In the ocean of life ... (poetry collection) in Marathi Poems by vidya,s world books and stories PDF | आयुष्याच्या सागरात... (कविता संग्रह)

Featured Books
Categories
Share

आयुष्याच्या सागरात... (कविता संग्रह)

१.आयुष्याच्या सागरात...

आयुष्याच्या सागरात
आशेच्या लाटांवर
तरंगते स्वप्नांची होडी
लाटेच्या प्रत्येक हिंदोळ्या वरती
अवलंबतो होडी चा तोल
संथ संथ हळव्या लाटा
होडी ला आधार तरंगण्याचा
जितक्या मोठ्या लाटा
तितकीच ओढ लागते होडीला
स्वप्न पूर्तीच्या किनाऱ्याची
पण कधी कधी लाटांच्या भोवऱ्यात
अडकते स्वप्नांची होडी
अपयशाच तुफान घोंघावत
लाटांची लाटाशी झुंज होते
आशेच्या लाटानचाच त्या
तयार होतो भोवरा
अन् अडकते त्यात स्वप्नांची होडी
किनारा तर दूरच राहतो
आयुष्याच्या सागरात स्वप्नांची होडी
मात्र लुप्त होते कायमची

२.सर्वस्व तुज वाहिले मी...

सर्वस्व तुज वाहिले मी
कुंकवाचा माझ्या तू धनी
नको करुस अपमान नात्याचा त्या
मज दूषण ते लावुनी
गरिबां घरची लेक जरी मी
आहे मज स्वाभिमान
सर्वस्व तुज वाहिले मी
कुंकवाचा माझ्या तू धनी
सप्तपदी ची ती सारी वचने
होती खोटीच की जणू
संसाराचा हा गाढा
मी एकटिच किती ओढू
तुज व्यसन ते दारूचे
मग मज व्यसन का लागावे संसाराचे?
सर्वस्व तुज वाहिले मी
कुंकवाचा माझ्या तू धनी
मज ठावूक हे जग व्यवहारिक
पण नको करू माझाच व्यवहार
नसे मी द्रौपदी कोण्या राजाची
गरीबां घरची लेक जरी मी
आहे मज स्वाभिमान
सर्वस्व तुज वाहिले मी
कुंकवाचा माझ्या तू धनी

३.कलियुग..

रामाची एकनिष्ठता
रामायणातच राहिली
या कलियुगात प्रत्येकाच्या
नजरेत फक्त वासणाच भरलेली
निस्वार्थ भक्ती मारुतीची
रामाच्या पायापाशी
आज जो तो देवळात जातो
काही तरी मागण्यासाठी
आजही हरण होत
द्रौपदीच्या अब्रूच
पण आज कुठलाच कृष्ण
येत नाही रक्षण करण्या तिचं
सत्ययुग ते देवांबरोबर
स्वर्गात गेले
धरणीवर्ती पाप्यांचे राज्य आले
मूठ भर जे असतील
सत्याला धरून वाहणारे
ते ही चिरडले जातात
हिंसेच्या पायाखाली

४.खरे सोबती...
हस्यापेक्षा अश्रूच खरे सोबती
आनंदात ही सोबत असतात
अन् दुःखात ही सोबत असतात
ओघळतात हे गालावरूनी
तरी मनाला हलक करतात
साथ सोडतात कधी कधी जिवलग ही
पण अश्रू मात्र साथ निभावतात शेवटपर्यंत
जेव्हा शब्द नसतात दुःख व्यक्त करायला
तेव्हा अश्रूच बोलू लागतात शब्दाविना
दुरावत जेव्हा आपल कोणीतरी
तेव्हा अश्रूच होतात आपले सोबती
काळजीने जेव्हा एखाद्याच्या मन पिळत
तेव्हा अश्रूनेच मन भिजत
हृदयावर घाव बसतात जेव्हा
घावाबरोबर अश्रू हि मिळतात तेव्हा
आनंदाच्या क्षणी ही झरझर
झरतात डोळ्यातून
अश्रूच खरे आयुष्याचे सोबती
अश्रूच मनाची व्यथा दर्शवतात
हास्यापेक्षा अश्रूच खरे सोबती..

५.प्रश्न..

का कुणास ठाऊक?
एक प्रश्न सतत पडतो मला
माणूस इतका व्यवहारी झाला तरी कसा?
व्यवहाराने का गोठून टाकलं
माणसाचं मन ,हृदय ,भावना
आपुलकी ,जिव्हाळा?
का कुणास ठाऊक?
एक प्रश्न सतत पडतो मला
एखाद्याचं दुःख पाहून
माणूस हेलावून का जात नाही?
रानात उभ्या केलेल्या
बुजगवण्यासारखा स्तब्ध कसा राहतो ?
का कुणास ठाऊक?
एक प्रश्न सतत पडतो मला
अलीकडच हसणं माणसाचं
उसनवारी वाटतं
नाती सारी जणू
एक फसव ढोंगच वाटत.
का कुणास ठाऊक?
एक प्रश्न सतत पडतो मला
निस्वार्थ या जगात आता
उरल तरी का कुणी?
का सगळेच बनून जातील
फक्त व्यवहारी पुतळे?

६.पिंजऱ्यातून सोड ..

पिंजऱ्यातून सोड एकदा मला मानवा
जीवन संपण्या आधी घेवू दे
आस्वाद पुन्हा एकदा आकाशी उडण्याचा
तारुण्य ही गमावले तुझ्या बंदिस्त पिंजऱ्यात
जन्मभर केली गुलामी तुझी
स्वातंत्र्य माझे तू हिरावून घेतले
जीवन माझे तुझे दान झाले

जीवन सं पन्या आधी घेवू दे
आस्वाद पुन्हा एकदा माझ्या स्वातत्र्याचा
ऐश आरामाची तू दिलेली भीक
निमूटपणे मी स्वीकार केली
पिंजऱ्यात राहुनी तुझ्या घराची शोभा वाढवली
जीवन संपण्या आधी घेवू दे
आस्वाद पुन्हा एकदा कष्ठूनी खाण्याचा

उभा जन्म गेलाच आहे रे तुझ्या पिंजऱ्यात
शेवटचे चार क्षण घालवू दे माझ्या घरट्यात
उडूनिया जाईन दूर माझ्या जगी
जिथे असतील माझी नाती गोती
जीवन संपन्या आधी घेवू दे
पुन्हा एकदा त्यांना अखेरचे डोळ्यात समावूनि
अन् पुन्हा जगू दे मला
अखेरचे आयुष्य चार क्षणाचे

७.स्त्री..

स्त्री जितकी सहनशील
तितकीच ती कठोर आहे
शांत निर्मळ नदिसारखी
तर कधी खवळलेल्या समुद्रा
इतकी भयानक
सारच उध्वस्त करणारी
दुर्गा सरस्वती तर ती आहे च
पण पाप्यान साठी ती
चंडिका ही झाली होती
किती अन्याय करशील मानवा
पण जेव्हा तिच्या सहनशीलतेची
संपेल सीमा उद्रेक होईल
तिच्या रागाचा
भस्म होईल तुझे जीवन
तिच्याच पासूनी तुझे अस्तित्व
हेच विसरून गेलास तू
पुरुष पणाचा गर्व तुला
अहंकाराने तू मातला
स्त्रीवर अत्याचार केला
अबला म्हणुनि हिनवून हीनवून
तिचा स्वाभिमान तू ललकार ला
युगे युगे लोटून गेली
तरीही जन्मा येईल ती
शस्त्र घेऊन हाती भवानी
कलियुगात ही लढत राहील ती ..

८.सोड तरुणा...

सोड तरुणा खेळ आता हा
हे आयुष्य नसते खेळ फक्त हा
आकर्षणाची दोरी धरुनी
चढू नकोस प्रेम समजूनी
मोहजाल हे गुंतवूनी ठेवील तुजला
सांग कसा सांभाळशील देशाला हातानी ह्या
ज्या हातात धरल्या आहेस
आधीच दारूच्या बाटल्या
व्यसनात बु डूनी जवूनी
किती उडवशिल सिगारेटचे धूर
हरवू नकोस भवितव्य स्वतः चे

सोड तरुणां खेळ आता हा
हे आयुष्य नसते खेळ फक्त हा
शिक्षणाच्या नावाखाली
भरवूनी बाजार मौजमजेचा
भविष्याला नको उध्दवस्त करुस
आयुष्याला टाईम पास समजून
नको घालवू मौल्यवान वेळ हा
घे समजुनी कर्तव्य स्वतःचे
आयुष्य असते अवघे चार दिवसांचे

सोड तरुणां खेळ आता हा
हे आयुष्य नसते खेळ फक्त हा
जमावशिल जितके सोडून जाशील इथेच
कर काम असे कीर्ती रुपे मागे उरशिल
सोड तरुणां खेळ आता हा
हे आयुष्य नसते खेळ फक्त हा...

९. दिवा..

झाले वाळवंट आज माझे ही मन
नाही ओलावा नाही साऊलीची आस
सारा समुद्र ही प्याले
तरी भागेना ही तहान
जगाच्या या गोंधळात
उरे रिते माझे मन
प्रकाश देता देता जगाला
जळे ज्योतीचे हे जीवन
कसा खेळ हा नशिबाचा
ज्योत जाई जळून
दिवा राहतो एकटा....

१० .जीवन असल कितीही खडतर..

जीवन असल कितीही खडतर
तरी ते हसत जगावच लागत
काट्या सोबत ही फुलाला
फुलावच लागतं
अपयश आलं म्हणून का
खचून जायचं असत?
यशाच्या आशेने पुन्हा
धडपडावच लागत
जीवन असल कितीही खडतर
तरी ते हसत जगावच लागत

नाही आले सुखाचे क्षण
म्हणून का दुःखाला कुरवाळत
बसायचं असत?
सुखा साठी च पुन्हा पुन्हा
झगडावं लागत
नाही मिळालं हवं ते
म्हणून का जगणं सोडायचं असत?
पुन्हा नवीन वाटेवर पाऊल
ठेवावच लागत
जीवन असल कितीही खडतर
तरी ते हसत जगावं च लागत
दिल्या आपल्या नीच जखमा
म्हणून का नात तोडायच असत?
जखमेला च आधार बनवून
जीवन हसत जगावं च लागत..