Last Moment - Part 5 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 5

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

शेवटचा क्षण - भाग 5



साक्षगंध झालं आणि त्वरीतच लग्न मुहूर्त बघण्यात आला.. सगळ्यांच्या सोयीनुसार काढताना तो मुहूर्त चक्क 10 महिन्यानंतरचा निघाला.. गार्गी खुश होती उशीराच मुहूर्त निघाला म्हणून.. कारण आता तिला जून सगळं विसरून नव्याने गुंतायचे होते.. आणि यासाठी तिला वेळ हवाच होता.. तसा तो मिळाला..

गार्गी कुण्या दुसऱ्याची होणार आता कायमची हा विचार करून प्रतीक मात्र पूर्ण बिथरून गेला पण सगळ्यांसमोर तस काहीच न दाखवता स्वतःला कसंबसं सावरत तो त्याच्या खोलीत गेला, आतून कडी लावून घेतली आणि रात्रभर ढसाढसा रडला.. आज तिच्या सर्व आठवणी त्याला छळत होत्या.. पण हे त्यानीच घेतलेलं पाऊल होतं.. त्यानेच तिला स्वतःपासून लांब केलं होतं.. ती दुसऱ्या कुणाची होताना त्याला वाईट वाटणार साहजिकच होत आणि हे होणार याची कल्पनाही त्याला होती पण तरी आज तो स्वतःलाही समजावू शकत नव्हता.. मनातून अगदी तुटून गेला होता तो.. आणि त्याला सावरायला कोणीच नव्हतं .. आज उशीच्या कुशीत इतक्या दिवसाच दुःख तो मोकळं करत होता.. आणि रडत रडत त्याला ग्लानी आली.. तो केव्हा बेशुद्ध झाला त्यालाही कळलं नाही.. सकाळी प्रियाने जोरजोरात दरवाजा ठोकला तेव्हा तो शुद्धीवर आला.. रात्री काय झालं त्याला काहीच कळत नव्हतं.. त्याच डोकं जड झालं होतं.. त्याला काहीच सुचत नव्हतं तरी कसाबसा उठून त्याने दरवाजा उघडला..

प्रिया - असा कसा रे तू कुंभकर्ण, इतका वेळ झोपतं का कुणी?? केव्हाचा आवाज देतेय मी.. किती वाजले बघ एकदा घड्याळामध्ये...

तिची अखंड बडबड चालू होती.. आणि प्रतीकच डोकं मात्र खूप जड झालं होतं.. तो फक्त

प्रतीक - प्रिया, पाणी...

एवढंच म्हणाला आणि धाडदिशी पलंगावर पडला..

आता प्रिया घाबरली.. त्याच्याकडे गेली.. त्याला आवाज दिले पण त्याची काहीच प्रतिक्रिया नव्हती.. ती पटकन उठली आणि पाणी घेऊन आली..

थोडं त्याच्या तोंडावर शिंपडलं तस त्याला जाग आली, त्याच अवस्थेत प्रियाने त्याला पाणी पाजलं.. आणि त्याला उठून बसवलं..

प्रिया - काय झालं प्रतीक?? तू ठीक आहेस ना?? आपण डॉक्टर कडे जायचं का?? अरे मला वाटलं तू झोपला होता..

प्रतीक - प्रिया माझं डोकं खूप जड झालंय ग मला काहीच सुचत नाहीय..

प्रिया - काल रात्री दारू वगैरे घेतली का तू??

प्रतीक - (चिढुन) काहिही काय बोलतेस ग?.. तुला माहिती आहे ना मी घेत नाही ते..

प्रिया - हो पण अस तेव्हाच होतं. मी tv मध्ये बघितलंय..

प्रतीक - तू तुझे तर्क बंद कर आणि मला एक ग्लास लिंबू साखर पाणी दे..

प्रिया - आता आणते..

ती निघालीच होती की तिला आवाज देत थांबवून तो म्हणाला..

प्रतीक - कुणाला काही सांगू नको प्लीज..

प्रिया - ठीक आहे.. आलीच मी..

लिंबू पाणी पिल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं.. गार्गीचा विचार अजूनही डोक्यात होताच पण आता त्याची तीव्रता थोडी कमी झाली होती.. त्याने स्वतःला सावरलं होतं..

कार्यक्रम आटोपून सगळे घरी आले.. रात्री झोपताना गार्गी कार्यक्रममध्ये जे झालं त्याचाच विचार करत होती.. तिच्या समोर गौरव आणि प्रतीक दोघेही फिरत होते.. गौरव नी विचारलेला प्रश्न जसा तिच्या डोक्यात इको सारखा परत परत वाजत होता.. बऱ्याच वेळाने तिने स्वतःच मन अगदी घट्ट करून स्वतःला समजावलं की "आता तुला मागे फिरून बघायचं नाहीय, आणि तास करताही येणार नाही.. आता गौरवच तुझं संपुर्ण आयुष्य आहे.. हे जेवढ्या लवकर तू स्वीकार करशील तेवढं चांगलं आहे.." आणि तिने तिच्या प्रतिकबद्दलच्या भावनांना मनात एक कोपऱ्यात बंद करून घेतल्यात..

पुढे दोन दिवस झाले तरी पण गौरव ने नंबर घेऊनही गार्गीला फोन केला नव्हता.. आणि इकडे सगळे जण तिला "फोन आला होता का ? " अस विचारून चिढवू लागले.. खर तर गौरवले बोलायचं होतं पण घरी पाहुणे होते आणि सगळ्यांसमोर बोलणार कसं आणि दुसरीकडे जाऊन बोलायचं तर सगळे चिढवतील म्हणून त्याने जर धिरानेच पुण्याला गेल्यानंतरच फोन करूयात अस ठरवलं..

पुण्याला पोचल्यानंतर सगळं आवरून गौरव ऑफिसला निघाला आणि तिथूनच फोन करूयात असं बट्याने ठरवलं..
तो ऑफिसला पोचून फोन करणार तेवढ्यातच गार्गीच मेसेज आला , " पोचला का पुण्याला??" तिचा मेसेज बघून तर त्याच आनंद गगनात मावेनासा होता.. त्याने लगेच तिला फोन केला..

गार्गी - हॅलो,

गौरव - हॅलो, गार्गी, पोचलो मी आज सकाळीच पोचलो, आणि आता ऑफिसला आलोय, तुला फोन करायला फोन हातात घेतलाच होता की तुझा मेसेज आला..

गार्गी - हम्म.. ठीक आहे..

गौरव - का ग, काय झालं? तुझा आवाज खालावलेला वाटतोय... तब्येत ठीक आहे ना??

गार्गी - हो मी ठीक आहे.. बरं चला मी ठेवते, तुम्ही ऑफिसला आहेत ना.. नंतर बोलूयात..

गौरव - अग अग... एवढ्या लवकर ठेवते?? नीट बोललीही नाही आणि लगेच??

गार्गी - हो तू ऑफिसला आहे ना काम असेल तुला म्हणून...

गौरव - अग अजून सद्धे मी कामाला सुरुवात नाहीं केली, थोडं उशिरा बसेल मी , आणि अग तुझ्याशी बोलायला मी आज ऑफिसला थोडं लवकर निघून आलोय..

गार्गी - अच्छा.. खरच बोलायचं आहे का??

गौरव - हो मग काय ?? आताही बोललो नाही तर मग केव्हा बोलायचं?? एक तर इतक्या उशीराचा मुहूर्त निघालाय.. तोपर्यंत फोनवर तर बोलूच शकतो ना..

गार्गी - हम्म.. नंबर तर तु असा मागितला होता, जस की घरी गेल्यावर लगेच फोन करशील.. पण बघ 2 दिवस होऊन गेलेत तरी तुझा फोन नाही.. शेवटी मलाच मेसेज करावा लागला.. सगळ्यांनी किती चिढवल मला माहिती आहे.. "अजून कसा फोन आला नाही तुला?? "अस विचारून विचारून 2 दिवसात माझं डोकं खराब करून टाकलं, मलाही किती वेगवेगळ्या शंका येत होत्या माहिती आहे.. असो जाऊ द्या तुला काय फरक पडतोय..

गार्गीच अस बोलणं ऐकून गौरव मनातल्या मनात हसत होता.. त्याला खूप छान वाटलं हे ऐकून की गार्गी त्याच्या फोनची वाट बघत होती..

गार्गी - काय झालं?? आता काही बोलणार आहेत की असाच हसत बसणार आहेत??

गौरवला जरा आश्चर्यच वाटलं ..

गौरव - तुला कसं कळलं मी हसतोय ते??

गार्गी - कळलं बरोबर.. पण का हसत होता ते नाही कळलं..

गौरव - अग , तू नाही का सुरू झाली राजधानी एक्सप्रेस सारखी भराभर.. आणि तूझं अस नॉन स्टॉप बोलणं ऐकून माझ्या मनात विचार आला की नक्की तू तीच आहेत ना जी आपल्या साखरपुड्यात अगदी मोजकेच शब्द बोलत होती.. आणि तुला अस हक्काने माझ्यावर चिढताना बघून मस्त वाटलं मला..

गार्गी - हम्म.. तुला तिकडे मजा येतेय, आणि माझा काही विचार केला का??

गौरव - ओहह, नाही तो तर नाही केला, I M so sorry.. की तुला माझ्यामुळे इतका त्रास झाला..

गार्गी - हम्म, ठीक आहे.. चालेल , नंतर बोलूयात आता ..

गौरव - I LOVE YOU GARGI..

गार्गी - अ.. ??

गौरव - चल.. बाय, ठेवतो.

गार्गी - बाय

आणि फोन ठेवला, गौरवच पहिल्याच फोन कॉल मध्ये अस I love you म्हणणं गार्गीला खूपच अनपेक्षित होतं, त्याच्या या शेवटच्या वाक्याने तीच्या मनात कालवाकालव झाली.. त्याच्या अश्या अनपेक्षित वक्तव्याने ती मात्र विचारात पडली.. ती तिच्याच मनाला समजावत राहिली..

मन 1 - असं कसं एक दोन भेटीतच याला प्रेम झालं?? का उगाच सगळे म्हणतात म्हणून बोलला हा?? आणि बोलायचं तर थोडं थांबून तरी बोलायचं ना हे अस पहिल्याच बोलण्यात?? हे जरा विचित्र वाटलं मला... आणि किती सहज बोलला तो त्याला थोडा सुद्धा अवघडलेपणा वाटला नाही बोलताना.. जस काही नेहमीची सवय असावी हे अस बोलण्याची..

मन 2 - अग वाटलं म्हणून बोलुन गेला असेल त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे, engagement झालीय , त्यामुळे भीती वाटली नसावी आणि त्याला तुझ्याबद्दल भावना असतील तर त्याने व्यक्त केल्यात.. बस त्यात काय एवढं.. सोड एवढा विचार करण्यासारखं काही नाही, त्याच्या होणाऱ्या बायकोलाच बोललाय ना तो कुण्या दुसऱ्या मुलीला तर नाही उगाच शंका कुंशंका मनातून काढून टाक..

मन 1 - हो पण आता पुढे बोलताना मी काय बोलू , एक अवघडलेपणा जाणवेल ना मला, मी कसं आणि काय सांगू त्याला?? आणि त्या दिवशी सारखं त्याने मला काही विचारलं तर मी काय करू..

गौरवच्या एका वाक्यामुळे गार्गी मात्र पूर्ण गोंधळून गेली होती...

मन 2 - जाऊ दे ते बघुयात नंतरच नंतर वेळेवर..

असा विचार करत ती त्यातून बाहेर आली आणि कॉलेजला निघून गेली.. कॉलेजमध्ये पुनः सगळे तिचे classmates तिला चिढवायला लागलेत.. त्यांच्या मध्ये ती सकाळचं टेन्शन विसरून गेली..


---------------------------------------------------------
क्रमशः