ही कथा माझी आहे,फक्त नाव व्यक्तीच बदल केला आहे...जस घडलं तस आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे....
“हॅपी होळी”,
असा मी टेक्स्ट मॅसेज एका अनोळखी नंबर ला केला...
माझ्या मित्राचे १२ वी चे पेपर सुरू झाले होते,
आणि माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन नव्हता म्हणून,
तो म्हणाला की तुम्ही काही दिवस हा मोबाईल वापरून बघा...
आणि तुमचा छोटा मोबाईल मला द्या,
पेपर झाल्यानंतर माझ्या छोट्या मोबाईल मध्ये तो एक स्नेहा नावांनी नंबर सेव्ह होता...
मित्राच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधला असावा...
मी मुद्दामच पाहावं म्हटलं नंबर सुरू आहे की नाही तर,
म्हणून डायरेक्ट
hiiii,हॅलो न पाठवत हॅपी होळी असा संदेश पाठवला..
actually त्या दिवशी होळीच होती...
काही वेळानंतर लगेच तिकडून massage आला...
“who are you”???
मी म्हणालो मॅसेज वरच: सुरज
(आडनाव मुद्दाम सांगितलं नाही)
परत टेक्स्ट..,
कुठला सुरज,
कोणता सुरज,
आणि मला मॅसेज कसा केला,
एवढ्या सर्व प्रश्नांची भडिमार सुरू झाली...
मी मनात म्हटलं सुरज wrong नंबर लागला,
पण हा जरा जास्तच भारी वाटून राहिला,
म्हणून मी काही वेळ टेक्स्ट केलेच नाही...
तिकडून msg येऊनच राहिले,
सांग कोणता सूरज तर,
माझं लग्न झालं आहे आणि
तू जर नाही सांगितलं तर मी रिपोर्ट करेल,
माझा नवरा खूप बेकार आहे,
त्याला मी सांगितलं हा नंबर
तर तुझी काही खैर नाही...
असे कित्येक msg येऊनच राहिले...
आता मात्र मी पुरताच घाबरलो...
तसा ही मी एक नंबरचा फट्टू...
एवढे msg वाचून विचार आला,
की मित्राने कोणाचा नंबर सेव्ह केला होता,
आणि माझ्यात जास्तच रहिमान असल्याने मी msg केला...
म्हणून मी त्या नंबर ला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिल!!!!
अशी धमकी दिल्यावर काय करणार शेवटी नाईलाज झाला आणि तो नंबर कायमचा टाकून दिला ब्लॅक लिस्ट मध्ये,आणि शांत झोपी गेलो...
तस ही झोप काही आली नाही त्या दिवशी...
दुसऱ्या दिवशी उठलो आणि कॉलेज च्या लायब्ररी मध्ये जाऊन वाचू लागलो...
लगेच मोबाईल वर ते ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेल्या नंबर वरून कॉल येऊ लागले,
ब्लॅक लिस्ट मध्ये असल्याने एक रिंग वाजून तो कॉल कटत होता,
msg यायला लागले,
plz एकदा कॉल उचल,
मला तुझ्याशी बोलायचं आहे??
माझं लग्न वैगरे काही झालं नाही,
पण मला तुझ्याशी एकदा कॉल वर बोलायचं आहे,
शिव्या वैगरे,किव्हा रागावणार नाही...
आता एवढे msg आल्यावर मात्र थोडं मलाही बर वाटू लागलं...
केली हिम्मत बघू म्हटलं काय होते बोलणं तर????
काय म्हणेल,
विचारेल फक्त नंबर कुठून मिळला,
कुणी दिला,
आणि यानंतर कॉल करायचा नाही,
असं वैगरे सांगेल...
केला मी कॉल,
हॅलो मी सुरज,
बोलायचं होत न तुला माझ्याशी,
बोल आता...
अरे काही नाही,
काल जे सांगितलं ते सर्व खोटं होत,
actually म्हणजे असं आहे की,
माझा एक सूरज नावाचा बॉयफ्रेंड होता,
आणि काही महिन्यांपूर्वी आमचं ब्रेकअप झालं,
मला वाटलं तो असेल म्हणून मी तुला परत परत कॉल करत होती...
तिकडून ती अनोळखी व्यक्ती बोलत होती....
मी म्हटलं ठीक आहे,
काही हरकत नाही,
तो सुरज नाही पण हा सुरज नक्की आहे...
मग नाव विचारलं तर ती म्हणाली,
“श्री”आहे माझं नाव...
आता “श्री” म्हटल्यावर मी म्हणालो
हे तर मुलीचं नाव राहू शकत नाही,
हे तर मुलांचं नाव आहे,
मला तस नाव त्या नंबर नी सेव्ह होता,
तेव्हाच माहिती झालं होतं,
but ही व्यक्ती खरी सांगणार नाही,
म्हणून कदाचित श्री सांगत असावी....
काही वेळ बोललो आणि मग शेवटी तीच म्हणाली,
वेळ असेल तर नक्की कॉल करा परत,
तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा....
पहिलं प्रेम विसरून होऊन आता वर्ष उलटलं होतं,
असं वाटायचं की आता तरी प्रेम होणार नाही,
म्हणून त्या व्यक्तीशी तो कॉल वर बोलण्याचा योग होता...
मग त्या व्यक्तीच बोलन आणि सरळ सरळ बोलणं, बिंदास बोलणं,
जरा मनाला आवडायला लागलं,
ती ही बोलत असायची,
आणि मी ही बोलत असायची...
पण एकमेकांना पाहिलं नव्हतं...
३ ऱ्याच दिवशी,
स्नेहा नी ,
(नंतर नाव सांगितलं होतं,)
सुरज मला तू खूप आवडतो,
मला तुझं बोलन आवडलं,
तुझे विचार आवडले,
माझ्याशी लग्न करशील का???
हा एकाएकी स्नेहा ने प्रश्न टाकला...
मी शॉक झालो,
म्हटलं बोलून आपण तीन दिवस झाले,आणि बाईसाहेबांची गाडी जरा जास्तच वेगात सुटली,
म्हणून मी त्या दिवशी टाळाटाळ करून ते उत्तर लांबणीवर टाकलं...
ते यासाठी की मी पाहिलं नव्हतं तिला,
आणि तस ही स्नेहा ने पहिलेच म्हटलं की,
तुझं उत्तर तू मला पाहिल्यानंतर देशील,
तोपर्यंत मी तुला उत्तर मागणार नाही...
असेच आम्ही रात्री 3 कधी सकाळ पर्यन्त कॉल वर बोलत असायचो...
कारण मी रूम करून राहायचो,
त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हताच,
आणि स्नेहा च्या आईच त्या बोलण्याच्या काळात गर्भपिशवीच operation असल्याने,
ती दिवसभर आईसोबत थांबायची आणि मग रात्री परत यायची,
ते फक्त माझ्याशी बोलायला...
बाबा लहानपणीच वारले असल्याने ती आणि आई वर्धेतच मोठ्या आईकडे रूम करून राहायची...
त्यामुळे रात्रभर बोलण शक्य वायचं...
मग एवढ्या बोलण्यात तिने तिच्या सवयी सांगितल्या,
बाबा नसताना आईने कसं वाढवलं,
आणि मी कश्या वाममार्गाला लागली,
म्हणजे मला बापाचं प्रेम भेटलं नाही त्यामुळे मी बॉयफ्रेंड मध्ये प्रेम शोधत होती,
आणि प्रत्येक वेळेसच मला धोका मिळत गेला,
मग त्यातून कधी मी ड्रिंक प्याले,
कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला,
ट्रेस असल्याने,
कधी हाताची नस कापावी असाही विचार केला,
सर्व खरं खरं सांगितलं,
एवढंच नाही तर मी कुणाशी माझं शरीर share केलं,
सर्व खऱ्या गोष्टी तिने सांगितल्या...
पहिल्यांदा तर मला हे किळसवाणे वाटलं,
कारण मी पहिलं प्रेम केलं,
2 वर्षे मस्त केलं,
पण कधी तिच्या शरीराचा वापर केला नाही,आणि मी ही कधी तो विचार मनात आणला नव्हता...
म्हणून थोडा वेगळाच अनुभव मी घेत होतो,
११वी सम्पली होती स्नेहा ची,
आणि मी एम ए ला...
असं वयाच अंतर तर होतंच पण शिक्षणाचं ही अंतर होत,
म्हणून मी प्रेमाच्या दृष्टीने स्नेहा बद्दल काही विचार केला नाही...
फक्त एक गोष्ट चांगली वाटली की स्नेहा ने आपल्याला खरं सांगितलं,
मला जर अंधारात ठेऊन जरी ठेवायचं असत तर तिने ठेवलं असतं,
पण तिने कधी या गोष्टी लपवल्या नाही...
याच गोष्टीने मी तिच्याशी थोडा आकर्षित झालो...
पंधरा दिवस सतत कॉल वर बोलल्यानंतर,
मी तिला पाहायला गेलो...
i mean भेटायला गेलो,
पसंद आली तर प्रेमाच उत्तर द्यायच
नाही तर सरळ पहिली भेट ही लास्ट भेट म्हणून वापस यायचे...
मी पिवळ्या कलर च शर्ट आणि जीन्स घातला होता...
मी तिला पहिलेच म्हणालो की तू जीन्स टॉप घालून न येता,
सलवार सूट घालुन ये...
तशी ती आली होती....
तिला पाहताच मी तिच्याकडे पाहतच राहिलो...
कमरेपर्यंत लांब केस,
जे मला फार जास्त आवडतात,
रंग रूपाने गोरी,
आणि माझ्या उंचीला match होणारी अशीच ती होती...
शेवटी अर्धा तसाची ती भेट पण मी एवढा लाजाळू की तिला तिथे तिच्या प्रेमाचं उत्तर दिलं नाही...
घरी आलो तो खुश होऊनच,कारण स्नेहा होती ही तशीच,
प्रेम करावे वाटेल अशीच...
टेक्स्ट केला मी,
i love you sneha...
तिकडून पण मला रिप्लाय आला,
i love you suraj...
आता तुम्ही असं म्हणाल की मी चेहरा पाहून उत्तर दिलं,
तर तुम्ही तस ही समजू शकता,
कारण आहे त्याला इथे ते मांडता येणार नाही,...
अशीच आमचं हे प्रेम वाढत चालले होते,
कधी मग तिच्या कॉलेज ला भेट तरी कधी बाहेर कुठे...
पण एवढ्या भेटीत मी फक्त एकदाच शेकहॅन्ड घेतली,
त्याउपर काहीच नाही...
अचानक एक महिन्यानंतर,
हॅलो सुरज,
मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही,
आपण मित्र बनून राहू शकतो का???
असा कॉल स्नेहा चा आला....
मी काय उत्तर द्यावे,,
समजलच नाही,
म्हणून मी कॉल कट केला....
शेवटी काही दिवसांनी कॉल आला आणि तिने झालेला प्रकार सांगितला,
की माझा bf suraj जुना वाला,
आला होता,
आणि त्याने मला धमकी दिली की,
तू माझी नाही तर कुणाची नाही,
आणि तू जर कुणासोबत दिसली तर मात्र त्या व्यक्तीची खैर नाही,
त्यामुळे मी घाबरली आणि तुला मी मैत्रीचं निमंत्रण दिले,
सॉरी सुरज,
ते तुझ्यासाठी होत रे,
कारण मला वाटते की माझ्याने तुला काही नुकसान होऊ नये,
प्लिझ माफ करून देशील,
i love you suraj....
मी मात्र या वेळेस रिप्लाय देणं टाळलं...
असेच काही दिवस मजेत जात होते,
मात्र माझ्या मनात तिच्या पास्ट विषयी शल्य बोचत होते,
बोलत बोलत ती जूनं सांगत असायची त्यामुळे आमची भांडणे ही वायची,२-४ दिवस बोलायचं नाही एवढी...
शेवटी सॉरी म्हनलं की परत बोलन सुरू वायच...
माझं जग मात्र आता स्नेहा झाली होती,
सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आमचं बोलन संपायच नाही...
मजेत दिवस चालले होते,
5-6 महिने व्यवस्थित गेले असणार,
एक दिवस मात्र मोठं भांडण होऊन आमचं असणार relation तुटून गेलं,
या वेळेस ना कुणी सॉरी म्हटलं न काही...
कारण असं की तिचा ती पास्ट विसरायला तयार नव्हती
ती त्यांना जास्त महत्व देत होती आणि मला कमी...
माझं एकच म्हणणं असायचं
मी आहो तुझ्या life मध्ये मग दुसरा कुणी चालणार नाही,
पण तिचा चंचल स्वभाव,
शेवटी वेगळं वायचा निर्णय घेतला,
आणि माझं relation एन्ड झालं...
माझ्या आयुष्यात होती फक्त आता अश्रू आणि फक्त अश्रू...
कारण मी खूप प्रेम केलं,तिच्या शरीरावर कधीच केलं नाही,
तर मी माझी बायको होईल याच नात्याने तिच्यावर प्रेम केलं,
पण ते म्हणतात न खऱ्या प्रेमाची किंमत ते गेल्यावर समजते तसंच हे इथे झालं...
ती मात्र खूप मजेत होती,
मी झालो नाही झालो दुसरा बॉयफ्रँड बाईने बनवला...
इथेच माझ्या प्रेमाची हार झाली होती...
मी तिच्या आठवणीत झुरतो आहे,
दिवसरात्र रडत असतो,
एक झलक पाहायला तिच्या कॉलेज कडून फिरतो आहे आणि स्नेहा च्या मनात थोडं ही माझ्या विषयी काही वाटू नये म्हणून तिने दुसरा life मध्ये येऊ द्यावा...
हीच का मी केलेल्या प्रेमाची किंमत मला मोजावी लागली आहे...
तिच्या आयुष्यात दुसरा bf येणं खूप जिव्हारी झोम्बल,
पूर्ण तुटून गेलो मी,
पण शेवटी स्वतःला सावरून अभ्यास करू लागलो...
एवढ्या एकटेपणात मात्र ती साथ लाभली माझ्या मित्रांची...
खूप समजावलं त्यांनी की,
“ अरे सूरज जिला तुझ्या प्रेमाची कदर नाही तिच्याशी एवढं प्रेम करतो कश्याला????
आहेत तुला कुणीही सहज हो म्हणू शकतेस,
तुझ्यात काहीच कमी नाही आहे,
हुशार आहेस,
मेरिट विद्यार्थी आहेस,
पाहायला छान आहे,
तू मनात आणलं तिला बनवू शकतो आपलं,"
पण मित्राना काय माहिती प्रेम प्रेम असतं म्हणून,
कितीही चूका केल्या तरी पण प्रेम आपलंच वाटत...
असे काही दिवस गेले,
परत स्नेहा चा कॉल आला,
सुरज चुकली रे मी मला माफ कर न,
मला येऊ देन तुझ्या आयुष्यात,
आणि मी मात्र आपलं प्रेम वापस आलं याची खुशी म्हणून मी परत तिला स्वीकार करत असायचो...
पण म्हणतात न जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही,
किव्हा कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकड,
ही म्हणी तिला बरोबर लागू वायच्या...
प्रत्येक वेळेस मी तिला माफ करायचो आणि ती प्रत्येक वेळेस प्रेमाचा घाणेरडा खेळ करून निघून जायची...
आणि मला एकट्याला,
माझ्या डोळ्यात अश्रू ठेवून निघून जायची...
असे मी प्रेमाचे तब्बल 6 चान्स स्नेहा ला दिले,
की आता सुधारेल,
मग सुधारेल,
येईल अक्कल आता तरी पण माझ्या पदरी निराश्याच येत होती...
७ वा चान्स...
एकेदिवशी नवीन नंबर वरून कॉल आला,
हॅलो मी स्नेहा बोलते,
मी मुद्दामच कोण स्नेहा म्हणून विचारलं,
कारण या स्नेहा ने माझ्या प्रेमाचे तुकडे तुकडे केले होते,
त्यामुळे मला ते नाव नको झालं होतं...
काही वेळ बोललो आणि यानंतर कॉल करायचा नाही हे बजावून सांगितलं...
पण स्नेहा ऐकणार नाही हे नक्की होत,
आणि मलाही तेवढंच बर वाटायचं,की प्रेम परत आला,
काहीही असो पुन्हा एकदा मी जिंकलो....
या वेळेस मात्र मी सावध सुरुवात केली,
बाईची फितरत माहिती होती,
जास्त दिवस टिकणार नाहि यांचा साथ,
म्हणून स्नेहा ने मला एक चान्स देतो का म्हणत कोड्यात पकडले....
माझ्याकडून नाही होणारच नाही हे तिला चांगलंच माहिती होत,
पण या वेळेस मी मात्र तू जिला जास्त मानते,
म्हणजे तिची आई,
तू तिची शपथ घेऊन सांग की यापुढे मी तुझ्यासोबत प्रामाणिक राहील,
तुला सोडून जाणार नाही,
पास्ट विषयी माझ्या मनात काहीच नाही,
तरच तुला मी परत एक नव्याने चान्स देतो...
शेवटी स्नेहा नी शपथ घेतलीच....
मी यासाठी असं म्हटलं की एवढे प्रयत्न,
चान्स देऊन पोरगी आपलं प्रेम समजली नाही,
कदाचित आता आईच्या शपथ दिल्याने तरी थांबेल...
पुन्हा मी माझ्या बंद पडलेल्या प्रेमाच्या इंजिन ला सुरू केलं,
फक्त स्नेहा च्या प्रेमासाठी....
बस,
जे नव्हतं वायच तेच याही वेळेस झालं....
तिच्या bf ने नवीन बनवलेल्या असं तसं केलं,
आणि मला त्याला सोडता येणार नाही,
परत पोरीन यु turn घेतला आणि मला शेवटी पुन्हा एकदा सोडून गेली....
आता मात्र मी तिच्यासाठी प्रेमाचे पूर्ण दरवाजे बंद केले..म्हणजेच असं झालं की प्रेम या पासून माझा विश्वास उडाला आहे...आता ना कुणी आयुष्यात येऊ देणार,ना कुणावर प्रेम करणार....
एक सर सांगायचे मला,
की सुरज एक मुलगा 4-5 girlfrnd सहज घुमवतो,
त्याला हा समाज किव्हा त्याचे घरवाले काहीच म्हणत नाही,
आणि मग एखाद्या मुलीने जर असं वागलं किव्हा तिच्या हातून या चुका झाल्या तर आपण का म्हणून वाईट वाटून घ्यायचं...
या एका sentence वर मी स्नेहा च्या सर्व वाईट चांगल्या गोष्टी स्वीकारल्या,
तिला आपलं मानलं,तिच्यावर प्रेम केलं,
तिच्या प्रत्येक चुका माफ करत करत गेलो,
ती प्रेम करत नाही असं नाही ती खूप करते आणि दरवेळी च लग्नासाठी मागणी घालते आणि मी प्रत्येकवेळी नाहीच म्हणतो...तीच प्रेम आहे म्हणून अजूनही वाटच पाहत बसली आहे की हा कधी पुन्हा एक वेळ चान्स देतो,कधी मला लग्नासाठी होय म्हणतो...पण प्रेम फक्त आत्म्यावर करून चालत नाही शरीर ही तेवढंच महत्वाचं हे लग्नानंतर म्हणतोय...आणि इथे तर विषयच गंभीर आहे म्हणून हा प्रश्न आता मीच अनुत्तरीत ठेवणार आहे...
पण शेवटी माझा दुसऱ्या प्रेमाचा प्रयोग हा फसला एवढं मात्र खरं आहे...
आज ही स्नेहा ला मीच हवा आहे,
तिला आता या चुका कळून चुकल्या आहे,पण मी मात्र तिच्या प्रेमासाठी माझ्या मनाचे कायमचे दरवाजे बंद केले आहे...
आता ती फक्त उरली आहे माझ्या कवितेपुरतीच...
आज ही तीच माझ्या मनात आहे,म्हणून तर लिखाणाच्या पूर्वी “श्री सूरज ”म्हणून लावत असतो,
पण आता तिला परत आयुष्यात येऊ द्यायचे नाही,
आणि तिच्यावर प्रेम करायचे नाही एवढं पक्के आहे...
💐समाप्त💐
कशी वाटली माझ्या दुसऱ्या प्रेमाचा फसलेला प्रयोग नक्की वाचकांनी प्रतिक्रिया द्यावी हीच माफक अपेक्षा.....
आपलाच...
✍️श्री सूरज