Reshmi Nate - 23 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 23

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

रेशमी नाते - 23

दहाच्या आसपास विराटला जाग आली... डोळे चोळतच नजर‌ पिहुवर टाकतो....पिहु शांत दोन्ही हाताचा विळखा घालुन त्याला बिलगुन झोपली होती..विराट गालात हसत तिच्या चेहरयावरुन हात फिरवत गालावर‌ किस करतो.
रात्री पिहुला झोप लागतच नव्हती ..खुप उशीराने झोप लागली होती...त्याने अलगद तिचे हात काढुन तिला ब्लँकेट नीट ओढली.. फ्रेश होऊन सगळे कर्टन उघडुन स्लाईडींग उघडुन बाहेर आला. रिमझिम पाऊस चालु होता..तिच्या वर नजर टाकून तो खाली आला... मेन डोर उघडला..सर्वंट आत येऊन सगळ आवरु लागली...विराट पिहूसाठी दूध घेऊन वर आला .पिहु अजुन झोपलीच होती.
विराट तिच्या जवळ आला आणि मानेखाली हात घालत तिच्या चेहरयावरुन ,एक हात फिरवु लागला....पिहु...उठायच नाही...का...त्याने तिच्या गालावर हलकेच टॅप‌ करत तिला उठवु लागला..

अम्म ,ती आठ्या पाडतच त्याच्या हात धरत परत त्याला बिलगली...

अगं उठ ब्रेकफास्ट करुन,परत झोप

तिने अजुन डोळे उघडलेच नव्हते..पिहु उठ ना...त्याने तिच्या गळ्यावर हात ठेवत ताप वैगेरे आहे कि नाही चेक करत बोलला.

हहं मला त्रास होतोय...मला कणकण आल्यासारखी वाटते...थोड्यावेळ झोपते...ती पाय पोटात घेऊन अंग चोरुन त्याच्या कुशीत शिरली..

हो गं..दुध पी ..मग परत झोप.मी डॉक्टरअंकला,फोन करु का...त्याला ही आता तिची काळजी,वाटु लागली...

नको,काही काय तुमच...ती डोळे उघडुन नीट उठुन बसली..तिचा स्लिवलेस टॉप असल्याने तिच अंग गार पडले होते..त्याने तिच्याभोवती ब्लँकेट ओढुन कुशीत घेतलं...

गरम पाण्याचा शॉवर घे बर वाटेल...चल तो तिचे केस नीट करत कानामागे घेत बोलला... दुध पिणार का आता.

नको मला भुक लागली .

हम्म ,उठ...त्याने तिला बेडवरुन उचलून घेतलं...

तु...तु....म्ही कु..ठे सोडा ती चाचरतच बोलु लागली...

विराट हसत तिला बाथरुमपर्यंत सोडतो..अजुन किती लाजणार आहेस...तो तिच्या कपाळाला हलकं कपाळ मारत बोलतो...
पिहु लाजुन खाली बघते.जा गरम पाण्याचा शॉवर घे

पिहु शॉवर घेऊन आल्यावर तिला जरा बरं वाटत होते...

पिहु आवरुन परत बेडवर झोपते..विराट तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो.

पिहु,उठुन बस...थोडस खा परत झोप...तो तिचा हात धरुन बसवतो

अहो,मी खाते.

मी खाऊ घातल्याने पोटातच जाणार आहे...विराट हलक हसत बोलतो...तो तिला स्वत: चमच्याने भरवतो...

तूम्ही केला का...

‌नाही मी शेक घेतलाय...आत्ताच नंतर करतो....हे ज्युस पी आलो बाथ घेऊन तो उठून बाथरुममध्ये जातो.

पिहु ज्युस पिऊन तिच्या मम्मीला कॉल करते ...

विराट त्याच आवरुन ब्रेकफास्ट करतो..पिहु पोर्चमध्ये झोपाळ्‌यात बसुन बोलत होती...विराट तिच्या जवळ येऊन बसला पिहु ने ही थोडक्यात बोलण संपवुन विराटला बिलगली..दोघेही झोपाळयात बसुन कोसळणारा पाऊस बघत एकमेकांच्या कुशीत बसले होते...

पिहु काही त्रास होत असेल तर परत जाऊया का,त्याला आता तिची काळजी वाटु लागली...आपण उगाच घाई केली अस वाटत होते...

एवढ काही नाही‌ त्रास होत ये.. फक्त विकनेस पणा वाटतोय ती बाहेरचा पाऊस बघतच बोलली..तो तिच्या केसांवर ओठ‌ टेकवतो.

विराटच्या उबदार कुशीत पिहुला कधी झोप लागली कळलंच नाही..विराट ने तिच्याकडे बघितलं तर‌ ती झोपली होती... तिला अलगद उचलुन बेडवर झोपवलं

सगळीकडचे कर्टन ओढुन अंधार केला...तो ही तिला कुशीत घेऊन झोपला.संध्याकाळाचे चार वाजले तेव्हा कुठे पिहुला जाग आली.विराट तिच्या कुशीत झोपला होता..

पिहु फ्रेश़‌ होऊन येते अजुन विराट झोपलाच होता..तिला आता सकाळपेक्षा बर वाटत होते...इतक्या दिवसाची दगदग परत काल रात्रीचा नवीन अनुभव त्यामुळे ती घाबरली ही होती...पण विराट ने तिला खुप समजुन घेतलं होते.कालची रात्र आठवुन तिच्या अंगावर गोड शहारा येत होता... स्वतःशीच लाजत तिने बॅग ओपन केली...सकाळ पासुन नाईटसुटवरच होती...काल तिने वरचा एक ड्रेस घालुन बघितला होता..साईज साठी पण आज तिने नीट ड्रेस बघितले...तर ती बघतच राहीली...विराट ने सगळे वेस्टन ऑऊटफीट घेतले होते...जे तिने कधीच बाहेर घातले नव्हते...लग्नाच्या आधी ती थ्रीफोर्ट वैगेरे घालत होती.लग्न झाल्यावर ते पण तिने बंद केले होते.घरात साडी कॉलेज ला जाताना सलवार सुट,कुर्तीज लेगिंग असलच घालत‌ होती..
तिने दुसरी बॅग ओपन केली तर त्यात सगळे एक्ससेरीज होते...तिने कपाळालाच हात लावला...ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी,मेकअप चे न्यु ब्रँडचे पर्स वॉच तर क्लेशन बघुन ती शॉकच झाली.एक नजर विराट वर टाकुन ती हसली.तिच आवरुन ती खाली आली...कोणी ही नव्हते...ती मेन डोर ओपन करत बाहेर आली.पावसाची रीमझीम चालुच होती.सगळी कडे हिरवळीची चादर पसरली होती...झाडांना नवीन पालवी फुटली होती.गोकर्णाची वेल गेटवरुन पसरली होती...रंगबेरंगी फुलांनी गार्डन खुलन दिसत होते..पिहुला बाहेरचा नजरा बघुन मन ताजेतवाने झाले...

विराट ला जाग येत तो‌ बेडवर हात फिरवतो...दचकून उठतो..पिहु कुठे गेली...तो पटकन तिला हाक मारतच खाली येतो
..त्याच लक्ष मेनडोर कडे ..पिहुला बघुन तो रीलॅक्स झाला.ती झोक्यात बसुन पावसाचे थेंब हातावर घेत बाहेरचा नजरा बघण्यात गुंग झाली होती...तिच्या चेहरयावरची स्माईल बघुन विरटचा ही चेहरा खुलला..नाही तर सकाळपासुन तिचा उतरलेला चेहरा बघून त्याला टेंशनच आले‌ होते..त्याच्या तर‌ मनात परत घरी जायचा विचार चालु होता...

विराट किचनमध्ये गेला.आणि तिच्यासाठी त्याने आल्याचा चहा बनवला‌..त्याने मागुन तिच्या समोर मग धरला...तो हसत तिच्या हातात मग देतो.

पिहुचा चेहराच खुलला..आहहं तुम्ही केला.‌‌ती आश्चर्यचकित होतच बोलु लागली...

हो मी केलाय..टेस्ट करुन सांग कसा झालाय..तो चेअरवर बसत‌ बोलला.

पिहुने एक स्वीप पिला...वॉव किती छान झालाय...पिहु डोळे मिटुन स्वाद घेत बोलते‌‌....विराट गालात हसत त्याची ब्लॅक कॉफी पितो.

अहो,तुम्हाला येते चहा कॉफी करता..पिहु ब्लँक होत विचारते.

ते काय अवघड आहे का न यायला...

खुप छान झाला आहे चहा वॉव तुमच्या हाताच पहिल्यांदा काहीतरी पित असेल....पण तुम्ही कस काय चहा दिला मला नाही त्या वेळेस ओरडत असता हुहह पिहु चहा घेत बोलते...

तुला आवडते ना पावसात चहा घ्यायला म्हणून केला..ते ही आज तुला त्याची गरज पण आहे.अंगातला थकवा दुर होईल..पण एकदा दिलं म्हणून सारख मागे लागायच नाही..तो नजर रोखुनच बोलतो...

अहो ,खुप छान आहे ...सगळ पिहु एक्साईटेड होत सगळीकडे नजर फिरवते.विराट तिचा चेहरा बघून गालात हसतो..पिहुची नजर विराटवर पडते तशी ती लाजुन दुसरीकडे बघते..तो एकसारखाच तिला स्टेअर करत होता.. पिहु उठुन पटकन त्याच्या मांडीवर बसुन त्याच्या डोळ्यावर हात ठेवत कुशीत शिरते...विराट हसत तिचा हात डोळयावरुन काढुन तिच्या भोवती हातांचा विळखा घालतो.चल आत जाऊ‌या...गारवा भरपुर आहे...पाऊस काही थांबणार नाहीये...

हम्म ,दोघे हॉलमध्ये येऊन बसतात...पिहुला कोणी नाही तर मोकळ मोकळ वाटत होते...त्यात विराट ची साथ बस्स जगायला काय हवं होते😍😍😍

संध्याकाळी सर्वंट आत येऊन स्वंयपाकाची तयारी करु लागते..

तुला काय खायच का तो तिचे केस मागे घेत विचारतो...

हहं मला कांदा भजी खाऊ वाटतायेत पिहु ओठांवर जीभ फिरवत बोलते...अम्म्....😋

पिहु ,कधी तरी हेल्दी खात जा ना..😓.विराट वैतागतच बोलतो.

अहं ..ती बारीक चेहरा करतच त्याच्याकडे बघते..

मुद्दाम करतेस ना..आज मला तुझ्यावर चिडायच नाहीये...म्हणून सगळे मनासारख करतेस ना...

पिहु हसून हो म्हणते....

जा सांग तुला काय हवं आणि डीनरचा मेनु सांग

हम्म.पिहु किचनमध्ये जाते.

ताई सांगा काय करु ...ती बाई हसतच विचारते...

पिहु हसते..नाव काय आहे.....

लीला..

हहं पिहु तिला भजी करायला लावते...डीनरसाठी विराटला मल्टीग्रेन आटाची पोळी ,आणि कमी तेलात पनीर फ्राय,ब्राऊन राईस सोयाबीन टाकुन करायला लावते...तिच्यासाठी दाल खिचडी करायला लावते...

विराट ‌ने सकाळपासुन फोन केले नव्हते..त्याचे एकावर एक फोन चालु झाले...

पिहु सगळ इंटेरीअर , बघण्यात गुंग झाली...काल फक्त वरुन वरुन बघितलं होते...विराट जरी फिरत फोनवर बोलत‌ होता..पण सगळ लक्ष पिहुकडेच होते...ती एक एक वस्तु निहाळत होती...एकटीच गालात हसत विचार करत होती...

बेबी पिंक कलरचा जम्पसुट घातला होता .केसांना क्लचर लावुन वर फोल्ड केले होते आर्धे केस सुटले होते ..चेहरयावर मेकअपचा लवेश ही नव्हता..हलक पूसट‌ केसांत कुंक होते...मंगळसुत्र सोडुन कुठलाही दागिना नव्हता. तिच्या गळ्यावर हलकेसे लव्ह बाईट् स उठुन दिसत होते..ते बघुन त्याला कालची दोघांनी रात्र आठवली तो हलकेच हसला.तिच्या चेहरयावरचा आंनद त्याच्या मनाला सुख कारक समाधान देत होते..विराट कॉलबंद करून तिच्या कोपरयाला पकडुन स्वतःकडे वळवुन तिच्या ओठांवर ओठ ठेवतो..

अम्म,पिहु बाजुला होते...अ....ती बोलायच्या आत परत तिला जवळ ओढुन तिच्या ओठांचा ताबा घेतला.‌काही क्षणांनी ती त्याच्या छातीवर पंच करत कुशीत शिरते..

विराट हसत मिठी घट्ट करतो...

पिहु नजर वर करून किचन मध्ये नजर वळवते...लीला तिच्या कामात असते...

अहो तुम्ही ना.कुठे ही.....ती गाल फुगवुन त्याच्याकडे बघते.

माझ मन झालं किस करायच ..तो तिच्या गालावरुन अंगठा फिरवत म्हणतो...

मन झालं म्हणुन कुठे पण चालु होयच का ती किचनमध्ये नजर फिरवत त्याला म्हणते..

तिचा काय संबध..विराट खट्याळ हसत बोलतो...

खरच तुम्ही ना,ती त्याच्या मिठीतुन सुटत किचन मध्ये जाते...

लीला,झालं...पिहुला आता ती ही जड वाटु लागली विराट तर‌ कोण आहे कोण नाही विचार सुध्दा करत नव्हता.....

हो ताई ,झालं ...ती ही पटापट सगळ करुन निघुन गेली..

पिहुने मेन डोर लावला..विराट तिच्याकडे मस्ती भरया नजरेने बघत तिच्या जवळ येत होता..पिहु ची धडधड वाढली पिहु पटकन त्याला ढकलुन पळाली...

हे ,......तो ही तिच्या मागे हसतच गेला.

पिहु,डायनिंग टेबलाच्या भोवतीच फिरु लागली...अ...हो आपण जेवण करु...ती त्याला थांबण्याचा प्रयत्न करु लागली...😽

अहं ,तो चेअर बाजुला घेत हसत तिच्या जवळ येत होता..😼

ना...ही.म...मला भुक लागली आहे.

तो पटकन तिचा हात ओढुन जवळ ओढतो..

अहहं,इइ.. ती लटक्या रागातच बोलते.

माझ्यापासुन लांब राहण आता इतक सोपं नाही..तो तिच्या कमरेला पकडुन वर‌ उचलत तिचा चेहरा समोर आणत म्हणतो..
पिहु त्याच्या खांद्यावर हात ठेवुन कपाळाला कपाळ टेकवत ‌खुदकन हसते..
विराट तिला थोड वर करत तिच्या गळ्यावर किस करतो..पिहुच्या अंगाला सरकन काटा येतो...ती अंग चो‌रुन त्याच्या मानेला हाताचा विळखा घालते..
विराट चा मोबाईल वाजतो तसा त्यांचा मुड स्पाॅईल होतो.😂 विराट चिडुनच तिला खाली सोडतो..पिहु जोरजोरात हसते.विराट मोबाईल बघतो मॉमचा कॉल होता..तो रीसीव करत बोलु लागतो...दोघेही सुमनशी बोलुन फोन ठेवतात.ती त्याला मिठी मारते.तो तिच्या पाठीवरुन हात फिरवत बोलतो.चल भुक लागली ना..

ह..हो पिहु,हसुन बोलते...

दोघेजण जेवण करतात...रात्रीचे नऊ वाजले होते...

पिहु तुला मुव्ही बघायचा...

पिहु एक्साईटेड होत हो म्हणते...

तुला हॉहर मुव्ही खुप आवडतात ना, ...तो टिव्हीला पेन ड्राव्हीय लावत बोलतो...

पिहुच्या चेहरयाचा रंगच उडाला....बाहेर वीजांचा जोरात कडकडाट
धो धो कोसळणारा पाऊस ,त्यात एवढ्या मोठ्या घरात दोघेच इतकी भयाण शांतता आणि हॉहर मुव्ही बघायचा तिला तर दरदरुन घामच फुटला‌.तिला हॉहर‌ मुव्ही खुप आवडायचे...मम्मी कडे तर त्यांच घर लहान असल्याने तिला भिती वाटत नव्हती...आणि इकडे तर‌ चोवीस तास सात आठ नोकर घरातच फिरतच होते...त्यामूळे बिनधास्त ती हॉहर मुव्ही बघत होती..

पिहु कुठला लावु ..

अहं..हं कु...कुठलाही ती वरवर हसतच बोलु लागली..
.
विराट मुव्ही लावुन वर चालला होता..

अ..हो तुम्ही..पिहु दचकुनच त्याला बघु लागली‌‌‌..आलोच ब्लँकेट घेऊन येतो..

.अ..हं ती परत सोफ्यावर बसली...इकडे तिकडे नजर फिरवु लागली.

विराट ब्लँकेट घेऊन आला.त्याने सोफा अॅडजेस्ट करुन बेड केला.
दोघेही मागे टेकुन पाय पसरुन आरामात मुव्ही बघत होते...विराट तर इंटरेस्ट नव्हता.तो मोबाईलवर मेल चेक करत बसला.. ..पिहुला आवडत असल्याने ती तर म‌न लावुन बघु लागली.नंतर नंतर वीजांचा आवाज खुपच येऊ लागला..आतुन तर आता भिती वाटु लागली...

अ...हो बस्स मला नाही...ब..बघायच.,😅

का,

ते..म...मला बोर होतेय...(तिला,भितीच वाटत होती...पण कस बोलणार😂)

विराट ने हसत बंद करुन‌ तिला कुशीत घेतलं घाबरते तर ‌खर पण तरीही बघायच...😂😂ती दचकत होती.तर तो तिची मज्जा बघत‌ होता.

मी...ते...ही वेळ आहे का,हॉहर बघायची...इथे त्या पावासामुळे काही सुचत नाही,आणि त्यात तुम्ही मुद्दाम लावलं ना...पिहु त्याला ढकलुन चिडुन बोलली...

अरे मुद्दाम का लावु,तुला आवडतं आणि मला काम करायच होत पण मला काय माहीत तु खरच घाबरते...विराट ला हसू आवरत नव्हते...

हुम्म्,तुम्ही बोलला होता ना...काम करणार नाही तरी घेऊन बसला...

अरे सोन‌ा...मी इथेच आहे ना,थोडफार तर बघाव लागणार ना,मानव जरी असला तरी त्याला लगेच कुठले ही डीसीजन घेता येत नाही...बाबा पण रीटायर झालेत ना घरात करमत नाही म्हणून दोन तीन तास जाऊन बसतात ऑफिस मध्ये ...तो उठुन जवळ घेतो...

हम्म रीषभ दादा नमन आहेत ना,घरी तर ओरडुन ओरडुन दोघांना ऑर्डर‌ देत होता...किती बोलतात ... दोघ बिचारे घाबरून ‌ गेले होते...

बिचारे,दोघे त्यांना किती सांगितलं ना...सुधारणारे नाहीयेत...

नमनला किती सांगितलं तरी तो जाणार नाही... रीषभला नाही अजुन नॉलेज,वर्ष झाला आहे....त्यात आर्धा तर वेळ आलिशा बरोबर फोनवर घालवतो..

आहहं पिहु शॉक होत बघते...क...काय म्हणाला...तुम्ही

आलिशा अँड रीषभ लव्ह इच अदर ( विराट पिहुला उचलुन घेत बोलतो..पिहु त्याच्या गळ्यात हात गुंफवते.)

अहं ओहह म्हणुन तर दोघे सारखे एकत्र दिसत होते...छान आहे आलिशा..रीषभ दादांचा नंबर‌ का आता पिहु एक्साईटेड होतच बोलते

नाही...अस काही नाहीये...

मग तुम्हाला कस कळालं,पिहु ब्लँक होत विचारते.

आय अम विराट देशमुख आय नो इच अँड एव्हरी अपडेट अबाऊठ एव्हरीवन .मी रीयॅक्ट करत नाही म्हणून मला आजुबाजुला काय चालु कळत नाही असे वाटते.....पण मी वेळ यायची वाट बघत असतो...विराट रुबाबदारपणे म्हणतो...

पिहु हसते,हो का...सांगा ना...कोण सांगितलं

आलिशाचेच वडील आले होते...त्यांना दोघांच कळालं होते रीषभ आणि आलीशाच्या लग्नाची बोलणी करायला...

मग दोघांना माहीत आहे,तर का लपवतात‌..

दे बोथ डोन्ट नो दॅट हर फादर मेट मी...

ए...एक मिनीट मला काहीच कळत नाहीये.काय बोलतायेत.

विराट रुमचा डोर पायाने ढकलत रुममध्ये येऊन तिला बेडवर बसवतो...विराट तिच्या मांडीवर डोक ठेवुन आडवा होता...

आलिशा वडील आले होते...पण मी आत्ताच लग्नाचा विषय नको बोललो...

का,पिहु शॉक होऊनच विचारते...

पिहु प्रेमाने पोट भरत नाही ,आलिशा त्याच्या पेक्षा जास्त कमवते...
आणि तो अजुन स्वतः काहीच कमवत नाहीये,मी जेवढी कामे देईल तेवढच आणि सेव्हिंग तर काही करायची नाही सगळं उधळ्याची काम करतो.आत्ता कुठे तीन चार महिने नीट काम करायला लागला...अजुन सहा महिने जाऊ देत मग बघू....

आपल्या घरात लव्ह मॅरेज कोण कोण केलं का,रीषभ दादा एकटेच आहे..

सध्या तर‌ तोच आहे ..पण तेही आलिशा चांगली मुलगीआहे ती स्वतः तिच्या पायावर उभी आहे..तिला मी सात आठ वर्ष बघितले आहे .

पिहु हसते...आणि नमनच स्टडी झालं आहे आता तो काय करणार आहे

मी स्वतः त्याला बिझनेस जॉईन करायाला लावणार आहे.विराट थोड गंभीर विचार करतच बोलतो...

अहो,(पिहु बोल्याने त्याची तंद्री तुटते)

हहं

स्लाईडींग लावा....किती पावसाचा आवाज येतोय...

विराट हसतो...तु लाव ना...

न..नाही मी आता इथुन उठणार सुध्दा नाही...

विराट जोरजोरात हसत स्लाईडींग लावतो....

दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपुन जातात.❤❤

दोन दिवस दोघे छान टाईम स्पेड करुन मुंबईला निघतात..

अहो,घरी जाणार आहे....

नाही एअरपोर्टवर‌ चाललो,

अहो,...पिहु नरवस होत बघते...

वॉट हप्पन,असा का फेस केला...

मी..क..कधी ऐरोप्लेन मध्ये बसले नाही..ना कधी इंडीया च्या बाहेर गेली..पिहु टेंशनमध्येच म्हणते.

विराट तिच्या भोवती घेत तिला कुशीत घेतो...मी आहे ना,...

हम्म,दोघेही एअरपोर्टवर येतात..फ्लाईटची आनऊसमेंट होती..पिहु विराट च्या हाताला विळखा घालत घट्ट पकडते..विराट तिच्यावर नजर टाकत,पिहु मी़ असल्यावर टेंशन का घायच तिचा चेहरा सांगतच होता तिला भिती वाटत आहे..

पिहु कसतरी गालात हसत मान हलवते.विराट तिला नीट समजावुन सांगतो...पिहु स्टार्टींगला घाबरल्यासारख होईल..पण नंतर नाही जाणवणार...पिहु दचकली तिने पटकन डोळे मिटुन विराट चा हात घट्ट पकडला..

टेक अ डीप ब्रीथ...तो तिच्या केसांवरुन हात फिरवत तिला शांत करत बोलला...

थोड्यावेळाने ती नॉर्मल झाली विराट ने तिच्या कपाळावर ओठ टेकवले...तो तिला बोलणयात नादवत होता.त्यामुळे ती ही रीलॅक्स होत त्याच्याशी बोलु,लागली.आठ तासांनी ते बालीला पोहचले.
पिहु,पहिले थोडी घाबरली होती..पण,विराटने तिला छान संभाळुन घेतले होते...

विराट पिहु ऐअरपोर्टच्या बाहेर थांबले होते...पाच ते दहा मिनीटांनी एक कार आली...दोघेही कार मध्ये बसुन निघाले..बाहेरचा नजारा बघुन तिचा चेहराच खुलला...ताजी हवा हिरवे गार डोंगर,खळखळत्या नद्या,भातशेतीचे हिरवेगार गालीचे...व्हा किती सुंदर आहे ना..पिहु विराट कडे बघत बोलली...

विराट हलका हसत तिच्या भो्वती हात घालुन जवळ घेतो...

तुम्ही पण फस्ट टाईम आला का..

वन टाईम कामच्या निमीत्ताने आलो होतो.

तुम्हाला सगळ माहीत असेल ना..

हो

मला सगळ फिरयाच किती सुंदर आहे ना....चेहरयावरचा आंनद बघुनच तिला खुप आवडल आहे हे दिसत होते...

हो गं विराट हसत तिला कवटाळतो...

एका व्हिला च्या बाहेर कार थांबते.

स्टाफ त्यांच वेलकम करतात...सगळ लगेज आत घेऊन जातात...
पिहु तर डोळे विस्फारुनच बघत राहते....अहो,हे... हे हॉटेल आहे पिहु शॉक रीयॅक्ट करत बोलते.

नाही, व्हीला आहे...चल आत

पिहु विराट आत येतात. बाहेर छोटस गार्डन होते थोडफार लाकडी बांधकाम असल्याने ते आकर्षक दिसत होते....दोघे ही आत गेले...एक मोठा लिव्हींग ऐरीया,त्यालाच अॅटच डायनिंग ऐरीया...दोन बेड रूम होत्या. बाहेर बॅक साईडला पुल होता....पूलच्या शेजारी कोपरयात स्विंगबेड होता..




हा बेड आहे...पिहु हात लावते .. नवल होत विचारते..तिने कधी अस बघितलच नव्हतं .सगळ नवीन होत तिच्या साठी लग्नझाल्यापासुन तिने खुप खुप वेगवगळ्या वस्तु बघितल्या होत्या.एकदा रुममधलाच बाऊल आणि वाझ फुटला चुकून तेव्हापासुन ती कधी कुठल्या वस्तुला हात लावयाची हिम्मत होत नव्हती....त्यात रोहिणी मुद्दाम तिला त्याची किम्मत सांगायची मग तर त्याच्याकडे नजर सुध्दा वळावयाची नाही.

हो,स्विंग बेड आहे...विराट तिच्या कमरेला पकडत त्या बेड वर आडवा पडत हसत बोलतो.त्याचे पाय जमिनीवर असल्याने त्याने पायाने एक झोका दिला...

पिहु ,

हहं...

तुला आवडलं ना...

हो ‌खुप( ती त्याला हाताचा विळखा घट्ट घालत बोलते...)हे सगळ मला स्वप्न असल्यासारखे वाटत आहे....तुमच्यासाठी काही नसेल पण माझ्यासाठी हे माझ भाग्यच म्हणाव लागेल.कधी मी असा विचार केलाच नाही..(ती त्याच्या डोळ्यात बघते).थँक्स तुम्ही माझ्यासाठी खुप काही केलं आहे...

हे तुझ नशीब आहे ..माझ्यामुळे काही झाल नाहीये..

पिहु गालात हसत त्याच्या छातीवर डोक ठेवुन त्याच्या हद्याची ठोके ऐकु लागली...खुप वेळ दोघे शांत होते...

तो तिच्या पाठीवर हात फिरवतो...पिहु,झोपायच नाहीये...ती शांत पडली म्हणजे झोपणार हे माहीत होते...

हहं

हहं काय तो तिच्या,शोल्डरला धरून उठवतो..डीनर करु मग झोपुया...

हम्म,मला झोप आलीये...ती गाल‌ फुगवुनच बोलते.(त्याला ती काय बोलते ते समजलं )हो ..हो झोप तो हसत तिला चेअरवर बसवुन डीनर ऑर्डर करतो...

अहो ,इंडीयन फुडच हवयं मला ...

हम्म,

दोघेही डिनर करतात..दिवसभराच्या थकव्यामुळे दोघही झोपून जातात...सकाळी नऊलाच जाग येते.

अहो,उठा ना...पिहु तो उठत नाही म्हणून जोरजोरात हलवत उठवु लागली...

विराट कुस बदलुन परत पाला‌था झोपतो...काय झालं पिहु..
अहो,दहा वाजलेत...

तुला काय काम आहे का... मला आहे तो आवसाळलेल्या आवाजात डोळे झाकूनच बोलतो..

अहो,मग फिरणार कधी पिहु चिडतच बोलली...

विराट एक हात,मागे घेऊन तिला कुशीत ओढतो..कुठला प्लेस पळुन जाणार नाहीये..घेऊन जातो ना..झोप,तो तिला ब्लँकेटमध्ये घेऊन झोपला..पिहु जोरातच त्याच्या दंडाला चावली...

अहहाहहं तो कळवळत उठुन बसला...पिहुss मॅड आहेस का..

पिहु खुदखुद हसत त्याच्या गळ्यात हात गुंफवते..उठा मला भुक लागली...

तिचे केस ओलसर दिसले

तु बाथ घेतलीस...तो चेहरा पाडुनच बोलतो.

ह...‌हो का ती दबकतच विचारते.

मला तुझ्याबरोबरच घ्यायचा होता...तेव्हा पिहुला कळते ती लाजुन त्याच्या कुशीत शिरते...

चल आता जाऊ,तो तिला उचलुन घेतो...

न...नको, ती घाबरतच उतरते...त...तुम्ही घ्या...ती आवंढा गिळतच बोलते...

वेडी,इतक लाजल्यावर कस होणार‌ आपलं तो तिच्या शोल्डवर‌ मानेवर चेहरा घासत बोलतो..

अ...अहो,ती चेहरा बाजुला घेत बोलते.मला खरच भुक लागली..ती बारीक चेहरा करतच बोलते.

विराट गालात हसत तिच्या ओठावर हलक किस करून तिला ब्रेेकफास्ट ऑर्डर करतो.पिहु हा नंबर आहे (त्याने तिथले बुकलेट उचलुन तिला दाखवलं.)कॉल करून मागवत जा तुला काय हवं असेल तर...तो बाथ घ्यायला गेला...

बेल वाजली ...एकतर सावधान इंडीया,क्राईम पेट्रोल सिरीयल्स बघुन तर तिला लोकांची भितीच वाटायची...कोण कस असे‌‌ल .विराट ने आतूनच आवाज दिला पिहु दार उघड...

ह...हो तिने घाबरतच दार उघडले...वेटर ने आत सगळ आणुन ठेवलं ती दारात उभी होती..तो वेटर नेहमी प्रमाणे हसत गुुड मॉर्निंग विश करुन निघून गेल्यावर तिच्या श्वासात श्वास आला.

तिने आता जास्त न विचार करता पहिले खाऊन घेतलं.
विराट ही आवरुन आला...दोघेही ब्रेकफास्ट करुन बाहेर पडले ..पिहु चा आंनद बघुन विराट ही ‌खुश होता..

gitgit waterfall


पहिले दोघे जण वॉटरफॉल बघायला आले. ऑफ सिझनला आल्याने बोटावर‌ मोजण्याइतकेच लोक होते....छान शुभ्र पाणी वरुन कोसाळत होते...ते दुपारी आल्याने झाडाच्या सावलीतुन हळुच किरणे डोकावत होती.. पक्षांचा किलकीलहाट ऐकुन तर पिहुचा चेहराच खुलला.वॉव किती सुंदर आहे इइइ ती उड्या मारतच हसत बोलु लागली...
विराट ने तिचे फोटोज काढले..ती खुलुन पोझ देत होती...दोघांचे ही खुप सारे फोटोज काढले...गार ताज्या वारयाने दोघांच मन प्रसन्न झाले होते....

गाईडने जवळपास मंदीरे आहेत म्हणून सांगितले..

अहो,चला ना...

पिहु मला आवडत नाही,टेपंल वैगेरे मध्ये...ते घरात मॉम ऐकत नाही म्हूणन तिच्या समाधानासाठी मी पाया पडतो..

अहो,

पिहु,

परत पिहु काहीच बोलत नाही...

दोघेही संध्याकाळी परत व्हीला मध्ये आले...तो हात लावत होता तर ती झटकत रुसुनच बसली होती..पिहु ऐकायच नसेल ना,उद्या रीटर्न जाऊ

न..नाही ती पटकन त्याला बिलगत म्हणाली.. तो चिडलेला तिच्या रीअॅक्शनला त्याला हसायलाच आले...

एकच स्पॉट बघितला आणि लगेच तुम्ही म्हणता...ती चिडूनच त्याला बोलु लागली.

इतक राग येण्यासारख काय आहे...मला आवडत नाही आणि इथे देवदर्शन करायाला आलीस का.

ते हनीमुन पॅकेज मध्ये येत नाही तो लास्टचे व‌र्ड रोमँटीक होतच बोलु लागला...पिहु लाजुन हसु लागली..

पिहुने ब्लॅक कलरचा शोल्डर स्ट्रॅप शॉर्ट ड्रेस घातला होता.विराटने ही ब्लॅक कलरचा स्लिम फिटींगचा कॅज्युल शर्ट घातला होता.
पिहुला बघुन त्याला तर बाहेर डीनरला जायची इच्छाच नव्हती....
पिहु आपण इथेच डीनर मागवायच का,तो लाडात येत तिच्या गळ्यावर मानेवर बोट फिरवत म्हणाला..

अहं,आता आवरलं चला ना..ती त्याचा हात पकडतच निघाली...दोघांच खाण्यात तर लक्षच नव्हतेच.विराट तिला मुद्दाम छेडत असल्याने तिला घश्याखाली घासच उतरत नव्हता..

दोघेजण जेवण करुन परत व्हिला मध्ये आले.पिहु पुढे आली.विराटने दार लावताच पिहुचा हात पकडुन मागे ओढुन तिला अवेगानेच मानेवर गळ्यावर किस करु लागला‌..पिहु एक मिनीट दचकलीच..पण आता तिला ही सवय झाली होती..तो थोडा का होईना अग्रेस्वीह होताच...ती ही त्याच्या स्पर्शात गुंतच चालली...तिचे ही ओठ त्याच्या गळ्यांवर फिरु लागले..तिचा स्पर्शच त्याच्या साठी इतका मोहक होता..कि त्याने तिचा चेहरा दोन्ही हातांनी पकडत ओठांवर दात रोवु लागला...पिहु ही त्याला साथ देऊ लागली...कधी त्याने तिच्या ड्रेसची झिप काढली ते पिहुला ही कळलं नाही...दोघांचे ही फुलले होते...अंगावर रोमांच येत होते...
पिहु पटकन त्याला बिलगली.विराट ने तिला उचलून घेतलं ...आणि स्वींग बेडवर घेऊन आला...सगळे परदे त्याने खाली सोडले ..त्याच्या डोळ्यातली प्रेमाची नशा बघुन पिहु लाजुन चुर झाली होती .तिने बेडशीट दोन्ही हातांनी धरत पाय मागे घेत मागे सरकु लागली...विराट ने अलगद तिचा पाय धरत तिला स्वतःकडे ओढले...त्याचे हात तिच्या पुर्ण अंगभर फिरत होते...दोघांच्या अंगावर गोड शहारे येत होते...पिहु ही,लाजेचा परदा काढत त्याला साथ देऊ लागली...थंड गार हवेत दोघांच्या प्रेमाला बहार येत होता...चंद्राचा मंद प्रकाश पडत होता.

दोघेही एकमेकांच्या कुशीत शांत बसले होते..

अहो ,

विराट मागे टेकुन शांत डोळे झाकुन बसला होता...

अ....हो,पिहु परत त्याला आवाज देत त्याच्याकडे बघते...

हहहं तो डोळे उघडझाप करत तिला मागे घेत तिच डोक छातीवर ठेवतो..

ती हनुवटी त्याच्या छातीवर ठेवत त्याच्याकडे बघते.

काय विचा‌रायच का,

ती मानेनच हो बोलत हसते....

(तो डोळ्‌यानेच विचार बोलतो)...तुम्ही चिडणार नसेल तर...पिहु क्युट फेस करतच बोलते...

चिडण्यासारख असेल तर बोलु नकोस...माझा मुड खराब होईल...

तुम्ही दरवेळेस मला बोलुच देत नाही अस काही तरी बोलता ..पिहु नजर खाली घेत च बोलते..

बोल ..तो हलक हसून बोलतो...

पिहु दोन सेंकद शांत त्याच्याकडे बघते...तुमच्या लाईफ मध्ये माझ्याआधी कोणतीच मूलगी नव्हती का,...म्हणजे आता कॉलेजमध्ये नंतर परत कोणी असेलच ना,तुमच्या मध्ये आणि माझ्यामध्ये सेवन इयरचा गॅप आहे...ती हाताची सात फिंगर करुन त्याला विचारू लागली.

विराट गालात हसत तिला कुशीत घेतो...

पिहु,मान वर करत त्याच्याकडे बघु लागली...

मला माहित असलेले असते ना,आपल्यात ऐवढा गॅप आहे मी लग्नाला तयारच झालो नसतो...तशी ती कुशीतुन बाजुला होते.

पण आता आहे त्याच्यावर डिसकस करायचं नाही ती लटक्या रागाताच त्याच्या हातावर पंच मारत बोलते.

हहं, आता आहे तो चेहरा पाडतच बोलतो..

अहो,ती आठ्या पाडतच बघु लागली.त्याला ही तिला चिडायवायला मज्जा येऊ लागली...

किती चिडतेच गं तो तिचे गाल ओढुन परत कुशीत घेत ब्लँकेट ने कवटाळतो....

मी तुम्हाला काही तरी विचारलं

पिहु मी फस्ट इयरला असताना डॅड गेले... त्याच्या आवाज सांगताना,जड झाला होता..ऩंतर बाबांची तबियत ‌खालवली होती..मॅनेजर पण त्यात त्यांचा प्रॅाफिट करुन घेत होते...त्यात ‌खुप लॉस झाला.. सहा महिन्यांनी मी बिझनेस जॉईन केला होता..मग तेव्हापासुन जे बिझनेस मध्ये गेलो तर स्वतःला काय हवं ते मी विसरुनच गेलो..मला ही वाटत होते...आ‌पल्याला ही कोणाची तरी साथ हवी...पण कस कोणाला बघुन फिलच झालं नाही..तुला हीं‍ बघुन राग यायचा .(तसा पिहुचा चेहराच उतरला)...पण मला हे कुुठे माहीत ज्या मुलीचा राग येतो तिच्या वर मी इतक प्रेम करेल..
तो तिला कुशीत घेत केसांवर ओठ टेकवत बोलतो...पिहु पण ‌त्याच्या भोवती विळखा घालत घट्ट मिठी करते...

मला नाही आठवयाचे ते दिवस..पिहु बारीक आवाजातच त्याला बोलते...कारण तेव्हा तो ती रुममध्ये दिसली कि चिडचीडच करत होता.

पिहु झोपायच नाही का तो विषय चेंज करत बोलतो..

ना..नाही,मला झोप नाही आली...अहो,ऐक ना..ती परत प्रश्न करणार ते बघुन त्याने मोबाईल दा‌खवला.....पिहु रात्रीचे तीन वाजत आलेत..हे बघ आणि तूझ बोलण काही संपत नाहीये..

तो खाली सरकत तिलाही खाली ओढु‌न कुशीत घेत डोळे झाकतो..

अहो,मला सनराईज बघायाचा...

पिहु झोप सनराईज बघा‌‌यला लवकर झोपली‌तर उठशील ना... दोन तासांनी पहाट होईल.तो झोपतेच बोलु लागला..

अहो ...

आपण रुममध्ये झोपायच का,ती इकडेतिकडे बघत बोलली सगळीकडे काळोख अंधार होता...फक्त चंद्राचा प्रकाश होता.
विराटने पुलसाईडचे सगळे लाईट्स ऑफच ठेवले होते.त्यामुळे तिला भिती वाटत होती...

अ..हो...तिने बघितलं त‌‌र त्याला झोप लागली होती...तिने मोबाईल मध्ये आलाराम लावुन पुर्ण ब्लँकेट ओढुन त्याला बिलगुन झोपली..त्यांच्या व्हिला उंचावर असल्याने तिथुन सनराईज खुप छान दिसत होता...पिहुला काही झोप लागली नाही ...आलाराम वाजल्याने तिने पटकन बंद केला..विराटचा हात ती अलगद काढत होती कि ..त्याने परत तिच्या भोवतीचा हात घट्ट केला..पिहुला त्याच अस करण खुप आवडलं ती हसत त्याच्या चेहरयावर फुंकर मारत होती..तेव्हा कुठे त्याने हात लुझ केला...ती हळुच त्याच्या मिठीतुन बाहेर आली...समोर त्याच्या श‌र्ट पडला होता..तिने तो घेऊन घातला आणि स्वतःशीच लाजली...परत तिच्यालक्षात येताच ती पटकन विराटचा मोबाईल घेऊन बेडवरुन उठुन सनराईज बघायला स्विमींगपुलच्या कोपरयात आली...छान सुर्याचा लाल गोळा वर येत होता..आकाशात लाल पिवळ्या रंगाची उधळण झाली होती....


ते समोरच दृश्य बघुन ती गुंगच झाली इतक सुंदर दिसत होते..ती मोबाईल मध्ये फोटोज घेऊन लागली.. स्लेफी सुध्दा घेतली...तिला
विराट उठवायच होते पण तो खुप शांत झोपला होता...म्हणून तिच मन झालं नाही...
तिला परत तर झोप येणार नव्हती...आणि विराट ही काय लवकर उठणार नाही.ती तिथेच त्याच्या मोबाईल चाळत. बसली. लग्नापासुनचे फोटोज,ते आत्तापर्यंतचे सगळे फोटोज तिने आज बघितले होते...पहिल्यांदा त्याच्या सोबत हॉटेल मध्ये वीराने काढलेला फोटो ती आज बघुन हसली त्यात विराटला तिचा हात पकडायला पण नको वाटायच..आणि आज झोपेत सुध्दा मी मिठीत हवी ..पिहु विराट वर नजर टाकते...सगळे फोटोज बघुन झाले...तिने दोन दिवस झालं घरी फोन केला नव्हता...तर एक तास फोन वर बोलली..इकडच सगळ एक्साईटेड होत सांगु लागली...रेवतीला तिच्या चेहर‌यावरचा आंनद जाणवत होता...

नऊच्या,आसपास विराटने डोळे उघडुन सगळीकडे नजर फिरवु लागला.‌..त्याची नजर पिहुवर पडली..पिहु पुलमध्ये पाय टाकुन फोनवर हात घेऊन बसली होती..गुलाबाच्या पाकळ्‌या एक एक करत त्याच एका हाताने हार्ट काढुन त्यात विराट लिहायच चाललं होत...विराट गालात हसत पालथा होत तिच्या कडे बघत राहीला...तिने त्याचा श‌र्ट घातला होता...गुडघ्याच्यावर आला होता...हात तर‌ पुर्ण झाकुन गेले होते...त्यात तिचे गोरे गोरे पाय आकर्षक दिसत होते.वरचे दोन तीन बटण न लावल्याने एकासाईडने शर्ट शोल्डरवरुन उतरला होता...विराटला तिला अस बघुन अंगाला गोड शहारे ‌येत होते..पिहुला चाहुल लागताच तिने वर नजर केली..विराट तिलाच एकटक बघत होता...पिहु गालात हसुन त्याला हात करत बोलु लागली.

तो उठुन तिच्या शेजारी बसला...गुड मार्निंग तो तिच्या ओठांवर ओठ ठेवत बोलला.

ती चावा घेतच उठुन उभी राहीली...जोरात हसत गुड मा‌र्निंग ss म्हणत त्याच्या लांब झाली...

पिहु,ssतो चिडुनच उठला...

पिहु हसत पळत लांब गेली...तो ही तिच्या मागे गेला..

पिहु सकाळ सकाळी अस विश करतात का ,

तुम्ही केलं तर चालते का,मी केले तर नाही चालत ती त्याच्यापासुन लांब लांब पळतच बोलु लागली...

मी कधी तुला बाईट केलं...

हे कोण केलं..ती गाल आणि गळ्यावर बोट दाखवत बारीक डोळे करतच बोलली..

ओहह ,तो खट्याळ हसत तिच्या जवळ आला...तो तिच्या वर नजर वर खाली करत निहाळत बोलु लागला...पिहु हॉट दिसतेस...

पिहुनेस्वतःकडे बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आले कि तिने विराट चा शर्ट घातला होता...त्यात तो तर खुप लुझ असल्याने तो शोल्डर वरुन पुर्ण उतरला होता...ती आवंढा गिळत त्याच्या डोळ्यात आरपार बघत होती..अ.हो...ते मी ती शर्ट वर करुन अंग झाकण्याचा प्रयत्न करत होती...

अहं.....मला हवा आहे श‌र्ट तो खट्याळ गालत हसत तिच्याकडे येत बोलु लागला...

तिला समजल त्याच्या मनात काय चालु आहे...ती लाजुन त्याच्या कुशीत शिरली.त्याने पुलसाईडचा शॉवर ऑन केला...दोघांच्या डोक्यावरुन पाणी येत होते..तसे दोघेही बेभान होत गेले‌...त्याने तिला उचलुन घेतले...आणि बाथरुममध्ये आला...पिहुही त्याच्या मिठीत विरघळली...दोघेही एक दीड तास छान दोघे रोमँटिक बाथ घेऊन आवरत होते..विराटचा तर आज रोमान्स संपायचा नावच घेत नव्हता....

इतनी मोहब्बत करो ना
मैं डूब ना जाऊं कहीं
वापस किनारे पे आना
मैं भूल ना जाऊं कहीं
देखा जबसे चेहरा तेरा
मैं तो हफ़्तों से सोया नहीं
बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं
मुझे नींद आती नहीं है अकेले
ख्वाबों में आया करो
नहीं चल सकूँगा तुम्हारे बिना
मैं मेरा तुम सहारा बनो
इक तुम्हें चाहने के अलावा
और कुछ हमसे होगा नहीं
बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं
हमारी कमी तुमको महसूस होगी
भींगा देंगी जब बारिशें
मैं भर कर के लाया हूँ
आँखों में अपनी
अधूरी सी कुछ ख्वाहिशें
रूह से चाहने वाले आशिक
बातें जिस्मों की करते नहीं
बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
बोल दो ना ज़रा दिल
में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

तो त्याच प्रोटीन शेक करत होता...अहो मला ही भुक लागली आहे मी पहाटेच उठली ती चिडुन बोलली...

वॉट(,त्याने शेक करायच ‌थांबवलं)..तु अजुन काहीच खाल्ल नाही...एवढ्या लवकर उठलीस कश्याला...तो आठ्या पाडतच बोलतो

पिहु शांत होत त्याच्याकडेच बघत होती...

चिडुनच फोन घेऊन तिच्यासाठी ऑर्डर केलं....नंतर तिच्याकडे वळाला..तुला मी कालच सांगितलं होत ना..भुक लागली तर मागवायच नाही तर मला उठवायच...मी ऑर्डर केलं असतं
तु फाय थर्टीला उठली आणि आता अकरा वाजत आहेत..

ते...तु...तुम्ही झोपला होता...

हहं मी झोपलो होतो...मग तु ऑर्डर करायच ना,आणि मेडीसीनपण घेतल्या नसशील...इतक स्वतःबाबतीत केयर लेस कशी असु शकेतस....तो ओरडुनच बोलत होता.....

पिहु डोळ्यातलं पाणी सावरत एकटक त्याच्याकडे बघत होती..

पिहु बोल काहीतरी...मी काय विचारतोय...

ती दचकलीच तो ओरडला तर...(.त्याला ही माहीत होतं तो किती तिला बोल बोलल तरी आता ती काहीच बोलणार नाही...)
तो केसांमधुन हात फिरवत त्याच्या रागावर कंट्रोल करत गार्डनमध्ये जाऊन बसतो...(ती तर‌ बोलणार नाही आणि अजुन समोर तो थांबला कि त्याच्या रागावर कंट्रोल राहणार नाही.)

बेल वाजली ,विराटने आत येऊन दार उघडलं वेटर ब्रेकफास्ट ठेवुन निघुन गेला..

विराट शांत‌ होत तिच्या जवळ आला तिचा हात पकडत त्याने तिला चेअर वर बसवलं...
पिहु खाऊन घे तो चेअर जवळ ओढुन बसला..

पिहु ने एक नजर बघितलं आणि प्लेट घेतली. तिने कसबसे तिच्या डोळ्यातलं पाणी आवरलं होते...

पिहु,

हहं ,ती त्याच्याकडे बघत हळु आवाजात बोलली.

‌मला इतकच म्हणायच सगळ्या गोष्टी स्वतःही करायाला शिक...कोणालाही घाबरायची काही गरज नाही ये..आणि मी जिथे ही घेऊन जाईल ती जागा तुझ्यासाठी सेफच असणार आहे.त्याने तिच्या गालावर हात ठेवत शांतपणे तिला सांगितले. इथे आल्यापासुन ती सगळयांकडे अविश्वासानेच बघायची ते त्याने नोटीस केलं होते.

पिहु मानेनेच हो बोलली..

बोलु नकोस पण स्माईलसुध्दा करायची नाही का तो तिच्या भोवती हात घेत तिला जवळ घेत हसत बोलला...

पिहु वरवर हसत त्याच्याकडे ब‌घु लागली...

पिहु हस बोलल तर मनात नसताना ही हसायच का,तो एक भुवई वर करतच विचारु लागला..

पिहु दोन्ही हातांचा विळखा घालत त्याला बिलगली.

तो ही तिच्या केसावरुन पाठीवरुन हात फिरवत तिला शांत करत होता..चला उठा लेट होईल...फिरायला जायच ना,तो ती रडायच्या घाईत दिसत होती तर त्याने तिला ‌थोड दुर करत गालावर कनट्युनिसली कीस करत बोलु लागला‌..तशी पिहु लाजुन गालात हसु लागली...

विराटचा फोन वाजला,पिहु आवर मी कॉल घेतो मग निघु हह.तो बाहेर येऊन फोन बोलत होता...

पिहुने पटकन आवरुन घेतलं...त्याची वाट बघत चेअर वर‌ बसली.
विराट आत आला...पिहु झालं आवरुन तो मोबाईल मध्ये बघत बोलला...तिचा आवाज न आल्याने त्याने वर बघितलं तर पिहु चेअरला मागे ठेकुन झोपुन गेली होती..

विराटने कपाळावर अंगठा फिरवत एक उसासा सोडला...तिच्या समोर येऊन उभा राहीला..

तिने व्हाईट टॉप आणि शॉर्ट डेनिमची डंग्री घातली होती....ती होती आधीच नाजुक त्यात अस काही घातलं तर ती डॉल सारखीच दिसायची ‌...केस छान सेट केले होते...डोळ्याना लाईट आयशॅड्यो,आयलाईनर रे‌खीव लावलं होते..ओठांना लाईट ऑरेज कलरची लिपस्टीक लावली होती..तो स्वतःशीच हसत तिच्यासमोर गुघड्यांवर बसला ..पिहु कधी खुलणार माझ्यासमोर...भांडायला सुध्दा विचार करते...झोप आलीये हे पण सांगु वाटत नाही...मी बोललो तर लगेच तयार झाली...वेडाबाई....तो हसत तिचे केस मागे घेत बोलु लागला‌.. त्याने तिला उचलुन बेडवर झोपवलं तिचे डंग्रीचे बेल्ट लुझ करुन पायातले स्निकर काढुन तिला ब्लँकेट ओढलं.ती रात्रभर झोपलीच नव्हती‌..आता तिला चांगलीच गाढ झोप लागली होती....

त्याने हातातल्या वॉच कडे बघितलं बारा वाजत आले होते...
त्याने त्याच जॅकेट काढुन ठेवलं लॅपटॉप‌ उघडुन मानवला व्हिडीयो कॉल केला...मग इथुनच त्याच काम चालु केलं...तिला डीस्टर्ब नको म्हणुन तो गार्डनमध्ये जाऊन बसला....

चार,वाजता पिहुला जाग आली...तिने हळुच डोळे उघडझाप करत इकडे तिकडे बघितले...विराट तिला रुममध्ये दिसलाच नाही ती डोळे ताट करतच उठुन बसली ...तिला विराट बाहेर गार्डनमध्ये दिसला...ती पटकन उठुन बाहेर गेली‌..आणि पळतच त्याच्या मांडीवर बसत त्याला बिलगली...त्याला एक सेंकद‌ कळलच नाही...त्याने तिला एका हाताने पकडलं.पिहुच लक्ष लॅपटॉपकडे गेलं ...विराट ची व्हीडीयो कॉलवर मिटींग चालु होती...तस विराट च्याही लक्षातच येताच त्याने लॅपटॉप फिरवला.तो पर्यंत मानवने व्हीडीयो कॉल कट केला.

पिहु तर तोंडालाच हात लावते.

अहो,स...सॉरी ....म..मला माहित नव्हतं..ती घाबरुनच बोलु लागली...

विराट गालात हसत तिला कुशीत घेतो...शुशुss...

अ...अहो,

चुप एकदम ती परत तेच बोलणार म्हणुन तो दाटवतच बोलतो‌‌.
झाली झोप.

ती त्याच्याकडे बघते...आणि गालात हसतच हो बोलते...

विराट गालात हसत तिचा चेहरा दोन्ही हातांनी पकडत तिच्या कपाळावर कीस करतो...पिहु पण रीलॅक्स होते...

अहो,आजचा दिवस गेला ना‌‌‌..ती चक करतच बोलते...

जाऊ दे तो हलक हसत बोलतो..उद्या जाऊ त्यात काय एवढ...

हहहं ती हसुन परत त्याला बिलगते.

जा फ्रेश हो बीचवर जाऊ...

हह.हो...ती खुश होतच उठत पळतच निघुन गेली.

दोघेही सनसेटच्या टाईमिंगला बीच वर गेले....समुद्राला सुर्य टच करतोय की काय अस वाटत होते...पिहु डोळे विस्फारुनच बघत होती...आज तिने सनराईज आणि सनसेट‌ दोन्ही बघितले होते....विराट ने तिला मागून मिठीत घेतलं...पिहुने त्याच्या मिठीत अंग झोकुन दिलं...दोेघे हीं‌ तो क्षण डोळ्यात साठवुन घेत होते...पिहु...

हह तिने मान मागे घेत त्याच्याकडे बघितलं....

एका हात तिच्या गालावर ठेवत डो्ळ्यात आरपार बघु लागला‌‌‌....आय लव्ह यु.....त्याने थोड झुकुन तिच्या ओठांवर ओठ ठेवत डीप किस केलं...

पिहु लाजुन त्याच्याकडे वळत त्याच्या कुशीत शिरली..त्यानेही हसत घट्ट मिठी केली

दुसरयादिवशी दोघे ही nusa dua beach वर गेले.तिथले वॉटरस्पोर्ट खेळले..पिहु ने पहिल्यांदा इतक एन्जॉय‌ केलं होते...

तिला जास्त प्रवास नको म्हणुन तो दररोज एक एक स्पॅाट विराट फिरवत होता.आणि

Ubud: Nature’s Delight

Lovina: Black Sands

Mount And Lake Batur: Magnificent Views

Nusa Lembongan: Serene Sights

Sanur Beach: Tree Lined Streets

Kuta Beach: White Sand Beach

Nungnung Waterfall: Mesmerizing Views

Bali Bird And Reptile Park: Rare Excursions

Tukad Cepung Waterfall: Spellbinding Ambiance

Ayung: For River Rafting

Jimbaran Beach: Shimmering Lands

Green Bowl Beach: Romantic Escapes

Tirta Empul: Heritage Site

Bali Safari And Marine Park: Theme Park

पंधरा दिवस दोघांनी खूप एन्जॉय‌ केला... एकमेकांना हवा तेवढा वेळ दिला बाली मधली शेवटची रात्र दोघांनी ‌छान सेलिब्रेट केली.
दोघेही आंनदाचे क्षण मनात भरुन घरच्या रस्त्याला निघाले.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

हाय फ्रेंड,मागच्या पार्टला भरुभरुन प्रेम दिल्याबद्दल थँक्यु😊😊
हा भाग कसा वाटला समिक्षाद्वारे कळवा....

क्रमशः