं 33 मध्ये एकटाच तिला बघायला जातो.

रेवती एका हातात चाकू घेऊन टेबलावर असलेल्या सफरचंदावर ठक..... ठक..... करत त्यांचे दोन तुकडे करत होती. तिच्याच पाठीमागे रोहन उभा होता. एक भयानक काळी शक्ती अचानक आकाशातून रूम मध्ये आली आहे हे त्याच्या चाणाक्ष नजरेने ओळखले. हॉस्पिटलच्या बाहेर कुत्र्यांनी जोरजोरात भुंकायला सुरवात केली होती. काही कुत्रे तर कोल्ह्यासारखे ओरडत होते ज्याला बहुतांश लोक कुत्राचे रडणे असे म्हणतात जणू त्यांनाही एका वाईट शक्तीची चाहूल लागली होती.

लगेचच रेवतीने मागे वळून पहिले. तिच्या नजरेत विलक्षण क्रूरता दिसत होती. अतिशय भेसूर आणि घोगऱ्या आवाजात ती म्हणाली.

" रोहन आलास तु तुझ्या चेहऱ्यावरची तडफड दिसतेय मला पण तु धीर ठेव तुला आणखी सहन करायचं आहे " असे म्हणता क्षणिच विजेच्या वेगाने ती रोहनजवळ आली...हातातील चाकू छातीच्या फक्त 5cm दूर होता.... त्याच्या शरीरावरच केसन केस ताठरल होत.... डोकंही काही क्षण स्तब्ध झालं होत.

" नाही नाही एवढ्या लवकर तुला नाही नाही मारणार तुला आणखी तडफडत बघायचं असं".

" तुला काय हवंय? " रोहन म्हणाला.
एवढ्यात तो चाकू सपकन करून रेवतीच्या तळहातावर मारला जातो. रक्ताची धार वाहायला सुरवात होते.
आ........ त्या भयाण चेहर्यामागून एक निरागस किंकाळी रेवतीच्या तोंडातून बाहेर पडते.

" थांब... थांब तिला मारू नको " रोहन म्हणतो.

" तु तडफडतोय रोहन " असे म्हणतच परत एक जोरदार वार रेवतीच्या तळहातावर होतो. रेवतीच राक्षसी हास्य त्या रूम मध्ये थैमान घालू लागत. इतक्यात तिच्या हातातला चाकू बेडखाली पडतो. तोंड वेडंवाकडं करून ती चाकू पाहण्यासाठी बेडखाली जाते. बराच वेळ होऊनही ती बाहेर येत नाही म्हणून रोहन बेडखाली तिला पाहायला खाली वाकतो पण ती तिथे नव्हतीच. ती कुठे गेली आहे हे पाहण्यासाठी तो मागे वळतो तर पाहताक्षणीच त्याच शरीर घामाने ओलाचिंब होते कारण रेवती भिंतीवर पालीसारखि चिकटून बसली होती. पुढच्या क्षणी ती हवेत उडते तिचे लांबसडक केस हवेत उडत होते... तिचा चेहरा अतिशय कोरडा झाला होता..त्या कोरड्या चेहऱ्याला भेगा पडून त्यातून बारीक रक्ताचे थेंब टपकत होते.... अतिशय जोरात आवाज करून ती एक प्रचंड चाकूचा प्रहार रोहनच्या खांद्यावर करते.
आई ग............ एक जोरदार किंकाळी त्या रूममध्ये काही काळ असणाऱ्या शांततेचा भंग करते.
अमित आणि आरती नक्की काय झालंय हे पाहण्यासाठी रूममध्ये येतात. एवढ्यात रेवती वेगाने
हॉस्पिटलच्या सेकंड फ्लोर वरून पळत सुटते आरती ही तिच्यामागोमाग धावायला लागते. एकंदरीत शांत असलेल्या हॉस्पिटलमध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होत. अमित रोहनला सावरत होता त्याच्या खांद्याला झालेल्या जखमेला ड्रेसिंग करतो आणि हॉस्पिटलच्या अशांत झालेल्या वातावरणाला शांततेचं रूप देण्यात व्यस्त होतो. रोहनचा मोबाईल खणाणतो तेव्हा आरती त्याला सांगते कि रेवती हॉस्पिटलच्या मागे बेशुद्ध अवस्थेत मिळाली आहे. रोहन, अमित आणि आरती रेवतीला परत हॉस्पिटलच्या रूममध्ये आणून झोपवतात. डॉक्टर आरतीला मानसपोचार तज्ञांशी consult करायला सांगतात.

आता रेवतीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो. तिच्या शरीरावरील जखमा ही बऱ्या होतात आणि मानसपोचारतज्ञ् ही तिच्यावर ट्रीटमेंट करत असतात. साधारणतः एक सप्ताह होतो. रेवती आता कॉलेजलाही जाऊ लागते. सगळ्याशी हसत खेळत पूर्णतः बरी झाली आहे असेच सर्वांना वाटते. रोहनही तिच्या सोबत नेहमी असतो. त्या वाईट शक्तीचे अस्तित्व आता संपले आहे यावर सर्वांचा विश्वास बसू लागतो. रेवतीचे अमानवी कृत्यही आता बंद झाले होते.
अचानकपणे रोहन आरती आणि अमितला whatss app msg करून दुसऱ्या दिवशी दुपारी 11 वाजता ईफोर कॅफेमध्ये भेटायला बोलावतो.

🏤🏤स्थळ :- ईफोर कॅफे ☕️☕️ वेळ :- दुपारी 11

रोहन, आरती आणि अमित कॅफेमध्ये हॉट कॉफी घेत बोलायला सुरवात करतात.

रोहन :-. मी काय म्हणतोय ते काळजीपूर्वक ऐका.
आरती आणि अमित रोहनचे शब्द ऐकण्यासाठी कान टवकारतात. हजार सश्यांची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर असते.
" मला असं एक सप्ताहापासून जाणवत आहे कि ही खरचं रेवती आहे कि तिचे मृगजळ म्हणजे एका सप्ताहापासून ती आपल्या बरोबर तर आहे पण तिचे वागणे, बोलणे, हसणे सर्व काही वेगळंच आहे जणू ही रेवती नव्हे दुसरंच कुणीतरी आहे ".

आरती :- हो ना मलाही असाच अनुभव आला आहे.

अमित :- मला तर जास्त काही माहित नाही बा.

आरती :- म्हणजे बघ ना ज्या आरतीचा पूजापाठ
केल्याशिवाय दिवस सुरु नाही व्हायचा ती
आरती आता पूजेला बस म्हटलं तरीही
बसेना काहीतरी नक्कीच विचित्र आहे
तिच्यात.

रोहन :- त्या दगडाचं.... तु पापी आहेस.... रेवतीच
अमानवी कृत्य या सर्वांचं रहस्य तरी काय हे
लवकरच उलगडायला हवं.

अमित :- हो नक्की काहीतरी करायला हवं. उद्या आपण सर्वजण एक विशिष्ट योजना आखू Done

आरती :- Done

रोहन :- Done

अमित :- अरे हो आज सायंकाळी विकीच्या birthday ची पार्टी आहे तुम्ही सर्व येत आहे ना.
रोहन आणि आरती होकारार्थी माना डोलावतात.

अमित, रोहन, आरती आणि रेवती सायंकाळी विकीच्या घरी बर्थडे पार्टीसाठी पोहचतात. क्षणातच त्या पार्टीचे स्वरूप बदलते एका नकारत्मक शक्तीने तेथे पाऊल ठेवले हे जाणवत होते. विकीची आजी जी नेहमी ईश्वराची भक्ती करण्यात तल्लीन राहत होती ती आज पार्टीमध्ये सर्वात समोर दिसत होती. रेवतीला पाहताक्षणीच ती म्हणाली

"कोण आहेस तु? "

" आजी, मी रेवती ".
आजी अतिशय जोरात ओरडून म्हणाली

" मी तुला विचारतेय कोण आहेस तु? "

जाड्या भरड्या आणि भेसूर आवाजात रेवती म्हणाली

" कोणी का असेना तुला काय करायचं ऐ म्हतारे हिम्मत असेल तर रोखून दाखव ".

एक जोरदार हिसडा तिने आजीला दिला. आजी जमिनीवर कोसळली. अमित, आरती रेवतीला घेऊन बाहेर जाऊ लागतात. पार्टीचे वातावरण आता शांत आणि सौम्य झाले.

" आजी मला माहित आहे ती रेवती नाही आहे " रोहन म्हणाला.

" ती रेवती नाही एक दृष्ट काळी शक्ती आहे ती "

" आजी आता काय कराव "रोहन विचारू लागतो

" तिच्या जीवाला सोबतच तिच्या सोबत राहणाऱ्या तुमच्या जीवालाही आता धोका आहे ".

" आजी ह्यावर काही उपाय, मार्ग आहे का? कुणी आहे का जो मला ह्यातून बाहेर काढू शकेल? ".

"तुला फक्त एकच व्यक्ती ह्यातून बाहेर काढू शकतो जो स्वतः दिव्यास्त्रामधला पाशुपतास्त्रा सारखा आहे ज्याचा प्रहार कधीही खाली जात नाही... तो ललाटमय आहे अनेक मंत्राचे गारुड त्याच्याकडे आहे".

" आजी कोण आहे तो? "

" तो दिव्ययुवक आहे रुद्र...... रुद्रदमण "

" काय रुद्रदमण... कोण आहे हा रुद्रदमण? "

पुढची कथा 4थ्या भागात
--- निखिल देवरे

आपण जर ही कथा वाचत असाल तर उत्तमच पण ह्या कथेचा तिसरा भाग कसा वाटला ह्याचा अभिप्राय दिल्यास दुधात साखर

🙏 कृपया हा भाग आपल्याला कसा वाटला हे अभिप्रायाने, रेटिंगनि कळवा 🙏