सावली भुत प्रेत आत्मा ह्या सर्वा पासून माणसांना भीती वाटते पण मुळात हे असतात का कि आपला अंधविश्वास आहे बरेच जण म्हणतात असतात आम्ही बघितलं आम्हाला अनुभव आहे. मला कधी कधी प्रश्न येतो कि खरच असतात का असं वाटते हो असतील देव दिसत नाही पण आपला विश्वास आहे ना मग देव असतील तर भुत पण असतील आपला भास असो की अंधविश्वास आपण नाव जरी काढलं तर भीती वाटते अंधार झाला की आपण घाबरतो लगेच देवाचं नाव घायला लागतो कारण आपण ह्या गोष्टी मान्य करतो....कि भुत असतात. अशीच एक निश्चय ची कथा आहे. मी ऐकलेली
निश्चय हा खुप हुशार होता आपल्या आई सोबत शहरात राहायचा तसे ते गावी राहणारे होते. पण निश्चय ला जॉब लागला त्या मुळे तो शहरात राहण्या साठी आला. आईचा तसा तो खुप लाडका होता.त्याला फक्त त्याची जॉब आणि घर एवढंच दिसत होत कोणाशी काही संबंध ठेवत नव्हता. एकदा त्याच्या आईला गावा वरून फोन आला गावा मध्ये जे घर आहे ते रस्त्या वर असल्या मुळे त्याला मोडण्यात येत आहे त्यांना गावी जावं लागेल. निश्चय च्या आईने तस त्याला सांगितलं निश्चय जाण्या साठी तयार झाला.आईला पण यायचं होत पण निश्चय मनाला खुप दुर चा प्रवास असल्या मुळे त्याने आईला येण्यास नकार दिला. आणि तो ऑफिस ची अर्धी सुट्टी घेऊन निघाला.
निघते वेळेस दुपारचे दोन वाजले होते. आणि गाडी ३ वाजता ची होती तो स्टेशन ला पोहचे पर्यंत ३ वाजले गाडी मध्ये बसला आणि बस चालू झाली. अगोदरच खुप थकला होता त्या मुळे लगेच त्याला झोप लागली. थोड्या वेळानी उठला आणि फोन वापरत बसला पण ऑफिस मधुन आल्या मुळे फोन मध्ये चार्जिंग खुप कमी होती. त्याने फोन बाजूला ठेऊन दिला आणि बसला. आता त्याला खुप कंटाळा येत होता पण काय करणार गावी जावं लागत होत बाजूला एक म्हतारी आणि तिची नातं होती म्हतारी तिच्या नातीला कथा सांगत होती भुताची तसं निश्चय च्या कानावर शब्ध पडत होते. पण निश्चय चा विश्वास नव्हता ह्या गोष्टीन वर निश्चय त्या म्हतारी आजी ला मनाला काय ग आज्जे असं काही नसते तु विनाकारण का बरं अश्या गोष्टी सांगते आज्जी मानते तुझा विश्वास नसेल पण आमच्या सोबत झालं म्हणून सांगत आहे तुम्ही काय शिकलेली पोर तुम्हाला सार खोटं वाटते पण तुम्ही किती जरी अविश्वास दाखवला तरी ह्या गोष्टी असतात.
आज्जी जस जस सांगत गेली तस तो ऐकत गेला कारण त्याच्या कडे दुसरा इलाज नव्हता. नंतर त्याला हि विश्वास होत गेला भुत असतात म्हणून त्या नंतर बस थांबली आणि आज्जी नातं दोघी उतरून गेल्या. पण निश्चय मात्र तोच विचार करत बसला. आत्ता बस थांबली होती निश्चय ने खाली उतरून नाश्ता केला आणि परत बस मध्ये येऊन बसला संध्याकाळ झाली होती आत्ता ७:३० वाजले होते.पण निश्चय च गाव येण्या साठी भरपूर वेळ होता. तसे बस मध्ये खुप प्रवाशी होते पण निश्चय हा कमी बोलणारा होता लोकांशी बोलायला जास्त आवडत नव्हतं त्या मुळे तो परत झोपला. आणि त्याला झोप लागली. बस स्टॅन्ड ला गाडी थांबली पण तो उतरला नाही थोडी बस समोर गेल्या नंतर त्याला जाग आला. आणि त्याने एका माणसाला विचारलं कोणतं गाव आहे म्हणून त्याच्या आलं त्याच गाव मागे गेलं आणि तो नंतर उतरला. आत्ता उतरला तेव्हा १० वाजले होते आणि निश्चय ला अजून मागे यायचं होत. जिथे तो उतरला तिथे स्टॅन्ड वर कोणीच नव्हतं रात्रीची वेळ होती आणि गावातले लोक लवकरच झोपतात त्या मुळे बस स्टॅन्ड शांत होत निश्चय वाट बघत बसला.पण तिथे त्याला कोणीच दिसत नव्हतं. वातावरण अगदी शांत होत.
हवेचे आवाज येत होते रात किडे किर्रर्र किर्रर्र करत होते कुत्रे भुंकायचा आवाज येत होता. आणि असा काळोख पसरला होता. निश्चय ला आत्ता मात्र भीती वाटायला लागली आजी जे सांगत होती. ते त्याला दिसायला लागलं असं वाटत होत उगाच त्या आज्जी जवळ बसलो निश्चय च्या मनात वेग वेगळे विचार यायला लागले भीतीने त्याच अंग थर थर कापत होत. रस्त्या वर कोणीच नाही आत्ता कोणाची मदत घेऊ कोणी तरी येईल का देवा माझी मदत कर असच बोलत राहिला पण रात किड्याच्या आवाजा मुळे त्याच काही मन लागेना. थोड्या वेळानी त्याला रस्त्या वरून आवाज येत होता कोणी तरी येत आहे म्हणून तसा त्याचा जीव खाली वर होत होता हे कोण असेल भुत तर नसेल देवा कोणी तरी माणूस असू दे तो देवाला प्रार्थना करत होता. त्यांनी रोड वर बघितलं तर एक माणूस येत होता. त्याला थीर वाटला आत्ता त्याच मन थोडं शांत झालं त्या माणसाला बघून त्यांनी बघितलं तर ते त्याच्या कडेच येत होता. आल्या नंतर त्या माणसांनी विचारलं निश्चय ला कोण गाव च पाहुणा तुम्ही इतक्या रात च्या काय करताय हित निश्चय नी सांगितलं बस ची वाट बघतोय. तुम्ही कुठे राहता आणि ईथे कस काय निश्चय नी विचारलं बस स्टॅन्ड च्या थोडं दूर घर हाय माझ घरला जात होतो पण तुम्ही इथं एकटे बसलेले बघून बोलायला आलों म्या त्याच बोलणं ऐकून निश्चय ला बरं वाटल त्याची भीती कमी झाली. दोघांच्या गप्पा मस्त रमत गेल्या. पण अचानक निश्चय ची नजर त्याच्या पाया कडे गेली आणि बघितलं तर काय पाय उलटे आत्ता मात्र निश्चय च्या अंगाचं पाणी पाणी झालं त्याला काहीच कळत नव्हतं तोंडा तुन शब्ध फुटत नव्हते डोळ्या मधून पाणी वाहत होत.निश्चय नि त्या माणसा कडे बघितलं तर त्याचे डोळे लाल सर दिसत होते एका बाजूने चेहरा जळाला होता. हे सर्व बघून निश्चय जोरात ओरडला आणि रस्त्याच्या दिशेने पळाला त्याने मागे वळून बघितलं तर ते माणूस भयानक आवाजात हसत होता. आणि त्याला बोलवत होता पण निश्चय नि परत मागे वळून नाही बघितलं आणि समोरून बस आली निश्चय गाडीत बसला आणि गटागटा पाण्याची बॉटल खाली केली बस मध्ये बसल्या नंतर त्याने मागे वळून बघितलं आत्ता तिथे कोणीच नव्हतं.निश्चय खुप घाबरला होता पण बस मध्ये लोकांना बघून त्याला थोडं बर वाटलं थोड्या वेळात निश्चय च गाव आलं गावात जाणारे १,२ मानस होती तो त्यांच्या सोबतच गेला आणि सुखरूप घरी पोहचला
काय वाटते तुम्हाला भुत खरच असतात का, की आपला भास असतो..