कादंबरी – प्रेमाची जादू
भाग – ३२ वा
--------------------------------------------------------------------
सकाळी सकाळी हॉलमध्ये चहा-आणि नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे यशच्या घरातील सगळे
मेम्बर आलेले होते . नेमका यशच उशिरा आला
आणि सगळ्यांना गुड मोर्निंग करीत खुर्चीत बसत म्हणाला ..
" आज काय विशेष आहे बुवा ?
सगळे कुठे बाहेर जाण्याच्या तयारीत असल्या सारखे दिसत आहेत .
मला नाही सांगितले कुणी ? की आज काय शेड्युल आहे आपले ?
आज्जी त्याच्याकडे पाहत म्हणाली –
तुझे लक्ष तरी असते का आजकाल घरात ? ते असते तर आले असते लक्षात .
चौधरीकाकांच्या घरी पार्टी झाल्यापासून तू आमच्या पासून जरा दूर दूरच राहतोय असे वाटते
आहे आम्हाला ,
का रे बाबा काय झाले असे अचनक ?
आज्जीने टाकलेल्या बाउन्सरने यश गडबडून गेलाय हे सार्यांनी ओळखले ..
यश मनात म्हणाला -
सुधीरभाऊ आणि अंजलीवाहिनी .ऑफिसला जाण्याच्या घाईत आहेत ..म्हणून बरे ..
नाही तर अंजलीवहिनीनी या वाहत्या गंगेत नक्कीच हात धुऊन घेतले असते ,
तरी एक सिक्सर मारलाच त्यांनी ..
त्या म्हणाल्या ..
आजी ..तुम्ही म्हणताय त्यात खूप तथ्य आहे बरे का ..!
मी जरा निवांत असले की .नक्की सांगते तुम्हाला
मग आपण करू विचार ,या यशचे काय करायचे ?
या वेळी आपण चुपचापपणाने या मोठ्या माणसांचे बोलणे ऐकणे जास्त योग्य आहे.
चहा घेत घेत आजोबा म्हणाले ..
अरे यश , आपल्या मागच्या हॉलमध्ये अशात काही संगीत कार्यक्रम झालाच नाहीये,
एक ठरणार होता ,पण त्या नव्या गायिकेला ..सिटी पासून दूर असलेल्या आपल्या बंगल्यात
कुणी श्रोते आलेच नाहीत तर ?
या काल्पनिक भीतीने त्या मुलीने कार्यक्रमच रद्द केला . फार मोठी संधी घालवली असे म्हणेन ,
अरे बाबांनो - लक्षात ठेवा -
मैफिलीसाठी ,मैफिलीत ..गर्दी नको असते ..मोजकेच पण दर्दी कानसेन “,समोर असले की
गायन सदर करणारा कलावंत मनोमन खुश होऊन जाते ..
आणि अशा माहौल मध्ये मग तो आणि त्यचे साथीदार खरे रंग भरीत असतात “
नेमकी ही गोष्ट ती नव्या होतकरू गायिकेला महत्वाची वाटली नाही , त्याला आपण काय करणार ?
तिच्या वडिलांना देखील मुलीचीच शंका योग्य वाटली ती त्यांना पटली ,
त्याला आपण काय करणार ?
यश सगळ्या गोष्टी नशिबात असेल तरच होत असतात नसता आपण ठरवतो एक, आणि होत असते
तिसरेच ..
यालाच म्हणतात ...जीवन ऐसे नाव !
आजी म्हणाल्या – यश, एक सूचना आहे माझी ,
आपल्या परिवाराच्या आयोजनाने होणार्या "संगीत सभा उपक्रमात "–
एक सुगम संगीत गायन मैफिल आयोजित करशील का ?
पूर्वार्धात – आपल्या मधुराचे उप-शास्त्रीय आणि सुगम गायन असू दे..
आणि उत्तरार्धात – आपल्या परिचयाच्या विविध संगीत विद्यालातील गायक-गायिका यांची निवड
करून ..त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून ..मोजक्या ५-६- कलाकारांचे गायन सादरीकरण ठवू या.
करशील ना ?असा संगीत उत्सव ?
तू या विशेष संगीत कार्यक्रमाचा निमंत्रक असणार ,आणि तुझे मित्र आयोजक असणार .
माझी इच्छा आहे..आपल्या मधुराची मधुर- सुरेल मैफिल आपल्या परिचित रसिक श्रोत्यांना ऐकण्यास मिळावी.
यश मनातून बेहद्द खुश झाला ,पण आपला आनंद लपवत म्हणाला ..
आज्जी – तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होईल ..
पर्वा रविवार आहे..
एक काम कर..उद्या सकाळी ..तू आणि आजोबा मधुराला फोन करा ,.आणि तिला आपल्याकडे बोलवा.
ती आली म्हणजे ..मग. आपण मिळून ठरवू या .
चालेल न ?
अंजली वाहिनी म्हणाल्या – बघितलात आजी .मी काय म्हणाले होते ..
लोक किती चतुर झालेत, सगळं मनासारखे घडवून आणतात ,पण झालेला आनंद काही दाखवत नाही .
आजी हसत म्हणल्या – अंजली – तू वाहिनी आहेस ना त्याची ,
बडी भाबी ..मदत करणारी असते..
आणि इथे तर तु मदत करायची ,ती मला करावी लागते आहे .
अंजलीवाहिनी – म्हणल्या – मानले पाहिजे आज्जी तुम्हाला ..!
यशच्या मनातले ओळखून तुम्ही अगदी बरोब्बर तसे घडवून आणता .
आजोबा म्हणाले – तसे तर तसे ..पण.हे व्हायला हवे आहे..
हे तर तुला पण वाटते न अंजली ?
ऑफकोर्स आजोबा – मधुरा मला पण खूप आवडायला लागली आहे ..
आजी – इतक्यांदा मी तिला भेटले आहे , बोलले आहे , मला जाणवते की –
या मधुराच्या व्यक्तीमत्वात काही तरी विशेष आहे ..तिच्या सहवासात येणार्या माणसांना ती
आपलासा करून घेते .
यशवर तिच्या प्रेमाची जादू झाली असेल तर ..मला तरी खूप आवडेल –
जे तुम्हा दोघांच्या मनात मधुरा आणि यश यांच्या बद्दल जे काही चालू असते .
.त्याला माझा सक्रीय पाठींबा आहे .
पण..अंजली ..एक गोष्टीचा तू शोध घे आणि आम्हाला रिपोर्ट दे..
सुधीरभाऊ ,यशची आई , त्याचे बाबा ..मधुराबद्दल तू विचार या तिघांना ,
ते तुझ्या जवळ काय म्हणाले ते आम्हाला सांग ..
अंजली वाहिनी म्हणाल्या –
यस, आजोबा – मला वाटते ते तिघेही जण..आपल्याच बाजूने आहेत ..ते फक्त वाट पाहत असावेत
की त्यांचा यश त्यांना स्वतहा होऊन काही सांगेल याची .
आजोबा म्हणाले –होय अंजली , तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे.
आपण ही याचीच वाट पाहतो आहे , पण, हा मुलगा काही बोलायला उत्सुकच नाहीये .
तसे तर अंतिम शब्द आमचा असणार ,तो तुम्हा सर्वांना मान्य असणार “
हे आम्हाला ही माहिती आहे .
पण गोष्टी गोडी गोडीने होत गेल्या तर जास्त आनंद मिळतो यात.
अंजली वाहिनी म्हणाल्या – मी आणि सुधीर निघतो ऑफिसला
आज शुक्रवार ..भरपूर काम असेल.
उद्या शनिवार सुट्टी ..आपण बोलू पुन्हा या विषयावर .
आणि ते दोघे निघून गेले ..तोच ...
बागेत असलेले माळीकाका हॉलमध्ये येऊन यशला म्हणाले ..
यशदादा – कुणी तरी सेठ आलेत ,
बिझिनेस बद्दल तुमच्याशी अर्जंट बोलायचे आहे म्हणतात ,
त्यांना वर घेऊन येऊ की .
तुम्हीच येताय बागेत ..त्यांना बोलायला ?
यशला आश्चर्य वाटले ..तितकेच ते घरातील सगळ्यांना वाटले ..
बिझीनीस आणि त्यातील माणसे ,पैश्याचे व्यवहार , या गोष्टी ..
यशने कटाक्षाने घरापर्यंत येऊ देत नसे ..आणि त्याचे सांगणे
सूचना सगळ्या मार्केट मध्ये माहिती झालेली होती ..
तरी पण ..सकाळी सकाळी मार्केट सुरु होण्या अगोदर कुणी आले आहे ..
याचा अर्थ नक्कीच काही तरी सिरीयस मैटर आहे.
तो म्हणाला –
माळीकाका ..खाली बागेत खुर्च्या आहेतच , त्यांना बसवा ,आलोच म्हणावे मी.
आणि हो, मी खाली आल्यवर ..तुम्ही लगेच वरती येऊन ..नाश्त्याचे –चहाचे बघाल .
यशच तयार होऊन खाली बागेत आला ..
बागेत खुर्च्या टाकलेल्या होत्या ..त्यातील एका खुर्चीवर आलेले सेठ बसलेले पाहून
यशला आश्चर्याचा धक्काच बसला ..
कार बिझिनेस मधले सगळ्यात मोठे डीलर स्वतः आज त्याच्या घरी आले होत .
नमस्कार झाला दोघांचा –
सेठ म्हणाले – हे बघ यश , अगोदर सॉरी म्हणतो मी तुला ,
बिझिनेस घरपर्यंत आणायचा नसतो “ हे तुझ्या इतकेच मला ही पटलेली गोष्ट आहे.
तरी आज मला तुझ्याकडे यावे लागले आहे..म्हणजे त्याचे कारण ही तितकेच महत्वाचे आहे,
आणि सिरीयस पण आहे.
यश म्हणाला ..
तुम्ही आलात म्हणजेच मामला काहीतरी गंभीर आहे “याची कल्पना आलीय मला ..
तुम्ही विनासंकोच ..अगदी काही आडपडदा न ठेवता मला डिटेलमध्ये सांगा ..
माझ्या कडून तुम्हाला सगळी मदत होईल ..हे आधीच मी तुम्हाला सांगून टाकतो.
सेठ म्हणाले –
याची तर मला ग्यारंटी आहे यश . आता भीती एकच आहे माझ्या मनात ..की ज्यांच्या
बद्दल मी तुला सांगणार आहे ..त्यांची मला आता यापुढे ग्यारंटी राहिलेली नाही.
यश म्हणाला – सेठ – असे कोड्यात बोलू नका ..
सरळ सरळ मुद्याचे बोला .
खुर्चीवर जरा अधिक मोकळेपणाने बसत त्यांनी सुरुवात केली..
यश तुझ्या ग्यारेज्माध्ला , बिझिनेस मधला .सगळ्यात सज्जन ,प्रामाणिक माणूस ..
नारायणकाका “
आता खूप गोत्यात आलेला आहे. त्याने स्वतः काही केलेलं नाहीये “
हे सगळ्या दुनियेला मालुम झालेलं आहे ..
पण ..नारायणच्या इमानदारीचा,त्याने कमावलेल्या विश्वासाचा गैरफायदा ..त्याचा जावाई –भाचा गेल्या वर्षभरा पासून घेतो आहे .
नंबर एकच भुरटा चोर -माणूस आहे हा., चैन करणे ,पैसे उडवणे .
दारू पिऊन घरी आले की .बायकोला मारहाण करतो ..
आपल्या पोरीच्या जीवाचे काही बरे –वाईट होऊ नये या भीतीने नारायणकाका सहन करीत आहेत
आणि हा बदमाश आपला सख्खा मामा- असलेल्या सध्या –सरळ –पापभिरू सासर्याला –
स्वतःच्या तालावर वाट्टेल तसा नाचवतो आहे .
यश ,मागच्या वर्षी ..नारायणकाका माझ्या घरी आले,
डोक्यावर पाय ठेवीत म्हणाले ..सेठ ..दया करा माझ्यावर ..
तुम्ही डायरेक्टर असलेल्या बँकेकडून मला पन्नास हजार रुपये लोन म्हणून मंजूर करा .
माझ्या पोरीचा संसार उघड्यावर येऊ देऊ नका , माझा जावाई भांडणे करतोय रोज ,
धंद्यासाठी त्याला पन्नास हजार द्या, नाही तर ..सांभाळ तुम्ही तुमच्या पोरीला , मी चाललो
तिला सोडून.
असे संकट आणलाय हो या हरामखोर भाच्याने ..कुठून दुर्बुद्धी झाली होती मला ..माझी गरीब
पोरगी सापडलीय या सैतानाच्या तावडीत .
तुम्हीच जमानतदार ,ग्यारंटीदार व्हा .. आणि कुणाला पण सांगू नका .ही गोष्ट ..
आमच्या यश साहेबांना पण नका सांगू. मी तुमचे लोन फेडून टाकतो ,विश्वास ठेवा माझ्यावर .
यश ,आपल्या नारायणकाकांची कहाणी सगळी खरी आहे, नशीब रुसलाय त्यांचे त्यांच्यावर .
मी म्हणालो ..
नारायणकाका ..माझे ऐका तुम्ही –
एक करा ..मी तुमच्या पोरीला देतो वीस- पंचीवीस हजारपर्यंत लोन म्हणून ,
पोरीला सांगा छोट मोठ दुकान कर सुरु तुमच्या वस्तीत .
हे पैसे तुम्ही जसे जमेल तसे मला परत करा , तुमची इमानदारी ,,तारण असणार आहे.
तुम्ही बँकेत वगेरे जाऊ नका ..ते कर्ज, त्यावरचे व्याज , नको त्या भानगडी .
माझ्या सांगण्याचा काही परिणाम झाला नाही .काकांचे म्हणणे एकच ..त्यंच्या जावयाला पन्नास
हजार पाहिजेत लोन म्हणून त्याला नवा धंदा सुरु करयचा बस हे एकच मागणे आहे त्याचे ..आणि धमकी सुद्धा .
दोन ग्यारंटीदार पाहिजेत ..एक तुम्ही व्हा ,दुसरा जामीनदार मी स्वतहा होतो ..माझ्यावर विश्वास ठेवा
सेठ तुम्ही .
यश, माझ्या व्यावहारिक बुद्धीला त्या दिवशी काय झाले होते कुणास ठाऊक ,
नारयणकाकाच्या डोळ्यातल्या पाण्याने मी विरघळून गेलो ..आणि त्याच्या जाव्य्ला कर्ज मंजूर करून दिले .
गेले वर्षभरात ,नारयणकाकांनी जीवाचा आटापिटा करून व्याज थकबाकी होऊ दिली नाही ..पण.मुद्दलात
एक रुपया आलेला नाही ..
आता मला नोटीस पाठवलीय बँकेने ..हे कर्ज खाते ..काय करायचे याचे आता ?
यश आता तू स्वतः लक्ष दे यात .आणि दहा –वीस हजार तरी भरले पाहिजेत या लोन खात्यात .
माळीकाकांनी नाश्त्याच्या प्लेट आणून ठेवल्या ..
त्याच वेळी आणखी एक गाडी गेट समोर थांबली .आणि त्यातून एक व्यक्ती उतरली ..
बागेत यशला आणि आधी आलेल्या सेठला नमस्कार करीत म्हणाली ..
यश , या सेठ्नी जे काम आणले आहे न.. माझे पण..तसेच काम आहे तुझ्याकडे ..
नारयण काकाच्या जावयाचे प्रताप सांगायला आलोय मी ..
आता तूच यातून सोडव आम्हाला ..
आधी आलेले सेठ बोलले ..यश , असे आम्ही दोघेच असुत असे समजू नको ..
अजून काय काय फेस करावे लागेल ..काय माहित .?
यश त्या दोघा सेठ लोकांना म्हणला ..
थोडा वेळ द्या मला ..मी तुमच्या सोबत आहे..यातून मार्ग काढू या आपण.
ते आलेले दोघे निघून गेले ..
यशच्या मनात आले ..या जावयाकडे पाहिलेच पाहिजे ..याला ढील देता कामा नये.
मधुराने अगदी बारकाईने या जावयाचा उद्योग नेमक्या वेळी आपल्या समोर आणलाय.
ग्रेट मधुरा , तू माझ्या सोबत आहेस ..लव्ह यु डियर ...!
आणि त्याला आज्जीने सुचवलेल्या कार्यक्रमाची आठवण झाली..
रविवारी ..मधुरा .सकाळी सकाळी त्याच्याकडे येणार ..
तिला दिवसभर राहण्यासाठी ये असे आज ऑफिस मध्ये गेल्या सांगयचे “
ती नक्की "हो" म्हणेल याची खात्री होतीच यशला .
------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात ..
भाग – ३३ वा लवकरच येतो आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------